काही ही हां ... दिवाकर साहेब
थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , हेल्मेट परिधान केलेल्यांनाच् पंपा वर पेट्रोल मिळणार , दिवाकर रावतेंचा आदेश.
काय म्हणावे याला , हेल्मेट सक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक वाहतूक कशी समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही रावते साहेब ???
मुळातच हेल्मेट अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि हेल्मेट ही पूर्णपणे सुरक्षित आहे का , पुण्यात मंध्यतरी अपघातात हेल्मेट धारक दोन महिलांचा मृत्यु झाला मग यास जबाबदार कोण.
हेल्मेट पेक्षाही महत्वाचे आहे वेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम वाहतूक प्रणाली ,उत्तम रस्ते.
हे राहिले बाजूला आणि हेल्मेट सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात 30 लाख दुचाकी वाहने आहेत तितके हेल्मेट उपलब्ध आहेत का ???
मग कुठल्या निकषा वर करता अशी हेल्मेट सक्ती.
-मनिष अनुसे ७०५७२१८१०६
प्रतिक्रिया
22 Jul 2016 - 10:23 am | टवाळ कार्टा
पुणेकर का तुम्ही...मग चालूदे
22 Jul 2016 - 10:26 am | मनिषशिल्पाअनुसे
आपला ह्या सक्तिला विरोध आहे का पाठिंबा???
22 Jul 2016 - 10:36 am | एकुलता एक डॉन
हेल्मेट होते म्हणून 2 महिलांचा मृत्यू झाला ,नसते तर 2000 असत्या
22 Jul 2016 - 10:49 am | मनिषशिल्पाअनुसे
मान्य आहे की,हेल्मेट हे सुरक्षेचे साधन आहे....म्हणुन काय सक्ती????मुळात आपले रस्ते नीट नाही,ते राहील बाजुला.आणि बाकीचे ’उद्योग’ सुरु झाले आहेत......
22 Jul 2016 - 10:52 am | एकुलता एक डॉन
निवडून कोण देते ?
22 Jul 2016 - 10:54 am | एकुलता एक डॉन
23 Jul 2016 - 10:21 pm | चतुरंग
आंतर्पिके सुधा घेता येतील!! ;)
22 Jul 2016 - 11:14 am | पी. के.
दु चाकी स्वरांनी हेल्मेट घालावं हा प्राथमिक नियम आहे तो न पाळल्यामुळे सरकार ला सक्त्ती करावी लागतीय.
रस्ते नीट नाही आणि हेल्मेट या दोन गोष्टीचे लॉजिक नाय समजलं.
डोकं फुटून आपला जीव गेला तर यमाला असं नाय म्हणू शकत की रस्ते खराब केले ते लोक आगोदर उच्चल.
14 Aug 2016 - 9:09 pm | रॉजरमूर
खड्डे आणि हेल्मेट च्या संबंधातील लॉजिक नसेल कळत तर आजची ही बातमी वाचा .
सगळे लॉजिक क्लिअर होतील . इथे खड्डे ही आहेत आणि हेल्मेट ही आहे .
हेल्मेट घातले की जणू तुम्हाला जीवन सुरक्षा कवच प्राप्त होते असा समज असणार्यांनीही ही आणि म्हणून त्याचा धोशा लावणार्यांनीही बातमी अवश्य वाचावी .
16 Aug 2016 - 3:08 pm | पी. के.
आतिशय दुःखद बातमी.
अशी दुःखद बातमी दाखवून लॉजिक क्लिअर करण्याची काय हि मानसिकता..
हेल्मेट मुळे वाचला आशा खूप बातम्या असतात पण नकारात्मक चस्मा घातलेल्याना त्या नाही दिसतं.
हेल्मेट घातलं म्हणून वाचलो सांगणार भेटतात, हेल्मेट नाही घातलं म्हणून वाचलो सांगणार नाही भेटत.
17 Aug 2016 - 11:44 pm | थॉर माणूस
हे तुमचे हेल्मेट न घालण्यामागचे लाॅजिक असेल तर तुम्हाला हेल्मेटची गरजच नाही. हेल्मेट आघात कमी करण्याकरीता असते, ते काही अभेद्य कवच नाही. पण हेल्मेट मुळे वाचलेले किमान 5-6 लोक मला माहिती आहेत. 2 केस नव्या को-या रस्त्यावर घडलेल्या.
त्यामुळे हेल्मेट घालायचे नसेल तर राहूद्या, फक्त हा कायद्याने दंडनीय अपराध असल्याने (MVA 1988 section 129) अडवल्यावर पावती फाडली की रस्ते खराब म्हणून रडू नका.
19 Aug 2016 - 9:17 am | सुबोध खरे
+१००
सुयोग्य प्रतिसाद
22 Jul 2016 - 11:07 am | अभ्या..
चार हेल्मेट घ्यावेत अन सरळ पम्पाबाहेर स्टॉल लावावा.
10 रु. भाडे पेट्रोल भरेपर्यंत.
22 Jul 2016 - 11:10 am | मनिषशिल्पाअनुसे
त्याशिवाय ह्यांना कळणार नाही.....
22 Jul 2016 - 11:39 am | एकुलता एक डॉन
ह्याचा अर्थ सक्ती चा काही अर्थ नाही
22 Jul 2016 - 11:43 am | आनंदराव
ब्येष्ट धंदा. रोजचे 1000 तर कुठे नाही गेले
22 Jul 2016 - 11:47 am | अभ्या..
हा, जोपर्यंत पंपवाले ह्यात पडत नाहीत तोपर्यंत चांदीय. एकदा त्यांनी पंपावरच दोरीने बांधून हेलमेट लटकावले कि आपला बाजार उठला.
22 Jul 2016 - 6:03 pm | आनंदराव
त्ये बी खरयं म्हना
22 Jul 2016 - 12:16 pm | sagarpdy
हा प्रकार बहुतेक म.प्रदेश मध्ये चालू आहे (बहुधा)
23 Jul 2016 - 5:47 pm | लोनली प्लॅनेट
लय भारी शक्कल लढवली तुम्ही
22 Jul 2016 - 11:11 am | जागु
मला तर माझ्या घरातूनच सक्ती आहे. गेले ८-९ वर्षापूर्वी मी गाडी घेतली आणि ऑफिसला नेणार हे ठरले तेव्हा नवर्याने आधीच ताकिद दिली की हेल्मेट घालून गाडी नेणार असशील तर ने नाहीतर नको नेऊ. ह्यात पुर्ण काळजी होती. सात-आठ दिवस जरा मला जड गेल पण नंतर सवय झाली. आणि आता इतकी सवय झाली आहे की हेल्मेट नसेल तर मला त्रास होतो.
ही सक्ती मला एकदा लाभदायक ठरलेली. ऑफिसच्या रोडला रेल्वे ट्रॅक आहे. एक दिवस ट्रेन आल्याने फाटक बंद होते व पुढे खुप गर्दी होती म्हणून एका झाडाखाली उन होत म्हणुन गाडी बाजूला घेऊन तिथेच थांबले. इथे रस्ता पूर्ण मोकळा होता. पण एक मागून क्रेन आली आणि माझ्या अॅक्टीवाच्या पुढच्या भागाला धडक दिली. ती दिल्या बरोबर गाडी पडून मी पाठच्या बाजूने डोक्यावर पडले. मला कळलेच नव्हते काय झाले कारण अपघात होण्यासारखी परिस्थितीच नव्हती. नंतर पाहीले क्रेन पुढे जात होती. त्याला ओरडून थांबवले. माझ्या गाडीचा पुढचा भाग तुटला. हेल्मेटला खालच्या बाजूने थोडी चिर गेली. तेव्हा मला जाणवले की जर आज हेल्मेट नसते तर काय झाले असते. कोणताही प्रसंग सांगून येत नाही. आता रोड चांगला होता, ट्रॅफिक नव्हती की काही नव्हत. त्या क्रेन वाल्याने क्लिनर बरोबर घेतला नव्हता ही त्याची चुकी होती.
ह्या वरून मी हे शिकले की आपण स्वतःच्या सेफ्टीचा विचार करावा. सरकार सक्ती करतोय म्हणुन नाहीतर आपल्या स्वताच्या सेफ्टीसाठी हेल्मेट घाला. कोणाला त्याचा अगदीच त्रास होत असेल तर ती गोष्ट वेगळी.
22 Jul 2016 - 11:16 am | मनिषशिल्पाअनुसे
बरोबर अगदी......पण आज कोणी स्वतचा विचार करत नाही.....
23 Jul 2016 - 8:26 pm | ज्योति अळवणी
एकदम मान्य आणि अगदी बरोबर
20 Aug 2016 - 7:04 pm | मराठी कथालेखक
नवर्याचं ऐकणारी पत्नी म्हणून तुमचा सत्कार :)
22 Jul 2016 - 11:18 am | तुषार काळभोर
मग आगपाखड होणे बरोबरच आहे!!
22 Jul 2016 - 11:19 am | चौकटराजा
कोर्टाने आदेश दिल्याचा संदर्भ देत दिवाकर रावते हे हेलमेट सक्तीच्या पाठीमागे लागले आहेत आपल्याकडून कोर्टाची बेअदबी होउ नये म्हणून कोणताही राज्यकर्ता हेच करील. त्यात त्याना दोष देण्याचे कारण नाही. याच प्रमाणे पिंपरी चिंचवड मधील ६६००० अनधिकृत बांधकामे पाडून टाका म्हणूनही कोर्टाने आदेश दिलेला आहे. जोपर्यंत त्यातील एखाद्या बांधकामाच्या ढिगार्याखाली एखादे बालक सापडणार नाही तो पर्यंत ती कोर्टाची बेअदबी झाली हे राजकारणी ठरवणार नाहीत. त्यात मतदानाचा मोठा भाग आहे. त्याला मग माणुसकीचा मुलामा नगरसेवक द्यायला एका पायावर तयार असणार आहेत. या संदर्भात पेट्रोल पंप चालकानी पोलिस खात्याची उपस्थिती पेट्रोल पंपावर मागितली आहे. आधीच वहातुक पोलीसांची संख्या कमी
( कॅमेरा सेक्शन मधे पुणे शहरासाठी केवळ ६ पोलिस आहेत) असताना ह्या पेट्रोल पंपासाठी नवीन भरती करावी लागेल. लोक या आदेशातून पळवाट अशी काढतील की हेलमेट घेऊन जायचे. पंपावर प्रवेश करताच घालायचे व पंपाबाहेर आल्यावर काढून टाकायचे. खरी तळमळ दिवाकर रावतेंची तेंव्हाच सिद्ध होईल जेंव्हा चौकाचौकात- ते ही पूर्ण महाराष्ट्राच्या, निर्दयपणे झेब्रा लाईन, सिग्नल तोडणे,उलट्या दिशेने घुसणे चुकीचा ओव्हरटेक ई बाबत जबरा दंड वसूल केला जाईल त्यावेळी हेलमेट सक्तीवर कोणालाच काही बोलता येणार नाही. पण या साठी वहातुक पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी पुन्हा स्पेशल कॅमेरे बसवावे लागतील कारण खरी गोची तिथेच आहे.
हे जो पर्यंत होत नाही तो पर्यंत लोक म्हणत राहतील की हेल्मेट सक्ती हे कायद्याने बंधनकारक आहे व कोर्टाच्या आदेशामुळे सरकारचा नाईलाज आहे. पण मनातून नागरिकाना वाटेल की कुणाची तरी हेल्मेट खपविण्यार्या लॉबीचा यात वाटा आहे.
सिग्नल सुधारणे, वहातुक पोलिसांच्या कामगिरीकडे करडी नजर ठेवणे झाल्यास, रस्ते सुधारल्यास, झिब्रा मार्किंग नेहमी अद्ययावत ठेवल्यास लोक आनंदाने हेलमेट घालतील. पण ..... पण.....
22 Jul 2016 - 11:56 am | स्वीट टॉकर
काही वर्षांपूर्वी हेल्मेटसक्ती आली आणि खूप विरोध झाल्यामुळे विरून गेली. तेव्हां त्याबद्दल एक विनोदी लेख माझ्या वाचण्यात आला होता. त्याचा गाभा असा.
सरसकट हेल्मेटसक्ती करणं चूक आहे. काही जण हेल्मेटसक्तीला विरोध करतात त्यात त्यांचा काहीही दोष नाही. ते सर्व बिनडोक असतात. त्यामुळे त्यांच्या डोक्याचं रक्षण करण्यात काहीच पॉइन्ट नसतो. मात्र त्यांचा मेंदू नेमका कुठे असतो हे नीट माहीत नसल्यामुळे शासनाने प्रत्येक दुचाकीस्वाराला चॉइस द्यायला हवा. एक तर डोक्यावर हेल्मेट घाला किंवा सबंद शरीरावर चिलखत!
;-)
22 Jul 2016 - 12:02 pm | टवाळ कार्टा
खरेच आहे ते
22 Jul 2016 - 12:03 pm | बाबा योगिराज
पयले माझ्या मापाच हेमलेट अणुनसनी द्या मग बगू...!
22 Jul 2016 - 12:21 pm | कपिलमुनी
22 Jul 2016 - 12:26 pm | अभ्या..
नीच कम्मू
24 Jul 2016 - 4:10 pm | बाबा योगिराज
दुत्त दुत्त...
22 Jul 2016 - 12:22 pm | एकुलता एक डॉन
स्थळ पुणे. दोन युवक. अतिशय आनंदात. तिसरा मित्र भेटतो.
मित्र: काय रे? आज एकदम एवढे खुश ?
युवक 1: अरे तुला सांगणारच होतो फोन करून, आम्हाला दोघांना नोकरी लागली.
मित्र: दोघांना एकदम?
युवक 2: एकदम सोड. एकाच ठिकाणी. एकाच पेट्रोल पंपावर.
मित्र: वा. मस्त. गम्मत आहे नाही !
युवक 1 : काम पण सोपं आहे. हा एंट्रन्स ला हेल्मेट देतो.कस्टमर पेट्रोल भरतो. आणि मी, पेट्रोल भरून झालं की त्या कस्टमर कडून एक्झिट ला ते कलेक्ट करतो.
22 Jul 2016 - 12:29 pm | विनायक प्रभू
हेल्मेट सक्ती राज्य उलथवु शकते
इंदिरा गांधी की जय
22 Jul 2016 - 1:24 pm | उडन खटोला
वि प्र सर,
जरासं अडीच तीन फूट वर या. ;)
22 Jul 2016 - 1:32 pm | मोदक
संजय गांधी की जय
हे जास्त संयुक्तीक ठरेल. ;)
22 Jul 2016 - 12:31 pm | कविता१९७८
आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे हेलमेटची आणि ती बरोबरच आहे असे मला वाटते कारण यामुळे मी रोज न चुकता हेलमेट घालते अगदी ऑफीस बाहेरही . सक्ती नसती तर कदाचित मला रोज हेलमेट घालायची सवय लागली नसती. लोकांना एलियन पाहिल्यासारखं वाटतं पण मला माझ्या सेफ्टीची जास्त चिंता आहे, हेलमेट घातल्याने कधी ट्रॅफीक पोलिसानेही अडवलं नाही इथे. इथे रस्त्यावर इतके खड्डे आहेत की रोज कुणा न कुणाचं अॅक्सिडंट होतच असतं मग तेव्हा लोकांना हेल्मेट ची आठवण येते . सक्ती केल्याशिवाय लोकांना हेलमेट घालण्याची सवय लागणार नाही हे माझे मत.
22 Jul 2016 - 1:02 pm | चौकटराजा
सरकारने एखाद्या रस्त्यावर इतकया इतक्या मापाचे इतके इतके खड्डे असलेच पाहिजेत असेच टेण्डर काढावे. रोज चार पाच
म्रुत्यू झाले की सक्ती न करताच सर्व हेल्मेट घालायला लागतील.
अशीच सोय आयुर्विमा, गाडीचा विमा, घराचा विमा, टीव्हीचा विमा, पासपोर्टचा विमा, रेशनकार्ड , क्रेडिट कार्ड , आधार कार्ड चोरीला जाण्याची शक्यता, मधुमेह बी पी होण्याची शक्यता , मूल न होण्याची शक्यता , आगीचा विमा, परदेश प्रवासात विमान
रद्द होण्याचा विमा अशी दोन उत्तरे असलेल्या सर्वा॑ची भिति समाजाला घालावी. सर्वीस सेक्टर फोफावून मजबूत सर्वीस टेक्स सरकारला मिळेल.
22 Jul 2016 - 1:30 pm | पगला गजोधर
मस्तच...
22 Jul 2016 - 5:43 pm | आदूबाळ
उकडत असेल नै दिवसभर हेल्मेट घालून बसायचं म्हणजे...
22 Jul 2016 - 5:50 pm | उडन खटोला
हल्कत बव्लत अच्रत आदुबाल
22 Jul 2016 - 6:05 pm | अभ्या..
यात काय हल्कत्पना? पुढे लिहिलय की
वाचले नै का? ;)
22 Jul 2016 - 7:58 pm | कविता१९७८
अच्छा, मग?
