पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले:
This election was an opportunity for the opposition to work together, to leave the past behind & build trust amongst each other. Unfortunately, some opposition parties chose to directly or indirectly support the BJP, in an attempt to derail the idea of a united opposition.— Margaret Alva (@alva_margaret) August 6, 2022
उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.
प्रतिक्रिया
12 Aug 2022 - 10:21 pm | शाम भागवत
:)
12 Aug 2022 - 10:43 pm | श्रीगुरुजी
अश्या सुरस, उत्कंठावर्धक, रहस्यमय,अद्भुत कथा अजून येऊ दे. तेवढंच आमचं मनोरंजन!
13 Aug 2022 - 12:03 am | शाम भागवत
:)
13 Aug 2022 - 12:15 am | श्रीगुरुजी
:)
12 Aug 2022 - 7:58 pm | मुक्त विहारि
चर्च बेकायदा आश्रमशाळा प्रकरणाला वेगळे वळण ; सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची संस्थाचालकाविरोधात विनयभंगाची तक्रार
https://www.loksatta.com/thane/a-minor-girl-who-was-released-from-an-ash...
अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारी नंतर या बेकायदेशीर चर्च आश्रमशाळा प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसून येत आहे.
13 Aug 2022 - 10:01 am | निनाद
सीवूड येथील एका चर्चमध्ये बेकायदेशीरपणे आश्रमशाळा (Navi mumbai crime) चालवली जात होती. या शाळेत असलेल्या ४५ अल्पवयीन बालकांची सुटका करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Minor Molestation) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवून चर्च व्यवस्थापकांच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 Aug 2022 - 8:59 pm | मुक्त विहारि
अमरावतीत भाजपच्या तिरंगा प्रचार रथाची तोडफोड, समाजकंटकांवर कारवाईची मागणी
https://www.loksatta.com/nagpur/bjp-india-flag-campaign-chariot-vandaliz...
अमरावती शहरात गत काही दिवसांपासून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. आज घडलेल्या घटनेचा तपास देखील पोलिसांनी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रचार रथावर झालेला हल्ला हा देशाचा अपमान असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
12 Aug 2022 - 9:09 pm | गामा पैलवान
हिंदूंच्या यात्रेवर हल्ले झाले तेव्हा सरकारं मूग गिळून गप्प बसली. सर्वधर्मसमभाव म्हणे. त्यामुळे धर्मांध माजले आणि ते तिरंगा यात्रेवर हल्ले करू लागले. वेळीच आवर घालायचा असतो.
-गा.पै.
12 Aug 2022 - 9:29 pm | श्रीगुरुजी
न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दींवर चाकूहल्ला होऊन त्यात ते गंभीर जखमी झालेत.
13 Aug 2022 - 8:47 am | वामन देशमुख
सलमान रश्दी रश्दींवरील हल्ल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक लोक त्यांचे सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकाच्या प्रती खरेदी करीत आहेत.
https://www.indy100.com/viral/salman-rushdie-stabbing-the-satanic-verses
13 Aug 2022 - 9:33 am | कॉमी
चांगली गोष्ट आहे.
असेच व्हायला हवे.
13 Aug 2022 - 10:55 am | धर्मराजमुटके
ज्या धर्माच्या लोकांचे शिक्षण व्हावे असे वाटते ते लोक खरेदी करतात काय ? वाचतात काय ? आपल्या चुका मान्य करतात काय ? आपल्यात बदल करतात काय ?
दुसर्या धर्मियांनी ते वाचून पहिल्या धर्मियांच्या जीवनात काही बदल होणार आहे काय ? तसे नसेल तर ही कवायत करुन फारसे काही हाती लागेल अशी परिस्थिती नाही असेच म्हणावी लागेल.
13 Aug 2022 - 10:10 am | निनाद
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थी राख्या घालून शाळेत पोहोचले. त्यावर आक्षेप घेत मिशनरी शाळेतील शिक्षकांनी मुलांना जबरदस्तीने पकडून राख्या काढून फेकून दिल्या. कर्नाटकातील मंगळुरू येथील कटिपल्ला येथील इन्फंट मेरीज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.
ख्रिश्चन शाळांमधील हिंदू विद्यार्थ्यांना पद्धतशीरपणे अपमानित करण्याच्या आणि त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक चालीरीती आणि परंपरांना लक्ष्य करून त्यांना अपमानास्पदपणे वागवण्याचा घटना घडत आहेत. हा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू मुलांचा धर्मावरून छळ केला आहे.
हिंदू विद्यार्थ्यांनी ख्रिश्चन शाळांमधे न जाता इतर शाळांमध्ये गेले पाहिजे.
13 Aug 2022 - 10:58 am | धर्मराजमुटके
मी देखील हाच विचार करुन जिथे हिंदू धर्माचा आदर केला जातो अशा शाळेमधे मुलाला दाखल केले आहे. अर्थात त्याची जास्तिची आर्थिक किंमत मला मोजावी लागतेय हे ही खरेच. असो.
13 Aug 2022 - 11:10 am | वामन देशमुख
त्याचे कारण शिक्षण हक्क कायदा आहे
मोदींनी आठ वर्षांत तो कायदा रद्द करायला हवा होता.
13 Aug 2022 - 11:16 am | वामन देशमुख
केंद्र -राज्य दोन्हीकडे, लोकांना हिंदुत्ववादी वाटणारी भाजपची सरकारे आहेत.
13 Aug 2022 - 10:35 am | श्रीगुरुजी
स्थानिक नगरसेवकाने ध्वजवाटप केले. अत्यंत दु:खाने सांगावेसे वाटते की ध्वजाचे आरेखन पूर्ण चुकले आहे.
तिन्ही रंगाच्या पट्ट्यांची रूंदी वेगवेगळी आहे. श्वेत पट्टा सर्वाधिक रूंद असून भगवा पट्टा सर्वात कमी रूंदीचा आहे. मध्यभागी असलेले अशोकचक्र वर्तुळाकार नसून उजवीकडे झुकलेले अंडाकृती आकारात आहे.
13 Aug 2022 - 10:49 am | धर्मराजमुटके
मला वाटते की तुमचा स्पष्टवक्ता स्वभाव पाहता ही गोष्ट तुम्ही नक्कीच नगरसेवकाच्या लक्षात आणून दिली असेल.
अवांतर : मी घर घर तिरंगा मोहिमेत सहभागी झालो नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकणार्या गोष्टींची यादी वाचली.
एवढे सगळे सोपस्कार माझ्याकडून होतील की नाही याची शंका वाटते. तसा मी देव देश आणि धर्माबाबत आस्थेवाईक असलो तरी कर्मकांडांमधे मागे पडतो. त्यापेक्षा १५ ऑगस्ट ला मुलाच्या शाळेत जाऊन तिथल्या मुलांच्या निरागस सान्निध्यात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे ठरविले आहे.
13 Aug 2022 - 5:45 pm | आनन्दा
राजहंसाचे चालणे
जगी झालीया शहाणे
म्हणोनि काय कवणे
चालोची नये
13 Aug 2022 - 5:52 pm | धर्मराजमुटके
ह्या मारधाडीच्या धाग्यावर एवढे सुंदर वचन ? आत्मा थंडावला आज :)
नक्कीच चालावे. मी फक्त माझ्यापुरते सांगीतले हो.
14 Aug 2022 - 8:17 am | जेम्स वांड
भारतीय ध्वज संहितेनुसार अतिशय गंभीर गुन्हा असून याच्याविरुद्ध कडक शिक्षेची प्रावधाने आहेत.
खरे पाहता बी आय एस उर्फ ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या मानकांनुसार झेंडे बनविण्याचे काम करण्यासाठी एकमात्र मान्यताप्राप्त युनिट आहे देशात ते म्हणजे कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ.
बाकी इतर असले थातूरमातूर रंगकाम करून बनवलेले झेंडे घेऊ नयेत, तो एक कायदेशीर गुन्हाच नाही तर राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान पण होतो, जो कुठल्याही सुजाण नागरिकांनी करू नये.
15 Aug 2022 - 5:47 am | अनन्त अवधुत
आणि काल सकाळी झेंडा लावताना त्यातल्या चुका लक्षात आल्या.
ध्वज २:३ प्रमाणात नव्हता, अशोक चक्र तिरपे होते, भगवा, पांढरा, आणि हिरव्या रंगाचे प्रमाण पण चुकले होते.
झेंडा बदलण्यासाठी दुकानदाराकडे गेलो असता, तो म्हणाला कि सगळे झेंडे एकसारखेच आले होते. सगळे विकले गेले आणि आता एकच झेंडा शिल्लक आहे.
तो झेंडा पण प्रमाणात नसल्याने मी घेतला नाही. मी मजजवळचा झेंडा त्याला परत केला.
तळटीपः त्याच्या दुकानावर लावलेला झेंडा मात्र प्रमाणशीर होता. त्याने बहुधा दुसरीकडून आणला असावा.
14 Aug 2022 - 9:22 am | आग्या१९९०
झेंड्याच्या नावाने बालिशपणा चालू आहे. पोरंटोरं सायकल ,बाईकवर तिरंगा लावून तिरंग्याचा अवमान करत आहेत. हेतू तोच असावा.
14 Aug 2022 - 9:30 am | जेम्स वांड
काय असेल ह्यावर माझे भाष्य नाही, किंवा जनता हेतुपरस्पर काही करेल ते ही एखाद सरकारच्या म्हणण्यावर ते ही झेंड्याच्या अपमान बाबतीत असे अजूनतरी वाटत नाही मला.
जनता भावूक असते, प्रसंगी कायद्याने अडाणी असते पण इतकी चवचाल नसते, कारण मुळात गर्दीचा बुद्ध्यांक जरा कमीच असतो, लोकांना देशभक्ती साजरी करायला आवडते, त्यानुसार ध्वजसंहिता पण मॉडीफाय झाली आहे (त्याच्यासाठी एका काँग्रेसच्या राज्यसभा खासदार असणाऱ्या नवीन जिंदल नामक नेत्याने आंदोलन केले होते) मॉडीफाईड संहितेनुसार कोणीही भारतीय नागरिक भारतीय झेंडा फडकवु शकतोच, विषय तो नाही विषय आहे झेंडा मानकांच्या अनुसार असणे किंवा नसणे, देशभक्ती मुळात वाईट गुण वाटत नाही. त्यामुळे हेतुवर तूर्तास benefit of doubt, पण एकंदरीत जनतेने तारतम्य अन् झेंड्याच्या पावित्र्याची जाण ठेवावी अशी अपेक्षा.
14 Aug 2022 - 10:24 am | आग्या१९९०
जनतेचा हेतू नक्कीच तसा नाही. ज्यांनी एखादे खेळणे वाटावे अशा प्रकारे सदोष तिरंगे वाटले त्यांच्या हेतूबद्दल शंका येते. तिरंग्याचा अवमान होऊ नये ह्याबद्दल काय काळजी घेतली? सदोष तिरंगे वाटलेच कसे गेले? आपण तिरांग्याबाबतीत फार गंभीर नसल्याचे सरकारने दाखवून दिले आहे.
14 Aug 2022 - 11:47 am | डँबिस००७
"हर घर तिरंगाने" झेंड्याचा घोर अपमान होतो. पण हमिद अंसारी ह्यांनी 15August कार्यक्रमाला झेंड्याला सॅल्युट केला नाही, तेंव्हा पुरोगाम्याच्या मते तो झेंड्याचा अपमान नव्हता.
आता पर्यंत ईतकी वर्षे झेंड्याचे अपमान होतच होते. अगदी हल्ली पर्यंत आम जनतेला 15 August / 26 Jan सोडुन ईतर दिवशी झेंड्याला हात लावायची ( झेंडा फडकवायची) कायद्याने बंदी होती. पुढे कधीतरी ही बंदी उठवली गेली.
लहान मुले शाळेय गणवेशावर पेपरचे झेंडे पीनने लावत, सायकलवर काडीवर चीकटवलेले झेंडे बांधत असत. कायद्यानुसार आम्ही असे गुन्हे शालेय जिवनात केलेले आहेत. शाळेत फडकवले जाणारे झेंडे कर्नाटकातल्या खादी भंडारातुन येत असत ह्याच्यावर माझा विश्वास नाही.
पुर्ण देशाला झेंड्याचा पूरवठा फक्त एका खादी भंडारातुन व्हावा हा अतर्क निर्णय असावा.
14 Aug 2022 - 12:18 pm | जेम्स वांड
अगदी हल्ली पर्यंत आम जनतेला 15 August / 26 Jan सोडुन ईतर दिवशी झेंड्याला हात लावायची ( झेंडा फडकवायची) कायद्याने बंदी होती. पुढे कधीतरी ही बंदी उठवली गेली.
असं नाही स्पष्ट उपलब्ध आहे पण ते नेटवर नवीन जिंदल विरुद्ध भारत सरकार १९९५ , हे काँग्रेस पार्टीचे खासदार होते, काहींना ते गैरसोयीचे वाटू शकेल पण होते हे fact बदलले जाऊ शकत नाही.
फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया ही त्यांची गैर सरकारी संस्था होय.
ह्याचं कोडच्या अंतर्गत, कर्नाटक खादी मंडळाला पर्यायवाचक इतर मटेरियल वापरून झेंडे बनवणारे उत्पादक २००५ पासून allowed केले आहेत पण त्यांनाही झेंडे BIS मानकांच्या अंतर्गतच बनवावे लागतात, अन् अश्या स्टँडर्ड वर certified आजही कर्नाटक खादी मंडळ एक कंपनी आहे.
दुसऱ्या कुठल्या असतील तर पहावयास लागतील. तुमचा तर्क चेक करताना नवीन माहिती सापडली, ते एक बरे झाले.
