Skip to main content

ताज्या घडामोडी- ऑगस्ट २०२२ (भाग २)

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 06/08/2022 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले: उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.

वाचने 24904
प्रतिक्रिया 186

प्रतिक्रिया

In reply to by जेम्स वांड

मी थोडासा contemporary बोलतोय.
पूर्ण contemporary असे काही नसतेच कारण पूर्वी घेतलेल्या निर्णयांचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी असतोच. बाबरी पडल्यानंतर एक वर्षाने नोव्हेंबर १९९३ मध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत विधानसभा निवडणुक झाली होती. त्यावेळी 'आज पाच प्रदेश कल सारा देश' अशी भाजपची घोषणा होती. त्या निवडणुका भाजपने पूर्णपणे एकट्याने आणि हिंदुत्व या स्लोगनवर लढवल्या होत्या. झाले काय? तर उत्तर प्रदेशात सपा-बसपा युती झाल्याने विरोधकांची मते विभागली गेली नाहीत आणि भाजपला सरकार बनवता आले नाही. तिथे मुलायमसिंग मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात तर सपशेल पराभव झाला. राजस्थानातही पूर्ण बहुमत मिळाले नाही तर २०० पैकी ९५ जागा मिळाल्या म्हणून शेखावत मुख्यमंत्री होऊ शकले. फक्त दिल्लीत भाजपला अपेक्षित होता तसा विजय झाला. तेव्हा भाजपच्या नेतृत्वाला बहुतेक एक गोष्ट समजली की नुसत्या हिंदुत्वाच्या जोरावर आपण स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही. आता भाजप बर्‍याच राज्यात आहे. त्यावेळी दक्षिणेत कर्नाटकात ४ खासदार आणि सिकंदराबाद मधून बंडारू दत्तात्रय हे एक खासदार एवढेच अस्तित्व होते. तेव्हा बाबरी पडल्यावर आपण स्वबळावर सत्तेत येऊ वगैरे भाजप नेते बोलत असले तरी सत्य परिस्थिती तशी नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर १९९४ मध्ये अडवाणींनी पत्रकारांशी बोलताना भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करेल असे म्हटले होते हे पेपरात वाचल्याचे माझ्या लक्षात आहे. म्हणजे जे १९९८ मध्ये प्रत्यक्षात झाले त्या दृष्टीने भाजपने आधीपासूनच पावले उचलली होती. तसेच वाजपेयी आणि अडवाणी यांचे वयही वाढत होते हा आणखी एक फॅक्टर असू शकेल. म्हणजे आपण असतानाच पक्षाची सत्ता दिल्लीत यायला पाहिजे असा काही विचार असावा. त्यातून मग भाजपने मित्र शोधले त्यात जॉर्ज फर्नांडिस- नितीशकुमार होते. ते १९९६ मध्ये भाजपबरोबर गेले. १९९८ मध्ये आणखी बरेच पक्ष बरोबर घेतले. तेव्हा 'ऑर्गॅनिक' वाढीपेक्षा मित्रपक्ष शोधून त्यांच्या मदतीने सत्तेत यायचा सोपा मार्ग भाजपने खेळला असे दिसते. त्या प्रकारात मग नितीशकुमार २०१३ पर्यंत भाजपबरोबर होते. २०१३ मध्ये नितीशकुमार आणि भाजपचे बिनसले. तरीही २०१७ मध्ये कोणत्या कारणांमुळे भाजपने नितीशना परत घेतले असावे याविषयी अन्य एका प्रतिसादात लिहिलेच आहे. ती युती कालपर्यंत होती. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर contemporary हे पूर्णपणे वेगळे कसे करणार?

In reply to by क्लिंटन

असे ध्वनित झाले असल्यास माफ करा, पण contemporary significant असावे तत्कालिक चर्चेत इतकेच काय ते सुचवत होतो बाकी काही नाही.

In reply to by क्लिंटन

तेजस्वी यादव बुद्धिमान असेल तर तो नितीशकुमारांना पाठिंबा न देता मुदतपूर्व निवडणूक घ्यायला लावेल ज्यात भाजप व संजद या दोन शत्रूंपैकी संजद हा शत्रू पूर्ण संपून नितीशकुमारांची राजकीय कारकीर्द कायमस्वरूपी संपेल व भाजप हा एकमेव शत्रू शिल्लक राहील. १९७९ मध्ये इंदिरा गांधींनी आधी चरणसिंगना पाठिंबा देऊन जनता पक्षाचे सरकार पाडले व नंतर ३ आठवड्यांनी चरणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेऊन तेही सरकार पाडले व मुदतपूर्व निवडणूक घ्यायला लावली. तेजस्वी यादवने निदान असे तरी करावे. नितीशकुमारांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणे ही तेजस्वी यादवची घोडचूक ठरेल कारण अत्यंत विश्वासघातकी नितीशकुमार पुन्हा एकदा टोपी फिरवून भाजपकडे जाऊ शकतात. दुसरीकडे नितीशकुमारांनी भाजपला पुन्हा एकदा लाथ मारून राजदशी पुन्हा एकदा सोयरिक जमविणे यात काहीच आश्चर्य नाही. १९९६ पर्यंत लालूबरोबर जनता दलात असणाऱ्या नितीशकुमारांनी जनता दल सोडून जॉर्ज फर्नांडिसांबरोबर समता पक्ष काढला. त्याचेच रूपांतर पुढे संयुक्त जनता दलात जाणे. आपली प्रतिमा उच्चवर्णीय, हिंदुत्ववादी वगैरे असल्याने बिहारमध्ये बहुमतापासून आपल्याला दूर रहावे लागते, या चुकीच्या समजुतीतून भाजपने आपल्या तुलनेत खूप लहान असलेल्या संजदच्या नितीशकुमारांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करून आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. जी गंभीर घोडचूक महाराष्ट्रात भाजपने केली त्यातून भाजप काहीच शिकला नाही व तीच गंभीर घोडचूक बिहारमध्ये करून बसला. नितीशकुमार हे अत्यंत निष्ठुर व अत्यंत विश्वासघातकी आहेत हे समजूनही भाजन नितीशकुमारांचे तळवे चाटत बसला. २००९ च्या आसपास नितीशकुमारांनी पक्ष संस्थापक जॉर्ज फर्नांडिसांंना उमेदवारी नाकारून त्यांना पक्षातून हाकलून दिले. नंतर २०१३ मध्ये भाजपला लाथ घालून पुन्हा एकदा राजदबरोबर सूत जुळवून सरकार टिकविले. २०१४ मध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर जेमतेम २ जागा जिंकल्या. २०१५ मध्ये तिसऱ्यांदा राजदशी सोयरिक करून विधानसभा निवडणूक जिंकली. राजदपेक्षा कमी जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद मिळविले. २०१७ मध्ये पुन्हा एकदा राजदला लाथ घालून पुन्हा एकदा भाजपशी सोयरिक केली व मुख्यमंत्रीपद टिकविले. नितीशकुमारांसारख्या पवारांपेक्षाही जास्त विश्वासघातकी व्यक्तीला पुन्हा पाठिंबा देणे ही घोडचूक ठरेल असे मी त्यावेळी मिपावर लिहिले होते. ते आज सिद्ध झाले. भाजप नितीशकुमारांच्या इतक्या कह्यात गेला होता की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ खासदार असलेल्या भाजपने फक्त १७ जागा लढविल्या तर २ खासदार असलेल्या संजदला भाजपने तब्बल १७ जागा दिल्या. हा अर्थातच अत्यंत चुकीचा निर्णय होता. आता अपेक्षेप्रमाणे नितीशकुमारांनी पुन्हा एकदा भाजपला लाथ घालून पुन्हा एकदा राजदशी सोयरिक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्यापेक्षा अत्यंत लहान पक्षांना भरपूर जागा देऊन डोक्यावर घेणे, त्यांचे तळवे चाटणे आणि आपली लाचारी दाखवून त्यांच्या लाथा सहन करणे ही चूक भाजप महाराष्ट्रात व बिहारमध्ये वारंवार करीत आला आहे. अनेकदा लाथा खाऊनही अक्कल येत नाही. अश्या पक्षांची लायकी लाथा खाण्याचीच आहे. बरं झाले भाजपला पुन्हा एकदा कंबरड्यात लाथ बसली. परंतु भविष्यात भाजप महाराष्ट्रात किंवा बिहारमध्ये हीच घोडचूक पुन्हा करणार नाही याची कोणतीही शाश्वती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