22 Jul 2016 - 8:31 pm | उडन खटोला
जौ द्या ओ, कुठे या लोकाना प्रतिसाद द्यायचा.
आपण आपली सुरक्षितता सांभाळायची हेल्मेट घालून.
ऑफिसमध्ये काय, बाहेर काय, हेल्मेट मस्ट, सेफ्टी फर्स्ट.
22 Jul 2016 - 10:51 pm | कविता१९७८
हो का? पालघरला हेल्मेट घालुन फीरताना तर पाहील नाही कधी तुम्हाला परान्जपे भौ
22 Jul 2016 - 11:00 pm | उडन खटोला
मी पालघरचा परांजपे असल्याचं सांगितल्याबद्दल आभारी आहे.
22 Jul 2016 - 1:31 pm | अद्द्या
मुळात ,
सक्ती करावी लागेपर्यंत लोकांना अक्कल येत नाही..
मग रडत बसता असले धागे काढत .
चालूदे
22 Jul 2016 - 1:40 pm | मोदक
अहो... गरजेचे आहेच आहे.
आजचे उदाहरण बघा.
मी ऑफिसला येतो त्या एका सिमेंटच्या रस्त्यावर एकदम कमी प्रमाणात ऑईल सांडले होते. त्यात रिमझिम पाऊस पडत होता. सिमेटचा रस्ता + ऑईल + जी असेल नसेल तितकी माती / चिखल यामुळे माझ्या आधी २, नंतर मी आणि माझ्यानंतर ३ असे ६ दुचाकीस्वार ३० च्या वेगाने जातानाही पडले.
माझ्या गाडीवर आणि हेल्मेटवर अपघाताच्या खुणा शिल्लक आहेत.
आणि मी ऑफिसात बसून प्रतिसाद लिहित आहे. :)
22 Jul 2016 - 1:46 pm | अनिरुद्ध.वैद्य
हेल्मेट घाला. नाय तर फाईन भरा!!
22 Jul 2016 - 2:34 pm | कंजूस
सरदारजी कसे घालतात हेल्मेट?
22 Jul 2016 - 6:00 pm | इरसाल
त्यांना हेल्मेट घालयची गरज नसते.फक्त समोरुन येणारे किडे, धुळ, वारा यापासुन बचावाला ते वायजर घालतात. त्यांनी बांधलेल्या पगडीमधे खुप पेडे (स्तर म्हणा हव तर) असतात. पगडीधारी शीख गाडीवरुन पडला तरी डोक्याला मार लागायची शक्यता फार कमी असते. हो, चेहरा घासणे किंवा त्याला दुखापत होणे हे अपघात कसा झाला यावर अवलंबुन असते.
22 Jul 2016 - 3:02 pm | श्रीगुरुजी
तुमचं घर गळतंय का? मग वॉटरप्रुफिंग, दुरूस्ती इ. करू नका. त्याऐवजी मग घरात रेनकोट/छत्री वापरायची सक्ती हवी. घरदुरूस्ती वगैरेच्या फंदात पडू नका.
रावत्यांच्या डोक्यात पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचा कीडा आलेला दिसतोय. पुणेकरांनी कितीही वेळा हेल्मेटसक्ती फोल ठरविली तरी ठराविक कालांतराने हेल्मेटसक्ती पुन्हापुन्हा येतच असते. यावेळीही हेल्मेटसक्ती फोल ठरून पुणेकरांचाच विजय होणार आहे.
22 Jul 2016 - 3:26 pm | शिद
श्रीगुरुजी...या धाग्यावर तुमच्याच प्रतिसादाची वाट पहात होतो आणि अपेक्षित प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद _/\_.
मला वाटलं मागे काढलेल्या हेल्मेटच्या धाग्यावर आलेले सल्ले पाहून तुम्ही एव्हाना हेल्मेट वापरयला सुरूवात केली असेल.
असो. तुमची मर्जी.
ह्यात विजय होण्यासारखं काय आहे?
आत्ता मोदींनीच आवाहन करायला हवं हेल्मेटसक्तीच असं वाटतंय. (ह.घ्या) :)
22 Jul 2016 - 3:29 pm | श्रीगुरुजी
मोदी असोत वा फडणवीस वा मोह्न भागवत वा अजून कोणी . . . हेल्मेटेसक्तीला आमचा विरोधच राहील.
22 Jul 2016 - 5:30 pm | बोका-ए-आझम
लोकांना रस्ते अपघातात डोकं फुटून मरायचं स्वातंत्र्य असलंच पाहिजे. उद्या हाच विरोध लायसन्स, पीयुसी, इन्शुरन्स वगैरे सगळ्या गोष्टींना झाला पाहिजे. In fact, गाड्यांवर नंबर प्लेट तरी का लावायची म्हणतो मी! यापुढे तर आईवडिलांनी मुलाला शाळेत घालण्याअगोदर driving school मध्ये घालावे आणि driving शिकवावे असा सरकारी GR निघेपर्यंत या आंदोलनाची तीव्रता कमी होता कामा नये!
23 Jul 2016 - 12:47 pm | पगला गजोधर
लायसन्स शिवाय ड्रायवर .... इतरांच्या जीवाला धोका ....
पीयूसी शिवाय गाडी ..... प्रदूषणामुळे इतरांच्या जीवाला धोका ....
नंबरप्लेट शिवाय गाडी .... इतरांच्या संपत्तीला धोका चोरी /हस्तांतर चा ....
म्हणून इथे कायदा ....
पण
हेल्मेट शिवाय चालक ..... इतरांच्या जीवाला / संपत्तीला धोका ????? आहे का ?
23 Jul 2016 - 1:00 pm | उडन खटोला
आयडी नाम सार्थ करताय
23 Jul 2016 - 1:11 pm | पगला गजोधर
_/\_
23 Jul 2016 - 3:08 pm | चौकटराजा
एकूणच जीवन जगताना आपला विचार व इतरांचा विचार असे दोन प्रकारे विचार करून माणूस आपल्या निर्णयांची आखणी करीत असतो. कोणता विमा किती घ्यायचा हे उदाहरण घ्या. माझे माझ्या कुटंबावर किती प्रेम आहे व त्याचा माझ्या आर्थिक क्षमतेशी किती मेळ आहे याने विम्याची रक्कम आपण ठरवतो. मी जर माझे नातेवाईक हे जीवनप्रवासातील काही काळ माझ्या बरोबर रहाणारे पांथस्थ आहेत त्यांच्यात इतके काय गुन्तून रहायचे ( उड जाएगा हंस अकेला ... जग दोन दिनका मेला ) असे ठरवले की विम्याची रक्कम कमी होणार.
आता सार्वजनिक जीवनातही आपल्याला दुसर्याचा विचार हा करावा लागतो. त्यासाठी या उदाहरणात गाडीला ब्रेक्स नीट असणे, वायपर चालत असणे, हेड लॅम्प टेल लॅम्प चालू असणे, गाडीवर योग्य तेवढेच वजन नेणे या वहानाशी संबंधित गोष्टींचा सम्बंध दुसर्याच्या जगण्याशी येतो कारण यातील दुर्लक्षामुळे दुसर्यास आपण जखमी करू शकतो. यास्तव कायद्याने वहान योग्यता ही तपासण्याची प्रक्रिया ठरविली आहे. त्यालाच आपण गाडीचे पासिंग म्हणतो जसे पॅसिव्ह स्मोकिंगचा धोका आहे म्हणून सार्वजनिक ठिकाणी अॅक्टीव्ह स्मोकिंगला बंदी आहे. तसे पॅसिव्ह स्मोकीम्ग गाडीही करायला लावते सबब पासींग प्रोसेस मधे प्रदूषण नियंत्रण परीक्षा गाडीला पास व्हावे लागते.
आता हा विचार झाला गाडीचा -- आता चालकांची प्रोफाईल पाहू. वाहन चालविताना वेग योग्य कोणता हे कायद्याने रस्त्याची परिस्थीती पाहून ठरवलेले असते सबब त्या प्रमाणे पाट्या लावल्या जातात. सिंग्नल ची वेळ , त्याचा सिक्वेन्स हा ही काय द्याने परिस्थीती पाहून ठरवला जातो.झिब्रा पट्टा आखताना पादचार्याचा विचार असतो. एकदिक मार्ग ठरवतानाही कित्येक वेळा देशातील किती पेट्रोल वाया जाईल अस विचार न करता किती वाहने सुरक्षितपणे अमुक रूंदीच्या रस्त्यावरूना धावतील याचा विचार केला जातो.
