Skip to main content

नामांतरीत आयडी

लेखक बाळ सप्रे यांनी मंगळवार, 10/05/2016 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर जसे वैविध्यपूर्ण लिखाण्/विचार वाचायला मिळतात तसेच वैविध्यपूर्ण आयडी देखिल समोर येतात. काही काळ लेख,प्रतिसाद वाचून एकेका आयडीचा अंदाज यायला लागतो. हे आयडी बदलतादेखिल येतात. त्यामुळे आयडी बदलला की त्याच्या प्रतिसाद्/लेखांची हिस्ट्री जमेपर्यंत परत अंदाज बांधता येत नाहीत. पण स्वभावाप्रमाणे लेख प्रतिसाद यांची भाषादेखिल लपवणे कठीण असते. चाणाक्ष मिपाकर खूप लवकर कुठल्या आयडीने कुठले नवे नाव धारण केलय ते ओळखतात. डुआयडी वगैरे असेल तर लोक फार काळजी वगैरे घेउन लिखाण करतात पण मिपाकरांच्या नजरेतून वाचणे तसे कठीणच. आता आयडी बदलण्यामागे नेहेमीच काही कलुषित कारणे असतात असे नव्हे. खूप वेगेवेगळे आयडीज बघून आपणही नव आयडी घ्यावा अशीही इच्छा होत असेल. असो एवढी प्रस्तावना कशाला तर तुम्ही ओळखलेले असे नामांतरीत (अथवा एकाच व्यक्तीचे जुने नवे आयडी अथवा डुआयडी) आयडी इथे टाकणे.. चूक की बरोबर खात्री पण करुन घेता येइल.. माझ्या माहितीतीले हे काही .. अत्रुप्त आत्मा > अत्रुप्त > आत्मबंध गगनविहारी > गवि धनाजी वाकडे > धन्या > सतिश गावडे संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर स्वॅप्स > एस इस्पिकचा एक्का > डॉ सुहास म्हात्रे गिरीजा > प्रसाद गोडबोले > प्रगो माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!! . . . . .

वाचने 13325
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

In reply to by स्रुजा

चालणेबल आहे. लाहोर्बिलावकुत वगैरे छाप शब्द शिकायचा क्लास लावुन घे म्हणजे झालं =))

धन्या, सतीस गावडे आणि फटू हे तीन्ही वेगळे आयडी आहेत. तसेच ठाकूर आणि क्षीरसागर पण. (मालक कोण व किती हे माहीत नाही) बाकी नामांतरितात मी पण आहे. ;)

In reply to by अभ्या..

धन्या, सतीस गावडे आणि फटू हे तीन्ही वेगळे आयडी आहेत
म्हणूनच एकाच व्यक्तिचे जुने नवे आयडी असही म्हटलय.. रच्याकने.. तुमचही आधीचं नाव कळू द्या :-)

In reply to by बाळ सप्रे

धन्या, सतीस गावडे आणि फटू हे तीन्ही वेगळे आयडी आहेत
का माझ्या आयडींच्या जीवावर उठला आहात? ;)

संक्षी=ठाकूर वगळता बाकिचे ऑफिशिअल आहेत,त्यामुळे त्यात काय नवीन नाही. डुआयडींची नावे सांगून काहीजणांचा भांडाफोड करायचा असेल तर सांगा.इतरांनाही एखाद्या आयडीबद्दल शंका वाटत असेल तर इथे सांगावी,फक्त चर्चा हेल्दी झाली पाहिजे,नायतर फुकटचा राडा नको.

जुने = नवे क्लिंटन = गॅरी ट्रुमन वल्ली = प्रचेतस मांत्रिक = विजय पुरोहित तर्रीताई = शिवकन्या अमित पाटील = सागर कदम

In reply to by अजया

ज्या धाग्याचे संदर्भ दिलेत ना आपण तिथे अभ्या आणि माझी मजा सुरु होती. तुमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. सोडून द्या. बाकी वर मुद्दाम हो म्हणालो आहे हे चाणाक्ष वाचकांना समजले असेल ज्यात तुम्ही येणं शक्य नाही. बॅटमॅन च्या उत्तराला मी होय अभ्या.. असं म्हणालो आहे. बाकी मी प्यारे आहे किंवा नाही किंवा मधून आहे मधून नाही यामुळे आपल्या ला नेमका काय फरक पडतो ते कृपया समजू शकेल काय???

In reply to by वैभव जाधव

बाकी मी प्यारे आहे किंवा नाही किंवा मधून आहे मधून नाही यामुळे आपल्या ला नेमका काय फरक पडतो ते कृपया समजू शकेल काय???
बाडिस

In reply to by टवाळ कार्टा

आपण माझ्या पर्सनल फोन नंबरवर निष्कारण पिंग करुन मला तुमचा नवा नंबर ब्लाॅक करा वगैरे लिहिलंत की नाही? अजूनही तुमचे नसते उद्योग बंद नाही झालेले दिसत.अनेक अनाहितांनी तुमची तक्रार केलेली असताना आपण डुप्लिकेट आयडीत अवतार घेतला आहे हे त्यांना कळायला हवेच.

In reply to by अजया

? डोक्यावर पडून किती दिवस झाले? एखाद्यानं ब्लॉक करा असं सांगितलं तर नेमका प्रॉब्लेम काय आहे कळेल का? बाकी काही बोलला का ? बाकी इथे प्यारे किंवा आणखी काही असलेली व्यक्ती whatsapp किंवा चेपू किंवा आणखी कुठे वेगळी असणार ना? मिसळपाव वर वैभव जाधव किंवा प्यारे किंवा आणखी अजया म्हणजे व्यक्ती नाही. आयडी आहे. तुमचा वाद नक्की कुणाशी आहे?

In reply to by वैभव जाधव

मुळात तुम्ही सांगायला येण्याची आवश्यकता काय होती? तुमचा उद्देश तुम्ही खोटे बोलून इतर मिपाकरांना कांगावा करुन फार सरळ आहे असे दाखवायला बघताय का?

In reply to by अजया

मुद्दा काय आहे? काय खोटं बोललो? कांगावा आधी पण तुम्हीच केला होता आताही तुम्हीच करताय. आमच्या डोक्यात नसलेल्या गोष्टी इररेलॅव्हेंट प्रकारे कोट करुन अकारण गोंधळ करु नका.

In reply to by वैभव जाधव

तुम्ही खोटे बोलल्याचा पुरावा तुमच्यासाठी नाही तर इतरांसाठी आहे ! तुम्हाला वाचता येत नाही हे दिसतच आहे. कांगावा "तो मी नव्हेच" तुम्ही केला आहे.तोही अर्थातच दिसत नसेल.
आमच्या डोक्यात नसलेल्या गोष्टी इररेलॅव्हेंट प्रकारे कोट करुन अकारण गोंधळ करु नका.
तुमच्यासारखे निरागस तुम्हीच :)

In reply to by अजया

बाकी मी प्यारे आहे किंवा नाही किंवा मधून आहे मधून नाही यामुळे आपल्या ला नेमका काय फरक पडतो ते कृपया समजू शकेल काय???
एखादा आयडी आधी काय होता आणि आता काय आहे यामुळे प्रतिसादावर फरक पडू नये याबद्दल होते ते

In reply to by टवाळ कार्टा

बाकी एखादा प्रतिसाद काडी नसताना त्याला काडी म्हणणे हे सरसकटीकरण आहे...जिथे काडी असेल तिथे मी त्या प्रतिसादाला काडीच म्हणतो...ताकाला जाउन भांडे लपवत नाही :) आणि मी उगाच काड्या सारायला येतो हा वैयक्तीक आरोप आहे...आजच मिपावर "मिनी मायनी मो" चे उच्चारण परत बघितले...ज्याच्याबद्दल लिहिले तो आयडी कधी काड्या सारताना बघितला नाहिये...मग बाकीचे आयडी त्या आयडीबद्दल कुचाळक्या करतात त्याला काय म्हणावे

In reply to by टवाळ कार्टा

मी उगाच काड्या सारायला येतो हा वैयक्तीक आरोप आहे
इथे उगाच या शब्दाबद्दल आक्षेप आहे...मी काडी टाकली तर जाणून्/समजून टाकतो....ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ

In reply to by वैभव जाधव

वरचं उत्तर बॅटमॅनच्या प्रतिसादाला दिसतय.. असो.. 'ते तुम्ही नव्हेत' तर माझा आयडी खरा की खोटा ते बघा बॅक्ग्राउंड व्हेरीफि़केशन करुन .. :-)

माझा उल्लेख नै.. निशिढ... तथास्तु=जेपी. (नामांतर चळवळीचा सक्रीय कार्यकर्ता)

नामांतर चळवळीस म्या इरोध केला व्हता, च्यामारी कोन आता हाय,आधी क्वन व्हता नंतर काय व्हईल त्याचा काय बी अतापता लागत नाय बाँ... एक्सेल सांभाळायचा तर्रास्स्स का घ्यावा ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भींगी भींगी सड़कों पे मैं तेरा इंतज़ार करूँ धीरे धीरे दिल की ज़मीं को तेरे ही नाम करूँ... :-SANAM RE

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हे माझे डुआयडी नसून ज्ञात आयडी आहेत. तीन आयडिंनी केलेले लेखन तीन वेगवेगळ्या धाटनीचे आहे. महत्वाचे, यातल्या कुठल्याही आयडीचा मी "शिखंडी आयडी" म्हणून उपयोग केलेला नाही.

In reply to by सतिश गावडे

आता एक शिखंडी आयडी काढून स्वतःची तरफदारी करायची सवय करून घ्या. रच्याकने, मी पण एका डुआयडीची रिक्वेस्ट दिली होती, अजून अ‍ॅक्टीव्हेट झालेला नाही.. यांचे कसे होतात देव जाणे.

In reply to by आनन्दा

आता एक शिखंडी आयडी काढून स्वतःची तरफदारी करायची सवय करून घ्या.
होय. प्रयत्न चालू आहेत. असा शिखंडी आयडी काढला की पहीला तुमच्याच आयडीच्या मानगुटीवर बसेन. आणि स्वतःच्या तरफदारीबद्दल म्हणाल तर असते काहींना लाल रंगाचे फटकारे मारण्याची जन्मजात सवय. :)

पहिलं म्हणजे असे आयडींवर धागे यावेत व त्यात माझे सदस्यनाम असावे याची मला मौज वाटते. उगाच तो ग़ालिबसाहेबांचा शेर आठवतो - 'तू कहाँ का दाना था, किस हुनर में यकताँ था...'. असो. दुसरं म्हणजे माझा आयडी कोणी 'ओळखावा' यात नवल ते काय? मी सदस्यनाम जाहीररित्या बदलले होते. तसेच काही काळ त्याचे कारण व जुने सदस्यनाम हे प्रोफाईलच्या माहितीत ठेवलेही होते. तेव्हा जुने सदस्यनाम वा जुनी ओळख 'लपवावी' म्हणजे ते कोणीतरी 'शोधून काढेल' वा 'ओळखेल' असे यात काहीही नाही. अगदीच कोणाला इतरांच्या लेखनापेक्षा त्यांची सदस्यनाम हिस्टरी खोदून काढायला जास्त आवडत असेल तर त्यासाठी एक एक्सेल शीट बनवून इंटरेस्टेड सदस्यांना मेलवर पाठवावी. त्यासाठी धागे काढण्याची गरज नाही.

In reply to by एस

तुमच्यासारखे काही जाहीरपणे बदलतात.. काही जण कोणाला नकळत बदलतात व 'तो मी नव्हेच' असं पण करतात.. बाकी एक्सेल शीट वगैरे रोजच्याच आहेत. आणि प्रत्येकाला कुठे व्यनि करत बसणार.. त्यापेक्षा धागा काढणं सोपं वाटलं..