मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ईशावास्य उपनिषदातला शांतीमंत्र

विवेक ठाकूर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ... ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्‍यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे. वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे. _________________________________ आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , ( कारण ) ..... ( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते | ................... (तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) , केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||

वाचने 35889 वाचनखूण प्रतिक्रिया 263

प्रचेतस Sun, 04/24/2016 - 13:50
इतका तोकडा लेख तुमच्याकडून अपेक्षित नव्हता. बाकी आकाशाच्या जागी आत्मा हा शब्द हवा होता काय? तसं आकाशही बरोबरच आहे म्हणा. अब्जावधी वर्षापूर्वी फुटलेल्या कुठल्यातरी सुपरनोव्हाच्या धुळीतूनच आपण जन्मलोय म्हणा.

In reply to by प्रचेतस

विवेक ठाकूर Sun, 04/24/2016 - 13:59
त्यामुळे तेवढाच ठेवला आहे . आत्मा अॅबस्ट्रॅक्ट कत्पना वाटते . आकाश समोर आणि प्रत्यक्ष आहे . तेच देहाच्या आरपार आहे हे कळलं की झालं !

विवेक ठाकूर Sun, 04/24/2016 - 14:16
अवकाश म्हणजे स्पेस आणि आकाश म्हणजे स्काय यची तुम्हाला कल्पना आहेच. पैकी आवकाशाशी सामान्य व्यक्ती चटकन रिलेट होऊ शकत नाही पण आकाशाशी आपलं जिव्हाळ्याचं नातं आहे. शिवाय आकाश वर बघितल्यावर दिसतं हा प्रत्येकाचा अनुभव आहे . तुम्हाला ते अॅबस्ट्रॅक्ट का वाटतं ?

In reply to by विवेक ठाकूर

प्रचेतस Sun, 04/24/2016 - 14:40
आकाश आपण अनुभवतो पण ते दिसत नाही. म्हणजे त्याचे खरे स्वरुप आपणास दिसत नाही. कधी ते लख्ख निळं दिसतं तर कधी ते तांबडंलाल दिसतं तर कधी मेघांनी पांढरं कापसासारखं तर कधी काळंभोर दिसतं तस्मात् त्याचं ठराविक असं एक स्वरुप नाही म्हणूनच ते अॅबस्ट्रॅक्ट आहे.

In reply to by प्रचेतस

विवेक ठाकूर Sun, 04/24/2016 - 15:07
आकाश म्हटल्यावर सामान्य मनात अथांग निळाई उमटते असं वाटत नाही का ? अर्थात, पोस्ट जनमताचा अंदाज घेण्यासाठीच आहे. पण आकाश म्हटल्यावर उपरनिर्दिष्ट निर्देश होतो असं वाटत नाही का ?

In reply to by प्रचेतस

विवेक ठाकूर Sun, 04/24/2016 - 15:38
वास्तविकात तू म्हटल्याप्रमाणे अवकाश (स्पेस) (म्हणजे रंगहीन, निराकार, व्यापक, नि:संग आत्मस्वरुप), हा मूळ शब्द योग्य आहे पण लोकांना स्पेसशी रिलेट होता येत नाही. त्यामुळेच बुद्धाचा शून्यवाद अनाकलनीय वाटतो. तेंव्हा पोस्टमधे अवकाश असा बदल केल्यास लोक रिलेट होऊ शकतील का असा प्रश्न आहे. म्हणजे ज्यांना आध्यात्मिक आकलन आहे त्यांना तो अर्थ भावण्याची शक्यता आहे पण `आकाश' या `अथांग आणि व्यापक' असा निर्देश असलेल्या शब्दानं, लोकांना श्लोकाशी जवळीक वाटेल असं वाटतं.

In reply to by विवेक ठाकूर

प्रचेतस Sun, 04/24/2016 - 22:30
अवकाशाशी लोकांना रिलेट होता येणार नाही हे खरेच. पण मग आकाशाच्या जागी शून्य हा शब्द अधिक योग्य ठरला असता म्हणजेच काहीही नाही तरीही सर्वच काही आहे असा अर्थ सयुक्तिक झाला असता. बाकी बुद्धाच्या शून्यवादावर अवश्य लिहा.

In reply to by प्रचेतस

विवेक ठाकूर Mon, 04/25/2016 - 12:36
म्हणून तर पूर्णही संकल्पना मांडली गेली ! आता परत पूर्णाकडून शून्याकडे म्हणजे विरोधाभासी होईल.

In reply to by प्रचेतस

आनंदी गोपाळ Fri, 04/29/2016 - 23:32
लोक एकंदरितच माठ असतात व अमुक तमुकशी रिलेट होऊ शकणार नाहीत या गृहितकावर आधारीत चर्चापुच्छ वाचले. मूळ संस्कृत श्लोकाशी किती लोक रिलेट होत होते?

In reply to by विवेक ठाकूर

वैभव जाधव Sun, 04/24/2016 - 18:35
आकाशाला शब्द हा विषय आहे (शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यातला 'शब्द' हा विषय) आकाशातून शब्द इकडून तिकडे जातो. आकाश पांचभौतिक आहे आणि ते विश्वाबरोबर उत्पन्न होते आणि नाश देखील पावते. पूर्ण मद: पूर्ण मिदं मधलं 'पूर्ण' अनादि काळापासून पूर्ण च आहे, आहे आणि आहे.(काळाचं बंधन नसल्याने भूत, वर्तमान,भविष्य असा विषय नाही) तरीही आकाशाशी थोडीफार तुलना अमर्याद भासल्याने कधी कधी होते ती एक पायरी खाली उतरुन केली जाते. आपण परफेक्शनिस्ट असल्याने खाली उतरावे लागू नये म्हणून सांगितले.