आपण गाडीचा विमा काढताना पूर्ण विमा काढण्याचे कायदेशीर बंधन आपल्यावर नाही पण थर्ड पार्टी विमा सक्तीचा आहे. कारण त्यात दुसर्याचा किमान विचार करण्याचे बंधन आहे.
हे सगळे पुराण सांगण्याचे कारण वरील सर्व बाबतीत चालकाला निर्णयाचे स्वातंत्र्य नाही. घटनेची पायमल्ली झाली असा दावा कोणालाही करता येत नाही.
कारखान्यात काम करताना वेल्डर्स ना गॉगल घालण्याचे बंधन आहे ते या हेलमेटच्या बंधनासारखेच आहे का ? माझ्या मते नाही. कारण तो वेल्डर दुसर्याच्या कारखान्यात कामाला आहे. वेल्डरला काही नुकसान झाले तर त्याची कायदेशीर जबाबदारी
मालकावर येउ शकते. सबब तिथेही दुसर्याचा विचार आहेच. पण हेलमेटचे तसे नाही. इस्पितळात डॉ व नर्सेस मास्क घालतात त्यात डॉ चे इन्फेक्शन रोग्याला वा रोग्याचे इन्फेक्शन डॉ ला होऊ नये असा उद्देश आहे. म्हणजे दुसर्याचा विचार इथे लाच. आता हेलमेट ची सक्ती कोणाला करायची. तर माझ्या मते मी जर रायडर असेन तर पिलियन रायडर साठी मी हेलमेट सक्तीने घेतलेच पाहिजे कारण त्यात दुसर्याचा विचार आहे. हे थर्ड पार्टी विम्यासारखेच आहे.
हेलमेट रायडरने घातलेच पाहिजे व पिलियन रायडर नेही घातलेच पाहिजे असा जगातील बर्याच देशात कायदा आहे. याचाच अर्थ हेल्मेट हा एक सवयीचा भाग आहे. त्याने होणारे तोटे हे कारण वाजवी असते तर जगात हा कायदा मोडीत निघाला असता. आजही भारतात हाय वे वर दोघानाही हेलमेट सक्तीचे करा असेच हेल्मेटला विरोध करणारे ही म्हणत आहेत.पुण्यात वहातुक सुधारा रस्ते सुधारा मग तुम्हाला हेलमेट ची सक्ती करायचा नैतिक अधिकार आहे असे काहींची मागणी आहे.
१९८८ सालच्या कायद्यातील हेलमेटची सक्ती किमान मेन रायडर साठी ही वरील विचारांच्या संदर्भात घटनाबाह्य आहे असे माझे मत आहे. पण....यावर कोणी हुशार वकिलाने आतापर्यंत घटनेतील व्यक्तिस्वातंत्र्याचा दाखला देत कसलाही अर्ज केल्याचे ऐकिवात नाही.
23 Jul 2016 - 3:11 pm | चौकटराजा
हे काय ? हेलमेट नाही... तुमची घरी कोणी वाट पहातंय हे विसरलात वाटतं ... असली आवाहने बोगस आहेत . त्यापेक्षा वहाने
जपून चालवा... विचारात गढू नका... वन वे चे नियम पाळा.. आपले वाहन वरचेवर तपासा ... आपले घरी आपली कोणीतरी वाट पहातंय हे आवाहन अधिक रास्त आहे.
23 Jul 2016 - 3:32 pm | मार्मिक गोडसे
हे सर्व पाळले तर अपघात होतंच नाही असे आपल्याला वाटते का? रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवताना कीतीतरी दुचाकीस्वारांच गंभीर अपघात झाले आहेत.
23 Jul 2016 - 4:15 pm | अभ्या..
अरे हे तर खुप नॉर्मल आहे गोडसेसाहेब, एकदा आमच्या गावाकडे येऊन पहा. कुठला प्रसंग कधी घडेल सांगता येत नाही. एकतर गावातले रोड खुप अरुंद आहेत. काही रस्ते मात्र अत्यंत प्रशस्त्/डीव्हायडरवाले केलेत पण नागरिकांना कोण शिकवणार ड्रायव्हिंग. अॅक्सीलेटर पिळता आला की ड्रायव्हिंग आले असा समज असतो बहुतेकांचा. कॉलेजची मुले बेधुंदपणे कश्याही पॉवरबाइक्स ताणत असतात. कॉलेजच्या मुलींबाबत तर बोलायलाच नको. अगदी ठरवून सगळे नियम तोडतात. ट्रिपलसीट, वनवे, राँग साइड, विदौट पेपर कश्याही गाड्या पळवीत असतात. पोलीसानी पकडले तर रडगाणी चालूच असतात. सांसारिक माणसे कुठल्या तंद्रीत गाड्या चालवतात त्यांनाच माहीत. अचानक थांबणे, अगदी स्लो स्पीडने रस्त्याच्या मधूनच चालवणे, मोठमोट्या पिशव्या विथ साईडने बसलेल्या काकू अस्ल्याने बॅलन्स न होणे हे प्रकार कायम. अॅक्टीव्हाकाकू हे तर भयानक प्रकरण. दोन्ही साईडला पाय सोडून स्पीडब्रेकरच्या आधीच ५ फूटावर गाडी थांबवुन नंतर फुल्ल थ्रॉटलने ब्रेकरवरुन पास होणार्या काकवा पाहण्यात आहेत. इंडीकेटर वगैरे न दाखवता भस्सकन वळणे, दुसर्याच वाहनधारकाची चुक दाखवुन उध्द्दार करणे हेही नेहमीचेच. रिक्षा बिक्षा, टमटम, मॅजिक, स्कूलबसा आणी प्रायव्हेट बोलेरोंची मस्ती अवरणनीय अशीच. सामान्य पादचारी ही कमी नाहीत. प्रत्येक १५ फूटाला कोणीतरी आडवे जातेच. बुरखेधारी मंडळ ७-८ जणाच्या ग्रुपने कोठेही न पाहता निघत असतात. म्हशी, गायी, कुत्री हे पण अधुन मधुन असतात. पोलीस ग्रुप करुन नाकेबंदी करतात. मध्यमवर्गीयच हमखास आडवले जातात. दोन दिवसापूर्वी संपणार्या इंशुरन्स साठी अडवलेले पोलीस बिना णंब्ररप्लेटच्या एक्स्युव्ही/ऑडी जाउ देतात. काही कारवाई झालीच तर लोकसेवकांचा फोन येतोच.
एवढे असुन गावचा टिपिकल माजुरडेपणा असतोच. ज्याचा माजुरडेपणा कमी तो माघार घेतो, पैसे भरतो अथवा दवाखान्यात जातो एवढेच. सगळ्यात स्वतः अवलंबलेला चांगला मार्ग म्हणजे ड्रायव्हिंग करतेवेळी आणि रस्त्यावर असताना प्रत्येक सेंकंदाचा पार्ट अॅलर्ट राहणे, त्यावेळी मोबाईल न वापरणे. हेल्मेट तर कंपलसरीच वापरतोय. आधी अगदी काय चंद्रावर जायचेय का अशी हेटाळणी व्हायची ती कमी झालीय पण हेल्मेट मस्टच आता.
23 Jul 2016 - 4:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
हे सगळे बाडीस शिवाय एक जोडतो, सगळ्यात डांबिस प्राणी डुक्कर हा हो! बेटे कुठे वळल काय पत्ता नसतो, रस्ता क्रॉस करेल म्हणावे अन डुकराच्या बुडाच्या बाजूने गाडी पुढे न्यावी म्हणली तर लेकाचे पिच्छे मुड करतं अन गाडी खाली तडमडतं अन मागे वळेल म्हणावे तर लेकाचं प्रेमभंग्या आशिक रेल्वेबुडी उड्या मारतात तसे दंडवत प्रणिपात घालतात, गाडी म्होरं, बरं गंमत अजूनच वायली, चांगली बुलेट जरी डुकरावर चढली तरी डुकराला शष्प फरक पडत नाही (शष्पचे ग्रामीण भावंड वापरायचा मोह टाळतो आहे) आमच्या एका मित्राची सुझुकी जिक्सर खाली डुक्कर आले म्हणून येरबडली होती गडी थरथरत उठून बघतो ते डाव्या बाजूचा टाकी ते टेललॅम्प बाजार उठलेला अन डुक्कर निवांत डुरकत रस्त्यापलीकडे पोचलेले. त्यात लेकुरवाळी डुकरीण असली तर अजूनच कल्ला तिच्यायला!