नितीशकुमार ह्यांनी पद्धतशीरपणे आपली प्रतिमा सावरली हे पण दुर्लक्ष करून चालणारे fact नाही गुरुजी. लालूंच्या जंगलराज बद्दल लोकांच्या मनात यथोचित भीती पेरणे, बिहारमध्ये खरोखर विकासाला चालना देणे, त्यांचे श्रेय पूर्णपणे स्वतःच्या छबीला देऊन भाजपला उष्टे भांडेही चाटण्यास न सोडणे (ह्यावेळी सुमो नुसते वेंधळेपणाने बघत बसले होते का हा प्रश्न आहेच) २४/७ वीज, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स, स्त्री शिक्षणात चक्क ५०% वाढ, बिहारी माणसाच्या सरासरी आयुर्मानात ५ वर्षांची वाढ हे भाजप आणि संजद सरकारच्या काळात साध्य झालेले आकडे आहेत. भाजपच्या संजय श्रावगी, सुशील मोदी, इत्यादी कार्यकर्त्यांनी तिथे काम केलेले आहे पण त्याचे क्रेडिट जमा झाले पूर्ण नितीशच्या खात्यात, इतके की "बिहार की बेटी इशरत जहाँ" मोड मध्ये गेलेल्या नितीश कुमार ह्यांचेच तळवे त्यांना परत एकदा चाटण्याची हौस, ती का ? कारण मी वरती (का खाली) उहापोह केल्याप्रमाणे भाजपने कधी बिहारमध्ये राज्यव्यापी अपील असलेला एकच नेता पण उभा करण्याची तसदी घेतली नाही, युपीमध्ये (काहींच्या मते ध्रुवीकरण केल्यामुळे, पण काही का असेना) योगींचा एक चार्म आहे, "महाराज जी" किंवा "महंत जी" म्हणले का लोक प्रेमाने नाहीतर दहशतीने बघतात त्या व्यक्तीकडे, बिहारमध्ये इतकी वर्षे होऊनही असा एक लीडर न बनवता येणे हे मला वाटते भाजपच्या आजच्या बिहारमधील घसरड्या स्थितीचे एकमेव कारण आहे, बाकी नितीश निष्ठुर असणे वगैरे वरवरचा राजकीय मुलामा झाला (जो आधी नितीश सोबत बसलेले असताना भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींना पण पूर्णपणे ठाऊक होता)

आणखी २ हजार कोटींचा घोटाळा? किरीट सोमय्यांच्या दाव्यामुळे खळबळ, म्हणाले “संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार” https://www.loksatta.com/maharashtra/kirit-somaiya-news-allegations-on-… वसई विरारमधील २००० कोटी रुपयांचा जमीन बांधकाम घोटाळा, पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथे पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्ससोबत झालेल्या बैठका यांची चौकशी सुरू व्हायची बाकी आहे. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.....

In reply to by मुक्त विहारि

इशरत जहाँ बिहार की बेटी म्हणणाऱ्या लोकांसोबत आधीच कश्याला सरकार स्थापन केले ते फक्त कळेना.

काय बोलावं ते सुचत नाहीये


https://www.esakal.com/amp/maharashtra/supreme-court-notice-to-sharad-p… राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश या नोटीसीमधून न्यायालायने दिले आहेत.....

अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस, किरीट सोमय्या म्हणाले, “१००० कोटी रुपयांचा…” (https://www.loksatta.com/mumbai/kirit-somaiya-serious-allegations-of-ma…) माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

मंत्रीमंडळात संजय राठोड व अब्दुल सत्तारना घेतलेले पाहून अत्यंत संताप आला. महाराष्ट्रात सत्तेसाठी अत्यंत वखवखलेले भाजप नेते रोज एक नवीन खालची पातळी गाठत आहेत. याच राठोडविरूद्ध चित्रा वाघ व चंद्रकांत पाटलांनी रान उठविले होते. आता मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाटील राठोडच्या मांडीला मांडी लावून बसणार आणि ओशाळवाणे हसत राठोडचे समर्थन करणार. सुदैवाने चित्रा वाघ अजूनही राठोडच्या विरोधात आहेत. देव करो आणि महाराष्ट्रात लवकरात लवकर दीर्घकाळासाठी राष्ट्रपती राजवट येवो. उद्धव ठाकरेंनी निदान राठोडला मंत्रीमंडळातून काढून परत घेतले नव्हते. यांनी तर त्यापुढची पायरी गाठली.

In reply to by श्रीगुरुजी

उद्धव ठाकरे चॅप्टर झालाय बंद आता, फुटले एकनाथराव अन् ४० आमदार कधीच, सत्ता झाली स्थापन. हनुमान ह्या कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या देवतेवर अश्लाघ्य अन् अश्लील टीका करणाऱ्या अन् आता "आपल्या" म्हणवल्या जाणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यावरही दोन शब्द बोलावे ही विनंती आपणांस. अन् महाराष्ट्रातील नेत्यांनी काय म्हणून म्हणता आहात ? महाराष्ट्रातील फुटीर अन् फडणवीस दिल्लीच्या वाऱ्या कश्याला करत होते जर मंत्रिमंडळ फायनल करायचे नव्हते तिकडे तर ? हवाबदल म्हणून ? केंद्र स्तरावरील भाजप सुद्धा तितकीच सत्ता पिपासू आणि विधिनिषेध नसणारी आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य ह्या निमित्ताने अधोरेखित झालेले आहेच.

जरा एक शंखपुष्पी डोस . इतकेच गद्दार होते नितीशकुमार तर पहिलेच कश्याला लाळ घोटत गेली भाजप त्यांच्यामागे ?? का आता परत हे सगळे आठवून हीच टीका निर्लज्जपणे परत करणार भाजप ??

In reply to by श्रीगुरुजी

आदेशाशिवाय काहीही होत नाही, त्यामुळे (जर करत असाल तर हं) भाजप केंद्रीय नेतृत्वाला धुवून कड्क इस्त्रीचे कपडे घालणं बंद केलंत तरी चालेल. भाजपमध्ये मोदी आणि शहा ह्यांच्या इच्छे शिवाय अन् त्यांच्या संज्ञानात दिल्याशिवाय काडी इकडची तिकडे होत नसते हे मला वाटते स्पष्ट आहे आता.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. ही बातमी कळताच मला फार वाईट वाटले आहे ! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! _/\_

बाकी, महाराष्ट्र भाजप लाळ चाटे, बिहार भाजप लाळ घोटे गोवा भाजप परोपकार म्हणून काँग्रेसी खोगीरभर्ती भरतोय मेघालय राज्याचे भाजप उपाध्यक्ष बर्नार्ड मराक वेश्यालय चालवणार जिथे कायदेशीर अज्ञान मुलींना वेश्याव्यवसाय करणेस लावले होते

फक्त मोदी शहा ह्यांना ह्याच्यातली कसलीच कल्पना नाही इतके ते गरीब बिचारे लोक अंधारात आहेत

असे ज्याचे म्हणणे असेल त्याच्या अंधभक्तीभावासमोर काय बोलणे !

In reply to by जेम्स वांड

एकट्या फडणवीसांना दोष देऊन उपयोग नाही, केंद्रीय नेतृत्वही तेवढेच जबाबदार आहे. १०६ आमदार असतानाही भाजपची काय असहाय्य आहे ते समजत नाही. तावडे, मुंढे ही मंत्रमंडळात नाहीत, म्हणजेच फडणवीसांना मोकळे रान आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

आणि सिंपल पद्धतीने मांडलेले फॅक्ट नेल ऑन द हेड प्रकारे. महाराष्ट्रात जरा काही विपर्यस्त अन् नागड्या राजकीय सोयीनं झालं का फडणवीस अन् राज्य भाजप दोषी गोव्यात काही झालं तरी स्थानिक नेतृत्वाच्या नावानं बोंब पण इथ मुळात मोदी शहांच्या परवानगीशिवाय काडी इकडची तिकडे होत नाही हे फॅक्ट का विसरावे मग ?? घी देखा बडगा नही देखा म्हणायला हवे ह्या केसमध्ये

In reply to by रात्रीचे चांदणे

फडणवीसांसारख्या अपात्र, पक्षाला खड्ड्यात घालणाऱ्या व सत्तेसाठी अत्यंत शखवखलेल्या व्यक्तीला पूर्ण रान मोकळे देणारे मोदी^शहा तितकेच दोषी आहेत. खडसेंना भाजप सोडायला लावला, मुंडे व तावडेंना संपविले आणि नाईलाजाने विधान परिषदेत आणाव्या लागलेल्या बावनकुळेंना मंंत्रीपद दिले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सत्तेसाठी अत्यंत शखवखलेल्या व्यक्तीला पूर्ण रान मोकळे देणारे मोदी^शहा तितकेच दोषी आहेत.
आभारी आहे, मनमोकळेपणाने कबूल केल्यामुळे, आपल्याबद्दल आदर दुणावला....

In reply to by श्रीगुरुजी

बावनकुळे आणि अमित शहा यांचे फारच "प्रेमाचे" संबंध आहेत. त्यामुळे ते बाजूला राहिलेत त्यात काही विशेष नाही.

देशभर भाजपाची सत्ता असली पाहिजे. सगळ्याच राज्यात भाजपा असली पाहिजे. भाजपा सर्वत्र व्यापून उरली पाहिजे या नादात भाजपा काय काय करते आणि सत्तालोलूप भाजपा सत्तेसाठी काय करेल याची गॅरंटी कोणीही घेऊ शकत नाही. महाराष्ट्रात अनैसर्गिक युती म्हणून बोंब मारणारे. ( खरं तर राजकारणात नैसर्गिक, अनैसर्गिक काही नसतं) जम्मु-काश्मिर मधे भाजपाने मुप्ती महबुबावर संसार थाटला ते काही नैसर्गिक म्हणायचं कारण नव्हतं, तोही संसार फार टीकला नाही. महाराष्ट्रात, राष्ट्रवादीबरोबर पहाटे उठून संसार स्थापन करायची धडपड सर्व देशाने बघीतली. सत्तेशिवाय राहता येईना म्हणून अडीच वर्ष 'पुन्हा येईनचा' महाराष्ट्रात गळ टाकून बसले. वेगवेगळे प्रयोग आणि सत्तेशिवायचा तो आरडा-ओरडा महाराष्ट्र बघत होताच. शेवटी, एक गट फोडून उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे लागले. दिल्लीत आप पक्षाशी ढुसण्या देणे सुरु असतात. पंजाबमधे लाथाळ्या सुरुच असतात. आता बिहारमधे जनता दल (संयुक्त ) युतीशी असलेली सत्तायुती संपुष्टात येत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट धरुन उभी राहीलेली भाजपा शिवसेना संपवायला निघाली. बिहारमधे देशाचे गृहमंत्री, अमित शहा जनता दल (संयुक्त) फोडाफोडीत गुंतले होते, प्रयत्न करीत होते असा आरोप करण्यात येत होता. म्हणून बिहारचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही असे ठरवून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपा बरोबरचा संसार मोडला. अजून किती सत्तायुत्या आणि कोणत्या पक्षाबरोबर किती घटस्फोट ते येत्या काळात कळेलच. पण, आज तरी सत्तेचा हावरटापोटी भाजपा थोडीफार असलेली प्रतिष्ठा घालवत आहे. भाजपाला सत्तेचा हावरटपणा आवरावा लागणार आहे, नाही तर भाजपाची वाताहात होऊन रसातळाला ती नक्की जाईल. आपण मात्र तोवर ''बहनो और भाईयो'' असा गोड आवाज कुठून आला तर, आपल्या खिशाला भोक नक्की पडणार असे समजून सांभाळलं पाहिजे, आपल्या हातात सध्या तितकेच उरले आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक गट फोडून उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे लागले. लागले नाही, पार्टी अंतर्गतच गेम होऊन पदावनती झाली आहे म्हणायला फुल स्कोप आहे हो सर. पण, बिरुटे मोदी विरोधक आहेत, हिंदुद्वेषी आहेत अन् अब्दुल सत्तार धर्मयोद्धे आहेत हो, तसं ठरलंच आहे आपलं फिक्स. &#128540 &#128540 &#128540

In reply to by जेम्स वांड

>>>बिरुटे मोदी विरोधक आहेत, हिंदुद्वेषी आहेत अन् अब्दुल सत्तार धर्मयोद्धे आहेत हो, तसं ठरलंच आहे आपलं फिक्स. होना...! =)) एक तर मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळ विस्तार केला. अन्नपाणी गोड लागेल का. कालची एकादशी आणि आज निषेध म्हणून उपवास. जड चाल्लय सगळं. सरकार येऊन आनंद होईना. (कप्पाळमोक्ष स्मायली) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

. देशहित म्हणून कळ सोसा थोडी तुम्ही, काय परत फिरून एक मिपाकर म्हणून शरम वाटली वाला डायलॉग मला परत मारूची इच्छा नाही बघा प्रोफेसर साहेब.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट धरुन उभी राहीलेली भाजपा शिवसेना संपवायला निघाली. खोटे बोलणे थांबवा. मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर महाराष्ट्रात कोणालाही माहिती नसलेल्या सेनेला माजपने मोठे केले आहे ही वस्तुस्थिती आहे. याविषयी पूर्ण आकडेवारीनिशी अनेकदा लिहिले आहे. विश्वास बसत नसल्यास युती होण्यापूर्वी कोणाला किती मते होती, किती आमदार होते ते शोधा.

In reply to by श्रीगुरुजी

देशात सध्या खरं बोलणारे दोनच लोक. एक आमचे शेठ आणि दुसरे तुम्ही... ( ह. घ्या) बाकी, मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. १९ जून १९६६ ला. जनसंघानंतर, भाजपाचं बारसं व्हायला १९८० उजाडलं. आता वयाने कोण मोठं ? शिवसेना. तत्त्पूर्वी शिवसेनेने अनेक पक्षांशी युत्या केल्या. (महापालिकेत) प्रजासमाजवादी, काँग्रेस इंडिकेट-सिंडिकेट, रिपब्लीकन, मुस्लीम लीग ते दलित पँथर. नंतरची, युती ”भाजपासोबत सुद्धा शिवसेनेने १९८४ मध्ये अगदी काही काळ घरोबा केला होता. पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर व त्यानंतर उसळलेल्या भीषण दंगलीमुळे आलेल्या लाटेत, ही युती वाहून गेली होती. नंतर, भाजपने सेनेशी काडीमोड घेतला (कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे गाजलेले वाक्य हे त्याच काळातले) पण त्यांचे बंध परत जुळले ते १९८९ मध्ये, ते सुद्धा हिंदुत्वाच्या विषयावर” पुढे. १९९० शिवसेना-भाजपा युती. शिवसेना- ५२. भाजपा ४२. १९९५ ला शिवसेना ७३ तर, भाजपा ६५. १९९९ शिवसेना ६९ तर, भाजपा ५६ २००४ शिवसेना ६२ तर, भाजपा ५४ २००९ शिवसेना ४६ तर, भाजपा ४६ २०१४ ( आपल्या शेठची विशेष लाट) शिवसेना ६३ तर, भाजपा १२२ २०१९ शिवसेना ५५ तर, भाजपा १०६ (माहितीस्त्रोत विकि) सर्व प्रवास पाहिला तर, शिवसेनेचे कायम जास्त आमदार निवडून येत राहीले. शिवसेनचा महाराष्ट्रभर कायम दबदबा राहीला. भाजपा आत्ता आत्ता महाराष्ट्रभर दिसायला लागले. बाकी, राजकीय पक्षांचा प्रवास आकड्यांवर असतो. सतत, शिवसेनेबरोबर भाजपाला युती करावी लागली. बाकी, तुम्हाला तुमची काय वस्तुस्थिती मांडायची ती मांडावी. माझा विषय संपला. जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण तुम्हाला कावीळ होऊन वरतून तुम्ही पिवळ्या काचेच्या चष्म्याला हळद फासून तो घालून प्रतिसाद टंकन करता आहात आणि तुम्ही लवकर ब्रे व्हावे इतक्या शुभेच्छा सहित इथेच थांबतो तळटीप :- मजय सी मयत री करनर क असे मी मुळीच विचारणार नाही

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगळी आकडेवारी सादर करा की सर. असे काय करता?
मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. १९ जून १९६६ ला. जनसंघानंतर, भाजपाचं बारसं व्हायला १९८० उजाडलं. आता वयाने कोण मोठं ?
समजा १९८० मध्ये भाजप हे नाव न घेता परत जनसंघ हे नाव घेतलं असतं तर मग जनसंघ मोठा झाला असता का? कारण जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली होती आणि १९७७ पूर्वीच्या जनसंघातले सगळे लोक १९८० च्या भाजपत होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कधी मिळाले याविषयीही लिहा की. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ विद्याधर गोखले हे अधिकृत शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. निवडणुक आयोगाने बाकीच्या तीन- वामनराव महाडिक, अशोक देशमुख आणि मोरेश्वर सावे यांना अपक्ष उमेदवार म्हणून म्हणून धरले होते ते का हे पण सांगा की. https://ceomadhyapradesh.nic.in/Links/Books/89_Vol_II.pdf वर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांचे अधिकृत निकाल आहेत. त्यात निवडणुक लढविणार्‍या पक्षांची नावे दिली आहेत. शिवसेनेचे नाव तिथे राज्यस्तरीय पक्षांमध्येही दिसणार नाही तर ते REGISTERED(Unrecognised ) PARTIES मध्ये दिसेल. ते का हे पण लिहा की. बरं १९९० पूर्वी अगदी १९५७ मध्ये जनसंघाचे पूर्ण देशात चार खासदार होते त्यापैकी दोन महाराष्ट्रातून निवडून आले होते ते पण लिहा की. महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघ-भाजपचे किती आमदार निवडून यायचे आणि शिवसेनेचे किती आमदार निवडून यायचे ते पण लिहा की. १९९० आणि नंतर नुसत्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या लिहिलीत. पण दोन पक्षांनी किती जागा लढवल्या होत्या ते पण लिहा की. मग स्ट्राईक रेट कोणाचा जास्त होता ते पण सगळ्यांना कळेल. असं काय करता सर? प्रा.डॉ. आहात ना? मग नुसती आपल्या म्हणण्याला अनुकूल आकडेवारी सिलेक्टिव्हली देऊन कशी चालेल? सगळी आकडेवारी नको का द्यायला?

In reply to by क्लिंटन

छे, काहीतरीच काय विचारता? बिरूटे म्हणतात तेच अंतिम सत्य असताना जागा किती लढविल्या, पूर्वी किती आमदार निवडून यायचे हे आकडे कशासाठी पहायचे? मुंबईत १९८० मध्ये प्रचंड लाट असलेल्या इंदिरा कॉंग्रेसशी युती असूनही सेनेचे दोन्ही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते तरीही सेनाच मोठी. १९६७ मध्ये मुंबईत सेनेचा महाराष्ट्रद्रोही स. का. पाटलांना पाठिंबा असूनही ते पडले असले तरीही सेनाच मोठी बरं का.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेना वयाने मोठी असली तरी मते किती मिळायची? १९६७, १९७२ व १९७८ च्या निवडणुकीत वयाने मोठ्या सेनेचे शून्य आमदार निवडून आले होते, तर भाजपचा पूर्वावतार जनसंघाचे १९६७ मध्ये ४ व १९७२ मध्य ५ आमदार होते. १९७८ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाला होता व जनता पक्षाचे ९६ आमदार होते. बादवे, जनसंघ १९५२ मध्ये स्थापन झाला होता तर सेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली होती. १९८० ला भाजप स्थापन झाला व दीड महिन्याने झालेल्या निवडणुकीत भाजपचे महाराष्ट्राच्या विविध भागातून स्वबळावर १४ आमदार निवडून आले होते. १९८५ मध्ये भाजपचे १६ तर सेनेचा फक्त १ आमदार होता. म्हणजे १९८५ पर्यंत जनसंघ/भाजप निर्विवाद सेनेपेक्षा खूप मोठा पक्ष होता. १९९० मध्ये युती झाल्यानंतर सेनेने १८३ जागा लढवून फक्त ४२ जिंकल्या तर माजपने १०५ पैकी ४२. १९९५ मध्ये सेनेने १७१ पैकी ७३ तर भाजपने ११७ पैकी ६५, १९९९ मध्ये सेनेने १७१ पैकी ६९ तर भाजपने ११७ पैकी ५६, २००४ मध्ये सेनेने १७१ पैकी ६२ व माजपने ११७ पैकी ५४ आणि २००९ मध्य सेनेने १६९ पैकी ४४ तर भाजपने ११९ पैकी ४६ जागा जिंकल्या. २०१४ मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढून सेनेने २८८ पैकी ६३ तर भाजपने २८८ पैकी १२३ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये सेना ५६ (१२४) व भाजप १०५ (१६४) जागा जिंकल्या होत्या. या आकडेवारीतून कोणता पक्ष मोठा हे कोणालाही समजेल (डोळ्यावर झापड लावलेल्यांना सोडून). सेनेला भाजपने मुंबईबाहेर नेऊन वाढविले हे स्फटिकाइतके स्पष्ट आहे (अपवाद डोळ्यांवर झापड लावलेले).

In reply to by श्रीगुरुजी

तुमचे लॉजिक मला पटते, किंवा तुम्ही दिलेली आकडेवारी पण, फक्त माझा एकच प्रश्न आहे

जर इतकं सगळं होतं, डोळ्यासमोर तर भाजपने इतक्या सीट सोडल्याच कश्याला सेनेसाठी ? १९८९ पासून ते युती तुटेपर्यंत ?


In reply to by जेम्स वांड

हे फक्त अडवाणीच सांगू शकतील (आता गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन नसल्याने). हा चुकीचा निर्णय होता एवढेच मी सांगू शकतो.

In reply to by श्रीगुरुजी

अभ्यास आहे तुमचा त्याला अनुषंगिक काही अंदाज आपले ?? हा सीन clear होणे गरजेचे आहे, कारण काळ सोकावतो हो, बाकी काही नाही.

In reply to by जेम्स वांड

जेम्सभाऊ, बर्‍याच दिवसांपासून ही गोष्ट लिहायचे म्हणत होतो. इतके दिवस ते लिहिले नव्हते पण आता लिहित आहे. पब्लिक फोरमवर लिहिताना काही अलिखित संकेत असतात. इंग्लिशमध्ये लिहायचे असेल आणि सगळे कॅपिटल लेटर्समध्ये लिहिले तर समोरचा माणूस ओरडून बोलत आहे असे त्याचा अर्थ घेतला जातो. त्या कारणासाठी निदान ऑफिशिअल ई-मेल्समध्ये पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये कोणी लिहित नाही/ लिहू नये अशी अपेक्षा असते. त्याप्रमाणेच असे एखादे वाक्य नेहमीच्या फॉन्टपेक्षा अडीच-तीन पट आकार वापरून आणि वर बोल्ड करून लिहिल्यासही एखाद्या गोष्टीवर जोर द्यायला/अधोरेखित करायलाच तसे केले जात नसून समोरचा माणूस ओरडून बोलत आहे असा त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो. आता याविषयीचे नियम कुठेही लिहिलेले नाहीत पण मानवी विचार करायच्या पध्दतीला अनुसरून हे संकेत पाळले जातात. जर एखादी गोष्ट महत्वाची आहे हे मांडायचे असेल तर ती अधोरेखित करणे किंवा नुसती बोल्ड फॉन्टमध्ये लिहिणे किंवा त्याहूनही अधिक महत्वाची असेल तर दोन्ही वापरणे हे करता येऊ शकेलच. त्यातून समोरचा माणूस एखादी गोष्ट महत्वाची आहे हे सांगत आहे पण ओरडून बोलत आहे असे कोणाला वाटायचा प्रश्न नसतो. बघा पटते का. नाही पटले तर सोडून द्या.

In reply to by क्लिंटन

सोडून देणार नाही, कारण अगदीच पटलेले आहे, मला मुळातच ओरडुन बोलण्याची काही खास आवड नाही किंवा एकंदरीत इथे ईच्छा पण नव्हती, हे निःसंदिग्ध शब्दांत आधीच स्पष्ट करतो. त्याहून पुढे स्पष्टीकरण द्यायचं म्हणाल्यास मुळात असे ठळक केल्याने ओरडुन बोलल्याचे फील होते किंवा तसे जाणवते हेच मला माहिती नव्हते, किंबहुना असे काही अलिखित नियम मिपावर असतील असेही माहिती नव्हते मला तरी प्रामाणिकपणे. सहसा मी वाचनमात्र असल्यापासून कैक लोकांना कैक प्रकारची रंगरंगोटी करताना बघितले आहे, सुहास म्हात्रे म्हणून एक होते ते कोट करण्याचा मसुदा लाल करत, अजून एक होते ते आपले सरळ कोट अनकोट वापरत, आपण ज्या प्रतिसादाला प्रश्न करतोय त्याचा मूळ मजकूर वेगळा दिसावा आणि आपण टंकलेला मजकूर वेगळा दिसावा इतकाच माझा मोटिव होता कायम, पण हरकत नाही ह्यापुढे तुम्ही दिलेल्या सल्ल्यानुसार लिहिले तरी तो साध्य होईलच असे दिसते आहे त्यामुळे पुनश्च आभार :) - (समन्वयवादी शांत प्रजाती) वांड

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेना वयाने मोठा (१९६६) पक्ष आहे, हे मान्य केल्यावर एक लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना प्रादेशिक पक्ष आणि स्वयंभू पक्ष होता. शिवसेनेला प्रचार प्रसार आणि याला वेळ लागत होता. गावागावात शिवसेना शाखा स्थापन होत होत्या. आजही गावागावात शिवसैनिक सापड़तील. तर जनसंघ, जनता पार्टी आणि शेवटी भाजपा स्वतंत्र पक्ष स्थापन झाला तेव्हा तो राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची स्थापना झाली तेव्हा जनसंघाच्या जनतापार्टीच्या माध्यमातून रेड़ीमेड पीचवर म्हणजेच आयत्या बिळावर रेघोट्या मारायला मिळाल्या म्हणून भाजपा पक्ष (१९८०) स्थापन झाल्याबरोबर त्यांचे निवडणुकीत आंकड़े दिसायला लागतात त्यात फार काही कर्तुत्व नाही. एक मला संदर्भ नाही, अजुन एक भाजपा पक्ष स्थापन झाले तेव्हा एक या जनसंघाची शाखा असलेला एक अखिल भारतीय जनसंघ नावाचा पक्षही अगदी २०१५ पर्यन्त होता. उद्या मुळ भाजपा पक्ष आमचाच होता असा दावा करू शकले असते. तर पुढे, भाजपा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आपली पाळंमुळं रोवण्यासाठी स्व. प्रमोद महाजन मुरली मनोहर जोशी. हिंदू ह्रदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची अजीजी करीत राहिले. महाराष्ट्रात पाय रोवले. मला वाटते शिवसेनेने भाजपाला कडेवर घ्यायचा तो निर्णय चुकला म्हणून पहिल्या प्रतिसादात जे म्हणालो की ज्यांना महाराष्ट्रात मोठं केलं तेच पक्ष संपवायला निघाले. आज असंख्य शिवसैनिक या विचाराशी सहमत असतील. बाकी चालू द्या.. जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटते शिवसेनेने भाजपाला कडेवर घ्यायचा तो निर्णय चुकला म्हणून पहिल्या प्रतिसादात जे म्हणालो की ज्यांना महाराष्ट्रात मोठं केलं तेच पक्ष संपवायला निघाले. पुन्हा एकदा असत्य प्रतिपादन. २३ वर्षात जेमतेम १ आमदार निवडून आणलेला व वसंतदादा पाटलांच्या कृपेने निवडून आलेले काही नगरसेवक असलेला महापालिका पातळीचा चिल्लर पक्ष राज्याच्या विविध भागातून निवडून आलेले आमदार असणाऱ्या पक्षाला कडेवर घेऊ शकतो का? ज्यांना निवडणूक दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी लागते तो पक्ष आपल्यापेक्षा बऱ्याच मोठ्या पक्षाला कडेवर घेत असेल तर त्या पक्षाचे पेकाट मोडले असते. मुंगी हत्तीला कडेवर घेऊ शकत असेल तरच सेनेने भाजपला कडेवर घेतले हे कदाचित मान्य करता येईल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर जनसंघ, जनता पार्टी आणि शेवटी भाजपा स्वतंत्र पक्ष स्थापन झाला तेव्हा तो राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची स्थापना झाली तेव्हा जनसंघाच्या जनतापार्टीच्या माध्यमातून रेड़ीमेड पीचवर म्हणजेच आयत्या बिळावर रेघोट्या मारायला मिळाल्या म्हणून भाजपा पक्ष (१९८०) स्थापन झाल्याबरोबर त्यांचे निवडणुकीत आंकड़े दिसायला लागतात त्यात फार काही कर्तुत्व नाही.
१९७७ च्या जनता पक्षात जनसंघ, चरणसिंगांचा भारतीय लोकदल, मोरारजी देसाईंचा काँग्रेस (ओ) आणि जगजीवनरामांचा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हे चार पक्ष विलीन झाले होते. त्या पक्षाला १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत २९५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी सगळ्यात जास्त म्हणजे ९०+ खासदार मुळचे जनसंघाचे होते (संदर्भः India Since Independence: Making Sense of Indian Politics हे जे.एन.यु चे प्रोफेसर व्ही.आर.कृष्ण अनंत यांनी लिहिलेले पुस्तक.) याचा अर्थ १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर त्यांना जनता पक्षाच्या आयत्या बिळावर (की पिठावर) रेघोट्या मारायला मिळाल्या असा होतो का? १९७७ मध्ये मुळच्या जनसंघ गटाचे निवडून गेलेले खासदार जनसंघ पूर्वीपासून जिथे त्यामानाने बळकट होता अशा राज्यांमधून म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमधून तर काही उत्तर प्रदेशातून निवडून गेले होते. बाकी १९८० मध्ये स्थापना झाल्यावर भाजपला लगेच राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळाला नव्हता. निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळायला किमान ४ राज्यांमधून किमान ४% पेक्षा जास्त मते मिळावी लागतात ती अट भाजपने स्थापना झाल्यानंतर लगेच २ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण केली होती.
एक मला संदर्भ नाही, अजुन एक भाजपा पक्ष स्थापन झाले तेव्हा एक या जनसंघाची शाखा असलेला एक अखिल भारतीय जनसंघ नावाचा पक्षही अगदी २०१५ पर्यन्त होता. उद्या मुळ भाजपा पक्ष आमचाच होता असा दावा करू शकले असते.
तो पक्ष होता १९७३ मधून जनसंघातून काढलेल्या बलराज मधोक यांचा. ते नंतर चरणसिंगांच्या भारतीय लोकदलात आणि तिथून १९७७ च्या जनता पक्षात होते पण त्यांनी बाहेर पडून आपला भारतीय जनसंघ हा पक्ष काढला. जनसंघ हा केडर बेस्ड पक्ष असल्याने बलराज मधोकांना पक्षातून काढल्यावर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले असे झाले नाही. त्यांच्या पक्षाचे १०० सदस्य होते की नाही कोणास ठाऊक तरी नावाला तो पक्ष होता. त्याच नावाचा बलराज मधोक यांचा पक्ष होता म्हणून बहुदा जनता पक्षातून बाहेर पडलेल्या मुळच्या जनसंघवाल्यांना भाजप हे नवे नाव घ्यावे लागले. तेव्हा बलराज मधोक फार तर दुसर्‍या कोणी भारतीय जनसंघ हे नाव घेता कामा नये हा आग्रह धरू शकले असते पण भाजपवर दावा कसा सांगणार? अवांतरः १९७७ चा जनता पक्ष नंतर कितीही खंगला असला तरी तो जिवंत होता- अगदी २०१३ पर्यंत. सुब्रमण्यम स्वामी तो पक्ष चालवत होते. नंतर त्यांनी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन केला म्हणून त्या पक्षाचे अस्तित्व संपले. त्यामुळे १९८८ मध्ये वि.प्र.सिंग, रामकृष्ण हेगडे वगैरेंनी स्थापन केलेल्या पक्षाला जनता पक्ष हे नाव घेता आले नाही म्हणून त्यांना जनता दल हे नाव घ्यावे लागले.

In reply to by श्रीगुरुजी

भाजप-शिवसेना युती व्हायच्या आधीच्या काळातही शिवसेना मोठा पक्ष असेल तर मग १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे शिवसेनेचे नेते भाजपचे उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावर निवडणुक का लढले होते? धनुष्यबाण चिन्हावर शिवसेना उमेदवारांना निवडणुक लढवायला काय हरकत होती? पण प्रॉब्लेम हा होता की त्यावेळी निवडणुक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला दिलेलेच नव्हते- ते मिळाले १९८९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर म्हणजे १९९० च्या विधानसभा निवडणुकांसाठी. त्यापूर्वी शिवसेना हा unrecognised पक्ष असल्याने त्याला कोणतेही हक्काचे चिन्ह राखून ठेवलेले नव्हते. त्यामुळे १९९० पूर्वी शिवसेनेचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुक लढवायचे. भाऊ तोरसेकरांनी एका व्हिडिओत सांगितलेली आठवण म्हणजे महापालिका निवडणुकांमध्येही सगळ्या शिवसेना उमेदवारांना एकच चिन्ह असायचे असे नाही. तसेच महापालिका वॉर्डांच्या सीमा अशा असतात की एक गल्ली एका वॉर्डात आणि त्याला समांतर गल्ली दुसर्‍या वॉर्डात असू शकते. त्यावेळी प्रचारासाठी भिंती रंगवायचे त्यात भिंत रंगविणार्‍या कॉन्ट्रॅक्टरला एकीकडे शिवसेना उमेदवाराचे एक चिन्ह आणि तिथून जवळच दुसरे चिन्ह रंगवावे लागायचे. आणि असा पक्ष अगदी १९५७ मध्ये महाराष्ट्रातून दोन खासदार निवडून आणणार्‍या पक्षापेक्षा मोठा होता. आहे की नाही मज्जा?

In reply to by क्लिंटन

माझ्या आठवणीप्रमाणे १९८० मध्ये सेनेने इंदिरा कॉंग्रेसशी युती करून लोकसभा निवडणुकीत आपले दोन उमेदवार हात या चिन्हावर निवडणुकीत उतरविले होते. मुंबई हा आपला बालेकिल्ला हा शिवसेनेचा समज व इंदिरा कॉंग्रेसची देशभर प्रचंड लाट असूनही (१९८० लोकसभा निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसने स्वबळावर महाराष्ट्रात ४८ पैकी ३९ जागा व देशात ३५५ जागा जिंकल्या होत्या) सेनेचे दोन्ही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. यातून सेनेला मुंबईतही नगण्य पाठिंबा होता हे स्पष्ट दिसते. सेना १९८९ पर्यंत कधी प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या चिन्हावर लढायची, कधी इंदिरा कॉंग्रेसच्या चिन्हावर तर कधी भाजपचे चिन्ह उसनी घ्यायची. तरीही या पक्षाने म्हणे भाजपला कडेवर घेऊन मोठे केले. बादवे, मी आयुष्यात कधीही कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीशी युती करणार नाही. त्याऐवजी मी शिवसेनेचे दुकान बंद करेन, असे बाळ ठाकरे म्हटल्याचे बोलघेवडे भाजप नेते वारंवार सांगून उद्धव ठाकरेंवर टीका करीत असतात. परंतु बाळ ठाकरेंनी आपल्या हयातीतच सलग ५ वर्षे (१९७५-८०) कॉंग्रेसशी युती केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम लीग, शेकाप, प्रजा समाजवादी अश्या पक्षांशीही युती केली होती याचे सोयिस्कर विस्मरण करतात.

नितीशकुमारांनी राजीनामा दिला, तेजस्वी यादवानी पाठिंब्याचे पत्र दिले, उद्या पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. तेजस्वी यादवसुद्धा मूर्ख निघाला. नितीशकुमार कधी राजदला लाथ घालून पुन्हा भाजपशी सोयरिक जमवतील हे तेजस्वीला कळणार सुद्धा नाही. तेजस्वी यादवने सुवर्णसंधी गमावली आहे. आज १९७९ मधील इंदिरा गांधींच्या चतुर खेळ्यांची आठवण येत आहे.

प्रेषित मुहम्मद ह्यांच्यावर टीका केल्याबद्दल चौफेर राळ उडून नुपूर शर्मा ह्यांना भाजपने अंतर दिले, त्यांना पदावरून हटवले, त्यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक विधान असून त्याचा पार्टीशी काहीही संबंध नाही म्हणून नूपुरला अक्षरशः धार्मिक कट्टरपंथीय उन्मादासमोर एकटी सोडली. आणि, लाखो काय कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या भगवान हनुमान आणि त्यांच्या स्तुतीपर स्तोत्राला अतिशय घाण भाषेत संभावना करून हिडीस वक्तव्य करणाऱ्या माणसाला मात्र मानाने मांडीला मांडी लावून मंत्री करून घेतले. नूपुर, तू चुकलीसच. तू ज्यांना धर्म - प्रामाणिक समजत होतीस ते मात्र सत्ता - प्रामाणिक निघाले असेच वैषम्य तुला घेऊन जगावे लागणार आहे. &#128532 &#128532 &#128532 &#128532

रात्रीचे चांदणे,
१०६ आमदार असतानाही भाजपची काय असहाय्य आहे ते समजत नाही.
असहाय्यता अशीये की ही १०६ संख्या गाठलीये ती मोदींमुळे. अन्यथा कमी जागा मिळाल्या असत्या. दस्तुरखुद्द मोदी प्रचाराला येऊनही १४५ का मिळंत नाहीत, हे दुखणंआहे. मोदी किती वेळ पुरणार? महाराष्ट्र भाजपने स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे. पण साधं खडसेंना सांभाळून घेता येत नाही आणि बावनकुळेना डावललं जातं. शिवाय भरीला २०१४ साली राष्ट्रवादीच्या पाठींब्यावरून लोकांच्या खाल्लेल्या शिव्या व २०१९ ची दादा पवारांशी केलेली चुंबाचुंबी आहेच. महाराष्ट्र भाजप सत्ताकारणात कमी पडतो आहे. फडणवीस खूप चांगले मुख्यमंत्री होते. मी तर म्हणेन की मनोहर जोशींपेक्षाही चांगले. पण ते गंभीर नाहीत असा उगीच संदेश गेलाय जनतेत. अधिक माहितीसाठी भाजप आणि शिवसेना यांचं मोदिपूर्व काळातलं बलाबल प्राडॉनी इथे दिलं आहे : https://www.misalpav.com/comment/1149582#comment-1149582 आ.न., -गा.पै.

अनेकांना अनेकदा मूर्ख बनविता येते हे आज नितीशकुमारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. यावेळी लालूऐवजी लालूपुत्र मूर्ख ठरला.

माविआ का स्थापन झाली ? भाजप ने राष्ट्रवादी सोबत पहाटे शय्या सोबत का केली ? एवढ्या कोलांट्या मारून नितीश - राजद एकत्र का येतात ? ज्या आमदारावर आरोप केलेत त्याच लोकांना मंत्री करून फडणवीस काय साध्य करतात ?? उत्तर एकच -- सत्ता आणि त्याद्वारे मिळणारा पैसा... म्हणून कोणालाही नवीन निवडणूक नको असते... सत्ता कशी का मिळेना ती मिळाली की पैसा येतो आणि पैसा आला की कार्यकर्ते , आमदार सगळे येतात..

नुकताच ही चित्रफीत बघण्यात आली. विषय : 2024 में PM बनेंगे नीतीश कुमार ? बरेचसे मुद्दे पटण्याजोगे आहेत. चांगले विश्लेषण. बिहारी टोन ऐकायला मजा येतेय.

In reply to by धर्मराजमुटके

केजरीवाल, ममता, राहुल गांधी असे नितीशकुमारांपेक्षा ताकदवान नेते स्पर्धेत असताना नितीशकुमारांना कोण पंतप्रधान करणार?

In reply to by धर्मराजमुटके

एका अर्थी जे होत आहे ते मोदींना अनुकूल आहे. समाजवादी नेते अविश्वासार्ह असणे आणि नितीश सोडून गेल्यावर बिहारमधील १७ ऐवजी ३६-३७ जागा लढवता येऊन १७ पेक्षा जास्त जागा जिंकायची संधी असणे ही भाजपला अनुकूल घडामोड आहे हे आधीच लिहिले आहे. दुसरे म्हणजे विरोधी पक्षांमध्ये आता पंतप्रधानपदाचा आणखी एक उमेदवार वाढला. नितीश तिकडे गेल्याने लगेच सगळे विरोधी पक्ष त्यांना स्विकारतील असे अजिबात नाही- विशेषतः इतकी वर्षे भाजपबरोबर आणि गेली ५ वर्षे मोदींच्या भाजपबरोबर सत्ता उपभोगलेली असल्याने आणि एकदाही स्वबळावर बहुमत मिळवलेले नसल्याने. तरीही त्यांना स्वतःचा दावा पुढे रेटण्यापासून कोणी अडवू शकत नाही. उपेंद्र कुशवाह यांनी तेच म्हटले आहे. विरोधी कॅम्पमध्ये जितके जास्त दावेदार असतील तितकी भांडणे व्हायची शक्यता वाढेल आणि विरोधी कॅम्प तितक्या प्रमाणावर विभागलेला आहे हे चित्र मतदारांपुढे २०२४ मध्ये जाईल. मागे कधीतरी माझ्या दुसर्‍या आयडीमधून हे लिहिले पण होते. बहुदा त्यामुळेच मोदी-शहांनी नितीशकुमार जायची शक्यता आहे हे समोर दिसत असतानाही त्यांना अडविण्यासाठी काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत.

In reply to by क्लिंटन

नितीश व ठाकरेंची ब्याद जाणे हा भाजपसाठी शुभसंकेत आहे. परंतु भाजपचे धरसोड नेतृत्व पुन्हा यांच्याशी सोयरिक करणार नाही याची शाश्वती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

एका अर्थाने एन.डी.ए ही संकल्पनाच आता मोडीत निघाली आहे. शिवसेना, जदयु असे गेले. अकाली दल शेतकरी कायद्याच्या प्रश्नावर गेले. राजस्थानात हनुमान बेनिवाल या भाजपच्या बंडखोर नेत्याचा पक्ष एन.डी.ए मध्ये होते. त्या पक्षाने भाजपशी युती करून २०१९ मध्ये राजस्थानात लोकसभेची एक जागाही जिंकली होती. पण तो पक्ष सुध्दा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत होता त्यामुळे तो पक्षही गेला असे म्हणायला हवे. अखिल झारखंड स्टुडंट्स युनियन बरोबर आहे की नाही हे तपासून बघायला हवे. उत्तरपूर्वेतले काही पक्ष अजून एन.डी.ए मध्ये आहेत. हे पक्ष त्यामानाने नगण्य आहेत. त्यातल्या त्यात आसाम गण परिषद हाच एक मोठा पक्ष आहे. त्यालाही लोकसभेच्या २-३ पेक्षा जास्त जागा द्यायची गरज नाही. १९९८ ते २००४ या काळात केलेल्या चुका यापुढे सुधारायला हव्यात. जर भाजप आपल्या मुळच्या अजेंड्यावर कायम राहिला असता तर कधीनाकधी पक्ष स्वबळावर नक्कीच सत्तेत येऊ शकला असता. भले त्याला आणखी काही वर्षे लागली असती. पण स्वतः वेगवेगळ्या प्रदेशात वाढण्याऐवजी मित्रपक्ष शोधून त्यांच्या मदतीने सत्तेत यायचा शॉर्टकट भाजपने अवलंबला आणि त्यात पक्षाचे नुकसान झाले. या प्रकारात ममता, चंद्रबाबू नायडू, जयललिता, जॉर्ज फर्नांडिस, अजितसिंग, ओमप्रकाश चौटाला, बन्सीलाल वगैरे भाजपच्या मूळ अजेंड्याशी काडीमात्र संबंध नसलेले लोक बरोबर घेतले गेले आणि त्यामुळे पक्षाचा तेवढ्यापुरती सत्ता मिळून फायदा झाला पण पक्षाचे आणि एकूणच उजव्या राजकारणाचे दीर्घकालीन नुकसान झाले. युपीए सरकारने विशेषतः युपीए-२ सरकारने घातलेल्या सावळ्यागोंधळामुळेच २०१४ मध्ये भाजपला सत्तेत यायची संधी मिळाली असे म्हणायला हवे. जर युपीएने थोडा बरा- अगदी नरसिंहरावांची पकड होती तितकी जरी ठेवली असती तरी २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे अशक्य झाले असते. ही सत्ता मिळाली आहे त्याचा वापर करून आतापर्यंत मोदींनी पकड चांगली ठेवली आहे. आता मित्रपक्षांचे जोखड दूर केले पाहिजे.

संजय राठोडला पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याने त्यांना मंत्रीपद दिले असे एकनाथ शिंदे, फडणवीस व भाजपचे इतर नेते सांगत आहेत. या क्लीन चिटबद्दल कधीच वाचले नाही. किंबहुना खालील इंडियन एक्स्प्रेसची बातमी सांगते की पुणे पोलिसांनी असलेल्या पुराव्यांचा अजून तपासच सुरू केलेला नाही. मग क्लीन चिट कधी मिळाली? https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/cities/pune/pune… एकदा कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं की कोणत्याही वाईट गोष्टींचं समर्थन करता येतं आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीला विरोध करता येतो. महाराष्ट्रात भाजप रोज एक नवीन खालची पातळी गाठतोय. उद्या दाऊद, हफिज सईद, एमआयएम यांचा सुद्धा पाठिंबा फडणवीस घेतील आणि त्याचे मराठी आणि हिंदीत जोरदार युक्तिवाद करून समर्थन सुद्धा करतील.

राठोड यांना मंत्री मंडळात घेणे चुकच आहे पण हे प्रश्न विचारणारे लोक मलीक जेंव्हा मंत्री होते तेंव्हा कधीच प्रश्न विचारत नव्हते.

In reply to by विजुभाऊ

दोन्ही निर्णय चुकीचे होते/आहेत. पण तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच वागणार असाल तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय? त्यांनी दाऊदशी संबंध असणाऱ्याला मंत्रीपदावर ठेवलं आणि तुम्ही विवाहबाह्य संबंध, गुपचूप गर्भपात व त्यातून झालेल्या आत्महत्या प्रकरणातील आरोपीला मंत्री केलं. दोघे एकाच नाण्याच्या बाजू.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, विवाहबाह्य संबंध, गर्भपात व आत्महत्या हे कितीही निंद्य प्रकार असले तरी संजय राठोड कायद्याच्या कचाट्यात येनं अवघड आहे. विबासं हा कायद्याने गुन्हा नाही. गर्भपात असू शकतो, पण तो संजय राठोडांनी करायला भाग पाडला हे दाखवणं जिकिरीचं आहे. तीच बाब आत्महत्येची. काद्याप्रमाणे हा गुन्हा पूजा चव्हाणने केला आहे. तो करण्यास संजय राठोडांनी भाग पाडलं हे सिद्ध होणं जवळजवळ अशक्य. त्यामुळे संजय राठोड दिमाखात परत मंत्री होऊ शकतात. निदान प्रथमदर्शनी तरी मला तसं दिसतंय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सहमत. संजय राठोड परत मंत्री झालेत व "मला क्लीन चीट मिळाली आहे. जर माझ्यावर कुणी कायदेशीर कारवाई करायची मागणी करत असेल तर मी पण कायदेशीर कारवाई करेल" अशी उघड धमकी द्यायला लागले आहेत. उना पुरा १ दिवस झाला आहे शपथ घेउन. भाजपा च्या बोटचेपे पणाचा आता वीट यायला लागला आहे. :(

In reply to by सुक्या

राठोड व पूजा चव्हाणमधील संभाषणाच्या अनेक चित्रफीति उपलब्ध आहेत, तिचा गर्भपात खोटे नाव वापरून केला याची रूग्णालयात नोंद आहे, तिच्या घराजवळील सीसीटीव्ही मध्ये राठोड, त्याचा एक मित्र व पूजा चव्हाण आत्महत्येपूर्वी काही मिनिटे एकत्र दिसतात . . . असे अनेक पुरावे पोलिसांकडे असूनही मागील दीड वर्षे पोलिस थंड बसून आहेत. आता तर अश्या आरोपींचे संकटमोचक व संरक्षक सत्तेत आल्याने सर्व पुरावे नष्ट होऊन राठोडला अधिकृत क्लीन चिट मिळणार.

सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव येथील घटनेचे आरोपी वरावरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. आणि वैद्यकीय जामीन असला तरी या इसमाने कधीही रुग्णालयात भेट दिली नाही. राव हा इसम बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य आहे. आता हा प्राणी येनकेन प्रकारे जामीन स्वातंत्र्याचा गैरवापर करणार हे निश्चित आहे. राव यांच्यावर डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाचा आरोप आहे. ३१ डिसेंबरचे त्यांचे भाषण हे कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ दुसऱ्या दिवशी हिंसाचार घडवून आणणारे एक कारण असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. कार्यक्रमाच्या आयोजकांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपही आहे. सर्वोच्च न्यायालये माओवाद्यांना इतके चांगले का वागवतात हे न सुटलेले कोडे आहे!

एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करून दोन दिवस झाले. तरीही अजून खातेवाटपाचा पत्ता नाही. इतकेच नाही तर शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री करणार याविषयीही काहीही हालचाल झालेली दिसत नाही. एकूणच ठाकरेंच्या सरकारने घातलेल्या सावळ्यागोंधळामुळे भराभर कामे करून आपले नाव करायची या सरकारला संधी होती पण ते ती संधी व्यर्थ दवडत आहेत असे दिसते.

In reply to by क्लिंटन

एस.टी. चे विलिनीकरण, राडोडचे गुन्हे, अब्दुल सत्तारची हिंदूविरोधी विधाने, भावना गवळींवरील ईडीच्या धाडी याचा ज्यांना सोयिस्कर विसर पडला, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? मविआतील आव्हाड, सत्तार, राठोड, सरनाईक, यशवंत जाधव वगैरे आता निर्धास्त झाले असतील कारण त्यांचा भक्कम संरक्षणकर्ता आता सत्तेत आलाय. मविआ काळात त्यांच्यावर निदान तोंडदेखली कारवाई तरी होत होती. पण आता तर थेट क्लीन चिट आणि मंत्रीपदाचे बक्षीस.

In reply to by क्लिंटन

मंत्रिमंडळ घोषित होईल असे साव भाव आणून बाइट देतायत श्री अब्दुल सत्तार, हनुमान भक्त नेता. =)))))

मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींसह जागतिक शांततेसाठी तीन सदस्यीय आयोगाचा प्रस्ताव देणार आहेत. अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी जागतिक शांततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, UN महासचिव अँटोनियो गुटेरेस आणि पोप फ्रान्सिस यांचा समावेश असलेल्या 3 सदस्यीय आयोगाचा प्रस्ताव दिला आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष पाच वर्षांच्या कालावधीसाठी जागतिक युद्धविरामाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींसह तीन जागतिक नेत्यांनी बनवलेले आयोग तयार करण्यासाठी UN कडे लेखी प्रस्ताव सादर करण्याची योजना आखत आहेत. मेक्सिकोचे अध्यक्ष म्हणाले, कमिशनचे उद्दिष्ट जगभरातील युद्धे थांबवण्याचा प्रस्ताव सादर करणे आणि किमान पाच वर्षांसाठी युद्धविराम शोधण्यासाठी करारावर पोहोचणे हे आहे. ते म्हणाले, या निर्णयामुळे जगभरातील सरकारांना त्यांच्या लोकांना, विशेषत: युद्ध आणि त्याच्या परिणामांमुळे सर्वाधिक त्रास होत असलेल्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी स्वतःला समर्पित करण्यात मदत होईल. युद्धजन्य कारवाया थांबवण्याचे आवाहन करून, मेक्सिकन राष्ट्राध्यक्षांनी चीन, रशिया आणि अमेरिकेला शांतता मिळविण्याचे निमंत्रण दिले आहे आणि आशा आहे की ते तीन देश ते ऐकतील आणि मध्यस्थी स्वीकारतील जसे की ते प्रस्तावित आहेत. देवा, ह्या बातमीमुळे मोदी हेटर्सच मानसीक संतुलन बिघडु देऊ नकोस !!

In reply to by डँबिस००७

या प्रस्तावित आयोगाचा कितपत उपयोग होईल याची कल्पना नाही- बहुतेक फार उपयोग होणार नाही कारण त्यात पोप आणि यु.एन. सेक्रेटरी जनरल हे कसलेही अधिकार नसलेले लोक असणार आहेत आणि तिसरे सदस्य मोदींना पंतप्रधान म्हणून देशात अधिकार असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर जो मान किंवा दरारा अमेरिकेचे अध्यक्ष, रशियाचे अध्यक्ष किंवा चीनचे अध्यक्ष यांचा असतो तो भारताच्या पंतप्रधानांना अजून तरी नाही. पूर्वी भारताची विशेष दखलही घेतली जायची नाही त्यापेक्षा परिस्थिती बरीच चांगली आहे तरीही we are not there yet. नरसिंहराव १९९४ मध्ये अमेरिकेला गेले होते तेव्हा ते आणि बिल क्लिंटन यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली होती त्यात बरेचसे प्रश्न बिल क्लिंटनना इस्राएल-पॅलेस्टाईन दरम्यान शांततेचे प्रयत्न तेव्हा चालू होते त्याविषयी होते आणि खूप थोडे प्रश्न भारत-अमेरिका संबंधांवर होते. आता तशी परिस्थिती राहिली नाही हे नक्की. तसेच इतर कोणत्याही देशाच्या प्रमुखापेक्षा मोदींचे नाव तिथे सदस्य म्हणून घेतले जात असेल तर ते चांगलेच आहे. तरीही एक गोष्ट जरूर लिहाविशी वाटते. असा आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणण्यासाठी प्रयत्न करणे वगैरे गोष्टींमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी पडू नये असे खूप वाटते. कारण ती एक वाईट नशा आहे. जगात शांतता यावी, मग आपल्याला आपल्या प्रयत्नांसाठी शांततेचे नोबेल वगैरे मिळावे असे वाटायला लागायचा संभव असतो. त्यातून मग आपल्या हितसंबंधांना धोका पोचू शकेल हा धोका उद्भवतो. का कुणास ठाऊक वाजपेयींची पंतप्रधानपदाची कारकिर्द पाहता त्यांना भारत-पाकिस्तानात शांतता प्रस्थापित करावी आणि आपल्याला शांततेचे नोबेल मिळावे असा त्यांचा उद्देश होता का हा प्रश्न मला तरी नेहमी पडतो. या बाबतीत मी अगदी चुकीचा असेनही. पण तरीही सुरवातीला लाहोर बसयात्रेसाठी पुढाकार घेणे, लाहोरमध्ये We can choose our friends but not neighbours अशी टाळ्याखाऊ वाक्ये फेकणे, काश्मीरमध्ये सीजफायर, परवेझ मुशर्रफला सगळ्या जगाने वाळीत टाकलेले असताना ९/११ च्या दोन महिने आधी त्याला आग्रा परिषदेसाठी बोलावून घेणे आणि त्यामुळे त्याला चीफ एक्झिक्युटिव्ह मुशर्रफचा अध्यक्ष मुशर्रफ बनविणे, पुढे संसदभवनावरील हल्ल्यानंतर आणि मे २००२ च्या कालूचक हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान अणुयुध्द होणार अशी भिती पूर्ण जगात व्यक्त केली जात होती तरी ती परिस्थिती तेवढ्यापुरती निवळल्यानंतर मे २००३ मध्ये श्रीनगरला जाहिर सभा घेऊन तिथून परत पीस प्रोसेस सुरू करणे, काश्मीरातील अगदी हुर्रियतशी बोलणी सुरू करणे वगैरे गोष्टी पाहता वाजपेयींना तसे वाटायला लागले होते का हा प्रश्न नेहमी पडतो. नाहीतर आपण होऊन पाकिस्तानबरोबर बोलणी करा, शांततेचे प्रयत्न करा वगैरे प्रकार त्यांनी का केले असावेत हे समजत नाही. तेव्हा आंतरराष्ट्रीय शांतता वगैरे प्रकार भारताच्या कोणत्याच पंतप्रधानाने करायला जाऊ नयेत असे प्रामाणिकपणे वाटते- मोदींनी तर अजिबात नाही.

In reply to by क्लिंटन

मी सहमत आहे, खासकरून तरीही एक गोष्ट जरूर लिहाविशी वाटते. असा आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणण्यासाठी प्रयत्न करणे वगैरे गोष्टींमध्ये भारताच्या पंतप्रधानांनी पडू नये असे खूप वाटते. ह्यात दोन गोष्टी आहेत, पहिले म्हणजे तुम्ही म्हणले ते, अन् दुसरी म्हणजे नेहरुला दूषणे देऊन स्वतः नेहरूंच्या मार्गाने चालल्यागत होईल ते, असे मला स्पष्ट वाटते. ते विश्वगुरू इत्यादी ठीक आहे पण अजून पल्ला गाठायचा आहे, ह्यावर मी आपल्याशी सहमत आहे.

लाल सींग चढ्ढा सिनेमा काल रिलीझ झाला. मिडीया मध्ये बॉयकॉट म्हणुन वातावरण तापवले होते. हा सिनेमा सपशेल पडला व बॉयकॉट यशस्वी झालेला आहे अस बॉयकॉट करणार्यांच म्हणण आहे. सिनेमा गृह रिकामे होते असे काही व्हिडीयो व्हायरल झालेले आहेत पण खरी परिस्थिती काय आहे ?

In reply to by डँबिस००७

पुण्यातल्या माझ्या एका परिचिताने जो आमिर चा चाह्ता आहे त्याने काल हा चित्रपट थियेटर मध्ये बघितला , त्याने सांगितल्या प्रमाणे आमिर चा चित्रपट असला तरी फक्त १५/२० लोक थियेटर मध्ये होती हा बोयकॉटचाच असर होता. प्लस त्याच्या मते एकदम संथ व रटाळ चित्रपट आहे. सुरुवातीला चक्क ७ मिनिटे फक्त डिस्क्लेमर दाखवला. आमिरची पदोपदी ओवर अ‍ॅक्टिंग जाणवत होती.