In reply to by वैभव जाधव

विवेक ठाकूर Sun, 04/24/2016 - 22:21
आकाश पांचभौतिक आहे आणि ते विश्वाबरोबर उत्पन्न होते आणि नाश देखील पावते एक उदाहरण देतो ज्यावरनं उलगडा होईल. घडा, माती आणि आकाश या दोन तत्त्वांचा बनला आहे. सकृद्दर्शनी घड्याचा मृण्मयी आकार, आकाशाला धारण करुन आहे. तस्मात, घडा फुटेल तेंव्हा आकाशही संपेल अशी कल्पना आहे. हा समज, आकाशतत्त्व आकाराच्या केवळ आत आहे, या गैरसमजातून निर्माण होतो. आकाश हे मूलतत्त्व असल्यानं प्रत्येक आकार निर्मितीसाठी ते आवश्यक आहे. सूक्ष्मातल्या सूक्ष्म अणूमधे सुद्धा आकाशतत्त्व आहे कारण त्याशिवाय कोणतीही प्रक्रिया असंभव आहे. थोडक्यात, आकाशाशिवाय हालचाल असंभव आहे त्यामुळे त्याच्याशिवाय निर्मिती असंभव आहे. ईशावास्य उपनिषद लिहीणार्‍या ऋषीला, आकाशतत्व आकाराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहे या वस्तुस्थितीचा उलगडा झाला आहे. ते तत्त्व अविभाज्य असल्यानं, घडा आकाश घेरतो असा सामान्यांचा समज असला तरी, घड्याच्या आतलं आणि बाहेरचं आकाश एकच आहे हा त्या ज्ञानी पुरुषाचा अनुभव आहे. तस्मात, घडा फुटला तरी आकाशाला काहीही होत नाही. आकाशतत्त्व नामशेष होणं असंभव आहे कारण ते अनिर्मित आहे. त्याने सर्व चराचर व्यपाले आहे, ते अमर्याद आहे, ते कायम स्थिर असून सनातन आहे. तस्मात, कृष्णानं त्याला सनातन वर्तमान म्हटलंय. त्या ज्ञानीपुरुषाला, त्याच्या शरीरातलं आणि बाहेरचं आकाश एकच आहे असा साक्षात्कार झाला आहे. तस्मात, आकाशतत्त्व आणि तो स्वतः एकच झाला आहे. तो अद्वैत झाला आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू देहाला आहे, आपल्याला (म्हणजे आकाशतत्त्वाला) काहीही होत नाही अशी त्याची निश्चयात्मक चित्तदशा आहे. त्या चित्तदशेतून हा श्लोक लिहीला गेला आहे : ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

In reply to by विवेक ठाकूर

पैसा Sun, 04/24/2016 - 22:57
प्रतिसाद आवडला. पण श्लोकाचा अर्थ त्यांना लिहून देताना फक्त आकाश तत्वाऐवजी पंच तत्त्वे (महाभूते) असे लिहिलेत तर ते जास्त अचूक होईल ना?

In reply to by पैसा

वैभव जाधव Sun, 04/24/2016 - 23:06
पंच तत्त्वे नाही म्हणता येत. ती जाणिवेच्या कक्षेत असतात. पांचामध्ये सगळ्यात सूक्ष्म असं आकाश आहे पण पूर्णत्वाचा विचार त्याच्याहून अधिक सूक्ष्म आणि बरोबरीने व्यापक आहे. आहे पणाने असणं एवढंच. काहीच नाही म्हणताना त्या नाहीपणा मध्ये सुद्धा काहीतरी असतं. ते कुठून आलं? त्या आहे पणाचा, अस्ति चा विचार या श्लोकामध्ये केला आहे.

In reply to by वैभव जाधव

विवेक ठाकूर Sun, 04/24/2016 - 23:17
बुद्ध त्याला शून्य म्हणतो, कृष्ण साक्षी म्हणतो, ज्ञानी सत्य म्हणतात, झेनप्रणाली एंप्टीनेस म्हणते, इंग्रजीत अब्सोल्यूट असा शब्द आहे, ईशावास्यात त्याला पूर्ण म्हटलंय..... आकाश हा त्यातल्या त्यात, त्या सार्वभौम उपस्थितीचं सामान्याला समजणारं, जवळात जवळचं वर्णन आहे असं मला वाटतं.

In reply to by विवेक ठाकूर

वैभव जाधव Sun, 04/24/2016 - 23:23
हम वोहीच कै रै मियाँ! आप उसे बया करने कि कोशिश कर रहे है जो अल्फाजो के परे है| उसे नीचे खिचने की तौहीन हो रही है|

In reply to by विवेक ठाकूर

वैभव जाधव Mon, 04/25/2016 - 11:48
त्यासाठी वेगळा शब्द घालण्याची गरज मुळातच नाही. त्याला आकाश नका संबोधू एवढंच म्हणणं होतं. पूर्ण आहे. आणि ते तसंच पूर्णच आहे. खतम! साधा आणि समजायला सोपा श्लोक आहे. अनुभवायला तितकाच कठीण (आयुष्य जाईल तरी समजायचा नाही)

In reply to by वैभव जाधव

विवेक ठाकूर Mon, 04/25/2016 - 12:41
समर्पक शब्द हवा आहे म्हणून तर हा लेखन प्रपंच ! पूर्ण आहे. आणि ते तसंच पूर्णच आहे. खतम ? त्या पूर्णाशी रिलेट झालो तरच श्लोकातून दिलासा मिळेल. साधा आणि समजायला सोपा श्लोक आहे ? मग करुन दाखवा की अनुवाद ! अनुभवायला तितकाच कठीण (आयुष्य जाईल तरी समजायचा नाही) हे बाकी बरोबरे.

In reply to by विटेकर

प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/28/2016 - 13:43
आकाश हा शब्द योग्य नाही !
आकाशाबाहेरी पळों जातां । पुढें आकाशचि तत्त्वतां । तैसा तया अनंता । अंतचि नाहीं ॥ ७॥ खं शब्दें आकाशब्रह्म । महदाकाश व्यापक ब्रह्म । आतां बोलिजेल सूक्ष्म ब्रह्म । सर्वब्रह्म ॥ १२॥ पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंचभूतातीत । पंकीं आकाशीं अलिप्त । असोनि जैसें ॥ २०॥ ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे । परी दृष्टांतीं साहित्य पडे । विचारितां आकाश ॥ २१॥ खंब्रह्म ऐशी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती । म्हणोन ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२॥ काळिमा नसतां पितळ । मग तें सोनेंचि केवळ । शून्यत्व नसतां निर्मळ । आकाश ब्रह्म ॥ २३॥ म्हणोन ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन । आढळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४॥ अवांतर : संक्षींना सर्वे ठरवुन टारगेट करत आहेत , ते चालु दे , मात्र हे करताना आपल्याच तत्वज्ञानाला विरोधाभास होणार नाही ना ह्याची काळजी घेणे महत्वाचे वाटेत :)

In reply to by प्रसाद गोडबोले

वैभव जाधव गुरुवार, 04/28/2016 - 13:55
आकाश हा दृष्टांत दिला आहे. एखादी गोष्ट समजवण्यासाठी उदाहरण दिलं जातं. त्या दृष्टीने आकाश हे ब्रहमाच्या जवळ जाणारं म्हणून उदाहरणार्थ आहे. ते म्हणजे ब्रह्म अथवा पूर्ण नाही. आकाश इतर ठिकाणी योग्य शब्द वाटू शकेल पण श्लोकाचा अनुवाद करताना तशी लिबर्टी घेणं योग्य नाही असं माझं मत आहे.

