ताज्या घडामोडी- ऑगस्ट २०२२ (भाग २)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
6 Aug 2022 - 9:15 pm

पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले:

उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2022 - 9:36 pm | श्रीगुरुजी

छे, काहीतरीच काय विचारता? बिरूटे म्हणतात तेच अंतिम सत्य असताना जागा किती लढविल्या, पूर्वी किती आमदार निवडून यायचे हे आकडे कशासाठी पहायचे? मुंबईत १९८० मध्ये प्रचंड लाट असलेल्या इंदिरा कॉंग्रेसशी युती असूनही सेनेचे दोन्ही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते तरीही सेनाच मोठी. १९६७ मध्ये मुंबईत सेनेचा महाराष्ट्रद्रोही स. का. पाटलांना पाठिंबा असूनही ते पडले असले तरीही सेनाच मोठी बरं का.

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2022 - 9:30 pm | श्रीगुरुजी

सेना वयाने मोठी असली तरी मते किती मिळायची?

१९६७, १९७२ व १९७८ च्या निवडणुकीत वयाने मोठ्या सेनेचे शून्य आमदार निवडून आले होते, तर भाजपचा पूर्वावतार जनसंघाचे १९६७ मध्ये ४ व १९७२ मध्य ५ आमदार होते. १९७८ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाला होता व जनता पक्षाचे ९६ आमदार होते. बादवे, जनसंघ १९५२ मध्ये स्थापन झाला होता तर सेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली होती.

१९८० ला भाजप स्थापन झाला व दीड महिन्याने झालेल्या निवडणुकीत भाजपचे महाराष्ट्राच्या विविध भागातून स्वबळावर १४ आमदार निवडून आले होते. १९८५ मध्ये भाजपचे १६ तर सेनेचा फक्त १ आमदार होता.

म्हणजे १९८५ पर्यंत जनसंघ/भाजप निर्विवाद सेनेपेक्षा खूप मोठा पक्ष होता.

१९९० मध्ये युती झाल्यानंतर सेनेने १८३ जागा लढवून फक्त ४२ जिंकल्या तर माजपने १०५ पैकी ४२. १९९५ मध्ये सेनेने १७१ पैकी ७३ तर भाजपने ११७ पैकी ६५, १९९९ मध्ये सेनेने १७१ पैकी ६९ तर भाजपने ११७ पैकी ५६, २००४ मध्ये सेनेने १७१ पैकी ६२ व माजपने ११७ पैकी ५४ आणि २००९ मध्य सेनेने १६९ पैकी ४४ तर भाजपने ११९ पैकी ४६ जागा जिंकल्या. २०१४ मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढून सेनेने २८८ पैकी ६३ तर भाजपने २८८ पैकी १२३ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये सेना ५६ (१२४) व भाजप १०५ (१६४) जागा जिंकल्या होत्या.

या आकडेवारीतून कोणता पक्ष मोठा हे कोणालाही समजेल (डोळ्यावर झापड लावलेल्यांना सोडून). सेनेला भाजपने मुंबईबाहेर नेऊन वाढविले हे स्फटिकाइतके स्पष्ट आहे (अपवाद डोळ्यांवर झापड लावलेले).

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 10:46 pm | जेम्स वांड

तुमचे लॉजिक मला पटते, किंवा तुम्ही दिलेली आकडेवारी पण, फक्त माझा एकच प्रश्न आहे

जर इतकं सगळं होतं, डोळ्यासमोर तर भाजपने इतक्या सीट सोडल्याच कश्याला सेनेसाठी ? १९८९ पासून ते युती तुटेपर्यंत ?

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2022 - 11:03 pm | श्रीगुरुजी

हे फक्त अडवाणीच सांगू शकतील (आता गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन नसल्याने). हा चुकीचा निर्णय होता एवढेच मी सांगू शकतो.

जेम्स वांड's picture

10 Aug 2022 - 12:12 am | जेम्स वांड

अभ्यास आहे तुमचा त्याला अनुषंगिक काही अंदाज आपले ??

हा सीन clear होणे गरजेचे आहे, कारण काळ सोकावतो हो, बाकी काही नाही.

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2022 - 12:17 am | श्रीगुरुजी

काळ सोकावलाच आहे, हे अनेकदा सिद्ध झालंय.

क्लिंटन's picture

10 Aug 2022 - 10:16 am | क्लिंटन

जेम्सभाऊ, बर्‍याच दिवसांपासून ही गोष्ट लिहायचे म्हणत होतो. इतके दिवस ते लिहिले नव्हते पण आता लिहित आहे.

पब्लिक फोरमवर लिहिताना काही अलिखित संकेत असतात. इंग्लिशमध्ये लिहायचे असेल आणि सगळे कॅपिटल लेटर्समध्ये लिहिले तर समोरचा माणूस ओरडून बोलत आहे असे त्याचा अर्थ घेतला जातो. त्या कारणासाठी निदान ऑफिशिअल ई-मेल्समध्ये पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये कोणी लिहित नाही/ लिहू नये अशी अपेक्षा असते. त्याप्रमाणेच असे एखादे वाक्य नेहमीच्या फॉन्टपेक्षा अडीच-तीन पट आकार वापरून आणि वर बोल्ड करून लिहिल्यासही एखाद्या गोष्टीवर जोर द्यायला/अधोरेखित करायलाच तसे केले जात नसून समोरचा माणूस ओरडून बोलत आहे असा त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो. आता याविषयीचे नियम कुठेही लिहिलेले नाहीत पण मानवी विचार करायच्या पध्दतीला अनुसरून हे संकेत पाळले जातात. जर एखादी गोष्ट महत्वाची आहे हे मांडायचे असेल तर ती अधोरेखित करणे किंवा नुसती बोल्ड फॉन्टमध्ये लिहिणे किंवा त्याहूनही अधिक महत्वाची असेल तर दोन्ही वापरणे हे करता येऊ शकेलच. त्यातून समोरचा माणूस एखादी गोष्ट महत्वाची आहे हे सांगत आहे पण ओरडून बोलत आहे असे कोणाला वाटायचा प्रश्न नसतो.

बघा पटते का. नाही पटले तर सोडून द्या.

जेम्स वांड's picture

10 Aug 2022 - 9:45 pm | जेम्स वांड

सोडून देणार नाही, कारण अगदीच पटलेले आहे, मला मुळातच ओरडुन बोलण्याची काही खास आवड नाही किंवा एकंदरीत इथे ईच्छा पण नव्हती, हे निःसंदिग्ध शब्दांत आधीच स्पष्ट करतो.

त्याहून पुढे स्पष्टीकरण द्यायचं म्हणाल्यास मुळात असे ठळक केल्याने ओरडुन बोलल्याचे फील होते किंवा तसे जाणवते हेच मला माहिती नव्हते, किंबहुना असे काही अलिखित नियम मिपावर असतील असेही माहिती नव्हते मला तरी प्रामाणिकपणे.

