वटपोर्णिमेच्या शुभेच्छा

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
25 Jun 2010 - 4:01 pm


(चित्र जालावरुन साभार.)
वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून -

विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम|
वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा
महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६||

महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो.

*कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.

संस्कृतीधर्मसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

25 Jun 2010 - 4:04 pm | आंबोळी

तेवढा वडाचा फोटू पण टाका एखादा...

आणि हो.... तुम्हालाही शुभेच्छा!

आंबोळी

जे.पी.मॉर्गन's picture

25 Jun 2010 - 4:07 pm | जे.पी.मॉर्गन

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा ? ठीके.. तुम्हाला पण

तुमचा होतो खेळ.....

(हताश) जे पी

(ह घ्या)

शुचि's picture

25 Jun 2010 - 5:11 pm | शुचि

हा हा
माझ्या ऑफीसमधले एकजण म्हणायचे आज संध्याकाळी लवकर जायचय वडाला उलट्या फेर्‍या घालायला ;)

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

स्पंदना's picture

25 Jun 2010 - 4:11 pm | स्पंदना

शुची हे वर्णन शीव स्तुती मध्ये आल ना?
वट पौर्णिमा म्हणजे सवित्री आणि सत्यवान, यांची कथा ना?
असु दे ! श्लोक अतिशय छान.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

शुचि's picture

25 Jun 2010 - 4:35 pm | शुचि

अगं सुरेखसा "सौभाग्य" वरचा श्लोक म्हणून आपला. मी आज हा श्लोक आवर्जून म्हटला पूजेत.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2010 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. <<
नकोत; एकाच दिवसाच्या शुभेच्छा घेऊन काय करू? ठेवा तुमच्याकडेच!

(वात आणला आहे या शुभेच्छुकांनी!)

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 5:30 pm | बिपिन कार्यकर्ते

मग तुम्हाला वातपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!

बिपिन कार्यकर्ते

शुचि's picture

25 Jun 2010 - 5:35 pm | शुचि

=)) =))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2010 - 6:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मग तुम्हाला वातपौर्णिमेच्या शुभेच्छा!!! <<
वातकुक्कुट ऐकला होता, हे वातपौर्णिमा काय असतं?

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 6:06 pm | बिपिन कार्यकर्ते

नारळीपौर्णिमेला भरपूर नारळीभात खाल्ल्यावर जे होतं ते...

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2010 - 6:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सोडून सोडा की वो! ते आमोशा-पुनवेचं गणित आपल्या युयुत्सु सायबांना सांगा, आमाला नको.

अदिती

अवलिया's picture

25 Jun 2010 - 5:38 pm | अवलिया

शुभेच्छा !

--अवलिया

सहज's picture

25 Jun 2010 - 5:39 pm | सहज

महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो.

कळले नाही. कसला विहार, कसली क्रीडा?

शुचि's picture

25 Jun 2010 - 5:41 pm | शुचि

महादेवच संहार करतात ना. तीच क्रीडा. तेच विहरणं. संचारणं. तांडव.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सहज's picture

25 Jun 2010 - 5:45 pm | सहज

अश्या महासंहारात सर्वजण वडासकट संपत असतील म्हणून पार्वतीला पटवायचे का? की शंकराला महासंहार करु देउ नकोस म्हणजे आमचे "सुहाग" टिकून रहातील?

शुचि's picture

25 Jun 2010 - 5:48 pm | शुचि

सरस्वतीला विद्या, लक्ष्मीला धन आणि पार्वतीला सौभाग्य मागावं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2010 - 6:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> सरस्वतीला विद्या, लक्ष्मीला धन आणि पार्वतीला सौभाग्य मागावं. <<
का म्हणे?
सारखे काय हात पसरायचे, आपलं आपण काय ते मिळवावं की!!

