ट्रू एअर स्पीड, ग्राऊंड स्पीड, सर्किट वगैरे...

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
26 Sep 2011 - 5:34 pm

:

विमानाच्या वेगाबाबतीत एक फंडा क्लिअर करुन घेऊ. विमानाचा वेग म्हणजे त्याच्या कॉकपिटात दाखवला जाणारा वेग. हा वेग हवेशी रिलेटिव्ह असतो. विमान हवेला मागे ढकलून पुढे जातं.. जमिनीला नव्हे.. त्यामुळे मागे जाणार्‍या हवेचा स्पीड म्हणा किंवा हवेच्या तुलनेत पुढे सरकणार्‍या विमानाचा स्पीड म्हणा, हाच विमानाचा स्पीड असतो. त्याला ट्रू एअरस्पीड म्हणतात.

पण आपल्याला प्रवास तर जमिनीवरच्या ठिकाणांमधे करायचा असतो. त्यामुळे आपल्याला विमानाचा ग्राउंड स्पीड, अर्थात जमिनीशी रिलेटेड स्पीड काढणं भाग असतं.

समजा मुंबई गोवा एरियल अंतर ६०० किलोमीटर असेल. आणि समजा विमानाचा ट्रू एअर स्पीड ३०० किलोमीटर प्रतितास असेल.

अशा वेळी वारा साफ बंद असेल, तर विमान दोन तासात गोव्याला पोहोचेल. म्हणजे एअरस्पीड आणि ग्राउंड स्पीड एकच असेल.

जर समोरुन शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारा असेल तर ग्राउंड स्पीड (३०० उणे १००) २०० किलोमीटर प्रतितास इतका कमी होईल आणि विमानाला पोचायला तीन तास लागतील. जर पाठीकडून असाच वारा असेल तर विमान ४०० किमी प्रतितास अशा वाढीव ग्राउंडस्पीडने दीड तासातच गोव्याला पोहोचेल.

तसं वर दिलेलं गणित साधंच आहे. प्रत्यक्षात पायलटला प्रत्यक्ष वार्‍याचा वेग आणि दिशा बघून बरंच गणित करावं लागतं. वारा बरोब्बर समोरुन किंवा पाठीकडून नसतोच. त्याचा विरोध किती होईल त्याप्रमाणे वेग आणि उडण्याचे अँगल बदलले जातात.

विमान वर उचललं जातं ते पंखांवर तयार होणार्‍या हवेच्या "लिफ्ट"मुळे, एवढं सगळ्यांनाच माहीत असतं. पंख जोरात हवेतून पुढे जातो तेव्हा त्याच्या एरोफॉईल आकारामुळे त्याच्या खालून हवा वर दाब देते. हा दाब विमानाला हवेत उचलून धरण्याएवढा जोरदार हवा असेल तर पंख हा किमान एका वेगाने हवेतून सरकत राहिला पाहिजे. या वेगापेक्षा कमी वेग झाला की लिफ्ट पुरेशी मिळणार नाही आणि पंख (अर्थात विमान) खाली कोसळणार. म्हणजेच "स्टॉल" होणार.

या विमान हवेत राहण्यासाठी आवश्यक अशा किमान वेगाला "स्टॉलिंग स्पीड" म्हणतात. समजा तुमच्या विमानाचा स्टॉलिंग स्पीड दोनशे किलोमीटर प्रतितास आहे, तर फ्लाईटच्या कोणत्याही स्टेजमधे (जमिनीवरील चालणे वगळून) तुम्हाला २०० पेक्षा कमी स्पीड करता येणार नाही.

अर्थात स्टॉलिंग स्पीड हा ट्रू एअरस्पीड असतो. ग्राउंड स्पीड नव्हे. तात्विकदृष्ट्या तुम्ही शून्य ग्राउंडस्पीडमधे आकाशात टिकू शकाल (विमानाच्या एअरस्पीडइतकाच वारा समोरुन येत असेल तर) पण ट्रू एअरस्पीड स्टॉलिंग स्पीडच्या जराही खाली गेला की कपाळमोक्षच.

त्यामुळे विमान फास्ट चालवू नको रे म्हणण्याऐवजी "स्लो नको रे चालवू. मरायचंय का?" असं म्हणावं लागतं.

रनवेच्या भोवती विमान ज्या मार्गाने उडतं त्याला सर्किट पॅटर्न म्हणतात. सर्किट पॅटर्न हा सर्व एअरपोर्टसमधे जवळजवळ सारखाच असतो. एखाद्या एअरपोर्टच्या रनवेची दिशा ठरवताना त्या जागी वारा कसा वाहतो याचं अनेक वर्षांचं रेकॉर्ड पाहतात. विमानाचा टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं.

कारण.. ?

वर म्हटल्याप्रमाणे विमानाचे सर्व स्पीड हे हवेशी रिलेटिव्ह असतात. टेक ऑफसाठी आवश्यक स्पीडसुद्धा..

रनवेची लांबी अर्थातच मर्यादित असते.

त्यामुळे वारा समोरुन येत असला तर ट्रू एअरस्पीडच्या मानाने ग्राउंड स्पीड कमी राहतो आणि रनवेवरची कमी लांबी खर्च होऊन लवकर टेकऑफ होतो. एरवी विमान रनवेच्या दुसर्‍या टोकाशी जाऊन कदाचित ठोकरग्रस्त झालं असतं.

लँडिंगही याच, पक्षी वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं, कारण समोरुन येणार्‍या वार्‍याने लँडिंग झाल्यावर ग्राउंड स्पीड कमी होतो आणि विमान कमी अंतरात थांबतं..

रनवे जरी वार्‍याच्या हिस्टॉरिक दिशेवरुन बांधत असले, तरी वार्‍याची दिशा बदलत राहतेच. विशेषतः हवामान खूप बदललं की वार्‍याची दिशा उलटही होते. अशावेळी रनवे तर हलवता येत नाही.. मग टेकॉफ आणि लँडिंगची दिशा उलटी केली जाते.

मुंबईवासी विमानप्रवाशांनी किंवा नागरिकांनी खूपदा पाहिलं असेल की बर्‍याचवेळा घाटकोपरकडून लँडिंग करणारी आणि टेकॉफनंतर जुहू चौपाटीवर वर चढताना दिसणारी विमानं अचानक दिशा बदलून चौपाटीच्या दिशेने उलट लँडिंग करायला खाली येऊ लागतात. आणि टेकॉफनंतर ती जुहू ऐवजी घाटकोपर कुर्ल्यावर दिसतात. यालाच रनवे बदलला असं म्हणतात. मुंबई कंट्रोल टॉवर सर्व विमानांना "रनवे इन यूज" अशा नावाखाली नेहमीच याक्षणी कोणत्या बाजूने रनवे वापरात आहे हे सांगत असते.

आता सर्किट पॅटर्न पाहू..

इथे मी लेफ्ट साईडेड सर्किट पॅटर्न दाखवला आहे. २७ आणि ०९ हे रनवे नंबर्स आहेत. रनवे नंबर म्हणजे त्या रनवेचं तोंड ज्या बाजूला आहे ती दिशा. २७० डिग्री म्हणजे पश्चिम दिशा. त्यातलं शेवटचं शून्य काढून पहिले दोन आकडे वापरले जातात. त्याचप्रमाणे ०९ म्हणजे ९० डिग्री, अर्थात पूर्व दिशा.

या सर्किट पॅटर्नमधे आपण ०९ रनवे वापरुन सर्किट पॅटर्न दाखवला आहे. पूर्वेला तोंड करुन टेकऑफ घेतला जातो. टेकॉफनंतर नाकासमोर वर चढत जाण्याच्या भागाला अपविंड लेग म्हणतात.

अपविंड लेगमधून सरळ नाकासमोर एक्झिट घेऊन ठराविक उंची गाठायची आणि मग आपल्या गन्तव्यस्थानाची दिशा सेट करुन तिकडे तोंड वळवायचं, अशी एक एक्झिटची पद्धत आहे. किंवा मग काही ठिकाणी वर चढताचढताच डावीकडे वळून क्रॉसविंड लेग ही रेषा जॉईन केली जाते. क्रॉसविंड लेगमधून डावीकडे ४५ डिग्रीत एक्झिट घेण्याचा आणखी एक प्रकार आहे.

आता एक पूर्ण सर्किट करुन पाहूया.. अशी एकामागून एक सर्किट्स उड्डाण शिकताना केली जातात. त्यामुळे टेकॉफ आणि लँडिंगसहित सर्वच प्रकारची उत्तम प्रॅक्टिस होते.

टेकऑफ घेतला.. अपविंडमधे एक हजार फुटापर्यंत वर चढत गेलो. मग काटकोनात पण स्मूथ असं डावीकडे वळण घेतलं. क्रॉसविंड जॉईन केला.. दोन हजार फुटांची उंची गाठली. पुन्हा डावं वळण घेऊन रनवेला समांतर पण उलट दिशेत प्रवास सुरु केला. दोन हजार फुटांवर इंजिन पॉवर अ‍ॅड्जस्ट करुन विमान स्थिर केलं. आता रनवे आपल्या डाव्या हाताला दिसतोय. इथे आपण कंट्रोल टॉवरला रेडिओवर सांगतो. उदा. "पुणे, व्हिक्टर किलो अल्फा ऑन लेफ्ट डाउनविंड जीरो नाईन.." म्हणजेच अहो पुणे टॉवरवाले काका, मी रनवे ०९ च्या डाव्या डाउनविंड लेगमधे आहे.

टॉवर आपल्याला सांगतो:" व्हि़क्टर किलो अल्फा, पुणे... रिपोर्ट ऑन फायनल्स.."

म्हणजे जेव्हा फायनल लेगला पोचाल तेव्हा सांगा.

डाउनविंड लेगमधे आपण रनवे पार करुन थोडे पुढे गेलो की साधारण आपल्याला रनवेचं ०९ टोक "एट ओ क्लॉक" पोझिशनमधे दिसायला लागतं, असा एक पॉईंट येतो. या ठिकाणी पुन्हा स्मूथली डावं वळण घ्यायचं. याच सुमारास इंजिन पॉवर आयडल किंवा बंद करायची. त्यामुळे विमान खाली उतरायला लागतं.

उतरत उतरत आणि वळत वळत क्रॉसविंडच्या उलट दिशेत असलेल्या "बेस लेग" नावाच्या रेषेला जॉईन व्हायचं.

बेस लेगला काटकोनात असलेला लेग म्हणजे फायनल लेग. उतरणं चालूच आहे. फायनल लेगमधे आलात की दूर रनवे तुमच्या नाकासमोर दिसेल. रनवेच्या सेंटरलाईनशी विमानाचं नाक लावून धरत उतरणं चालू ठेवायचं. गरजेनुसार उतरण्याचा रेट वाढवायचा. रनवेचा आकडा हे आपलं टचडाऊन करण्याचं टारगेट असलं पाहिजे. त्याच्या आधी टच केलं तर अंडरशूट झालात, म्हणजे दगडधोंड्यात थेट घुसलात..

त्या टार्गेटच्या पुढे गेलात तर ओव्हरशूट..मग टचडाऊन झाल्यावर रनवेची उरलेली लांबी तुम्हाला पुरणार नाही.

अशा दोन्ही वेळी लँडिंग म्हणजे क्रॅशच.. (मेंगलोर क्रॅश ओव्हरशूटमुळे झाला होता..)

फायनलवर आल्यावर पुन्हा टॉवरला सांगायचं की मी फायनलवर आहे. मग तो तुम्हाला लँडिंग क्लियरन्स देईल आणि लँडिंगसाठी उपयोगी आकडेरुपी माहितीही देईल..

टचडाऊन केलंत की थोडं पुढे जाऊन टॅक्सीवेवर विमान वळवा आणि एप्रनमधे पार्क करा, किंवा परत सलग टेकऑफ घेऊन आणखी सर्किट करा.

जर बाहेरुन प्रवास करुन या विमानतळावर येत असलात तर जनरली डाउनविंड लेगमधे ४५ डिग्रीमधे जॉईन व्हायचं असतं. बाकी पुढे तसंच.

रनवेची दिशा बदलली की लेफ्ट साईडेड पॅटर्न राईट बनू शकतो...

....................

ओव्हर..

देशांतरजीवनमानतंत्रभूगोलविचारआस्वाद

प्रतिक्रिया

एक शंका.
वारा २०० किमी वेगाने वहात असेल . विमानाचा वेग २०० किमी असेल तर विमान एकाच जागेवर स्थिर राहील का?
( गुरुत्वाकर्षण हा फॅक्टर तात्पुरता नाही /नगण्य आहे असे गृहीत धरू)

मिग २९ च्या बाबतीत डिस्कव्हरीवर एक फिल्म पाहिली होती त्यात मिग २९ उलटे होऊन उलट दिशेला जाताना दाखवले होते तसेच उभे राहून आडव्या दिशेत उडत होते अशावेळेस गतीचे कोणते नियम लागु होताना नक्की काय घडते?

Nile's picture

26 Sep 2011 - 10:45 pm | Nile

>>वारा २०० किमी वेगाने वहात असेल . विमानाचा वेग २०० किमी असेल तर विमान एकाच जागेवर स्थिर राहील का?
( गुरुत्वाकर्षण हा फॅक्टर तात्पुरता नाही /नगण्य आहे असे गृहीत धरू)

वारा आणि विमान यांच्यामध्ये रिलेटीव्ह स्पीड(दोघांची दिशा वेगळी हवी, वेगळी म्हणजे परस्पर विरुद्धच नाही.) असेल तर हे शक्य आहे. (अर्थात अजून इतर फॅक्टर्स आहेत.) पण वारा आणी विमान एकाच दिशेला एकाच वेगाने असतील तर ते शक्य नाही.

थोडक्यात, गविंनी वरती लिहल्याप्रमाणे, विमानाचे पंख वार्‍याच्या आणि विमानाच्या रिलेटेव्ह स्पिडमुळे विमानाच्या वर आणि खाली वेगवेगळे प्रेशर निर्माण करतात. खाली प्रेशर जास्त असते जे विमानाला उचलते. जर रिलेटिव्ह स्पिड शुन्य झाला तर हे शक्य नाही. अर्थात रिलेटीव्ह स्पीड शुन्य नसला तरी तो विमानाला तरंगत ठेवण्याइतका हवाच अन्यथा विमान पडेल.

>>मिग २९ च्या बाबतीत डिस्कव्हरीवर एक फिल्म पाहिली होती त्यात मिग २९ उलटे होऊन उलट दिशेला जाताना दाखवले होते तसेच उभे राहून आडव्या दिशेत उडत होते अशावेळेस गतीचे कोणते नियम लागु होताना नक्की काय घडते?