थोड्याफार प्रमाणत मानवी पोरे अन डुक्कर पोरे सिमिलर असतात ह्या बाबतीत =))
24 Jul 2016 - 10:31 am | चौकटराजा
वरील विधान हेलमेट व वहान व्यवस्थित चालवणे यात अधिक महत्वाचे काय ते सांगण्यासाठी आहे. आता हे सर्व केले तरी मृत्यूच्या तावडीतून सुटका होईल काय ? याचे उत्तर कायदाही व सरकारही देउन शकणार नाही. केवळ नियति ( अस्तित्वात असली तर) देउ शकेल. आत्मघात व अपघात या घटना परिणामांती एकच असल्या तरी त्यात मोठाच फरक आहे. आत्मघातात
तो घडवून आणणार्या मनाला त्याची जाणीव असते. अपघात ही माणसाच्या अष्टवधानी पणाला मर्यादा आहेत व यंत्रच आहे ते काय कधीही बिघडू शकते या दोन मुख्यत्वे शक्यतांचा संयोग होऊन घडत असतात.उद्या हेलमेट काय अंगावर पूर्ण चिलखतासारखे
कवच असताना भूकंप होऊन धरणीनेच स्वाराला गिळून टाकले तर काय...... या तर चे उत्तर नियति हेच असते. तुम्ही कितीही काळ॑जी घ्या रस्त्यावरचा दोन बाय दोन सेंमी चा एखादा खडा, तेलाचा एखादा छोटासा डाग, एक फूट बाय एक फूटात पसरलेली
रेती तुमचा जीव घेउ शकते. हेलमेट घातले तरी जबर अति रक्तस्त्राव ची केस असली तरी माणूस मरतोच.
थोडक्यात आयुष्यात सार्याच गोष्टींची प्रि़कॉशन ही घेऊन जगता येत नाही. स्वता:च्या नशीबावर विश्वास ठेवतच जगणे भाग असते. नाहीतर प्रत्येक दिवशी गाडीची हवा, ब्रेक्स, टेल लॅम्प हेड लॅम्प , ब्लिन्कर्स ई ई चेक करूनच घरातून बाहेर जावे लागेल.
हेलमेट घालणारे हे सर्व रोज करतात का ?
24 Jul 2016 - 10:44 am | संदीप डांगे
नाहीतर प्रत्येक दिवशी गाडीची हवा, ब्रेक्स, टेल लॅम्प हेड लॅम्प , ब्लिन्कर्स ई ई चेक करूनच घरातून बाहेर जावे लागेल.
हे तर ड्रायविंगचे बेसिकच आहे चौराकाका, दिवसाची सुरुवात करण्याआधी आपण आंघोळपांघोळ करतोच तसं हे रोज करायलाच हवं.
नशिबाचंच म्हणाल तर मग डोळे बंद करुन, सीटवर मस्तपैकी मागे झोपुनही गाडी चालवायला काय हरकत आहे!
24 Jul 2016 - 4:04 pm | मार्मिक गोडसे
हो, गाडीचा हॉर्नही चेक करतो, स्वतःबरोबर दुसर्यांच्या जीवा़ची काळजी घेण्यासाठीच हे करतो. हेल्मेट फक्त स्वतःसाठी वापरतो.
23 Jul 2016 - 5:53 pm | पगला गजोधर
संख्याशास्त्र अभ्यासानुसार भारतात रस्त्यावरील अपघातातील होणाऱ्या, दुचाकी चालकांच्या मृत्यूचे, 'डोक्याला इजा ', हे एक महत्वाचे कारण आहे, असा दाखला हेल्मेटसक्ती मागे काही जण करतात...
मग त्या ऐवजी दुचाकी वापरावरच बंदी का नाही ?? (न राहेगा बांस , न बजेगी बांसुरी ... )
जर ऐकून अपघातातील मृत्यूतील (दुचाकी धारकांचे मृत्यू वगळून) उदा. कार चालक / प्रवासी , रिक्षा चालक / प्रवासी, पादचारी इ इ यांच्या मृत्यूचं मोठे कारण सुद्धा डोक्याला इजा हे आहे, मग....
त्यांना सुद्धा हेल्मेटसक्ती करणार काय ?
23 Jul 2016 - 3:27 pm | मार्मिक गोडसे
मग चारचाकी चालकाला सीट बेल्टची सक्ती करणे कितपत योग्य आहे?
23 Jul 2016 - 8:28 pm | चौकटराजा
ती ही सक्ती घटना बाह्यच ..... चालकाने स्वतःच बंधन घालून घेतले तर बेल्ट वा हेल्मेट फ्रंट गार्ड सारेच मोलाचे.
22 Jul 2016 - 3:38 pm | अनिरुद्ध.वैद्य
सगळ्यांनी व्यवस्थित नियमांमध्ये राहुन, खड्डेविरहित रस्त्यांवरुन दुचाकी हाकली तर अपघात होणार नाही का?
अन अपघात झाला तर आपण आपली सुरक्षा आपण न करता कोणी करावी?
22 Jul 2016 - 4:33 pm | मित्रहो
मुळात हेल्मेट घालायला सक्ती करावे लागते हेच खरे दुर्दैव आहे. रस्ते खराब वगेरे असल्यावर तर हेल्मेट घालणे आणखीन गरजेचे होउन जाते. भारत सोडला तर जगात सारेच हेल्मेट घालतात रस्ते चांगले असो की वाइट आपण मात्र न घालण्यासाठी कारणे शोधतो.
18 Aug 2016 - 6:38 am | नितिन थत्ते
>> भारत सोडला तर जगात सारेच हेल्मेट घालतात
भारतात देखील बहुतांश "शहरांत" हेलमेट घालतात.
22 Jul 2016 - 4:47 pm | अत्रन्गि पाउस
आरशाला हेल्मेट लाऊन बरेच जन फिरतात, सिग्नल पोलीस वगैरे आले कि हलकेच डोक्यावर ठेऊन वेळ मारून नेतात. पेट्रोल पंपावर अजून ५-१० मिनिटे
हा का ना का
22 Jul 2016 - 5:02 pm | माम्लेदारचा पन्खा
ज्याचा त्यानेच भोगायचा असतो......त्यात सरकार काय करणार ?
सक्ती करायचीच झाली तर दारु,सिगरेट,गुटखा,तंबाखू,प्लास्टिक असे किती तरी अनेक पदार्थ आहेत ते कुठे बंद झालेत ?
लोक सुजाण आहेत.... स्वतः जगायचं की नाही हेही तेच ठरवतील....काळजी घेणं आपल्या हाती आहे ...पुढे ईश्वरेच्छा बलियसी...
बाकी निरर्थक चर्चा चालू देत !...
22 Jul 2016 - 5:54 pm | एकुलता एक डॉन
आधी लगीन खड्डे मुक्त रस्त्याचे मग ,हेल्मेट चे !!
_एक संतापलेला नगरकर !
22 Jul 2016 - 6:39 pm | देशपांडे विनायक
हेल्मेट न घालणारे दुचाकी वाले यांच्या दुचाकीचे एक चाक काढून घ्या काही वेळासाठी
22 Jul 2016 - 7:19 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
आमच्यासारख्या काॅलेजच्या पोरांनी काय करायचं?
हेल्मेटने आमच्या स्टाईलस्टेटमेंटचं वाटोळं होईल!!!
22 Jul 2016 - 9:46 pm | शलभ
:D
मंद आहेत विरोध करणारे..
22 Jul 2016 - 7:47 pm | मोहनराव
जीव आपला त्यामुळे निर्णय आपला हेल्मेट घालायचे की नाही याचा.
22 Jul 2016 - 9:11 pm | खटपट्या
मला दया येते त्यांची जे हेल्मेट सक्तीला विरोध करतात. तेही काही कारण नसताना.
22 Jul 2016 - 10:21 pm | खटपट्या
काय मिळालं नाय, मग काय जे दीसलं ते घातलं डोक्यात. पेट्रोल पायजे ना...

23 Jul 2016 - 12:08 am | माम्लेदारचा पन्खा
काय पण फोटो काढतात लोक !
23 Jul 2016 - 1:52 am | गणेश उमाजी पाजवे
आपण काय सरकार वर उपकार म्हणून हेल्मेट घालतो का...तुम्हाला स्वतःच्या जीवाची काळजी नाही का?या लेख वाल्या बाई म्हणतायत कि.....
