(मुलिंनी धरु नये अबोला)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
25 Dec 2016 - 9:39 am

आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन
माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो.

पेरणा अर्थातच

(मुलिंनी धरु नये अबोला)

मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये
त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो

आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये
मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात

मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा सोडून लांब जाउ नये
मित्रांशी पंगा घेउन मुले तुमच्या बरोबर आलेली असतात

जावे दूरवर फिरायला, उगाच फालतु कारणे सांगु नयेत,
वरवर नाही म्हणताना तुम्हाला मनातून उकळ्या फुटलेल्या असतातच

इमान राखावं पल्सरशी, उगाच बुलेट कडे व्यर्थ पाहू नये
उफाळून आलेल्या भावना, पल्सरच्या आरशात दिसतात याचे भान राखावे

- उखळात कांडणे

eggsआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारप्रेम कविताभूछत्रीकरुणसंस्कृतीइतिहासशुद्धलेखनऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Dec 2016 - 9:45 am | ज्ञानोबाचे पैजार

फक्त एवढेच वाटते की...

उपेक्षा मुलांची कुठेही नसावी
मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी
नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना
मुलांचे स्मरण असो टवळ्यांना

- चलदूर अंघोळकर

शार्दुल_हातोळकर's picture

25 Dec 2016 - 10:13 am | शार्दुल_हातोळकर

हसुन हसुन लोळलो. :=))

कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !!
तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!

प्राची अश्विनी's picture

24 Sep 2022 - 8:10 am | प्राची अश्विनी

हहपुवा.

पैसा's picture

25 Dec 2016 - 9:48 am | पैसा

=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Dec 2016 - 10:28 am | हतोळकरांचा प्रसाद

अगागागागा!!!!

पैजारबुवा, मुजरा घ्या!
- ज्ञानोबांच्या पैजाराचे पैजार (अंघोळकरांचा प्रसाद)

चांदणे संदीप's picture

25 Dec 2016 - 2:32 pm | चांदणे संदीप

पैजारबुवा! =)) =))

कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =))

"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))

उखळातलं कांडण तुफान झालंय!!

Sandy

आदूबाळ's picture

25 Dec 2016 - 3:30 pm | आदूबाळ

"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))

+१

पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Dec 2016 - 5:28 am | अत्रुप्त आत्मा

@"पशु रोग" ››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

पद्मावति's picture

25 Dec 2016 - 4:10 pm | पद्मावति

=)) जबरदस्त.

संजय पाटिल's picture

25 Dec 2016 - 6:15 pm | संजय पाटिल

तुफान ... जबरी..

अजया's picture

25 Dec 2016 - 8:45 pm | अजया

=))))))

प्रचेतस's picture

25 Dec 2016 - 10:27 pm | प्रचेतस

अरारारारारा, =))

पैजारबुवा रॉक्स =))

खेडूत's picture

25 Dec 2016 - 10:30 pm | खेडूत

जब्रा!! :)

प्रसाद गोडबोले's picture

26 Dec 2016 - 3:24 am | प्रसाद गोडबोले

खतरनाक विडंबन =))))

अत्रुप्त आत्मा's picture

26 Dec 2016 - 5:25 am | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या =))

नीलमोहर's picture

26 Dec 2016 - 11:00 am | नीलमोहर

मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये,
त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो

डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये,
कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात

ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये,
असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात

ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये,
वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच

आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये,
स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात

इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये,
तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे

- भावना सांडणे

ग्रेंजर's picture

26 Dec 2016 - 11:43 am | ग्रेंजर

क्या बात!!!!!!!!!!!!!! भावना सांडणे पण जबरदस्त :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Dec 2016 - 2:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

लैच भावना सांडणारी कविता.

अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला.

रच्याकने :-
डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये,
कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात

हे सोडून बाकी सारे पटले.

पैजारबुवा,

अजया's picture

27 Dec 2016 - 5:44 pm | अजया

जबरदस्त निमो!

श्वेता२४'s picture

23 Sep 2022 - 5:00 pm | श्वेता२४

याला विडंबन नाही म्हणणार . नवी कविता म्हणून पाहते.

प्राची अश्विनी's picture

24 Sep 2022 - 8:11 am | प्राची अश्विनी

लय भारी. बाडीस

ग्रेंजर's picture

26 Dec 2016 - 11:43 am | ग्रेंजर

मूळ विडंबन पण मस्त!!!!!!!!!!

रातराणी's picture

27 Dec 2016 - 12:57 pm | रातराणी

:)

दंडवत स्वीकारा पैजारबोवा!!

विशाल कुलकर्णी's picture

27 Dec 2016 - 3:45 pm | विशाल कुलकर्णी

दंडवत घ्या प्रभूजी :)

चांदणे संदीप's picture

23 Sep 2022 - 4:45 pm | चांदणे संदीप

केवढे 'अबोली'चे फुलणे झाले आज. :)

सं - दी - प

श्वेता२४'s picture

23 Sep 2022 - 5:02 pm | श्वेता२४

ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये
त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो

हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))

प्राची अश्विनी's picture

24 Sep 2022 - 8:12 am | प्राची अश्विनी

पुन्हा एकदा दंडवत पैजारबुवा!

कर्नलतपस्वी's picture

24 Sep 2022 - 11:27 am | कर्नलतपस्वी

मस्तच

वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे
मग लोळता लोळता पोट का दुखावे?
मी ओळखून आहे सारे......

डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा?
मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा?
हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे
मी ओळखून आहे सारे .......

ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .