नामांतरीत आयडी

बाळ सप्रे's picture
बाळ सप्रे in काथ्याकूट
10 May 2016 - 6:08 pm
गाभा: 

मिपावर जसे वैविध्यपूर्ण लिखाण्/विचार वाचायला मिळतात तसेच वैविध्यपूर्ण आयडी देखिल समोर येतात.
काही काळ लेख,प्रतिसाद वाचून एकेका आयडीचा अंदाज यायला लागतो. हे आयडी बदलतादेखिल येतात. त्यामुळे आयडी बदलला की त्याच्या प्रतिसाद्/लेखांची हिस्ट्री जमेपर्यंत परत अंदाज बांधता येत नाहीत. पण स्वभावाप्रमाणे लेख प्रतिसाद यांची भाषादेखिल लपवणे कठीण असते. चाणाक्ष मिपाकर खूप लवकर कुठल्या आयडीने कुठले नवे नाव धारण केलय ते ओळखतात. डुआयडी वगैरे असेल तर लोक फार काळजी वगैरे घेउन लिखाण करतात पण मिपाकरांच्या नजरेतून वाचणे तसे कठीणच. आता आयडी बदलण्यामागे नेहेमीच काही कलुषित कारणे असतात असे नव्हे. खूप वेगेवेगळे आयडीज बघून आपणही नव आयडी घ्यावा अशीही इच्छा होत असेल.

असो एवढी प्रस्तावना कशाला तर तुम्ही ओळखलेले असे नामांतरीत (अथवा एकाच व्यक्तीचे जुने नवे आयडी अथवा डुआयडी) आयडी इथे टाकणे.. चूक की बरोबर खात्री पण करुन घेता येइल..

माझ्या माहितीतीले हे काही ..

अत्रुप्त आत्मा > अत्रुप्त > आत्मबंध
गगनविहारी > गवि
धनाजी वाकडे > धन्या > सतिश गावडे
संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर
स्वॅप्स > एस
इस्पिकचा एक्का > डॉ सुहास म्हात्रे
गिरीजा > प्रसाद गोडबोले > प्रगो
माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!!
.
.
.
.
.

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

10 May 2016 - 6:11 pm | पिलीयन रायडर

संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर हे ऑफिशियल आहे का? ;)

बाळ सप्रे's picture

10 May 2016 - 6:12 pm | बाळ सप्रे

नथिंग ऑफिशिअल अबाउट इट :-)

स्रुजा's picture

10 May 2016 - 11:49 pm | स्रुजा

लोल

अहो तुम्ही डु आयडी बद्दल लिहीताय की नामांतरीत आयडीज बद्दल?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 May 2016 - 8:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हि संधी घेउन सृजा असा नावबदल कर ना. =))

अस्वस्थामा's picture

11 May 2016 - 2:22 pm | अस्वस्थामा

नै तर सृज्जा कसं वाटतंय.. ;)

प्रीत-मोहर's picture

11 May 2016 - 2:26 pm | प्रीत-मोहर

आहे तेच बरय हो. नका भलते किडे घालु तिच्या डोक्यात :प

स्रुजा's picture

11 May 2016 - 6:10 pm | स्रुजा

सृजाउद्दौला कसं वाटतंय? शब्दश्रेयः आदुबाळ ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 May 2016 - 8:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चालणेबल आहे. लाहोर्बिलावकुत वगैरे छाप शब्द शिकायचा क्लास लावुन घे म्हणजे झालं =))

धन्या, सतीस गावडे आणि फटू हे तीन्ही वेगळे आयडी आहेत.
तसेच ठाकूर आणि क्षीरसागर पण.
(मालक कोण व किती हे माहीत नाही)
बाकी नामांतरितात मी पण आहे. ;)

बाळ सप्रे's picture

10 May 2016 - 6:17 pm | बाळ सप्रे

धन्या, सतीस गावडे आणि फटू हे तीन्ही वेगळे आयडी आहेत

म्हणूनच एकाच व्यक्तिचे जुने नवे आयडी असही म्हटलय..

रच्याकने.. तुमचही आधीचं नाव कळू द्या :-)

अभ्या..'s picture

10 May 2016 - 6:33 pm | अभ्या..

इसरलो, फेमस होता आयडी पण.

'मी नाही मी नाही ' तो तूच ना :)

चौकटराजा's picture

11 May 2016 - 2:11 pm | चौकटराजा

बहुदा " आपला अभिजित "

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 12:07 am | सतिश गावडे

धन्या, सतीस गावडे आणि फटू हे तीन्ही वेगळे आयडी आहेत

का माझ्या आयडींच्या जीवावर उठला आहात? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 May 2016 - 8:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगाला लागली कोणाची उचकी... ;)!!!

प्रदीप साळुंखे's picture

10 May 2016 - 6:21 pm | प्रदीप साळुंखे

संक्षी=ठाकूर वगळता बाकिचे ऑफिशिअल आहेत,त्यामुळे त्यात काय नवीन नाही.
डुआयडींची नावे सांगून काहीजणांचा भांडाफोड करायचा असेल तर सांगा.इतरांनाही एखाद्या आयडीबद्दल शंका वाटत असेल तर इथे सांगावी,फक्त चर्चा हेल्दी झाली पाहिजे,नायतर फुकटचा राडा नको.

स्पा's picture

10 May 2016 - 6:23 pm | स्पा

स्पा- मन्या फेणे - स्पा
सुधांशू देवरुखकर- सूड
वल्ली - प्रचेतस

उगा काहितरीच's picture

10 May 2016 - 6:28 pm | उगा काहितरीच

मला बदलायचाय...पण होत नाहीये .

जव्हेरगंज's picture

10 May 2016 - 6:30 pm | जव्हेरगंज

जुने = नवे

क्लिंटन = गॅरी ट्रुमन
वल्ली = प्रचेतस
मांत्रिक = विजय पुरोहित
तर्रीताई = शिवकन्या
अमित पाटील = सागर कदम

वैभव जाधव's picture

10 May 2016 - 6:30 pm | वैभव जाधव

वैभव जाधव- नीलमोहर- मोदक- अजया- अभ्या..- पैसा- बॅटमॅन- स्नेहांकिता

अभ्या..'s picture

10 May 2016 - 6:35 pm | अभ्या..

कित्ती पाईप वाकडे करताल?
सुधरा जरा.

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 12:12 am | सतिश गावडे

प्यारे१ कसा काय विसरलात?

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 12:22 am | वैभव जाधव

तुम्ही आणणार हे ठाऊक होतं :)

सध्या कसे आहात? ;)

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 8:51 am | सतिश गावडे

भारीच विश्वास प्यारेजी तुम्हाला. सध्या ओके.

बॅटमॅन's picture

11 May 2016 - 12:36 am | बॅटमॅन

आयला प्यार्‍या तू हैस होय.

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 12:49 am | वैभव जाधव

व्हय अभ्या..
मीच तो

अच्छा.मग तुमचा आय डी उघडकीला आणल्यावर जो आव आणला तो खोटा होता तर.

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 11:27 am | वैभव जाधव

ओ डोक्यावर पडून किती दिवस झाले?

व्हय अभ्या.. म्हणालो मी!

काहून माझ्या मागं लागलाय बाई???? जा की काय तर काम बघा!

दुसर्यावर आरोप करताना आपण कुठे काय खोटं बोललो आहे याचा विसर पडतो ना तुम्हाला.

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 12:18 pm | वैभव जाधव

ज्या धाग्याचे संदर्भ दिलेत ना आपण तिथे अभ्या आणि माझी मजा सुरु होती. तुमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. सोडून द्या.

बाकी वर मुद्दाम हो म्हणालो आहे हे चाणाक्ष वाचकांना समजले असेल ज्यात तुम्ही येणं शक्य नाही.

बॅटमॅन च्या उत्तराला मी होय अभ्या.. असं म्हणालो आहे.

बाकी मी प्यारे आहे किंवा नाही किंवा मधून आहे मधून नाही यामुळे आपल्या ला नेमका काय फरक पडतो ते कृपया समजू शकेल काय???

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 12:32 pm | टवाळ कार्टा

बाकी मी प्यारे आहे किंवा नाही किंवा मधून आहे मधून नाही यामुळे आपल्या ला नेमका काय फरक पडतो ते कृपया समजू शकेल काय???

बाडिस

आपण माझ्या पर्सनल फोन नंबरवर निष्कारण पिंग करुन मला तुमचा नवा नंबर ब्लाॅक करा वगैरे लिहिलंत की नाही?
अजूनही तुमचे नसते उद्योग बंद नाही झालेले दिसत.अनेक अनाहितांनी तुमची तक्रार केलेली असताना आपण डुप्लिकेट आयडीत अवतार घेतला आहे हे त्यांना कळायला हवेच.

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 12:58 pm | वैभव जाधव

?
डोक्यावर पडून किती दिवस झाले?

एखाद्यानं ब्लॉक करा असं सांगितलं तर नेमका प्रॉब्लेम काय आहे कळेल का? बाकी काही बोलला का ?

बाकी इथे प्यारे किंवा आणखी काही असलेली व्यक्ती whatsapp किंवा चेपू किंवा आणखी कुठे वेगळी असणार ना? मिसळपाव वर वैभव जाधव किंवा प्यारे किंवा आणखी अजया म्हणजे व्यक्ती नाही. आयडी आहे. तुमचा वाद नक्की कुणाशी आहे?

मुळात तुम्ही सांगायला येण्याची आवश्यकता काय होती?
तुमचा उद्देश तुम्ही खोटे बोलून इतर मिपाकरांना कांगावा करुन फार सरळ आहे असे दाखवायला बघताय का?

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 10:15 pm | वैभव जाधव

मुद्दा काय आहे? काय खोटं बोललो?
कांगावा आधी पण तुम्हीच केला होता आताही तुम्हीच करताय.

आमच्या डोक्यात नसलेल्या गोष्टी इररेलॅव्हेंट प्रकारे कोट करुन अकारण गोंधळ करु नका.

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 10:24 pm | वैभव जाधव

आणि काय तक्रार वगैरे करायची असली तर मालकांकडे करा.

तुम्ही खोटे बोलल्याचा पुरावा तुमच्यासाठी नाही तर इतरांसाठी आहे ! तुम्हाला वाचता येत नाही हे दिसतच आहे.
कांगावा "तो मी नव्हेच" तुम्ही केला आहे.तोही अर्थातच दिसत नसेल.

आमच्या डोक्यात नसलेल्या गोष्टी इररेलॅव्हेंट प्रकारे कोट करुन अकारण गोंधळ करु नका.

तुमच्यासारखे निरागस तुम्हीच :)

वैभव जाधव's picture

12 May 2016 - 11:45 am | वैभव जाधव

सुधरामायसिन च्या गोळ्या घ्या.

@ टका, तुला कुठलीही माहिती नसताना या विषयात उगाच काड्या करायला येऊ नकोस.

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 1:03 pm | टवाळ कार्टा

बाकी मी प्यारे आहे किंवा नाही किंवा मधून आहे मधून नाही यामुळे आपल्या ला नेमका काय फरक पडतो ते कृपया समजू शकेल काय???

एखादा आयडी आधी काय होता आणि आता काय आहे यामुळे प्रतिसादावर फरक पडू नये याबद्दल होते ते

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 1:07 pm | टवाळ कार्टा

बाकी एखादा प्रतिसाद काडी नसताना त्याला काडी म्हणणे हे सरसकटीकरण आहे...जिथे काडी असेल तिथे मी त्या प्रतिसादाला काडीच म्हणतो...ताकाला जाउन भांडे लपवत नाही :)

आणि मी उगाच काड्या सारायला येतो हा वैयक्तीक आरोप आहे...आजच मिपावर "मिनी मायनी मो" चे उच्चारण परत बघितले...ज्याच्याबद्दल लिहिले तो आयडी कधी काड्या सारताना बघितला नाहिये...मग बाकीचे आयडी त्या आयडीबद्दल कुचाळक्या करतात त्याला काय म्हणावे

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 1:08 pm | टवाळ कार्टा

मी उगाच काड्या सारायला येतो हा वैयक्तीक आरोप आहे

इथे उगाच या शब्दाबद्दल आक्षेप आहे...मी काडी टाकली तर जाणून्/समजून टाकतो....ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ

तरीपण विचारणार्‍या काहीजणांना 'डोक्यावर पडलात का?' असं विचारलं होतं आपण.. :-)

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 11:31 am | वैभव जाधव

सप्रे, तुमचा आयडी खरा आहे का?
वर उत्तर दिलंय. धन्यवाद!

बाळ सप्रे's picture

11 May 2016 - 11:44 am | बाळ सप्रे

वरचं उत्तर बॅटमॅनच्या प्रतिसादाला दिसतय..

असो.. 'ते तुम्ही नव्हेत' तर

माझा आयडी खरा की खोटा ते बघा बॅक्ग्राउंड व्हेरीफि़केशन करुन .. :-)

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 11:48 am | वैभव जाधव

ओके.

सस्नेह's picture

11 May 2016 - 2:03 pm | सस्नेह

मेर्कू कायकू बीचमे लाया इस्माईलभै ;)

नीलमोहर's picture

11 May 2016 - 12:37 pm | नीलमोहर

खाया पिया कुच नै, फोकटका गिल्लास तोडा

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 2:10 pm | टवाळ कार्टा

हा प्रतिसाद एडिट कसा केला? आधी इस्माईलभै नव्हते त्यात ;)

आधी नीट वाचला नाही असं दिसतय.

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 3:17 pm | टवाळ कार्टा

आधी वाचल्यानंतरपण "नवीन" असा ट्याग आलेला

मराठी कथालेखक's picture

10 May 2016 - 6:39 pm | मराठी कथालेखक

कन्फ्युज्ड अकाउंटंट >असंका नामांतरित आहे असं दिसतंय.

जेपी's picture

10 May 2016 - 6:43 pm | जेपी

माझा उल्लेख नै..
निशिढ...

तथास्तु=जेपी.

(नामांतर चळवळीचा सक्रीय कार्यकर्ता)

खटासि खट's picture

11 May 2016 - 12:29 am | खटासि खट

कसाकायबदलतातआयडी ?
जाणुनघेण्यासउस्तुक

नामांतर चळवळीस म्या इरोध केला व्हता, च्यामारी कोन आता हाय,आधी क्वन व्हता नंतर काय व्हईल त्याचा काय बी अतापता लागत नाय बाँ... एक्सेल सांभाळायचा तर्रास्स्स का घ्यावा ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भींगी भींगी सड़कों पे मैं तेरा इंतज़ार करूँ धीरे धीरे दिल की ज़मीं को तेरे ही नाम करूँ... :-SANAM RE

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 May 2016 - 8:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने गावडे सरांचं नामांतर झालेलं नसुन ते तीन वेगवेगळे आयडी आहेत.

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 11:08 am | सतिश गावडे

हे माझे डुआयडी नसून ज्ञात आयडी आहेत. तीन आयडिंनी केलेले लेखन तीन वेगवेगळ्या धाटनीचे आहे. महत्वाचे, यातल्या कुठल्याही आयडीचा मी "शिखंडी आयडी" म्हणून उपयोग केलेला नाही.

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 3:19 pm | टवाळ कार्टा

तुझा "फटू" म्हणून अज्जून एक आयडी आहे ना तुझा?

आनन्दा's picture

12 May 2016 - 8:13 am | आनन्दा

आता एक शिखंडी आयडी काढून स्वतःची तरफदारी करायची सवय करून घ्या.

रच्याकने, मी पण एका डुआयडीची रिक्वेस्ट दिली होती, अजून अ‍ॅक्टीव्हेट झालेला नाही.. यांचे कसे होतात देव जाणे.

सतिश गावडे's picture

12 May 2016 - 8:22 am | सतिश गावडे

आता एक शिखंडी आयडी काढून स्वतःची तरफदारी करायची सवय करून घ्या.

होय. प्रयत्न चालू आहेत. असा शिखंडी आयडी काढला की पहीला तुमच्याच आयडीच्या मानगुटीवर बसेन. आणि स्वतःच्या तरफदारीबद्दल म्हणाल तर असते काहींना लाल रंगाचे फटकारे मारण्याची जन्मजात सवय. :)

आदूबाळ's picture

12 May 2016 - 9:51 pm | आदूबाळ

तुम्ही "डुआयडी" नावाच्या डुआयडीची रिक्वेस्ट दिली होती का? ;)

पहिलं म्हणजे असे आयडींवर धागे यावेत व त्यात माझे सदस्यनाम असावे याची मला मौज वाटते. उगाच तो ग़ालिबसाहेबांचा शेर आठवतो - 'तू कहाँ का दाना था, किस हुनर में यकताँ था...'. असो.

दुसरं म्हणजे माझा आयडी कोणी 'ओळखावा' यात नवल ते काय? मी सदस्यनाम जाहीररित्या बदलले होते. तसेच काही काळ त्याचे कारण व जुने सदस्यनाम हे प्रोफाईलच्या माहितीत ठेवलेही होते. तेव्हा जुने सदस्यनाम वा जुनी ओळख 'लपवावी' म्हणजे ते कोणीतरी 'शोधून काढेल' वा 'ओळखेल' असे यात काहीही नाही.

अगदीच कोणाला इतरांच्या लेखनापेक्षा त्यांची सदस्यनाम हिस्टरी खोदून काढायला जास्त आवडत असेल तर त्यासाठी एक एक्सेल शीट बनवून इंटरेस्टेड सदस्यांना मेलवर पाठवावी. त्यासाठी धागे काढण्याची गरज नाही.

बाळ सप्रे's picture

11 May 2016 - 10:13 am | बाळ सप्रे

तुमच्यासारखे काही जाहीरपणे बदलतात.. काही जण कोणाला नकळत बदलतात व 'तो मी नव्हेच' असं पण करतात..

बाकी एक्सेल शीट वगैरे रोजच्याच आहेत. आणि प्रत्येकाला कुठे व्यनि करत बसणार.. त्यापेक्षा धागा काढणं सोपं वाटलं..

लालगरूड's picture

11 May 2016 - 9:28 am | लालगरूड

आयडी कसा बदलावा?

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 11:09 am | सतिश गावडे

प्रशांत आयडीला व्यनि करा.

बोका-ए-आझम's picture

11 May 2016 - 11:52 am | बोका-ए-आझम

तर ते स्वतःलाच व्यनि करतात की काय? ;)

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 12:24 pm | सतिश गावडे

ते त्यांना व्यनि करुन विचारावे लागेल. ;)

पक्षी's picture

11 May 2016 - 1:46 pm | पक्षी

खिक्क...

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 1:56 pm | टवाळ कार्टा

लोल

जव्हेरगंज's picture

11 May 2016 - 4:54 pm | जव्हेरगंज

g

माझीही शॅम्पेन's picture

11 May 2016 - 1:40 pm | माझीही शॅम्पेन

माझ्या मते

तजो >> तुड्तुडी >> मोगा >> mughabole

मार खातोय आता !!! पळा

माझा एक प्रश्न: एखाद्याला व्यक्तिगत संदेश/ खरडवहीत खरड टाकायची असेल तर त्याचे नाव कुठे दिसले की त्यावर क्लिक करून यांना व्यक्तिगत संदेश/ खरड लिहा वर टिचकी मारून लेखन चौकट मिळते परंतू ते नावच दिसले नाही तर लेखन चौकट कशी मिळवायची?

पिलीयन रायडर's picture

11 May 2016 - 1:49 pm | पिलीयन रायडर

व्यक्तिगत संदेश मध्ये जाउन नाव टायपायला घ्या.. सजेशन्स येतात. त्यातुन निवडा.

किंवा तसं ते नाव site:misalpav.com म्हणुन गुगल सर्च केलं तरी एखादा लेख / प्रतिसाद मिळतो, त्यातुन पण क्लिक करुन पण हे करता येईल.

भाते's picture

11 May 2016 - 1:52 pm | भाते

दिपक.कुवेत - दिपक दांडेकर - दिपक.कुवेत :)
हेमांगीके - किलमाऊस्की

पिलीयन रायडर's picture

11 May 2016 - 1:59 pm | पिलीयन रायडर

charshad (का असंच कायतरी) - ५०फक्त
गवि, तिमा ह्यांना शॉर्टफोर्म करुन घेतला ते आठवतय.

