एका अवलियाची भटकंती- किक स्कूटर
नमस्कार मंडळी
या लेखात आपल्याला एका भटक्या अवलियाची ओळख करून देणार आहे. जगभर अशी अनेक उदाहरणे आपण नेहमीच पाहत,वाचत,ऐकत असतो. पण असा अवलिया आपला "बॉय नेक्स्ट डोअर" असेल तर?
माझा ट्रेकिंग मधील जुना परिचित वर्तकनगर ठाण्याचा रहिवासी राजेश खांडेकर हा असाच एका भटक्या. राजेशचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. पण साधारण १९९० पासून राजेशच्या सायकल मोहीम सुरु झाल्या. ठाणे वज्रेश्वरी -१२० कि.मी. ठाणे नाशिक -५२० कि.मी. अशा एकेक मोहिमा फत्ते करता करता राजेशचा आत्मविश्वास वाढतच गेला आणि पुढे १९९७ मध्ये त्याने आणि कल्याणच्या संजय करंदीकरने मिळून ऑल इंडिया सायकल ट्रिप केली ज्यामध्ये त्या दोघांनी अंदाजे १४००० कि.मी. अंतर सायकल चालवली होती.
त्याच्या ही पुढची भरारी म्हणजे राजेशने २००९ मध्ये जवळपास १७००० कि. मी. ची म्यानमार-थायलंड -हाँग काँग-चीन-कोरिया-जपान-युरोप (झेक,ऑस्ट्रिया,जर्मनी,बेल्जीयम,फ्रांस,इटली,टर्की) अशी सफर सायकलवरून केली. २०१४ मध्ये त्याने बांगलादेश ते न्यूझीलंड अशी ११ देशांची १९००० कि.मी. ची सायकल सफर केली आणि कोरोनाने सर्व व्यवहार ठप्प झाले त्या आधी म्हणजे २०२० मध्ये तो अर्जेंटिना ते कॅनडा अश्या सफरीवर होता. पण दुर्दैवाने एक आठवडा पूर्ण होता होताच त्याला कोविडचा फटका बसला आणि व्हिसा वगैरेंच्या अडचणींमुळे साधारण ८०० कि.मी. नंतर ती ट्रिप त्याला अर्धवटच सोडावी लागली. आता खरे सांगायचे तर ह्यातील एकेक सफर म्हणजे आठवणींचा आणि अनुभवांचा खजिनाच आहे असे म्हणायला हरकत नाही. पण इतक्यावर स्वस्थ बसेल तो राजेश कसला?
राजेशचे सायकलिंग मधील गुरु उमेश ठाकूर आणि सविता ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनामुळे कोविड संपता संपता तो अजून एका मोहिमेच्या तयारीला लागला. लहान मुले पायाने ढकलत जी स्कुटर चालवतात म्हणजे किक स्कुटर , त्यावरून एक मोहीम करायचा किडा त्याला चावला. त्याने स्वतःच भंगारातून सामान ,सायकलचे पार्ट वगैरे आणले आणि वेल्डिंग आणि इतर तंत्र वापरून ही किक स्कुटर बनवली. अर्थात ही स्कुटर बनवताना त्याला बराच विचार करावा लागला. जसे की जमिनीपासून उंची किती असावी, दोन चाकातले अंतर, बसायची सीट कुठे,सामान बांधायला जागा वगैरे अनेक गोष्टी. मात्र बरेच दिवस खटपट केल्यानंतर साधारण १२००० रुपये खर्चात ही किक स्कुटर एकदाची बनली. मग एकीकडे कुठली मोहीम या स्कुटरवरून करता येईल याची चाचपणी तर दुसरीकडे ही स्कुटर चालवायची प्रॅक्टीस सुरु झाली. राजेश राहत असलेल्या भागातच तो रोज १०-२० कि.मी. प्रॅक्टिस करू लागला.पण स्कुटर चालवून रस्त्यावर केलेली अशी प्रॅक्टिस खरेतर नावालाच असते कारण प्रत्यक्ष ट्रीपमध्ये स्कुटरवर असणारे सामान वगैरे त्यात नसते.शिवाय रस्त्यामध्ये येणारी संकटे,भेटणारी चांगली वाईट माणसे, बदलणारे हवामान, खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या गैरसोयी हे काहीच त्यात समजत नाही.
पुढे विचार आणि चर्चा करता करता त्याने असे ठरवले की आपल्या प्रवासाची सुरुवात जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता उमलिगला पास, समुद्रसपाटीपासुन १९०२४ फूट, येथून करून कन्याकुमारी ० फूट येथे मोहीम संपवावी.
हा साधारण ९० ते १०० दिवसांचा प्रवास असेल ज्यात अंदाजे ४२०० कि.मी. अंतर पार करावे लागेल.
मग काय? ठरले तर आणि राजेश तयारीला लागला. आधीच्या मोहिमेतील रेल्वेने किवा बसने सायकल न्यायचा अनुभव तितकासा चांगला नसल्याने त्याने मुंबई -लेह विमान प्रवास निवडला. बँकेत जे काही पैसे जमा होते त्यातून तीन महिने आधी तिकिटे काढली. आणि थोडेफार पैसे जवळ ठेवून पुढच्या काटकसरीची मनोमन तयारी करून स्वारी निघाली प्रवासाला. अर्थात मनाली पासून ए टी एम वगैरे मिळतील या हेतूने ए टी एम कार्डही जवळ ठेवले होतेच.
तर सध्या हा अवलिया उमलिगला,मनाली,चंदीगड,आग्रा ,झाशी,नागपूर,हैदराबाद,चेन्नई,कन्याकुमारी या मार्गाने प्रवास करता करता ग्वाल्हेरजवळ धौलपूर येथे पोचला आहे आणि पुढे वाटचाल करतो आहे.
रोज साधारण सूर्योदयाला प्रवास सुरु करायचा आणि सूर्यास्त व्हायच्या आधी एखादा पेट्रोल पंप किंवा पोलीस ठाणे किंवा मंदिर,गुरुद्वारा बघून आपला तंबू लावायचा असा त्याचा शिरस्ता असतो.
त्याचे प्रवासाचे अंदाजे ४० दिवस झाले आहेत आणि पन्नासेक दिवस बाकी आहेत. प्रवासात मोबाईल ला नीट रेंज येत नसल्याने आमचे अतिशय कष्टाने बोलणे झाले ते ही तुटक तुटक. म्हणुन मग बाकीची माहिती मी कायप्पावरून मागवली.
राजेशला विचारले की तुला प्रवासात काय विशेष अनुभव आले? तर त्याने सांगितले की तसे विशेष संकट वगैरे काही आले नाही. पण बरेच मजेशीर अनुभव आले. बरेच लोक त्याला वाटेत थांबवून विचारतात की ह्या स्कुटरला बॅटरी आहे का? कुठे लावली आहे?गियर किंवा इंजिन आहे का? पण फक्त पायाने ढकलायची स्कुटर आहे हे कळल्यावर लोक तोंडात बोटे घालतात.
काही ठिकाणी लोक आग्रहाने चहा पाणी विचारतात तर कुठे स्कुटरला धक्का मारायला मदत करतात.एक दोन ठिकाणी उर्मट पोलीस भेटले पण साधारण चांगले लोकच भेटतात. राजेश एकदा जय गुरुदेव मंदिरात राहिला असताना त्याचा पाय इतका दुखत होता कि जमिनीवर टेकवता येत नव्हता.तेव्हा तेथील कर्मचाऱ्याने त्याचे पाय क्रीम लावुन मालिश करून दिले .शिवाय दुसऱ्या एका सफाई कामगाराने घरून जेवणही आणून दिले. असे अनेक किस्से राजेशच्या पोतडीत जमा झाले आहेत.
खरेतर राजेश नेहमीच प्रथमोपचाराचे साहित्य जवळ ठेवतो, आणि प्रवासात तो फारसा कधी आजारी पडत नाही.पण आता सतत ४० दिवस स्कुटर चालवल्याने त्याचा उजवा पाय बऱ्यापैकी सुजून दुखायला लागला आहे. वेदनाशामक औषधे वगैरे घेऊन कितपत उपयोग होईल माहित नाही. आपण आशा करुया की त्याला लवकरच बरे वाटेल.
पण मोहीम पूर्ण करायचा त्याचा आत्मविश्वास मात्र अजूनही भक्कम आहे. सर्वांच्या शुभेच्छा सोबत असल्यावर आणि एव्हढा दुर्दम्य आत्मविश्वास असल्यावर काय कठीण आहे? जगातील सर्व सायकलिंग मोहिमांपेक्षा वेगळी अशी ही मोहीम पूर्ण करून एक नवा विक्रम रचण्याची त्याची इच्छा आहे आणि हीच गोष्ट त्याला प्रवासात स्फूर्ती देत राहते असे तो म्हणतो. या मोहिमेबद्दल त्याने लिम्का बुक आणि गिनीज बुकलाही कळवले आहे.
सरते शेवटी आपल्या बॉर्डर रॉड ऑर्गनायझेशन ने लिहिलेले वाक्य त्याचे म्हणणे थोडक्यात सांगायला पुरेसे आहे. "आम्ही जगात कुठेही बांधकाम करू, मर्यादा फक्त आकाशाची"
आणि अर्थातच अशा मोहिमांना आर्थिक पाठबळ लागते. त्यासाठी राजेशचे तपशील

वाचने
11696
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
वाह! वेगळी भटकंती
सॅल्युट. या जगात भारावलेल्या
In reply to सॅल्युट. या जगात भारावलेल्या by कर्नलतपस्वी
या जगात भारावलेल्या वेड्यांची कमी नाही.
In reply to या जगात भारावलेल्या वेड्यांची कमी नाही. by मुक्त विहारि
या जगात भारावलेल्या वेड्यांची कमी नाही.
सकारात्मक वेड, समाजोपयोगी असतेच....स्वानंदासठी आणि एक अनोखा विक्रम नोंदवण्याच्या (दुय्यम) हेतुने ‘किक स्कुटर’ वरून (निर्विवादपणे धैर्याची कसोटी पहाणारा असा) केलेला हा ध्येयवेडा प्रवास ‘समाजपयोगी’ कसा ठरू शकेल हे नाही समजले.In reply to या जगात भारावलेल्या वेड्यांची कमी नाही. by टर्मीनेटर
टर्मिनेटर भौ,तुमच्या प्रश्नाच
In reply to या जगात भारावलेल्या वेड्यांची कमी नाही. by टर्मीनेटर
ह्या विषयावर बरेच सकारात्मक बोलता येईल...
फलीत ?
In reply to फलीत ? by कपिलमुनी
स्वःकंडू शमवण्या व्यतिरिक्त अशा मोहिमांचे फलीत काय?
In reply to फलीत ? by कपिलमुनी
माझ्याही मनात अगदी हाच विचार
अवलिया
राजेश खांडेकरांच्या जीद्दीला
भारीय हे, जिद्दी माणूस.
वा ! वा !!
अवलिया माणूस आहे खरा, पुढील
सर्व वाचकांचे धन्यवाद
डोक्यात पांगळे
मस्त
थक्क करून सोडणारा अवलीया आहे
थक्क करणारा प्रवास.
राजेशच्या प्रवास मार्गाचे
वेग काय पडतो ताशी?
पुन्हा एकदा सर्व वाचकांचे धन्यवाद
पुन्हा एकदा सर्व वाचकांचे धन्यवाद
चालत चालत लडाख वारी
In reply to चालत चालत लडाख वारी by कपिलमुनी
+१
In reply to +१ by चौथा कोनाडा
खरोखर!!
राजेश झाशीपर्यंत पोचला आहे.
अनोखा उपक्रमाला शुभेच्छा
अनोखा उपक्रमाला शुभेच्छा
अनोखा उपक्रमाला शुभेच्छा
अनोखा उपक्रमाला शुभेच्छा
अनोखा उपक्रमाला शुभेच्छा
अनोखा उपक्रमाला शुभेच्छा
अनोखा उपक्रमाला शुभेच्छा
सिंदबादच्या ७ सफरी जाहीर आहेत.
क्षमस्व पण मला ही कल्पना आवडली नाही
In reply to क्षमस्व पण मला ही कल्पना आवडली नाही by बाजीगर
गुड पॉइंट
जिद्दीला सलाम
राजेशची भटकंती