In reply to by शाम भागवत

विवेक ठाकूर गुरुवार, 04/28/2016 - 15:10
आकाश हा निर्देश आहे. तद्वत पूर्ण काय की ब्रह्म ,आत्मा, परमात्मा किंवा तुम्ही म्हणत असलेला सच्चिदानंद काय सर्व शब्द निरुपयोगी आहेत . तस्मात शांतता हा सर्वांना अनुभव असणारा शब्द योजून श्लोक पूर्ण केला आहे . सदर अनुवाद संबंधितांना आवडला आहे आणि काम संपन्न झाले आहे. आता या पोस्टवर चर्चेचं प्रयोजन राहिलेलं नाही .

In reply to by विवेक ठाकूर

वैभव जाधव गुरुवार, 04/28/2016 - 15:27
शांतता? चला, आत नाही किमान बाहेर तरी! असो! हा शब्द पुरेसा नाही एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो.

पैसा Sun, 04/24/2016 - 16:13
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर Sun, 04/24/2016 - 18:37
'ते' काय आहे हे समजणं एवढं सोपं असतं तर काय पाहिजे होतं अजून? आता 'ते' आणि 'हे' ह्याच्या ठिकाणी जिज्ञासू आप आपल्या बुद्धीने प्रतिमा टाकत राहिला तर अर्थापासून भटकणेच आहे. तुम्ही आकाश म्हणा, कुणी अवकाश म्हणेल, प्रकाश म्हणेल, पृथ्वी, अग्नी, जल, वायु, इलेक्ट्रॉन, समष्टी, काहीही. खरा अर्थ आहे 'ते आणि हे' हे 'काहीच नाही आणि संपूर्ण आहे'. आता जे 'काहीच नाही' आणि 'संपूर्ण आहे' त्याला एक्स्प्लेन करण्याच्या फंदात पडणे विसंगती आहे. its nothing and complete. ह्या वाक्यात its चा जो अर्थ तोच अदः आणि इदं चा अर्थ. धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Sun, 04/24/2016 - 22:40
'ते' काय आहे हे समजणं एवढं सोपं असतं तर काय पाहिजे होतं अजून? ते आणि आपण एकच आहोत. वास्तविकात, तेच आहे आणि त्यामुळे आपण तेच आहोत ! आता 'ते' आणि 'हे' ह्याच्या ठिकाणी जिज्ञासू आप आपल्या बुद्धीने प्रतिमा टाकत राहिला तर अर्थापासून भटकणेच आहे. तुम्ही आकाश म्हणा, कुणी अवकाश म्हणेल, प्रकाश म्हणेल, पृथ्वी, अग्नी, जल, वायु, इलेक्ट्रॉन, समष्टी, काहीही. शब्दच काढून टाकले तर अभिव्यक्ती असंभव होईल. कोणत्याही आध्यात्मिक वक्तव्याचं प्रकटीकरणच होणार नाही. आणि चुकीच्या शब्दयोजनेनं अर्थाचा अनर्थ होईल. तस्मात, कुठलाही शब्द कुठेही चालणार नाही. खरा अर्थ आहे 'ते आणि हे' हे 'काहीच नाही आणि संपूर्ण आहे'. आता जे 'काहीच नाही' आणि 'संपूर्ण आहे' त्याला एक्स्प्लेन करण्याच्या फंदात पडणे विसंगती आहे. ते आणि हे काहीच नाही आणि संपूर्ण आहे? ते आणि हे आहे (किमान प्रत्येकाचा तो रोजचा अनुभव आहे) आणि संपूर्णाचा प्रत्यय येत नाही म्हणून तर उपनिषद लिहीलं गेलंय. संपूर्णाची व्याख्या करण्याचं दु:साहस म्हणजेच तर आध्यात्म ! its nothing and complete. ह्या वाक्यात its चा जो अर्थ तोच अदः आणि इदं चा अर्थ. त्या `इट' चा अर्थ काढण्याचा प्रयत्न नाही चाललेला. ते आणि आपण एकच आहोत ही अनुभूती लोकांप्रती पोहोचवण्याचा प्रयास आहे.

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर Sun, 04/24/2016 - 22:48
ते आणि आपण एकच आहोत ही अनुभूती लोकांप्रती पोहोचवण्याचा प्रयास आहे.
आपण किती हुशार आहोत हे एवढं पोचवन्याचा प्रयास दिसत आहे. बाकी काही नाही. शुभेच्छा!

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर Sun, 04/24/2016 - 23:20
व्यक्तिगत?????? आय एम नॉट. लेट मी एक्स्प्लेन. पण तुमची इतरांसोबत चालू असलेली चर्चा पूर्ण होऊ देत. आय विल बी बॅक.

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर Sun, 04/24/2016 - 23:37
व्यक्तिगत नाही. चर्चेवरुन स्पष्ट दिसत आहे ते बोलत आहे. मला जे म्हणायचं आहे तेवढं टाईप करायला आत्ता इमिजिएट वेळ नाही. होप तुम्ही वाट पाहू शकाल. ....तुर्तास. १. पाणी: बर्फ, वाफ, द्रव्य अजुनही चौथी स्थिती बहुतेक प्लाझ्मा. चारही स्थितीत पाणी पाणीच असतं. एचटुओ. २. एनर्जी कॅन नॉट बी क्रीएटेड कॅन नॉट बी डीस्ट्रायड. ओन्ली कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड. बाकी बादमें.

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकूर Mon, 04/25/2016 - 00:43
इथे कुणी एकानं तरी श्लोकाचा अनुवाद दिला आणि मी तो योग्य असूनही नाकारलाय का ? शिवाय खाली प्रतिसादात तुम्ही म्हटलंय : तत्वज्ञान पोटभरल्या लोकांच्या चर्चेचा विषय आहे अर्थात! प्रापंचिक चिंता असलेल्या लोकांच्या जीवनात आध्यात्माला वेळ कुठून येणार ? ते फुरसतीचं आणि संपन्नतेचं लक्षण आहे. तस्मात, आता या धाग्यावर तुमच्याशी चर्चेत रस नाही.

In reply to by विवेक ठाकूर

तर्राट जोकर Mon, 04/25/2016 - 04:07
देअर यु आर. अध्यात्माच्या बाबतीत तुमच्या संकल्पना घट्ट आणि ठोस आहेत ज्या बदलायची तुमची मानसिकता दिसत नाही. त्या तुम्ही बदलाव्याच अशी माझीही काही जबरदस्ती नाही. वैभव आणि प्रचेतस यांच्याशी चर्चेतून तेच दिसलं. माझ्या प्रतिसादांमधे मीही काहीतरी बोललोय. पण इतरांना समजून घेणे सोडून त्यांना तुम्हाला जे पटते ते समजावून सांगण्याचाच प्रयत्न दिसतो. कदाचित ह्याचमुळे इतर सदस्य कोणी प्रतिसाद देत नसावेत ह्या धाग्यावर. ह्याच प्रतिसादात तुम्ही म्हणताय की कुणी योग्य अर्थ दिलेला नाही. कोण काय म्हणतंय ते योग्य वा अयोग्य अर्थ ठरवणारे तुम्ही-आम्ही कोण? हा श्लोक एक अत्युच्च पातळीवर पोचल्यावर येणारा अनुभव आहे. अध्यात्मात माणसे जेव्हा सर्वोच्च पातळीवर जातात तेव्हा शब्द न्यून आणि अर्थ गंभीर होत जातात. त्या शब्दांचा अर्थ योग्य त्यालाच कळतो. अध्यात्म हे शब्दांत पकडता येत नाही. असे श्लोक स्मशानात लिहून दैवी वातावरण निर्मितीचा अनुभव मिळेल. पण अर्थ पोचत नसतो, नाहीच. असे अनेक श्लोक आजकाल मालिकांच्या बॅकग्राउंडस्कोरला धीरगंभीर घाबरवणार्‍या आवाजात सुरु असतात. अर्थ कोणाला कळतो? त्यांचे कार्य फक्त वातावरण निर्मिती. अर्थ उलगडून सांगून अनुभूती येत नसते हे तर मान्य करायला हरकत नसावी. 'सत्यमेव जयते' हे त्याचे ढळढळीत उदाहरण. ज्यांनी हा श्लोक रचलाय त्यांचे ज्ञान व अनुभव उच्च पातळीचे आहेत हे आपण मान्य करतो. मग हा विचार का येत नाही की त्यांनी अदं आणि इदं च्या ठिकाणी थेट काय आहे तेच नसते का लिहिले? त्यांनी तसे लिहिलेले नाही ह्यातच त्या श्लोकाचा अर्थ स्पष्ट होत आहे. तुम्ही लिहिले आहे:
वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे.
आता मी म्हणतो की हा जो साधा अर्थ तुम्ही म्हणताय तो सपशेल चुकलेला आहे. जन्म आणि मृत्यू देहाला आहे असे तर त्या श्लोकात कुठेच नाही. मुळात तो श्लोक जन्ममृत्यूबद्दल नाहीच. किंवा तुम्ही म्हणताय त्या आकाशाबद्दलही नाही. तो श्लोक आहे सृष्टीबद्दल, ब्रह्मांडाबद्दल, अनुरेणुच्या शेवटच्या कणापासून ते अतिविशाल मोजता न येणार्‍या ब्रह्मांडाच्या पसार्‍याबद्दल. वैभव यांनी म्हटल्याप्रमाणे 'अल्फाजो के परे'. मानवाच्या क्षुद्र आयुष्याचा, त्याच्या रोजच्या कटकटीचा, जगण्यामरण्यासारख्या फालतू गोष्टींचा ह्या महान श्लोकाशी संबंध लावणे हेच मुळातून चुकल्याचे लक्षण आहे. मी तुमच्या ठिकाणी असतो तर हा श्लोक इथे लिहूच नये असे विचारणार्‍याला सांगितले असते. स्मशानासारख्या टेन्स प्रसंगी तर इतका खोल अर्थ कुणी समजून घेणे शक्य वाटत नाही. हा श्लोक अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करणार्‍यांसाठी आहे. जे लोक 'सुख दुखे समे कृत्वा' च्या लेवलला पोचलेत तिथून पुढे ह्या श्लोकाचा अर्थ समजणे सुरु होते. त्यापेक्षा साधं सोपं गीतासार छान असतं, सामान्यजनांना पटकन कळतं आणि अनूभूतीही येते. दुसरे असे की श्लोकाचा अर्थ. ह्या ब्रह्मांडात जे काही घडतंय ती एक प्रक्रिया आहे अविरत. ज्यात जे घडतं ते उपलब्ध असलेल्यातून घडतं, नष्ट होतं ते उपलब्ध असलेलं नष्ट होतं, नष्ट होऊन ते परत ब्रह्मांडात दुसरं काहीतरी बनण्यासाठी उपलब्ध होतं. थोडक्यात जे काही चाललंय ते फक्त चालू प्रक्रिया आहे. काही नष्ट होत नाही काही निर्माण होत नाही. ह्यात 'ते' आणि 'हे' जे म्हटलंय ते ब्रह्मांड, अनुरेणू हेच आहे असे दिसते. तो म्हणतो हेही पुर्ण आहे तेही पुर्ण आहे, पुर्णातून पुर्ण जन्म घेतं, पुर्णातून पुर्ण घेऊन ही पुर्ण शेष राहतं. आता 'हे' आणि 'ते' ह्याचा अर्थ अनूभूतीशिवाय समजत नाही. ज्याला अनूभुती नाही तो ह्याचा अर्थ कितीही समजून घेण्याचा प्रयत्न करुदेत्, उपयोग नाही.
शब्दच काढून टाकले तर अभिव्यक्ती असंभव होईल. कोणत्याही आध्यात्मिक वक्तव्याचं प्रकटीकरणच होणार नाही. आणि चुकीच्या शब्दयोजनेनं अर्थाचा अनर्थ होईल. तस्मात, कुठलाही शब्द कुठेही चालणार नाही.
शब्दांचे अचूक अर्थ लावायची भारीच जबाबदारी घेतली आहे ठाकूरसाहेब तुम्ही अंगावर. गरज नाही हो. बुद्धापासून ओशोपर्यंत अनेक लोक होऊन गेलेत साध्यासोप्या शब्दात आध्यात्मिक वक्तव्याचं प्रकटीकरण करणारे. तुम्ही त्यांच्या पातळीवर स्वतःला समजत असाल तर गोष्ट वेगळी. अध्यात्म अनुभवावर टिकुन आहे. शब्दांवर, चर्चेवर नाही. अनुभव सर्वोच्च आहे, सर्वोत्तम आहे, अ‍ॅब्सोलुट आहे. त्याला शब्दांच्या कुबड्यांची गरज नाही. उदा. पुन्हा सत्यमेव जयते. ह्याच्याइतकं खोटं वाक्य जगात नसेल. ह्याचा अर्थ मी "सत्य नेहमी जळते" असा सांगितला तर लोक जास्त विश्वास ठेवतील. शेवटी अनुभव प्रमाण. :-) 'शब्दांनी अनुभव शेअर केला जातो' हे एक. शब्दांनी अनुभव व्यक्त केला जातो, शेअर करणे अशक्य गोष्ट आहे. व्यक्त झालेला अनुभव ऐकणार्‍याला समजेल, अनुभूत होईलच असे नसते. आधीच माहित असलेली, जाणवलेली, स्मृतीत असलेली, अनुभव घेतलेली गोष्ट शब्दांनी लक्षात येईल. अगदी कधीच माहित नसलेली गोष्ट कशी शेअर केल्या जाईल? एक डॉक्टर दुसर्‍या डॉक्टरला मेडिसीनमधली एखादी किचकट व्याख्या सांगत असेल त्याचा अर्थ एखाद्या सीएला कसा कळेल किंवा वाइअसवर्सा? पुढे तुम्ही म्हटलंयः
आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , ( कारण )( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते | (तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही), केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||
आकाश पुर्ण कसे? आकाश म्हणजे काय तर अथांग निळाई असे तुम्हाला अपेक्षित आहे असे दिसते. मग पृथ्वीही अथांग आहेच. जिथे मी उभा राहतो तिथे माझ्या खाली पृथ्वी आणि वर आकाश अथांगच आहे. आकाश पृथ्वीला टेकलं की संपतं. (सामान्य जनकल्पना). 'सार्वभौम' ह्य शब्दाचा अर्थ भूमीशी संबंधित आहे. तुम्हाला 'सर्वव्यापक' म्हणायचा असेल तर 'सर्वव्यापक' म्हणा सरळ. पण तेही खरे नाही. घड्यात पाणी भरले तर आकाश कुठे जाते? पाण्याचा अणुरेणुंच्या मधल्या पोकळीत आकाश आहे का? मग अणुरेणुंमधे काय आहे? पाणी? म्हणजे पाणी आणि आकाश असे दोन तत्त्व वेगळी झाली. देह हा काही रिकामा घडा नाही. देह हाच पुर्ण आहे तो पुर्णातच आहे, तो निर्माण झाला, विलिन झाला असे समजणे भ्रम आहे. देह आणि आकाश एकमेकांतच आहेत. हे ही पुर्ण तेही पुर्ण कारण ते सर्व पुर्णचे घटक आहेत. पुर्णपासून तयार झालेले, पुर्णपासून वेगळे नसलेले. अहं ब्रह्मास्मी व तत्त्वमसि ह्या दोन संकल्पना अनुभवल्याशिवाय ह्या श्लोकाचा अर्थ कसा कळणार?
ते आणि हे आहे (किमान प्रत्येकाचा तो रोजचा अनुभव आहे) आणि संपूर्णाचा प्रत्यय येत नाही म्हणून तर उपनिषद लिहीलं गेलंय. संपूर्णाची व्याख्या करण्याचं दु:साहस म्हणजेच तर आध्यात्म !
संपुर्णाचा प्रत्यय येत नाही म्हणून उपनिषद लिहलंय? ऐकावे ते नवलच! अहो प्रत्यय आल्याशिवाय का लिहिता येतं? उपनिषद हे शिष्यांचे गुरुंशी झालेले वार्तालाप आहेत ना? की गुरुंनी शिष्यांशी डिस्कस करुन ठरवले की असे असे लिहिले की प्रत्यय येतो ब्वॉ? संपूर्णाची व्याख्या का करावी? तो अनुभूतीचा विषय आहे, व्याख्येचा नाही. साखरेच्या गोडीची कितीही व्याख्या केली तरी खाल्ल्याशिवाय समजत नाही. खाल्ल्यावर काय फील झालं ते लिहू शकता म्हणजे पुढची साखर खाणार्‍याला आपण खाल्ली ती साखरच आहे हे कळतं. पण तुम्ही लिहून ठेवलंय म्हणून त्याला ते फीलींग्स आले असे मानणे म्हणजे अजबच.
प्रापंचिक चिंता असलेल्या लोकांच्या जीवनात आध्यात्माला वेळ कुठून येणार ? ते फुरसतीचं आणि संपन्नतेचं लक्षण आहे.
अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या फुसक्या गप्पा ह्यात आपली सॉल्लीड गडबड झालेली दिसतेय. श्रीमंतांनी वेळ घालवण्याचं साधन म्हणुन अध्यात्म बघत असाल तर आपण आध्यात्माच्या प्लेगृपमधेही प्रवेश घेतला नाही असे दिसते. आता मी इथे भारतातल्या संतांची यादी देत बसलो तर आल्रेडी लांबलेला प्रतिसाद अधिकच लांबेल. तुम्हीच जालावर सर्चून घ्या आणि संतांमधे संपन्न असलेल्यांची टक्केवारी काढून बघा. सोबत फकिरांचीही आठवण ठेवा. माझी भूमिका: तत्त्वज्ञान हा पोटभरल्या लोकांच्या चर्चेचा विषय आहे. अध्यात्म हा चर्चेचा नाही तर अनुभूतीचा विषय आहे. तर अध्यात्माचा उपाशी वा भरल्या पोटाशी संबंध नसतो. अध्यात्म कुणाला समजवयाला जाणे पोरकटपणा आहे. त्यामुळे एखाद्याला अध्यात्मातले कळले ते इथे इतरांना 'पटवत' बसणे व इतरांचे विचार मान्य न करणे हा आपणच कसे हुशार आहोत ह्याचा ढिंडोरा पिटण्याचा उद्योग आहे असे माझे मत आहे. Ship of Theseus वर चर्चा करत बसण्यापेक्षा थेट साधना करत आध्यात्मिक प्रगती करणे श्रेष्ठ. कारण आध्यात्मिक प्रगती झाली की चर्चेतून उत्तरं शोधण्याची गरज पडत नाही. उत्तरं समोर हजर असतात आणि कुणाला काही समजवत बसण्याची उर्मी संपलेली असते. उरतं ते फक्त मार्गदर्शन. तेही आपल्याला शोधत आलेल्या शिष्याला. रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍याला पकडून 'घे दिक्षा' असे गळेपडूपणा करणे इज नॉट अध्यात्म अ‍ॅट ऑल. कुणीतरी मिपावरच सांगितलेलं आठवतंय. 'संत म्हणजे कठिण गोष्ट सोपी करुन सांगनारे, पंत म्हणजे सोपी गोष्ट कठिण करुन सांगणारे.' तिसरी कॅटेगिरीही आहे. कठिण गोष्ट आणखी कठिण करुन सांगणारे. काय म्हणावे बरे त्यांना? धन्यवाद! "असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।"

In reply to by तर्राट जोकर

वैभव जाधव Mon, 04/25/2016 - 11:24
जोकर, प्रतिसाद आवडला. बाण मारुन नंतर वर्तुळ काढलेल्या लोकांना आम्ही नेहमीच 'बुल्स आय' साध्य केला आहे असं वाटत असतं. १००/१०० द्यायचे आणि सोडून द्यायचं. कधी कधी नवीन ग्रहण (वाचन,श्रवण, दृश्य टिपणं) आणि चिंतन विसरून जाणं इष्ट असतं. अनलर्निंग करना आवश्यक होता है!

In reply to by तर्राट जोकर

वैभव जाधव Mon, 04/25/2016 - 11:24
जोकर, प्रतिसाद आवडला. बाण मारुन नंतर वर्तुळ काढलेल्या लोकांना आम्ही नेहमीच 'बुल्स आय' साध्य केला आहे असं वाटत असतं. १००/१०० द्यायचे आणि सोडून द्यायचं. कधी कधी नवीन ग्रहण (वाचन,श्रवण, दृश्य टिपणं) आणि चिंतन विसरून जाणं इष्ट असतं. अनलर्निंग करना आवश्यक होता है!

In reply to by तर्राट जोकर

पिलीयन रायडर Mon, 04/25/2016 - 11:41
तजो तुमचा सगळाच प्रतिसाद करेक्ट आहे! (बघा मी इंग्लिश शब्द वापरलाय..!! म्हणजे माझा उजेड पाडण्याचा प्रयत्न समजुन घ्या!) पण आता ह्या पॅराने सुरवात केल्या नंतर बाकीच्या प्रतिसादाचे प्रयोजन काय?! कोणत्याही धाग्यात हा प्रतिसाद परिच्छेद वापरता येईल. त्यांना चर्चा करायचीच नसते. तुम्ही असं म्हणा की काय लिहीलय! हाच सगळ्यात बरोब्बर अर्थ!! ते लगेच म्हणतील "तजो.. आता तुला खरी मेख कळली. तू असे रंग भरलेस धाग्यात की क्या बात है! आता ही चर्चा भन्नाट होणार!!" पण तुम्ही जर्राशी सुद्धा असहमती दाखवली की चर्चा तिथेच संपते. आजतागायत संक्षींनी दुसरी बाजु / दुसरा विचार मान्य केल्याचे मी तरी पाहिले नाही. तर सांगायचा मुद्दा हा की ह्यापेक्षा तुम्ही तुमची लेखमाला का नाही पुर्ण करत?
अध्यात्माच्या बाबतीत तुमच्या संकल्पना घट्ट आणि ठोस आहेत ज्या बदलायची तुमची मानसिकता दिसत नाही. त्या तुम्ही बदलाव्याच अशी माझीही काही जबरदस्ती नाही. वैभव आणि प्रचेतस यांच्याशी चर्चेतून तेच दिसलं. माझ्या प्रतिसादांमधे मीही काहीतरी बोललोय. पण इतरांना समजून घेणे सोडून त्यांना तुम्हाला जे पटते ते समजावून सांगण्याचाच प्रयत्न दिसतो. कदाचित ह्याचमुळे इतर सदस्य कोणी प्रतिसाद देत नसावेत ह्या धाग्यावर. ह्याच प्रतिसादात तुम्ही म्हणताय की कुणी योग्य अर्थ दिलेला नाही. कोण काय म्हणतंय ते योग्य वा अयोग्य अर्थ ठरवणारे तुम्ही-आम्ही कोण?

In reply to by पिलीयन रायडर

तर्राट जोकर Mon, 04/25/2016 - 11:48
:-) हा मेगाबायटी लिहितांना लेखमालेचाच विचार होता पिरातै, की फुकट वेळ जातोय त्यापेक्षा इतक्या वेळात दोन भाग लिहून होतील. पण कधी कधी काही गोष्टी आवश्यक होऊन जातात. मलाही खुमखुमी येते हो, मग मिटवायला लागतेच. =)) स्वॉरी, हमरा चुक्याच. ह्या धाग्यावर मी आधीच कोणताही प्रतिसाद देणे योग्य नव्हते. बात निकलती है तो बहुते दूर तक जातीच. ;)

In reply to by तर्राट जोकर

शलभ Mon, 04/25/2016 - 13:54
छान प्रतिसाद. विठांना आधीच समजलेलं की असा प्रतिसाद येणार ज्याला उत्तर नसेल. म्हणून अगोदरच चर्चेत रस नाही बोलून माघार. ;)

सतिश गावडे Sun, 04/24/2016 - 23:03
तत्वज्ञान ही कल्पनेची भरारी आहे. कुणाला तरी काहीतरी स्फुरतं. ते लिहीलं जातं, इतरांना ऐकवलं जातं, त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होतो, काहींना ते भावतं, काही दुर्लक्ष करतात. जीवन, विश्व गुढ आहे. आपल्या हाती फक्त त्याचे अर्थ लावणे आहे.

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा गुरुवार, 04/28/2016 - 14:33
माझी खरड उचलून इथे चिटकवली आहे त्या आयडीने...त्या आयडीचा आणि माझा काही संबंध नाहीये

mugdhagode Mon, 04/25/2016 - 08:34
सर्व धागे वादासठी उत्पन होतात .. वादातच्वाधतात व त्यात्च नष्ट होतात. वादातुन वाद काधला तर वादच उरतो. यात काय वाद ? .... वादमुनींचे वादवास्यौपनिषद

स्पा Mon, 04/25/2016 - 08:50
आपला देह ही विश्वाची रेप्लिका आहे, असे म्हणतात u can say a miniature. विश्वाला जाणणे सामान्य माणसाला कठीण आहे, पण तो स्वतःला ध्यानाने observe करु शकतो

In reply to by स्पा

सतिश गावडे Mon, 04/25/2016 - 08:54
आपला देह ही विश्वाची रेप्लिका आहे, असे म्हणतात
असं कोणं म्हणतं? जे असे म्हणतात ते तसंच आहे हे कशावरुन?