पण फ्लॅग कोड मॉडीफाय होण्याच्या अगोदर कर्नाटक खादी मंडळ एकमेव कंपनी होती, हे मात्र नक्की आहे. १७ एकरांत पसरलेल्या त्यांच्या फॅसिलिटी मधे १००-१५० कामगार वर्षभर फक्त झेंडे तयार करत असतात. त्यामुळे त्याकाळी असलेल्या लिमिटेड डिमांड मध्ये एकच कारखाना पुरेसा ठरत असेल असे वाटते
14 Aug 2022 - 12:21 pm | जेम्स वांड
हमीद अन्सारी
ह्या माणसाबद्दल एकंदरीतच मत खराब झाले आहे permanently, उपराष्ट्रपती पदावर असणाऱ्या माणसाने IAMC सारख्या धर्मांध अन् मूलतत्ववादी संघटनेच्या कार्यक्रमात जाऊन गळे काढणे ही शुद्ध हलकट वृत्ती आहे असे मी मानतो.
14 Aug 2022 - 12:07 pm | डँबिस००७
ज्या प्रमाणात "लाल सिंग चढ्ढा"चा बॉयकॉट यशस्वी झाला तितकाच "हर घर तिरंगा" कार्यक्रम यशस्वी होताना दिसत आहे. "मी पण देश प्रेमी" अस दाखवण्यासाठी आमिर खानने ह्या कार्यक्रमा अंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावलेले फोटो शेअर केलेले आहेत.
जनतेचा मूड बदलत आहे. पुढे येणार्या संभाव्य धोक्याची जाणिव होऊन त्यावरील ऊपायावर चर्चा करण्यासाठी बॉलीवूड मधील दिग्गजांची काल मिटींग झालेली आहे. जनतेला मुर्ख कसे बनवायचे ह्याचा सखोल आराखडा तयार केलेला आहे अशी बातमी आहे. (बातमीचा दूवा देता येणार नाही)
14 Aug 2022 - 12:26 pm | जेम्स वांड
अंतस्थ गोटातली बातमी असल्यास अन् ती पक्की असल्यास तुम्ही ती पोलीस, आयबी/ रॉ वगैरे लोकांना देऊन आपल्या नागरिक जबाबदारीचे पालन करणे जास्त श्रेयस्कर.
पब्लिक फोरम वर असे काही बोलताना आपणांस किमान विदा देता येत नसतील तर त्या वक्तव्याची जबाबदारी तरी वैयक्तिक रित्या घेण्याची तसदी उचलली पाहिजे, उद्या तुम्ही विदा लिंक काहीही उपलब्ध नाही/ देता येणार नाही/ देणार नाही म्हणून काहीही दामटून लिहाल तर त्याला काय अर्थ असेल !
14 Aug 2022 - 4:44 pm | कपिलमुनी
जनतेचे पैसे कसे लुटायचे याबद्दल काल मोदी आणि अदानी अंबानी ची मीटिंग झाली..
दुवा देता येणार नाही
15 Aug 2022 - 7:06 pm | डँबिस००७
"लाल सिंग चढ्ढा"च्या बॉयकॉटमुळे अंबानीचेच नुकसान झाले आहे हे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटले असावे ! त्यामुळे बरे झाले त्याला चांगलीच अद्दल घडवली. लगेहात आता जिओ फोनचा पण बॉयकॉट करा म्हणजे अंबानी कसा रस्त्यावर येईल.
14 Aug 2022 - 12:08 pm | आग्या१९९०
एखाद्या व्यक्तीने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते, परंतु येथे सरकारच सदोष राष्ट्रध्वज वितरीत करत आहे ह्यात तुम्हाला काहीही वावगे वाटत नाही?
15 Aug 2022 - 7:08 pm | डँबिस००७
जर सरकारने असे केले असेल तर तुम्ही ती माहीती, पोलीस, आयबी/ रॉ वगैरे लोकांना देऊन आपल्या नागरिक जबाबदारीचे पालन करणे जास्त श्रेयस्कर.
14 Aug 2022 - 12:14 pm | आग्या१९९०
ज्या प्रमाणात "लाल सिंग चढ्ढा"चा बॉयकॉट यशस्वी झाला तितकाच "हर घर तिरंगा" कार्यक्रम यशस्वी होताना दिसत आहे.
स्वदेशी लोकांनी काढलेला सिनेमा बॉयकॉट का करावासा वाटतोय?
"मी पण देश प्रेमी" अस दाखवण्यासाठी आमिर खानने ह्या कार्यक्रमा अंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावलेले फोटो शेअर केलेले आहेत.
आणि त्याने आपल्या घरावर तिरंगा नसता फडकावला असता तर त्याला काय म्हटले असते आपण?
14 Aug 2022 - 2:19 pm | गामा पैलवान
ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ३) उघडला आहे : https://www.misalpav.com/node/50562
-गा.पै.