एक सुंदर अरबी गाणे : यावर मराठी काव्य रचा...

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
19 Apr 2012 - 11:45 pm

एक सुंदर अरबी गाणे....

एक सुंदर तरुणी घराच्या दरवाज्यात उभी राहून तिने केलेल्या कोणत्याश्या गावच्या प्रवासाची आठवण सांगत्ये आहे .... त्या गावातील आबाल -वृद्ध तिच्या मोहक सौदर्यावर लुब्ध झालेले दिसतात... एक लहानसा मुलगा तिच्या येण्याच्या वाटेवर तिला देण्यासाठी एक सूर्यमुखीचे फूल घेऊन उभा असतो, तर एक वृद्ध फळविक्या तिला मोफत फळ देण्यात धन्यता मानतो... ती त्या गावाच्या गल्ल्या-बोळातून फिरताना तिच्या पायातला दागिना हरवतो, आणि तो ज्याला सापडला, त्या तरूणाकडे बघून ती गोडशी हसते.... तिचे ते दारात घुटमळणे, मटकवणे, मोहक अदा, आणि गाण्याच्या शेवटला दीर्घ आलाप केवळ अप्रतिम....
नॅन्सी अजराम हिच्यावर चित्रित केलेले व तिनेच म्हटलेले हे गाणे ऐकायला, बघायला खूपच सुंदर वाटले, परंतु अर्थ कळला नाही. जालावर एके ठिकाणी इंग्रजी अनुवाद दिला आहे, तो अपुरा आणि अयोग्य वाटला...

कुणी कविताप्रेमी मिपाकर हे गाणे बघून त्यावर मराठीत पद्य वा गद्य रचना करेल काय ?

खालील दुव्यावर गाणे बघा: ( गाण्याचा ठेका खूपच प्रभावी असल्याने उत्तम स्पीकर्सवर वाजवल्यास छान)

http://www.youtube.com/watch?v=iXZcIZ_Y7Ms

शृंगारशांतरसनृत्यसंगीतसंस्कृतीप्रवासकविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

20 Apr 2012 - 1:15 am | पाषाणभेद

लगेचच कविता स्फुरेल असे नाही पण
"बुगडी माझी सांडली ग! "

हे गाणे अगदी फिट्ट बसेल.

प्रभाकर पेठकर's picture

20 Apr 2012 - 3:04 am | प्रभाकर पेठकर

हे इजिप्तशियन गाणे असावे. चित्र फितीत जो फळे विकणारा आहे तो हातगाडीच्या ठेल्यावर स्ट्रॉबेरीज विकताना दिसतो आहे. असे चित्र इजिप्त मधे दिसते. तिथे स्ट्रॉबेरीज भयंकर स्वत आहेत.
अरबस्थानातील बहुतेक गायिका, नट्या ह्या इजिप्तशियन आहेत त्यानेही माझ्या दाव्याला दुजोरा मिळतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2012 - 2:13 pm | बिपिन कार्यकर्ते

काका, गायिकाही मसरी आहे आणि ते गाणंही. त्या गाण्याच्या शीर्षकात 'जिम'चा उच्चार ग असा केला आहे. :)

बाकी गाणं छानच आणि गायिकाही!

सुनील's picture

20 Apr 2012 - 9:08 pm | सुनील

मसरी म्हणजे काय?

हिंदीत इजिप्तला मिस्र म्हनतात. तेव्हा मसरी म्हणजे इजिप्शियनच काय?

इजिप्शियन हे अरबी भाषी असले तरी त्यांचा वंश (आणि मूळची भाषा) वेगळा आहे असे मानले जाते. खेरीज कडव्या अरबी राष्ट्रात अशा वेशभूषेत गाणे-बजावणे होत असेल असे वाटत नाही! अपवाद कदाचित इजिप्त आणि लेबनानचा असावा.

बाकी गाणे काहीही समजले नसले तरी गाणारी बै मात्र आवडली!! :)

चित्रगुप्त's picture

20 Apr 2012 - 9:17 pm | चित्रगुप्त

सदर बै (नॅन्सी अजरम) ही लेबनानची आहे.

घरी (व्यायाम म्हणून ) मी हिच्या एका गाण्यावर मुक्त नृत्य करत असतो, याचा ठेका कुणालाही नाचायला लावेल, असा आहे:
http://www.youtube.com/watch?v=Q6GZt1Isk90

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2012 - 11:27 pm | बिपिन कार्यकर्ते

@चित्रगुप्त : क्षमस्व. चुकी बद्दल. थोडी गल्लत झाली.

@सुनील : मसरी म्हणजे इजिप्शियन. (किंवा त्यांच्या ज ला ग म्हणायच्या पद्धतीमुळे त्यांना गंमतीने इगिप्शियनही म्हणलं जातं.) अरबीमधे इजिप्तला अल मिस्र / मस्र असं म्हणतात. (अल चा एल होतो इजिप्शियन लेहज्यामधे.) म्हणुन मसरी. मिस्री नाही म्हणत. मसरीच. लेबानीजना लुबनानी.

आत्ताचे इजिप्शियन हे आता वांशिकदृष्ट्या सरमिसळ झालेले आहेत. त्यांच्यातही वांशिक दृष्ट्या उच्चनीच आहेच. सामान्यपणे मुस्लिम झालेल्या समाजांमधून मुस्लिम होण्याच्या आधीचा वारसा नाकारणे किंवा मग त्या काळाला स्वतःच जाहिलियत वगैरे म्हणण्याचा कल दिसतो. मात्र इजिप्शियन आणि इराणी या दोन समूहांमधे ही प्रवृत्ती मला खूपच कमी दिसली आहे. एका इजिप्शियनने (ज्याने मला अरबी वाचायला शिकायला मदत केली) मला त्याने "We are bad grandchildren to good grandfathers." असं सांगितलं होतं.

बाकी कडव्या राष्ट्रात असं होत नसेल या बद्दल... अंतर्गत प्रवाह असतात प्रत्येक समाजात, त्यात अंतर्विरोधही असतो. सगळं काही एकसंध, एकसुरी, मोनोलिथिक नसतं कुठेच. इजिप्शियन समाज किंवा लेबनानी समाज हे त्यातल्या त्यात अगदीच उदारमतवादी, बर्‍यापैकी आधुनिक, शिक्षित वगैरे. त्यामुळे अरबांमधे कलाकारांच्यात याच दोन ठिकाणचे कलाकार प्रामुख्याने दिसतात. इजिप्शियन सिनेमे तर खूपच आधीपासून प्रसिद्ध आहेत.

सुनील's picture

21 Apr 2012 - 1:41 am | सुनील

विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2012 - 2:31 am | प्रभाकर पेठकर

श्री. बिपिन,

मिस्री (मस्कतमधील उच्चार) ह्या शब्दाला ३ अर्थ आहेत.
१) मिस्र = इजिप्त देश.
२) मिस्री = मिस्र देशीय तरूणी. इजिप्तशियन तरूणी. विस्तृत अर्थाने इजिप्तशियन व्यक्ती. (स्त्री-पुरूष कोणीही).
३) मिस्री = खडीसाखर. इजिप्तशियन स्त्रिया नाजूक, सुंदर आणि 'गोड' दिसतात म्हणून मिस्री = इजिप्तशियन तरूणी.
४) मिस्री = परी. परी सारखी सुंदर, नाजूक म्हणून इजिप्तशियन तरूणी.

इजिप्शियन समाज किंवा लेबनानी समाज हे त्यातल्या त्यात अगदीच उदारमतवादी, बर्‍यापैकी आधुनिक, शिक्षित वगैरे.

इजिप्तशियन्स, इतर अरबांच्या मानाने बरेच पुढारलेले, परंपरांना झुगारणारे, आधुनिक विचारसरणीचे. त्यामुळे इतर कट्टर अरब त्यांना कमी लेखतात. (दांभिकपणा). उलट, इजिप्तशियन स्वतःला इतर अरबांच्या मानाने उच्च समजतात.
शिक्षकी पेशात इजिप्तशियन तरूणींचा भरणा अधिक आहे. (त्या खालोखाल सुदानी शिक्षक).

इजिप्तशियन तरूणी त्यांच्या सुंदरतेच्या भांडवलावर इतर 'व्यवसायातही' आहेत. पेशाने शिक्षिका असलेल्याही अशा 'व्यवसायात' आहेत.