बर्‍याच फायटर विमानांमध्ये हाय स्पीड जेट नोझल्स असतात, हे थोडक्यात तुमच्या घरातमध्ये बागेला पाणी देणारा स्प्रिंकलर असतो तसे असते. स्प्रिंकलर गोल फिरतो कारण बाहेर पडणारे पाणी त्यावर विरुद्ध दिशेने बल लावते (न्युटनचा नियम) तसेच ह्या जेट्स मुळे विमान एका दिशेला जाईल इतका फोर्स निर्माण केला जातो, अर्थात ते तरंगेल इतका वेग किंवा तरंगत ठेवेल इतके बल असलेला/ले जेट्स हवेच.

गवि's picture

26 Sep 2011 - 8:40 pm | गवि

Nile धन्यवाद..
विजुभाऊ,तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर "हो" आहे. Head on समोरुन येणारा वारा 200 kmphअसेल तर कोणी त्यात विमान उडवणार नाही हा logical भाग सोडला तर तात्विकदृष्ट्या शक्य आहे.
साधं चपखल उदाहरण.तुम्ही ट्रेडमिलवर पळता तेव्हा पट्टा आणि तुम्ही यात 7kmph स्पीड असेल आणि तुम्ही 7kmphनेच पुढे पावले टाकलीत तर तुमचा जमिनीशी स्पीड 0 असेल आणि पट्ट्याशी स्पीड 7.म्हणून तुम्ही जागीच रहाल.आपण इथेही ग्राउंड स्पीडविषयीच बोलतोय.

मला ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन पिवळ्या रेघात टु व्हिलर नीट लावता येत नाही, हे वर लिहिलंय ते वाचुनच गरगरायला लागलंय,

भर चौकात उजवीकडचा टर्न इंडिकेटर चालु ठेवुन डावीकडे वळुन भांडणं होतात, त्यात हे एवढे इंडिकेटर, रनवेचे आकडे अन ते कंट्रोल टावर वाला काय सांगतोय याकडं लक्ष ठेवुन विमान चालवणं आणि अपघात न होता व्यवस्थित उतरवणं ही एक महाकठिण कला आहे, उगा वडापच्या डायवर सारखं नाही,

जगातल्या सगळ्या वैमानिकांना प्रणाम. या पेक्षा माझं क्षेत्र फार सोपं आहे अशी आजपुरती समजुत करुन घेतो, उद्या पुन्हा बसायचं आहे दोन ट्रान्स्फॉर्मर आणि सर्किट ब्रेकर घेउन, तिच्यायला १८ दिवस झाले लोडला स्टँडच होत नाहीये.

अरे राम! तुझा हा प्रतिसाद वाचायच्या आधीच मी माझा खालचा प्रतिसाद दिला. चुकला ना आता तो.

विसुनाना's picture

26 Sep 2011 - 6:03 pm | विसुनाना

लेखांक आवडला. मालिका उत्तम आहे.
जर लँडिंग योग्य नसेल (ओव्हरशूट) तर टचडाऊन झाल्यावर / थ्रस्ट रिव्हर्सल मोडमध्ये असताना विमान परत हवेत उडवणे शक्य असते का?

Nile's picture

26 Sep 2011 - 8:29 pm | Nile

पुस्तकी ज्ञानानुसार, वास्तवात लँडींग जमणार नसेल तर थ्रस्ट रिव्हर्सल केलेच जाणार नाही असे वाटते. रिव्हर्सल बर्‍याच उशीरा, लँडिंग नंतर, केले जाते. तात्त्विक दृष्ट्या रिव्हर्सल म्हणजे ब्रेकच. इतक्या उशीरा पुन्हा टेकऑफ करता येणार नाही कारण 'टेक ऑफ स्पीड'ला पोहोचण्याकरता आवश्यक रनवे असेलच असे नाही. काही चुकले असेल तर गवि दुरुस्त करतीलच.

गविं, मालिका आवडली. इन्स्ट्रुमेंट लँडिग सीस्टम (आयएलएस) वरही एखादा लेख लिहा. खरं तर थोडक्यात लिफ्ट, अँगल ऑफ अटॅक, ड्रॅग वगैरेवरही लिहा, एकदा विमानाचे फिजिक्स थोडेफार कळले तर कळायला सोपे जाईल असे वाटते.

याही भागात एकदम इण्टरेस्टिंग माहीती दिलीत..मस्तच. तुमच्या दोन तीन अश्या माहितीपूर्ण लेखांनंतर बहुतेक सगळे मिपाकर लाईसन्स्ड पायलट्स व्हायला पात्र होतील ;)

५० फक्त's picture

26 Sep 2011 - 7:09 pm | ५० फक्त

हा प्रतिसाद ना चुकलाच, हा खरंतर इथं शोभतच नाही मु़ळी, ह्या प्रतिसादाची योग्य जागा आहे, श्री नाटक्या किंवा श्री. सोकात्रि यांचे धागे. इथुन पुढं हा प्रतिसाद तिथं कॉपि पेस्ट करत चला.

