✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

व
वामन देशमुख यांनी
Tue, 04/01/2025 - 10:46  ·  लेख
लेख
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!
  • समृद्धी महामार्गावर टोल वाढला.
  • महामार्ग ६५ वर हैदराबाद-विजयवाडा दरम्यान टोल कमी झाला!
ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत. राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.
  • एनडीए
  • इंडिया
--- नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. - द्येस्मुक् राव्
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37218 वाचन

💬 प्रतिसाद (341)

प्रतिक्रिया

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/01/2025 - 16:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/01/2025 - 17:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

"मार्मिक"!

वामन देशमुख
Tue, 04/01/2025 - 22:07 नवीन
बाकी, व्यंगचित्र अगदी "मार्मिक" आहे हं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गोरगरिबांसाठी !

चौथा कोनाडा
Tue, 04/01/2025 - 18:59 नवीन
गोरगरिबांसाठी !
  • Log in or register to post comments

...हे पाहून मौज वाटली!

वामन देशमुख
Tue, 04/01/2025 - 21:58 नवीन
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा! काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!
  • Log in or register to post comments

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/01/2025 - 22:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

कोरोना काळात रस्तेबंदी असताना

श्रीगुरुजी
Wed, 04/02/2025 - 09:41 नवीन
Image removed. कोरोना काळात रस्तेबंदी असताना मी सुद्धा स्वत: गाडी चालवित वांद्र्यातून पंढरपुरास गेलो होतो. वांद्रे-पंढरपूर हा रस्ता दुर्गम, धोक्याचा व खड्ड्यांनी भरलेला आहे. माझे साहस एखाद्या वीर जवानाप्रमाणे होते. हे सर्व करण्यामागे माझी देशभक्तीच होती. जय हिंद जय महाराष्ट्र.
  • Log in or register to post comments

कुणी फटफटी तर कुणी मोटार!

वामन देशमुख
Wed, 04/02/2025 - 10:00 नवीन
या लोकांची मज्जाये, कुणी फटफटी चालवतंय तर कुणी मोटार चालवतंय, देश-राज्य मात्र नरेंद्र-देवेंद्र चालवताहेत! --- अवांतर: व्वा! खूप दिवसांनी फटफटी हा शब्द वापरला; एकदम भारी वाटलं! माझ्या बालपणी बाबांकडे रॉयल एनफिल्ड बुलेट होती. तेंव्हा मी ती चालवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी (बुलेट, जावा, येझदी, राजदूत इ. च्या काळात) मोटारसायकलीला फटफटी म्हणायचे. बाइक हा शब्द कदाचित कुणाला माहीतही नसावा! कालांतराने मी माझी रॉली घेतली. तेंव्हा, "वामन्या, घेतलास काय तुझी तुझी फटफटी लाष्टला?" असे मित्र म्हणाले होते. आता हे सर्व आठवले. त्यानिमित्ताने रागांचे आभार मानू की उठांचे आभार मानू? - (रॉलीप्रेमी) द्येस्मुक् राव्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

चौथा कोनाडा
Wed, 04/02/2025 - 11:14 नवीन
+१ गेले ते फटफटीचे दिवस ! किती सुटसुटीत ध्वनीदर्शक शब्द होता ! मोटारसायकल लै लांब अन बाईक लै बायकी शब्द !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

'सायकल चालवून कंटाळा आला,

रामचंद्र
Fri, 04/04/2025 - 00:26 नवीन
'सायकल चालवून कंटाळा आला, फटफट झाली जुनी...' हे चित्रपटगीत आठवतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

बरं झालं

सुबोध खरे
Wed, 04/02/2025 - 10:24 नवीन
बरं झालं ते लखनौहुन उत्तरप्रदेशात ला गेले नाहीत किंवा बंगळुरूतून कर्नाटकला गेले नाहीत . नाही तर माझ्या सारखे त्यांना पण मुंबईतून महाराष्ट्रात जायला लागले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुस्लिम महिला वफ्फ

श्रीगुरुजी
Wed, 04/02/2025 - 13:57 नवीन
मुस्लिम महिला वफ्फ विधेयकाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या
  • Log in or register to post comments