.....अहो पण काहीही उदाहरण काय देताय. तुम्ही पाहायला गेला होतात का मृत्यू नेमका हेल्मेट असताना सुद्धा डोक्यावर आघात होऊन झाला कि शरीरावर अन्य ठिकाणी जखमा असण्यामुळे झाला.बरे या दुचाकीवाल्यांचे ठीक आहे, हट्ट करून बसल्येत हेल्मेट नको म्हणून पण यांच्या घरच्यांना सुद्धा यांची काळजी नाही का?मी पण असाच हेल्मेट घालायला कंटाळा करत असे. पण एके दिवशी भारतमाता टॉकीज, लालबाग येथे थोड्याश्या पावसाने रस्ता निसरडा झाला होता व त्यात इंजिन ऑइल मिक्स झाले होते त्यात अगदी 30 किमी च्या वेगात असताना सुद्धा ऍक्टिवा सारख्या स्कुटर वरून मे पडलो व रस्त्यावर बाजूने डोके आपटले अगदी जोरात. 2 मिनिटे डोक्यात झिणझिण्या आल्या, समोर काहीच दिसत नव्हतं. मग हेल्मेट काढून डोक्याला काही लागलं नाही ना ते चेक केलं तेव्हा हेल्मेट ला बाजूने तडा गेला होता. विचार करा लेखावल्या बाई जर तो तडा हेल्मेट ऐवजी माझ्या डोक्याला असता तर!!! तेव्हा पासून कानाला खडा लावला आणि आता हेल्मेट घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही.तुम्ही त्या महिलांचं उदाहरण देताय कि त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? अहो हेल्मेट आहे म्हणून 2 च जणांचा मृत्यू झाला पण हेल्मेट नसेल तर हाच एकदा 2000 वर ही जाऊ शकतो कारण रोज प्रत्येक मिनिटाला पुण्यात काय किंवा मुंबईत काय कोणी ना कोणी दुचाकी वरून पडतच असत.ते सरकार जाऊदे चुलीत पण स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांसाठी,नवऱ्यासाठी, आई बाबांसाठी तरी हेल्मेट घालून बाहेर पडत जा. वेळ कुणावरही सांगून येत नाही.आणि हो दुचाकी चालवणारा कितीही महान असला अगदी तो व्हॅलेन्टिनो रोस्सी का असेना मोटो जिपी वाला , पण प्रत्येकाचं आयुष्यात एकदा तरी छोटामोठा ऍक्सीडेन्ट होताच. अर्थात आता हेल्मेट घातलात तर ते ऍक्सीडेन्ट Fatal होण्याची शक्यता जवळपास 50%-60% नि कमी होते एवढे लक्षात घ्या.आणि तर्हीही तुम्हाला हेल्मेट ला विरोध करायचाच असेल तर देव आपलं भलं करो _/\_
23 Jul 2016 - 1:57 am | खटपट्या
१००% सहमत...
23 Jul 2016 - 8:59 am | मोदक
या लेख वाल्या बाई नाहीयेत, बुवा आहेत.
बाकी प्रतिसादाशी हज्जारवेळा सहमत
23 Jul 2016 - 10:42 am | कविता१९७८
सहमत.
23 Jul 2016 - 3:14 am | जयन्त बा शिम्पि
आमचे चिरंजीव म्हणतात कि हेल्मेट डोक्यावर असले तर , पोलिस सरळ जावू देतात , लायसेन्स साठी अडवित नाही.
( म्हणजे पोलिसांना वाटते कि हेल्मेट चा नियम पाळणार्या ह्याच्याकडे लायसेन्स असणारच ! ! ) मी खरोखर दोनवेळा ,खिशात लायसेन्स घ्यायचेच विसरलो, आणि रस्त्यात दोन ठिकाणी पोलिस उभे होते , पण मला कोणी अडविले नाही. म्हणून हेल्मेटचा असा , सुरक्षा अधिक विसराळूपणावर मात , असा दोन्हीकडून फायदाच होतो .
23 Jul 2016 - 4:00 am | खटपट्या
"हेल्मेट नाही म्हणून अडवले" हे पोलींसाकडे पहीले कारण असते गाडी अडवण्याचे. आणि मग त्यानंतर बाकीची विचारपूस चालू होते...लायसेन्स, गाडीचे कागद, पीयूसी, इंन्शुरन्स इत्यादी. हे सर्व असणारे खूप कमी असतात. त्यामुळे सरळ हेल्मेट घालून बाकी चौकशीला फाटा देणे कधीही चांगलेच...
23 Jul 2016 - 12:22 pm | उडन खटोला
हेल्मेट, सीट बेल्ट, पीयूसी, इन्शुरन्स, कागदपत्रं, नियम पालन हे पोलिसांसाठी किंवा इतरांसाठी नसून स्वत:साठी आहे हे कृपया लक्षात घ्यावं.
बाकी पोलिसांसाठी किंवा इतरांसाठी करतोय अशी भावना असल्यास आपला दृष्टिकोन मुळातून बदलण्याची गरज आहे.
23 Jul 2016 - 1:06 pm | जगप्रवासी
माझा भाचा पोलीस दिसल्याशिवाय कधीच हेल्मेट घालत नाही, कितीतरी वेळा त्याला सांगून थकलो पण गेल्या महिन्यात त्याला एक अपघात झाला. कारच्या ड्रायव्हर ने दरवाजा उघडल्यामुळे तो दरवाज्यावर आपटून दूर उडाला आणि डिव्हायडर वर आपटला. खांद्याचं हाड मोडलं आहे, छातीच्या पिंजऱ्याचे हाड थोडी आत बेंड झाली आहेत (तुटली नाहीयेत असं डॉक्टर म्हणाले). डोकं आपटलं पण कधी नव्हे ते त्याने हेल्मेट घातल्यामुळे डोक्याला मार बसला नाही. हॉस्पिटल मध्ये त्याला भेटायला गेल्यावर मला सारखं सॉरी आणि थँक्स म्हणत होता. बोलतो आता हेल्मेट शिवाय गाडी चालवणार नाही कारण त्यामुळे वाचलोय.
हेल्मेट मुळे कधीच त्रास जाणवला नाही, उलट हेल्मेट नसेल तर बाईक चालवताना मला चुकल्यासारख वाटत.
हेल्मेट शिवाय बाईक न चालवणारा जगप्रवासी
23 Jul 2016 - 1:23 pm | चतुरंग
वाँट टु बी ए हेल् मेट, वेअर हेल्मेट!! :)
माझ्या बघण्यात दोन उदाहरणे आहेत जी फक्त आणि फक्त हेल्मेटमुळेच वाचली आहेत.
मी सायकलवरुन जाताना सुद्धा हेल्मेट घालतो. नेहेमीचा रस्ता असला तरी वेळ तीच नसते.
काय होईल आणि तुम्ही पडाल याचा अंदाज बांधणं केवळ अशक्य असतं.
सुरक्षित प्रवास करा आणि यानं किंवा हिनं फक्त हेल्मेट घातलं असतं तर.....अशी वेळ कृपया येऊ देऊ नका!!
23 Jul 2016 - 9:27 pm | कानडाऊ योगेशु
अगदी योग्य बोललात रंगासेठ!
23 Jul 2016 - 2:17 pm | Bhagyashri sati...
सहमत
23 Jul 2016 - 4:41 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
काय नाय वो ,हेल्मेट बनवणार्या कंपण्यांनी मलिदा चारला की हेल्मेटसक्तीची टुम निघते.ब्याग्या मिळाल्या की मग हे राजकारणी गप्प बसतात,२००२ ला पुण्यात हेल्मेटसक्ती केली तेव्हा एका दिवंगत राजकारण्याच्या नातेवाईकाने,ज्याचा हेल्मेट बनवण्याचा व्यवसाय होता ,त्याने चिक्कार पैसे छापले.
जवळपास जायचे असल्यास हेल्मेट वापरण्याची गरज नाही,पण लाँग रुट जायचे असेल ,दुसर्या गावी जायचे असेल तेव्हा हेल्मेट गरजेचे आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.
23 Jul 2016 - 5:51 pm | मुक्त विहारि
काय सांगता?
अपघात तुम्ही घराजवळ राहता, म्हणून होत नाहीत का?
दुचाकी चालवायची असेल तर आधी हेल्मेट आणि मग चावी.
23 Jul 2016 - 9:14 pm | संदीप डांगे
फारच विनोदी धागा झालाय... काय नेहमी नेहमी तेच ते दळण दळायचं,
मेंदू असलेले घालतील हेलमेट, नसलेले घालणार नाहीत. तेवढेच बिन्डोक कमी होतील जगातून. चांगलंच आहे की.