अदिती

शुचि's picture

25 Jun 2010 - 6:58 pm | शुचि

भारतात असताना कधी केले नाही तेवढे सणवार, पूजा मी अमेरीकेत करते. कारण मातीपासून तुटले जाण्याची रुखरुख. इथे संस्कृती आपण काटेकोरपणे जपली नाही तर विसर पडू लागतो चक्क. इतके भिन्न धर्मांचे, संस्कृतींचे, वंशांचे लोक दिसतात, सतत त्यांच्या विचारसरणीचा, सणावारांचा पगडा पडत असतो की आवर्जून आपले सण पाळावेसे वाटतात. बाकी हात पसरायचं बोलशील तर, आपल्या प्रिय व्यक्तींकरता सदैव याचकच असतं मन.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2010 - 8:49 pm | llपुण्याचे पेशवेll

बाकी हात पसरायचं बोलशील तर, आपल्या प्रिय व्यक्तींकरता सदैव याचकच असतं मन.
मस्तं. सहमत.
वटसावित्रीच्या कथेतून शिकायची काय तर सावित्रीची जिद्द. तिने पतीला यमाच्या कचाट्यातून सोडवून आणलं .

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

टारझन's picture

25 Jun 2010 - 9:12 pm | टारझन

यु सेड इट पेशव्या ...
बाकी म्हणशील तर ह्या कथेवरुन यमराज मला अंमळ मंद वाटतात =))

- (यमदुत) टारझन

पंगा's picture

25 Jun 2010 - 9:30 pm | पंगा

यमराज मला अंमळ मंद वाटतात

रेड्यावर बसतात, म्हटल्यावर... वाण नाही पण... दुसरे काय होणार?

संगतीचा परिणाम, आणखी काय?

(पण मंद आहेत तेच बरे आहे. इथे कोणाला मरायची घाई झाली आहे?)

- पंडित गागाभट्ट.

सहज's picture

25 Jun 2010 - 9:37 pm | सहज

पण रेड्याची संगत, वाण, गुण काढलात.
महाराष्ट्रातल्या रेड्यात वेद वगैरे म्हणण्याचे ज्ञान आले होते ना? आता यमराज म्हणल्यावर त्यांच्याकडे उत्तमोत्तम रेडा असण्याची शक्यता धरायला तुमची हरकत नसावी. परत वेदात सर्व नसले तरी भरमसाठ ज्ञान आहे असे म्हणतात (ऐकीव माहीती)

असो तर नक्की कोणाच्या संगतीचा (दुष)परिणाम काढलात म्हणायचे?

पंगा's picture

25 Jun 2010 - 9:54 pm | पंगा

महाराष्ट्रातल्या रेड्यात वेद वगैरे म्हणण्याचे ज्ञान आले होते ना?

फक्त एका रेड्यात. तोही संगतीचाच परिणाम.

आता यमराज म्हणल्यावर त्यांच्याकडे उत्तमोत्तम रेडा असण्याची शक्यता धरायला तुमची हरकत नसावी.

'उत्तमोत्तम' = 'वे.शा.पारंगत' हे आपले गृहीतक कशावर आधारलेले आहे, हे कळू शकेल काय?

सबब, यमाकडील रेडा, (रेड्याच्या स्पेसिफिकेशन्सप्रमाणे) उत्तमच होता.

(अवांतरः महाराष्ट्रातील रेड्याची कथा चुकीच्या रीतीने समजली गेलेली आहे, असे आमचे नम्र प्रतिपादन आहे. प्रस्तुत रेड्याच्या ट्रेनराचा, 'हात् साल्यो! तुमचे वे.शा.पठण काय, माझा रेडादेखील करू शकतो. पक्षी: तुमचे वे.शा.पठण, यानी की घोकंपट्टी, आणि माझ्या रेड्याचे रेकणे, यांत काहीही फरक नाही.' असा दावा असावा, याबद्दल आम्हास खात्री आहे. परंतु 'सांगायला गेलो एक, अर्थ निघाला भलताच' असे प्रस्तुत ट्रेनराबद्दल झाले असावे. असो.)

परत वेदात सर्व नसले तरी भरमसाठ ज्ञान आहे असे म्हणतात (ऐकीव माहीती)

असेल बुवा. मी वाचायला गेलेलो नाही, त्यामुळे कल्पना नाही.

- पंडित गागाभट्ट.

सहज's picture

25 Jun 2010 - 10:07 pm | सहज

जर मर्त्य लोकात असलेल्या रेड्यात वेद म्हणायची पॉवर तर यमलोकी व इतर कोणकोणत्या लोकी येजा करायची पॉवर असलेल्या रेड्यात स्पेशल पॉवर असावी असे गृहीतक.