सौगात-ए-मोदी ची उधळपट्टी

रात्रीचे चांदणे
Wed, 04/02/2025 - 19:16 नवीन
सौगात-ए-मोदी ची उधळपट्टी कदाचित वक्फ विधेयकासाठीच दिली असेल. सामान्य मुस्लिम लोकांचा विरोध थोडातरी कमी झाला असेल.
  • Log in or register to post comments

बाजार

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/03/2025 - 09:54 नवीन
सेन्सेक्स ३०० अंकानी खाली. US tariffs hit Indian markets as Sensex falls over 300 points, Nifty below 23,250 ट्रम्प ह्यांच्या आयात शुल्काच्या निर्णयावर जगातील सर्व देशप्रमुखांच्या प्रतिक्रिया येत आहेत. Meloni called a 20% tariff rate imposed on the European Union "wrong", while Albanese said a 10% import tax on Australia's goods was "unjustified." Ireland, Taoiseach Micheál Martin said Trump's decision was "deeply regrettable" and benefitted "no-one". Japan said its 24% levy was "extremely regrettable" and could violate World Trade Organization and US-Japan agreements, while Thailand said it would negotiate its 36% tariff. https://www.bbc.com/news/articles/cvgql020y5lo https://indianexpress.com/article/business/market/us-donald-trump-tariffs-india-stock-markets-sensex-nifty-50-9921556/ भारतातील प्रतिक्रिया- 'आपल्याला काहीच फरक पडणार नाही' तर 'झाला तर फायदाच होईल भारताला" अशा वाचायला मिळत आहेत.
  • Log in or register to post comments

भारतातील प्रतिक्रिया-

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 11:08 नवीन
भारतातील प्रतिक्रिया- 'आपल्याला काहीच फरक पडणार नाही' तर 'झाला तर फायदाच होईल भारताला" अशा वाचायला मिळत आहेत. कोणी दिली अशी प्रतिक्रिया?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

वर्तमान

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/03/2025 - 11:25 नवीन
इंग्रजी वर्तमानपत्रांत उद्योजकांनी दिली आहे. काल शेयरमार्केटमधील दलालही असेच म्हणत होते. सरकार/पंतप्रधान्/पियुष गोयल कोणतीच प्रतिक्रिया देणार नाहीत हे आधीपासुन माहित आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कोणकोणत्या उद्योजकांनी अशी

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 12:36 नवीन
कोणकोणत्या उद्योजकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे? कोणकोणते दलाल असे म्हणत होते? सरकार/पंतप्रधान्/पियुष गोयल कोणतीच प्रतिक्रिया देणार नाहीत हे आधीपासुन माहित आहेच. म्हणजे देश चालविणाऱ्या अधिकृत सरकारकडून कोणत्याही अधिकृत नेत्याने अजूनपर्यंत अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. पण माईडी कोणतेतरी अनामिक उद्योगपती, अनामिक दलाल यांच्या निराधार प्रतिक्रिया वाचून नाचायला लगली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/03/2025 - 12:57 नवीन
ट्रम्पने मोदीना बोलावुन व्हाईट हाउसमध्येच भारताचा अपमान केला. बेड्या घालुन्,साखळ्या घालुन भारतियांना परत पाठवले.. त्यावर एक अक्षर न बोलणारे आता काही बोलतील ह्याची अपेक्षाच नाही. आयात्शुल्कावर आता महत्वाचे देशप्रमुख प्रतिक्रिया नोंदवत आहेत. "वसुधैव कुटुंबकम/विश्वगुरु' करणारे मात्र गप्प आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 13:13 नवीन
खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर मार्गाने घुसलेल्या पुरूषांना ट्रंपने धोतर, कोट, टोपी, उपरणे, पानसुपारी, भेटवस्तू, दक्षिणा देऊन आणि महिलांना इरकली, लुगडं, धारवाडी खण, मोगऱ्याची वेणी देऊन ओटी भरून विमानाच्या प्रथम वर्गातून पाठवणी करायला हवी होती. पाठवणी करताना निरोप द्यायला ट्रंप दांपत्य विमानतळावर यायला हवे होते आणि प्रत्येकाला "पुन्हा यायचं हं आणि आल्यासरशी चांगलं महिनाभर रहायचं हं" असं सांगून गळाभेट घ्यायला हवी होती. माईडे तू नानांची, समोरच्या दुकानातल्या मारवाड्याची, कोपऱ्यावरच्या पानवाल्याची, पोस्टमनची प्रतिक्रिया घे पाहू आणि आम्हालाही सांग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हे