पण नामांतरपेक्षा डुआयडींविषयी बोला. म्हणुन लोकांनी शिस्तीत जाहीर केललं आहे पण तरी, जसं की सनईचौघडा - प्रमोद दर्देकर टाईप..

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 2:09 pm | टवाळ कार्टा

आणि (कायमचे?) भावी संपादक जेपी = एस.माळी =))

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 2:13 pm | सतिश गावडे

हे माहितीच नव्हते.

पिलीयन रायडर's picture

11 May 2016 - 2:54 pm | पिलीयन रायडर

=))

बेक्कार झालं राव!! तो प्रतिसाद हाय का बॅकप मध्ये??

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 3:17 pm | टवाळ कार्टा

कोणता प्रतिसाद?

पिलीयन रायडर's picture

11 May 2016 - 4:40 pm | पिलीयन रायडर
टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 4:51 pm | टवाळ कार्टा

आरारा...कित्ती ते खोदकाम

पिलीयन रायडर's picture

11 May 2016 - 5:00 pm | पिलीयन रायडर

नाही रे.. जेपी उर्फ माळींनी स्वतःच दिला (म्हणजे मी खवत मागितला हो!!)

हा प्रकार मला आवडला नाही.मला व्यनी आणी खरडी येत आहेत.(अर्थात गंभीर नाही).
तुम्ही टक्याला खव करु शकता.
एसमाळी हा आयडी मी काढलेला नाही.संतोष माळी वेगळे आहेत.
त्यांनी मिपा सोडताना मला तो आयडी मिळाला.

बाळ सप्रे's picture

11 May 2016 - 6:07 pm | बाळ सप्रे

एसमाळी हा आयडी मी काढलेला नाही.संतोष माळी वेगळे आहेत.
त्यांनी मिपा सोडताना मला तो आयडी मिळाला.

नामांतर, डुआयडी, जुनेनवे आयडी.. यासारख आता आयडी हस्तांतरण.. नवीन सिनारीओ समजला :-)

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 7:26 pm | सतिश गावडे

=))

त्यांनी मिपा सोडताना मला तो आयडी मिळाला.

म्हणजे समुद्रात माझ्या हातातनं निसटून पडलेली पाचूची अंगठी एखाद्या मित्राला वाळूत मिळावी तसा?

जेपी's picture

11 May 2016 - 6:12 pm | जेपी

छान..
आता बसा कुंथत ..हुंब्ब ..हुंब्ब..हुंब्ब =))

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 7:28 pm | सतिश गावडे

आता बसा कुंथत ..हुंब्ब ..हुंब्ब.. =))

अता
आणि शेवटी "हुंब्बक्क" शब्द राहीला.

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 7:28 pm | सतिश गावडे

आता बसा कुंथत ..हुंब्ब ..हुंब्ब.. =))

अता
आणि शेवटी "हुंब्बक्क" शब्द राहीला.

विदर्भात कुंथताना शेवटचा क्क वापरत नसतील =))

गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी घात झाला एसमाळींचा =))

पिलीयन रायडर's picture

11 May 2016 - 3:25 pm | पिलीयन रायडर

=))

mugdhagode's picture

11 May 2016 - 3:26 pm | mugdhagode

छान

नामांतर/डुआइडी / स्टेपनी आइडी शोध नक्की काय चाललंय?

शाम भागवत's picture

11 May 2016 - 5:02 pm | शाम भागवत

:-))

धनंजय माने's picture

11 May 2016 - 5:02 pm | धनंजय माने

हे असले प्रकार आम्ही फार पूर्वीपासून यशस्वीरीत्या अंमलात आणले आहेत.

या सरपोतदारांचं त्या सरपोतदारांना किंवा मावशींनाही कळलं नाही. बनवाबनवी. तेव्हा थोडी तंगी होती म्हणून हो!

माने हा शुद्ध हलकट पणा आहे..
आधी माझे सत्तर रुपय द्या पाहु..
व्याज नंतर पाहु..

इरसाल's picture

11 May 2016 - 5:14 pm | इरसाल

माझे काही (आकडा निश्चित आठवत्/सांगु शकत नाही) आयडी अन्सब्स्क्राईप करायचे होते, जिथे पासवर्ड आणी आयडी लिहीले होते तो कागद हरवला आहे, भेंडी काय करावं समजत नाहीये.

तिमा's picture

11 May 2016 - 5:17 pm | तिमा

सामान्यज्ञानात बरीच भर पडली. तशीच आणखी एक पण करा.
डोक्यावर पडलेला = म्हणजे काय? सर्वसाधारणपणे सर्व डोक्याकडूनच जन्माला येतात. बरं, ते निसटून खाली डोक्यावर पडतील, ही शक्यता फारच कमी असते. तर अशा, अ‍ॅक्सिडेंटल बाळांबद्दल आहे का हा वाकप्रचार ?

बाळ सप्रे's picture

11 May 2016 - 5:52 pm | बाळ सप्रे

डोक्यावर पडणे म्हणजे

पडल्यावर ज्याभागाला जमिनीचा स्पर्श/आघात होतो तिथे दुखापत होते, त्यानुसार डोक्यावर पडल्यास डोक्याला (परीणामी मेंदूला) मार लागून माणसाची वर्तणूक विचित्र होणे

म्हणजे पाळण्यातून डोक्यावर पडलेला.

श्रीगुरुजी's picture

11 May 2016 - 8:04 pm | श्रीगुरुजी

माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!!

ग्रेटथिन्कर, ग्रेटथिंकर, नानासाहेब नेफळे, टॉपगिअर्ड फिलोसोफर, सचीन, माईसाहेब कुलसुंदीकर, काकासाहेब केंजळे इ. वेगवेगळे अवतार धारण केलेल्या सदस्याचा नवीन आयडी 'पिंपळगावचा पिराजी' असा आहे.

जेपी's picture

11 May 2016 - 8:57 pm | जेपी

काही हं श्री..
प्रत्येक आयडी वेगळा आणी युनीक आहे .हवतर समस्त कुरसुंदी गावाची साक्ष काढ..
-माई मोड ऑफ..

mugdhagode's picture

12 May 2016 - 7:52 am | mugdhagode

मिपाचे गुर्जी = माबोचे मास्तुरे ? ?

रमेश भिडे's picture

12 May 2016 - 1:17 am | रमेश भिडे

मी सुद्धा एक ड्यूआयडी आहे असं मानू शकता. कारण मी जो खरा आहे तो मी इथे असत नाही.

बाकी इथली चहाच्या कपातली भांडणं वाचून मौज वाटली.

शतक पूर्ती च्या शुभेच्छा.

मी-सौरभ's picture

12 May 2016 - 9:18 pm | मी-सौरभ

नविन काहीतरी सांगा

नाखु's picture

12 May 2016 - 9:01 am | नाखु

धागा शतक पुर्ती निमीत्त टक्या लिखीत जे पी संपादीत "मिपा डुआयडी एक आडवा आढावा आणि अडवा बढाया" या आगामी ग्रंथाच्या सवलतीचे कुपन आणि १ किलो भुईमुगाच्या शेंगा १० उसाची कांडके देऊन करण्यात येईल.
(वेळ व ठिकाण यासाठी जेपी भाऊम्कडे संपर्क करणे त्यांचा नंबर एस माळींकडे आहे आणि एस माळी कुठे आहे ते फक्त टक्याला माहीती आहे)

वरील ग्रंथास जेष्ठ मिपाकर धन्याशेठ गावडे आणि सार्वकालीन माई यांनी प्रस्तावना कौतुक शब्द (हळदी-कुंकवासहीत दिले आहेत याची नोंद घेणे) पहिल्या १० प्रतींवर वरील नामांकीतांची स्वाक्षरी असेल असे आम्च्या सूत्रांनी कळविले आहे.

सदस्य अखिल मिपा सत्कार समिती आणि जेपी मित्र परिवार , कुंथुनाथ अगलतगल सेवा समीती.

चित्रगुप्त's picture

12 May 2016 - 10:32 pm | चित्रगुप्त

आयडींवर धागा निघालाच आहे, तर स्त्री-आयडींच्या त्सुनामीवर आमचा खालील धागा बघा:
http://www.misalpav.com/node/24707