मृत्युन्जय's picture

26 Sep 2011 - 6:22 pm | मृत्युन्जय

सोप्पय एकदम. च्यायला उगाच त्या पायलटांना एवढाले पगार देतात. पुण्याच्या रस्त्यांवर पीएमटी च्या बशी चालवुन दाखवा म्हणाव ;)

मिसळपाव's picture

26 Sep 2011 - 6:51 pm | मिसळपाव

अशी एकदम दोन चॉकोलेटं देऊन मग पंधरा दिवस काहिच नाहि असं नका हां करू! दर सोमवारी एक भाग टाकाल का? "च्यायला ऑफिस सुरू" असं डोक्यात येण्याऐवजी " व्वा, सोमवार म्हणजे गविवार" अशा विचाराने आराम वाटेल आम्हा बर्‍याच जणाना.

तळटिपः हा लेख ३ ऑक्टोबरला वाचणारे :-)

सोमवार म्हणजे गविवार

मस्त वाटले वाचुन ...

-----------

गवि
लिहित रहा.. वाचत आहे...

भडकमकर मास्तर's picture

26 Sep 2011 - 6:52 pm | भडकमकर मास्तर

नेहमीच्या घाईने लेख वाचला... मग चार ओळी समजल्या नाहीत ... त्या महत्त्वाच्या असल्याने पुढच्या चार ओळी समजल्या नाहीत ... आणि मग आपले विमान पडणार अशी भयंकर भीती वाटली आणि मागे येऊन पुन्हा पुन्हा ओळी वाचल्या...

हे सालं भयंकर आहे...

स्मिता.'s picture

26 Sep 2011 - 6:55 pm | स्मिता.

हा ही भाग मस्तच! एकंदरीत कुतूहल वाढत आहे.
आता विमानात बसले की कोणत्या वेळी वैमानिक काय करत असेल याचे अंदाज करून समोरच्यावर इंप्रेशन मारता येईल ;)

ऋषिकेश's picture

27 Sep 2011 - 5:29 pm | ऋषिकेश

+१ थोडा बदल करून असेच म्हणतो :)
आता विमानात बसलो की कोणत्या वेळी वैमानिक काय करत असेल याचे अंदाज करून समोरच्याशेजारची वर इंप्रेशन मारता येईल

आता विमानात बसलो की कोणत्या वेळी वैमानिक काय करत असेल याचे अंदाज करून शेजारची वर इंप्रेशन मारता येईल

वरील वाक्यावरुन हा प्रतिसाद ऋषिकेश चिंदरकरांनी दिल्या सारखा वाटतो.....
- कम्युनिस्ट (वपाडाव)

मस्त लेखन!
भारी वाटलं.:)
कधीकधी अज्ञानात सूख असतं हो गवि!;)
आता मी खिडकीला नाक लावून बसणार विमानात.;)

अर्धवट's picture

26 Sep 2011 - 7:48 pm | अर्धवट

कॉपीड

योगी९००'s picture

26 Sep 2011 - 8:03 pm | योगी९००

गवि..

तुमचे विमानावरचे लेख खरच आमच्या डोक्याचे छप्पर उडवून जातात. विमान चालवताना या गोष्टीचा कधीच विचार नाही हो..आजवर बरीच विमाने चालवली. F18, F22, MIG, passenger विमान पण चालवले. (संगणक खेळात हो..प्रत्यक्ष नाही).

मस्त माहिती मिळाली. आभारी आहे.

एक गोष्ट तितकीशी कळली नाही..

विमानाचा टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं.
हे मुंबईच्या विमानतळाबाबत ठिक आहे हो जेथे विमान ज्या दिशेने उतरते त्याच दिशेच्या विरूद्ध बाजूला टेकऑफ करते...म्हणजे समजा वारा जुहूकडून घाटकोपरकडे वहात असेल तर विमान घाटकोपरकडून उतरते पण जूहूकडे टेकऑफ करते. म्हणजे टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं. पण भारतातील इतर बर्‍याच विमानतळांवर ज्या बाजूने विमान उतरते त्याच दिशेला टेकऑफ पण करते. म्हणजे मी समजा चेन्नाईला उतरत असलो आणि माझे विमान गिंडीकडून उतरले तर ते किंवा दुसरे कोणतेही विमान गिंडीच्या विरूद्ध म्हणजे तांबरम कडे टेकऑफ करायला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. विमान चेन्नाईला पण गिंडीकडेच उडते. हे कसे काय? १०-१५ मिनिटात वार्‍याचा वेग उलटा होईल काय?

तुम्ही म्हणता त्यामधे चेन्नईच्या दोन वेगवेगळ्या रनवेजचं ( २५ / ०७ आणि १२/३०) कारण असू शकेल. त्यातल्या २५/०७ चे तोंड बरोब्बर गिंडीकडे आहे.
वारा अचानक बदलल्यामुळे किंवा मधल्या दिशेने असल्याने ट्रॅफिकचा समन्वय साधण्यासाठी दोन्ही रनवेजवरुन एकामागोमाग एक अशा टेकऑफना परवानगी देत असतील. कारण हे रनवे अगदी टोकाशी जोडलेले आहेत.

लँडिंग आणि टेकॉफ एकमेकांच्या विरुद्ध दिशेत एकाच वेळी होऊच शकत नाहीत.

नितिन थत्ते's picture

27 Sep 2011 - 11:12 am | नितिन थत्ते

>>लँडिंग आणि टेकॉफ एकमेकांच्या विरुद्ध दिशेत एकाच वेळी होऊच शकत नाहीत.

सहमत आहे.
अन्यथा टेक ऑफ करणारे विमान लॅण्डिंगच्या तयारीत असलेल्या विमानावर धडकेल.

अगदी छोट्या विमानतळावरही विमानाची धावपट्टीवरची धाव लॅण्डिंग आणि टेक ऑफ साठी एकाच दिशेने असते.

सध्या मुंबई विमानतळावर एक विमान लॅण्डिंग करून धावपट्टी सोडते तेव्हा दुसरे विमान टेक ऑफ साठी धावू लागते. आणि ते टेक ऑफ करेपर्यंत तिसरे विमान लॅण्डिंग करण्यासाठी पोचलेले असते. एकूणच हा प्रकार भीतीदायक वाटतो.

मी मुंबई विमानतळावर फ्लाईट डिस्पॅचमधे काम करत असताना (२००० च्या सुमारास) सात आठ विमाने स्टार्टअप करुन रांगेत उभी असायची. इंजिन सुरु केल्यापासून आणि रोलआउटपासून प्रत्यक्ष डिपार्चरला अर्धा-पाऊण तासही लागायचा. मिनिटामिनिटाला नुसता उभ्याउभ्या इंजिन जाळून हजारोंचा धूर होत असायचा. काही प्रसंगी वाट बघून बघून फ्युएल लेव्हल इतकी कमी झाली की परत इंधन भरावं लागलं असंही घडलेलं आहे.

हल्लीचं माहीत नाही. डीले होत नसावेत बहुधा.. काय मॅनेजमेंट केलीय कोण जाणे.

पाऊण तास एकदाच डिले झालेला आठवतोय.
नंतर मात्र १५ मिनिटे ते ३० मिनिटे अनेकवेळा इतरही विमानतळांवर झालेला आहे.
नुकतेच बॉस्टनहून शिकागोला येताना दोन तासांच्या प्रवासाला चार तास लागले.
म्हणजे प्रवास २ तासातच झाला बाकीवेळ आम्ही दोन्ही विमानताळांवर हजारोंचा धूर काढत उभे होतो.
माझ्या मनात एक (बावळट) शंका आहे ती म्हणजे आपले मोबईल फोन्स बंद करावे लागत असताना एकदा आम्ही बॉस्टनला विमानात बसल्याबसल्या पाच मिनिटात झोपलो ते फ्रांकफूर्टलाच जागे झालो. दोघांचेही फोन्स चालू अवस्थेतच राहिले. त्याने विमानाला सिग्नल मिळताना काही प्रश्न आला असेल का हे बरेच दिवसांपासून तुम्हाला विचारायचे होते. (हुश्श्य! शंका तरी विचारली.....उत्तर वेळ असेल तेंव्हा द्या.)

मोबाईल सिग्नलमुळे तसा काही इंटरफेरन्स होत नाही हो खरं म्हणजे. तसं कधी सिद्धही झालेलं नाही. पण एक शक्यता गृहीत धरुन प्रिकॉशन म्हणून तो नियम केलाय. आता फ्लाईटमधे मोबाईल वापरु द्यावा अशा विचाराचा जोर इंडस्ट्रीत वाढतोय. होईल लवकर तेही..

रेवती's picture

1 Oct 2011 - 1:52 am | रेवती

उत्तराबद्दल धन्यवाद!

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2011 - 8:30 pm | प्रभाकर पेठकर

विमान चालकाच्या अद्भूत विश्वातील गणिते वाचताना मनस्वी थरार जाणवतो. आज पर्यंत अनेक विमानप्रवास घडले, पण एवढी गणिते त्यात असतात हे ठाऊक नव्हते. मला वाटायचे दिसला एअरपोर्ट की उतरव विमान इतके सोपे असेल. (अर्थात नियंत्रण मनोर्‍याशी संवाद साधूनच).

अजून भरपूर लेख येऊ द्या. उत्सुकतेने वाचतो आहे.

सुनील's picture

26 Sep 2011 - 9:01 pm | सुनील

बरीच नवी माहिती मिळतेय.

ओव्हर!

प्रास's picture

26 Sep 2011 - 9:24 pm | प्रास

हा लेखांचा डब्बल बार ठासून भरलाय राव आज!

लेख काहीसा तान्त्रिक असल्याने घाईघाईने वाचून समजणारा नाहीए. पण तेवढाच माहितीपूर्ण आहे.

आवडला.

वरचा सोमवार हा गविवार कॉन्सेप्ट छान आहे. होऊन जाऊदे तसंच!!!

तुमचा फ्याण :-)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Sep 2011 - 9:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

निट वाचून प्रतिसादास जागा राखून ठेवतो...

नितिन थत्ते's picture

26 Sep 2011 - 9:42 pm | नितिन थत्ते

दोन्ही भाग मस्त.

दोन भागांत थोडी गॅप असावी असं वाटतं.

शिल्पा ब's picture

26 Sep 2011 - 10:02 pm | शिल्पा ब

आम्हाला नविन माहीती मिळाली. छान. गणित, विज्ञान प्रकार डोक्याबाहेरुनच सर्कीट करुन गेले पण बाकी छान.

जगड्या's picture

26 Sep 2011 - 10:18 pm | जगड्या

आनखीन येउद्यात !!!

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2011 - 10:38 pm | पिवळा डांबिस

माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक माहिती मला नवी असल्याने आवडली.
गवि, पुढील भागांसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!!

(बाकी त्या खट्याळ नायल्याला ह्या धाग्यापुरता का होईना पण अभ्यासू नायल्या केल्याबद्दल अनेक धन्यवाद!!!!;))

पाषाणभेद's picture

27 Sep 2011 - 1:24 am | पाषाणभेद

सहमत आहे.

ओव्हर अँड आउट

नंदन's picture

27 Sep 2011 - 1:32 am | नंदन

माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक माहिती मला नवी असल्याने आवडली.
गवि, पुढील भागांसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!!
(बाकी त्या खट्याळ नायल्याला ह्या धाग्यापुरता का होईना पण अभ्यासू नायल्या केल्याबद्दल अनेक धन्यवाद!!!!)

असेच म्हणतो :). लेख आवडला, गवि. सोबत दिलेली आकृती आणि छोट्या, सुटसुटीत वाक्यांमुळे समजायला सोपा वाटला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2011 - 8:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे. नायल्याला अभ्यासू बनवण्याबद्दल गविंना लष्कर-ए-खरडातर्फे विमानरत्न हा पुरस्कार देण्यात येत आहे.

गविवारचा फंडाही आवडला. गवि, हा ही लेख मस्तच.

अंतु बर्वा's picture

26 Sep 2011 - 10:46 pm | अंतु बर्वा

सहीच आहे... वाचुन हिथ्रो एअरपोर्टचा हा विडीओ आठवला..

http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=GLNbYqraTgE

शिल्पा ब's picture

27 Sep 2011 - 12:28 am | शिल्पा ब

थरारक माहीती मिळाली व्हीडीओतुन.

विमानांची कमी वेळातली उड्डाणे थरारक आहेत.
एकूणच व्हिडीओ आवडला.
धन्यवाद!
एरवी पेंगलेले पॅसेंजर्स या कश्याचीही दखल न घेता हजारो मैल प्रवास करत असतात.
हिथ्रोवरून तीन चार वेळा जायचा योग आला पण हा विचार मनात आला नव्हता.
त्यांच्याकडे बांधकाम मात्र सतत चालू असायचे म्हणून वैताग यायचा.;)

जे.पी.मॉर्गन's picture

30 Sep 2011 - 5:16 pm | जे.पी.मॉर्गन

हाउन्स्लोला असताना मिनिटागणिक एक विमान उतरताना दिसायचं... अहो म्हणजे ती विमानं त्यांचा "स्टॅक" सोडून "बेस लेग" पूर्ण करून "फायनल लेग" ला येऊन "टचडाऊन" ला लाईनअप व्हायची हो ... बाकी काहीच नाही ;)

आता काय कौतुक त्याचं? :P

धनंजय's picture

27 Sep 2011 - 12:53 am | धनंजय

लेखांक आवडला

आत्मशून्य's picture

27 Sep 2011 - 3:02 am | आत्मशून्य

बाकी तूमचं लीखाण वाचून उद्याच एखादा अ‍ॅक्शनपॅक्ड फ्लाइट सिम्यूलेटर गेम इंन्स्टाल करायची खूमखूमी आली आहेच, पण दूधाची तहान ताकावर म्हणून आताच गूगल अर्थ लोडवलय व त्यातला फ्लाइट सिम्यूलेटर वापरून प्रत्यक्ष जगाची व्हर्चूअल सफर सूरू केलि आहे.... कंट्रोलींग थोडं किचकट आहे (टेक ऑफलाच क्रॅशतोय) पण हळू हळू मजा येतेय.... डोगराच्या कड्यावरून समोरील दरीत वार्‍याच्या झोतावर मस्त स्वार होऊन पंख पसरून एकाच जागी स्थीर राहणारा पक्षी (जणू ध्यान करतोय)बघून जाम भारी वाटतं पण यामागच शास्त्र/कला माणसाला अवगत करणे खरोखरच कसरत :)

पूलेशू.

रामदास's picture

27 Sep 2011 - 8:21 am | रामदास

गगनविहारी करून टाकलं तुम्ही आम्हाला.
तांत्रीक माहीतीसोबत थोडसं ते हवाई सुंदर्‍यांबद्दलही चार शब्द लिहावे असे म्हणून बघतो.

मदनबाण's picture

27 Sep 2011 - 9:26 am | मदनबाण

तांत्रीक माहीतीसोबत थोडसं ते हवाई सुंदर्‍यांबद्दलही चार शब्द लिहावे असे म्हणून बघतो.
खी खी खी ;) अगदी अगदी ! ;)

माझीही शॅम्पेन's picture

1 Oct 2011 - 9:30 am | माझीही शॅम्पेन

हवाई सुंदर्‍यांबद्दलही चार शब्द लिहावे असे म्हणून बघतो.

काका आत्ता ट्यूब पेटली की एयर इंडिया मध्ये मध्यमवयिन (किवा ओल्ड वाइन) हवाईसुन्दरीना का निवृत्त करत नाहीत ते :)

(उड्डाण प्रेमी) शॅम्पेन

मनराव's picture

27 Sep 2011 - 2:49 pm | मनराव

मस्त !!!

मन१'s picture

27 Sep 2011 - 3:42 pm | मन१

प्रचंड आवडलं.

इष्टुर फाकडा's picture

27 Sep 2011 - 7:13 pm | इष्टुर फाकडा

लढाऊ विमाने आणि वाहतुकीची विमाने यांच्या स्टॉलिंग स्पीड चे जरा आकडे द्याना गवि....
कारण साधारणपणे लढाऊ विमाने हि जास्त स्पीडी असतात असे वाटते...म्हणूनच या स्टॉलिंग स्पीड चा त्यांच्या लढाऊ कार्यक्षमतेशी संबंध असावा असे वाटते...जरा प्रकाश टाकावा.
बाकी तुमचे सगळेच लेख आवडतात, हा तर तुमच्या नावालाच जगणारा लेख आहे :)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2011 - 2:52 pm | बिपिन कार्यकर्ते

एक शंका : पूर्व दिशेला ९० ऐवजी ०९ का म्हणतात?

०००, ०९०, १८०, २७० असे तीन डिजिटमधे दिशेचे आकडे सांगतात आणि संक्षिप्तपणासाठी पहिले दोन आकडेच घेतात. (दहा डिग्री राऊंडेड अप)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2011 - 3:01 pm | बिपिन कार्यकर्ते

वोगे!

अभिज्ञ's picture

1 Oct 2011 - 5:47 am | अभिज्ञ

अतिशय उत्कृष्ठ व संग्राह्य लेख मालिका.

अभिनंदन.

अभिज्ञ.

कपिलमुनी's picture

20 Apr 2012 - 4:40 pm | कपिलमुनी

इथे दिल्यबद्दल धन्यवाद !!

बाळ सप्रे's picture

20 Apr 2012 - 5:02 pm | बाळ सप्रे

कपिलमुनी,
तुम्ही आज धागा वाचल्यामुळे तो वर आला, त्यामुळे छान लेख वाचायला मिळाला..
गविंबरोबर तुम्हालाही धन्यवाद.

या धाग्यात वर्णन केलेल्या सर्किटच्या संदर्भाने नुकताच नेपाळला जोमसोम एअरस्ट्रिपवरुन गो अराउंड केल्यावर जवळच्या डोंगरात झालेला अपघात साधारण असा झाला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. आकृतीत दाखवण्याचा प्रयत्न करतोय.

जोमसोम विमानतळाची धावपट्टी प्रचंड उंच पर्वतातल्या खडतर जागी आहे आणि ती कच्ची आहे. रनवे ०६ (६० डिग्री अतएव उत्तरपूर्व दिशेत तोंड असलेल्या) या रनवेवर उतरण्यासाठी खाली आलेलं डॉर्नियर २२८-२१२ विमान फायनल लेगवर असताना तीव्र वार्‍यामुळे भेलकांडून त्याला लँड करता येईनासे झाल्यावर पायलटने गो-अराउंडचा निर्णय घेतला. चित्रातील पिवळ्या बाणाच्या मार्गाने हवेतून गो अराऊंड केलं. पायलटला आपल्या उंचीचा अंदाज नसावा किंवा एअरपोर्टच्या परिसरातल्या टेकड्यांच्या उंचीची माहिती नसावी. किंवा त्याला टेकडीपेक्षा जास्त उंची वेळेत गाठता आली नसावी.

क्रॉसविंड लेग पार करुन डावा डाऊनविंड लेग पकडल्यावर (रनवेच्या उलट दिशेत) वाटेत असलेल्या टेकड्यांपैकी (लाल बिंदू) एकीला उजवा पंख धडकला आणि विमान तिथेच क्रॅश झालं. डाऊनविंड पूर्ण होऊ शकला नाही.

बळी पडलेलं डॉर्नियर २२८-२१२ विमान असं असतं.

नंबर दोन आणि तीनचे छायाचित्र : जालावरुन साभार.

प्रभाकर पेठकर's picture

15 May 2012 - 6:14 pm | प्रभाकर पेठकर

भयानक. अकरा भारतियांचा आणि विमान कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू. जगातील मोजक्या खतरनाक धावपट्यांपैकी ती एक आहे असे वाचण्यात आले.

विजय_आंग्रे's picture

16 May 2012 - 11:49 am | विजय_आंग्रे

भयानक अपघात,

या अपघातात, तरुणी सचदेव, आणि तीच्या आईचाही मृत्यू झाला आहे. तरुणी सचदेव म्हणजे 'आय लव्ह यू रसना'... असे म्हणत आपल्या निरागस हास्याने जाहिरातीतून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ‘रसना गर्ल’