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/03/2025 - 14:51 नवीन
"धोतर, कोट, टोपी, उपरणे, पानसुपारी, भेटवस्तू, दक्षिणा देऊन आणि महिलांना इरकली, लुगडं, धारवाडी खण" हे नाहीतर हातापायात बेड्या.. ह्यामधे काहीच नाही का ? बायनरी थिंकिंग म्हणतात ते हे. तुम्ही आमच्याबरोबर आहात नाहीतर तुम्ही आमचे शत्रु. मुलगी हवी तर ती ऐश्वर्या रायसारखीच नाहीतर मी अविवाहितच राहणार ही मानसिकता. आयात शुल्क लावले म्हणुन ईतर देश ह्यावर कसा मार्ग शोधायचा ह्यावर विचार करत आहेत. आणि ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते कसे योग्य आहे ह्यावर अनेक भारतिय ट्रम्पचे कौतुक करत आहेत. उद्या बेकायदेशीर भारतियांना ट्रम्पने गोळ्या घालुन मारले तरीही मौनी पंतप्रधान गप्प बसतील आणि त्यांचे समर्थक "तो अमेरिकेचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणुन समर्थन करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 15:02 नवीन
ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते कसे योग्य आहे ह्यावर अनेक भारतिय ट्रम्पचे कौतुक करत आहेत. हो ना. आमच्याकडे सकाळी वृत्तपत्र टाकणारा, महापालिकेतील मूषकसंहार कार्यालयातील एक लिपिक, आरामखुर्चीतून झुलत झुलत वामकुक्षी करणारे एक निवृत्त पणजोबा, झालंच तर नाक्यावरचा पानवाला असे अनेक भारतीय आयातशुल्क वृद्धीसाठी ट्रंपचे कौतुक करताहेत. मौजे गुडमुडशिंगी (खुर्द) मध्ये तर कोपऱ्याकोपऱ्यावर फलक लावून त्यावर ट्रंपचे चित्र व त्याखाली वस्तादाने डाव टाकला असं लिहून फटाक्यांची आतषबाजी करताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

विनोद ठीक पण

स्वधर्म
गुरुवार, 04/03/2025 - 14:56 नवीन
माईंचा मूळ मुद्दा जो की इतके सर्व देश प्रतिक्रीया देत असताना आपले नेते एक अवाक्षरही प्रतिक्रीया देत नाहीत हा आहे. वी आर जष्ट टेकर्स, विदाऊट करेज टू डिसअ‍ॅग्री अशी देशाची प्रतिमा जागतीक पटलावर होत आहे. शेपूट घातले तरी त्याचे समर्थन आपण कसे करू शकता हे जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आंतरराष्ट्रीय राजकारणात

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 15:13 नवीन
आंतरराष्ट्रीय राजकारणात घायकुतीला येऊन काहीही करत नाहीत. प्रत्येक वेळी पूर्ण अभ्यास करून, लाभ-नुकसानीचा सखोल विचार करून त्यानुसार प्रतिक्रिया देऊन भूमिका घेतली जाते. १९९८ मधील अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध घातल्यानंतर त्या संबंधात भारत-अमेरिका चर्चा सुरू झाली व चर्चेच्या अनेक फेऱ्यांनतर जो अणुकरार झाला तो २००८ मध्ये. आताही पूर्ण अभ्यास करून योग्य तो निर्णय योग्य वेळी होईल व त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विवाह झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अपत्य जन्माला येत नाही. त्यासाठी ९ महिने लागतात. तसेच असे आंतरराष्ट्रीय विषय एका दिवसात हातावेगळे होत नाहीत. त्यासाठी वेळ द्यावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

ते ठीक पण

स्वधर्म
गुरुवार, 04/03/2025 - 17:11 नवीन
बाकीचे देशही विश्लेषण करतच असतील, तरीही त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. आपण आत्ता विश्लेषण करत आहोत. अगदी थायलंडसारखा देशही प्रतिक्रिया देता झाला. ते घायकुतीला आलेत असे अजिबात वाटत नाही. जिथल्या तिथे पहिली प्रतिक्रिया देणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आब राखण्यासाठी आवश्यक होते. भारतीयांना परत पाठवले ते ठीक पण बेड्या घालून पाठवणे हे देशासाठी अत्यंत अपमानकारक आहे. त्यावरही चिडीचूप! तरीही तुमच्या मनातील सरकारच्या प्रतिमेल धक्का लागत नाही, हे थोडे जास्तच बाजू घेणे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तात्काळ व घाईघाईने