सहसा मी वाचनमात्र असल्यापासून कैक लोकांना कैक प्रकारची रंगरंगोटी करताना बघितले आहे, सुहास म्हात्रे म्हणून एक होते ते कोट करण्याचा मसुदा लाल करत, अजून एक होते ते आपले सरळ कोट अनकोट वापरत,

आपण ज्या प्रतिसादाला प्रश्न करतोय त्याचा मूळ मजकूर वेगळा दिसावा आणि आपण टंकलेला मजकूर वेगळा दिसावा इतकाच माझा मोटिव होता कायम, पण हरकत नाही ह्यापुढे तुम्ही दिलेल्या सल्ल्यानुसार लिहिले तरी तो साध्य होईलच असे दिसते आहे त्यामुळे

पुनश्च आभार :)

- (समन्वयवादी शांत प्रजाती) वांड

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2022 - 8:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिवसेना वयाने मोठा (१९६६) पक्ष आहे, हे मान्य केल्यावर एक लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना प्रादेशिक पक्ष आणि स्वयंभू पक्ष होता. शिवसेनेला प्रचार प्रसार आणि याला वेळ लागत होता. गावागावात शिवसेना शाखा स्थापन होत होत्या. आजही गावागावात शिवसैनिक सापड़तील. तर जनसंघ, जनता पार्टी आणि शेवटी भाजपा स्वतंत्र पक्ष स्थापन झाला तेव्हा तो राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची स्थापना झाली तेव्हा जनसंघाच्या जनतापार्टीच्या माध्यमातून रेड़ीमेड पीचवर म्हणजेच आयत्या बिळावर रेघोट्या मारायला मिळाल्या म्हणून भाजपा पक्ष (१९८०) स्थापन झाल्याबरोबर त्यांचे निवडणुकीत आंकड़े दिसायला लागतात त्यात फार काही कर्तुत्व नाही. एक मला संदर्भ नाही, अजुन एक भाजपा पक्ष स्थापन झाले तेव्हा एक या जनसंघाची शाखा असलेला एक अखिल भारतीय जनसंघ नावाचा पक्षही अगदी २०१५ पर्यन्त होता. उद्या मुळ भाजपा पक्ष आमचाच होता असा दावा करू शकले असते. तर पुढे, भाजपा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आपली पाळंमुळं रोवण्यासाठी स्व. प्रमोद महाजन मुरली मनोहर जोशी. हिंदू ह्रदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची अजीजी करीत राहिले. महाराष्ट्रात पाय रोवले. मला वाटते शिवसेनेने भाजपाला कडेवर घ्यायचा तो निर्णय चुकला म्हणून पहिल्या प्रतिसादात जे म्हणालो की ज्यांना महाराष्ट्रात मोठं केलं तेच पक्ष संपवायला निघाले. आज असंख्य शिवसैनिक या विचाराशी सहमत असतील.

बाकी चालू द्या.. जय महाराष्ट्र.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2022 - 9:51 am | श्रीगुरुजी

मला वाटते शिवसेनेने भाजपाला कडेवर घ्यायचा तो निर्णय चुकला म्हणून पहिल्या प्रतिसादात जे म्हणालो की ज्यांना महाराष्ट्रात मोठं केलं तेच पक्ष संपवायला निघाले.

पुन्हा एकदा असत्य प्रतिपादन.

२३ वर्षात जेमतेम १ आमदार निवडून आणलेला व वसंतदादा पाटलांच्या कृपेने निवडून आलेले काही नगरसेवक असलेला महापालिका पातळीचा चिल्लर पक्ष राज्याच्या विविध भागातून निवडून आलेले आमदार असणाऱ्या पक्षाला कडेवर घेऊ शकतो का? ज्यांना निवडणूक दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी लागते तो पक्ष आपल्यापेक्षा बऱ्याच मोठ्या पक्षाला कडेवर घेत असेल तर त्या पक्षाचे पेकाट मोडले असते. मुंगी हत्तीला कडेवर घेऊ शकत असेल तरच सेनेने भाजपला कडेवर घेतले हे कदाचित मान्य करता येईल.

क्लिंटन's picture

10 Aug 2022 - 11:20 am | क्लिंटन

तर जनसंघ, जनता पार्टी आणि शेवटी भाजपा स्वतंत्र पक्ष स्थापन झाला तेव्हा तो राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची स्थापना झाली तेव्हा जनसंघाच्या जनतापार्टीच्या माध्यमातून रेड़ीमेड पीचवर म्हणजेच आयत्या बिळावर रेघोट्या मारायला मिळाल्या म्हणून भाजपा पक्ष (१९८०) स्थापन झाल्याबरोबर त्यांचे निवडणुकीत आंकड़े दिसायला लागतात त्यात फार काही कर्तुत्व नाही.

१९७७ च्या जनता पक्षात जनसंघ, चरणसिंगांचा भारतीय लोकदल, मोरारजी देसाईंचा काँग्रेस (ओ) आणि जगजीवनरामांचा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हे चार पक्ष विलीन झाले होते. त्या पक्षाला १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत २९५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी सगळ्यात जास्त म्हणजे ९०+ खासदार मुळचे जनसंघाचे होते (संदर्भः India Since Independence: Making Sense of Indian Politics हे जे.एन.यु चे प्रोफेसर व्ही.आर.कृष्ण अनंत यांनी लिहिलेले पुस्तक.) याचा अर्थ १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर त्यांना जनता पक्षाच्या आयत्या बिळावर (की पिठावर) रेघोट्या मारायला मिळाल्या असा होतो का? १९७७ मध्ये मुळच्या जनसंघ गटाचे निवडून गेलेले खासदार जनसंघ पूर्वीपासून जिथे त्यामानाने बळकट होता अशा राज्यांमधून म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमधून तर काही उत्तर प्रदेशातून निवडून गेले होते. बाकी १९८० मध्ये स्थापना झाल्यावर भाजपला लगेच राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळाला नव्हता. निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळायला किमान ४ राज्यांमधून किमान ४% पेक्षा जास्त मते मिळावी लागतात ती अट भाजपने स्थापना झाल्यानंतर लगेच २ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण केली होती.

एक मला संदर्भ नाही, अजुन एक भाजपा पक्ष स्थापन झाले तेव्हा एक या जनसंघाची शाखा असलेला एक अखिल भारतीय जनसंघ नावाचा पक्षही अगदी २०१५ पर्यन्त होता. उद्या मुळ भाजपा पक्ष आमचाच होता असा दावा करू शकले असते.

तो पक्ष होता १९७३ मधून जनसंघातून काढलेल्या बलराज मधोक यांचा. ते नंतर चरणसिंगांच्या भारतीय लोकदलात आणि तिथून १९७७ च्या जनता पक्षात होते पण त्यांनी बाहेर पडून आपला भारतीय जनसंघ हा पक्ष काढला. जनसंघ हा केडर बेस्ड पक्ष असल्याने बलराज मधोकांना पक्षातून काढल्यावर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले असे झाले नाही. त्यांच्या पक्षाचे १०० सदस्य होते की नाही कोणास ठाऊक तरी नावाला तो पक्ष होता. त्याच नावाचा बलराज मधोक यांचा पक्ष होता म्हणून बहुदा जनता पक्षातून बाहेर पडलेल्या मुळच्या जनसंघवाल्यांना भाजप हे नवे नाव घ्यावे लागले. तेव्हा बलराज मधोक फार तर दुसर्‍या कोणी भारतीय जनसंघ हे नाव घेता कामा नये हा आग्रह धरू शकले असते पण भाजपवर दावा कसा सांगणार?

