बौद्धिक कृष्णविवर

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
1 Mar 2014 - 2:39 pm

बौद्धिक कृष्णविवर:

लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते.

बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४]

युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात. कोंडी करणाऱ्या तर्कास आणि युक्तिवादास 'ती एक निराळी श्रद्धा प्रणाली आहे' असे सांगून बोळवण करून स्वतःची सुटका करून घेण्याचा असतो. या कॢप्तीत सर्व युक्तिवाद, श्रद्धा, विचारधारा एकाच पातळीवर असून सरसकट (equally) "सयुक्तिक (reasonable)" अथवा "असयुक्तिक (unreasonable)" असल्याचा आभास निर्माण केला जातो. [५].'तुमचा विश्वास जेवढा योग्य आहे तेवढाच माझा विश्वास योग्य आहे' असे दाखवण्याचा प्रयास करत वेळ मारून नेत स्वतःची हार होतानासुद्धा ताठ मानेने बाहेर पडण्याच्या प्रयत्नास Stephen Law न्युक्लिअर बटन म्हणजे शेवटचा सुटकेचा मार्ग म्हणतात ज्यात तत्त्वज्ञानातील प्रॉब्लेमला smokescreen[मराठी शब्द सुचवा](धूम्रावरण/धुराचा पडदा) म्हणून वापरले जाते, त्यामुळे त्यांचा तर्कांबद्दल संशय विशुद्ध ठरत नाही. .[६]

विशिष्ट विचारधारेसच बांधिलकी कायम ठेवण्यास चुकीची बौद्धिक दिशा आणि कॢप्त्या स्वीकारणे, कोणत्याही तर्कसंगत (रॅशनल) युक्तिवादास दुर्लक्षित करणे अथवा त्याला वळसा घालण्याचे कारस्थान करणाऱ्या संशयवादींच्या सहभागाचा प्रयत्न कोणत्याही तर्कसंगत चर्चेमुळे साध्य होत नाही. [७]

तर्कशास्त्र सुचविते की, अशा कारस्थान-सिद्धान्तवादी लोकांना(किंवा अशा प्रकारच्या धारणेकडे घसरलेल्या/झुकलेल्या लोकांना) बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे असा की त्यांच्या विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधणे, न की त्यांच्या विधानांच्या अर्थाकडे. (बहुतेक लोक नंतरचेच काम करतात).[८]

संदर्भ तार्किक उणीवा. (२०१३, जुलै ८). विकिपीडिया, एक मुक्त ज्ञानकोश.

Retrieved ०९:००, मार्च १, २०१४ from http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0...

मराठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.

धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद

संस्कृतीसमाजतंत्रविज्ञानविचारसमीक्षावादप्रतिभा

प्रतिक्रिया

मन बुद्धी आणि कृष्णविवर या बद्दल एक खुळा प्रयत्न.... या मराठी ब्लॉगवर काही विचारांचा अल्प प्रयास आढळला.

मारकुटे's picture

1 Mar 2014 - 6:16 pm | मारकुटे

छान छान !

मृगजळाचे बांधकाम's picture

1 Mar 2014 - 7:37 pm | मृगजळाचे बांधकाम

खूपच इनत्रेस्तिंग! येउद्या अजून या विषयी

बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.

भोकात जाणे यालाच म्हणतात काय ?

तर्कशास्त्र सुचविते की, अशा कारस्थान-सिद्धान्तवादी लोकांना(किंवा अशा प्रकारच्या धारणेकडे घसरलेल्या/झुकलेल्या लोकांना) बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे असा की त्यांच्या विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधणे, न की त्यांच्या विधानांच्या अर्थाकडे.

बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एक प्रयत्न केला होता. अगदी उघड उपप्रतिसाद लिहुन प्रेमाने व प्रांजळपणे केला होता... अर्थात ती व्यक्ती प्रचंड डीनायल मोड मधे गेली. विशेषतः तथाकथीत शब्दांचा खेळ करुन अराजकता निर्माण करायला माझ्या सावल्याही पुरेष्या आहेत पण प्रत्यक्ष माझ्या सोबत सांगोपांग चर्चा करायची तर विषयाचे समग्र आकलन हा एकमेव पर्याय खुला असल्याचे आकलन ह्वायला त्या व्यक्तीला वेळ लागला. त्या व्यक्तीला अजुनही तो माझ्या सावल्यांसोबत बोलत आहे असा भ्रम होता.

जो फुटल्या फुटल्या त्या व्यक्तीमधे असे काही नैराश्य निर्माण झाले की ज्याचे नाव ते. आता माझ्या निर्वीवाद मुद्यांना प्रतिवाद करणे त्याचा आवाका नाही हे जेंव्हा त्याच्या लक्षात आले त्या नंतर अर्ध्या हळकुंडाच्या पिवळ्या वाकड्या जिलब्या अशा काही थरथरत पडु लागल्या की त्यांला मुवी (मुर्ख विचारी) म्हणावे काय, की आणखी काही असे होउन गेले. अर्थात जेव्हडी थरथर जास्त तेव्हडा कुरकुरीतपणा मस्त या न्यायाने मला त्या अजुन आवडु लागल्या हे.वे.सा.न.ल.! पण मला यात इतकेच सुचवायचे आहे की विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधल्यास व्यक्ती हमखास बहिसटते.

माहितगार's picture

2 Mar 2014 - 1:49 pm | माहितगार

भोकात जाणे/जाऊदेणे वाक्प्रचाराचा अर्थ "अप्रिय व्यक्ती किंवा कृतीकडे दुर्लक्ष केल्याचे/करावयाचे सूचीत करणे." बौद्धिक कृष्णविवर अथवा डीनायल मोडशी संबंध अभ्यासावा लागेल असे वाटते.

विवाद टाळावा विधानांच्या पद्धतीकडे अथवा तार्कीक उणीवांच्या प्रकार/पद्धती दाखवावी असे सूचवतात.

मराठी शब्द वापरावयाचा खूप प्रयास असतो बराच अभ्यासही करतो तरी हवीती अर्थछटा; लेखनाचा ओघ; संभाव्य श्रोत्याचा शब्द संग्रह या गोष्टी जमेल तेवढ्या लक्षात घ्याव्या लागतात. पहिल्या प्रतिसादात ब्लॉग शब्द वापरावा लागला सध्या माझ्या संग.काची n ही कळ काम करत नाही प्रत्येक वेळी "न" च्योप पेस्त अवघड जाते असेही होऊ शकते.

पैसा's picture

2 Mar 2014 - 6:22 pm | पैसा

विधानाच्या पद्धतीकडे लक्ष वेधल्यास ते लोक यातून बाहेर येतात का याबद्दल शंका आहे. तसेही खरे स्पष्ट सांगायचे तर इथे आंतरजालावर भेटणारे लोक माझे कोणीही लागत नाहीत त्यामुळे त्यांच्या बर्‍यावाईटाची सगळी जबाबदारी मी का घ्यावी? जर जिवाशी खेळ असेल तर मधे पडणे ठीक. अन्यथा अशा अजिबात न ऐकणार्‍या लोकांशी मी वाद घालून स्वतःची एनर्जी आणि वेळ फुकट घालवू नये साठीच मला आठवण करून देणारी माझी स्वाक्षरी आहे.

Don't waste your time with explanations: people only hear what they want to hear - Paulo Coelho

इतर कोणीही दगडावर डोके आपटायला तयार असतील तर निर्विकारपणे बघत रहायचे आणि जमलेच तर तसल्या चर्चा मनोरंजक वाटून घ्यायच्या एवढे अनुभव इथे मिळाले आहेत.

धन्या's picture

2 Mar 2014 - 6:35 pm | धन्या

पूर्वी कुणी काही लिहिलं की तावातावाने प्रतिवाद करायला उद्युक्त होत असे. हल्ली असे प्रतिसाद फक्त वाचतो, प्रतिसाद "लिहिणार्‍याबद्दल" क्षणभर वाईट वाटून घेतो आणि पुढच्या क्षणाला तो प्रतिसाद विसरुन जातो.

शैलेन्द्र's picture

2 Mar 2014 - 6:49 pm | शैलेन्द्र

+१११
प्रतिसाद द्यायच्या कंटाळ्याचाही हल्ली कंटाळा येतो..

आत्मशून्य's picture

4 Mar 2014 - 2:45 pm | आत्मशून्य

Its better to keep your mouth shut and appear stupid than to open and remove all the doub!

ह.घ्या.!

माहितगार's picture

4 Mar 2014 - 3:52 pm | माहितगार

मंडळी आमच्या मराठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प करता सुद्धा जरा सवड काढावी म्हटल. आम्ही आमच्या धागा मालिका संपवून तिकडे परतणार पण जाता जाता चार संवगडी मिळाले तर आनंदच असेल. बाकी 'लगे रहो ?' नेहमीचच आहे.

आत्मशून्य's picture

4 Mar 2014 - 4:11 pm | आत्मशून्य

तर्कशास्त्र प्रकल्प करता सुद्धा जरा सवड काढावी म्हटल ?

रच्याकने मी आपल्या काय कामाचा ? माझे मराठी शुध्द लेखन आपण दुर्लक्षीत केलेत काय ? ते मुद्दाम तसे केलेले नाही. हां पण या शुध्दलेखनाच्या त्रूटीवर काही उपाय असेल तर मला आपल्या प्रकल्पात सहभागी व्हायला मनापासुन आवडेल. तेव्हडीच मराठीची सेवा होइल.

अवांतरः- कालच मी ऑफलाइन विकीपेडीया इन्स्टॉल केला त्याबद्दल तुम्हाला खरड केली होती.

माहितगार's picture

4 Mar 2014 - 7:12 pm | माहितगार

शुध्दलेखनाच्या त्रूटीवर काही उपाय असेल तर मला आपल्या प्रकल्पात सहभागी व्हायला मनापासुन आवडेल.

तसे असेल तर प्रकल्पावर शुभस्य शीर्घम स्वागत आहे. विकिपीडिया एक कोलॅबोरेटीव्ह प्रॉजेक्ट आहे. आपल्याला जेवढे येते तेवढेच करावयाचे ज्यांना त्या लेखात रस आहे आणि शुद्धलेखन येते ते नंतर येऊन दुरुस्त्या करू शकतात आणि करतात. काही सदस्य शुद्धलेखन दुरुस्त्याच करतात त्या शिवाय काहीजण स्वयंचलीत सुविधा चालवूनही दुरुस्त्या करतात/करू शकतात. आणि एखादा लेख मुखपृष्ठावर जाणार असेल तर त्यासाठीही सर्वजण मिळून विशेष मेहनतही घेत असतात. एवढ्या उत्तरावर समाधान नाही वाटले तर संबधीत उपायांबद्दल सविस्तर विकि पान येथे आहे

खासकरून हा विषय (किंवा इतर विषयही) तुमच्या आवडीचा आहे आणि आमच्या तसेच मराठी भाषिकांच्या गरजेचा आहे तेव्हा आपल्या सवडीनुसार अधून मधून दहा वीस मिनीटे देऊ शकलात तरीही चालेल मनःपुर्वक स्वागत आहे.

आत्मशून्य's picture

4 Mar 2014 - 7:23 pm | आत्मशून्य

सविस्तर व्यनि करतो.

माहितगार's picture

4 Mar 2014 - 3:42 pm | माहितगार

विधानाच्या पद्धतीकडे लक्ष वेधल्यास ते लोक यातून बाहेर येतात का याबद्दल शंका आहे.

सर्वात अलिकडे म्हणजे आमेरीकेत डार्विन सिद्धांतासोबतच शालेय शिक्षणात वैश्विक निर्मितीस कर्ता असू शकतो या सिद्धांताचा अंतर्भाव करावा अशा आग्रहावरून काही चर्चा वाद झाले त्या विवादातून परस्पर विरोधी गटांनी Logical Fallacies cite करण्यात उपयोग केला. तार्कीक उणीवांकडे (तर्कदोष Logical Fallacies) लक्ष वेधणे प्रकार तसा भारतात आणि युरोपातही खूप प्राचिन काळापासून आहे. आपल्याकडे अलिकडच्याच काळात केवळ याचा वापर कमी झाला तसेच मराठी महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात खूप क्लिष्ट (संकृतप्रचूर पण वापरावयास बोजड) पारिभाषिक शब्दांचा वापर झाल्यामुळेही कदाचित वापराचे प्रमाण कमी झाले असावे.

शेवटी संवाद कौशल्याचा भाग आहे. विधानाच्या पद्धतीकडे लक्ष वेधल्यास ते लोक यातून बाहेर आले तर वेळच वाचतो. समोरचाही सुज्ञ आणि खुल्या मनाचा असेल तर खेळाडूपणे तुमचे म्हणणे स्विकारेल. समजा काही कारणानी स्विकारले नाही गेले तर एखादा वाद पुढे चालू ठेवायचा अथवा नाही हा निर्णय घेण्याच्या तुमच्या स्वातंत्र्यात फारसा व्यत्ययही येत नाही.

आंतरजालावर अथवा इतरत्र वादात पडायच अथवा नाही हा सहसा प्रत्येक जण आपापला निर्णय प्रत्येकवेळी घेत असतो. तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्याचे एक तंत्र उपलब्ध आहे त्याचा आपण येथे परिचय करुन देत आहोत. संवाद-विवाद कौशल्यातील एक तंत्र माहित नसले तरीही वाद विवाद होतील माहित असले तरीही होतील कोणत कौशल्य कोणत तंत्र केव्हा कुठे वापराव वापराव का नाही हे तो प्रत्येक विवादपटू ठरवण्यास आपापला स्वतंत्र आहेच. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आहेच.

चर्चा सहभागा करीता धन्यवाद

माहितगार's picture

3 Mar 2014 - 8:29 am | माहितगार

आता पर्यंत आलेल्या प्रतिसादांकरता पोच व आभार. माझ्या कॉम्प्च्या कळफलकास समस्या; सविस्तर प्रतिसाद नंतर देईन.