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 17:17 नवीन
तात्काळ व घाईघाईने प्रतिक्रिया द्यावी असा हा निर्णय नाही. सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेणे हीच आंतरराष्ट्रीय राजकारणात योग्य प्रक्रिया असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

बाकीचे देशही विश्लेषण करतच

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 17:18 नवीन
बाकीचे देशही विश्लेषण करतच असतील, तरीही त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. बहुतेक त्या त्या देशात खोट्या पदवीवाले पीएम असतील त्यामुळे ते लगेच प्रतिक्रिया देत असतील, आपल्या देशात खर्या पदवीवाले पीएम असल्याने डोके चालवून विश्लेशन करुनउत्तर द्यायला थोडा वेळ लागत आसावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

बनिया

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/03/2025 - 17:49 नवीन
"सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेणे हीच आंतरराष्ट्रीय राजकारणात योग्य प्रक्रिया असते." प्रश्नपत्रिकेत एक/दोन वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न होते. ते सोडुन "आम्ही संदर्भासहित स्पष्टीकरणच लिहिणार" म्हणून ह्यांनी उत्तर पत्रिकाच कोरी ठेवली. काय बोलणार? एखाद्या हुशार बनियाने डाळींच्या भावाचा फलक ज्या सहजतेने दुकानाबाहेर लावावा तसे ट्रम्प ह्यांनी काल आयात शुल्कांचा फलक दाखवला.ईतर देशप्रमुखांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अशा प्रतिक्रिया द्यायला प्रचंड व्यासंग्,सखोल ज्ञान वगैरेची काहीही गरज नसते/नव्हती. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आंतरराष्ट्रीय राजकारणात एका

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 18:03 नवीन
आंतरराष्ट्रीय राजकारणात एका वाक्यात उत्तर द्या असे प्रश्न कधीही नसतात. काही प्रश्नांना तर उत्तर देण्यासाठी अनेक प्रबंध लिहावे लागतात. "फक्त एक दिवसासाठी पंतप्रधान करा, चोवीस तासात काश्मीर प्रश्न सोडवून दाखवितो" असला मूर्खपणा फक्त मुर्खांसाठी असतो. अगदी ११ सप्टेंबरनंतर सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबरला अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला नव्हता. १९९० मध्ये सद्दामने कुवेत बळकावल्यानंतरही अमेरिकेने जवळपास साडेपाच महिन्यांनंतर युद्ध सुरू केले होते. अमेरिका-युक्रेन युद्ध म्हणजे हत्ती व मुंगीचे युद्ध आहे, परंतु तीन वर्षांनंतरही रशियाला विजय मिळालेला नाही वा युद्ध थांबले नाही. कायमचूर्ण वटी झोपताना घ्या, सकाळी पोट साफ असे आंतरराष्ट्रीय राजकारण नसते. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मग

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/03/2025 - 23:22 नवीन
मग चीन्,जपान्,युरोपियन युनियन मधील देश ह्यांनी गेल्या काही महिन्यात अमेरिकेच्या धोरणांवर ज्या तात्काळ प्रतिक्रिया दिल्या, त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नाही पण भारताला मात्र आंतरराष्ट्रीय राजकारण चांगले कळते असे समजायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तसं नाही हो. आपण विश्वगुरु

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 23:30 नवीन
तसं नाही हो. आपण विश्वगुरु आहोत अशा ' फालतू ' गोष्टींकडे बघायला वेळ ( धमक ) कुठे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

भारताला आंतरराष्ट्रीय राजकारण

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 23:40 नवीन
भारताला आंतरराष्ट्रीय राजकारण व्यवस्थित समजू लागले आहे. ते कसे ते काही काळातच समजेल. 'ह्यां'ना दोन मिनिटात साबुदाण्याची लापशी करून देण्याइतके आंतरराष्ट्रीय राजकारण सोपे नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

वक्फ बिल लोकसभेत सम्मत झाले.

