एका अवलियाची भटकंती- किक स्कूटर

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
23 Sep 2022 - 5:57 pm

नमस्कार मंडळी
या लेखात आपल्याला एका भटक्या अवलियाची ओळख करून देणार आहे. जगभर अशी अनेक उदाहरणे आपण नेहमीच पाहत,वाचत,ऐकत असतो. पण असा अवलिया आपला "बॉय नेक्स्ट डोअर" असेल तर?

माझा ट्रेकिंग मधील जुना परिचित वर्तकनगर ठाण्याचा रहिवासी राजेश खांडेकर हा असाच एका भटक्या. राजेशचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. पण साधारण १९९० पासून राजेशच्या सायकल मोहीम सुरु झाल्या. ठाणे वज्रेश्वरी -१२० कि.मी. ठाणे नाशिक -५२० कि.मी. अशा एकेक मोहिमा फत्ते करता करता राजेशचा आत्मविश्वास वाढतच गेला आणि पुढे १९९७ मध्ये त्याने आणि कल्याणच्या संजय करंदीकरने मिळून ऑल इंडिया सायकल ट्रिप केली ज्यामध्ये त्या दोघांनी अंदाजे १४००० कि.मी. अंतर सायकल चालवली होती.

त्याच्या ही पुढची भरारी म्हणजे राजेशने २००९ मध्ये जवळपास १७००० कि. मी. ची म्यानमार-थायलंड -हाँग काँग-चीन-कोरिया-जपान-युरोप (झेक,ऑस्ट्रिया,जर्मनी,बेल्जीयम,फ्रांस,इटली,टर्की) अशी सफर सायकलवरून केली. २०१४ मध्ये त्याने बांगलादेश ते न्यूझीलंड अशी ११ देशांची १९००० कि.मी. ची सायकल सफर केली आणि कोरोनाने सर्व व्यवहार ठप्प झाले त्या आधी म्हणजे २०२० मध्ये तो अर्जेंटिना ते कॅनडा अश्या सफरीवर होता. पण दुर्दैवाने एक आठवडा पूर्ण होता होताच त्याला कोविडचा फटका बसला आणि व्हिसा वगैरेंच्या अडचणींमुळे साधारण ८०० कि.मी. नंतर ती ट्रिप त्याला अर्धवटच सोडावी लागली. आता खरे सांगायचे तर ह्यातील एकेक सफर म्हणजे आठवणींचा आणि अनुभवांचा खजिनाच आहे असे म्हणायला हरकत नाही. पण इतक्यावर स्वस्थ बसेल तो राजेश कसला?

राजेशचे सायकलिंग मधील गुरु उमेश ठाकूर आणि सविता ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनामुळे कोविड संपता संपता तो अजून एका मोहिमेच्या तयारीला लागला. लहान मुले पायाने ढकलत जी स्कुटर चालवतात म्हणजे किक स्कुटर , त्यावरून एक मोहीम करायचा किडा त्याला चावला. त्याने स्वतःच भंगारातून सामान ,सायकलचे पार्ट वगैरे आणले आणि वेल्डिंग आणि इतर तंत्र वापरून ही किक स्कुटर बनवली. अर्थात ही स्कुटर बनवताना त्याला बराच विचार करावा लागला. जसे की जमिनीपासून उंची किती असावी, दोन चाकातले अंतर, बसायची सीट कुठे,सामान बांधायला जागा वगैरे अनेक गोष्टी. मात्र बरेच दिवस खटपट केल्यानंतर साधारण १२००० रुपये खर्चात ही किक स्कुटर एकदाची बनली. मग एकीकडे कुठली मोहीम या स्कुटरवरून करता येईल याची चाचपणी तर दुसरीकडे ही स्कुटर चालवायची प्रॅक्टीस सुरु झाली. राजेश राहत असलेल्या भागातच तो रोज १०-२० कि.मी. प्रॅक्टिस करू लागला.पण स्कुटर चालवून रस्त्यावर केलेली अशी प्रॅक्टिस खरेतर नावालाच असते कारण प्रत्यक्ष ट्रीपमध्ये स्कुटरवर असणारे सामान वगैरे त्यात नसते.शिवाय रस्त्यामध्ये येणारी संकटे,भेटणारी चांगली वाईट माणसे, बदलणारे हवामान, खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या गैरसोयी हे काहीच त्यात समजत नाही.

पुढे विचार आणि चर्चा करता करता त्याने असे ठरवले की आपल्या प्रवासाची सुरुवात जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता उमलिगला पास, समुद्रसपाटीपासुन १९०२४ फूट, येथून करून कन्याकुमारी ० फूट येथे मोहीम संपवावी.

w1

w1

w1

w1
हा साधारण ९० ते १०० दिवसांचा प्रवास असेल ज्यात अंदाजे ४२०० कि.मी. अंतर पार करावे लागेल.
w1

मग काय? ठरले तर आणि राजेश तयारीला लागला. आधीच्या मोहिमेतील रेल्वेने किवा बसने सायकल न्यायचा अनुभव तितकासा चांगला नसल्याने त्याने मुंबई -लेह विमान प्रवास निवडला. बँकेत जे काही पैसे जमा होते त्यातून तीन महिने आधी तिकिटे काढली. आणि थोडेफार पैसे जवळ ठेवून पुढच्या काटकसरीची मनोमन तयारी करून स्वारी निघाली प्रवासाला. अर्थात मनाली पासून ए टी एम वगैरे मिळतील या हेतूने ए टी एम कार्डही जवळ ठेवले होतेच.
w1

w1

w1

w1

w1
तर सध्या हा अवलिया उमलिगला,मनाली,चंदीगड,आग्रा ,झाशी,नागपूर,हैदराबाद,चेन्नई,कन्याकुमारी या मार्गाने प्रवास करता करता ग्वाल्हेरजवळ धौलपूर येथे पोचला आहे आणि पुढे वाटचाल करतो आहे.
w1

रोज साधारण सूर्योदयाला प्रवास सुरु करायचा आणि सूर्यास्त व्हायच्या आधी एखादा पेट्रोल पंप किंवा पोलीस ठाणे किंवा मंदिर,गुरुद्वारा बघून आपला तंबू लावायचा असा त्याचा शिरस्ता असतो.
w1

w1

त्याचे प्रवासाचे अंदाजे ४० दिवस झाले आहेत आणि पन्नासेक दिवस बाकी आहेत. प्रवासात मोबाईल ला नीट रेंज येत नसल्याने आमचे अतिशय कष्टाने बोलणे झाले ते ही तुटक तुटक. म्हणुन मग बाकीची माहिती मी कायप्पावरून मागवली.
w1
राजेशला विचारले की तुला प्रवासात काय विशेष अनुभव आले? तर त्याने सांगितले की तसे विशेष संकट वगैरे काही आले नाही. पण बरेच मजेशीर अनुभव आले. बरेच लोक त्याला वाटेत थांबवून विचारतात की ह्या स्कुटरला बॅटरी आहे का? कुठे लावली आहे?गियर किंवा इंजिन आहे का? पण फक्त पायाने ढकलायची स्कुटर आहे हे कळल्यावर लोक तोंडात बोटे घालतात.
w1
काही ठिकाणी लोक आग्रहाने चहा पाणी विचारतात तर कुठे स्कुटरला धक्का मारायला मदत करतात.एक दोन ठिकाणी उर्मट पोलीस भेटले पण साधारण चांगले लोकच भेटतात. राजेश एकदा जय गुरुदेव मंदिरात राहिला असताना त्याचा पाय इतका दुखत होता कि जमिनीवर टेकवता येत नव्हता.तेव्हा तेथील कर्मचाऱ्याने त्याचे पाय क्रीम लावुन मालिश करून दिले .शिवाय दुसऱ्या एका सफाई कामगाराने घरून जेवणही आणून दिले. असे अनेक किस्से राजेशच्या पोतडीत जमा झाले आहेत.

w1

खरेतर राजेश नेहमीच प्रथमोपचाराचे साहित्य जवळ ठेवतो, आणि प्रवासात तो फारसा कधी आजारी पडत नाही.पण आता सतत ४० दिवस स्कुटर चालवल्याने त्याचा उजवा पाय बऱ्यापैकी सुजून दुखायला लागला आहे. वेदनाशामक औषधे वगैरे घेऊन कितपत उपयोग होईल माहित नाही. आपण आशा करुया की त्याला लवकरच बरे वाटेल.

w1

पण मोहीम पूर्ण करायचा त्याचा आत्मविश्वास मात्र अजूनही भक्कम आहे. सर्वांच्या शुभेच्छा सोबत असल्यावर आणि एव्हढा दुर्दम्य आत्मविश्वास असल्यावर काय कठीण आहे? जगातील सर्व सायकलिंग मोहिमांपेक्षा वेगळी अशी ही मोहीम पूर्ण करून एक नवा विक्रम रचण्याची त्याची इच्छा आहे आणि हीच गोष्ट त्याला प्रवासात स्फूर्ती देत राहते असे तो म्हणतो. या मोहिमेबद्दल त्याने लिम्का बुक आणि गिनीज बुकलाही कळवले आहे.

सरते शेवटी आपल्या बॉर्डर रॉड ऑर्गनायझेशन ने लिहिलेले वाक्य त्याचे म्हणणे थोडक्यात सांगायला पुरेसे आहे. "आम्ही जगात कुठेही बांधकाम करू, मर्यादा फक्त आकाशाची"
w1

आणि अर्थातच अशा मोहिमांना आर्थिक पाठबळ लागते. त्यासाठी राजेशचे तपशील
w1

प्रतिक्रिया

कॅलक्यूलेटर's picture

23 Sep 2022 - 6:12 pm | कॅलक्यूलेटर

शिवाय कष्टप्रद असणार. हेही ओघाने आलेच

कर्नलतपस्वी's picture

23 Sep 2022 - 7:08 pm | कर्नलतपस्वी

सॅल्युट. या जगात भारावलेल्या
वेड्यांचा कमी नाही. पुढील प्रवासाकरता शुभेच्छा.

सहमत आहे...

सकारात्मक वेड, समाजोपयोगी असतेच....

उदाहरणार्थ, गुडईयर

या जगात भारावलेल्या वेड्यांची कमी नाही.

ह्याच्याशी सहमत पण,
सकारात्मक वेड, समाजोपयोगी असतेच....
स्वानंदासठी आणि एक अनोखा विक्रम नोंदवण्याच्या (दुय्यम) हेतुने ‘किक स्कुटर’ वरून (निर्विवादपणे धैर्याची कसोटी पहाणारा असा) केलेला हा ध्येयवेडा प्रवास ‘समाजपयोगी’ कसा ठरू शकेल हे नाही समजले.

कर्नलतपस्वी's picture

24 Sep 2022 - 5:24 pm | कर्नलतपस्वी

टर्मिनेटर भौ,तुमच्या प्रश्नाच उत्तर तुमच्याच प्रतिसादात आहे.

प्रत्येक गोष्ट समाजोपयोगी असावी असा आग्रह का? फक्त समाजाला त्रास देणारी नसावी एवढे मात्र खरे.

एकदा बसू या...

कपिलमुनी's picture

23 Sep 2022 - 9:18 pm | कपिलमुनी

स्वःकंडू शमवण्या व्यतिरिक्त अशा मोहिमांचे फलीत काय?
सायकल , बाईक अगदि चालत सुद्धा समजू शकतो पण अशी किक स्कूटर घेउन काय दाखवायचे आहे ?

हा प्रश्न म्हणजे स्त्री पुरुष मिलन झाल्यावर प्रत्येक वेळी मुल व्हावे असा विचार करण्यासारखे आहे.

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2022 - 2:10 pm | कानडाऊ योगेशु

माझ्याही मनात अगदी हाच विचार आला होता मुनीवर.
मधंतरी एक लेख वाचनात आला होता अ‍ॅथेलिटिक्स मध्ये सध्या सर्वायवल साठी (मराठी शब्द?) निरर्थक झालेल्य भालाफेक,थाळीफेक व तसेच १०० मीटर मध्ये ऊर फुटेस्तोवर धावणे ह्या सारख्या स्पर्धा घेण्याचे कारण काय?
तर त्या लेखात असे लिहिले होते कि अशा स्पर्धांनी एकुण मानवी क्षमता किती वाढु शकते त्याचे एक बेंचमार्कंग होत राहते. व एकुणच त्यातुन मानवी क्षमता वाढण्याचे शोध लागुन फायदा एकुणच मानवजातीला होत राहतो.
इथेही असाच प्रकार आहे. सध्या एकाने असा काहीसा चाकोरीबाहेरचा प्रकार वापरुन एक यात्रा केली पुढे जाऊन लाईक माईंडेड पिपल मिळाले तर ती एक मोठी मोहीम होऊ शकते.

MipaPremiYogesh's picture

23 Sep 2022 - 10:26 pm | MipaPremiYogesh

अरे काय भन्नाट माणूस आहे... कमाल ..पुढच्या वाटचाली करता शुभेच्छा

टर्मीनेटर's picture

24 Sep 2022 - 10:51 am | टर्मीनेटर

राजेश खांडेकरांच्या जीद्दीला आणि धाडसाला सलाम!

प्रचेतस's picture

24 Sep 2022 - 3:25 pm | प्रचेतस

भारीय हे, जिद्दी माणूस.

कुमार१'s picture

25 Sep 2022 - 11:57 am | कुमार१

पुढील प्रवासाकरता शुभेच्छा.

श्वेता व्यास's picture

25 Sep 2022 - 1:32 pm | श्वेता व्यास

अवलिया माणूस आहे खरा, पुढील वाटचालीस शुभेच्छा!

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Sep 2022 - 5:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि राजेशचा आज (२५ सप्टे.)वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याला मनोमन शुभेच्छा!!

विनोदपुनेकर's picture

25 Sep 2022 - 6:28 pm | विनोदपुनेकर

आमच्याकड असे काहीतरी विपरीत करणाऱ्या माणसांना डोक्यात पांगळे आहेत असे बोलले जाते.

पण असे काही तरी जगावेगळे धाडस करायला मेंदू वेडाच असावा लागतो मांसासंच

दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे हे सायकल प्रेमी आपणास सलाम

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Sep 2022 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार

राजेश खांडेकरांचा वेडेपणा फार आवडला.
त्यांच्या उरवरीत मोहिमेला हार्दिक शुभेच्छा.
इथे अपडेट टाकत रहा.
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2022 - 6:05 pm | चौथा कोनाडा

थक्क करून सोडणारा अवलीया आहे हा !
भारी किक स्कूटर बनवलीय ! ही चालवायची म्हणजे जिकीरीचे काम !
(ती चालवतानाचा व्हिडिओ टाकता येईल का ? नीट कल्पना येईल )
राजेश खांडेकर यांना सलाम आणि पुढील मोहिमांसाठी हार्दिक शुभेच्छा !

कंजूस's picture

26 Sep 2022 - 7:11 pm | कंजूस

अवलिया खरंच.

कानडाऊ योगेशु's picture

26 Sep 2022 - 7:50 pm | कानडाऊ योगेशु

राजेशच्या प्रवास मार्गाचे लाईव लोकेशन इथे देता येईल का?

कंजूस's picture

26 Sep 2022 - 8:28 pm | कंजूस

सोबत किती किलो वजन असते?

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Sep 2022 - 8:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

राजेशच्या मोबाइलला नीट रेंज मिळत नसल्याने बोलणे होऊ शकले नाही. लाईव्ह लोकेशन देणे सुद्धा जरा कठिण वाटतेय. पण कळतील तसे अपडेत टाकत राहिन इथे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Sep 2022 - 8:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

राजेशच्या मोबाइलला नीट रेंज मिळत नसल्याने बोलणे होऊ शकले नाही. लाईव्ह लोकेशन देणे सुद्धा जरा कठिण वाटतेय. पण कळतील तसे अपडेट टाकत राहिन इथे.

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 6:04 pm | चौथा कोनाडा

+१

अ ति शय रोचक आणि थरारक !
सलाम त्या जोडप्याला

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Sep 2022 - 7:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

एंड्युरन्सची कमाल आहे. आणि मनःशक्तीची सुद्धा

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Sep 2022 - 12:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

w7

शशिकांत ओक's picture

9 Nov 2022 - 10:45 pm | शशिकांत ओक

सुखरूप परत यावे आणि पुढच्या मोहिमेची तयारी करावी.

शशिकांत ओक's picture

9 Nov 2022 - 10:46 pm | शशिकांत ओक

सुखरूप परत यावे आणि पुढच्या मोहिमेची तयारी करावी.

शशिकांत ओक's picture

9 Nov 2022 - 10:46 pm | शशिकांत ओक

सुखरूप परत यावे आणि पुढच्या मोहिमेची तयारी करावी.

शशिकांत ओक's picture

9 Nov 2022 - 10:46 pm | शशिकांत ओक

सुखरूप परत यावे आणि पुढच्या मोहिमेची तयारी करावी.

शशिकांत ओक's picture

9 Nov 2022 - 10:47 pm | शशिकांत ओक

सुखरूप परत यावे आणि पुढच्या मोहिमेची तयारी करावी.

शशिकांत ओक's picture

9 Nov 2022 - 10:47 pm | शशिकांत ओक

सुखरूप परत यावे आणि पुढच्या मोहिमेची तयारी करावी.

शशिकांत ओक's picture

9 Nov 2022 - 10:47 pm | शशिकांत ओक

सुखरूप परत यावे आणि पुढच्या मोहिमेची तयारी करावी.

शशिकांत ओक's picture

10 Nov 2022 - 10:17 am | शशिकांत ओक

तसे आपणही करावे असे सुचवायला न कळत पडत राहिलेल्या प्रतिसादातून प्रेरणा मिळो.

डिझाईनमधे मेकॅनिकल अडवांटेज पाहिजे.
म्हणजे सायकलकडे पहा, चालणा-यापेक्षा सायकल चालवणारा पूढे जातो,
स्वत:चे वजन पावलांवर / गुडघ्यावर पेलावे लागत नाही हा दूसरा फायदा.

पण ह्यांच्या स्कूटरमधे हा मेकॅनिकल अडवांटेज दिसत नाही.
पाय सारखा जमिनीवर मारल्यामुळे,आघात केल्यासारखा गुडघ्यावर प्रहार होत असणार.
पाय सूजेल नाहीतर काय होणार.
ईच्छाशक्तीवर रेटायचं तर किती??

त्यामुळे हे आत्मक्लेश करुन घेणे असे वाटले.

कपिलमुनी's picture

27 Nov 2022 - 10:47 am | कपिलमुनी

उगाच काहीतरी वेगळं करायचं म्हणून केलेला विचित्र प्रयत्न एवढेच वर्णन

Nitin Palkar's picture

3 Dec 2022 - 5:57 pm | Nitin Palkar

जिद्दीला सलाम आणि उर्वरित मोहिमेला शुभेच्छा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Jun 2023 - 12:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

तूनळीवर हा व्हिडिओ मिळाला. राजेश कन्याकुमारीला पोचला आणि ट्रिप पूर्ण झाली.

https://youtu.be/BRWo_pCMNZA