Skip to main content

चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........

लेखक मनिषशिल्पाअनुसे यांनी शुक्रवार, 22/07/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
काही ही हां ... दिवाकर साहेब थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , हेल्मेट परिधान केलेल्यांनाच् पंपा वर पेट्रोल मिळणार , दिवाकर रावतेंचा आदेश. काय म्हणावे याला , हेल्मेट सक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक वाहतूक कशी समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही रावते साहेब ??? मुळातच हेल्मेट अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि हेल्मेट ही पूर्णपणे सुरक्षित आहे का , पुण्यात मंध्यतरी अपघातात हेल्मेट धारक दोन महिलांचा मृत्यु झाला मग यास जबाबदार कोण. हेल्मेट पेक्षाही महत्वाचे आहे वेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम वाहतूक प्रणाली ,उत्तम रस्ते. हे राहिले बाजूला आणि हेल्मेट सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात 30 लाख दुचाकी वाहने आहेत तितके हेल्मेट उपलब्ध आहेत का ??? मग कुठल्या निकषा वर करता अशी हेल्मेट सक्ती. -मनिष अनुसे ७०५७२१८१०६

वाचने 24624
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

मुळात हेल्मेट घालायला सक्ती करावे लागते हेच खरे दुर्दैव आहे. रस्ते खराब वगेरे असल्यावर तर हेल्मेट घालणे आणखीन गरजेचे होउन जाते. भारत सोडला तर जगात सारेच हेल्मेट घालतात रस्ते चांगले असो की वाइट आपण मात्र न घालण्यासाठी कारणे शोधतो.

आरशाला हेल्मेट लाऊन बरेच जन फिरतात, सिग्नल पोलीस वगैरे आले कि हलकेच डोक्यावर ठेऊन वेळ मारून नेतात. पेट्रोल पंपावर अजून ५-१० मिनिटे हा का ना का

ज्याचा त्यानेच भोगायचा असतो......त्यात सरकार काय करणार ? सक्ती करायचीच झाली तर दारु,सिगरेट,गुटखा,तंबाखू,प्लास्टिक असे किती तरी अनेक पदार्थ आहेत ते कुठे बंद झालेत ? लोक सुजाण आहेत.... स्वतः जगायचं की नाही हेही तेच ठरवतील....काळजी घेणं आपल्या हाती आहे ...पुढे ईश्वरेच्छा बलियसी... बाकी निरर्थक चर्चा चालू देत !...

आधी लगीन खड्डे मुक्त रस्त्याचे मग ,हेल्मेट चे !! _एक संतापलेला नगरकर !

आमच्यासारख्या काॅलेजच्या पोरांनी काय करायचं? हेल्मेटने आमच्या स्टाईलस्टेटमेंटचं वाटोळं होईल!!!

आपण काय सरकार वर उपकार म्हणून हेल्मेट घालतो का...तुम्हाला स्वतःच्या जीवाची काळजी नाही का?या लेख वाल्या बाई म्हणतायत कि.....
मंध्यतरी अपघातात हेल्मेट धारक दोन महिलांचा मृत्यु झाला मग यास जबाबदार कोण.
.....अहो पण काहीही उदाहरण काय देताय. तुम्ही पाहायला गेला होतात का मृत्यू नेमका हेल्मेट असताना सुद्धा डोक्यावर आघात होऊन झाला कि शरीरावर अन्य ठिकाणी जखमा असण्यामुळे झाला.बरे या दुचाकीवाल्यांचे ठीक आहे, हट्ट करून बसल्येत हेल्मेट नको म्हणून पण यांच्या घरच्यांना सुद्धा यांची काळजी नाही का?मी पण असाच हेल्मेट घालायला कंटाळा करत असे. पण एके दिवशी भारतमाता टॉकीज, लालबाग येथे थोड्याश्या पावसाने रस्ता निसरडा झाला होता व त्यात इंजिन ऑइल मिक्स झाले होते त्यात अगदी 30 किमी च्या वेगात असताना सुद्धा ऍक्टिवा सारख्या स्कुटर वरून मे पडलो व रस्त्यावर बाजूने डोके आपटले अगदी जोरात. 2 मिनिटे डोक्यात झिणझिण्या आल्या, समोर काहीच दिसत नव्हतं. मग हेल्मेट काढून डोक्याला काही लागलं नाही ना ते चेक केलं तेव्हा हेल्मेट ला बाजूने तडा गेला होता. विचार करा लेखावल्या बाई जर तो तडा हेल्मेट ऐवजी माझ्या डोक्याला असता तर!!! तेव्हा पासून कानाला खडा लावला आणि आता हेल्मेट घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही.तुम्ही त्या महिलांचं उदाहरण देताय कि त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? अहो हेल्मेट आहे म्हणून 2 च जणांचा मृत्यू झाला पण हेल्मेट नसेल तर हाच एकदा 2000 वर ही जाऊ शकतो कारण रोज प्रत्येक मिनिटाला पुण्यात काय किंवा मुंबईत काय कोणी ना कोणी दुचाकी वरून पडतच असत.ते सरकार जाऊदे चुलीत पण स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांसाठी,नवऱ्यासाठी, आई बाबांसाठी तरी हेल्मेट घालून बाहेर पडत जा. वेळ कुणावरही सांगून येत नाही.आणि हो दुचाकी चालवणारा कितीही महान असला अगदी तो व्हॅलेन्टिनो रोस्सी का असेना मोटो जिपी वाला , पण प्रत्येकाचं आयुष्यात एकदा तरी छोटामोठा ऍक्सीडेन्ट होताच. अर्थात आता हेल्मेट घातलात तर ते ऍक्सीडेन्ट Fatal होण्याची शक्यता जवळपास 50%-60% नि कमी होते एवढे लक्षात घ्या.

आणि तर्हीही तुम्हाला हेल्मेट ला विरोध करायचाच असेल तर देव आपलं भलं करो _/\_


In reply to by गणेश उमाजी पाजवे

या लेख वाल्या बाई नाहीयेत, बुवा आहेत. बाकी प्रतिसादाशी हज्जारवेळा सहमत

आमचे चिरंजीव म्हणतात कि हेल्मेट डोक्यावर असले तर , पोलिस सरळ जावू देतात , लायसेन्स साठी अडवित नाही. ( म्हणजे पोलिसांना वाटते कि हेल्मेट चा नियम पाळणार्‍या ह्याच्याकडे लायसेन्स असणारच ! ! ) मी खरोखर दोनवेळा ,खिशात लायसेन्स घ्यायचेच विसरलो, आणि रस्त्यात दोन ठिकाणी पोलिस उभे होते , पण मला कोणी अडविले नाही. म्हणून हेल्मेटचा असा , सुरक्षा अधिक विसराळूपणावर मात , असा दोन्हीकडून फायदाच होतो .

In reply to by जयन्त बा शिम्पि

"हेल्मेट नाही म्हणून अडवले" हे पोलींसाकडे पहीले कारण असते गाडी अडवण्याचे. आणि मग त्यानंतर बाकीची विचारपूस चालू होते...लायसेन्स, गाडीचे कागद, पीयूसी, इंन्शुरन्स इत्यादी. हे सर्व असणारे खूप कमी असतात. त्यामुळे सरळ हेल्मेट घालून बाकी चौकशीला फाटा देणे कधीही चांगलेच...

हेल्मेट, सीट बेल्ट, पीयूसी, इन्शुरन्स, कागदपत्रं, नियम पालन हे पोलिसांसाठी किंवा इतरांसाठी नसून स्वत:साठी आहे हे कृपया लक्षात घ्यावं. बाकी पोलिसांसाठी किंवा इतरांसाठी करतोय अशी भावना असल्यास आपला दृष्टिकोन मुळातून बदलण्याची गरज आहे.

माझा भाचा पोलीस दिसल्याशिवाय कधीच हेल्मेट घालत नाही, कितीतरी वेळा त्याला सांगून थकलो पण गेल्या महिन्यात त्याला एक अपघात झाला. कारच्या ड्रायव्हर ने दरवाजा उघडल्यामुळे तो दरवाज्यावर आपटून दूर उडाला आणि डिव्हायडर वर आपटला. खांद्याचं हाड मोडलं आहे, छातीच्या पिंजऱ्याचे हाड थोडी आत बेंड झाली आहेत (तुटली नाहीयेत असं डॉक्टर म्हणाले). डोकं आपटलं पण कधी नव्हे ते त्याने हेल्मेट घातल्यामुळे डोक्याला मार बसला नाही. हॉस्पिटल मध्ये त्याला भेटायला गेल्यावर मला सारखं सॉरी आणि थँक्स म्हणत होता. बोलतो आता हेल्मेट शिवाय गाडी चालवणार नाही कारण त्यामुळे वाचलोय. हेल्मेट मुळे कधीच त्रास जाणवला नाही, उलट हेल्मेट नसेल तर बाईक चालवताना मला चुकल्यासारख वाटत. हेल्मेट शिवाय बाईक न चालवणारा जगप्रवासी

वाँट टु बी ए हेल् मेट, वेअर हेल्मेट!! :) माझ्या बघण्यात दोन उदाहरणे आहेत जी फक्त आणि फक्त हेल्मेटमुळेच वाचली आहेत. मी सायकलवरुन जाताना सुद्धा हेल्मेट घालतो. नेहेमीचा रस्ता असला तरी वेळ तीच नसते. काय होईल आणि तुम्ही पडाल याचा अंदाज बांधणं केवळ अशक्य असतं. सुरक्षित प्रवास करा आणि यानं किंवा हिनं फक्त हेल्मेट घातलं असतं तर.....अशी वेळ कृपया येऊ देऊ नका!!

काय नाय वो ,हेल्मेट बनवणार्या कंपण्यांनी मलिदा चारला की हेल्मेटसक्तीची टुम निघते.ब्याग्या मिळाल्या की मग हे राजकारणी गप्प बसतात,२००२ ला पुण्यात हेल्मेटसक्ती केली तेव्हा एका दिवंगत राजकारण्याच्या नातेवाईकाने,ज्याचा हेल्मेट बनवण्याचा व्यवसाय होता ,त्याने चिक्कार पैसे छापले. जवळपास जायचे असल्यास हेल्मेट वापरण्याची गरज नाही,पण लाँग रुट जायचे असेल ,दुसर्या गावी जायचे असेल तेव्हा हेल्मेट गरजेचे आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

काय सांगता? अपघात तुम्ही घराजवळ राहता, म्हणून होत नाहीत का? दुचाकी चालवायची असेल तर आधी हेल्मेट आणि मग चावी.

फारच विनोदी धागा झालाय... काय नेहमी नेहमी तेच ते दळण दळायचं, मेंदू असलेले घालतील हेलमेट, नसलेले घालणार नाहीत. तेवढेच बिन्डोक कमी होतील जगातून. चांगलंच आहे की.

घराजवळच यायचं-जायचं दिडेक महिन्यापूर्वी घडलाय किस्सा. एक व्यक्ती सुमारे दिडशे किमी चा प्रवास करुन घरी पोचत होती. घरापासून फक्त दिडशे फुटावर वादळी वार्‍याने धडक दिली. कोलमडून पडला... ७२ टाके पडलेत चेहर्‍यावर... घराजवळ असण्याचा फायदा की लवकर हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. जीव वाचला. घर जवळ असण्याचा मुद्दा लोक मांडतात तेव्हा त्यांच्या मनामधे नक्की काय चालत असेल? धोक्याची जाणीव आणि सुरक्षित जागेपासूनचे आपले अंतर ह्याला महत्त्व देत असावेत, ही काहीतरी आदिम प्रेरणा असेल. सुरक्षित स्थान म्हणजेच आपले घर ह्यापासून आपण जितके जवळ तितका धोका कमी अशी काहीशी सुप्तमनात नोंद असावी. अर्थातच बाइकवरुन प्रवास करतांना अशी जाणीव फूलिशच आहे. लोक घरातून निघतांना, बाईक स्टॅन्डवरुन काढतांनाही पडत असतात. आणि जखमी होतात, हॉस्पिटलात थेट ऑपरेशन थेटरमधे पोचतात. बघितलंय म्हणून सांगतोय.

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा, इथे मिपावरच एक उदाहरण मिळेल. पार्किंगमध्ये गाडी पार्क करताना डोके भिंतीवर आपटले, चालक कोमामध्ये. ..आणि लोकं हेम्लेट न घालायला नवीन नवीन कारणे शोधत असतात. सोडा राव, ज्याला सुधारायचे नाही त्याला त्याच्या नशिबावर सोडा.

माझ्या मुद्द्याचा विपर्यास केलेला दिसतोय,घराजवळचे रस्ते ,कामाच्या ठीकाणी जायचे रस्ते याची आपल्याला सवय असते,रुटीन रस्ता असेल तर माणुस व्यवस्थीत गाडी हाकू शकतो,किमान ट्रॅफीक ,रोड कंडीशनचि माहीती असते.त्यामुळे अपघताची शक्यता कमी होते.याउलट.. लांबच्या ठिकाणी जाताना रस्ता नेहमीचा नसतो ,ट्रॅफीक ,रोड कंडीशन माहीत नसते,वेगही जास्त असतो ,अश्यावेळी हेल्मेट गरजेचे आहे असे माझे मत आहे. रात्री जेवल्यावर पान खायला जायचे आहे ,पाच मिनिटांचा रस्ता आहे ,तेव्हा हेल्मेट घेऊन जाणे इष्ट नाही.सगळी मजाच् जाईल की राव.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

तुम्ही खुलासा केल्यावर नक्की काय बोलावे ह्याबद्दल संभ्रमात पडलो. असो!

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

>>>रात्री जेवल्यावर पान खायला जायचे आहे ,पाच मिनिटांचा रस्ता आहे ,तेव्हा हेल्मेट घेऊन जाणे इष्ट नाही.सगळी मजाच् जाईल की राव. मुद्दा रास्त आहे मात्र पाच मिनिटावर जाण्यासाठी कशाला गाडी? वॉकत वॉकत जावं. हेल्मेट घालून 'पचाक थुंकेकर' होता येणार नाही त्यापेक्षा वॉकतांना कधीही हां कार्यक्रम करता येईल हा मुद्दा देखील लक्षात घ्यावा लागेल.

हेल्मेटसक्ती सुरु झाली की रस्ता आठवतोआणि खड्डे हे तर्कशास्त्र न पटणारे आहे.खड्डा नसलेल्या रस्त्यावर अपघात झाल्यावर डोक्याला मार बसणार नाही का ? आणि खड्ड्यात पडल्यावर मार बसणार.अपघात टाळता येत नाहीत.पण त्यामुळे होणार्या परिणामांची तीव्रता कमी करता येते. आणि रस्त्यावर डोके आपटल्यावर जर हेल्मेट घातलेले असेल तर हेल्मेट नेमकेच हेच काम करते हे वाद घालणार्या मंडळींच्या लक्षात येत नाही असे. वाटते.रस्ता गुळगुळीत असो वा नसो रस्त्यावर आपटल्यावर रस्ता त्याचे काम करतो. पण हेल्मेट नसले तर काय होइल याची कलपनाही करवत नाही.

In reply to by हरकाम्या

प्वाइंट है बॉस. ह्या लोकांना वाटतं की ट्रॅफिकमुळे, खड्ड्यांमुळेच अपघात होतात. असे असेल तर म्हणावे लागेल की ह्या लोकांना खरंच डोकं नै हे... ;)

2012 साली मी बाईक ने रोज कोथरूड ते ऑफिस जात येत असे. एकदा संध्याकाळी परत येताना कर्वे रोड वर रांका च्या जरा अलीकडे अचानक गाडी स्लिप होऊन खाली आपटलो. गाडी तशीच स्लिप होत पुढे निघून गेली. शर्ट, पॅन्ट फाटली. तिथे असलेला एक वाहतूक पोलीस धावत आला आणी मला बाजूला नेऊन बसवले. गाडी आणून उभी केली. रस्त्याचा तो भाग चेक कला तर तिथे एकदम थोडे ऑईल सांडलेले होते. बाप झाल्यानंतर अवघ्या सातव्या दिवशी घडलेल्या ह्या घटनेत हेल्मेट नसते तर निश्चित फोटोत गेलो असतो.

हेल्मेट सक्ती का च्या ऐवजी हेल्मेट सक्ती का नको,,,, सक्ती तेव्हाच केली जाते जेव्हा लोक नियम धाब्यावर बसवतात . एकविसाव्या शतकात सुशिक्षित लोक समाज असे म्हणत असतील तर हा त्या देशाच्या पुढारलेपणाचा पराभव आहेत . आणि हेल्मेट सक्ती का? अशी मानसिकता असणारे लोक मुळात या देशाचे सुजाण नागरिक म्हणून घ्यावेत कि नाही याबद्दल शंका आहे . अरे तुम्हाला काय शिंगे आहेत का हेल्मेट न घालायला ,,,,, काही लोकांना हा खूप साधा प्रश्न वाटेल पण कसं आहे ना देश म्हणजे तिथल्या लोकांच्या विचाराचे प्रतिबिंब .... आणि अजून पण आपले विचार तसेच असतील तर आपण नव्या युगाची स्वप्ने कशी पहावीत ,,,,,,,कुणाला वाईट वाटले तर त्यांना हेल्मेट घालून नमस्कार

खयंच मरुदे.. लोकांना अपल्याच जिवाची काळ्जी नाहिये तर कोण काय करणार? माझ्या मित्राची engagement होती या विकेंडला २१aug. ती कॅन्सल केली कारण त्याच्या मामेबहिणीचा नवरा गेला. वयवर्ष ३३. या शनिवारीच गेले. गाडी स्पीड मधे होती, खड्डा चुकवायला गेले आणि समोरून येणार्‍या तीनचाकी गाडीवर आपटून काचेतून आत गेले. हेल्मेट नव्हतं. डोक्याला आणि मेंदूला मार लागून जागिच गेले. ताईचं वय २९ आणि मुलगी आहे ६ वर्षाची. संसार उध्वस्त. लिहवतही नाहिये.

हेल्मेट प्रमाणेच महाराष्ट्रातील जुने पुल पार करीत असताना, प्रत्येकाने कमरेला डबा ( अर्थात पाण्यात न बुडण्या साठी) बांधण्याचा बंधनकारक कायदा करण्याचा सरकार विचार करीत आहे.

मला आठवते आहे की काही वर्षपूर्वी हेल्मेट घालावे की नाही याच विषयावरून पुणेकरानी प्रोटेस्ट केले होते. अजुनही यावरच आपण बोलत आहोत हे वाचुन असे वाटले की अनेकाना आपल्या जीवाची व आपल्यानन्तर कुटुम्बाचे काय होईल याची पण पर्वा नाही. अपघातात हेल्मेट फुटले म्हणून म्रुत्यु पावतात याचा अर्थ काहीनी हेल्मेट घालुन्ही आपण मरु शकतो मग घालायची काय गरज असा काढला आहे. हेल्मेट मोडले वा फुटले का याचा कोणी तपास केला आहे का? हेल्मेट बनवणारे कोण व त्यान्चा सम्बन्ध कोणाशी आहे हे फार महत्वाचे आहे. मी जेथे राहतो तेथे वाहने सरसकट ६०-८० किमी वेगाने चालवतात पण अपघातात हेल्मेट मोडल्याने डोक्यास मार लागून ती व्यक्ति मेली असे अजुन ऐकले नाही. असो. हेल्मेट घालावे की नाही ही चर्चा चालुन्दे.

घातलं हेल्मेट तर हरकत काय आहे? हा काय विरोध करायचा मुद्दा आहे? गाडी घ्यायला पैसे आहेत आणि हेल्मेट घ्यायला नाहीत असं आहे का?

सरते शेवटी पुणेकराना ( फारतर असे म्हणू वेगळा विचार करणाराना ) हेलमेट घालावे लागणार. पाचशे रूपये दोन तीन वेळा भरावे लागले तर हेलमेट विकत येईल. एक खरे की जगात तसेच भारतात अनेक शहरात हेलमेट घातले जाते. पुणेकराना ते हळूहळू सक्तीने घालावेच लागेल. मला काळजी अशी पडली की ,, हेलमेट न घालणारे बिनडोक आहेत हे विचार करणार्या जंताना मग नवीन विषय शोधावे लागतील नं ! मग त्यानी आपला मोर्चा कंडोम न वापरणारे बिनडोक आहेत असा आटापिटा करण्यात घालवावा.काही प्रश्न जगाने वा बंगलोर जयपूर यानी कसे सोडविले आहेत ते समजून घ्यायला आवडेल. जयपूर मधील लहान मुलांसाठी लहान हेलमेट मिळतात का? चंदीगड मधील सरदारजीची पगडी हेलमेट एवढी मजबूत असते का ? की तीवर परफेक्ट बसणारे हेल्मेट ते लोक घालतात? बिनडोक (?)पुणेकर आता हेलमेट घालतील मग कोरेगाव, पाथर्डी, मालेगाव, झुमरीतलय्या, बारामुल्ला, थेकडी येथील सर्वच लहान मुले, वृद्ध, बायका ही हेलमेट घालायला लागतील ना? सध्यातरी शासन हेलमेट ( सक्ती)नको वाल्याना चेकमेट देण्याच्या मार्गावर पुढे जात असल्याचे चित्र आहे. हेलमेट घालणे ही एक संवय आहे. त्यात फायदेही व तोटेही आहेत. असा माझा तरी अनुभव आहे.