इजिप्तशियन चित्रपट हिन्दी चित्रपटांप्रमाणेच मारामार्‍या, चोर्‍या, खुन, नकली नोटा, दारू इ. जगातील काळी बाजू ही दाखविणारे असतात. त्यामुळे ओमान दूरदर्शनवर असे चित्रपट रात्री उशीराने दाखविले जात. (लहान मुले झोपली की).

मुळ धाग्यापासून दूर जाणार्‍या ह्या अतिअवांतराबद्दल क्षमस्व.

बहुगुणी's picture

20 Apr 2012 - 6:42 am | बहुगुणी

गाणं तसंच व्हिडिओ दोन्ही आवडले. धन्यवाद!

मराठी स्वैर रुपांतराचा हा प्रयत्न - छंदात वगैरे काव्य बसवण्याच्या फंदात पडलेलो नाही, अर्थ कळाला की इथले काही कवि त्याला छंद-रूप देतील अशी अपेक्षा आहे.

शब्दांबरोबर व्हिडीओ इथेच दिसावा म्हणून खाली देतो आहे:

तो शेजारी तरूण,
न कळे काय करावं तयाला
शीळ घाली साद घालून,
जिथे-तिथे दिसे मला

मी त्याच्या प्रेमात, हे त्याला आहे ठावे
दिवसभर उभा राही, न्याहाळत मला
झाले काय मला, त्याने असे का करावे
कसली ही काळजी नसती मनाला

नेहेमीच बाबा मला रोखून तो पाही
लाज वाटे मला, माझ्या डोळ्यांत डोकावे
कशावर आता माझा ताबाच नाही
प्रेमात झुरावे आणि जागत रहावे

त्याच्या प्रेमात दिवाणी
विसरले दिन रात
जणू झाले विरहिणी
कशी आग ही उरात

माझं हृदयही त्याचं, मी झाले त्याची प्रीती
खोडकर नजरेनं केलं घायाळ जीवाला
'पुरे आता खोड्या', लोक तयाला सांगती,
'असं सज्जात ठाकुनी, का छळशी पोरीला?'

पाषाणभेद's picture

20 Apr 2012 - 6:52 am | पाषाणभेद

सुंदर प्रयत्न!

नॅन्सीची गाणी मस्तच असतात... :)
या गायीका दिसयलाही गोड असतात ! ;)

(हायफाच्या गाण्यांचा चाहता) ;)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2012 - 2:29 pm | परिकथेतील राजकुमार

गाण्या फिण्यातले काही कळत नाही, पण बै आवडली.

अनेक दिवस हे गाणे रोज बघत होतो, हा धागा सुरु केल्यावर आज अचानकच या ओळी मनात प्रगटू लागल्या....

स्वप्नात तिला 'तो' दिसणे, मग त्यासाठी तिने केलेला अनोळखी गावाचा प्रवास आणि अनेक दिवस घेतलेला त्याचा शोध, हा सर्व माझा कल्पनाविलास आहे, मूळ गाण्यात असे काही आहे किंवा नाही हे ठाऊक नाही, परंतु या व्हिडियोत जे जे दिसते, ते काव्यात मांडण्याचा हा प्रयत्न आहे...

इतुकी कशी खुळी मी
स्वप्नी तया बघितले
सोडून सर्व नाती
स्वप्नासावे निघाले...१.

तो गाव दूर दिसता
माझीच मी हरवले
माहीत काही नसता
शोधात मग्न झाले...२.

एके दिनी सकाळी
घेउन मी दुचाकी
रस्त्यात जात असता
अवचीत वाट चुकले...३.

वाटेत वाट बघण्या
तो गोड बाळ थांबे
पुष्पाची भेट मजला
देवोन वाट सांगे...४.

वाटेत वृद्ध हसरा
फळ - ढीग लावणारा
देवून एक मजला
ठेवून घे म्हणाला...५.

धुंदीत चालताना
खरपूस गंध आला
ताई म्हणोन मजला
मधुकेक तो मिळाला...६.

परिचीत सर्व झाले
परि तो मला दिसेना
स्वप्नातल्या क्षणाची
अनुभूति काही ये ना...७.

ऐशा कितीक रात्री
फिरता तिन्ही त्रिकाळी
अवसेत मी शिरोनी
पुनवेत की नहाले...८.

एके दिनी परंतु
रस्त्यात चालताना
जाणे कसा कळेना
पैजार तो हरपला...९.

हळव्या क्षणी सुखाच्या
लांबून तोचि दिसला
पैजार आणि माझा
त्याच्यासवे मिळाला...१०.

पहिलीच भेट झाली
जडली अपूर्व बाधा
माझी न राहिले मी
या दोन लोचनांची
जादू अशी घडे ही

हे एक कडवं अगदी तंतोतंत जुळतंय चित्रगुप्तहो.
आमचा एक गायक मित्र हे गाणं असलं टिप लाऊन म्हणायचा की गाता गाताच जीव जाईल की काय असे वाटायचे..
उदाहरणार्थ असे:

पहिऽऽऽलीचऽऽऽऽ भेटऽऽऽऽ झालीऽऽऽऽऽ
जडऽऽलीऽऽऽ अपूर्व बाधा (इथे बाऽऽऽ धाऽऽ)
माझी...न राहिले मी..
त्या दोनऽऽऽ लोचनांची...
जादूऽऽऽऽ अशी घडे ही...

प्रास's picture

20 Apr 2012 - 8:02 pm | प्रास

मूळ गाणं आवडलं, मूळ गाण्याची गायिका आवडली त्याबरोबरच बहुगुणींचं स्वैर रुपांतरही आवडलं.

पण चित्रगुप्त काकांचं मराठी गाणं भन्नाट जमलं आहे. त्यांचा कल्पनाविलास खरोखर झकास झाला आहे. :-)

मी स्वैर रुपांतर केलं ते मात्र मूळ गीतरचनेशी शक्य तितकं प्रामाणिक रहाण्याचा प्रयत्न करून; मला मिळालेले शब्द असे आहेतः

"Ebn el geeran"
The Guy Next Door (Neighbor's boy)

The guy next door, here next to me, I don't know what can I do with him.
He keeps whistling and calling for me, and I find him everywhere!

Even though I love him, he stands by me all day long!
Why did he do this? What's wrong with me ...why do I have

Always, dad, dad, he stares at me all the time.
He makes me shy, he stares right through my eyes!

And there is nothing, my darling, that I can control anything,
other than love him, and stay up from his love, what else can I do, what?

Because I love him I forget, my night and my days, days.
And the longing in my heart my darling, it increases in my fire fire (love)!
I know that I belong to him, and my heart belongs to him!

Oh, my from his mischievous, oh, my from his looks, oh, my from his eyes.
People tell him, stop with the jokes, why in the balcony are making a fuss?

योगविवेक's picture

4 Oct 2019 - 12:00 am | योगविवेक

He makes me shy, he stares right through my eyes!

शर्म आती है मगर आज ये कहना होगा...
पण इथे प्रकार उलटाआहे...? बुरखेवालीला पहायचा चान्स आहे कुठे...

स्मिता.'s picture

21 Apr 2012 - 1:53 am | स्मिता.

केवळ व्हिडिओ बघून कल्पनाविलास करून लिहिलेलं काव्य मस्त जमून आलंय.

खरं शब्दांचं भाषांतर बघता व्हिडिओ आणि शब्दांमधे काही संगती वाटत नाही. (अर्थात आपल्याकडचीही गाणी याहून काय वेगळी असतात?)
गायिका मात्र अगदी गोड आहे.

चौकटराजा's picture

21 Apr 2012 - 5:09 am | चौकटराजा

चित्रगुप्त जी आपले गीत मस्त जमले आहे. पण पैजाराचा संदर्भ कळला नाही. नुपूर वगैरे ? बहगुणी चे गीतही जमले आहे.मजा पहा मेंदू बदलला की नजरिया बदलला! धन्यवाद दोघानाही !

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2012 - 9:07 am | प्रभाकर पेठकर

व्वा...व्वा...चित्रगुप्तजी मस्त जमली आहे कविता.

खिलजि's picture

3 Oct 2019 - 7:06 pm | खिलजि

ह्ये बाकी छान जमलंय .. भाषेची भट्टी मस्त लावलीय .. सुंदर

मदनबाण's picture

20 Apr 2012 - 9:49 pm | मदनबाण

आता राहवत नाही म्हणुन मला आवडणारे नॅन्सी चे दोन आणि हायफाचा एक इडियो इथे देत आहे. ;)

पाषाणभेद's picture

21 Apr 2012 - 12:08 am | पाषाणभेद

बहुगुणी अन चित्रगुप्तांच्या गाण्याच्या मागची कल्पना निराळी आहे.
@ चित्रगुप्त: "पैजार" म्हणजे पायातल्या चपला ना? की तुम्हाला पैंजण अभिप्रेत आहे?

चित्रगुप्त's picture

21 Apr 2012 - 8:22 am | चित्रगुप्त

मी हा व्हिडियो बघून कविता रचत असता पैजार हा शब्द सुचून गेला, पायातील तो दागिना या अर्थाने. पैंजण हा शब्द तिथे बसत नव्हता, असे वाटले.
या शब्दाचा शब्दकोशातील अथवा ज्ञानेश्वरीतील वगैरे अर्थ काय, याची मी फिकिर केली नाही.

एका शब्दाचे विविध - वेगवेगळे अर्थ असल्याचे आपण बघतोच, त्यामुळे हा शब्द या अर्थाने यापूर्वी कुणी वापरला नसेल, तरी कवीला भाषेची (किंवा एकूणच कोणत्याही कलावंताला त्या त्या माध्यमाची) मनसोक्त मोडतोड करण्याचे स्वातंत्र्य असते, असावे, असे मला वाटते. अश्या प्रयोगातूनच त्या त्या कलेचे क्षितिज विस्तृत होत असते, असे दिसून येते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Apr 2012 - 4:23 am | निनाद मुक्काम प...

हिचे मला हे गाणे आवडते.
अवांतर
पेठेकर काका म्हणतात त्याप्रमाणे इजिप्तचे सिनेसृष्टी ही अरब जगतातील विकसित झालेली असल्याने त्यांचे सिनेमे अखिल अरब जगतात पहिले जातात.
ह्यामुळे संपूर्ण अरब जगतात इजिप्तशियन अरबी उच्चार सर्वांना कळतात. एरवी आफ्रिका आणि मिडिल इस्ट मधील अरबी भाषेच्या उच्चारात कमालीचा फरक आहे.
ही लोक आणि लेबेनॉन आणि सिरीया शिक्षणाच्या बाबतीत अरब जगतात वासरात लगडी .........

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Apr 2012 - 5:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

अनाथालयाचे आहो आम्ही कार्यकर्ते,
मदती साठी मी घरोघर फिरते,
अनुभव माझे मी तुम्हाला सांगते,
जग फार सुंदर असते, जग फार सुंदर असते

कधी कधी गोड सानुले येतात,
पाहुन गाली खुदकन हसतात,
जाताजाता हाती फुलेही देतात,
मदतही करु असे वचन देतात,

हे सगळे किती छान असते,
जग फार सुंदर असते, जग फार सुंदर असते

वाटेत जाताना एक काका दिसतात,
काहीतरी प्रेमाने हातात देतात ,
पैसे नको असे लाजुन म्हणतात,
देव भले करो असे म्हणत जातात ,

हे सगळे किती छान असते,
जग फार सुंदर असते, जग फार सुंदर असते

अजीबाई तर रोज वाट बघतात,
मुलांसाठी काही खायला देतात,
भरभरुन मला दुवा त्या देतात,
उद्या जास्त देईन असे रोज म्हणतात,

हे सगळे किती छान असते,
जग फार सुंदर असते, जग फार सुंदर असते

एके दिवशी मला भेटला तरुण,
सांगे तुझसम होती माझीही बहीण,
रोज मनी असे त्याच्या तीची आठवण,
दाखवीले मला तिच्या पायीचे पैंजण,

जग किती प्रेमळ असते, जग किती दयाळु असते,
हे सगळे किती छान असते,
जग फारच सुंदर असते, जग फारच सुंदर असते

चित्रगुप्त's picture

24 Apr 2012 - 6:31 pm | चित्रगुप्त

@ ज्ञानोबाचे पैजार..

सुंदर.
अगदी वेगळ्या तर्‍हेने तुम्ही याकडे बघितलेत, ते आवडले...
....जग किती प्रेमळ असते, जग किती दयाळु असते,
...हे सगळे किती छान असते,
जग फार सुंदर असते, जग फार सुंदर असते...
हा आनंदाचा, प्रेमाचा, सौंदर्‍याचा भाव या व्हिडियोत आहे, तो तुम्ही नेमका पकडलात, हे फार भावले.