अवांतरः १९७७ चा जनता पक्ष नंतर कितीही खंगला असला तरी तो जिवंत होता- अगदी २०१३ पर्यंत. सुब्रमण्यम स्वामी तो पक्ष चालवत होते. नंतर त्यांनी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन केला म्हणून त्या पक्षाचे अस्तित्व संपले. त्यामुळे १९८८ मध्ये वि.प्र.सिंग, रामकृष्ण हेगडे वगैरेंनी स्थापन केलेल्या पक्षाला जनता पक्ष हे नाव घेता आले नाही म्हणून त्यांना जनता दल हे नाव घ्यावे लागले.

क्लिंटन's picture

10 Aug 2022 - 9:59 am | क्लिंटन

भाजप-शिवसेना युती व्हायच्या आधीच्या काळातही शिवसेना मोठा पक्ष असेल तर मग १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे शिवसेनेचे नेते भाजपचे उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावर निवडणुक का लढले होते? धनुष्यबाण चिन्हावर शिवसेना उमेदवारांना निवडणुक लढवायला काय हरकत होती? पण प्रॉब्लेम हा होता की त्यावेळी निवडणुक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला दिलेलेच नव्हते- ते मिळाले १९८९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर म्हणजे १९९० च्या विधानसभा निवडणुकांसाठी. त्यापूर्वी शिवसेना हा unrecognised पक्ष असल्याने त्याला कोणतेही हक्काचे चिन्ह राखून ठेवलेले नव्हते. त्यामुळे १९९० पूर्वी शिवसेनेचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुक लढवायचे. भाऊ तोरसेकरांनी एका व्हिडिओत सांगितलेली आठवण म्हणजे महापालिका निवडणुकांमध्येही सगळ्या शिवसेना उमेदवारांना एकच चिन्ह असायचे असे नाही. तसेच महापालिका वॉर्डांच्या सीमा अशा असतात की एक गल्ली एका वॉर्डात आणि त्याला समांतर गल्ली दुसर्‍या वॉर्डात असू शकते. त्यावेळी प्रचारासाठी भिंती रंगवायचे त्यात भिंत रंगविणार्‍या कॉन्ट्रॅक्टरला एकीकडे शिवसेना उमेदवाराचे एक चिन्ह आणि तिथून जवळच दुसरे चिन्ह रंगवावे लागायचे.

आणि असा पक्ष अगदी १९५७ मध्ये महाराष्ट्रातून दोन खासदार निवडून आणणार्‍या पक्षापेक्षा मोठा होता. आहे की नाही मज्जा?

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2022 - 11:11 am | श्रीगुरुजी

माझ्या आठवणीप्रमाणे १९८० मध्ये सेनेने इंदिरा कॉंग्रेसशी युती करून लोकसभा निवडणुकीत आपले दोन उमेदवार हात या चिन्हावर निवडणुकीत उतरविले होते.

मुंबई हा आपला बालेकिल्ला हा शिवसेनेचा समज व इंदिरा कॉंग्रेसची देशभर प्रचंड लाट असूनही (१९८० लोकसभा निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसने स्वबळावर महाराष्ट्रात ४८ पैकी ३९ जागा व देशात ३५५ जागा जिंकल्या होत्या) सेनेचे दोन्ही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. यातून सेनेला मुंबईतही नगण्य पाठिंबा होता हे स्पष्ट दिसते.

सेना १९८९ पर्यंत कधी प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या चिन्हावर लढायची, कधी इंदिरा कॉंग्रेसच्या चिन्हावर तर कधी भाजपचे चिन्ह उसनी घ्यायची. तरीही या पक्षाने म्हणे भाजपला कडेवर घेऊन मोठे केले.

बादवे, मी आयुष्यात कधीही कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीशी युती करणार नाही. त्याऐवजी मी शिवसेनेचे दुकान बंद करेन, असे बाळ ठाकरे म्हटल्याचे बोलघेवडे भाजप नेते वारंवार सांगून उद्धव ठाकरेंवर टीका करीत असतात. परंतु बाळ ठाकरेंनी आपल्या हयातीतच सलग ५ वर्षे (१९७५-८०) कॉंग्रेसशी युती केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम लीग, शेकाप, प्रजा समाजवादी अश्या पक्षांशीही युती केली होती याचे सोयिस्कर विस्मरण करतात.

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2022 - 5:33 pm | श्रीगुरुजी

नितीशकुमारांनी राजीनामा दिला, तेजस्वी यादवानी पाठिंब्याचे पत्र दिले, उद्या पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. तेजस्वी यादवसुद्धा मूर्ख निघाला. नितीशकुमार कधी राजदला लाथ घालून पुन्हा भाजपशी सोयरिक जमवतील हे तेजस्वीला कळणार सुद्धा नाही. तेजस्वी यादवने सुवर्णसंधी गमावली आहे. आज १९७९ मधील इंदिरा गांधींच्या चतुर खेळ्यांची आठवण येत आहे.

प्रेषित मुहम्मद ह्यांच्यावर टीका केल्याबद्दल चौफेर राळ उडून नुपूर शर्मा ह्यांना भाजपने अंतर दिले, त्यांना पदावरून हटवले, त्यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक विधान असून त्याचा पार्टीशी काहीही संबंध नाही म्हणून नूपुरला अक्षरशः धार्मिक कट्टरपंथीय उन्मादासमोर एकटी सोडली.

आणि,

लाखो काय कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या भगवान हनुमान आणि त्यांच्या स्तुतीपर स्तोत्राला अतिशय घाण भाषेत संभावना करून हिडीस वक्तव्य करणाऱ्या माणसाला मात्र मानाने मांडीला मांडी लावून मंत्री करून घेतले.

नूपुर, तू चुकलीसच. तू ज्यांना धर्म - प्रामाणिक समजत होतीस ते मात्र सत्ता - प्रामाणिक निघाले असेच वैषम्य तुला घेऊन जगावे लागणार आहे.

&#128532 &#128532 &#128532 &#128532

गामा पैलवान's picture

9 Aug 2022 - 8:45 pm | गामा पैलवान

रात्रीचे चांदणे,

१०६ आमदार असतानाही भाजपची काय असहाय्य आहे ते समजत नाही.

असहाय्यता अशीये की ही १०६ संख्या गाठलीये ती मोदींमुळे. अन्यथा कमी जागा मिळाल्या असत्या. दस्तुरखुद्द मोदी प्रचाराला येऊनही १४५ का मिळंत नाहीत, हे दुखणंआहे. मोदी किती वेळ पुरणार? महाराष्ट्र भाजपने स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे. पण साधं खडसेंना सांभाळून घेता येत नाही आणि बावनकुळेना डावललं जातं. शिवाय भरीला २०१४ साली राष्ट्रवादीच्या पाठींब्यावरून लोकांच्या खाल्लेल्या शिव्या व २०१९ ची दादा पवारांशी केलेली चुंबाचुंबी आहेच. महाराष्ट्र भाजप सत्ताकारणात कमी पडतो आहे. फडणवीस खूप चांगले मुख्यमंत्री होते. मी तर म्हणेन की मनोहर जोशींपेक्षाही चांगले. पण ते गंभीर नाहीत असा उगीच संदेश गेलाय जनतेत.

अधिक माहितीसाठी भाजप आणि शिवसेना यांचं मोदिपूर्व काळातलं बलाबल प्राडॉनी इथे दिलं आहे : https://www.misalpav.com/comment/1149582#comment-1149582

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2022 - 12:13 am | श्रीगुरुजी

अनेकांना अनेकदा मूर्ख बनविता येते हे आज नितीशकुमारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. यावेळी लालूऐवजी लालूपुत्र मूर्ख ठरला.

कपिलमुनी's picture

10 Aug 2022 - 1:14 am | कपिलमुनी

माविआ का स्थापन झाली ?
भाजप ने राष्ट्रवादी सोबत पहाटे शय्या सोबत का केली ?
एवढ्या कोलांट्या मारून नितीश - राजद एकत्र का येतात ?
ज्या आमदारावर आरोप केलेत त्याच लोकांना मंत्री करून फडणवीस काय साध्य करतात ??

उत्तर एकच -- सत्ता आणि त्याद्वारे मिळणारा पैसा...

म्हणून कोणालाही नवीन निवडणूक नको असते... सत्ता कशी का मिळेना ती मिळाली की पैसा येतो आणि पैसा आला की कार्यकर्ते , आमदार सगळे येतात..

धर्मराजमुटके's picture

10 Aug 2022 - 1:04 pm | धर्मराजमुटके

नुकताच ही चित्रफीत बघण्यात आली.
विषय : 2024 में PM बनेंगे नीतीश कुमार ? बरेचसे मुद्दे पटण्याजोगे आहेत. चांगले विश्लेषण. बिहारी टोन ऐकायला मजा येतेय.

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2022 - 2:07 pm | श्रीगुरुजी

केजरीवाल, ममता, राहुल गांधी असे नितीशकुमारांपेक्षा ताकदवान नेते स्पर्धेत असताना नितीशकुमारांना कोण पंतप्रधान करणार?

क्लिंटन's picture

10 Aug 2022 - 3:43 pm | क्लिंटन

एका अर्थी जे होत आहे ते मोदींना अनुकूल आहे. समाजवादी नेते अविश्वासार्ह असणे आणि नितीश सोडून गेल्यावर बिहारमधील १७ ऐवजी ३६-३७ जागा लढवता येऊन १७ पेक्षा जास्त जागा जिंकायची संधी असणे ही भाजपला अनुकूल घडामोड आहे हे आधीच लिहिले आहे. दुसरे म्हणजे विरोधी पक्षांमध्ये आता पंतप्रधानपदाचा आणखी एक उमेदवार वाढला. नितीश तिकडे गेल्याने लगेच सगळे विरोधी पक्ष त्यांना स्विकारतील असे अजिबात नाही- विशेषतः इतकी वर्षे भाजपबरोबर आणि गेली ५ वर्षे मोदींच्या भाजपबरोबर सत्ता उपभोगलेली असल्याने आणि एकदाही स्वबळावर बहुमत मिळवलेले नसल्याने. तरीही त्यांना स्वतःचा दावा पुढे रेटण्यापासून कोणी अडवू शकत नाही. उपेंद्र कुशवाह यांनी तेच म्हटले आहे. विरोधी कॅम्पमध्ये जितके जास्त दावेदार असतील तितकी भांडणे व्हायची शक्यता वाढेल आणि विरोधी कॅम्प तितक्या प्रमाणावर विभागलेला आहे हे चित्र मतदारांपुढे २०२४ मध्ये जाईल. मागे कधीतरी माझ्या दुसर्‍या आयडीमधून हे लिहिले पण होते.

बहुदा त्यामुळेच मोदी-शहांनी नितीशकुमार जायची शक्यता आहे हे समोर दिसत असतानाही त्यांना अडविण्यासाठी काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत.

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2022 - 3:58 pm | श्रीगुरुजी

नितीश व ठाकरेंची ब्याद जाणे हा भाजपसाठी शुभसंकेत आहे. परंतु भाजपचे धरसोड नेतृत्व पुन्हा यांच्याशी सोयरिक करणार नाही याची शाश्वती नाही.

क्लिंटन's picture

10 Aug 2022 - 4:11 pm | क्लिंटन

एका अर्थाने एन.डी.ए ही संकल्पनाच आता मोडीत निघाली आहे. शिवसेना, जदयु असे गेले. अकाली दल शेतकरी कायद्याच्या प्रश्नावर गेले. राजस्थानात हनुमान बेनिवाल या भाजपच्या बंडखोर नेत्याचा पक्ष एन.डी.ए मध्ये होते. त्या पक्षाने भाजपशी युती करून २०१९ मध्ये राजस्थानात लोकसभेची एक जागाही जिंकली होती. पण तो पक्ष सुध्दा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत होता त्यामुळे तो पक्षही गेला असे म्हणायला हवे. अखिल झारखंड स्टुडंट्स युनियन बरोबर आहे की नाही हे तपासून बघायला हवे. उत्तरपूर्वेतले काही पक्ष अजून एन.डी.ए मध्ये आहेत. हे पक्ष त्यामानाने नगण्य आहेत. त्यातल्या त्यात आसाम गण परिषद हाच एक मोठा पक्ष आहे. त्यालाही लोकसभेच्या २-३ पेक्षा जास्त जागा द्यायची गरज नाही.

१९९८ ते २००४ या काळात केलेल्या चुका यापुढे सुधारायला हव्यात. जर भाजप आपल्या मुळच्या अजेंड्यावर कायम राहिला असता तर कधीनाकधी पक्ष स्वबळावर नक्कीच सत्तेत येऊ शकला असता. भले त्याला आणखी काही वर्षे लागली असती. पण स्वतः वेगवेगळ्या प्रदेशात वाढण्याऐवजी मित्रपक्ष शोधून त्यांच्या मदतीने सत्तेत यायचा शॉर्टकट भाजपने अवलंबला आणि त्यात पक्षाचे नुकसान झाले. या प्रकारात ममता, चंद्रबाबू नायडू, जयललिता, जॉर्ज फर्नांडिस, अजितसिंग, ओमप्रकाश चौटाला, बन्सीलाल वगैरे भाजपच्या मूळ अजेंड्याशी काडीमात्र संबंध नसलेले लोक बरोबर घेतले गेले आणि त्यामुळे पक्षाचा तेवढ्यापुरती सत्ता मिळून फायदा झाला पण पक्षाचे आणि एकूणच उजव्या राजकारणाचे दीर्घकालीन नुकसान झाले.

युपीए सरकारने विशेषतः युपीए-२ सरकारने घातलेल्या सावळ्यागोंधळामुळेच २०१४ मध्ये भाजपला सत्तेत यायची संधी मिळाली असे म्हणायला हवे. जर युपीएने थोडा बरा- अगदी नरसिंहरावांची पकड होती तितकी जरी ठेवली असती तरी २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे अशक्य झाले असते. ही सत्ता मिळाली आहे त्याचा वापर करून आतापर्यंत मोदींनी पकड चांगली ठेवली आहे. आता मित्रपक्षांचे जोखड दूर केले पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2022 - 6:06 pm | श्रीगुरुजी

संजय राठोडला पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याने त्यांना मंत्रीपद दिले असे एकनाथ शिंदे, फडणवीस व भाजपचे इतर नेते सांगत आहेत. या क्लीन चिटबद्दल कधीच वाचले नाही. किंबहुना खालील इंडियन एक्स्प्रेसची बातमी सांगते की पुणे पोलिसांनी असलेल्या पुराव्यांचा अजून तपासच सुरू केलेला नाही. मग क्लीन चिट कधी मिळाली?

https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/cities/pune/pune-...

एकदा कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं की कोणत्याही वाईट गोष्टींचं समर्थन करता येतं आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीला विरोध करता येतो. महाराष्ट्रात भाजप रोज एक नवीन खालची पातळी गाठतोय.

उद्या दाऊद, हफिज सईद, एमआयएम यांचा सुद्धा पाठिंबा फडणवीस घेतील आणि त्याचे मराठी आणि हिंदीत जोरदार युक्तिवाद करून समर्थन सुद्धा करतील.

विजुभाऊ's picture

10 Aug 2022 - 6:31 pm | विजुभाऊ

राठोड यांना मंत्री मंडळात घेणे चुकच आहे
पण हे प्रश्न विचारणारे लोक मलीक जेंव्हा मंत्री होते तेंव्हा कधीच प्रश्न विचारत नव्हते.

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2022 - 7:07 pm | श्रीगुरुजी

दोन्ही निर्णय चुकीचे होते/आहेत. पण तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच वागणार असाल तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय? त्यांनी दाऊदशी संबंध असणाऱ्याला मंत्रीपदावर ठेवलं आणि तुम्ही विवाहबाह्य संबंध, गुपचूप गर्भपात व त्यातून झालेल्या आत्महत्या प्रकरणातील आरोपीला मंत्री केलं. दोघे एकाच नाण्याच्या बाजू.

श्रीगुरुजी,

विवाहबाह्य संबंध, गर्भपात व आत्महत्या हे कितीही निंद्य प्रकार असले तरी संजय राठोड कायद्याच्या कचाट्यात येनं अवघड आहे. विबासं हा कायद्याने गुन्हा नाही. गर्भपात असू शकतो, पण तो संजय राठोडांनी करायला भाग पाडला हे दाखवणं जिकिरीचं आहे. तीच बाब आत्महत्येची. काद्याप्रमाणे हा गुन्हा पूजा चव्हाणने केला आहे. तो करण्यास संजय राठोडांनी भाग पाडलं हे सिद्ध होणं जवळजवळ अशक्य.

त्यामुळे संजय राठोड दिमाखात परत मंत्री होऊ शकतात. निदान प्रथमदर्शनी तरी मला तसं दिसतंय.

आ.न.,
-गा.पै.

सुक्या's picture

10 Aug 2022 - 10:46 pm | सुक्या

सहमत.
संजय राठोड परत मंत्री झालेत व "मला क्लीन चीट मिळाली आहे. जर माझ्यावर कुणी कायदेशीर कारवाई करायची मागणी करत असेल तर मी पण कायदेशीर कारवाई करेल" अशी उघड धमकी द्यायला लागले आहेत. उना पुरा १ दिवस झाला आहे शपथ घेउन.

भाजपा च्या बोटचेपे पणाचा आता वीट यायला लागला आहे.
:(

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2022 - 11:04 pm | श्रीगुरुजी

राठोड व पूजा चव्हाणमधील संभाषणाच्या अनेक चित्रफीति उपलब्ध आहेत, तिचा गर्भपात खोटे नाव वापरून केला याची रूग्णालयात नोंद आहे, तिच्या घराजवळील सीसीटीव्ही मध्ये राठोड, त्याचा एक मित्र व पूजा चव्हाण आत्महत्येपूर्वी काही मिनिटे एकत्र दिसतात . . . असे अनेक पुरावे पोलिसांकडे असूनही मागील दीड वर्षे पोलिस थंड बसून आहेत. आता तर अश्या आरोपींचे संकटमोचक व संरक्षक सत्तेत आल्याने सर्व पुरावे नष्ट होऊन राठोडला अधिकृत क्लीन चिट मिळणार.

दाऊदशी संबन्ध आणि गर्भपात हे एकाच तागडीत तोलताय साहेब.

निनाद's picture

11 Aug 2022 - 7:03 am | निनाद

सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव येथील घटनेचे आरोपी वरावरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. आणि वैद्यकीय जामीन असला तरी या इसमाने कधीही रुग्णालयात भेट दिली नाही. राव हा इसम बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य आहे. आता हा प्राणी येनकेन प्रकारे जामीन स्वातंत्र्याचा गैरवापर करणार हे निश्चित आहे.
राव यांच्यावर डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाचा आरोप आहे. ३१ डिसेंबरचे त्यांचे भाषण हे कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ दुसऱ्या दिवशी हिंसाचार घडवून आणणारे एक कारण असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. कार्यक्रमाच्या आयोजकांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपही आहे.

सर्वोच्च न्यायालये माओवाद्यांना इतके चांगले का वागवतात हे न सुटलेले कोडे आहे!

क्लिंटन's picture

11 Aug 2022 - 1:49 pm | क्लिंटन

एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करून दोन दिवस झाले. तरीही अजून खातेवाटपाचा पत्ता नाही. इतकेच नाही तर शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री करणार याविषयीही काहीही हालचाल झालेली दिसत नाही.

एकूणच ठाकरेंच्या सरकारने घातलेल्या सावळ्यागोंधळामुळे भराभर कामे करून आपले नाव करायची या सरकारला संधी होती पण ते ती संधी व्यर्थ दवडत आहेत असे दिसते.

श्रीगुरुजी's picture

11 Aug 2022 - 10:04 pm | श्रीगुरुजी

एस.टी. चे विलिनीकरण, राडोडचे गुन्हे, अब्दुल सत्तारची हिंदूविरोधी विधाने, भावना गवळींवरील ईडीच्या धाडी याचा ज्यांना सोयिस्कर विसर पडला, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?

मविआतील आव्हाड, सत्तार, राठोड, सरनाईक, यशवंत जाधव वगैरे आता निर्धास्त झाले असतील कारण त्यांचा भक्कम संरक्षणकर्ता आता सत्तेत आलाय. मविआ काळात त्यांच्यावर निदान तोंडदेखली कारवाई तरी होत होती. पण आता तर थेट क्लीन चिट आणि मंत्रीपदाचे बक्षीस.

जेम्स वांड's picture

12 Aug 2022 - 9:31 am | जेम्स वांड

मंत्रिमंडळ घोषित होईल असे साव भाव आणून बाइट देतायत श्री अब्दुल सत्तार, हनुमान भक्त नेता.

=)))))

डँबिस००७'s picture

11 Aug 2022 - 2:14 pm | डँबिस००७

मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींसह जागतिक शांततेसाठी तीन सदस्यीय आयोगाचा प्रस्ताव देणार आहेत.
अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी जागतिक शांततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, UN महासचिव अँटोनियो गुटेरेस आणि पोप फ्रान्सिस यांचा समावेश असलेल्या 3 सदस्यीय आयोगाचा प्रस्ताव दिला आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष पाच वर्षांच्या कालावधीसाठी जागतिक युद्धविरामाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींसह तीन जागतिक नेत्यांनी बनवलेले आयोग तयार करण्यासाठी UN कडे लेखी प्रस्ताव सादर करण्याची योजना आखत आहेत.

मेक्सिकोचे अध्यक्ष म्हणाले, कमिशनचे उद्दिष्ट जगभरातील युद्धे थांबवण्याचा प्रस्ताव सादर करणे आणि किमान पाच वर्षांसाठी युद्धविराम शोधण्यासाठी करारावर पोहोचणे हे आहे. ते म्हणाले, या निर्णयामुळे जगभरातील सरकारांना त्यांच्या लोकांना, विशेषत: युद्ध आणि त्याच्या परिणामांमुळे सर्वाधिक त्रास होत असलेल्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी स्वतःला समर्पित करण्यात मदत होईल. युद्धजन्य कारवाया थांबवण्याचे आवाहन करून, मेक्सिकन राष्ट्राध्यक्षांनी चीन, रशिया आणि अमेरिकेला शांतता मिळविण्याचे निमंत्रण दिले आहे आणि आशा आहे की ते तीन देश ते ऐकतील आणि मध्यस्थी स्वीकारतील जसे की ते प्रस्तावित आहेत.

देवा,
ह्या बातमीमुळे मोदी हेटर्सच मानसीक संतुलन बिघडु देऊ नकोस !!

क्लिंटन's picture

11 Aug 2022 - 4:58 pm | क्लिंटन

या प्रस्तावित आयोगाचा कितपत उपयोग होईल याची कल्पना नाही- बहुतेक फार उपयोग होणार नाही कारण त्यात पोप आणि यु.एन. सेक्रेटरी जनरल हे कसलेही अधिकार नसलेले लोक असणार आहेत आणि तिसरे सदस्य मोदींना पंतप्रधान म्हणून देशात अधिकार असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर जो मान किंवा दरारा अमेरिकेचे अध्यक्ष, रशियाचे अध्यक्ष किंवा चीनचे अध्यक्ष यांचा असतो तो भारताच्या पंतप्रधानांना अजून तरी नाही. पूर्वी भारताची विशेष दखलही घेतली जायची नाही त्यापेक्षा परिस्थिती बरीच चांगली आहे तरीही we are not there yet. नरसिंहराव १९९४ मध्ये अमेरिकेला गेले होते तेव्हा ते आणि बिल क्लिंटन यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली होती त्यात बरेचसे प्रश्न बिल क्लिंटनना इस्राएल-पॅलेस्टाईन दरम्यान शांततेचे प्रयत्न तेव्हा चालू होते त्याविषयी होते आणि खूप थोडे प्रश्न भारत-अमेरिका संबंधांवर होते. आता तशी परिस्थिती राहिली नाही हे नक्की. तसेच इतर कोणत्याही देशाच्या प्रमुखापेक्षा मोदींचे नाव तिथे सदस्य म्हणून घेतले जात असेल तर ते चांगलेच आहे.

तरीही एक गोष्ट जरूर लिहाविशी वाटते. असा आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणण्यासाठी प्रयत्न करणे वगैरे गोष्टींमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी पडू नये असे खूप वाटते. कारण ती एक वाईट नशा आहे. जगात शांतता यावी, मग आपल्याला आपल्या प्रयत्नांसाठी शांततेचे नोबेल वगैरे मिळावे असे वाटायला लागायचा संभव असतो. त्यातून मग आपल्या हितसंबंधांना धोका पोचू शकेल हा धोका उद्भवतो. का कुणास ठाऊक वाजपेयींची पंतप्रधानपदाची कारकिर्द पाहता त्यांना भारत-पाकिस्तानात शांतता प्रस्थापित करावी आणि आपल्याला शांततेचे नोबेल मिळावे असा त्यांचा उद्देश होता का हा प्रश्न मला तरी नेहमी पडतो. या बाबतीत मी अगदी चुकीचा असेनही. पण तरीही सुरवातीला लाहोर बसयात्रेसाठी पुढाकार घेणे, लाहोरमध्ये We can choose our friends but not neighbours अशी टाळ्याखाऊ वाक्ये फेकणे, काश्मीरमध्ये सीजफायर, परवेझ मुशर्रफला सगळ्या जगाने वाळीत टाकलेले असताना ९/११ च्या दोन महिने आधी त्याला आग्रा परिषदेसाठी बोलावून घेणे आणि त्यामुळे त्याला चीफ एक्झिक्युटिव्ह मुशर्रफचा अध्यक्ष मुशर्रफ बनविणे, पुढे संसदभवनावरील हल्ल्यानंतर आणि मे २००२ च्या कालूचक हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान अणुयुध्द होणार अशी भिती पूर्ण जगात व्यक्त केली जात होती तरी ती परिस्थिती तेवढ्यापुरती निवळल्यानंतर मे २००३ मध्ये श्रीनगरला जाहिर सभा घेऊन तिथून परत पीस प्रोसेस सुरू करणे, काश्मीरातील अगदी हुर्रियतशी बोलणी सुरू करणे वगैरे गोष्टी पाहता वाजपेयींना तसे वाटायला लागले होते का हा प्रश्न नेहमी पडतो. नाहीतर आपण होऊन पाकिस्तानबरोबर बोलणी करा, शांततेचे प्रयत्न करा वगैरे प्रकार त्यांनी का केले असावेत हे समजत नाही. तेव्हा आंतरराष्ट्रीय शांतता वगैरे प्रकार भारताच्या कोणत्याच पंतप्रधानाने करायला जाऊ नयेत असे प्रामाणिकपणे वाटते- मोदींनी तर अजिबात नाही.

डँबिस००७'s picture

11 Aug 2022 - 5:26 pm | डँबिस००७

क्लिंटन,
१०००००% सहमत !

जेम्स वांड's picture

11 Aug 2022 - 9:21 pm | जेम्स वांड

मी सहमत आहे,

खासकरून

तरीही एक गोष्ट जरूर लिहाविशी वाटते. असा आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणण्यासाठी प्रयत्न करणे वगैरे गोष्टींमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी पडू नये असे खूप वाटते.

ह्यात दोन गोष्टी आहेत, पहिले म्हणजे तुम्ही म्हणले ते, अन् दुसरी म्हणजे नेहरुला दूषणे देऊन स्वतः नेहरूंच्या मार्गाने चालल्यागत होईल ते, असे मला स्पष्ट वाटते.

ते विश्वगुरू इत्यादी ठीक आहे पण अजून पल्ला गाठायचा आहे, ह्यावर मी आपल्याशी सहमत आहे.

डँबिस००७'s picture

12 Aug 2022 - 1:52 pm | डँबिस००७

लाल सींग चढ्ढा सिनेमा काल रिलीझ झाला.
मिडीया मध्ये बॉयकॉट म्हणुन वातावरण तापवले होते. हा सिनेमा सपशेल पडला व बॉयकॉट यशस्वी झालेला आहे अस बॉयकॉट करणार्यांच म्हणण आहे.
सिनेमा गृह रिकामे होते असे काही व्हिडीयो
व्हायरल झालेले आहेत पण खरी परिस्थिती काय आहे ?

यश राज's picture

12 Aug 2022 - 2:33 pm | यश राज

पुण्यातल्या माझ्या एका परिचिताने जो आमिर चा चाह्ता आहे त्याने काल हा चित्रपट थियेटर मध्ये बघितला , त्याने सांगितल्या प्रमाणे आमिर चा चित्रपट असला तरी फक्त १५/२० लोक थियेटर मध्ये होती हा बोयकॉटचाच असर होता. प्लस त्याच्या मते एकदम संथ व रटाळ चित्रपट आहे. सुरुवातीला चक्क ७ मिनिटे फक्त डिस्क्लेमर दाखवला. आमिरची पदोपदी ओवर अ‍ॅक्टिंग जाणवत होती.

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2022 - 3:01 pm | श्रीगुरुजी

https://m.timesofindia.com/india/pm-narendra-modi-still-set-to-win-major...

इंडिया टुडेच्या सर्वेक्षणानुसार आज लोकसभा निवडणूक झाली तर रालोआ २८६ जागा जिंकेल, संपुआ १४६ व इतर १११ जागा जि़ंकतील. म्हणजे रालोआला अगदी काठावरचे बहुमत मिळेल.

२०१९ मध्ये रालोआला ३५३ जागा होत्या व त्यात भाजपला ३०३ होत्या. आता संजद (१६), सेना (१८) व अकाली दल (२) रालोआत नाहीत.

भाजपला गोवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड यातील सर्व ६९ जागा मिळाल्या होत्या व २०२४ मध्ये जवळपास असेच चित्र असेल.

मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आसाम, झारखंड व छत्तीसगड येथील २७४ पैकी १९४ जागा होत्या. उर्वरीत राज्यातून सुमारे ५५ जागा होत्या.

यापैकी मध्यप्रदेश, कर्नाटक, हरयाणा व छत्तीसगड या राज्यात जवळपास ८५% जागा जिंकल्याने तेथे जागा वाढविण्यास फारसा वाव नाही. कदाचित तेथील काही जागा भाजप गमावेल.

परंतु उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यातील २०५ पैकी ११४ जागा सध्या असणाऱ्या भाजपला या राज्यात किमान २० जागा वाढविण्याचा वाव आहे.

त्यामुळे भाजप एकटा ३००+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे.

सुरिया's picture

12 Aug 2022 - 4:27 pm | सुरिया

सीबीआय, इन्कमटॅक्स, ईडी सारख्या संस्थांच्या कर्तुत्वाचा आणि त्याचा राजकारण्यांच्या, उद्योगपतींच्या आणि सामान्यजनांच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव आणि केंद्रातील पक्षाचे शासन आणि राज्यातिल शासन हे एकाच पक्षाला देण्याचे गतकालीन फायदेतोटे आणि अपेक्षित स्थिरतेचा विचार पाहता भाजपा एकटा ५४३ पैकी ५०० जागा जिंकू शकेल असे वाटते. (यामागे सध्या आहेत तशा युत्या वगैरे टाळून स्वबळावर ५३० किंवा सर्वच वगैरे जागा भाजपानेच लढवाव्यात असे गृहितक आहे)

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2022 - 5:47 pm | श्रीगुरुजी

भाजपने आपल्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नेमणूक केली आहे. मागील सुमारे ६ वर्षे चंद्रकांत पाटील अध्यक्षपदी होते.

चंद्रकांत पाटलांना हाताशी धरून फडणवीसांनी पक्षातील आपल्या तथाकथित प्रतिस्पर्धींना अक्षरशः संपवून पक्षाचे नुकसान करून स्वत:चे मुख्यमंत्रीपद व पक्षाची सत्ता घालविली. विनोद तावडे, पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नुसती व्यक्त करण्याचा अत्यंत गंभीर गुन्हा केल्यानंतर फडणवीसांनी अत्यंत निष्ठुर पद्धतीने त्यांना राजकारणातून संपविले. मुंडें विरूद्ध चिक्की प्रकरण, तावडेंविरूद्ध पदवी प्रकरण, खडसेंविरूद्ध भ्रष्टाचार, पाकिस्तानहून फोनकॉल अशी अनेक खोटी प्रकरणे विरोधकांच्या खांद्यावरून बाहेर आणली. बावनकुळे विदर्भात आपले प्रतिस्पर्धी आहेत अशी समजूत करून घेऊन त्यांनाही उमेदवारी नाकारली. या सर्व कारस्थानात चंद्रकांत पाटलांनी फडणवीसांना साथ दिली. यामुळे विदर्भात भाजपचे १५ उमेदवार पडले. खडसे व मुंडे मतदारसंघातही फडणवीसांनी आपल्याच उमेदवारांना पाडले. त्यामुळे अर्थातच भाजपची आमदारसंख्या १९ ने घटून सत्ता गेली.

आपल्या पाठिंब्याची किंमत पाटलांनी कोथरूड मतदारसंघ बळकावून वसूल केली. स्थानिक उमेदवारांना डावलून आपल्या मर्जीतील उमेदवारांना शिवाजीनगर मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ देऊन टाकले.

सत्ता गमाविल्यानंतरही फडणवीसांनी आपल्या चुका सुधारल्या नाहीत. तावडे व मुंडे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर आहेत. खडसेंना पक्ष सोडायला लावला. या चुकांचा अजून मोठा फटका पुढील निवडणुकीत बसणार आहे.

राज्याध्यक्ष या भूमिकेतून चंद्रकांत पाटलांचे कर्तृत्व शून्य आहे. अत्यंत वाचाळ वक्तव्ये व विनोदी दावे करणे एवढेच त्यांनी ६ वर्षे केले. पक्षवाढ म्हणजे इतर पक्षातील अत्यंत भ्रष्ट, गुन्हेगार, जातीयवाद्यांची भरताड करणे हे त्यांचे कर्तृत्व. अशांना भाजपत आणून पक्ष घाण करून ठेवला.

हे सर्व सुरू असताना मोदी-शहां फडणवीसांना पाठिंबा देत होते. ते सुद्धा फडणवीस-पाटील यांच्याइतकेच दोषी आहेत.

परंतु उशीरा का होईना, मोदी-शहांना हळूहळू जाग येताना दिसत आहे. आधी बावनकुळेंना विधान परीषदेत आमदार केले. परंतु मंत्रीमंडळात बावनकुळेंना न घेऊन आपण आधीच्याच चुका सुरू ठेवणार हे फडणवीसांनी दाखवून दिले. पण आता चंद्रकांत पाटलांच्या जागेवर बावनकुळेंना आणल्याने मोदी-शहा आपल्या चुका सुधारत आहेत असं दिसतंय. आता उमेदवारी वाटपामध्ये पाटलांचा हस्तक्षेप कमी असेल व फडणवीसांनाही मुक्तहस्त मिळणार नाही. पुढील निवडणुकीत कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी पुन्हा एकदा उमेदवार असाव्या. पाटलांनी आग्रह धरल्यास त्यांना कोल्हापूरमधून उभे करावे. नाही तरी त्यांनी जाहीर सभेत सांगितले आहेच की कोल्हापुरातील कोणत्याही मतदारसंघातून मी निवडून येऊन दाखवीन, अन्यथा हिमालयात निघून जाईन.

यापुढील पाऊल म्हणजे मुंडे व तावडे यांना परत महाराष्ट्रात आणणे व फडणवीसांना नेतेपदावरून बाजूला करणे ही असायला हवी, म्हणजे माझ्यासारखे पूवाश्रमीचे भाजप समर्थक पुन्हा भाजपला मत देतील. शक्य झाल्यास खडसेंना सुद्धा परत आणावे.

शाम भागवत's picture

12 Aug 2022 - 6:10 pm | शाम भागवत

केसरकरांनी दोन चार दिवसांपूर्वी गौप्यस्फोट केला. अशोक चव्हाण, अजित पवार व उठा हे तिधे मोदींना भेटायला दिल्लीला गेले होते. तिथे मिटींग संपल्यावर उठा आपल्या सोबत्यांना सोडून एकटेच मोदींना अर्धा तास भेटले. परत सेना भाजपा युती करायचे नक्कीही झाले. पण भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन आणि राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड यामुळे तो प्लॅन फिस्कटला.
अन्यथा फडणवीसांवर किती घणाघाती टीका करता आली असती नाही का? फडणवीस विरोधकांची एक मोठी सुवर्णसंधी हिरावली गेली. फारच नुकसान झालं बॅा.
:))

फडणवीस अगदी वाईट्ट आहेत. मूर्खासारखे काहीतरी ठरवत असतात. मोदी शहा कितीही हुषार असले तरी त्यांचे मोदींपुढे काही चालत नाही. त्यामुळे ते गपगुमान फडणवीसांच्या होला हो म्हणत बसतात!
:))

आपल्या करियर मध्ये अर्ध्या पेक्षा अधिक रिमेक असलेल्या चित्रपटांमध्ये काम करुन मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणवुन घेण्यार्‍या आमिर खाण ची लोकांनी व्यवस्थित पाचर मारली ! :)))
वार वही पें करो जहा दर्द बोहोत ज्यादा होता है !
जिहादी बॉलिवुड हे हिंदुस्थानी लोकांच्या पैशातुन मोठे झाले आणि हिंदुस्थानी लोकांचेच हिंदू धर्म विरोधी ब्रेन वॉश करत राहिले, पण काळ आता बदलला आहे हे उघड आहे. उत्तम कलाकृती पाहण्यास उपलब्ध असताना ह्यांचे डब्बा रिमेक पाहण्याचे पाप लोकांनी का करावे ?
आता एकमेकांची चाटणारे रडणारे समोर येत आहेत, अक्षय रडला, म्हणाला अर्थव्यवस्थेला नुकसान होते [ बरोबर, जिहादी अर्थव्यवस्थेला नुकसान झाले, ते झालेच पाहिजे ! याची मैत्री Aneel Mussarat आणि Nabeel Mussarat शी आहे त्या बद्धल २ शब्द सांग म्हणावे. ] आता येडा अण्णा पण म्हणतोय असं करु नका ! तुम्ही हिंदू द्रोही / देश द्रोही प्रोपगेंडा बंद करा आधी, मग विचार करु.
अगदी गेल्या २-३ दिवसात आमिरचा कौन बनेगा करोड्पती मधली क्लिप व्हायरल झाली, ती पहा...

आर्मी लेडीला सॅल्युट करण्यासाठी आमिर खाणकडे एकही हात तेव्हा उपलब्ध नव्हता ! मिडीयात हे व्हायरल झाल्यावर काहीतरी थातुर मातुर कारण दिले त्याने. जर आमिर ने खरचं सॅल्युट केला असेल आणि त्याच्या मतानुसार वेगवेगळ्या कॅमेरा अँगलमुळे ते आले नसेल तर केबीसीवाल्यांनी आमिर चे सगळ्या अँगलचे फुटेज रिलीज करावे.
हा असे का वागतो त्याचे विश्लेशण :-

-
--
---
मी ध्रुव राठी बद्धल म्हणालो होतो :- ध्रुव राठी चा व्हिडियो मी आधीच पाहिला होता, तो एक प्रसिद्ध व्ह्लॉगर / युट्युबर आहे. परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे.

आता तरी समजले का फंडिग का होते ?
असो...

जाता जाता :- लाल सिंग की चड्डी उतार देने के बाद, अब पठाण की पतलुन उतरनेवाली है ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022

मुक्त विहारि's picture

12 Aug 2022 - 7:02 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

12 Aug 2022 - 7:08 pm | धर्मराजमुटके

चित्रपट कालच रिलिज झाला आहे. आजचा शुक्रवार, शनिवार आणि रविवारचे कलेक्शनचे आकडे आले की चित्रपट हिट आहे की फ्लॉप झाला हे ठरविता येईल ना ?
शिवाय ऱक्षाबंधन ला सार्वजनिक सुट्टी नसते. वेळ काढून भाऊ बहिण एकमेकांकडे जाण्यासाठी प्रवास करतात त्यामुळे कालचे आकडे गृहित धरावेत काय ?

चित्रपट कालच रिलिज झाला आहे. आजचा शुक्रवार, शनिवार आणि रविवारचे कलेक्शनचे आकडे आले की चित्रपट हिट आहे की फ्लॉप झाला हे ठरविता येईल ना ?
तुम्हाला हा चित्रपट फ्लॉप झाला आहे हे कळेल, तेव्हा नक्की सांगा. :)

शिवाय ऱक्षाबंधन ला सार्वजनिक सुट्टी नसते. वेळ काढून भाऊ बहिण एकमेकांकडे जाण्यासाठी प्रवास करतात त्यामुळे कालचे आकडे गृहित धरावेत काय ?
ओह्ह, आमिर ला हे बहुधा समजले नसावे की हिंदू सणांना अधिक महत्व देणे पसंत करतात, चित्रपट त्या दिवशी रिलीज करणे योग्य नाही ! :)))
ज्या लोकांनी हा पाहिला आहे त्यांचे रिव्हूज हे चित्रपटापेक्षा अधिक प्रसिद्ध होत आहेत... तेव्हा रिव्हू पाहुन जमल्यास त्याचा आनंद घ्या !
विशेष सुचना :- वाचकांना असे भन्नाट रिव्हू मिळाले तर ते नक्की शेअर करा, आम्ही देखील त्याचा लुफ्त घेऊ ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022

मदनबाण's picture

15 Aug 2022 - 8:58 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2022 - 6:48 pm | श्रीगुरुजी

वा! जगाला जे माहिती नाही ते तेथे उपस्थित नसूनही केसरकरांसारख्या राज्य पातळीवर तिय्यम किंवा त्यापैक्षाही खालच्या पातळीवर असलेल्या नेत्याला समजलं हे वाचून केसरकर व त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांबद्दलचा आदर द्विगुणित झाला.

मुख्य म्हणजे चव्हाण व पवारांच्या उपस्थितीत मोदी गुपचूप ठाकरेंशी १० मिनिटे बोलले, १० मिनिटात सत्तांतराची योजना ठरली, ठाकरेंनी राजा हरीश्चंद्राप्रमाणे निस्पृह वृत्तीने आसनत्याग करून शत्रूला गादीवर आणण्याची तयारी केली . . . परंतु बाहेर बसलेल्या पवार व चव्हाणांना याचा सुगावा लागून त्यांनी लगेच योजना आखून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करून भाजपचा डाव उधळून लावला व डाव उधळून जात असताना ठाकरे त्याला पाठिंबा देत होते.

अजून येऊ दे फिक्शन!