विजुभाऊ
गुरुवार, 04/03/2025 - 11:52 नवीन
वक्फ बिल लोकसभेत सम्मत झाले. उबाठा सेनेने त्यांचे वक्फ बिलाविरुद्ध मत नोंदवले.
  • Log in or register to post comments

जन्मापासून मुस्लिमधार्जिणा

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 12:37 नवीन
जन्मापासून मुस्लिमधार्जिणा असलेल्या पक्षाकडून काही वेगळे अपेक्षित होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हे माहीत असूनही तुमच्या

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 22:16 नवीन
हे माहीत असूनही तुमच्या लाडक्या पक्षाने त्यांच्यासोबत युती का केली होती? सध्या तुम्ही तुमच्या लाडक्या पक्षाच्या धोरणावर आणि पक्ष वाढीवर ( भ्रष्ट नेते आयात ) नाराज असल्याचे जाणवते. नैराश्यातून आलेला तुमचा प्रतिसाद बघता लवकरच तुम्ही संन्यास घेणार असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पूर्वी प्रचारात अमित शाहंनी

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 22:35 नवीन
पूर्वी प्रचारात अमित शाहंनी एक बोधकथा सांगितली होती. ती सांगण्याचा मोह आवरत नाही. एका अरण्यात एक साधू तपश्चर्या करीत असतो. त्याच्या गुहेत एक मूषक वास्तव्यास येतो. साधू त्यालाही आपल्याबरोबर थोडे अन्न द्यायचा. एक दिवस मूषक साधुला सांगतो की मला त्या मार्जाराचे खूप भय वाटते. त्यामुळे साधू त्या मूषकाचे मार्जारात रूपांतर करतो. काही दिवसांनी तो बोका साधुला सांगतो की मला त्या श्वानाचे खूप भय वाटते. त्यामुळे साधू बोक्याचे रूपांतर श्वानात करतो. काही दिवसांनी श्वान साधुला सांगतो की मला त्या शार्दुलाचे खूप भय वाटते. त्यामुळे तो साधू श्वानाचे रूपांतर शार्दुलात करतो. काही दिवसांनी शार्दूल साधुला सांगतो की मला मूषकाचे खूप भय वाटते. तो रात्री केव्हाही अंगावर चढून आयाळ कुरतडतो. शेवटी वैतागून साधू शार्दुलाला पुन्हा एकदा मूळ मूषक स्वरूपात आणतो. भाजपने शिवसेनेला मूषक स्वरूपातून शार्दूल स्वरूपात नेले, परंतु शार्दूल होण्याची पात्रता नसल्याने पुन्हा मूळ मूषक स्वरूपात आणून बिळात नेऊन ठेवले. तात्पर्य - मूषकास मूषक स्वरूपातच ठेवावे, शार्दूल स्वरूपात नेले तरी तो मूषकच राहतो. बाकी मी संन्यास वगैरे घेत नसतो. येथील थापाड्यांच्या थापा उघडकीस आणण्याचे माझे कार्य अखंडित राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

एक अजगर आपल्या मालकाच्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 22:39 नवीन
एक अजगर आपल्या मालकाच्या बाजूला झोपून रोज माप घेतो, एके दिवशी त्याची साईज मालका पेक्षा मोठी झाल्यावर मालकालाच गिळतो, असे अजगर महाराष्ट्र गोमंतक पार्टी, अकाली दल, आसाम गण परिषद नी शिवसेना ह्यांनी पाळले होते म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

परत एकदा निर्लज्ज खोटेपणा.

टीपीके
Fri, 04/04/2025 - 00:28 नवीन
परत एकदा निर्लज्ज खोटेपणा. गुरुजींनी इथेच अनेकवेळा दाखवून दिले आहे की कोण अजगर होते आणि कोणी कोणाला पाळले होते, तेव्हा तिकडून तुम्ही पळ काढला आणि परत तीच गरळ ओकायला निर्लज्जपणे इकडे आलात. तुम्हाला माहित आहे खोटे 2 ओळीत लिहिता येते पण ते खोडण्यासाठी खूप मेहनत घेऊन मुद्देसूद लिहावे लागते. दिवसभर गावभर हुंदडायला आणि निर्लज्जपणे फुकटचा पगार खाणाऱ्या माणसासाठी काड्या सारणे हा खेळ आहे, पण प्रत्येक वेळी तुमचे खोटे उघडे पाडायला इतरांकडे वेळ असेलच असे नाही. म्हणून उगाच स्वतःची पाठ थोपटू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खोटा कोण आहे ते अख्खा

