गाभा:
जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात
कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर
नेटिझन्समध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त
करण्यात येत आहे.
माझ्या मनात ही काही प्रश्न निर्माण होत आहेत
मटनावरील बंदी ही मूर्खपणाची,
निरुपयोगी आहे का?
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू
शकता का ?
मुंबईमध्ये फक्त जैन समुदायाची नव्हे तर सर्व
समुदायाची लोक राहतात . मग इतरांवर
बंधने का?
भारतामध्ये विविधतेत एकता आहे. मात्र
सरकार विविधतेवर बंदी घालत आहे.
अच्छे दिन हे आहेत का ?
प्रतिक्रिया
8 Sep 2015 - 5:12 pm | बाबा योगिराज
मायला असल काही खर असेल तर रमजानच्या काळात दिवसभर उपाशी रहाव लागल नाही म्हंजे मिळवली.........
.
.
.
.
.
अवांतरः- मी पयला फ्यासन गेली की काय???
8 Sep 2015 - 5:52 pm | नाव आडनाव
रमजानच्या काळात दिवसभर उपाशी रहाव लागल नाही म्हंजे मिळवली..
आयला, पॉइंट आहे ...
8 Sep 2015 - 8:46 pm | रमेश आठवले
रमझानच्या काळात एकदा कुवैत ला जाणे झाले होते. तिथे दिवसाच्या काळात बाजारात किंवा ऑफिस मध्ये किंवा इतर कुठेही काही ही खायला प्यायला मिळत नसे.. माझा मुक्काम पंच तारांकित हॉटेल मध्ये असल्याने माझी पोटपूजा फक्त तेथे होऊ शकत होती .
रोझा चा उपवास सोडताना सर्व मुस्लिम बांधव हमखास मांसाहार करतांत.
8 Sep 2015 - 9:01 pm | प्यारे१
अनुभवः
मुस्लिम लोक उपवास सोडताना खजुर खाऊन आणि पाणी पिऊन उपास सोडतात. नंतर फळं. त्यानंतर लगेच मांसाहार करत नाहीत. नमाज पढून आल्यावर जेवण करतात. त्यात मांसाहार शक्यतो असतो. दिवसभर अन्न पाणी काहीही नसतं.
9 Sep 2015 - 1:18 am | रमेश आठवले
माझ्या माहितीप्रमाणे निदान हैदराबाद मध्ये तरी रोजा चा उपवास सम्पल्यावर हालिम नावाचा मटनाचा प्रकार जेवणात असतो. गव्हाचा जाडा रवा आणि मटन दिवसभर एकत्र शिजवून हा पदार्थ बनवतात .
9 Sep 2015 - 9:22 am | सुनील
हलीम
9 Sep 2015 - 9:23 am | सुनील
http://misalpav.com/node/3272
8 Sep 2015 - 5:25 pm | अनिरुद्ध.वैद्य
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू
शकता का ?
>>
मी काय प्यावे ह्यावर सरकार नियंत्रण ठेवते तर काय खावे ह्यावरदेखील सरकार नियंत्रण ठेवू शकते :)
8 Sep 2015 - 5:36 pm | प्यारे१
+१
ड्राय डे सुद्धा बंद व्हायला हवेत. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ला ड्राय डे ठेवून नेमकं काय मिळतं कुणास ठाऊक. आधीच्या दिवसात कधीही 'स्टॉक' मिळतो च की.
8 Sep 2015 - 5:39 pm | अनिरुद्ध.वैद्य
.
8 Sep 2015 - 6:03 pm | shawshanky
अहो इथ शोधून देव सापडतो "स्टॉक" काय चीज आहे
8 Sep 2015 - 6:23 pm | बाबा योगिराज
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू
शकता का ?
>>
मी काय प्यावे ह्यावर सरकार नियंत्रण ठेवते तर काय खावे ह्यावरदेखील सरकार नियंत्रण ठेवू शकते :)
प्रतिसाद द्या
मि काहिही खाल्यावर / पिल्यावर .... किती आणि कसा पो टाकावा यावर पन सर्कार नियंत्रण ठुनार का???
.
.
.
.
कन्फुज्ड बाबा......
9 Sep 2015 - 2:30 pm | अनिरुद्ध.वैद्य
कुठ टाकावं ह्यावर नियंत्रण हाय की …
9 Sep 2015 - 4:46 pm | बाबा योगिराज
ते बी खरच हाये म्हना....
.
.
.
.
सहमत असलेला बाबा....
8 Sep 2015 - 5:48 pm | बॅटमॅन
तद्दन मूर्खपणा आहे. अगोदरच्या काळातही जैनांची असली दहशत पहावयास मिळालेली आहे. व्हेजिटेर्यन लोक सात्त्विक का कायतर असतात असे समजायचे लोक अगोदर, असला शाकाहारी दहशतवाद पाहून ती उरलीसुरली समजूतही धुळीला मिळाली.
8 Sep 2015 - 5:51 pm | अनिरुद्ध.वैद्य
बॅटमॅनभो
चुकीची समजूत! हिटलर शाकाहारी का काय ते होता म्हणे :D
8 Sep 2015 - 6:08 pm | असंका
हिटलर शाकाहारी का काय ते होता म्हणे
वॉट्स अॅप / सोशल मिडीया ग्यान ना?
वॉट्स अॅप वर येणारी प्रत्येकच गोष्ट खोटी असते असं वाटायला लागलंय आज काल....
8 Sep 2015 - 6:11 pm | अनिरुद्ध.वैद्य
लहानपणी राजीव दिक्षितच्या जबरदस्ती ऐकाव्या लागेल्या कैसेटीत ऐकल्याचे आठवते!
8 Sep 2015 - 9:53 pm | बॅटमॅन
नै नै. हिटलर नंतर नंतर खरेच शाकाहारी झाला होता. तो आणि त्याचे क्लोज असलेले नाझी अधिकारी यांच्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे त्यांपैकी अनेकांना माणसे मारताना काही वाटत नसले तरी प्राण्यांच्या हालअपेष्टा आवडत नसल्याने कैकजण व्हेज होते.
कंबोडिया देशातला क्रूरकर्मा पोल पॉट हाही शुद्ध शाकाहारी होता. त्यानेही लाखो लोक मारले. तेव्हापासून शाकाहाराच्या सात्त्विकतेचे कौतुक सांगणार्यांना "हो का, बरं बरं, हिटलरही शाकाहारी होता" असे सांगावे वाटते.
8 Sep 2015 - 5:53 pm | फुलथ्रॉटल जिनियस
ब्याटम्याना, हिंदूंनी बिफला घातलेल्या बंदीला तुझा पाठिंबा असेलच!!!!
जैनांना शिव्या टाकायच्या आणि मुस्लिम बांधवांना बीफ खाण्यापासून रोखायच, हि दुटप्पी भूमिका कशासाठी?
8 Sep 2015 - 6:21 pm | शलभ
माईंच्या स्टाईल मधे फुलथ्रॉटल जिनियस..;)
8 Sep 2015 - 9:50 pm | बॅटमॅन
बीफबंदीला माझा पाठिंबा नाही. बायदवे फक्त मुसलमानच नव्हे तर केरळ-तमिळनाडूतील काही हिंदू जातीही पारंपरिकरीत्या बीफ खातात.
9 Sep 2015 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
बालीमधले हिंदू पण सर्रास गोमांस खातात. सणासुदीला खास मांसासाठी पोसलेल्या गुरांची विक्री होते. गोमांस फक्त पुजारी लोकांसाठीच निषिद्ध समजले जाते.
9 Sep 2015 - 12:57 pm | बॅटमॅन
नवीन माहितीकरिता धन्यवाद!
9 Sep 2015 - 1:17 am | सटक
एक उगीच माहितीचा दाणा टाकतो!
ग्लॅडिएटर्स जे योद्धे म्हणून गणले जात असत त्यांचे खाणे जवळ जवळ पूर्णतः शाकाहारी असल्याचा ताजा ताजा शोध लागला आहे...अर्थात कारणे थोडी वेगळी आणि विचित्र आहेत म्हणा, पण शाकाहाराच्या सात्विकतेला अगदीच बट्टा लावला आहे बुआ!!
9 Sep 2015 - 3:23 am | बॅटमॅन
रोमन आर्मीच्या आहारातही एकूण मांसाहाराचे प्रमाण तसे कमीच होते. इतके असूनही पूर्ण मांसाहारी असलेल्या अनेक टोळ्यांवर त्यांनी अनन्वित अत्याचार केले.
8 Sep 2015 - 6:14 pm | प्रदीप
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का ?
होय. निरनिराळ्या पंथाचे, धर्माचे, रीतिरिवाजाचे लोक, निरनिराळ्या गोष्टी खातात. उदा. कुत्रे, मांजरे, वाघाच्या लिंगापासून बनविलेले काही पदार्थ वगैरे. परदेशात (काही देशांत, जिथे असे भक्षणा करणारे लोक असू शकतात, तिथे) ह्यातील अनेक गोष्टी खाण्यावर कायद्याने बंदी आहे. उद्या भारतातही ह्यांतील काही कुणी खायचे ठरवले, तर ते अवैध ठरावे?
8 Sep 2015 - 6:18 pm | होबासराव
आपला तुमच्या ह्या हि आयडि ला पाठींबा
सिंथेटिक कद्रुस दरेकर चा फॅन
होबासराव
8 Sep 2015 - 6:22 pm | बोका-ए-आझम
8 Sep 2015 - 6:25 pm | सुबोध खरे
कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त ती कत्तल सार्वजनीक ठिकाणी करू नये. (उदा. उघड्यावर कुर्बानी देणे किंवा प्राण्यांचा बळी देणे.) अमुक धर्माच्या सणात त्यांनी वागावे तसेच वागावे हा आग्रह का?
बीफ वरील बंदी सुद्धा त्यात मोडते.( मी बीफ खात नसलो तरीही).
उद्या हे म्हणू लागतील कि श्रावण आहे तर सगळे कोंबडी वाले,मासे विक्रेते, खाटीकखाने आणि अंडी वाल्यांची दुकाने सुद्धा बंद असावीत.
यासाठी पर्युषणाच्या काळात खाटीकखाने बंद ठेवण्याचा निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. राजकीय फायद्यासाठी कोणत्याही धर्माला झुकते माप देणे हे चुकीचे आहे.
8 Sep 2015 - 6:30 pm | अनुप ढेरे
हे तुणतुणं गेलं का 'अच्छे दिन' वर!
ही बातमी वाचा. त्यावरची तारीख वाचा.
www.dnaindia.com/mumbai/report-mira-bhayander-civic-body-bans-meat-sale-...
आणि हेही वाचा.
8 Sep 2015 - 6:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा.....................
काय राव ! लेखकाच्या तोंडून चांगला व्दिशतकी धागा ओढून काढलात !!!
8 Sep 2015 - 7:20 pm | प्रदीप
लेखकाच्या तोंडून चांगला व्दिशतकी धागा ओढून काढलात !!!
असे येथे कुणीही, कुणाच्याही तोंडातील काहीही ओढून घेऊ शकते का? तसे असल्यास मिपाकरांचा णिशेद!
9 Sep 2015 - 12:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपा हे तुमचे आमचे सगळ्यांचेच प्रतिबिंब आहे ! :)
9 Sep 2015 - 8:27 pm | विकास
असे येथे कुणीही, कुणाच्याही तोंडातील काहीही ओढून घेऊ शकते का? तसे असल्यास मिपाकरांचा णिशेद!
आता जर लोकांच्या तोंडचे अन्न देखील ओढण्यात महाराष्ट्र अग्रेसर होत असेल तर एक धागा काय, किस झाड की पत्ती! ;)
(ह. घ्या.)
8 Sep 2015 - 6:44 pm | अनिरुद्ध.वैद्य
आता लिंक व्हिजीट केले! तिथे २००४ चा उल्लेख काढून टाकलाय. द्वाड आहे मीडिया!
8 Sep 2015 - 9:22 pm | नाव आडनाव
ही डीएनए मधलीच पण नंतरची बातमी आहे (तुम्ही दिलेली ३० ऑगस्ट ची आहे आणि ही ६ सप्टेंबरची )
http://www.dnaindia.com/mumbai/report-mira-bhayandar-civic-body-bans-sal...
एनडीटीवी च्या बातमीत (सप्टेंबर ७, २०१५ ) पण आठ दिवस बॅन आहे असंच दिलंय
http://www.ndtv.com/india-news/after-beef-ban-no-meat-for-8-days-in-dist...
अजून काही बातम्या सुध्धा ह्याच वर्षिच्या आणि ८ दिवसाच्या आहेतः
http://www.eenaduindia.com/Maharashtra/OthersInMaharashtra/2015/09/06170...
http://www.mid-day.com/videos/mbmc-mayor-justifies-ban-on-meat-sale-duri...
11 Sep 2015 - 10:07 am | आनन्दा
तुम्हाला अर्थ कळलेला नाही असे दिसतेय. असो.
जरा त्या इमेज मधली तारीख परत पहा.
11 Sep 2015 - 10:44 am | नाव आडनाव
लिंक मधे (आणि इमेज मधे सुध्धा) मांस विक्री दोन दिवस ( / तीन दिवस) बंद राहणार असं होतं. म्हणून मी त्या लिंक दिल्या होत्या - ज्यात मांस विक्री या वर्षि आठ दिवस बंद आहे असं लिहिलंय.
8 Sep 2015 - 6:36 pm | होबासराव
अहो कद्रुस मिया द रेकर उर्फ सिंथेटिक जिनियस आणखि काय काडि टाकणार
8 Sep 2015 - 6:37 pm | संजय पाटिल
त्यानी फक्त कत्तलखाने बंद ठेवायचं म्हंटलं आहे. मांसाहार वर्ज्य असं म्हंटलेलं नाही.
8 Sep 2015 - 6:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
शांक्या,मीरा भायंदरच्या महापौर गीता भरत जैन(भाजपा) आहेत.

ज्यांना मटन खायचे आहे त्यांनी दहिसर,विरारला जाउन मटन विकत घ्यावे असे ह्यांचे म्हणणे.
8 Sep 2015 - 6:46 pm | संजय पाटिल
हे वाचा अनुप ढेरे ह्यान्च्या लिंकेत्लं----
When asked about the needs of Mira-Bhayander’s non-vegetarians, Kumar said that the ban is only for a day at a time. “Meat shops are closed only for a day. So people have the option of buying meat a day earlier,” said Kumar.
8 Sep 2015 - 7:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
खरे आहे रे संजय.पण प्रश्न एक दिवसाचा नसून व्यक्तीस्वातंत्र्याचा व काही गट जे दादागिरी करतात त्याचा आहे. रमझानच्या महिन्यात 'मीरा-भायंदरमधील लोकांनी एक दिवस उपाशी रहावे' अशी मागणी झाली तर जैन समाज पाठिंबा देणार की "स्वातंत्र्याची गळचेपी झाली हो..."म्हणत न्यायालयात धाव घेणार? असा ह्यांचा सवाल.
8 Sep 2015 - 9:36 pm | पीके
व्यक्ती स्वातंत्र्य म्हण्जे काय?
8 Sep 2015 - 6:53 pm | बोका-ए-आझम
8 Sep 2015 - 7:31 pm | प्रसाद गोडबोले
मी कोणत्याही प्रकारे मांसाहाराचा निषेध अन शाकाहाराचे समर्थन करत नाही , मात्र तरीही सदर धागा आणि इंटरनेट्वरील विचारवंतांची मते पाहुन खालील विचार मनात आहे
१) सेक्युलर देश म्हणजे नक्की काय ? बहुसंख्यांची मनमानी चालते तो देश असा काहीसा अर्थ आहे काय ?
२) फाळणी नंतर भारत पाकिस्तान दोन देश झाले , पाकिस्तानात , बांग्लादेशात पोर्क मिळते का ? स्वतःच्या धर्माचे आचरण करण्यासाठी त्या लोकांनी झगडुन स्वतंत्र देश मिळवला मग हिंदु जैन बौध्द शीख लोकांन्नी आपल्या अहिंसेला धरुन सेक्युलर देश कल्पना उचलुन धरली ही त्यांची चुक झाली काय ?
३) जैनांना फाळणी करुन ( इवलासा का होईना ) पण स्वतंत्र देश मिळाला असता तर त्यांना आनंदाने त्यांचे निर्णय राबवता आले असते ना ?
४) भारत देश सेक्युलर असल्याचा कोणत्या धर्माच्या लोकांन्ना सर्वात जास्त फायदा होत आहे ? कोणत्या धर्माच्या लोकांचे नुकसान होत आहे ?
५) जैनांच्या भावनांचा आदर कसा राखला जाईल ? की त्यांनी पारशी धर्माप्रमाणे नामशेष होवुन जाणे अपेक्षित आहे ? बरं पारश्यांच्या अग्यारीत अपारशी लोकांना जाण्यास बंदी असते त्या विरुध्द हे विचारवंत काही का बोलत नाहीत ? सेक्युलॅरिझम च्या नावाखाली , ज्यांनी खर्या अर्थाने सेक्युलॅरिझम चा शोध लावला त्या आमच्या भारतीय धर्मांनाच का बरे चेपले जाते ?
६) व्यक्तीस्वातंत्र्याच्या आडुन ह्या मांस बंदीवर टीका करणारे लोक इतर नॉनसेन्स बंद्यांच्या विरोधात आवाज उठवणार का ? ( बाकी सोडा पण १५ ऑगस्टला आमचा जन्मदिवस असतो हो , ते ड्रायडे ची बंदी काढता आली तर बरें होईल =)) )
आणि सर्वात महत्वाचा प्रश्न :
७) जे धर्म आक्रामकपणे स्वतःच्या तत्वांचा प्रचार प्रसार करत नाहीत ते आयसीसच्या वादळापुढे टिकुन रहातील का ?
8 Sep 2015 - 7:40 pm | द-बाहुबली
बाकी
आयसीसच्या वादळाला तोंड द्यायला भारतीय लष्कर सक्षम आहे. आणी त्यामार्फतच तोंड दिले जावे ही अपेक्षाही.
8 Sep 2015 - 7:49 pm | प्रसाद गोडबोले
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !
आयसीस चे युध्द भारताविरुध्द नाही हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल तोच सुदीन !
तोवर हॅप्पी ड्रीमींग !!
8 Sep 2015 - 7:50 pm | द-बाहुबली
आयसीसला उत्तर भारतीय लष्करानेच द्यायचे आणी त्यानेच दिले पाहिजे हे ज्या दिवशी लक्षात येइल तो समस्त भारतियांसाठी सुदीन.
8 Sep 2015 - 9:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
असंख्य हॉटेलांमध्ये जैन पावभाजी मिळते,जैन पिझ्झा,एग्लेस केक का काय तो.. मिळतो ना रे प्रगो?
8 Sep 2015 - 8:29 pm | प्यारे१
एका विचारधारेला (भले ती आपल्यासाठी किंवा खरंच, चुकीची असो) शस्त्रानं किंवा लष्कराकडून उत्तर कसं देता येईल?
लष्कर समर्थ असलं तर आताच्या वर्तमान अडचणी का संपत नाहीयेत?
एका कसाब सारख्या पित्त्याला किंवा त्या दृष्टीनं २-५ लाख लोकांना मारु शकलो तरी पुढची फळी तयार व्हायची नि आक्रमण करायची थांबेल?
8 Sep 2015 - 8:39 pm | द-बाहुबली
ऑपरेशन म्यानमार.
8 Sep 2015 - 8:42 pm | प्यारे१
एन्लायटन प्लीज.
घटना ठाऊक आहे. नवीन चलन आलंय आयसिसचं.
बिलियन्स ऑफ डॉलर्स चा खजिना जमला आहे. शस्त्रास्त्रं आहेत, प्रोग्राम्ड लोक आहेत. मिळणारा पाठिंबा दुर्दैवानं जगभरातून आहे
8 Sep 2015 - 8:52 pm | द-बाहुबली
आय डोंट डिस्कस दिज मॅटर्स विद सिवीलीयन्स सॉरी. ;)
बस फक्त हेच दुखणं खरं आहे. आणी तेल विहीरींवर कब्जा केल्यामुळे त्यात भरच पडत आहे. पैसा आहे म्हणूनच हात पाय पसरता येत आहेत. बाकी मी विधान जे धर्म आक्रामकपणे स्वतःच्या तत्वांचा प्रचार प्रसार करत नाहीत ते आयसीसच्या वादळापुढे टिकुन रहातील का ? या वाक्याच्या संदर्भात केले असल्याने यानुशंगाने विशीष्ट प्रश्न मनात असेल तर कृपया विचारावा.
कारण त्या प्रश्नाला माझे उत्तर भारतीय लष्कर इसीसला उत्तर द्यायला सक्षम आहे त्यासाठी जगात एखादा नवीन धर्म स्थापायाची अथवा अस्तित्वात असलेला दुसरा एखादा धर्म आक्रमक करायचा ज्यातुन इसिस आपोआप संपेल/त्याला शह बसेल असे मानणे भाबडी आशा आहे असेच आहे. इसीस मानवते विर्ध्द आहे असेच कृत्यातुन सिध्द करते आणी भारतीय लष्कर मानवतेसाठी काम करायला सक्षम आहे.
अर्थात धर्मस्थापनार्थाय प्रत्यक्ष नारायणानेच अवतार घेतला तर गोष्टच निराळी होइल म्हणा...
9 Sep 2015 - 2:31 pm | अनिरुद्ध.वैद्य
एका विचारधारेला (भले ती आपल्यासाठी किंवा खरंच, चुकीची असो) शस्त्रानं किंवा लष्कराकडून उत्तर कसं देता येईल?
>>
आपल्याकडच्या पुरोगामी वैचारिक मंडळींना पाठवायचं का तिकडे?
9 Sep 2015 - 2:37 pm | होबासराव
'आप'ण सहमत, मिपावर सुद्धा आहेत कि सो कॉल्ड पुरोगामी काड्यासारु, वर्गणी करुया आन द्यु इ पाठ्वुन हाकानाका
9 Sep 2015 - 2:42 pm | बॅटमॅन
त्यावरनं आठवलं, फेबुवर पाहिलेलं: पाकिस्ताण टूरिझम/व्हिसाचे सर्वांत मोठे प्रमोटर्स म्हणजे भारतातील स्वयंघोषित राष्ट्रभक्त मंडळी. जरा कै झालं की "याला पाकिस्तानला पाठवा" चा उद्घोष सुरू असतो.
9 Sep 2015 - 8:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या. ह्याला गॉथमला पाठवा रे.
9 Sep 2015 - 8:42 pm | प्यारे१
थोडक्यात 'ह्याला ''घरी'' पाठवा रे' असं आहे का ते? ;)
9 Sep 2015 - 2:42 pm | अनिरुद्ध.वैद्य
.
9 Sep 2015 - 2:45 pm | प्यारे१
गुड सजेशन
9 Sep 2015 - 2:27 pm | प्रसाद गोडबोले
असो.
जैन समाजाविषयी कीव आणि सहानुभुती वाटते .
तुमच्या पेक्षा पारशी नशीबवान हो , दुसर्या देशातुन इथे येवुनही मोठ्ठा कौतुकाने स्वतःच्या धर्माचे आचरण करत आहेत , प्रत्येक अग्यारी बाहेर स्पष्ट पाटी लावलेली असते की पारशी आणि इराणी झोराश्ट्रीयन सोडुन कोणालाही प्रवेश नाही आणि त्यांच्या विरुध्द कोणी ब्र ही काढत नाहीत !
असो . आता १५ ऑगस्ट २६ जानेवारीला सक्तीच्या दारुबंदी विरुध्द बघु कोण आवाज उठवते ह्या इंटरनेटीय विचारवंता मधील !!
9 Sep 2015 - 2:29 pm | अनिरुद्ध.वैद्य
त्यांच्या विरुद्ध जाउन व्होट बँक तयार होत नसेल त्यामुळे असे असावे.
9 Sep 2015 - 2:36 pm | बॅटमॅन
अग्यारीतला प्रवेश आणि स्वतःचा धर्म सोडून इतरांनी काय खावे अन काय नाही या दोन गोष्टींची तुलना करणे हेच मुळात तर्कदुष्ट आहे. जसे अग्यारीत नॉनझोरोअॅस्ट्रियन लोकांना प्रवेश नाही, तद्वतच नॉनहिंदूंना प्रवेश न देणारी देवळेही आहेतच की.
पण स्वतः मांस खात नाही म्हणून इतरांनीही खाऊ नये ही तर दडपशाही झाली. जैन सोडून इतर धर्मीयांनी मांसाहार केला तर जैन धर्मीयांचे कुठले धर्मतत्त्व पाळले जात नाही तेवढे सांगा, मग त्या अनुषंगाने चर्चा करता येईल.
बाकी आयसिस वगैरे निव्वळ मुद्दे भरकटवणे आहे.
9 Sep 2015 - 2:58 pm | प्रसाद गोडबोले
मुद्दा असा आहे की जसा जैनांच्या भावनांचा आदर कोणत्या देशात होईल ?
ठीक आहे , घोडा मैदान दूर नाही !
9 Sep 2015 - 3:08 pm | बॅटमॅन
भावनांचा आदर इतरांच्या आहारावर का घसरावा हे न उलगडणारे कोडे आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा की इतरांनी नॉनव्हेज खाल्ले तर जैनांचे कुठले धर्मतत्त्व विटाळते? तसे त्यांच्या धर्मग्रंथात काही आहे का?
9 Sep 2015 - 3:49 pm | प्रसाद गोडबोले
नाही नाही तसे मुळीच नाहीये . जैन आणि सारेच भारतीय धर्म अॅकोमोडेटीव्ह आहेत , पण हा आमचा सद्गुण आमच्याच मुळावर उठायला लागला तर काय करावे ?
सौदी मधे मला सहा महिन्यात एकदाही पोर्क खायला मिळाले नाही , रमजान मधे हमखास सारी हॉटेल बंद असायची दिवसा , ते लोकं कसे कट्टरतेने स्वतःची धार्मिक धोरणे राबवतात ! बरं आमचा जैन बौध्द आणि हिंदु धर्म पहिल्या पासुनच सेक्युलर म्हणुन आम्ही सेक्युलॅरिझम स्विकारलले तर ते आमच्याच मुळावर उठायला लागले आहे ! ३६५ दिवसातील ५ दिवस नॉनव्हेज खाल्ले नाहीतर काय बिघडते ?
फाळणीच्या वेळेला मुसलमानांनी झगडुन स्वतंत्र देश मिळवला , तिथे ते आनंदाने त्यांची धोरणे राबवतात ( भले मग ती काहीही का असेना ) मग आमच्या लोकांनी धर्माच्या आधारावर राज्य निर्माण नकरता सेक्युलरत्व स्विकारले तर त्या धर्माच्या लोकांच्या भावनांचा आदर केला तर काय बिघडेल ?
डिस्क्लेमर : मी स्वतः कट्टर शाकाहारी नाही , पण मला सर्व "सेक्युलर" धर्मांविषयी प्रचंड आदर आहे. जैन , बौध्द आणि वैदिक परंपरांची पार्श्वभुमी नसती तर हा देश किती सेक्युलर राहिला असता देव जाणे !
9 Sep 2015 - 3:57 pm | बॅटमॅन
म्हणजे तुम्हांला सौदीत पोर्क मिळाले नसल्याने जैनपुरस्कृत बंदीचा पुरस्कार करताय का?
झालंच तर सेकुलारिझम मुळावर उठणे आणि अशी खाद्यबंदी यांचा काय संबंध आहे ते जरा सांगा बघू.
आणि ५ दिवस नॉनव्हेज खाल्ले नैतर काय बिघडते, बीफ खाल्ले नैतर काय बिघडते, पोर्क खाल्ले नैतर काय बिघडते हे सारेच प्रश्न सारखेच निरर्थक आहेत.
वेल, बहुसंख्य कोण आहेत इथे? त्यांच्या भावनांचा आदर करायचा की अल्पसंख्य भावनांचा?
9 Sep 2015 - 3:58 pm | बॅटमॅन
चातुर्मास, त्यातही श्रावणात हिंदू लोक मांसाहार करत नाहीत. त्यापायी हिंदूंनी कधी त्या काळात मांसबंदी घातल्याचे आठवत नाही, मग जैनांचा असला आततायीपणा का खपवून घ्यावा?
9 Sep 2015 - 4:43 pm | प्रसाद गोडबोले
हो .
पहा ना , इतर धर्माचे लोकं त्यांची तत्वे , धार्मिक धोरणे बिन्धास्त पणे राबतात त्यांच्या देशात , ह्या देशात मात्र ज्यांनी सेक्युलॅरिझम स्विकारले त्याच धर्मांना त्यांची धोरणे राबवता येत नाहीत
ह्म्म ....खरेच त्यांनी फाळणीच्या वेळेला स्वतंत्र देश मागुन घ्यायला हवा होता असली धार्मिक धोरणे राबवण्याकरिता !
आता भोगा म्हणाव आपल्या कर्माचि फळं !!
9 Sep 2015 - 5:01 pm | कपिलमुनी
इस्लामिक देशांनी त्यांचा देशाचा अधिकृत धर्म मुस्लिम आहे असे जाहीर केले आहे. आणि त्यानुसार त्यांचे कायदे ठरवले आहेत. आणि तिथे रहायचे असल्यास ते पाळावेच लागतात.
भारताने (इंडिया) कोणताही धर्म अधिकृतपणे स्वीकारलेला नाही. त्यामुळे सेक्युलॅरिझममुळे प्रत्येक धर्माला इथे समान हक्क आहे किंबहुना आपल्या कायद्याप्रमाणे अल्पसंख्याकांना संरक्षण देखील आहे.
त्यामुळे मुस्लिम / जैन / बौद्ध / ख्रिस्चन / इतर भारतामध्ये आपापल्या धर्माचे आचरण करू शकतात आणि सरकारकडून त्यांच्या प्रथेसाठी / भावनांसाठी संरक्षण / सोयी/ सुविधा मागू शकतात आणि प्रथा , परंपरा राबवू शक्तात.
जसे १.हिंदूंनी गोमासांवर बंदी आणली
२. जैन लोकांची मांसाहार बंदी मागणी
३. मुस्लिमांचा विवाह कायदा , बुरखा कायदा
४. शिखांचा शस्त्र बाळगण्याचा कायदा
11 Sep 2015 - 11:45 am | विजुभाऊ
कोणि काय खावे-प्यावे हे ज्याचे त्याने ठरवावे असे असेल तर मग सरकारने शिगारेट , तंबाखू , मद्य , गांजा अफू चरस या वर बंदी सरसकट बंदी कशासाठी घालावे.
( माझा मांसाहार बंदी ला विरोधच आहे)
11 Sep 2015 - 11:55 am | प्रसाद गोडबोले
कपिलमुनी मी हेच म्हणत आहे . सेक्युलॅरिझम हा गुण फक्त भारतीय धर्मातच आहे म्हणजे हिंदु बौध्द आणि जैन . ह्या धर्माच्या लोकांच्या बहुसंख्यते मुळेच भारत देश सेक्युलर राहिला आहे अन्यथा आपल्यात आणि अन्य धर्मांध देशात फरक राहिला नसता .
पण ह्या धर्मांमुळे भारत सेक्युलर राहिला , त्यांनाच त्यांची धार्मिक धोरणे राबवता येत नाहीत म्हणुन म्हणालो कि सेक्युलॅरिजह्म त्यांच्याच मुळावर उठले आहे .
आता सोपा विचार करा : पाकिस्तान ने धर्माच्या आधारावर स्वतंत्र देश मागुन घेतला , त्यांच्या देशात पोर्क मिळावे म्हणुन आपण आंदोलन करतो का ? नाही ! थोडक्यात "त्यांनी" त्यांची धार्मिक धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले .
असेच जर जैनांनी त्यांचा स्वतंत्र देश मागुन घेतला असता तर त्यांनाही त्यांच्या श्रध्दा , त्यांची धार्मिक धोरणे आनंदाने राबवता आली असती ना !
सेक्युलर राहुन काय फायदा झाला त्यांचा ?
असो.
9 Sep 2015 - 5:08 pm | थॉर माणूस
अहो त्यांच्या देशात बंदीमुळे पोर्क मिळाले नाही तर मग इथे चार दिवस पोर्कसक्ती लागू करा ना, मांसबंदी करून पायावर धोंडा कशाला मारताय? :)
9 Sep 2015 - 5:08 pm | फुलथ्रॉटल जिनियस
हिंदूमधले काही ब्राह्मण सोडले तर कोण चातुर्मास पाळते हल्ली, बायका असतात धार्मिक ,त्या काही प्रमाणात पाळतात, पण ब्राह्मणेत्तर पुरुषांना श्रावणातच खायची हुक्की जास्त येते.त्यामुळे ते सक्तीच्या भानगडीत कधीच पडले नाहीत,
आजकाल नवीन नॉनव्हेज हॉटेल निघाले कि तिथे उद्घाटनालाच ब्राह्मण असतात म्हणे, सदाशिव पेठेत निघालेली पुरेपुर कोल्हापुर,कोल्हापुरी रस्सा मंडळ हि हॉटेल त्यातीच द्योतके आहेत, यात ब्राह्मणांवर टिका करायचा उद्देश नाही, पण हिंदूंचे धार्मिक नेतृत्व करणारे ब्राह्म्ण व स्वतः हिंदूंच भ्रष्ट झाल्याने ते इतरांवर मांसबंदी घालण्याच्या नैतिक स्थीतीत नाहीत.
9 Sep 2015 - 5:11 pm | प्यारे१
शतक होणार आहे ओ. एवढी का काळजी करताय?
9 Sep 2015 - 5:17 pm | कपिलमुनी
केला ना कबूल !
झाला तर मग ! घ्या पाया सूप , नंतर वजडी आणि मुंडी जेवायला
9 Sep 2015 - 6:20 pm | सुबोध खरे
फुलथ्रॉटल जिनियस
ब्राह्मणेत्तर पुरुषांना श्रावणातच खायची हुक्की जास्त
स्वतः हिंदूंच भ्रष्ट झाल्याने
हे आपण कोणत्या आधारावर ठरवले?
का अशीच विचारांची पिंक टाकलीत ?
8 Sep 2015 - 9:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
चर्चा मीरा-भायंदर महानगर पालिकेकडून चालू होऊन आय्सीस पर्यंत पोचली..
8 Sep 2015 - 9:19 pm | फुलथ्रॉटल जिनियस
डायनॉसॉरस का नष्ट झाले ' या चर्चेतही हिंदुत्ववादी गांधी नेहरु यांना घुसडु शकतात,तर आयसिस आणि मिरा भाइंदरच काय घेऊन बसलात माइसाहेब
8 Sep 2015 - 9:50 pm | पीके
डायनासॉर का नष्ट झाले हे ओळ्खेल तो सुज्ञ बाकी या जागात इसीस सार्खे डाय्नासोर फक्त आपलं अस्तित्व दखवण्यापुर्तेच येतात आणि न्स्ष्ट होतात हे लक्ष्त ठेवा
8 Sep 2015 - 10:06 pm | संजय पाटिल
जरा उघ्डुन सांगाल का?
8 Sep 2015 - 11:41 pm | लिओ
जर सर्व मांसाहारी एका क्षणात शाकाहारी झाले, आणि त्यामुळे जर शाकाहारी अन्न/पदार्थ पुरवठा व मागणी यात तफावत झाली तर मुळचे शाकाहारी किती दिवस उपवास करतील.
जिओ और जिने दो.
9 Sep 2015 - 12:46 am | गणामास्तर
सर्वांनी एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवला पाहिजे. पर्युषण पर्वात ईतर धर्मियांनी जैन समाजाप्रती सदभावना म्हणून मांसाहार न करता फक्त गरम पाणी पिवून उपास करावा. बकरी ईद ला जैन धर्मियांनी बोकडाची कुर्बानी देऊन हलीम वगैरे चापावे. हाकानाका.
9 Sep 2015 - 4:39 am | अनन्त अवधुत
+१
9 Sep 2015 - 8:37 am | अविनाश पांढरकर
+१००
9 Sep 2015 - 8:21 am | सुबोध खरे
+100
9 Sep 2015 - 9:11 am | अत्रुप्त आत्मा
हा सगळा मोदीसरकारचा करिष्मा आहे. ते भाजपलाही खुष ठेवणार.. आणि इतरांनाहि! प्रत्येक धर्मात जो जो गाढवपणा आहे, त्याला मधून मधून अशीच सूट/सवलत देणार. हुशार राज्यकर्ते जनतेच्या देवभोळे पणाचा फ़ायदा उचलण्यास कध्धिही चुकत नसतात..
आपणही त्यांना सहाय्यभूत होऊन चातुर्मासात कांदा लसूण वांग विक्रिवर बंदि आणायचि मागणी केलि पाहिजे. नाही का?
(खंरं)सेक्युलर शासन ज्याला खायचय त्याची उपेक्षा करत नसत,ज्याला न खायचय त्याला खाण्याची बळजबरि / आग्रहहि करत नसतं. यात कोणाचिहि गैरसोय होत नाही.
उलट धर्मवादाला बळि पडलेलं अथवा त्याच्या वापराला तयार- असलेलं शासन , हे अशा प्रकारचे "त्या त्या समाजाना बरं वाटणारे" निर्णय घेऊन त्या त्या समाजाचा फ़ायदा उठवायच्या त-यारित नेहमी असतं..
आपण यात कोणाला उचलून धरायचं? हा साधा निर्णय सूज्ञपणे आपल्याला घ्यायचा आहे.
जैनांच्या बाजूनी दिलेल्या निर्णयाचा मी अनेकवार निषेध करतो.. आणि "त्यानाही गटारात लोळू द्या आम्हीही लोळणार !" ह्या टनाटनि मानासिकतेचा धिक्कार!!!
9 Sep 2015 - 10:23 am | गॅरी ट्रुमन
ही बंदी नक्की कधीपासून आहे याविषयी थोडा संभ्रमच निर्माण झाला आहे. कारण इंडिअन एक्सप्रेसमधील या बातमीत म्हटले आहे की अशी बंदी १९६४ पासून आहे!!
या निर्णयाचे मेरीट-डिमेरीट जे काही असतील ते असतील पण या निमित्ताने जैन धर्मियांचा दहशतवाद वगैरे म्हणणारेच लोक "Terror has no religion" असे म्हणताना दिसतात याचीही जरा मौजच वाटली. (शेफाली वैद्यच्या फेसबुक पेजवरून साभार)
9 Sep 2015 - 10:48 am | याॅर्कर
पुढच्या वेळेस भाजप हारणार 'ही काळ्या दगडावरची पांढरी रेष'
(जर हे असेच चालू राहिले तर)
10 Sep 2015 - 2:09 pm | dadadarekar
तुमच्या तोंडात चिकन पडो
10 Sep 2015 - 2:21 pm | खटपट्या
चिकन नाही बीफ म्हणा बीफ...
10 Sep 2015 - 2:24 pm | प्यारे१
कच्चं च????
11 Sep 2015 - 11:50 am | खटपट्या
आता, ते कसं खातेत ते म्हाईत नाय...
10 Sep 2015 - 6:53 pm | प्रदीप साळुंखे
यापूर्वीही काॅग्रेसच्या काळात दोन दिवसांसाठी वगैरे अशी बंदी होती म्हणे पण तेव्हा प्रसारमाध्यमे झोपा काढत होती.
9 Sep 2015 - 11:47 am | गॅरी ट्रुमन
याविषयी नवीन नवीन दावे येत आहेत त्यामुळे संभ्रमात भरच पडत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून केरळ सरकार रमझानच्या महिन्यात शाळेत 'मिड डे मिल' देत नाही आणि २००८ मध्ये दस्तुरखुद्द मार्कंडेय काटजूंनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना अशी तात्पुरती बंदी घालणे कायद्याला धरून आहे असे म्हटले होते असा दावा भाजपच्या संजू वर्मा यांनी केला आहे. याविषयी अधिक ट्विटरवरील https://twitter.com/IndiaToday/status/641289247106793472 हा व्हिडिओ. या दाव्याच्या सत्यतेविषयी कोणाला माहित आहे का?
हा दावा खरा असल्यास या प्रकरणामागे पराचा कावळा करण्यामागे नेहमीप्रमाणे प्रेस्टिट्यूट आहेत असे दिसते. जर अशी बंदी गेल्या कित्येक वर्षांपासून असेल आणि इतकी वर्षे त्याचे बातम्यांमध्ये नामोनिशाणही नसेल पण नेमके आताच होणे, केरळमध्ये रमझानच्या महिन्यात मिड डे मील वर बंदी असेल तरी त्याची अजिबात वाच्यता न होणे पण मुंबई आणि मीरा-भाईंदरचा प्रश्न मिडियामध्ये प्राधान्याने येणे या सगळ्यात काहीतरी काळेबेरे असावे असे दिसते. याच मंडळींनी मागच्या वर्षी कुठल्या तरी कॅन्सरच्या औषधाची किंमत ६ हजारवरून १ लाख वर गेली, कुमारी मातांना त्यांच्या मुलांचा पासपोर्ट काढताना त्यांच्यावर बलात्कार झाला होता की नाही याची माहिती देणे आता बंधनकारक झाले आहे वगैरे कंड्या बेमालूम पसरवून दिल्या होत्या. लगोलग अनेक फेसबुकींनी शहाजोगपणे 'हेच का ते अच्छे दिन' असा प्रश्नही विचारला होता. पण या सगळ्या बातम्या खोट्या होत्या हे स्पष्ट झाल्यावर ही सगळी मंडळी पळून गेली होती (अपेक्षेप्रमाणे)--कारण या लोकांना खरी परिस्थिती काय आहे हे शोधून काढण्यात इंटरेस्ट नसतोच मुळी. यांचा इंटरेस्ट नुसती मोदींवर टिका करण्यात असतो!! हा प्रकार पण त्यातलाच आहे की काय ही शंका येऊ लागली आहे.
मला वाटते कोणत्याही धार्मिक सणासाठी कोणावरही सक्ती करू नये. कितीही मोठी एकादशी येऊ दे, पर्यूषण येऊ दे, रमझान येऊ दे, ज्यांना तो मानायचा आहे त्यांनी तो मानावा आणि धार्मिक कृत्ये जी काही असतील ती करावीत पण ज्यांना त्यावर विश्वास नाही त्यांना तो न ठेवायचा अधिकार आहे आणि असलाच पाहिजे. कुणावरही सक्ती होता कामा नये. तीच भारतीय परंपराही आहे आणि तसे करणेच योग्य आहे.
9 Sep 2015 - 6:27 pm | सुबोध खरे
कुणावरही सक्ती होता कामा नये. तीच भारतीय परंपराही आहे आणि तसे करणेच योग्य आहे.
+१
9 Sep 2015 - 3:30 pm | माहितगार
शाकाहार असो अथवा मांसाहार, जिथ पर्यंत विज्ञानाचा संबंध आहे अन्नपदार्थाचे विघटन चयापचय क्रिया एक सारख्या होत असाव्यात, मांसाहार आणि शाकाहारात मुख्य फरक मांसाहारातून अधिकच्या मिळणार्या प्रोटीनच्या मात्रेचा आहे (डॉक्टर लोकांनी यात चूक असल्यास सुधारावी).
सात्वीकता ही वैचारीक प्रक्रीया मेंदूतून होत असेल आणि आहाराचा आणि मेंदूचा प्रोटीनच्या मात्रे मुळे पडणार्या फरका पलिकडे संबंध नसेल तर १) आहारातून मिळणार्या अधिक प्रोटीन्समुळे सात्विकता कमी होते आणि हिंसकवृत्ती वाढते असे असेल तर अ) अधिक प्रोटीन्स खाणार्यांची सात्वीकता कमी होते आणि तामसवृत्ती वाढते हे साधार सिद्ध करावयास हवे, ब) असा दावा करणार्यांनी शाकाहारी प्रोटीन्सपण खाणे वर्ज्य केले पाहीजे
२) दुसरा आ़़क्षेप उग्र वासाचा असतो, अधिक उग्र वास घेणार्या व्यक्ती पदार्थ न खाता असात्विक आणि तामस होतात आणि त्याच परिस्थितीत उग्रवासही न घेणार्या व्यक्ती असात्विक आणि तामस व्यवहार करतच नाहीत हे निष्पक्षपणे साधार सिद्ध व्हावयास हवे.
३) मांसाहार खाणार्याच्या अन्न ग्रहण करताना प्राणी कापल्याचे इमॅजीनेशन येते म्हणून तो हिंसक होतो असे नसावे दही भात खाणार्या शाकाहारी माणसाला तांदळाच्या दाण्यांच्या पुर्नरुत्पाददन आणि पाडसाला दूध कमी पडल्याचे आणि आपल्या कडून तांदळाच्या भावी रोपावर अथवा पाडसावर अन्याय झाल्याचे जसे येत नाही तसेच मांसाहारी माणसास कत्तलखान्यात काय चालू आहे याचे दृष्य शाकाहारी माणसाच्या कल्पनेत येते त्या पेक्षा अधिक येत नसावे पण तो शाकाहारी माणसांचा गोड गैरसमज आहे.
४) प्रोक्रीएशन आणि प्राण्यांच्या भावी पिढीवरील अन्याय. प्रामाणिक पणे सांगावयाचे झाल्यास झाडावरून खाली पडलेल्या फळाचे इतर कोणत्याही सजीवाने ग्रहण केले नाहीतर प्रत्येक बी जमीनीत पेरून केवळ अशा फळाचा गर तेवढा खाणे हा एकमेव शुद्ध शाकाहार आहे बाकी सर्व प्रकारचे आहार कोणत्या ना कोणत्या प्रकारे इतर सजीवांवर अन्याय करतातच करतात. हे तत्व बहुतांश शाकाहार्यांनी लक्षात घेतलेले नसते. त्या अर्थी त्यांनी सजींवाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हनन केलेलेच असते त्यामुळे तत्वतः ते कोणत्याही मांसाहार्या पेक्षा श्रेष्ठ ठरत नाहीत.
वरच्या प्रतिसादात ब्याटमन म्हणतात तसे खाण्याच्या पदार्शांचा आणि सात्विकतेचा मुलतः संबंध असण्यास कोणताही वैज्ञानिक अथवा तार्कीक आधार दिसत नाही. जगात जेथे जेथे शांततेचा प्रसार करणारा बौद्ध धर्म गेला त्यातील बहुतांश प्रदेशात मांसाहार होत असावा. पण त्यांच्या सात्विकतेत त्यामुळे कमतरता अथवा वाढ दोन्हीही होत नसावे.
धर्मसंस्थांनी मुख्य उद्देशास सोडून गरजेपेक्षा परिघाबाहेरील व्यक्ती, कुटूंब, समुह, राज्य यांच्या आहारातील हस्तक्षेपास श्रद्धेची जोड देण्याचे अधिकतममुल्य एक कर्मकांड, व्यक्ती, कुटूंब, समुह, राज्य व्यक्तीस्वांतत्र्यातील धर्मसंस्थेने टाळण्या जोगा हस्तक्षेप या पलिकडे कितपत जाऊ शकते या बाबत मी साशंक आहे. मुख्य म्हणजे व्यक्ती आणि समाजात मानसिक दुरावा निर्माण करणार्या आहार विषयक अटी धर्मसंस्थेच्या सहीष्णूता आणि मानवतेच्या तत्वांना धरून असू शकतात का या बद्दल मी साशंक आहे.
आणि एवढे विवेचन करूनही काही स्थितीत मी व्यक्तीगत पातळीवर मांसाहार न करण्यास सहमत असू शकतो त्या मागचा तार्कीक मुद्दा प्रतिसाद क्रमांक २ मध्ये देतो.
9 Sep 2015 - 3:53 pm | माहितगार
कोणत्याही धर्माने सांगीतले म्हणून नव्हे तर एक सजीव म्हणून जीवो जीवस्य भोजनम हे तत्वही मी समजून घेऊन स्विकारतो त्याच वेळी एक सजीव म्हणून मी तत्वतः भूतदया मानतो आणि म्हणून सजीवांचा विणीचा (मेटींगचा) काळ, किंवा मैथून ते पाडस अंगावर आहे त्या काळात प्राण्यांप्रती किमान स्तराची भूतदाया बाळगावी आणि हा काळ अधिकतम सजीवांसाठी विशीष्ट ऋतूत पडत असेल जसेकी भारतात पावसाळा तर प्रदेश परत्वे ऋतूस अनुसरून मांसाहार टाळणारे चतुर्मासाचे अनुसरण भूतदयावादी आणि तर्कपूर्ण वाटते. जसे कि मासेमारी करणार्यांना पावसाळ्यात मासेमारी करण्यापासून परावृत्त केले जाते. हे मांसाहार करणार्यांसाठी सुद्धा सयुक्तीक आहे की जेव्हा मुबलक शाकाहार उपलब्ध आहे तेव्हा अधिकतम भूतदया दाखवावी, (किमान पक्षी स्वतःच्या स्वार्थासाठी भूतमात्रांना आधी वाढीची संधी द्यावी मग खावे :) )
(मी स्वतः चतुर्मासातही माझ्यासमोर मांसाहार आल्यास नाही म्हणत नाही हि बाब वेगळी, पण म्हणून इतरांनी तार्कीक बाजू कोणती हे समजून घेऊनये असे नव्हे)
दुसरी बाजू देशाच्या दृष्टीने आर्थीक आहे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रदुषण वाढवणार्या, आणि परकीय चलनाची गंगाजळी आटवणार्या एनर्जींवर चालणार्या टृक्टर्स पेक्षा बैलादी प्राण्यांवर जेवढी म्हणून शेती होऊ शकते त्याचे समर्थन केले पाहीजे हे मला तर्कपूर्ण वाटते.
तिसरी बाजू मांसाहार करणार्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मात्र अंशतः लंगडा यासाठी आहे की जिवनाचे स्वांतत्र्य जे तुम्हाला हवे आहे ते इतर भूत मात्रांनाही हवे आहे. पण म्हणून शाकाहारी लोकांच्या टोकाच्या भूमिका सुद्धा ग्राह्य ठरतात असे नव्हे. समतोल साधण्याच्या दृष्टीने राजसंस्थेचा मानवी आहारसाखलीतील तर्कपूर्ण हस्तक्षेप योग्यही असू शकतो
9 Sep 2015 - 6:30 pm | सुबोध खरे
प्रोटीन साठी मांसाहार करायची गरज अजिबात नाही. बाकी ज्याला जे रुचेल आणि पचेल ते त्याने खावे. सक्ती नसावी.
पृथ्वीवरील सर्वात मोठे तीन प्राणी हे पूर्ण शाकाहारी आहेत. हत्ती, गेंडा आणि रान रेडा किंवा हिप्पो
पहा
http://www.healthaliciousness.com/articles/foods-highest-in-protein.php
9 Sep 2015 - 7:17 pm | माहितगार
नाही मुख्य मुद्दा हा आहे की मांसाआहार पोटात गेल्याने नेमकी अशी कोणती (विज्ञानाच्या निकषांवर स्विकार्य) क्रिया होते की ज्याने तामसवृत्ती वाढावी ?
एनी वे आपण विषयातले जाणकार आहात म्हणून कुतूहल म्हणून दाळी कडधान्ये न खाणार्या शाकाहारी प्राण्यांची प्रोटीन्सची गरज कशी भागवली जाते ?
त्यांना खाता येणार्या गोष्टी माणसांना खाता आल्यातर दोन गोष्टी होतील १) वाढत्या लोकसंख्येच्या आहाराचा खास करून शाकाहारी वर्गातील माणसांपुढचा मोठाच प्रश्न सुटू शकेल २) हत्ती, गेंडा आणि रान रेडा किंवा हिप्पो यांच्या आहारावर माणसाने आक्रमण केल्यास त्यांच्या उरल्या सुरल्या अस्तीत्वाचा प्रश्न अधिक गंभीर बनेल :) (ह. घ्या.)
9 Sep 2015 - 7:29 pm | फुलथ्रॉटल जिनियस
पृथ्वीवरील सर्वात मोठे तीन प्राणी हे पूर्ण शाकाहारी
आहेत. हत्ती, गेंडा आणि रान रेडा किंवा हिप्पो
पहा>>>>>>>> डॉक्टर, कशाला बुद्धीभेद करत आहात? , पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी ब्लू व्हेल हा आहे, आणि तो फक्त मांसाहार करतो, क्रिल हा झिंग्यासारखा प्राणि त्याचा मुख्य आहार आहे.
9 Sep 2015 - 8:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मासे आणि प्राणी ह्यामधला फरक जरा अभ्यासणार काय? सायंशिक्षा वर्ग पॉनसर करतो हवं तर.
10 Sep 2015 - 2:17 pm | dadadarekar
मासे हे प्राणी आहेत.
सजीवाम्चे दोन मुख्य प्रकार आहेत.
प्लेंट किंग्डम
अॅणिमल किंग्डम
9 Sep 2015 - 7:41 pm | सौंदाळा
डॉक्टर यावरुन एक प्रसंग आठवला,
माझ्या आईची शस्त्रक्रिया (लिझारोव फिक्सेटर) झाल्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर (रानडे) म्हणाले : प्रोटीन साठी मांसाहार करायची गरज अजिबात नाही. त्या डॉक्टरांकडे नंतर फॉलोअपसाठी जाणे शक्य नव्हते म्हणुन त्यांनी आमच्या जवळचे दुसरे डॉक्टर (पाटील) सुचवले. पहिल्याच भेटीत त्यांनी आईला विचारले: काय चिकन, मटण खाता की नाही? खात जावा.
सांगायचा उद्देश बर्याच माणसांना आपण शाकाहारी / मांसाहारी असलो की बाकीचे पण शाकाहारी / मांसाहारी असावे असे वाटते
(आईसाठी प्रोटीनपॅक्ड खेकडे आणणारा) सौंदाळा
9 Sep 2015 - 8:24 pm | सुबोध खरे
सौंदाळा साहेब,
माझी एक रुग्ण जिला चिकन जीव कि प्राण होतं. तिने आपले वडील गेल्यावर त्यांची आठवण म्हणून चिकन (मटण, मासे सगळं सामिष) सोडलं. वडिलांच्या जाण्याने तिची प्रकृती फारच खराब झाली होती अशा स्त्रीला दुसरे चागले निरामिष पर्याय सुचवणे हे डॉक्टर म्हणून तुमचे कर्तव्य असते. मुंबईत बरेच जैन रुग्ण पण येतात.
तिसरी गोष्ट म्हणजे गरीब रुग्ण-- ज्यांना बाजरी २२ % प्रोटीन आणि कडधान्ये(२०-४५% प्रोटीन) परवडू शकतात फारतर अंडे. अशा रुग्णांना आपण चिकन खा ( १४० रुपये किलो) (मटण तर ४००-४५० रुपये आहे) कोणत्या तोंडाने सांगायचे.
एक आठवण -- पुण्याला असताना एक गरीब मजूर स्त्री जिचा मुलगा कुपोषणाची शिकार होता. त्या स्त्रीचा नवरा दारू पित असे. घरात मुलासाठी चिकन केले तर हाच एकटा हादडत असे.( केले नाही तर बायकोला मारत असे). अशा स्त्रीला आमच्या सरांनी बाजरीची भाकरी, मटकी / मुगाची उसळ आणि गूळ ( लोह मिळण्यासाठी) खायला सांगितले होते आणि सकाळी एक अंडे उकडून( जेंव्हा नवरा झोपलेला असे). मुलगा दोन महिन्यात बराच सुधारला होता.
9 Sep 2015 - 8:32 pm | सुबोध खरे
१०० +
बाजरीत ११ % प्रोटीन असते २२% नव्हे
चुकी बद्दल क्षमस्व
9 Sep 2015 - 8:33 pm | प्यारे१
२ भाकरी खाल्ल्या तर ;)
10 Sep 2015 - 10:36 am | सौंदाळा
सहमत आहे डॉक
मलाही बाकी लोक शाकाहारी / मांसाहारी कसेही असा काही फरक पडत नाही.
पण अजुन एक म्हणजे घरात सगळे कट्टर मांसाहारी असुन छोटा मुलगा / मुलगी मांसाहार करत नाही (आवडत नाही) म्हणुन दु:खी झालेल्या आई-बाबांची मनस्थिती मांसाहारीच जाणोत. ;)
बाकी या धाग्याबद्दल म्हणाल तर बीफ, चिकन, मटण, मासे हा पकडणार्याचा, कापणार्याचा, विकणार्याचा आणि खाणार्याचा राजीखुषीचा सौदा असतो. ईतर लोकांचा यात संबंध यायचे काहीच कारण नाही. फक्त हे मांस विकायच्या जागांची ठिकाणे आणि तिथली स्वच्छता हा कळीचा मुद्दा आहे.
घरच्या मांसाहारासाठी २०-सप्टेंबरची आतुरतेने वाट बघणारा - सौंदाळा
9 Sep 2015 - 7:37 pm | होबासराव
प्रोटीन साठी मांसाहार करायची गरज अजिबात नाही. बाकी ज्याला जे रुचेल आणि पचेल ते त्याने खावे. सक्ती नसावी.
फु़जि उर्फ सिंथेटिक जिनियस्..डॉक ह्यांच वाक्य आपण पुन्हा एकदा वाचावे.
9 Sep 2015 - 8:01 pm | सुबोध खरे
डॉक्टर, कशाला बुद्धीभेद करत आहात?
जीनियस साहेब
मी दहा महत्त्वाच्या प्रथिने असलेल्या अन्नपदार्थांची यादी सुद्धा दुव्यात दिली आहे.त्यात पाच निरामिष आणी ५ सामिष पदार्थ आहेत.
शिवाय ज्याला जे पचेल किंवा रुचेल ते त्याने खावे असे म्हटले आहे बुद्धिभेद कुणाचा आणी कशाला करू?
जो रुग्ण शाकाहारी म्हणून माझ्याकडे येईल किंवा श्रावण आहे त्यानंतर १० दिवस घरात गणपती असतो त्यानंतर पंधरा दिवस श्राद्धपक्ष/ पितृपक्ष आहे तेंव्हा तेंव्हा मी सामिष खात नाही( शुक्रवारी माझ्या स्वागत सहायीकेच्या आईच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली जी असे दोन महिने सामिष खात नाही) त्याला मी काय निळ्या देव्माशाचे उदाहरण देऊ काय? शक्ती येण्यासाठी वर दिलेल्या पदार्थातील तुम्हाला जे पचेल किंवा रुचेल ते खा.
तुमच्या समाधानासाठी पृथ्वी ऐवजी जमिनीवर असा बदल करून घ्या. आणिक काय लिहिणे
यात बुद्धिभेद कुठे आला?
9 Sep 2015 - 8:06 pm | सौंदाळा
डॉक रॉक्स, फुजि शॉक्स
9 Sep 2015 - 8:33 pm | फुलथ्रॉटल जिनियस
@सुबोध खरे , आर यु सिरियस! कुठलाच शहाणा डॉक्टर 'पचेल रुचेल ते खा 'असे सांगणार नाही.नऊ गरजेची अमिनो ॲसिड्स आहेत, ज्यातली फक्त पाचच शाकाहारात सापडतात, बाकीच्या चार अमिनो ॲसिड्स साठी मांसाहार करावाच लागतो. त्यामुळे तुम्हाला एक तर माहिती दिसत नाही किंवा जैनांसारखे तुमचे शाकाहाराचे अजेंडे राबवत आहात.
9 Sep 2015 - 8:41 pm | सुबोध खरे
Every time legumes like beans, lentils, and peanuts are combined with grains like wheat, rice, and corn, a complete protein is born.
The term "complete protein" refers to amino acids, the building blocks of protein. There are 20 different amino acids that can form a protein, and nine that the body can’t produce on its own. These are called essential amino acids—we need to eat them because we can’t make them ourselves. In order to be considered “complete,” a protein must contain all nine of these essential amino acids in roughly equal amounts.
Yes, meat and eggs are complete proteins, and beans and nuts aren’t. But humans don’t need every essential amino acid in every bite of food in every meal they eat; we only need a sufficient amount of each amino acid every day
असे मूळ जीवरसायन शास्त्राचे पुस्तक म्हणते. एक तर मी शिकलो ते चुकीचे असेल किंवा आपले नवीन संशोधन असेल.
https://en.wikipedia.org/wiki/Complete_protein
9 Sep 2015 - 8:49 pm | सुबोध खरे
जाता जाता -- मी जैन नाही. मी सर्व तर्हेचे सामिष खातो. बीफ सुद्धा खाल्लेले आहे.( भारतात मिळणारे बीफ हे बर्याच वेळेस रोगी किंवा कुपोषित जनावरांचे असल्याने मी ते नियमितपणे खात नाही) माझा कोणताही छुपा किंवा उघड अजेंडा नाही. परंतु मी लोकांच्या मताचा आदर करतो एवढेच मला म्हणायचे आहे. आपल्याला कोणतीही सफाई द्यायची गरज नाही परंतु मी आपल्याही मताचा आदर करतो यासाठी हा प्रपंच.
माझा पहिला प्रतिसाद आपल्या वाचनासाठी परत देत आहे.
कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त ती कत्तल सार्वजनीक ठिकाणी करू नये. (उदा. उघड्यावर कुर्बानी देणे किंवा प्राण्यांचा बळी देणे.) अमुक धर्माच्या सणात त्यांनी वागावे तसेच वागावे हा आग्रह का?
बीफ वरील बंदी सुद्धा त्यात मोडते.( मी बीफ खात नसलो तरीही).
उद्या हे म्हणू लागतील कि श्रावण आहे तर सगळे कोंबडी वाले,मासे विक्रेते, खाटीकखाने आणि अंडी वाल्यांची दुकाने सुद्धा बंद असावीत.
यासाठी पर्युषणाच्या काळात खाटीकखाने बंद ठेवण्याचा निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. राजकीय फायद्यासाठी कोणत्याही धर्माला झुकते माप देणे हे चुकीचे आहे.कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त ती कत्तल सार्वजनीक ठिकाणी करू नये. (उदा. उघड्यावर कुर्बानी देणे किंवा प्राण्यांचा बळी देणे.) अमुक धर्माच्या सणात त्यांनी वागावे तसेच वागावे हा आग्रह का?
बीफ वरील बंदी सुद्धा त्यात मोडते.( मी बीफ खात नसलो तरीही).
उद्या हे म्हणू लागतील कि श्रावण आहे तर सगळे कोंबडी वाले,मासे विक्रेते, खाटीकखाने आणि अंडी वाल्यांची दुकाने सुद्धा बंद असावीत.
यासाठी पर्युषणाच्या काळात खाटीकखाने बंद ठेवण्याचा निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. राजकीय फायद्यासाठी कोणत्याही धर्माला झुकते माप देणे हे चुकीचे आहे.
9 Sep 2015 - 8:15 pm | होबासराव
शिवसेना सुद्धा असल्या कुठल्याहि बॅन च्या विरोधात आहे :- उद्धव ठाकरे
9 Sep 2015 - 8:22 pm | विकास
आज जे काही बातम्यांमधे दिसते आहे आणि जे वर ट्रूमनसाहेबांनी सांगितले आहे त्यावरून हा ठराव काँग्रेसच्या काळात घेतला होता असे दिसते आणि त्याला आता काँग्रेस (आणि शिवसेना देखील) विरोध करताना दिसते. त्यात राज्य सरकारचा संबंध देखील दिसत नाही... तरी देखील, भाजपाने ह्या निर्णयापासून फारकत घेयला हवी होती. पण सगळ्यांच्याच बाजूने नेहमी प्रमाणेच, "All politics is local" चालू आहे झाले.
मला स्वतःला असली कुठलीच बंदी मान्य नाही... (त्यात खात नसलो तरी बीफ देखील आले). पण माझ्या लेखी या चार दिवसाच्या बंदी पेक्षा गंभीर मुद्दा आहे तो विशिष्ठ सोसायट्यांमधे मटण-मांस खाणार्यांना जागा अधिकृत पणे नाकारायच्या पद्धतीला. ज्यामुळे मी २-३ वर्षांपूर्वी ऐकल्याप्रमाणे मुंबईत कोळी समाजाला काही ठिकाणी घरे मिळत नव्हती... हे कायद्याला धरून होऊ शकत नाही. जात आणि धर्म यावर सोसायट्या तयार करण्यावर बंदी घातली पाहीजे. त्याच बरोबर आपल्या पाककृतीमुळे जर इतरांना त्रास होत असला तर तो करताना कमीतकमी कसा त्रास होईल हे देखील समजून सर्वांनी केले पाहीजे असे वाटते.
10 Sep 2015 - 12:12 pm | अनिरुद्ध.वैद्य
योग्य मुद्दा विकास! हे जागा न देण्याचे प्रमाण मुंबईत फार वाढत चाललेत.
9 Sep 2015 - 8:42 pm | विकास
कारण काही असुंदेत पण जर एखाद्या गटाला धर्म-पंथ आधी कारणावरून सुखवायचे असेल तर बंदी घालण्यापेक्षा कॅनेडीयन सरकार सारखे करावे...
कॅनडा सरकार / टांकसाळीने दिवाळीच्या निमित्ताने स्पेश्शल सोन्याची नाणी काढली आहेत आणि ते ती कॅनेडीयन $२,६९९.९५ अथवा दुसरे स्वस्त (तरी देखील) कॅनेडीयन $७९.९५ ला विकत आहेत. पब्लीक पण खुष सरकार पण खुष! :)
10 Sep 2015 - 12:17 pm | द-बाहुबली
सुरेख.
10 Sep 2015 - 1:13 pm | तिमा
मीट ना मिला रे मनका!
10 Sep 2015 - 9:55 pm | ट्रेड मार्क
Indian Express मधील लेखातील काही परिच्छेद -
Is it a new ban? No. It has been in force since 1964, when the BMC passed a resolution directing a two-day prohibition on sale of meat in deference to the demands by Jains, a powerful community which holds many stakes in business and industry in Mumbai.
In 2004, the Congress-NCP government passed another resolution endorsing the two-day ban. Since then, the ban has been extended to four days across Mumbai every September. “Two days are according to the 1964 BMC resolution and two on account of the state’s 2004 resolution,” said a senior BMC official.
The Congress has done a U-turn. Having passed the state government resolution supporting the two-day ban in 2004, it is now opposing it. Sanjay Nirupam, president of the Mumbai unit of the Congress, has termed the BMC’s ban “undemocratic”. “Though religious sentiments should not be hurt, other communities should not be deprived of their daily meals. We condemn this decision,” he said. Why the brouhaha now if it has been an annual affair for 41 years? Simply because this year, it comes just six months after the Maharashtra government’s controversial decision to ban the sale of beef in the state. While the slaughter of cows was previously prohibited in the state under the Maharashtra Animal Preservation Act of 1976, the implementation of the ban means that bulls and bullocks cannot be slaughtered for meat either. Anyone found to be selling beef or in possession of it can be jailed for five years and fined Rs 10,000. In the light of the controversial beef ban, the 41-year-old seasonal ban on mutton and chicken is also raising eyebrows.
Read more at: http://indianexpress.com/article/explained/simply-put-why-mumbai-will-be...
10 Sep 2015 - 10:44 pm | अनुप ढेरे
कहर म्हणजे मुंबै महापालिकेने सुद्धा हा निर्णय घेतला आहे. जिथे शिवसेना सत्तेत आहे. आणि शिवसेनाच आता विरोध करतिये!
11 Sep 2015 - 11:25 am | तिमा
एका जैन कुटुंबाच्या पार्टीला एका हॉटेलमधे गेलो होतो. मित्रपरिवार व लहान मुले धरुन १०-१२ जणं होतो. खाण्याची ऑर्डर देऊन झाली होती. लहान मुले मस्ती करत होती. मुलांच्या समोर मेन्यु कार्ड पडलेली होती. ईंग्रजी शाळेत जाणारी मुलं ती! तिथेच जाहीर वाचन सुरु झाले. मधेच एका पानावर, चिकन चाऊ चाऊ आणि तत्सम लिस्ट सुरु झाली. त्या मुलांच्या आई-वडिलांचे चेहेरे गोरेमोरे झाले. त्यांनी दटावलं. पण मुले कुठली ऐकायला ? शेवटी एका मुलाच्या आईने लगबगीने उठून, ती मेन्यु कार्डे काढून घेतली. बाकी सारे आश्वस्त झाले पण त्या लिस्टचे आयटेम्स कानावर पडल्यावर माझ्या तोडाला पाणी सुटले.
11 Sep 2015 - 11:34 am | सौंदाळा
तिमा काका मी तर मुंबईत जैन चिकन मिळते असे ऐकले होते (कांदा-लसुण न घालता केलेले) :)
खखोदेजा
11 Sep 2015 - 11:51 am | विजुभाऊ
कोणत्याही धर्मावर टीका नाही मात्र "अहिंसा" या शब्दाचा गैर अर्थ लावत जीव हत्या होते म्हणून घरातील झुरळे , ढेकूण न मारणारे , पर्युषण काळात तोंडातील जंतुंची हत्या होते म्हणून तोंड न घासणारे जैनबांधव पहिल्यावर तर मी माझेच डोके ठिकाणावर आहे का हे तीन चार दा हात लावुन पाहिले होते.
11 Sep 2015 - 3:41 pm | श्रीगुरुजी
कोणत्याच स्वरूपातील मांसाहार करीत नसल्याने अशी बंदी ८ दिवसांऐवजी कायमस्वरूपी असावी अशीच इच्छा करतो!
11 Sep 2015 - 8:39 pm | मराठे
मूर्खपणाचा कळस असं म्हणणार होतो, पण लोकांचं काही सांगता येत नाही. या ही पेक्षा जास्त मूर्खपणा करून दाखवतील. (काही काही प्रतिक्रियांवरून हे दिसतंच आहे)