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे Mon, 04/25/2016 - 09:49
अनुभवाचं कसं आहे, एकदा एखादी गोष्ट मनावर बिंबवली की ती गोष्ट मन सत्य म्हणून स्विकारतं. मुळात सश्रद्ध माणसाचे मन अशा अधिभौतिक अनुभवांच्या बाबतीत सकारात्मक असते. त्यात ती गोष्ट एखाद्या "अधिकारी" व्यक्तीने (authoritative figure) मांडली असल्यास मन त्या गोष्टीचा सहजरीत्या स्विकार करते. आणि तसेच "अनुभव" त्या व्यक्तीलाही येऊ लागतात. याचं अगदी नेहमीचं उदाहरण म्हणजे "मंदिरात गेलं की प्रसन्न वाटतं". लहानपणापासून हेच मनावर बिंबवलं गेलं असल्याने सश्रद्ध माणसाला मंदिरात गेले की असा "अनुभव" येतोच. मलाही येत असे. पुढे निरिश्वरवादी झाल्यानंतर माझ्या मनाचं हे कंडीशनिंग पुसलं गेल्याने मला हल्ली असे अनुभव मुळीच येत नाहीत. उलट त्या मंदिरातील अस्वच्छता (असेल तर) प्रकर्षाने जाणवते. भारतीय अध्यात्म ज्याला "अनुभव" म्हणतं त्याचा मेंदूविज्ञानाच्या दृष्टीकोनातून म्हणावा तितका अभ्यास झालेला नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की बेंगळुरूमधील National Institute of Mental Health and Neurosciences मध्ये योग, ध्यानधारणा आणि समाधी अवस्था यावर संशोधन चालू आहे.

In reply to by स्पा

सतिश गावडे Mon, 04/25/2016 - 10:24
तुमचा याबाबतचा काय अनुभव गावडे साहेब
मला हल्ली अनुभव येत नाहीत. :)
पुस्तके तुम्ही बरीच वाचता हे आम्हास समजलेले आहे :)
तुम्हाला योग्य तेच समजलं आहे. मात्र मी पुस्तक वाचून थांबत नाही. त्यावर चिंतनही करतो. :)

In reply to by सतिश गावडे

पिलीयन रायडर Mon, 04/25/2016 - 09:56
प्रतिसाद आवडला. पटला.. मलाही कधीच मंदिरात जाऊन शांत किंवा प्रसन्न वाटलं नाही. तुम्ही म्हणता तशी अस्वच्छता आणि इतरच गोष्टी जास्त जाणवतात. एकंदरित आपली मत जी आपण "अनुभवातुन" आली आहेत असं म्हणतो, तो अनुभवच मुळात अ‍ॅबसोल्युट असेलच असं नाही. ते मनाचं कंडिशनिंग असु शकतं.

पिलीयन रायडर Mon, 04/25/2016 - 09:44
सोप्पा श्लोक आहे त्याला उगाच गुढ.. गहन आणि इतकं क्लिष्ट का करायचं? मी अजिबात आध्यात्मिक व्यक्ति नाही. हे जे काही प्रश्न तुम्हा लोकांना पडतात आणि इथे त्यावर टेराबायटी चर्चा होतात, त्यात मला काडीचाही रस नाही. अर्धं निम्म तर मला कळतच नाही. साधारणतः जगात असेच लोक जास्त आहेत. आणि मुळ श्लोक त्यांनाही उमजेल असा आहे. जे आहे ते त्याच्या जागी पर्फेक्ट आहे. कमी नाही की जास्त नाही. कितीही स्थित्यंतर होत राहिली तरी हे सगळं पर्फेक्टच असणारे. कमी नाही की जास्त नाही. हा मला लागलेला अर्थ. आता तुम्हाला आकाश आणि आपण देह नसुन काहीतरी वेगळेच आहोत (म्हणजे मी वायला.. माझा देह वायला..) इ थिअरी बद्दल ममत्व आहे. म्हणुन तुम्हाला ह्या श्लोकात आकाश आणि जन्म-मृत्यु इ. दिसलं. पण तो काही सगळ्यांनाच पटेल असा अर्थ नाही. तस्मात..
वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे.
असं "तुम्हाला" वाटतंय. तुमचा लेख वाचुन माझा असा समज झालाय की एक मंत्र - अर्थासहित स्मशानात लिहीला जावा अशी कल्पना आहे. आणि आपण तिथे नक्की काय अर्थ लिहीला जावा ह्यावर चर्चा करत आहोत. तो अर्थ सांगण्याची जवाबदारी तुम्हाला दिली आहे का? दिली असल्यास प्लिझ.. कळकळीने एक सांगते.. उगाच काहीतरी अवघड अर्थ सांगु नकात.. आधीच स्मशानात लोकांची मनस्थिती ठिक नसते. तिथे थोडक्यात लोकांचे दु:ख कमी होईल / दु:खाला सामोरे जाण्याची ताकद मिळेल असे काहीतरी लिहीणे अपेक्षित आहे. आयुष्याचे तत्वज्ञान-००१ चा पाठ द्यायचा नाहीये. खरं तर ह्यासाठी मुळात हा श्लोक बरोबर आहे का असा मला प्रश्न पडलाय. मला स्वतःला अशा प्रसंगी "नैनं छिंदन्ति... " सारख्या आशयाचा श्लोक जास्त समर्पक वाटला असता. एकंदरीत माणसाच देहच फक्त संपलाय, आत्मा अमर आहे हा संदेश दु:खात असलेल्याला जास्त आधार देईल असे माझे मत. बाकी मलाही वैभव ह्यांचे मत पटते. तुम्हाला तुमच्या पर्सनल चिंतनासाठी अर्थ लावायचाच असेल तर "आकाश" शब्द चुकच आहे. तुम्ही जे घटाचे उदा दिले आहे त्यातही तुम्हाला "अवकाश"च म्हणायचे आहे. निळाईवाले आकाश नाही. आणि जनसामान्यांना तुम्ही ह्या भानगडीत ओढुच नकात. त्यातही वैकुंठ मध्ये गेलेल्यांना तर नकोच नको.. पुन्हा एकदा प्लिझ..

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर Mon, 04/25/2016 - 11:14
मी अजिबात आध्यात्मिक व्यक्ति नाही. हे जे काही प्रश्न तुम्हा लोकांना पडतात आणि इथे त्यावर टेराबायटी चर्चा होतात, त्यात मला काडीचाही रस नाही. अर्धं निम्म तर मला कळतच नाही. मग पुढचं कशाला लिहीलंय ? साधारणतः जगात असेच लोक जास्त आहेत. आणि मुळ श्लोक त्यांनाही उमजेल असा आहे. जे आहे ते त्याच्या जागी पर्फेक्ट आहे. कमी नाही की जास्त नाही. कितीही स्थित्यंतर होत राहिली तरी हे सगळं पर्फेक्टच असणारे. कमी नाही की जास्त नाही. हा मला लागलेला अर्थ. `ते' काय आहे याचा शोध म्हणजे आध्यात्म आहे. ते पूर्ण आहे असं श्लोकातच म्हटलंय. तस्मात, तुम्ही `पर्फेक्ट' असा इंग्रजी शब्द लिहून काही नवा प्रकाश पाडलाय असा गैरसमज असेल तर तो काढून टाका. आता तुम्हाला आकाश आणि आपण देह नसुन काहीतरी वेगळेच आहोत (म्हणजे मी वायला.. माझा देह वायला..) इ थिअरी बद्दल ममत्व आहे. म्हणुन तुम्हाला ह्या श्लोकात आकाश आणि जन्म-मृत्यु इ. दिसलं. पण तो काही सगळ्यांनाच पटेल असा अर्थ नाही. मला काय म्हणायचंय हे न कळल्यानं तुम्ही स्वतःचाच गैरसमज उधृत केला आहे. वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. असं "तुम्हाला" वाटतंय. मला ते `वाटत' नाही, तो समस्त ज्ञानीजनांचा `अनुभव' आहे. तुमचा लेख वाचुन माझा असा समज झालाय की एक मंत्र - अर्थासहित स्मशानात लिहीला जावा अशी कल्पना आहे. आणि आपण तिथे नक्की काय अर्थ लिहीला जावा ह्यावर चर्चा करत आहोत. तो अर्थ सांगण्याची जवाबदारी तुम्हाला दिली आहे का?...वगैरे म्हणजे तुम्ही लेखसुद्धा नीट वाचलेला नाही ! मला स्वतःला अशा प्रसंगी "नैनं छिंदन्ति... " सारख्या आशयाचा श्लोक जास्त समर्पक वाटला असता. एकंदरीत माणसाच देहच फक्त संपलाय, आत्मा अमर आहे हा संदेश दु:खात असलेल्याला जास्त आधार देईल असे माझे मत. नैनं च्छिंदंती शस्त्राणीपेक्षा हा शांतीमंत्र कमालीचा परिणाम साधतो. पण एकतर तुम्हाला आध्यात्मात `काडीचा रस नाही' असं तुम्ही म्हटलंय आणि जे काम करायचंच नाही त्याबद्दल निरर्थक अशी सविस्तर लांबण लावलीये. बाकी मलाही वैभव ह्यांचे मत पटते. तुम्हाला तुमच्या पर्सनल चिंतनासाठी अर्थ लावायचाच असेल तर "आकाश" शब्द चुकच आहे. तुम्ही जे घटाचे उदा दिले आहे त्यातही तुम्हाला "अवकाश"च म्हणायचे आहे. निळाईवाले आकाश नाही. आणि जनसामान्यांना तुम्ही ह्या भानगडीत ओढुच नकात. त्यातही वैकुंठ मध्ये गेलेल्यांना तर नकोच नको.. पुन्हा एकदा प्लिझ. वैभव यांच्याकडे कालपर्यंत शब्द नव्हता. आज त्यांनी दिलेल्या शब्दांचा विचार केला जाईल. अर्थात, चर्चा न वाचता काय वाट्टेल ते ठोकण्याची तुमची पूर्वापार शैली तुम्हाला लखलाभ. आणि जनहिताची इतकी कळकळ असेल तर वैकुंठात जाऊन, मृत्यूनं व्यथित झालेल्यांना दिलासा देणारं तुमचं ज्ञान तिथे प्लेक्स लावून प्रकाशित कराल तर ते जास्त विधायक होईल .

In reply to by विवेक ठाकूर

पिलीयन रायडर Mon, 04/25/2016 - 11:34
अपेक्षित प्रतिसाद! आता आलम दुनियेला अक्कल नाही हे ठरलेले असल्याने बोलायची सोयच नाहीये म्हणा. तुम्ही "ज्ञानीजन".. तुमचे अनुभव म्हणजे सार्वत्रिक.. वैश्विक सत्यच.. तुम्ही म्हणताय की हाच अर्थ आहे तर हाच अर्थ आहे.. तुम्ही म्हणताय हाच मंत्र सगळ्यात भारी तर हाच!! पण लेख न वाचल्याचा आरोप मात्र करु नका राव! वाचलाय मी लेख शिस्तीत.. नेहमीच वाचते.. तुम्ही सुद्धा एकदा वाचुन बघत जावा.. बर असतं ते! बाकी काही असो.. पण आपल्याला कशी आता एकमेकांच्या प्रतिसादाची सवयच झाली आहे नाही?!

In reply to by पिलीयन रायडर

वैभव जाधव Mon, 04/25/2016 - 11:40
बाय द वे तो 'शांतिमंत्र' आहे बरं का सज्जनहो (पिरा, विठा आणि आपण सगळेच) त्यातून 'शांती' मिळणं अपेक्षित आहे! अवांतर - डायनामाईट शांती नावाचं एक क दर्जाचं प्रकरण आहे. हलकं घ्या.

In reply to by पिलीयन रायडर

पैसा Mon, 04/25/2016 - 11:59
खरं तर ह्यासाठी मुळात हा श्लोक बरोबर आहे का असा मला प्रश्न पडलाय.
एवढ्याबद्दल काय वाटले ते लिहिते. अर्थात मी अभ्यासू वगैरे नाही. जे काही थोडंफार डॉक्यात एवढ्या वर्षात शिरलंय त्यावरून बोलते. आदिशंकराचार्यानी आणि अन्य आचार्यांनी यावर बरेच काही लिहून ठेवले आहे. ब्रह्म, माया वगैरे अभ्यास असणारे त्यावर भरपूर चर्चा करू शकतात. सामान्य माणसाच्या दृष्टीने आपला देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे असा आपला समज. मेल्यावर तो देह पंचमहाभूतांच्या स्वाधीन होतो. त्याचे त्याला परत जाते. म्हणजे पूर्णातून आलेले त्याचे त्याला परत मिळते. समुद्रातून ओंजळभर पाणी घेतले तर समुद्र कमी होत नाही. मात्र ओंजळीत तेच समुद्राचे पाणी असते. ते ओंजळीतले पाणी अर्घ्य म्हणून समुद्राला परत दिले म्हणून समुद्रात भरही पडत नाही. तसाच पूर्ण ब्रह्मातून आलेला देह/जीव/आत्मा त्याच्याकडे परत गेला आहे. "ते ब्रह्म" आणि "हा जीवात्मा" इतका चिमुकला अर्थ कोणी घेतला तरी बहुधा पुरेसा व्हावा. बहुधा या थोड्या अर्थाने तो श्लोक तिथे लिहिला असावा. अर्थात आधीच शोकाकुल असलेल्या नातेवाईकांना दु:खावर फुंकर घालणारा "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि" हा श्लोक तिथे जास्त योग्य ठरला असता हे तुझे म्हणणे बरोबर. पण हा श्लोक तिथे असणेही चुकीचे नाही.

mugdhagode Mon, 04/25/2016 - 12:26
आता पुढे काहीही नाही . स्वस्थ झोपा. ( सिर्फ इंतजार ! कयामत का . ) इतकं सोपं लिवायचं सोडुन हे संस्कृतावरुन मराठी लोक का अशांत होताहेत?