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/04/2025 - 00:48 नवीन
खोटा कोण आहे ते अख्खा महाराष्ट्र जाणतो, ज्यांच्या डिग्र्याच खोट्या आहेत ते नी जे बांडगुळ बनून शिवसेनेच्या जीवावर वाढले ते स्वतःला मोठे म्हणणारच! अहो कसे पाया पडायला यायचे मातोश्रीवर विसरले का? सेनेने फेकलेल्या १२७ की १२० जागा घेऊन पळत सुटायचे! १७१ की १८० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला ११७ जागा पदरात मिळालेला पक्ष वाढवतो ह्यावर एखादा मूर्खच विश्वास ठेवेल किंवा एखादा अंधभक्तच! मूर्ख अंधभक्त असेल तर तो ह्यालाही खोटेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

गुरुजींनी इथेच अनेकवेळा

श्रीगुरुजी
Fri, 04/04/2025 - 08:21 नवीन
गुरुजींनी इथेच अनेकवेळा दाखवून दिले आहे की कोण अजगर होते आणि कोणी कोणाला पाळले होते, युती होण्यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत शून्य जागा जिंकणाऱ्या पक्षाला भाजपने खांद्यावर घेऊन मोठे केले. पण हे इतके नालायक की आपल्या कर्तृत्वानेच आपण मोठे झालो या भ्रमात भाजपच्या कानातच . . . शेवटी भाजपने खांद्यावरून उतरवून दाणकन जमिनीवर आदळून पेकाट मोडले. १ वर्षापूर्वी देशाचा पंतप्रधान होणार अशी दर्पोक्ती करणारे आज राज्यात विरोधी पक्षनेता होण्याच्या पात्रतेचे सुद्धा राहिले नाहीत व पात्रता नसली तरी आमच्यावर दया करून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद द्या अशी भाजपचे पाय धरून विनवणी करीत आहेत. पण मांजर जसे उंदराला खेळवते तसे भाजप खोडकरपणे यांना खेळवतोय. विरोधी पक्षनेतेपदासाठी एकनाथ शिंदेंशी बोला असे सांगून सांगता येत नाही व सहनही होत नाही अशी भाजपने उबाठाची केविलवाणी अवस्था केलीये. शेवटी नाक मुठीत धरून एकनाथ शिंदेंंना शरण जावे लागणार आणि भाजप उपकार केल्यासारखा आपल्याला हवा तोच माणूस विरोधी पक्षनेता करणार व भास्कर जाधव, आठा वगैरे चरफडत हात चोळत बसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

कुठे त्या भुजबळांच्या नादाला

सुबोध खरे
Fri, 04/04/2025 - 11:03 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी म्हटलेच होते ,तुम्ही

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 23:14 नवीन
मी म्हटलेच होते ,तुम्ही संन्यास घेणार. आता असंबद्ध बोधकथा सांगून लवकरच भोंदूबाबा होणार ह्याची तयारी चालू केलीसुद्धा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बोधकथा प्रचंड झोंबलेली दिसते.

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 23:28 नवीन
बोधकथा प्रचंड झोंबलेली दिसते. मी तुमच्यासारख्यांच्या झोंबणाऱ्या जखमांवर नियमित तिखटमीठ टाकण्यासाठी येत राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

शेवटी उठाने द्विधा मनस्थिती व

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 14:09 नवीन
शेवटी उठाने द्विधा मनस्थिती व संदिग्धावस्थेतून बाहेर पडून मुस्लिम अनुययाची व हिंदू विरोधाची आपल्या पिताश्रींपासून चालत आलेली भूमिका सुस्पष्टपणे घेतली यासाठी हार्दिक अभिनंदन! वरकरणी तोंडदेखले हिंदूप्रेम, आमचं हिंदुत्व गाईचे नाही तर बाईचे अशी हास्यास्पद भूमिका, मुस्लिमप्रेम उघड उघड दाखविण्यास संकोच या मानसिक कुचंबणेतून उठा बाहेर आले. मुस्लिमप्रेम सांगता येत नाही व हिंदूउन्नती सहन होत नाही ही अवस्था शेवटी उठाने संपुष्टात आणली. उठाच्या संदिग्ध भूमिकेमुळे ओवेसी, अबू आझमी, कॉंग्रेस इ. साशंक असायचे. पण शेवटी धाडस करून उठाने अत्यंत निसंदिग्धपणे मुस्लिम अनुनयाची भूमिका घेऊन सर्व संदिग्धता, साशंकता कायमस्वरूपी संपुष्टात आणली. मुस्लिमांना आता अधिकृत एक नवीन मसीहा मिळाला. मृतावस्थेत पडून शेवटचे आचके देणाऱ्या उबाठा गटाला मुस्लिम मतांचा प्राणवायू मिळून हा गट अति दक्षता विभागातून बाहेर जनरल वॉर्ड मध्ये येण्याची शक्यता निर्माण झालीये. सर्व उबाठाप्रेमींना यासाठी दिलोजानसे बधाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हा अजून पाषाणयुगात वावरतोय.

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 18:38 नवीन
Image removed. हा अजून पाषाणयुगात वावरतोय. अडीच वर्षे कुंभकर्णी निद्रा केल्यानंतर असंच होणार.
  • Log in or register to post comments

एखाद्याने किती खरं बोलावं?

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 19:26 नवीन
एखाद्याने किती खरं बोलावं? काही मर्यादा?? काढा रे इडी, सीबीआय, निवडणूक आयोग, गद्दार…..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

*''छत्रपती शिवाजी महाराज १००

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 19:26 नवीन
*''छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, त्यांनी सर्वधर्मभाव जोपासला.”* - ⁠*भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* https://saamtv.esakal.com/maharashtra/gadkari-slams-nitesh-ranes-controversial-statement-on-shivaji-maharaj-bdk97 *इतिहासाचे विद्रूपीकरण करणाऱ्या भाजपच्या उथळ नेत्यांना व भक्तांना नितीन गडकरींनी स्पष्टच शब्दात चपराक दिली आहे.*
  • Log in or register to post comments

बरोब्बर

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/03/2025 - 19:34 नवीन
पांचजन्य्,ऑर्गनायझरच्या पलिकडे जाउन जे वाचन करतात त्यातल्या मोजक्या भाजपा नेत्यांत गडकरी ह्यांचा समावेश होतो. गडकरी बरोबर बोलतात पण वेळ निघुन गेल्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हुकुमशाहीत वेळ निघुन

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 19:55 नवीन
हुकुमशाहीत वेळ निघुन गेल्यावरच बोलावे लागते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आत ३ एप्रिल आहे. साहजिकच आहे

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 19:41 नवीन
आत ३ एप्रिल आहे. साहजिकच आहे काल २ एप्रिल होती आणि उद्या ४ एप्रिल असेल, परवा ५ एप्रिल असेल आणि साहजिकच आहे मग ६ एप्रिल असणार, त्यानंतर ७ एप्रिल येणार. येणार म्हणजे काय येणारच. न येऊन चालणारच नाही. मी मानगुटीला धरून ७ एप्रिलला घेऊन येणार. नाही आला तर पोटात वाघनखे खुपसून कोथळा बाहेर काढून महाराष्ट्राच्या मातीत गाडीन.
  • Log in or register to post comments

मागचा आठवडा आंद्रे वपाडाव

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 22:01 नवीन
मागचा आठवडा आंद्रे वपाडाव ह्यांनी गाजवल्या नंतर हा आठवडा aagya गाजवताहेत! श्रीगुरुजी एकटेच लढताहेत, भक्तांकडून योग्य ती रसद श्रीगुरूजीना पोहोचत नाहीये. पुढचा आठवडा बहुतेक “माई दी ग्रेट” गाजवणार! त्यापुढचा बिरुटेसर! :) मस्त रे मस्त! कुणी फिरवा दंडपटा कुणी काढा तलवारी, पण सोडू नका शत्रूला मोकळे ह्या मुलुख मैदानी! :) - २० मिपाकराना प्रत्यक्ष भेटलेला अमरेंद्र बाहुबली!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा