Skip to main content

"ना खाऊंगा , ना खाने दूँगा"

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 08/09/2015 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर नेटिझन्समध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. माझ्या मनात ही काही प्रश्न निर्माण होत आहेत मटनावरील बंदी ही मूर्खपणाची, निरुपयोगी आहे का? मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का ? मुंबईमध्ये फक्त जैन समुदायाची नव्हे तर सर्व समुदायाची लोक राहतात . मग इतरांवर बंधने का? भारतामध्ये विविधतेत एकता आहे. मात्र सरकार विविधतेवर बंदी घालत आहे. अच्छे दिन हे आहेत का ?

वाचने 19180
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

मायला असल काही खर असेल तर रमजानच्या काळात दिवसभर उपाशी रहाव लागल नाही म्हंजे मिळवली......... . . . . . अवांतरः- मी पयला फ्यासन गेली की काय???

In reply to by नाव आडनाव

रमझानच्या काळात एकदा कुवैत ला जाणे झाले होते. तिथे दिवसाच्या काळात बाजारात किंवा ऑफिस मध्ये किंवा इतर कुठेही काही ही खायला प्यायला मिळत नसे.. माझा मुक्काम पंच तारांकित हॉटेल मध्ये असल्याने माझी पोटपूजा फक्त तेथे होऊ शकत होती . रोझा चा उपवास सोडताना सर्व मुस्लिम बांधव हमखास मांसाहार करतांत.

In reply to by रमेश आठवले

अनुभवः मुस्लिम लोक उपवास सोडताना खजुर खाऊन आणि पाणी पिऊन उपास सोडतात. नंतर फळं. त्यानंतर लगेच मांसाहार करत नाहीत. नमाज पढून आल्यावर जेवण करतात. त्यात मांसाहार शक्यतो असतो. दिवसभर अन्न पाणी काहीही नसतं.

In reply to by प्यारे१

माझ्या माहितीप्रमाणे निदान हैदराबाद मध्ये तरी रोजा चा उपवास सम्पल्यावर हालिम नावाचा मटनाचा प्रकार जेवणात असतो. गव्हाचा जाडा रवा आणि मटन दिवसभर एकत्र शिजवून हा पदार्थ बनवतात .

मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का ? >> मी काय प्यावे ह्यावर सरकार नियंत्रण ठेवते तर काय खावे ह्यावरदेखील सरकार नियंत्रण ठेवू शकते :)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

+१ ड्राय डे सुद्धा बंद व्हायला हवेत. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ला ड्राय डे ठेवून नेमकं काय मिळतं कुणास ठाऊक. आधीच्या दिवसात कधीही 'स्टॉक' मिळतो च की.

In reply to by प्यारे१

अहो इथ शोधून देव सापडतो "स्टॉक" काय चीज आहे

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का ? >> मी काय प्यावे ह्यावर सरकार नियंत्रण ठेवते तर काय खावे ह्यावरदेखील सरकार नियंत्रण ठेवू शकते :) प्रतिसाद द्या मि काहिही खाल्यावर / पिल्यावर .... किती आणि कसा पो टाकावा यावर पन सर्कार नियंत्रण ठुनार का??? . . . . कन्फुज्ड बाबा......

तद्दन मूर्खपणा आहे. अगोदरच्या काळातही जैनांची असली दहशत पहावयास मिळालेली आहे. व्हेजिटेर्यन लोक सात्त्विक का कायतर असतात असे समजायचे लोक अगोदर, असला शाकाहारी दहशतवाद पाहून ती उरलीसुरली समजूतही धुळीला मिळाली.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

हिटलर शाकाहारी का काय ते होता म्हणे वॉट्स अ‍ॅप / सोशल मिडीया ग्यान ना? वॉट्स अ‍ॅप वर येणारी प्रत्येकच गोष्ट खोटी असते असं वाटायला लागलंय आज काल....

In reply to by असंका

नै नै. हिटलर नंतर नंतर खरेच शाकाहारी झाला होता. तो आणि त्याचे क्लोज असलेले नाझी अधिकारी यांच्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे त्यांपैकी अनेकांना माणसे मारताना काही वाटत नसले तरी प्राण्यांच्या हालअपेष्टा आवडत नसल्याने कैकजण व्हेज होते. कंबोडिया देशातला क्रूरकर्मा पोल पॉट हाही शुद्ध शाकाहारी होता. त्यानेही लाखो लोक मारले. तेव्हापासून शाकाहाराच्या सात्त्विकतेचे कौतुक सांगणार्‍यांना "हो का, बरं बरं, हिटलरही शाकाहारी होता" असे सांगावे वाटते.

In reply to by बॅटमॅन

ब्याटम्याना, हिंदूंनी बिफला घातलेल्या बंदीला तुझा पाठिंबा असेलच!!!! जैनांना शिव्या टाकायच्या आणि मुस्लिम बांधवांना बीफ खाण्यापासून रोखायच, हि दुटप्पी भूमिका कशासाठी?

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

बीफबंदीला माझा पाठिंबा नाही. बायदवे फक्त मुसलमानच नव्हे तर केरळ-तमिळनाडूतील काही हिंदू जातीही पारंपरिकरीत्या बीफ खातात.

In reply to by बॅटमॅन

बालीमधले हिंदू पण सर्रास गोमांस खातात. सणासुदीला खास मांसासाठी पोसलेल्या गुरांची विक्री होते. गोमांस फक्त पुजारी लोकांसाठीच निषिद्ध समजले जाते.

In reply to by बॅटमॅन

एक उगीच माहितीचा दाणा टाकतो! ग्लॅडिएटर्स जे योद्धे म्हणून गणले जात असत त्यांचे खाणे जवळ जवळ पूर्णतः शाकाहारी असल्याचा ताजा ताजा शोध लागला आहे...अर्थात कारणे थोडी वेगळी आणि विचित्र आहेत म्हणा, पण शाकाहाराच्या सात्विकतेला अगदीच बट्टा लावला आहे बुआ!!

In reply to by सटक

रोमन आर्मीच्या आहारातही एकूण मांसाहाराचे प्रमाण तसे कमीच होते. इतके असूनही पूर्ण मांसाहारी असलेल्या अनेक टोळ्यांवर त्यांनी अनन्वित अत्याचार केले.

मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का ? होय. निरनिराळ्या पंथाचे, धर्माचे, रीतिरिवाजाचे लोक, निरनिराळ्या गोष्टी खातात. उदा. कुत्रे, मांजरे, वाघाच्या लिंगापासून बनविलेले काही पदार्थ वगैरे. परदेशात (काही देशांत, जिथे असे भक्षणा करणारे लोक असू शकतात, तिथे) ह्यातील अनेक गोष्टी खाण्यावर कायद्याने बंदी आहे. उद्या भारतातही ह्यांतील काही कुणी खायचे ठरवले, तर ते अवैध ठरावे?

आपला तुमच्या ह्या हि आयडि ला पाठींबा सिंथेटिक कद्रुस दरेकर चा फॅन होबासराव

कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त ती कत्तल सार्वजनीक ठिकाणी करू नये. (उदा. उघड्यावर कुर्बानी देणे किंवा प्राण्यांचा बळी देणे.) अमुक धर्माच्या सणात त्यांनी वागावे तसेच वागावे हा आग्रह का? बीफ वरील बंदी सुद्धा त्यात मोडते.( मी बीफ खात नसलो तरीही). उद्या हे म्हणू लागतील कि श्रावण आहे तर सगळे कोंबडी वाले,मासे विक्रेते, खाटीकखाने आणि अंडी वाल्यांची दुकाने सुद्धा बंद असावीत. यासाठी पर्युषणाच्या काळात खाटीकखाने बंद ठेवण्याचा निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. राजकीय फायद्यासाठी कोणत्याही धर्माला झुकते माप देणे हे चुकीचे आहे.

In reply to by अनुप ढेरे

हा हा हा..................... काय राव ! लेखकाच्या तोंडून चांगला व्दिशतकी धागा ओढून काढलात !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लेखकाच्या तोंडून चांगला व्दिशतकी धागा ओढून काढलात !!! असे येथे कुणीही, कुणाच्याही तोंडातील काहीही ओढून घेऊ शकते का? तसे असल्यास मिपाकरांचा णिशेद!

In reply to by प्रदीप

असे येथे कुणीही, कुणाच्याही तोंडातील काहीही ओढून घेऊ शकते का? तसे असल्यास मिपाकरांचा णिशेद! आता जर लोकांच्या तोंडचे अन्न देखील ओढण्यात महाराष्ट्र अग्रेसर होत असेल तर एक धागा काय, किस झाड की पत्ती! ;) (ह. घ्या.)

In reply to by अनुप ढेरे

आता लिंक व्हिजीट केले! तिथे २००४ चा उल्लेख काढून टाकलाय. द्वाड आहे मीडिया!

In reply to by अनुप ढेरे

ही डीएनए मधलीच पण नंतरची बातमी आहे (तुम्ही दिलेली ३० ऑगस्ट ची आहे आणि ही ६ सप्टेंबरची ) http://www.dnaindia.com/mumbai/report-mira-bhayandar-civic-body-bans-sa… एनडीटीवी च्या बातमीत (सप्टेंबर ७, २०१५ ) पण आठ दिवस बॅन आहे असंच दिलंय http://www.ndtv.com/india-news/after-beef-ban-no-meat-for-8-days-in-dis… अजून काही बातम्या सुध्धा ह्याच वर्षिच्या आणि ८ दिवसाच्या आहेतः http://www.eenaduindia.com/Maharashtra/OthersInMaharashtra/2015/09/0617… http://www.mid-day.com/videos/mbmc-mayor-justifies-ban-on-meat-sale-dur…

In reply to by आनन्दा

लिंक मधे (आणि इमेज मधे सुध्धा) मांस विक्री दोन दिवस ( / तीन दिवस) बंद राहणार असं होतं. म्हणून मी त्या लिंक दिल्या होत्या - ज्यात मांस विक्री या वर्षि आठ दिवस बंद आहे असं लिहिलंय.

मटनावरील बंदी ही मूर्खपणाची,निरुपयोगी आहे का?
शांक्या,मीरा भायंदरच्या महापौर गीता भरत जैन(भाजपा) आहेत. Geeta ज्यांना मटन खायचे आहे त्यांनी दहिसर,विरारला जाउन मटन विकत घ्यावे असे ह्यांचे म्हणणे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हे वाचा अनुप ढेरे ह्यान्च्या लिंकेत्लं---- When asked about the needs of Mira-Bhayander’s non-vegetarians, Kumar said that the ban is only for a day at a time. “Meat shops are closed only for a day. So people have the option of buying meat a day earlier,” said Kumar.

In reply to by संजय पाटिल

खरे आहे रे संजय.पण प्रश्न एक दिवसाचा नसून व्यक्तीस्वातंत्र्याचा व काही गट जे दादागिरी करतात त्याचा आहे. रमझानच्या महिन्यात 'मीरा-भायंदरमधील लोकांनी एक दिवस उपाशी रहावे' अशी मागणी झाली तर जैन समाज पाठिंबा देणार की "स्वातंत्र्याची गळचेपी झाली हो..."म्हणत न्यायालयात धाव घेणार? असा ह्यांचा सवाल.

शाकाहारी दहशतवाद
मी कोणत्याही प्रकारे मांसाहाराचा निषेध अन शाकाहाराचे समर्थन करत नाही , मात्र तरीही सदर धागा आणि इंटरनेट्वरील विचारवंतांची मते पाहुन खालील विचार मनात आहे १) सेक्युलर देश म्हणजे नक्की काय ? बहुसंख्यांची मनमानी चालते तो देश असा काहीसा अर्थ आहे काय ? २) फाळणी नंतर भारत पाकिस्तान दोन देश झाले , पाकिस्तानात , बांग्लादेशात पोर्क मिळते का ? स्वतःच्या धर्माचे आचरण करण्यासाठी त्या लोकांनी झगडुन स्वतंत्र देश मिळवला मग हिंदु जैन बौध्द शीख लोकांन्नी आपल्या अहिंसेला धरुन सेक्युलर देश कल्पना उचलुन धरली ही त्यांची चुक झाली काय ? ३) जैनांना फाळणी करुन ( इवलासा का होईना ) पण स्वतंत्र देश मिळाला असता तर त्यांना आनंदाने त्यांचे निर्णय राबवता आले असते ना ? ४) भारत देश सेक्युलर असल्याचा कोणत्या धर्माच्या लोकांन्ना सर्वात जास्त फायदा होत आहे ? कोणत्या धर्माच्या लोकांचे नुकसान होत आहे ? ५) जैनांच्या भावनांचा आदर कसा राखला जाईल ? की त्यांनी पारशी धर्माप्रमाणे नामशेष होवुन जाणे अपेक्षित आहे ? बरं पारश्यांच्या अग्यारीत अपारशी लोकांना जाण्यास बंदी असते त्या विरुध्द हे विचारवंत काही का बोलत नाहीत ? सेक्युलॅरिझम च्या नावाखाली , ज्यांनी खर्‍या अर्थाने सेक्युलॅरिझम चा शोध लावला त्या आमच्या भारतीय धर्मांनाच का बरे चेपले जाते ? ६) व्यक्तीस्वातंत्र्याच्या आडुन ह्या मांस बंदीवर टीका करणारे लोक इतर नॉनसेन्स बंद्यांच्या विरोधात आवाज उठवणार का ? ( बाकी सोडा पण १५ ऑगस्टला आमचा जन्मदिवस असतो हो , ते ड्रायडे ची बंदी काढता आली तर बरें होईल =)) ) आणि सर्वात महत्वाचा प्रश्न : ७) जे धर्म आक्रामकपणे स्वतःच्या तत्वांचा प्रचार प्रसार करत नाहीत ते आयसीसच्या वादळापुढे टिकुन रहातील का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बाकी
जे धर्म आक्रामकपणे स्वतःच्या तत्वांचा प्रचार प्रसार करत नाहीत ते आयसीसच्या वादळापुढे टिकुन रहातील का ?
आयसीसच्या वादळाला तोंड द्यायला भारतीय लष्कर सक्षम आहे. आणी त्यामार्फतच तोंड दिले जावे ही अपेक्षाही.

In reply to by द-बाहुबली

आयसीसच्या वादळाला तोंड द्यायला भारतीय लष्कर सक्षम आहे. आणी त्यामार्फतच तोंड दिले जावे ही अपेक्षाही.
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आयसीस चे युध्द भारताविरुध्द नाही हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल तोच सुदीन ! तोवर हॅप्पी ड्रीमींग !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आयसीसला उत्तर भारतीय लष्करानेच द्यायचे आणी त्यानेच दिले पाहिजे हे ज्या दिवशी लक्षात येइल तो समस्त भारतियांसाठी सुदीन.

In reply to by द-बाहुबली

जैनांच्या भावनांचा आदर कसा राखला जाईल ?
असंख्य हॉटेलांमध्ये जैन पावभाजी मिळते,जैन पिझ्झा,एग्लेस केक का काय तो.. मिळतो ना रे प्रगो?

In reply to by द-बाहुबली

एका विचारधारेला (भले ती आपल्यासाठी किंवा खरंच, चुकीची असो) शस्त्रानं किंवा लष्कराकडून उत्तर कसं देता येईल? लष्कर समर्थ असलं तर आताच्या वर्तमान अडचणी का संपत नाहीयेत? एका कसाब सारख्या पित्त्याला किंवा त्या दृष्टीनं २-५ लाख लोकांना मारु शकलो तरी पुढची फळी तयार व्हायची नि आक्रमण करायची थांबेल?

In reply to by द-बाहुबली

एन्लायटन प्लीज. घटना ठाऊक आहे. नवीन चलन आलंय आयसिसचं. बिलियन्स ऑफ डॉलर्स चा खजिना जमला आहे. शस्त्रास्त्रं आहेत, प्रोग्राम्ड लोक आहेत. मिळणारा पाठिंबा दुर्दैवानं जगभरातून आहे

In reply to by प्यारे१

आय डोंट डिस्कस दिज मॅटर्स विद सिवीलीयन्स सॉरी. ;)
बिलियन्स ऑफ डॉलर्स चा खजिना जमला आहे.
बस फक्त हेच दुखणं खरं आहे. आणी तेल विहीरींवर कब्जा केल्यामुळे त्यात भरच पडत आहे. पैसा आहे म्हणूनच हात पाय पसरता येत आहेत. बाकी मी विधान जे धर्म आक्रामकपणे स्वतःच्या तत्वांचा प्रचार प्रसार करत नाहीत ते आयसीसच्या वादळापुढे टिकुन रहातील का ? या वाक्याच्या संदर्भात केले असल्याने यानुशंगाने विशीष्ट प्रश्न मनात असेल तर कृपया विचारावा. कारण त्या प्रश्नाला माझे उत्तर भारतीय लष्कर इसीसला उत्तर द्यायला सक्षम आहे त्यासाठी जगात एखादा नवीन धर्म स्थापायाची अथवा अस्तित्वात असलेला दुसरा एखादा धर्म आक्रमक करायचा ज्यातुन इसिस आपोआप संपेल/त्याला शह बसेल असे मानणे भाबडी आशा आहे असेच आहे. इसीस मानवते विर्ध्द आहे असेच कृत्यातुन सिध्द करते आणी भारतीय लष्कर मानवतेसाठी काम करायला सक्षम आहे. अर्थात धर्मस्थापनार्थाय प्रत्यक्ष नारायणानेच अवतार घेतला तर गोष्टच निराळी होइल म्हणा...

In reply to by प्यारे१

एका विचारधारेला (भले ती आपल्यासाठी किंवा खरंच, चुकीची असो) शस्त्रानं किंवा लष्कराकडून उत्तर कसं देता येईल? >> आपल्याकडच्या पुरोगामी वैचारिक मंडळींना पाठवायचं का तिकडे?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

'आप'ण सहमत, मिपावर सुद्धा आहेत कि सो कॉल्ड पुरोगामी काड्यासारु, वर्गणी करुया आन द्यु इ पाठ्वुन हाकानाका

In reply to by होबासराव

त्यावरनं आठवलं, फेबुवर पाहिलेलं: पाकिस्ताण टूरिझम/व्हिसाचे सर्वांत मोठे प्रमोटर्स म्हणजे भारतातील स्वयंघोषित राष्ट्रभक्त मंडळी. जरा कै झालं की "याला पाकिस्तानला पाठवा" चा उद्घोष सुरू असतो.

In reply to by बॅटमॅन

पाकिस्ताण टूरिझम/व्हिसाचे सर्वांत मोठे प्रमोटर्स
ह्या ह्या ह्या. ह्याला गॉथमला पाठवा रे.

In reply to by प्रसाद गोडबोले

असो. जैन समाजाविषयी कीव आणि सहानुभुती वाटते . तुमच्या पेक्षा पारशी नशीबवान हो , दुसर्‍या देशातुन इथे येवुनही मोठ्ठा कौतुकाने स्वतःच्या धर्माचे आचरण करत आहेत , प्रत्येक अग्यारी बाहेर स्पष्ट पाटी लावलेली असते की पारशी आणि इराणी झोराश्ट्रीयन सोडुन कोणालाही प्रवेश नाही आणि त्यांच्या विरुध्द कोणी ब्र ही काढत नाहीत ! असो . आता १५ ऑगस्ट २६ जानेवारीला सक्तीच्या दारुबंदी विरुध्द बघु कोण आवाज उठवते ह्या इंटरनेटीय विचारवंता मधील !!

In reply to by प्रसाद गोडबोले

अग्यारीतला प्रवेश आणि स्वतःचा धर्म सोडून इतरांनी काय खावे अन काय नाही या दोन गोष्टींची तुलना करणे हेच मुळात तर्कदुष्ट आहे. जसे अग्यारीत नॉनझोरोअ‍ॅस्ट्रियन लोकांना प्रवेश नाही, तद्वतच नॉनहिंदूंना प्रवेश न देणारी देवळेही आहेतच की. पण स्वतः मांस खात नाही म्हणून इतरांनीही खाऊ नये ही तर दडपशाही झाली. जैन सोडून इतर धर्मीयांनी मांसाहार केला तर जैन धर्मीयांचे कुठले धर्मतत्त्व पाळले जात नाही तेवढे सांगा, मग त्या अनुषंगाने चर्चा करता येईल. बाकी आयसिस वगैरे निव्वळ मुद्दे भरकटवणे आहे.

In reply to by बॅटमॅन

तर्कदुष्ट
मुद्दा असा आहे की जसा जैनांच्या भावनांचा आदर कोणत्या देशात होईल ?
आयसिस वगैरे निव्वळ मुद्दे भरकटवणे आहे
ठीक आहे , घोडा मैदान दूर नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

भावनांचा आदर इतरांच्या आहारावर का घसरावा हे न उलगडणारे कोडे आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा की इतरांनी नॉनव्हेज खाल्ले तर जैनांचे कुठले धर्मतत्त्व विटाळते? तसे त्यांच्या धर्मग्रंथात काही आहे का?

In reply to by बॅटमॅन

इतरांनी नॉनव्हेज खाल्ले तर जैनांचे कुठले धर्मतत्त्व विटाळते? तसे त्यांच्या धर्मग्रंथात काही आहे का?
नाही नाही तसे मुळीच नाहीये . जैन आणि सारेच भारतीय धर्म अ‍ॅकोमोडेटीव्ह आहेत , पण हा आमचा सद्गुण आमच्याच मुळावर उठायला लागला तर काय करावे ? सौदी मधे मला सहा महिन्यात एकदाही पोर्क खायला मिळाले नाही , रमजान मधे हमखास सारी हॉटेल बंद असायची दिवसा , ते लोकं कसे कट्टरतेने स्वतःची धार्मिक धोरणे राबवतात ! बरं आमचा जैन बौध्द आणि हिंदु धर्म पहिल्या पासुनच सेक्युलर म्हणुन आम्ही सेक्युलॅरिझम स्विकारलले तर ते आमच्याच मुळावर उठायला लागले आहे ! ३६५ दिवसातील ५ दिवस नॉनव्हेज खाल्ले नाहीतर काय बिघडते ? फाळणीच्या वेळेला मुसलमानांनी झगडुन स्वतंत्र देश मिळवला , तिथे ते आनंदाने त्यांची धोरणे राबवतात ( भले मग ती काहीही का असेना ) मग आमच्या लोकांनी धर्माच्या आधारावर राज्य निर्माण नकरता सेक्युलरत्व स्विकारले तर त्या धर्माच्या लोकांच्या भावनांचा आदर केला तर काय बिघडेल ? डिस्क्लेमर : मी स्वतः कट्टर शाकाहारी नाही , पण मला सर्व "सेक्युलर" धर्मांविषयी प्रचंड आदर आहे. जैन , बौध्द आणि वैदिक परंपरांची पार्श्वभुमी नसती तर हा देश किती सेक्युलर राहिला असता देव जाणे !

In reply to by प्रसाद गोडबोले

सौदी मधे मला सहा महिन्यात एकदाही पोर्क खायला मिळाले नाही , रमजान मधे हमखास सारी हॉटेल बंद असायची दिवसा , ते लोकं कसे कट्टरतेने स्वतःची धार्मिक धोरणे राबवतात ! बरं आमचा जैन बौध्द आणि हिंदु धर्म पहिल्या पासुनच सेक्युलर म्हणुन आम्ही सेक्युलॅरिझम स्विकारलले तर ते आमच्याच मुळावर उठायला लागले आहे ! ३६५ दिवसातील ५ दिवस नॉनव्हेज खाल्ले नाहीतर काय बिघडते ?
म्हणजे तुम्हांला सौदीत पोर्क मिळाले नसल्याने जैनपुरस्कृत बंदीचा पुरस्कार करताय का? झालंच तर सेकुलारिझम मुळावर उठणे आणि अशी खाद्यबंदी यांचा काय संबंध आहे ते जरा सांगा बघू. आणि ५ दिवस नॉनव्हेज खाल्ले नैतर काय बिघडते, बीफ खाल्ले नैतर काय बिघडते, पोर्क खाल्ले नैतर काय बिघडते हे सारेच प्रश्न सारखेच निरर्थक आहेत.
फाळणीच्या वेळेला मुसलमानांनी झगडुन स्वतंत्र देश मिळवला , तिथे ते आनंदाने त्यांची धोरणे राबवतात ( भले मग ती काहीही का असेना ) मग आमच्या लोकांनी धर्माच्या आधारावर राज्य निर्माण नकरता सेक्युलरत्व स्विकारले तर त्या धर्माच्या लोकांच्या भावनांचा आदर केला तर काय बिघडेल ?
वेल, बहुसंख्य कोण आहेत इथे? त्यांच्या भावनांचा आदर करायचा की अल्पसंख्य भावनांचा?

In reply to by बॅटमॅन

चातुर्मास, त्यातही श्रावणात हिंदू लोक मांसाहार करत नाहीत. त्यापायी हिंदूंनी कधी त्या काळात मांसबंदी घातल्याचे आठवत नाही, मग जैनांचा असला आततायीपणा का खपवून घ्यावा?