पुर्वी राजे-महाराजे यांच्याकडे उत्तमोत्तम चीजवस्तु असत.(म्युझीयम कलेक्शन्स पाहून) यमाकडे तर प्रभावी अस्त्र यमाला खुश करायला बेस्ट ऑफ द बेस्ट रेडा कोण्या ट्रेनरने दिला असायची शक्यता वाटते. (आठवा: इंद्राचा ऐरावत, वेताळचा तुफान इ.)

बाकी या चर्चेत तुमच्या संगतीत राहून थोडे आधीक तर्कट व्हावे हा हेतु ;-)

त्याला मोड ऑफ ट्रान्स्पोर्टेशन म्हणून रेडा पाहिजे. त्याला वेद येणे हे क्वालिफिकेशन असू शकत नाही. नुसता रेकला तरी पुरे. हॉर्न म्हणून तेवढे पुरेसे आहे.

यमाला खुश करायला बेस्ट ऑफ द बेस्ट रेडा कोण्या ट्रेनरने दिला असायची शक्यता वाटते.

रेड्याला वेद येण्यात व्हॅल्यू अ‍ॅडिशन नेमके काय होते? या जास्तीच्या फीचरचा नेमका फायदा काय? रिव्हर्स हॉर्न म्हणून? रेडा मारुति मेकचा आहे काय?

उगाच काहीतरी गिमिक्स करून रेड्याची किंमत वाढवायची झाले!

आणि एवढे करून स्पीडच्या नावाने मात्र बोंब. म्हणजे जे पाहिजे त्याचा पत्ता नाही, आणि नको त्या फीचर्सची किंमत.

थोडक्यात, यमा हॅज़ बीन हॅड. ही हॅज़ बीन हँडेड अ‍ॅन ओव्हरप्राइस्ड लेमन विथ यूसलेस (हा शब्द मिभोकाकांकडून साभार.) फीचर्स. त्याने कन्झूमर कोर्टात तक्रार नोंदवली पाहिजे.

(शिवाय सेफ्टी फीचर्सचे काय? रेड्यावरून जाणारा प्रत्येक पॅसेंजर - यम वगळल्यास - हमखास मरतो, असे निरीक्षण आहे.)

- पंडित गागाभट्ट.

टारझन's picture

25 Jun 2010 - 10:32 pm | टारझन

यमाचा रेडा कितीही गुणवाण , बुद्धीवाण असला तरी तो भरोष्याचा णक्कीच नव्हता (असं ऐकलंय) ... त्याची णसबंदी केली होती म्हणे यमाने ... यम म्हणे आपण संपवायची कामं करायची की आपलाच उपद्व्याप वाढवायचा ?

(सौजन्य : ऐकिव माहिती)

पंगा's picture

25 Jun 2010 - 10:43 pm | पंगा

त्याची णसबंदी केली होती म्हणे यमाने ... यम म्हणे आपण संपवायची कामं करायची की आपलाच उपद्व्याप वाढवायचा ?

आता रेड्याची गरज आहे म्हटल्यावर उपद्व्याप वाढले म्हणून तक्रार करून कशी चालेल? एकच रेडा किती दिवस पुरेल? आणि त्यानंतर काय? दुसरा रेडा तर पाहिजे ना?

की यमाने "(रेड्याचे) पुढील सात जन्म मला हाच रेडा मिळो" असे काही व्रतबीत केले होते? (काँट्रॅक्ट ऑटोमॅटिकली रिन्यूएबल अपॉन एक्स्पिरेशन?)

अवांतरः रेड्याची वेळ भरली, की यम त्याला रेड्यावरूनच नेत असेल का? (मनात चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतोय. जमत नाहीये. तसे चित्रकलेत आम्ही पहिल्यापासून कच्चेच! :()

- पंडित गागाभट्ट.

सहज's picture

25 Jun 2010 - 10:49 pm | सहज

ऐकीव माहीती. यमाकडे म्हणे आधी एक यादी येते. त्यात जर रेड्याचे नाव असेल तर त्या दिवशीसाठी यमाकडे दुसरा रेडा तयार असावा.

अगेन एका पेक्षा जास्त रेडे तयार ठेवणे यमाच्या दृष्टिने फायद्याचे.

असो सध्या "पिंम्प माय रेडा" असा यमाच्या गोठ्यातला यमलोकातला रिएलिटी शो असेल का ह्याचे चित्र नजरेसमोर आणतो आहे.

सहज's picture

25 Jun 2010 - 10:34 pm | सहज

एवढ्या लांबच्या प्रवासाला, चांगली कंपनी देइल. ऐनवेळी बिघणार नाही किंवा अटीतटीच्या वेळी सांभाळून घेईल उदा. अवघड रस्ता, यम झोपला असताना काइन्डा ऑटोपायलट.

रेग्युलर रुटस नव्हेत तर प्रोसीजरस समजणारा. दाउदचा ड्रायवर काही सामान्य ड्रायव्हर नसणार, काही स्पेशल स्किल्स असणारच.

कोणी वे.शा. संपन्न तर्क करुन यमाला अर्ध्या वाटेत फसवु लागला तर बॅकप म्हणुन वेद लोड केलेला रेडा असणे तर अगदीच उपयुक्त असणार.

अगेन तुमचे निरिक्षण रेड्यावर पेसेंजर हमखार मृत्यु धरले तर हा स्पेशल पॉवर असलेलाच रेडा असणार नाहीतर कधीतरी एक्सीडेंटली यमाची बातमी पेपरात आली असती की.

Nile's picture

25 Jun 2010 - 10:56 pm | Nile

काय लोक आहेत हे वरचे. वटपोर्णिमेच्या धाग्यावर सगळ्या पतिव्रता असतात हो! तुमचे विचारजंती फंडे पोरींना इम्प्रेस करायला इथे तरी वापरु नका!

-Nile

शिल्पा ब's picture

25 Jun 2010 - 11:02 pm | शिल्पा ब

विचारजंत पोरीना इम्प्रेस करतात हे कोणी सांगितलं...इम्प्रेस करायला विचारजंत असण्यापेक्षा थोडा चांगला चेहरा आणि थोडी डार्क साईड आणि पिळदार बॉडी पाहिजे....(हे आपलं आमचा निरीक्षण)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Nile's picture

25 Jun 2010 - 11:30 pm | Nile

तुमचं निरिक्षण असेल हो काहीही, आणि बरोबर असेलही, पण त्यांना तसं वाटत नसेल कशावरुन?

-Nile

सहज's picture

25 Jun 2010 - 11:04 pm | सहज

इथे यमाच्या रेड्याबद्दल गंभीर चर्चा चालू आहे. कोण्या पतिव्रतेच्या वटपुजेत अडथळा नाही की कोण्या पोरीशी चर्चा अथवा पोरीबद्दल उल्लेख नाही.

अर्थात तुमच्या जिव्हाळ्याचा मात्र "तो विषय" दिसतोय. चला मोठे व्हा!

शिल्पा ब's picture

25 Jun 2010 - 11:18 pm | शिल्पा ब

इतकं "तो विषय " म्हणायला काय झालं आता? वरती उल्लेख झाला म्हणून आपला आम्ही सांगितलं ....रेड्याच्या चर्चा चालू द्या... आमचा पण - १

पिटुकली शिल्पा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

25 Jun 2010 - 11:07 pm | पंगा

एवढ्या लांबच्या प्रवासाला, चांगली कंपनी देइल.

'वेद ऐकवणे' ही जर यमाची 'चांगल्या कंपनी'ची कल्पना असेल, तर 'अवर टेस्ट्स डिफर' एवढेच म्हणून सोडून देणे मला भाग पडते.

ऐनवेळी बिघणार नाही किंवा अटीतटीच्या वेळी सांभाळून घेईल उदा. अवघड रस्ता, यम झोपला असताना काइन्डा ऑटोपायलट

वेदाची सीडी लावल्याने वाहन ऐन वेळी बिघडत नाही? याबद्दल पुरेसा विदा उपलब्ध आहे का? की ही केवळ वैयक्तिक निरीक्षणांतून उद्भवलेली अंधश्रद्धा आहे?

आणि वेदाची सीडी = झोपेसाठी ऑटोपायलट्/क्रूझ कंट्रोल? वापरून पाहण्याचा मोह होतो, पण त्यानंतर मी गाडीतून थेट रेड्यावर (यमाच्या की रस्त्यावरच्या कोठल्याही हा प्रश्न येथे गौण आहे.) सापडेन, अशी भीती वाटते. नकोच ते!

रेग्युलर रुटस नव्हेत तर प्रोसीजरस समजणारा.

वेद हे ड्रायव्हर्स मॅन्युअल असू शकतात याची कल्पना नव्हती. धन्यवाद.

