Skip to main content

नामांतरीत आयडी

लेखक बाळ सप्रे यांनी मंगळवार, 10/05/2016 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर जसे वैविध्यपूर्ण लिखाण्/विचार वाचायला मिळतात तसेच वैविध्यपूर्ण आयडी देखिल समोर येतात. काही काळ लेख,प्रतिसाद वाचून एकेका आयडीचा अंदाज यायला लागतो. हे आयडी बदलतादेखिल येतात. त्यामुळे आयडी बदलला की त्याच्या प्रतिसाद्/लेखांची हिस्ट्री जमेपर्यंत परत अंदाज बांधता येत नाहीत. पण स्वभावाप्रमाणे लेख प्रतिसाद यांची भाषादेखिल लपवणे कठीण असते. चाणाक्ष मिपाकर खूप लवकर कुठल्या आयडीने कुठले नवे नाव धारण केलय ते ओळखतात. डुआयडी वगैरे असेल तर लोक फार काळजी वगैरे घेउन लिखाण करतात पण मिपाकरांच्या नजरेतून वाचणे तसे कठीणच. आता आयडी बदलण्यामागे नेहेमीच काही कलुषित कारणे असतात असे नव्हे. खूप वेगेवेगळे आयडीज बघून आपणही नव आयडी घ्यावा अशीही इच्छा होत असेल. असो एवढी प्रस्तावना कशाला तर तुम्ही ओळखलेले असे नामांतरीत (अथवा एकाच व्यक्तीचे जुने नवे आयडी अथवा डुआयडी) आयडी इथे टाकणे.. चूक की बरोबर खात्री पण करुन घेता येइल.. माझ्या माहितीतीले हे काही .. अत्रुप्त आत्मा > अत्रुप्त > आत्मबंध गगनविहारी > गवि धनाजी वाकडे > धन्या > सतिश गावडे संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर स्वॅप्स > एस इस्पिकचा एक्का > डॉ सुहास म्हात्रे गिरीजा > प्रसाद गोडबोले > प्रगो माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!! . . . . .

वाचने 13325
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

माझ्या मते तजो >> तुड्तुडी >> मोगा >> mughabole मार खातोय आता !!! पळा

माझा एक प्रश्न: एखाद्याला व्यक्तिगत संदेश/ खरडवहीत खरड टाकायची असेल तर त्याचे नाव कुठे दिसले की त्यावर क्लिक करून यांना व्यक्तिगत संदेश/ खरड लिहा वर टिचकी मारून लेखन चौकट मिळते परंतू ते नावच दिसले नाही तर लेखन चौकट कशी मिळवायची?

In reply to by कंजूस

व्यक्तिगत संदेश मध्ये जाउन नाव टायपायला घ्या.. सजेशन्स येतात. त्यातुन निवडा. किंवा तसं ते नाव site:misalpav.com म्हणुन गुगल सर्च केलं तरी एखादा लेख / प्रतिसाद मिळतो, त्यातुन पण क्लिक करुन पण हे करता येईल.

दिपक.कुवेत - दिपक दांडेकर - दिपक.कुवेत :) हेमांगीके - किलमाऊस्की

charshad (का असंच कायतरी) - ५०फक्त गवि, तिमा ह्यांना शॉर्टफोर्म करुन घेतला ते आठवतय. पण नामांतरपेक्षा डुआयडींविषयी बोला. म्हणुन लोकांनी शिस्तीत जाहीर केललं आहे पण तरी, जसं की सनईचौघडा - प्रमोद दर्देकर टाईप..

In reply to by पिलीयन रायडर

हा प्रकार मला आवडला नाही.मला व्यनी आणी खरडी येत आहेत.(अर्थात गंभीर नाही). तुम्ही टक्याला खव करु शकता. एसमाळी हा आयडी मी काढलेला नाही.संतोष माळी वेगळे आहेत. त्यांनी मिपा सोडताना मला तो आयडी मिळाला.

In reply to by जेपी

एसमाळी हा आयडी मी काढलेला नाही.संतोष माळी वेगळे आहेत. त्यांनी मिपा सोडताना मला तो आयडी मिळाला.
नामांतर, डुआयडी, जुनेनवे आयडी.. यासारख आता आयडी हस्तांतरण.. नवीन सिनारीओ समजला :-)

In reply to by जेपी

त्यांनी मिपा सोडताना मला तो आयडी मिळाला.
म्हणजे समुद्रात माझ्या हातातनं निसटून पडलेली पाचूची अंगठी एखाद्या मित्राला वाळूत मिळावी तसा?

छान

हे असले प्रकार आम्ही फार पूर्वीपासून यशस्वीरीत्या अंमलात आणले आहेत. या सरपोतदारांचं त्या सरपोतदारांना किंवा मावशींनाही कळलं नाही. बनवाबनवी. तेव्हा थोडी तंगी होती म्हणून हो!

माझे काही (आकडा निश्चित आठवत्/सांगु शकत नाही) आयडी अन्सब्स्क्राईप करायचे होते, जिथे पासवर्ड आणी आयडी लिहीले होते तो कागद हरवला आहे, भेंडी काय करावं समजत नाहीये.

सामान्यज्ञानात बरीच भर पडली. तशीच आणखी एक पण करा. डोक्यावर पडलेला = म्हणजे काय? सर्वसाधारणपणे सर्व डोक्याकडूनच जन्माला येतात. बरं, ते निसटून खाली डोक्यावर पडतील, ही शक्यता फारच कमी असते. तर अशा, अ‍ॅक्सिडेंटल बाळांबद्दल आहे का हा वाकप्रचार ?

In reply to by तिमा

डोक्यावर पडणे म्हणजे
पडल्यावर ज्याभागाला जमिनीचा स्पर्श/आघात होतो तिथे दुखापत होते, त्यानुसार डोक्यावर पडल्यास डोक्याला (परीणामी मेंदूला) मार लागून माणसाची वर्तणूक विचित्र होणे

माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!!
ग्रेटथिन्कर, ग्रेटथिंकर, नानासाहेब नेफळे, टॉपगिअर्ड फिलोसोफर, सचीन, माईसाहेब कुलसुंदीकर, काकासाहेब केंजळे इ. वेगवेगळे अवतार धारण केलेल्या सदस्याचा नवीन आयडी 'पिंपळगावचा पिराजी' असा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

काही हं श्री.. प्रत्येक आयडी वेगळा आणी युनीक आहे .हवतर समस्त कुरसुंदी गावाची साक्ष काढ.. -माई मोड ऑफ..

मी सुद्धा एक ड्यूआयडी आहे असं मानू शकता. कारण मी जो खरा आहे तो मी इथे असत नाही. बाकी इथली चहाच्या कपातली भांडणं वाचून मौज वाटली. शतक पूर्ती च्या शुभेच्छा.

धागा शतक पुर्ती निमीत्त टक्या लिखीत जे पी संपादीत

"मिपा डुआयडी एक आडवा आढावा आणि अडवा बढाया"

या आगामी ग्रंथाच्या सवलतीचे कुपन आणि १ किलो भुईमुगाच्या शेंगा १० उसाची कांडके देऊन करण्यात येईल. (वेळ व ठिकाण यासाठी जेपी भाऊम्कडे संपर्क करणे त्यांचा नंबर एस माळींकडे आहे आणि एस माळी कुठे आहे ते फक्त टक्याला माहीती आहे) वरील ग्रंथास जेष्ठ मिपाकर धन्याशेठ गावडे आणि सार्वकालीन माई यांनी प्रस्तावना कौतुक शब्द (हळदी-कुंकवासहीत दिले आहेत याची नोंद घेणे) पहिल्या १० प्रतींवर वरील नामांकीतांची स्वाक्षरी असेल असे आम्च्या सूत्रांनी कळविले आहे. सदस्य अखिल मिपा सत्कार समिती आणि जेपी मित्र परिवार , कुंथुनाथ अगलतगल सेवा समीती.