23 Jul 2016 - 9:38 pm | संदीप डांगे
घराजवळच यायचं-जायचं
दिडेक महिन्यापूर्वी घडलाय किस्सा. एक व्यक्ती सुमारे दिडशे किमी चा प्रवास करुन घरी पोचत होती. घरापासून फक्त दिडशे फुटावर वादळी वार्याने धडक दिली. कोलमडून पडला... ७२ टाके पडलेत चेहर्यावर... घराजवळ असण्याचा फायदा की लवकर हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. जीव वाचला.
घर जवळ असण्याचा मुद्दा लोक मांडतात तेव्हा त्यांच्या मनामधे नक्की काय चालत असेल? धोक्याची जाणीव आणि सुरक्षित जागेपासूनचे आपले अंतर ह्याला महत्त्व देत असावेत, ही काहीतरी आदिम प्रेरणा असेल. सुरक्षित स्थान म्हणजेच आपले घर ह्यापासून आपण जितके जवळ तितका धोका कमी अशी काहीशी सुप्तमनात नोंद असावी. अर्थातच बाइकवरुन प्रवास करतांना अशी जाणीव फूलिशच आहे. लोक घरातून निघतांना, बाईक स्टॅन्डवरुन काढतांनाही पडत असतात. आणि जखमी होतात, हॉस्पिटलात थेट ऑपरेशन थेटरमधे पोचतात. बघितलंय म्हणून सांगतोय.
23 Jul 2016 - 10:16 pm | मोदक
डांगे अण्णा, इथे मिपावरच एक उदाहरण मिळेल. पार्किंगमध्ये गाडी पार्क करताना डोके भिंतीवर आपटले, चालक कोमामध्ये.
..आणि लोकं हेम्लेट न घालायला नवीन नवीन कारणे शोधत असतात.
सोडा राव, ज्याला सुधारायचे नाही त्याला त्याच्या नशिबावर सोडा.
23 Jul 2016 - 10:19 pm | मोदक
*** इथे मिपावरच कोणीतरी लिहिलेले एक उदाहरण मिळेल.
23 Jul 2016 - 11:45 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
माझ्या मुद्द्याचा विपर्यास केलेला दिसतोय,घराजवळचे रस्ते ,कामाच्या ठीकाणी जायचे रस्ते याची आपल्याला सवय असते,रुटीन रस्ता असेल तर माणुस व्यवस्थीत गाडी हाकू शकतो,किमान ट्रॅफीक ,रोड कंडीशनचि माहीती असते.त्यामुळे अपघताची शक्यता कमी होते.याउलट..
लांबच्या ठिकाणी जाताना रस्ता नेहमीचा नसतो ,ट्रॅफीक ,रोड कंडीशन माहीत नसते,वेगही जास्त असतो ,अश्यावेळी हेल्मेट गरजेचे आहे असे माझे मत आहे.
रात्री जेवल्यावर पान खायला जायचे आहे ,पाच मिनिटांचा रस्ता आहे ,तेव्हा हेल्मेट घेऊन जाणे इष्ट नाही.सगळी मजाच् जाईल की राव.
24 Jul 2016 - 12:06 am | संदीप डांगे
तुम्ही खुलासा केल्यावर नक्की काय बोलावे ह्याबद्दल संभ्रमात पडलो. असो!
24 Jul 2016 - 10:02 am | मुक्त विहारि
+ १
24 Jul 2016 - 1:24 am | उडन खटोला
>>>रात्री जेवल्यावर पान खायला जायचे आहे ,पाच मिनिटांचा रस्ता आहे ,तेव्हा हेल्मेट घेऊन जाणे इष्ट नाही.सगळी मजाच् जाईल की राव.
मुद्दा रास्त आहे मात्र पाच मिनिटावर जाण्यासाठी कशाला गाडी? वॉकत वॉकत जावं. हेल्मेट घालून 'पचाक थुंकेकर' होता येणार नाही त्यापेक्षा वॉकतांना कधीही हां कार्यक्रम करता येईल हा मुद्दा देखील लक्षात घ्यावा लागेल.
24 Jul 2016 - 9:46 am | हरकाम्या
हेल्मेटसक्ती सुरु झाली की रस्ता आठवतोआणि खड्डे हे तर्कशास्त्र न पटणारे आहे.खड्डा नसलेल्या रस्त्यावर अपघात
झाल्यावर डोक्याला मार बसणार नाही का ? आणि खड्ड्यात पडल्यावर मार बसणार.अपघात टाळता येत नाहीत.पण
त्यामुळे होणार्या परिणामांची तीव्रता कमी करता येते. आणि रस्त्यावर डोके आपटल्यावर जर हेल्मेट घातलेले असेल
तर हेल्मेट नेमकेच हेच काम करते हे वाद घालणार्या मंडळींच्या लक्षात येत नाही असे. वाटते.रस्ता गुळगुळीत असो
वा नसो रस्त्यावर आपटल्यावर रस्ता त्याचे काम करतो. पण हेल्मेट नसले तर काय होइल याची कलपनाही करवत
नाही.
24 Jul 2016 - 9:59 am | संदीप डांगे
प्वाइंट है बॉस. ह्या लोकांना वाटतं की ट्रॅफिकमुळे, खड्ड्यांमुळेच अपघात होतात. असे असेल तर म्हणावे लागेल की ह्या लोकांना खरंच डोकं नै हे... ;)
24 Jul 2016 - 4:17 pm | अभिजीत अवलिया
2012 साली मी बाईक ने रोज कोथरूड ते ऑफिस जात येत असे. एकदा संध्याकाळी परत येताना कर्वे रोड वर रांका च्या जरा अलीकडे अचानक गाडी स्लिप होऊन खाली आपटलो. गाडी तशीच स्लिप होत पुढे निघून गेली. शर्ट, पॅन्ट फाटली. तिथे असलेला एक वाहतूक पोलीस धावत आला आणी मला बाजूला नेऊन बसवले. गाडी आणून उभी केली. रस्त्याचा तो भाग चेक कला तर तिथे एकदम थोडे ऑईल सांडलेले होते. बाप झाल्यानंतर अवघ्या सातव्या दिवशी घडलेल्या ह्या घटनेत हेल्मेट नसते तर निश्चित फोटोत गेलो असतो.
24 Jul 2016 - 4:21 pm | माम्लेदारचा पन्खा
परतिसादकर्त्यास येक येक हेमलेट फ्री फ्री फ्री....आपापले पत्ते देऊन जा बर्का !
24 Jul 2016 - 4:30 pm | संदीप डांगे
=))
14 Aug 2016 - 10:53 pm | योगेश कोकरे
हेल्मेट सक्ती का च्या ऐवजी हेल्मेट सक्ती का नको,,,,
सक्ती तेव्हाच केली जाते जेव्हा लोक नियम धाब्यावर बसवतात . एकविसाव्या शतकात सुशिक्षित लोक समाज असे म्हणत असतील तर हा त्या देशाच्या पुढारलेपणाचा पराभव आहेत . आणि हेल्मेट सक्ती का? अशी मानसिकता असणारे लोक मुळात या देशाचे सुजाण नागरिक म्हणून घ्यावेत कि नाही याबद्दल शंका आहे . अरे तुम्हाला काय शिंगे आहेत का हेल्मेट न घालायला ,,,,, काही लोकांना हा खूप साधा प्रश्न वाटेल पण कसं आहे ना देश म्हणजे तिथल्या लोकांच्या विचाराचे प्रतिबिंब .... आणि अजून पण आपले विचार तसेच असतील तर आपण नव्या युगाची स्वप्ने कशी पहावीत ,,,,,,,कुणाला वाईट वाटले तर त्यांना हेल्मेट घालून नमस्कार
15 Aug 2016 - 4:39 am | राजेश घासकडवी
शहाण्यासारखं वागण्याची जबरदस्ती करणं हेच मूर्खपणाचं आहे!
15 Aug 2016 - 5:37 pm | आनंदी गोपाळ
स्रीगुरूजींचे अभिनंदन. तुमच्यासारखे लोक आमच्या धंद्याला बरकत आणतात.
15 Aug 2016 - 7:16 pm | टवाळ कार्टा
नको घालूंदे हेल्मेट...मरुंदे तिचायला...तेव्हडीच रिकामी डोकी कमी होतील
16 Aug 2016 - 2:05 pm | सानझरी
खयंच मरुदे.. लोकांना अपल्याच जिवाची काळ्जी नाहिये तर कोण काय करणार?
माझ्या मित्राची engagement होती या विकेंडला २१aug. ती कॅन्सल केली कारण त्याच्या मामेबहिणीचा नवरा गेला. वयवर्ष ३३. या शनिवारीच गेले. गाडी स्पीड मधे होती, खड्डा चुकवायला गेले आणि समोरून येणार्या तीनचाकी गाडीवर आपटून काचेतून आत गेले. हेल्मेट नव्हतं. डोक्याला आणि मेंदूला मार लागून जागिच गेले. ताईचं वय २९ आणि मुलगी आहे ६ वर्षाची. संसार उध्वस्त. लिहवतही नाहिये.
17 Aug 2016 - 7:05 pm | Sanjay Uwach
हेल्मेट प्रमाणेच महाराष्ट्रातील जुने पुल पार करीत असताना, प्रत्येकाने कमरेला डबा ( अर्थात पाण्यात न बुडण्या साठी) बांधण्याचा बंधनकारक कायदा करण्याचा सरकार विचार करीत आहे.
18 Aug 2016 - 12:01 pm | दिगोचि
मला आठवते आहे की काही वर्षपूर्वी हेल्मेट घालावे की नाही याच विषयावरून पुणेकरानी प्रोटेस्ट केले होते. अजुनही यावरच आपण बोलत आहोत हे वाचुन असे वाटले की अनेकाना आपल्या जीवाची व आपल्यानन्तर कुटुम्बाचे काय होईल याची पण पर्वा नाही. अपघातात हेल्मेट फुटले म्हणून म्रुत्यु पावतात याचा अर्थ काहीनी हेल्मेट घालुन्ही आपण मरु शकतो मग घालायची काय गरज असा काढला आहे. हेल्मेट मोडले वा फुटले का याचा कोणी तपास केला आहे का? हेल्मेट बनवणारे कोण व त्यान्चा सम्बन्ध कोणाशी आहे हे फार महत्वाचे आहे. मी जेथे राहतो तेथे वाहने सरसकट ६०-८० किमी वेगाने चालवतात पण अपघातात हेल्मेट मोडल्याने डोक्यास मार लागून ती व्यक्ति मेली असे अजुन ऐकले नाही. असो. हेल्मेट घालावे की नाही ही चर्चा चालुन्दे.
18 Aug 2016 - 1:38 pm | हकु
घातलं हेल्मेट तर हरकत काय आहे? हा काय विरोध करायचा मुद्दा आहे?
गाडी घ्यायला पैसे आहेत आणि हेल्मेट घ्यायला नाहीत असं आहे का?
19 Aug 2016 - 9:47 am | चौकटराजा
सरते शेवटी पुणेकराना ( फारतर असे म्हणू वेगळा विचार करणाराना ) हेलमेट घालावे लागणार. पाचशे रूपये दोन तीन वेळा
भरावे लागले तर हेलमेट विकत येईल. एक खरे की जगात तसेच भारतात अनेक शहरात हेलमेट घातले जाते. पुणेकराना
ते हळूहळू सक्तीने घालावेच लागेल. मला काळजी अशी पडली की ,, हेलमेट न घालणारे बिनडोक आहेत हे विचार करणार्या जंताना मग नवीन विषय शोधावे लागतील नं ! मग त्यानी आपला मोर्चा कंडोम न वापरणारे बिनडोक आहेत असा आटापिटा करण्यात घालवावा.काही प्रश्न जगाने वा बंगलोर जयपूर यानी कसे सोडविले आहेत ते समजून घ्यायला आवडेल. जयपूर मधील
लहान मुलांसाठी लहान हेलमेट मिळतात का? चंदीगड मधील सरदारजीची पगडी हेलमेट एवढी मजबूत असते का ? की तीवर परफेक्ट बसणारे हेल्मेट ते लोक घालतात? बिनडोक (?)पुणेकर आता हेलमेट घालतील मग कोरेगाव, पाथर्डी, मालेगाव, झुमरीतलय्या, बारामुल्ला, थेकडी येथील सर्वच लहान मुले, वृद्ध, बायका ही हेलमेट घालायला लागतील ना? सध्यातरी शासन
हेलमेट ( सक्ती)नको वाल्याना चेकमेट देण्याच्या मार्गावर पुढे जात असल्याचे चित्र आहे.
हेलमेट घालणे ही एक संवय आहे. त्यात फायदेही व तोटेही आहेत. असा माझा तरी अनुभव आहे.
20 Aug 2016 - 2:48 pm | श्रीगुरुजी
पुण्यात हेल्मेटसक्ती यशस्वी होणे अशक्य आहे. आजवर अनेकांनी अनेकवेळा हेल्मेटसक्ती करण्याचा निष्फळ प्रयत्न करून सोडून दिलेला आहे. यावेळीही हेल्मेटसक्ती यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही. शेवटी पुणेकरांचाच विजय होत आलेला आहे आणि विजय होत राहणार!
20 Aug 2016 - 6:46 pm | नमकिन
द्वार बंद करुन बसलेत पुणेकर. साक्षात श्रीविष्णू जरी अवतरले तरी शक्यता कमी.
20 Aug 2016 - 7:11 pm | तर्राट जोकर
चंपाबाई मोड ऑन
"मुसलमानांत धर्मसुधारणा यशस्वी होणे अशक्य आहे. आजवर अनेकांनी अनेकवेळा धर्मसुधारणा करण्याचा निष्फळ प्रयत्न करून सोडून दिलेला आहे. यावेळीही धर्मसुधारणा यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही. शेवटी इस्लामचाच विजय होत आलेला आहे आणि विजय होत राहणार!"
चंपाबाई मोड ऑफ!!
20 Aug 2016 - 10:10 pm | राजेश घासकडवी
विजय?? कशाची टिमकी कोण वाजवेल सांगता येत नाही. आणि हो, सगळेच पुणेकर काही स्वतःच्या डोक्याची किंवा कायद्याची चिंता नसलेले नसतात. पोलिसांनी हेल्मेट वापराची सक्ती करायला सुरुवात केली की मुकाट्याने जाऊन हेल्मेटं विकत घेतात. फेब्रुवारीमध्ये पुण्यात हेल्मेटचे सेल्स प्रचंड वाढले!
काही वर्षं लागतील, पण हेल्मेटं घातलेले चालक जास्त जास्त दिसायला लागतील. आत्ताच जर तुम्ही पुण्याच्या ट्रॅफिकचे फोटो गूगल केलेत तर सर्वसाधारणपणे २०१० नंतरच्या फोटोंत (सगळ्याच फोटोंत नाही) हेल्मेटं जास्त प्रमाणात दिसतात.
20 Aug 2016 - 10:49 pm | श्रीगुरुजी
अमेरिकेत राहून पुण्यात काय चालले आहे यावर अधिकारवाणीने भाष्य करताय!
असो. अज्ञानात सुखी रहा.
20 Aug 2016 - 10:52 pm | तर्राट जोकर
अर्रेवा! तुम्ही पुण्यात राहून अख्ख्या जगात काय चालले आहे त्यावर भाष्य करता त्याबद्दल काय मत आहे?
20 Aug 2016 - 10:52 pm | थॉर माणूस
अहो ते मूळ पुण्याबद्दल बोलत आहेत, तिथल्या बाकांवर नाहीतर बंद दुकानाच्या पायरीवर बसणारे आणि विश्वाची चिंता करणारे पुणे.
चांगले आहे, तेवढीच सरकारी महसूलात वाढ होइल.
20 Aug 2016 - 11:23 pm | श्रीगुरुजी
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गोवंश हत्येवर बंदी आली. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने चाईल्ड पॉर्नवर बंदी घालण्याचे सूतोवाच केले. लगेच निधर्मांधांनी आकाशपाताळ एक करायला सुरूवात केली. या गोष्टींवर बंदी घालणारे हे कोण? आम्ही काय खायचं, काय बघायचं, काय बोलायचं, काय वाचायचं हे आता सरकार ठरविणार का? अशी बंदी घालून या सरकारने आपला फॅसिस्ट चेहरा उघडा केला आहे ... अशा अनेक प्रतिक्रिया निधर्मांधांनी सुरू केल्या.
पण आता हेल्मेटसक्तीच्या निर्णयावर हे गप्प आहेत. जसं आम्ही काय खायचं, काय बघायचं, काय वाचायचं इ. सरकारने ठरविणे चुकीचे आहे, तसेच आम्ही डोक्यावर काय घालायचं हे सुद्धा सरकारने ठरविणे चुकीचे आहे. मी हेल्मेट न घातल्याने जर इतरांना त्रास होत नसेल तर हेल्मेट घालायची माझ्यावर सक्ती का?
20 Aug 2016 - 11:46 pm | तर्राट जोकर
व्यक्तिस्वातंत्र्याचा तुमचा अर्थ काही भलताच आहे बुवा????