कोणी वे.शा. संपन्न तर्क करुन यमाला अर्ध्या वाटेत फसवु लागला तर बॅकप म्हणुन वेद लोड केलेला रेडा असणे तर अगदीच उपयुक्त असणार.

त्यासाठी वेदांतले काउंटरआर्ग्युमेंट कशाला पाहिजे? डिलीट बटण पुरेसे आहे.

अरे हो, पण मुळात प्रवासाअंती डिलीट बटण मारण्यासाठीच तर पॅसेंजर घेतलेला आहे, नाही का? म्हणजे अर्ध्या वाटेवर डिलीट बटणाची सोय नसावी.

दुसरा उपाय आहे. तो म्हणजे हिंदीत उत्तरे देणे. गप्प नाही बसला, तरी विषयांतर नक्कीच होते. (बहुधा यमाने रेड्याचे मुके घेत कसे बसावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळते. त्याची यमाला फारशी गरज नसतेच. त्यामुळे यम निवांत झोपी जाऊ शकतो.)

याकरिता जास्त हिंदी येण्याचीही फारशी गरज नसावी. 'हँय गुरू?' आणि 'अबे चूप!' एवढे वाक्प्रचार माहीत असले तरी पुरेसे आहे.

अगेन तुमचे निरिक्षण रेड्यावर पेसेंजर हमखार मृत्यु धरले तर हा स्पेशल पॉवर असलेलाच रेडा असणार नाहीतर कधीतरी एक्सीडेंटली यमाची बातमी पेपरात आली असती की.

याचा अर्थ रेडा १९९४ मॉडेलचा आहे. फक्त त्या वर्षीची मँडेटरी सेफ्टी फीचर्स आहेत, त्याहून अधिक नाहीत. (फक्त ड्रायवर-साइड एअरबॅग.)

- पंडित गागाभट्ट.

नितिन थत्ते's picture

25 Jun 2010 - 11:22 pm | नितिन थत्ते

>>याचा अर्थ रेडा १९९४ मॉडेलचा आहे. फक्त त्या वर्षीची मँडेटरी सेफ्टी फीचर्स आहेत, त्याहून अधिक नाहीत. (फक्त ड्रायवर-साइड एअरबॅग.)

ऐकीव माहितीनुसार रेडा +१९९४ चे मॉडेल नसून -१९९४ चे मॉडेल आहे. आपल्या हुशार पूर्वजांनी -१९९४ मध्येच +१९९४ कम्प्लायंट मॉडेल बनवले होते.

नितिन थत्ते

सहज's picture

25 Jun 2010 - 11:31 pm | सहज

भले तुमच्यामते अजुन वेगळी फीचर्स असावीत. वे.शा पारंगत रेडा हे काही युजलेस फीचर नाही. (संदर्भ - अर्ध्या वाटेत डिलीट बटन वापरता येत नाही. मोडक्या तोडक्या हिंदीत, एखादा मराठी वे.शा. संपन्न म्हणु शकला असता सध्या महाराष्ट्रासे प्रदेशसे हम प्रवास करत्ये आहे. तर इधरकु हमशे मराठीच बोलनेका. मी मराठीच बोलणार, आमच्या वेदात असे लिहले..) यावरुन सुचले रेड्यात भारतातल्या हजारो काय किती असतील तितक्या भाषा त्या रेड्याला येण्यात यमाचा फायदा आहे. कुठल्याही दिवशी वेगवेगळ्या प्रांतात जावे लागले व नेमके काही कारणाने यमाचा घसा आला, मौन व्रत असले इ इ.

शिवाय वे.शा. तर एक फीचर्स झाले, तो रेडा सर्वगुणसंपन्न असु शकेल व त्याचे तसे असणे यमाच्या फायद्याचे होते.

आता तर असे वाटू लागले आहे की कोणत्याही मर्त्य मानवाला पुरुन उरेल इतका शहाणा रेडा यमाकडे असला पाहीजे होता अन्यथा त्याला कामावरुन डच्चू मिळू शकला असता किंवा खाते फेरबदल झाले असते.

सबब तुमचा मुळ मुद्दा रेड्याची संगत, वाण नाही ... इ पटले नाही.

असो तूर्तास इतकेच. :-)

पंगा's picture

25 Jun 2010 - 11:34 pm | पंगा

कुठल्याही दिवशी वेगवेगळ्या प्रांतात जावे लागले व नेमके काही कारणाने यमाचा घसा आला, मौन व्रत असले इ इ.

"मौनं सर्वार्थसाधनम्"बद्दल कधी ऐकले नाही काय?

हा तर हिंदी बोलण्याहूनही उत्तम उपाय! उत्तर द्यायचे नाही. घालू दे एकट्याला जितका घालायचा तितका वाद!

असो.

- पंडित गागाभट्ट.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2010 - 9:26 pm | llपुण्याचे पेशवेll

अरे तसं नाही रे.... मी तुझ्यापेक्षा जास्त हुषार झालो म्हणजे तू मंद झालास असे नाही रे... तू ही हुषार मी ही हुषार. फक्त तू १ हुषार तर मी सव्वा हुषार. तसं ती सावित्री सव्वा हुषार ठरली. :)
कळलं का?

(हुषार_)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

मेघवेडा's picture

25 Jun 2010 - 9:37 pm | मेघवेडा

टार्‍या, सही अंमळ चुकली का रे? यापेक्षा सुटेबल पर्याय उपलब्ध होता म्हणून विचारलं! ;)

धाग्याचा खफ झालाच आहे आता.. चालू द्या! ;)

शैलेन्द्र's picture

25 Jun 2010 - 6:10 pm | शैलेन्द्र

इतकी वर्ष देव्या एकाच डीपार्टमेंटला आहेत, भन्नाट सेटींग झालं असणार त्यांच... अशान भ्रष्टाचार वाढतो, सरकारने बदली केली पाहीजे आता...

वेताळ's picture

25 Jun 2010 - 5:42 pm | वेताळ

:D
कधी वड ह्या दोर्‍यांच्या बंधनातुन मुक्त होणार देवालाच माहित.
वडाबद्दल सहानुभुती वाटते. :D

वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jun 2010 - 5:43 pm | परिकथेतील राजकुमार

छान :)

खरडफळ्याची सोय ह्या धाग्यावर हलवली आहे का ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शुचि's picture

25 Jun 2010 - 5:46 pm | शुचि

हा तत्कालीन धागा अहे खुशाल ख फ करावा ;)

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

jaypal's picture

25 Jun 2010 - 7:54 pm | jaypal

(ती पुजेला जाउ नये म्हणुन) मीच बायकोला दो-याने बांधुन ठेवतो. :T
gfgdf
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

स्पंदना's picture

25 Jun 2010 - 8:43 pm | स्पंदना

हा हा हा हा! हु हु हु हु! अयया आइ ग्ग ! हा हा हा हु हु ..थांबा हो..पोटात दुखायला लागल वाचुन. आइइ ग!! हा हा हा

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

रामदास's picture

25 Jun 2010 - 7:58 pm | रामदास

एकदा वेळ काढून "सौन्दर्य लहरी" च्या इतर श्लोकांबद्दल पण लिहा.

स्पंदना's picture

25 Jun 2010 - 8:46 pm | स्पंदना

शुची एव्हढ्या मोठ्या वडाला फेर्‍या घालायच्या म्हणजे जॉगिंग ला जायचे कपडे घालुन जाव लागेल, साडी नाही चालायची.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

Nile's picture

25 Jun 2010 - 9:10 pm | Nile

डान्या, मेवे, नंद्या अशा आमच्या समस्त बॅचलर मित्रांना वटपोर्णिमेच्या शुभेच्छा! दोर्‍या/पोर्‍या/फेर्‍यात अडकु नका!

-Nile

शुचि's picture

25 Jun 2010 - 9:24 pm | शुचि

पण डॉन यांच्या पत्नीचा फोटो पाहील्यासाराखा का वाटतो मला मिपा कट्ट्याच्या फोटोत? :?
नाही माझा काहीतरी गैरसमज झाला असावा ..

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

Nile's picture

25 Jun 2010 - 9:30 pm | Nile

पाहिला असेल ब्वॉ तुम्ही, पण तरीही तो अडकायचा नाही याची खात्री आहे आम्हाला.

काय रे डान्या, बायको म्हणुन घेउन गेला होतास काय लेका?

-Nile

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2010 - 9:31 pm | llपुण्याचे पेशवेll

छे छे .. त्याची कोणी बायको नाहीये.. सगळ्या ष्टेप्न्याच हायेत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

Nile's picture

25 Jun 2010 - 10:13 pm | Nile

फॅमिली कट्ट्याला बायको म्हणुन मिरवली असेल रे एखादीला पुप्या.. तुला तर माहितच आहे डान्या...

-Nile

टारझन's picture

25 Jun 2010 - 9:35 pm | टारझन

डाण्याच्या स्टेपण्या अंमळ गोटा (पक्षी: गुळगुळीत) झाल्यात असं कोण तो गॅरेजवाला म्हणत होता बॉ =))

- (ग्रीपवाल्या स्टेपण्याधारी) टारझन

छोटा डॉन's picture

25 Jun 2010 - 11:45 pm | छोटा डॉन

डॉन्या आणि कट्ट्याला ?
डॉन्या आणि त्याची बायको ?
डॉन्या आणि त्याची बायको आणि ती पण कट्ट्याला ?
डॉन्या आणि स्टेपनी ?
डॉन्या आणि स्टेपन्या ?
डॉन्या आणि त्याच्या स्टेपन्या आणि त्यापण अम्बळ टकल्या ?

चाल्लो मी हिमालयात !
नान्या, आहेस ना रे बाबा तिकडे ?

------
( अम्बळ गंडलेला ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

Nile's picture

26 Jun 2010 - 12:29 am | Nile

का बे, देशावरच्या संपल्या काय्?नविन शोधायला थेट तिकडे चाललास ते?

-Nile

जागु's picture

25 Jun 2010 - 9:52 pm | जागु

शुची तुला आणि सर्व सावित्र्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.

शिल्पा ब's picture

25 Jun 2010 - 10:01 pm | शिल्पा ब

मी उगाच असली व्रतं करत नाही...या जन्मात काय काय होईल याची माहिती नाही आणि लगेच पुढच्या जन्माचा (तेसुद्धा ७) नवरा बुक कशाला करा?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

25 Jun 2010 - 10:07 pm | पंगा

बरोबर आहे. बल्क रेट/प्री-ऑर्डर कन्सेशन अथवा डिस्काउंट बर्‍यापैकी मिळत असल्याशिवाय असले घाऊक डील्स करण्यात कधीच पॉइंट नसतो. शिवाय काँट्रॅक्टमध्ये अर्ली टर्मिनेशन क्लॉज़ नाही. म्हणजे एकदा अडकल्यावर सुटका नाही. नकोच ते!

- पंडित गागाभट्ट.

टारझन's picture

25 Jun 2010 - 10:10 pm | टारझन

ह्या कण्सेप्ट मधे पुणर्जन्म कंसिडर केला , तर पुण्हा म्हैलेचाच जल्म मिळेल कशावरुन ?
समजा हे व्रत करुन फुडल्या जल्म्नात पुरुष म्हणुन जरी जल्मले तरीपण तोच नवरा काय ? आगायाया !! लै बग्ज आहेत !

-( फुडल्या जन्मी अंबानी घराण्यात जन्मायची स्वप्ण पहाणारा ) टुकार टिंबाणी

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2010 - 10:11 pm | llपुण्याचे पेशवेll

समजा हे व्रत करुन फुडल्या जल्म्नात पुरुष म्हणुन जरी जल्मले तरीपण तोच नवरा काय ? आगायाया !! लै बग्ज आहेत
हॅ हॅ हॅ.. आजूबाजूच्या बदलांकडे बघा की हो टारोबा.
मला उगाच Give me some sunshine आठवून गेले.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

टारझन's picture

25 Jun 2010 - 10:16 pm | टारझन

आयला खरंच की =)) या बग ला इन्व्हॅलिड म्हणुन डिस्कार्ड करण्यात आले आहे ...

नितिन थत्ते's picture

25 Jun 2010 - 10:16 pm | नितिन थत्ते

युयुत्सु दिसले नाहीत या धाग्यावर. :?

सप्तपदी सारख्याच या फेर्‍यांनी फण नक्की काहीतरी वाईट होत असणार.

नितिन थत्ते

Nile's picture

25 Jun 2010 - 10:21 pm | Nile

पुरुषांसाठी वाईटच की! ;)
सेक्सिस्ट झालोच आहे नाहीतरी

-Nile

प्रियाली's picture

25 Jun 2010 - 10:28 pm | प्रियाली

थँक यू हं!