In reply to by चौकटराजा

सरते शेवटी पुणेकराना ( फारतर असे म्हणू वेगळा विचार करणाराना ) हेलमेट घालावे लागणार.
पुण्यात हेल्मेटसक्ती यशस्वी होणे अशक्य आहे. आजवर अनेकांनी अनेकवेळा हेल्मेटसक्ती करण्याचा निष्फळ प्रयत्न करून सोडून दिलेला आहे. यावेळीही हेल्मेटसक्ती यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही. शेवटी पुणेकरांचाच विजय होत आलेला आहे आणि विजय होत राहणार!

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई मोड ऑन "मुसलमानांत धर्मसुधारणा यशस्वी होणे अशक्य आहे. आजवर अनेकांनी अनेकवेळा धर्मसुधारणा करण्याचा निष्फळ प्रयत्न करून सोडून दिलेला आहे. यावेळीही धर्मसुधारणा यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही. शेवटी इस्लामचाच विजय होत आलेला आहे आणि विजय होत राहणार!" चंपाबाई मोड ऑफ!!

In reply to by श्रीगुरुजी

विजय?? कशाची टिमकी कोण वाजवेल सांगता येत नाही. आणि हो, सगळेच पुणेकर काही स्वतःच्या डोक्याची किंवा कायद्याची चिंता नसलेले नसतात. पोलिसांनी हेल्मेट वापराची सक्ती करायला सुरुवात केली की मुकाट्याने जाऊन हेल्मेटं विकत घेतात. फेब्रुवारीमध्ये पुण्यात हेल्मेटचे सेल्स प्रचंड वाढले! काही वर्षं लागतील, पण हेल्मेटं घातलेले चालक जास्त जास्त दिसायला लागतील. आत्ताच जर तुम्ही पुण्याच्या ट्रॅफिकचे फोटो गूगल केलेत तर सर्वसाधारणपणे २०१० नंतरच्या फोटोंत (सगळ्याच फोटोंत नाही) हेल्मेटं जास्त प्रमाणात दिसतात.

In reply to by राजेश घासकडवी

अमेरिकेत राहून पुण्यात काय चालले आहे यावर अधिकारवाणीने भाष्य करताय! असो. अज्ञानात सुखी रहा.

In reply to by श्रीगुरुजी

अर्रेवा! तुम्ही पुण्यात राहून अख्ख्या जगात काय चालले आहे त्यावर भाष्य करता त्याबद्दल काय मत आहे?

In reply to by राजेश घासकडवी

अहो ते मूळ पुण्याबद्दल बोलत आहेत, तिथल्या बाकांवर नाहीतर बंद दुकानाच्या पायरीवर बसणारे आणि विश्वाची चिंता करणारे पुणे. चांगले आहे, तेवढीच सरकारी महसूलात वाढ होइल.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गोवंश हत्येवर बंदी आली. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने चाईल्ड पॉर्नवर बंदी घालण्याचे सूतोवाच केले. लगेच निधर्मांधांनी आकाशपाताळ एक करायला सुरूवात केली. या गोष्टींवर बंदी घालणारे हे कोण? आम्ही काय खायचं, काय बघायचं, काय बोलायचं, काय वाचायचं हे आता सरकार ठरविणार का? अशी बंदी घालून या सरकारने आपला फॅसिस्ट चेहरा उघडा केला आहे ... अशा अनेक प्रतिक्रिया निधर्मांधांनी सुरू केल्या. पण आता हेल्मेटसक्तीच्या निर्णयावर हे गप्प आहेत. जसं आम्ही काय खायचं, काय बघायचं, काय वाचायचं इ. सरकारने ठरविणे चुकीचे आहे, तसेच आम्ही डोक्यावर काय घालायचं हे सुद्धा सरकारने ठरविणे चुकीचे आहे. मी हेल्मेट न घातल्याने जर इतरांना त्रास होत नसेल तर हेल्मेट घालायची माझ्यावर सक्ती का?