कवितानागेश's picture

26 Jun 2010 - 1:54 am | कवितानागेश

मी नित्यनेमाने हे असे सण विसरते!
दिवसभर सगळीकडे लय नटलेल्या बायका पहिल्या की कधितरी ट्यूब पेटते...
मग मी चडफडते.. च्यायला, साडी नेसायचा १ चान्स गेला ! नुस्त्या कपाटात पडून राहतात!
..आजपण तसेच झालय...
============
(तंद्रट, आळशी )माउ

रेवती's picture

26 Jun 2010 - 2:59 am | रेवती

बापरे!
या धाग्यावर कायकाय चालले आहे.
बास करा आता. यमाची, त्याच्या रेड्याची, बायको, स्टेपनी आणि अजून कसली चर्चा सुरू करून वाढवत नेणार आहात मंडळी?

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jun 2010 - 10:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> बास करा आता. <<
ऑसं कॉसं, ऑसं कॉसं, रॅव्तीताई?? चॉर्चा ही झॉलीच पॉहिजे.

काय म्हणे डॉन्याची बायको?? त्सेंटापण विचारत होती डॉन्याच्या लग्नाबद्दल!
कसल्या डोंबल्याच्या पद्धती आणि सणवार? मनात आलं की दोनचार पुरणपोळ्या आणायच्या आणि हादडायच्या. हाताशी कामाला व्हॉलेंटीयर असले तर दहावीस घरीही बनवता येतात ... तीच गत श्रीखंड, गुलाबजाम, चकल्या, कडबोळ्याची! हव्येत कशाला ते सण!
जेटमाऊलींची म्हणणं मान्य आहे, कपाटातल्या साड्यांना हवा लागू द्यायची असेल तर एकतर कॉन्फरन्स-डीनर शोधावा नाहीतर सणवार!

अदिती

तिमा's picture

27 Jun 2010 - 5:48 pm | तिमा

फायनल कॉमेंट ऐका. हल्ली बायकांना वडाकडे जायला वेळ नसतो. म्हणून वटपोर्णिमेला वडापाव खाऊन 'वडा पाव' असे फक्त म्हणावे.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

केदार-मिसळपाव's picture

12 Jun 2014 - 9:01 pm | केदार-मिसळपाव

तिमा, "वदा-पाव" आवडले.

अनुप ढेरे's picture

12 Jun 2014 - 9:00 pm | अनुप ढेरे

यम आणि रेड्याची कहर चर्चा!!

प्रसाद गोडबोले's picture

13 Jun 2014 - 6:35 pm | प्रसाद गोडबोले

ह्यावरुन आठवले ....एकदा यम आणि यमीची चर्चा निवांत वेळ काढुन वाचायची आहे :)

आयुर्हित's picture

13 Jun 2014 - 11:19 am | आयुर्हित

वटपोर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व मिपाकारांना मनापासुन शुभेच्छा.

निसर्ग देतांना इतके भरभरुन देत असतो की घेतांना आपली झोळी कमीच पडते. मनूष्यप्राण्याला जीवन देणार्‍या प्रत्येक जिवाचे/वस्तुचे पुजन करुन त्यांचा मान वाढविणे हेच आपली भारतीय संस्क्रुति शिकवते व वेळोवेळी आपल्या देवांनीही व क्रुष्णानेही गोवर्धन पूजा करुन आपल्याला याचा आदर्श पाठ शिकवला आहे.

या निमित्ताने निसर्गाचे संवर्धन करायचा निश्चय करुन,प्रत्येकाने आपआपल्यापरीने खारिचा वाटा उचलावा, हिच विनंती.

महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ

अश्या वेळी तू आपल्या पतीसमवेत विहार करतेस असा ह्या ओळीचा अर्थ अहे.
सौदर्य लहरी मध्ये सर्वत्र आपल्या परमशिवस्वरूप पतीसमवेत विहार करणारी त्रिपुरसुन्दरी असा देवीचा उल्लेख आहे

मदनबाण's picture

14 Jun 2014 - 12:10 pm | मदनबाण

नवर्‍यावर आपली "वट" राहावी म्हणुन स्त्रीया वटपोर्णिमा साजरी करतात... :p हाच त्यांचा छुपा अजेंडा असतो ! :secret:
ते यम-रेडा इं... सगळी कॉन्स्पिअरसी थेअरी आहे बघा. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }