ताज्या घडामोडी- ऑगस्ट २०२२ (भाग २)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
6 Aug 2022 - 9:15 pm

पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले:

उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

8 Aug 2022 - 10:04 pm | आग्या१९९०

जामीन मिळविण्याचा प्रयत्न केल्यास वर्षा राऊतला अटक करू असा इशारा मिळाला असणार.
ह्याचा अर्थ तिच्या अटकेची गरज नाही?

श्रीगुरुजी's picture

8 Aug 2022 - 10:13 pm | श्रीगुरुजी

मला माहिती नाही. ते फक्त सक्तवसुली संचलनालय ठरविते. तिला लवकरच अटक होणार असा माझा अंदाज आहे.

आग्या१९९०'s picture

8 Aug 2022 - 10:55 pm | आग्या१९९०

मग राउतांनी जामीन मागितला काय, न मागितला काय, काय फरक पडतोय?

एप्रिलमध्ये संबंधित संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांमध्ये झालेल्या संवादात दोन्ही राष्ट्रांनी करार केल्या नंतर अमेरिकन नौदलाची युद्धनौका दुरुस्तीसाठी भारतीय बंदरात दाखल झाली आहे. चार्ल्स ड्रू चेन्नईच्या कट्टुपल्ली येथील L&T च्या शिपयार्डमध्ये दुरुस्ती आणि संबंधित सेवांसाठी आली. यासाठी सुमारे दोन आठवडे लागतील अशी अपेक्षा आहे.
L&T शिपयार्ड ही जागतिक मानकांनुसार बांधलेल्या सुविधेत जहाज उचलण्याची क्षमता आहे. अमेरिकेने याचे कडक ऑडिट केले आणि मगच ही घडामोड झाली. L&T शिपयार्ड ने नौदल आणि तटरक्षक दलासाठी जहाजे आधीच बांधली आहेत आणि निर्यात ऑर्डरही मिळवल्या आहेत.

गेल्या चार-पाच वर्षांत भारतीय संरक्षण निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. २०१५ मध्ये सुमारे १५०० कोटी रुपयांची निर्यात होत होती. ती आता सुमारे १३००० कोटी रुपये झाली आहे.

चौकस२१२'s picture

9 Aug 2022 - 9:53 am | चौकस२१२

अभिनंदन.... मेक इन इंडिया अगदी नसले तरी अश्या प्रकारचे "बौद्धिक तांत्रिक काम " भारतात होत असले तर चांगलेच आहे

प्रसाद_१९८२'s picture

9 Aug 2022 - 10:09 am | प्रसाद_१९८२

आर्थर रोड कारागृहातील कोठड्यांना खिडक्या असतात काय ?

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 11:18 am | जेम्स वांड

.

खिडक्या, मनोरे, झरोके, व्हेंटिलेटर, किंवा इतर काही जे हवे असेल ते बघून घ्या आपल्या सोयीनं

भाजप सेना दोहोंना ९-९ मंत्रिपदे समसमान वाटप ज्या पक्षाला मोठे केले, त्याला फोडले, कायम मोठेपणा दिला, त्यातूनच फोडलेल्या गटाला अन् जगातील सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाला एकच प्रमाणात तोलण्याचा प्रकार ?

मंत्रिपदे वाटप खालीलप्रमाणे

.

ह्यात मलाच अब्दुल सत्तार अन् संजय राठोड दिसतायत काय ??

अब्दुल सत्तार म्हणजे ते भगवान हनुमंताच्या विरुद्ध अतिशय अश्लील शिवी देऊन टिप्पणी करणारे किंवा हल्लीच ताज्या ताज्या गरमागरम टी ई टी घोटाळ्यात लिप्त असणारे आहेत का दुसरे कोणी ??

ते कसं म्हणायचं असतं

हां!!!

भाजप हा एकमेव पर्याय असल्याचे मला तरी वाटते

संजय राठोड म्हणजे ते पुण्याची पूजा चव्हाण का कोण मुलगी होती तिच्या आत्महत्येला जबाबदार अन् कैक महिने फरार होऊन बसलेले नसतील ना ?? ते दुसरे कोणीतरी असतील ज्यांचे मंत्रिपद जावे म्हणून भाजपच्या चित्रा वाघ ह्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

ते कसं म्हणायचं असतं म्हणे अश्यावेळी

हां!!!

काय बोलावं ते सुचेना

आग्या१९९०'s picture

9 Aug 2022 - 12:27 pm | आग्या१९९०

कित्ती बोलू नी कित्ती नको असं झालंय मला. असं म्हणायचं.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 12:35 pm | जेम्स वांड

हातचे संवाद फेकू नका हो !

&#129315 &#129315 &#129315 &#129315

अश्यावेळी खास मांडण्यासाठी संवाद मिपावर उपलब्ध आहेत तेच वापरायचे असतात आम्हाला

&#129315 &#129315 &#129315

आग्या१९९०'s picture

9 Aug 2022 - 12:43 pm | आग्या१९९०

Copyright चे उल्लंघन होणार नसेल तर वापरा.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 12:41 pm | जेम्स वांड

मोदी शहांना clean chit देणार का आमचे मिपा तज्ञ ?

की बुआ त्यांना काय माहिती नसते त्यांचा फडणवीसांनी सांगितले त्यावर अन् फडणविसांवर भरवसा आहे असे काहीसे ??

कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात कोणाला किती जागा अन् खाती मिळतील ह्याचं चर्चा करायला दिल्लीला चकरा मारत होते ना कायम !?

नसल्यास त्या उठसूठ दिल्ली भेटीचे प्रयोजन काय असेल बुआ ??

प्रसाद_१९८२'s picture

9 Aug 2022 - 1:02 pm | प्रसाद_१९८२

भाजपाने संजय राठोड व अब्दुल सत्तारला मंत्रीपद देऊन, भाजपा सत्तेसाठी किती हापालेली आहे हे दिसून येते.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 1:09 pm | जेम्स वांड

४० लोकांचा गट फुटलाय भाजपतून त्यातलेही हे दोनच नमुने हवे वाटले का मोदी शहांना ? इतर ३१ पैकी २ निवडणे कठीण का होते ? सत्तालोलुपता तर तशीही आधीच दिसली आहे की,

रामाच्या नावावर पार्टी मोठी करून मग हनुमानाला अन् हनुमान चालीसाला शिव्या घालणारे आमदार मंत्री करण्यामागे सत्तालोलुपता मानली तरी इतकी का लेव्हल पाडली हा प्रश्न अनुत्तरित राहतोच.

क्लिंटन's picture

9 Aug 2022 - 1:39 pm | क्लिंटन

नितीशकुमार आज दुपारी ४ वाजता राज्यपालांना भेटणार आहेत. बहुदा ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर करतील. त्यानंतर राजदबरोबर सरकार स्थापनेचा दावा करतील आणि उद्या मुख्यमंत्रीपदाची विक्रमी आठव्यांदा शपथ घेतील असे दिसते. २०१७ मध्येही राजदबरोबर असलेली आघाडी मोडायच्या वेळेस त्यांनी आधी राजीनामा दिला होता आणि भाजपबरोबर सरकार स्थापनेचा दावा करून परत शपथ घेतली होती. त्याची पुनरावृत्ती होणार का हे बघायचे.

प्रसाद_१९८२'s picture

9 Aug 2022 - 1:59 pm | प्रसाद_१९८२

आताच बातम्यांमधे दाखवतायत की, नितीशकुमार स्वत: राजीनामा न देता फक्त भाजपाच्या मंत्र्याना ते बरखास्त करणार आहेत. मला वाटते भाजपाने स्वत:हून पाठींबा काढून घ्यावा यासाठी त्यांची धडपड सुरु असावी.

क्लिंटन's picture

9 Aug 2022 - 2:03 pm | क्लिंटन

हो. तांत्रिकदृष्ट्या नितीशकुमारांनी स्वतः राजीनामा द्यायची गरज नाही. भाजपच्या मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी राजदचे मंत्री येऊ शकतात. फक्त त्या परिस्थितीत विधानसभेत बहुमत सिध्द करायला राज्यपाल सांगतील. तसेही राजीनामा देऊन राजदबरोबर नवे सरकार स्थापन केले तरी विधानसभेत बहुमत सिध्द करावेच लागेल.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 2:09 pm | जेम्स वांड

ह्याबाबतीत मी बिहार भाजपला पण तितकाच जास्त दोष देईन, का ते खाली सविस्तर मांडतोय...

नितीशकुमार ह्यांच्यावर checks and Balances ठेवणारे एकही नेतृत्व अक्षरशः अडीच पावणेतीन दशकांच्या युतीनंतरही त्यांना जमलेले नाही. एकतर पूर्ण भाजप बिहारचा तंबू एकखांबी असून सुशील मोदी (सुमो) ह्यांच्यावर तोललेला आहे. सुमो हे तुम्ही कुठंतरी म्हणालात तसे बेभरवशाचे समाजवादी गृहस्थ आहेत, सुमो सुद्धा १९७३ मध्ये पटना विद्यापीठातून बॉटनी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण सोडून जेपी आंदोलनात लागलेले विद्यार्थी नेते होते, म्हणजेच त्यांचे "पॉलिटिकल जेनेसिस" हे पण नितीशकुमार, शरद यादव, लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव इत्यादींच्या सोबतच झालेले आहे. इतके असूनही इन द फर्स्ट प्लेस संघ (होय आता ते बेभरवशाचे गृहस्थ नियमित शाखा अटेंड करणारे कार्यकर्ते आहेत) आणि भाजपने त्यांना जोजवण्याचे उद्योग का केले हे अनाकलनीय आहे. बरं, जोजवले, अक्षरशः गुळाचा गणपती केल्यासारखे त्यांना भाजपने लाडावून ठेवले आणि आयत्या पीठावर रेघोट्या मारल्यासारखे सुमो तिथं त्या पदावर बसून राहिले, अगदी एक शक्यता म्हणून पण जर आपण मानले की भाजपने त्यांना नितीश वर वचक म्हणून ठेवले होते तर त्यांना तिथे बसवून पण भाजपसारख्या "कॅडर बेस्ड पार्टी" असल्याचा कंठशोष चालवणाऱ्या पार्टीनं एक पर्यायी नेतृत्व बिहार राज्यात विकसित केले नाही ? जिथे लोकसभेच्या ४० सीट आहेत ?? तिथे लोकसभेच्या प्रचारात मोदींना घाम गाळून नितीशकुमार सोबत घेऊन झुलावे लागते फडात. हा दैव देते अन् कर्म नेते प्रकार वाटतो मला तरी.

बिहार प्रभारी कोण केले जाते हा एक वेगळाच विषय आहे, मागच्यावेळी तर चक्क मोदींचे कट्टर शत्रू संजय जोशी निवडणूक प्रभारी करून काय साधले गेले ते आजतागयत कळलेले नाही, बिहार विधानसभा तोंडावर असताना मोहन भागवतांनी आरक्षण विरोधी वक्तव्य करणे, धड प्रभारी न देणे, पर्यायी नेतृत्व न विकसित करणे इतके होऊनही नितीश कह्यात राहतील अशी अपेक्षा करणे बाळबोध नाही म्हणले तर काय म्हणायचे !!?? नितीश ह्यांना परम्युटेशन करण्याचा स्कोप भाजप बिहारच्या ढिसाळ कारभार अन् lackadaisical attitude ने दिला आहे, अन् ह्या क्रॉनिक आजारावर पण आत्मविश्वासाच्या ७०व्या मजल्यावर असलेले भाजप केंद्रीय नेतृत्व परत ई डी वगैरे प्रयोग करून तात्कालिक इलाज करेल असे दिसतेय, permanent इलाज म्हणल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढवणे, म्हणजे नितीशकुमार ह्यांच्या अरे ला का रे करणारा एक मास अपील नेता बिहारात बनवणे हाच असेल, असे देखील इथे मला वाटते आहे.

क्लिंटन's picture

9 Aug 2022 - 4:05 pm | क्लिंटन

इन जनरल सहमत.

आता इन जनरल सहमत का आणि १००% सहमत का नाही? याचे कारण बिहारचे राजकारण थोडे वेगळे आहे असे वाटते. एक तर समाजवादी विचाराच्या पक्षांना इतर कोणत्याही राज्यात मिळाले त्यापेक्षा जास्त स्थान बिहारमध्ये मिळाले आहे. राममनोहर लोहियांच्या राजकारणाचा प्रभाव उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पडला. नंतरच्या काळात उत्तर प्रदेशात तो प्रभाव बराच कमी झाला पण बिहारमध्ये टिकून राहिला. आता तो प्रभाव उत्तर प्रदेशात बराच कमी झाला असे का म्हणतो? कारण तिथे १९८९ आणि २०१२ या दोनच निवडणुकांमध्ये समाजवादी विचारांचे पक्ष (१९८९ मध्ये जनता दल आणि २०१२ मध्ये समाजवादी पक्ष) एक तर बहुमत मिळवू शकले (२०१२ मध्ये) किंवा बहुमताच्या बरेच जवळ जाऊ शकले (१९८९ मध्ये). पण बिहारमध्ये मात्र १९९० पासून जवळपास प्रत्येक निवडणुकीत समाजवादी विचारांच्या पक्षांना बहुमत मिळत आले आहे. १९९० मध्ये पूर्ण बहुमत नव्हते पण बहुमताच्या बर्‍याच जवळ जनता दल होते. १९९५ मध्ये जनता दलाला स्वतःचेच बहुमत होते. २००० पासूनही आकडे बघितले तर नितीशकुमार आणि लालू या दोन प्रमुख पक्षांच्या बेरजेला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. म्हणजे अगदी २००५ मध्ये जरी नितीशकुमारांनी ठरविले असते तर त्यांचे आणि लालूंचे सरकार येऊ शकले असते. तेव्हा जे उत्तर प्रदेशात झाले नाही ते बिहारमध्ये का झाले?

याचे कारण बिहारच्या वेगळ्या राजकारणात आहे. बिहारचे राजकारण वेगळे कोणत्या दृष्टीने?

१. जयप्रकाश नारायणांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाला बिहारमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. खरं सांगायचं तर ते आंदोलन म्हणजे अडाणीपणाचा कळस होते. त्यावेळी अब्दुल गफुर मुख्यमंत्री होते. त्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की झालं- सगळ्या समस्यांचे समाधान होणार अशाप्रकारचे वातावरण त्यातून निर्माण केले होते. कसलाही कार्यक्रम नाही, कसलीही दिशा नाही- नुसती हवेतली ध्येये- भ्रष्टाचार निपटून काढू, जातीभेद संपवू, महागाई संपवू वगैरे पण ते कसे करायचे याविषयी काहीही बोलायचे नाही. इतकेच नाही तर सरकारला ते करता येत नाही म्हणजे सरकारने राजीनामा दिला पाहिजे मग घाला विधानसभेला घेराव, घाला मंत्र्यांच्या घरांना घेराव असले प्रकार त्या आंदोलनात होते. त्याचवेळेस गुजरातमध्येही विद्यार्थ्यांनी सुरू केलेले नवनिर्माण आंदोलन होते. पण गुजरातमध्ये नंतरच्या काळात त्या आंदोलनाच्या दरम्यान असलेले लोक कुठच्या कुठे विरले पण बिहारमध्ये मात्र तेव्हा सक्रीय असलेले लालू, नितीश, सुशील मोदी, पासवान वगैरे लोक अनेक दशके सक्रीय राहिले- अजूनही आहेत. याचे कारण काय असावे? जयप्रकाश नारायणांचे नेतृत्व म्हणावे का? असेलही. पण १९७० च्या दशकात सगळ्या राज्यांमधून तसेच स्वातंत्र्यचळवळीत सक्रीय असलेले कोणीना कोणी ज्येष्ठ नेते मिळालेच असते. गुजरातमध्ये असे नेते कमी होते का? तरीही बिहारमध्ये झाले आणि नंतरच्या काळातही अनेक वर्षे ज्याचा प्रभाव टिकून राहिला ते इतर एकाही राज्यात झाले नाही. याचे कारण बिहारमधील लोकांच्या मानसिकतेत असावे का?

आता हे बिहारमधील लोकांची मानसिकता अशी का असावी? मला वाटते त्याचे कारण जमिनदारी आणि त्यातून झालेले अन्याय आणि अत्याचार तसेच जातीभेद याचे प्रस्थ बिहारमध्ये खूप जास्त होते. त्यामुळे समाजवादी राजकारणाला पोषक वातावरण तिथे होते. मुळात भारतीय समाज हिंसक नाही त्यामुळे माओवाद्यांना वगैरे फार समर्थन कुठेच मिळाले नाही. बिहारमध्येही चळवळ होती/आहे पण त्या चळवळीला व्यापक समर्थन कधीच कुठेच मिळाले नाही. काही प्रमाणात तशीच स्थिती उत्तर प्रदेशातही होती. मग तिथे तसेच का झाले नाही? त्याविषयी नंतर लिहितो.

१९७७ च्या निवडणुकांचे निकाल बघाल तर बिहारमध्ये जनता पक्षाच्या उमेदवारांना अगदी दणक्यात विजय मिळाला होता. रामविलास पासवान त्यावेळेस ४.२४ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकले होते. त्यावेळी देशाची लोकसंख्या आताच्या अर्ध्यापेक्षा कमी होती. म्हणजे तेव्हाचे ४.२४ लाखांचे मताधिक्य म्हणजे आताचे ९ लाख झाले. २०१९ मध्ये ९ लाख मताधिक्याने जिंकलेला कोणी उमेदवार माहिती आहे का? जनता पक्षाच्या अनेक उमेदवारांना ७५% पेक्षा जास्त- काहींना अगदी ८५% मते वगैरे मिळाली होती. त्यापूर्वीही बिहारमध्ये विविध समाजवादी पक्षाच्या गटांना बर्‍यापैकी मते मिळत होती. मधू लिमयेंसारखे समाजवादी नेते थेट महाराष्ट्रातून येऊन बिहारमधून लोकसभेवर निवडून जाऊ शकत होते. तसेच जॉर्ज फर्नांडिसांसारखे मुळचे कर्नाटकातले आणि आयुष्य मुंबईत घालवलेले लोक बिहारमधून जिंकू शकत होते.

उत्तर प्रदेशातही साधारण अशीच स्थिती असली तरी समाजवादी राजकारणाची त्यामानाने पिछेहाट तिथे का झाली पण बिहारमध्ये का झाली नाही? मला वाटते त्याचे कारण आहे की बिहारमध्ये कर्पुरी ठाकूरांचे (जे जयप्रकाश नारायण आणि राममनोहर लोहियांचे शिष्य होते) शिष्य बर्‍याच अंशी आपल्या जातीच्या लोकांचा जनाधार राखून होते. लालू यादवांमध्ये, नितीश कुर्मी आणि कोयरींमध्ये तर पासवान दलितांमध्ये. मुख्य म्हणजे यापैकी कोणीही कधीही काँग्रेसमध्ये नव्हते. उत्तर प्रदेशात राममनोहर लोहिया गेल्यानंतर काँग्रेसविरोधी राजकारणात एक पोकळी तयार झाली होती. तसे बिहारमध्ये झाले नाही कारण तिथे कर्पुरी ठाकूर होते. उत्तर प्रदेशात मुलायमसिंग लोहिया गेल्यानंतर लगेच जम धरू शकले नाहीत कारण ते त्यामानाने तरूण होते (ते १९६७ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते).

समाजवादी लोक एकत्र येण्यासाठी भांडतात आणि भांडण्यासाठी एकत्र येतात. त्यातून नितीश, लालू, पासवान वगैरे लोक १९८९ च्या जनता दलात एकत्र होते. पण नंतर त्यांनी आपले वेगळे पक्ष स्थापन केले ही सगळ्यात महत्वाची घडामोड झाली. वर म्हटल्याप्रमाणे हे नेते आपल्या जातींमध्ये जनाधार टिकवून होते. तसेच मुळातल्या समाजवादाकडे झुकलेल्या मतदाराला त्यामुळे पर्याय मिळाला- म्हणजे लालूला कंटाळल्यावर नितीश आणि नितीशला कंटाळल्यावर लालू वगैरे. असे करत या सगळ्या मंडळींना आपला आधार टिकविण्याइतपत मते मिळत राहिली. उत्तर प्रदेशात तसे झाले नाही. अजितसिंगांचा प्रभाव पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांपुरता मर्यादित होता आणि ते पण त्या जिल्ह्यांचे अनभिषिक्त सम्राट वगैरे अजिबात नव्हते. त्यामुळे मुलायमला कंटाळलेला मतदार दुसर्‍या समाजवादी गटाकडे जाईल ही शक्यताच राहिली नाही त्यामुळे तो मतदार त्यांच्यापासून दूर गेला. त्यामुळे मुलायम टिकून जरी राहिले असले तरी इन जनरल समाजवादी राजकारणाची पिछेहाट झाली. म्हणजे बिहारमध्ये लालूनंतर नितीश हा त्याच समाजवादी कुटुंबातला निवडून द्यायला दुसरा पर्याय होता. तसे उत्तर प्रदेशात नव्हते.

उत्तर प्रदेशात दुसरा बदल घडविणारा महत्वाचा घटक म्हणजे रामजन्मभूमी आंदोलन. अयोध्या उत्तर प्रदेशात असल्याने हा प्रभाव तिथे जास्त पडला. त्यातून हिंदू मतदार जातींमध्ये विभाजित होण्यापेक्षा धर्माच्या ओळखीवर एकत्र यायचे प्रमाण वाढले. लालू पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हाच त्यांनी कदाचित ही शक्यता ओळखली आणि मोठ्या हुषारीने सामाजिक न्याय, मै आपको स्वर्ग तो नही दे सकता लेकिन स्वर जरूर दुंगा वगैरे गोष्टी करून उत्तर प्रदेशात झाले ते बिहारमध्ये तितक्या प्रमाणावर होऊ दिले नाही.

भाजपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला त्याला शंकरसिंग वाघेला, केशुभाई पटेल, काशीराम राणा वगैरे मुळचे संघाचे कार्यकर्ते आणि त्यांनी केलेले कष्ट जबाबदार आहेत. नाहीतर जनसंघाला मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, काही प्रमाणात उत्तर प्रदेश वगैरे राज्यांमध्ये थोडेफार यश मिळायचे तसे गुजरातमध्ये कधीही मिळाले नव्हते. तरीही गुजरातमध्ये भाजपने हातपाय पसरलेच ना? तीच गोष्ट महाराष्ट्राची. तीच गोष्ट कर्नाटकची. बिहारमध्ये संघाच्या मुशीतून घडलेले कोणी वाघेला, पटेल, येडियुराप्पा, मुंडे वगैरे नव्हते का? हे सगळे नेते पुढे मोठे झाले म्हणून आपल्याला माहित झाले. सुरवातीला ते लोकही लहान कार्यकर्तेच होते. तसे कोणी मोठे व्हायचे पोटेंशिअल असायचे लोक बिहारमध्ये संघाकडे नव्हते? जर पूर्ण देशात सगळीकडे संघाकडे तसे लोक असतील तर बिहारमध्ये नव्हते हे होणे जरा कठीण होते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की इतर राज्यात जसे भाजपने हातपाय पसरले तसे करायला बिहारमध्ये तितकी अनुकूल परिस्थिती नसावी- कारण समाजवादी राजकारण प्रिय असलेल्या मतदारांचे प्रमाण जास्त होते आणि वर दिलेल्या कारणांमुळे ते मतदार वेगळ्या पक्षांमध्ये विभाजित झाले असले तरी एकूण समाजवादी विचारधारेतच राहिले आणि त्यांना हिंदुत्वाकडे ओढणे शक्य झाले नसावे. भाजपलाही सुशील मोदी सारख्या मुळच्या समाजवादी माणसावरच विसंबून राहावे लागले यातच सगळे काही आले नाही का?

१९९५ मध्ये बिहार आणि झारखंड मिळून असलेल्या विधानसभेत भाजपला ४० आणि नितीशला अवघ्या ६ जागा होत्या तेव्हा भाजप नितीशपेक्षा मोठा पक्ष होता हे नक्की. तरीही त्याला भाजपने मोठे बनविले हे पण तितकेच खरे. पण त्यामागे भाजपचे काही वेगळे गणित असावे का? म्हणजे लालूला कंटाळलेले मतदार आपल्यापेक्षा नितीशच्या मागे जायची शक्यता जास्त (त्या निवडणुकीत) म्हणून नितीशला मोठे केले अशाप्रकारचे? तेव्हा भाजपने कोणतेही दुसरे नेतृत्व उभे केले नाही असे आपण म्हणतो तेव्हा बिहार स्पेसिफिक वेगळी परिस्थिती कारणीभूत होती का याचाही विचार व्हायला हवा. कदाचित १९९५ नंतरही भाजपने नितीशशी युती केली नसती तर भाजप अजून वाढला असता पण त्या प्रक्रीयेला अधिक वेळ गेला असता म्हणून भाजपला घाई झाल्याने तसे केले का हे समजत नाही.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 4:37 pm | जेम्स वांड

कारण तुमचं म्हणणं यथायोग्य असलं तरी ऐतिहासिक अन् स्मरणरंजन जास्त वाटतंय.

मी थोडासा contemprory बोलतोय. सुमोंच्या बॅक ग्राउंड वर लिहिण्याचा उद्देश फक्त एक perspective देणे इतकाच होता, त्यानंतर पण भागवतांनी केलेलं विधान, किंवा मी उद्धृत केलेली इतर समकालीन उदाहरणे पाहता भाजप ही बिहारमध्ये एकतर वाऱ्याची दिशा जोखण्यास कायमच चुकत आली आहे म्हणावे लागेल किंवा नितीश ह्या एका भाड्याच्या खांबावर पूर्ण भाजपचा तंबू तोलण्याचा मूर्खपणा भाजप कायम करत आली आहे

हे दोनच स्कोप उरतात, बाकी आकडेवारी अन् मतदारांचे मानसिकता वगैरे मुद्दे त्या मनाने दुय्यमच ठरतील यापुढे, आत्ताच्या परिस्थितीत तरी.

क्लिंटन's picture

9 Aug 2022 - 5:47 pm | क्लिंटन

मी थोडासा contemporary बोलतोय.

पूर्ण contemporary असे काही नसतेच कारण पूर्वी घेतलेल्या निर्णयांचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी असतोच.

बाबरी पडल्यानंतर एक वर्षाने नोव्हेंबर १९९३ मध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत विधानसभा निवडणुक झाली होती. त्यावेळी 'आज पाच प्रदेश कल सारा देश' अशी भाजपची घोषणा होती. त्या निवडणुका भाजपने पूर्णपणे एकट्याने आणि हिंदुत्व या स्लोगनवर लढवल्या होत्या. झाले काय? तर उत्तर प्रदेशात सपा-बसपा युती झाल्याने विरोधकांची मते विभागली गेली नाहीत आणि भाजपला सरकार बनवता आले नाही. तिथे मुलायमसिंग मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात तर सपशेल पराभव झाला. राजस्थानातही पूर्ण बहुमत मिळाले नाही तर २०० पैकी ९५ जागा मिळाल्या म्हणून शेखावत मुख्यमंत्री होऊ शकले. फक्त दिल्लीत भाजपला अपेक्षित होता तसा विजय झाला. तेव्हा भाजपच्या नेतृत्वाला बहुतेक एक गोष्ट समजली की नुसत्या हिंदुत्वाच्या जोरावर आपण स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही. आता भाजप बर्‍याच राज्यात आहे. त्यावेळी दक्षिणेत कर्नाटकात ४ खासदार आणि सिकंदराबाद मधून बंडारू दत्तात्रय हे एक खासदार एवढेच अस्तित्व होते. तेव्हा बाबरी पडल्यावर आपण स्वबळावर सत्तेत येऊ वगैरे भाजप नेते बोलत असले तरी सत्य परिस्थिती तशी नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर १९९४ मध्ये अडवाणींनी पत्रकारांशी बोलताना भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करेल असे म्हटले होते हे पेपरात वाचल्याचे माझ्या लक्षात आहे. म्हणजे जे १९९८ मध्ये प्रत्यक्षात झाले त्या दृष्टीने भाजपने आधीपासूनच पावले उचलली होती. तसेच वाजपेयी आणि अडवाणी यांचे वयही वाढत होते हा आणखी एक फॅक्टर असू शकेल. म्हणजे आपण असतानाच पक्षाची सत्ता दिल्लीत यायला पाहिजे असा काही विचार असावा. त्यातून मग भाजपने मित्र शोधले त्यात जॉर्ज फर्नांडिस- नितीशकुमार होते. ते १९९६ मध्ये भाजपबरोबर गेले. १९९८ मध्ये आणखी बरेच पक्ष बरोबर घेतले. तेव्हा 'ऑर्गॅनिक' वाढीपेक्षा मित्रपक्ष शोधून त्यांच्या मदतीने सत्तेत यायचा सोपा मार्ग भाजपने खेळला असे दिसते. त्या प्रकारात मग नितीशकुमार २०१३ पर्यंत भाजपबरोबर होते.

२०१३ मध्ये नितीशकुमार आणि भाजपचे बिनसले. तरीही २०१७ मध्ये कोणत्या कारणांमुळे भाजपने नितीशना परत घेतले असावे याविषयी अन्य एका प्रतिसादात लिहिलेच आहे. ती युती कालपर्यंत होती.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर contemporary हे पूर्णपणे वेगळे कसे करणार?

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 6:08 pm | जेम्स वांड

असे ध्वनित झाले असल्यास माफ करा,

पण contemporary significant असावे तत्कालिक चर्चेत इतकेच काय ते सुचवत होतो बाकी काही नाही.

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2022 - 2:29 pm | श्रीगुरुजी

तेजस्वी यादव बुद्धिमान असेल तर तो नितीशकुमारांना पाठिंबा न देता मुदतपूर्व निवडणूक घ्यायला लावेल ज्यात भाजप व संजद या दोन शत्रूंपैकी संजद हा शत्रू पूर्ण संपून नितीशकुमारांची राजकीय कारकीर्द कायमस्वरूपी संपेल व भाजप हा एकमेव शत्रू शिल्लक राहील.

१९७९ मध्ये इंदिरा गांधींनी आधी चरणसिंगना पाठिंबा देऊन जनता पक्षाचे सरकार पाडले व नंतर ३ आठवड्यांनी चरणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेऊन तेही सरकार पाडले व मुदतपूर्व निवडणूक घ्यायला लावली. तेजस्वी यादवने निदान असे तरी करावे.

नितीशकुमारांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणे ही तेजस्वी यादवची घोडचूक ठरेल कारण अत्यंत विश्वासघातकी नितीशकुमार पुन्हा एकदा टोपी फिरवून भाजपकडे जाऊ शकतात.

दुसरीकडे नितीशकुमारांनी भाजपला पुन्हा एकदा लाथ मारून राजदशी पुन्हा एकदा सोयरिक जमविणे यात काहीच आश्चर्य नाही. १९९६ पर्यंत लालूबरोबर जनता दलात असणाऱ्या नितीशकुमारांनी जनता दल सोडून जॉर्ज फर्नांडिसांबरोबर समता पक्ष काढला. त्याचेच रूपांतर पुढे संयुक्त जनता दलात जाणे. आपली प्रतिमा उच्चवर्णीय, हिंदुत्ववादी वगैरे असल्याने बिहारमध्ये बहुमतापासून आपल्याला दूर रहावे लागते, या चुकीच्या समजुतीतून भाजपने आपल्या तुलनेत खूप लहान असलेल्या संजदच्या नितीशकुमारांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करून आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. जी गंभीर घोडचूक महाराष्ट्रात भाजपने केली त्यातून भाजप काहीच शिकला नाही व तीच गंभीर घोडचूक बिहारमध्ये करून बसला.

नितीशकुमार हे अत्यंत निष्ठुर व अत्यंत विश्वासघातकी आहेत हे समजूनही भाजन नितीशकुमारांचे तळवे चाटत बसला. २००९ च्या आसपास नितीशकुमारांनी पक्ष संस्थापक जॉर्ज फर्नांडिसांंना उमेदवारी नाकारून त्यांना पक्षातून हाकलून दिले. नंतर २०१३ मध्ये भाजपला लाथ घालून पुन्हा एकदा राजदबरोबर सूत जुळवून सरकार टिकविले.

२०१४ मध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर जेमतेम २ जागा जिंकल्या. २०१५ मध्ये तिसऱ्यांदा राजदशी सोयरिक करून विधानसभा निवडणूक जिंकली. राजदपेक्षा कमी जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद मिळविले.

२०१७ मध्ये पुन्हा एकदा राजदला लाथ घालून पुन्हा एकदा भाजपशी सोयरिक केली व मुख्यमंत्रीपद टिकविले. नितीशकुमारांसारख्या पवारांपेक्षाही जास्त विश्वासघातकी व्यक्तीला पुन्हा पाठिंबा देणे ही घोडचूक ठरेल असे मी त्यावेळी मिपावर लिहिले होते. ते आज सिद्ध झाले.

भाजप नितीशकुमारांच्या इतक्या कह्यात गेला होता की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ खासदार असलेल्या भाजपने फक्त १७ जागा लढविल्या तर २ खासदार असलेल्या संजदला भाजपने तब्बल १७ जागा दिल्या. हा अर्थातच अत्यंत चुकीचा निर्णय होता.

आता अपेक्षेप्रमाणे नितीशकुमारांनी पुन्हा एकदा भाजपला लाथ घालून पुन्हा एकदा राजदशी सोयरिक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आपल्यापेक्षा अत्यंत लहान पक्षांना भरपूर जागा देऊन डोक्यावर घेणे, त्यांचे तळवे चाटणे आणि आपली लाचारी दाखवून त्यांच्या लाथा सहन करणे ही चूक भाजप महाराष्ट्रात व बिहारमध्ये वारंवार करीत आला आहे. अनेकदा लाथा खाऊनही अक्कल येत नाही. अश्या पक्षांची लायकी लाथा खाण्याचीच आहे. बरं झाले भाजपला पुन्हा एकदा कंबरड्यात लाथ बसली. परंतु भविष्यात भाजप महाराष्ट्रात किंवा बिहारमध्ये हीच घोडचूक पुन्हा करणार नाही याची कोणतीही शाश्वती नाही.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 5:21 pm | जेम्स वांड

नितीशकुमार ह्यांनी पद्धतशीरपणे आपली प्रतिमा सावरली हे पण दुर्लक्ष करून चालणारे fact नाही गुरुजी.

लालूंच्या जंगलराज बद्दल लोकांच्या मनात यथोचित भीती पेरणे, बिहारमध्ये खरोखर विकासाला चालना देणे, त्यांचे श्रेय पूर्णपणे स्वतःच्या छबीला देऊन भाजपला उष्टे भांडेही चाटण्यास न सोडणे (ह्यावेळी सुमो नुसते वेंधळेपणाने बघत बसले होते का हा प्रश्न आहेच) २४/७ वीज, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स, स्त्री शिक्षणात चक्क ५०% वाढ, बिहारी माणसाच्या सरासरी आयुर्मानात ५ वर्षांची वाढ हे भाजप आणि संजद सरकारच्या काळात साध्य झालेले आकडे आहेत. भाजपच्या संजय श्रावगी, सुशील मोदी, इत्यादी कार्यकर्त्यांनी तिथे काम केलेले आहे पण त्याचे क्रेडिट जमा झाले पूर्ण नितीशच्या खात्यात, इतके की "बिहार की बेटी इशरत जहाँ" मोड मध्ये गेलेल्या नितीश कुमार ह्यांचेच तळवे त्यांना परत एकदा चाटण्याची हौस, ती का ? कारण मी वरती (का खाली) उहापोह केल्याप्रमाणे भाजपने कधी बिहारमध्ये राज्यव्यापी अपील असलेला एकच नेता पण उभा करण्याची तसदी घेतली नाही, युपीमध्ये (काहींच्या मते ध्रुवीकरण केल्यामुळे, पण काही का असेना) योगींचा एक चार्म आहे, "महाराज जी" किंवा "महंत जी" म्हणले का लोक प्रेमाने नाहीतर दहशतीने बघतात त्या व्यक्तीकडे, बिहारमध्ये इतकी वर्षे होऊनही असा एक लीडर न बनवता येणे हे मला वाटते भाजपच्या आजच्या बिहारमधील घसरड्या स्थितीचे एकमेव कारण आहे, बाकी नितीश निष्ठुर असणे वगैरे वरवरचा राजकीय मुलामा झाला (जो आधी नितीश सोबत बसलेले असताना भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींना पण पूर्णपणे ठाऊक होता)

मुक्त विहारि's picture

9 Aug 2022 - 2:11 pm | मुक्त विहारि

आणखी २ हजार कोटींचा घोटाळा? किरीट सोमय्यांच्या दाव्यामुळे खळबळ, म्हणाले “संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार”

https://www.loksatta.com/maharashtra/kirit-somaiya-news-allegations-on-s...

वसई विरारमधील २००० कोटी रुपयांचा जमीन बांधकाम घोटाळा, पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथे पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्ससोबत झालेल्या बैठका यांची चौकशी सुरू व्हायची बाकी आहे. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.....

मुक्त विहारि's picture

9 Aug 2022 - 2:14 pm | मुक्त विहारि

https://www.tv9marathi.com/national/married-75-bangladeshi-girls-brought...

CAA आणि NRC कायदे लवकरात लवकर यायला हवेत ....

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 2:30 pm | जेम्स वांड

इशरत जहाँ बिहार की बेटी म्हणणाऱ्या लोकांसोबत आधीच कश्याला सरकार स्थापन केले ते फक्त कळेना.

काय बोलावं ते सुचत नाहीये

https://www.esakal.com/amp/maharashtra/supreme-court-notice-to-sharad-pa...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश या नोटीसीमधून न्यायालायने दिले आहेत.....

मुक्त विहारि's picture

9 Aug 2022 - 2:31 pm | मुक्त विहारि

https://zeenews.india.com/marathi/entertainment/pradip-patavardhan-is-no...

प्रदीप पटवर्धन, यांना श्रद्धांजली....

अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस, किरीट सोमय्या म्हणाले, “१००० कोटी रुपयांचा…” (https://www.loksatta.com/mumbai/kirit-somaiya-serious-allegations-of-mad...)

माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2022 - 2:41 pm | श्रीगुरुजी

मंत्रीमंडळात संजय राठोड व अब्दुल सत्तारना घेतलेले पाहून अत्यंत संताप आला. महाराष्ट्रात सत्तेसाठी अत्यंत वखवखलेले भाजप नेते रोज एक नवीन खालची पातळी गाठत आहेत. याच राठोडविरूद्ध चित्रा वाघ व चंद्रकांत पाटलांनी रान उठविले होते. आता मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाटील राठोडच्या मांडीला मांडी लावून बसणार आणि ओशाळवाणे हसत राठोडचे समर्थन करणार.

सुदैवाने चित्रा वाघ अजूनही राठोडच्या विरोधात आहेत. देव करो आणि महाराष्ट्रात लवकरात लवकर दीर्घकाळासाठी राष्ट्रपती राजवट येवो. उद्धव ठाकरेंनी निदान राठोडला मंत्रीमंडळातून काढून परत घेतले नव्हते. यांनी तर त्यापुढची पायरी गाठली.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 2:49 pm | जेम्स वांड

उद्धव ठाकरे चॅप्टर झालाय बंद आता,

फुटले एकनाथराव अन् ४० आमदार कधीच, सत्ता झाली स्थापन.

हनुमान ह्या कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या देवतेवर अश्लाघ्य अन् अश्लील टीका करणाऱ्या अन् आता "आपल्या" म्हणवल्या जाणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यावरही दोन शब्द बोलावे ही विनंती आपणांस.

अन् महाराष्ट्रातील नेत्यांनी काय म्हणून म्हणता आहात ? महाराष्ट्रातील फुटीर अन् फडणवीस दिल्लीच्या वाऱ्या कश्याला करत होते जर मंत्रिमंडळ फायनल करायचे नव्हते तिकडे तर ? हवाबदल म्हणून ?

केंद्र स्तरावरील भाजप सुद्धा तितकीच सत्ता पिपासू आणि विधिनिषेध नसणारी आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य ह्या निमित्ताने अधोरेखित झालेले आहेच.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 2:42 pm | जेम्स वांड

जरा एक शंखपुष्पी डोस

.

इतकेच गद्दार होते नितीशकुमार तर पहिलेच कश्याला लाळ घोटत गेली भाजप त्यांच्यामागे ??

का आता परत हे सगळे आठवून हीच टीका निर्लज्जपणे परत करणार भाजप ??

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2022 - 2:44 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्र व बिहारमधील भाजपचे प्रमुख नेते लाळचाटे आहेत.

आदेशाशिवाय काहीही होत नाही, त्यामुळे (जर करत असाल तर हं) भाजप केंद्रीय नेतृत्वाला धुवून कड्क इस्त्रीचे कपडे घालणं बंद केलंत तरी चालेल.

भाजपमध्ये मोदी आणि शहा ह्यांच्या इच्छे शिवाय अन् त्यांच्या संज्ञानात दिल्याशिवाय काडी इकडची तिकडे होत नसते हे मला वाटते स्पष्ट आहे आता.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे.
ही बातमी कळताच मला फार वाईट वाटले आहे ! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! _/\_

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 2:57 pm | जेम्स वांड

बाकी,

महाराष्ट्र भाजप लाळ चाटे,

बिहार भाजप लाळ घोटे

गोवा भाजप परोपकार म्हणून काँग्रेसी खोगीरभर्ती भरतोय

मेघालय राज्याचे भाजप उपाध्यक्ष बर्नार्ड मराक वेश्यालय चालवणार जिथे कायदेशीर अज्ञान मुलींना वेश्याव्यवसाय करणेस लावले होते

फक्त मोदी शहा ह्यांना ह्याच्यातली कसलीच कल्पना नाही इतके ते गरीब बिचारे लोक अंधारात आहेत

असे ज्याचे म्हणणे असेल त्याच्या अंधभक्तीभावासमोर काय बोलणे !

रात्रीचे चांदणे's picture

9 Aug 2022 - 3:12 pm | रात्रीचे चांदणे

एकट्या फडणवीसांना दोष देऊन उपयोग नाही, केंद्रीय नेतृत्वही तेवढेच जबाबदार आहे. १०६ आमदार असतानाही भाजपची काय असहाय्य आहे ते समजत नाही. तावडे, मुंढे ही मंत्रमंडळात नाहीत, म्हणजेच फडणवीसांना मोकळे रान आहे.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 3:24 pm | जेम्स वांड

आणि सिंपल पद्धतीने मांडलेले फॅक्ट

नेल ऑन द हेड प्रकारे.

महाराष्ट्रात जरा काही विपर्यस्त अन् नागड्या राजकीय सोयीनं झालं का फडणवीस अन् राज्य भाजप दोषी

गोव्यात काही झालं तरी स्थानिक नेतृत्वाच्या नावानं बोंब

पण इथ मुळात मोदी शहांच्या परवानगीशिवाय काडी इकडची तिकडे होत नाही हे फॅक्ट का विसरावे मग ??

घी देखा बडगा नही देखा म्हणायला हवे ह्या केसमध्ये

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2022 - 3:27 pm | श्रीगुरुजी

फडणवीसांसारख्या अपात्र, पक्षाला खड्ड्यात घालणाऱ्या व सत्तेसाठी अत्यंत शखवखलेल्या व्यक्तीला पूर्ण रान मोकळे देणारे मोदी^शहा तितकेच दोषी आहेत. खडसेंना भाजप सोडायला लावला, मुंडे व तावडेंना संपविले आणि नाईलाजाने विधान परिषदेत आणाव्या लागलेल्या बावनकुळेंना मंंत्रीपद दिले नाही.

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 3:46 pm | जेम्स वांड

सत्तेसाठी अत्यंत शखवखलेल्या व्यक्तीला पूर्ण रान मोकळे देणारे मोदी^शहा तितकेच दोषी आहेत.

आभारी आहे, मनमोकळेपणाने कबूल केल्यामुळे, आपल्याबद्दल आदर दुणावला....

बावनकुळे आणि अमित शहा यांचे फारच "प्रेमाचे" संबंध आहेत. त्यामुळे ते बाजूला राहिलेत त्यात काही विशेष नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2022 - 3:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देशभर भाजपाची सत्ता असली पाहिजे. सगळ्याच राज्यात भाजपा असली पाहिजे. भाजपा सर्वत्र व्यापून उरली पाहिजे या नादात भाजपा काय काय करते आणि सत्तालोलूप भाजपा सत्तेसाठी काय करेल याची गॅरंटी कोणीही घेऊ शकत नाही. महाराष्ट्रात अनैसर्गिक युती म्हणून बोंब मारणारे. ( खरं तर राजकारणात नैसर्गिक, अनैसर्गिक काही नसतं) जम्मु-काश्मिर मधे भाजपाने मुप्ती महबुबावर संसार थाटला ते काही नैसर्गिक म्हणायचं कारण नव्हतं, तोही संसार फार टीकला नाही. महाराष्ट्रात, राष्ट्रवादीबरोबर पहाटे उठून संसार स्थापन करायची धडपड सर्व देशाने बघीतली. सत्तेशिवाय राहता येईना म्हणून अडीच वर्ष 'पुन्हा येईनचा' महाराष्ट्रात गळ टाकून बसले. वेगवेगळे प्रयोग आणि सत्तेशिवायचा तो आरडा-ओरडा महाराष्ट्र बघत होताच. शेवटी, एक गट फोडून उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे लागले. दिल्लीत आप पक्षाशी ढुसण्या देणे सुरु असतात. पंजाबमधे लाथाळ्या सुरुच असतात. आता बिहारमधे जनता दल (संयुक्त ) युतीशी असलेली सत्तायुती संपुष्टात येत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट धरुन उभी राहीलेली भाजपा शिवसेना संपवायला निघाली. बिहारमधे देशाचे गृहमंत्री, अमित शहा जनता दल (संयुक्त) फोडाफोडीत गुंतले होते, प्रयत्न करीत होते असा आरोप करण्यात येत होता. म्हणून बिहारचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही असे ठरवून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपा बरोबरचा संसार मोडला. अजून किती सत्तायुत्या आणि कोणत्या पक्षाबरोबर किती घटस्फोट ते येत्या काळात कळेलच. पण, आज तरी सत्तेचा हावरटापोटी भाजपा थोडीफार असलेली प्रतिष्ठा घालवत आहे. भाजपाला सत्तेचा हावरटपणा आवरावा लागणार आहे, नाही तर भाजपाची वाताहात होऊन रसातळाला ती नक्की जाईल. आपण मात्र तोवर ''बहनो और भाईयो'' असा गोड आवाज कुठून आला तर, आपल्या खिशाला भोक नक्की पडणार असे समजून सांभाळलं पाहिजे, आपल्या हातात सध्या तितकेच उरले आहे.

-दिलीप बिरुटे

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 3:31 pm | जेम्स वांड

एक गट फोडून उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे लागले.

लागले नाही, पार्टी अंतर्गतच गेम होऊन पदावनती झाली आहे म्हणायला फुल स्कोप आहे हो सर.

पण,

बिरुटे मोदी विरोधक आहेत, हिंदुद्वेषी आहेत अन् अब्दुल सत्तार धर्मयोद्धे आहेत हो, तसं ठरलंच आहे आपलं फिक्स.

&#128540 &#128540 &#128540

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2022 - 7:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>बिरुटे मोदी विरोधक आहेत, हिंदुद्वेषी आहेत अन् अब्दुल सत्तार धर्मयोद्धे आहेत हो, तसं ठरलंच आहे आपलं फिक्स.

होना...! =)) एक तर मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळ विस्तार केला.
अन्नपाणी गोड लागेल का. कालची एकादशी आणि आज निषेध
म्हणून उपवास. जड चाल्लय सगळं. सरकार येऊन आनंद होईना. (कप्पाळमोक्ष स्मायली)

-दिलीप बिरुटे

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 7:16 pm | जेम्स वांड

.

देशहित म्हणून कळ सोसा थोडी तुम्ही, काय परत फिरून

एक मिपाकर म्हणून शरम वाटली वाला डायलॉग मला परत मारूची इच्छा नाही बघा प्रोफेसर साहेब.

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2022 - 3:32 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट धरुन उभी राहीलेली भाजपा शिवसेना संपवायला निघाली.

खोटे बोलणे थांबवा. मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर महाराष्ट्रात कोणालाही माहिती नसलेल्या सेनेला माजपने मोठे केले आहे ही वस्तुस्थिती आहे. याविषयी पूर्ण आकडेवारीनिशी अनेकदा लिहिले आहे. विश्वास बसत नसल्यास युती होण्यापूर्वी कोणाला किती मते होती, किती आमदार होते ते शोधा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2022 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देशात सध्या खरं बोलणारे दोनच लोक. एक आमचे शेठ आणि दुसरे तुम्ही... ( ह. घ्या) बाकी, मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. १९ जून १९६६ ला. जनसंघानंतर, भाजपाचं बारसं व्हायला १९८० उजाडलं. आता वयाने कोण मोठं ? शिवसेना. तत्त्पूर्वी शिवसेनेने अनेक पक्षांशी युत्या केल्या. (महापालिकेत) प्रजासमाजवादी, काँग्रेस इंडिकेट-सिंडिकेट, रिपब्लीकन, मुस्लीम लीग ते दलित पँथर. नंतरची, युती ”भाजपासोबत सुद्धा शिवसेनेने १९८४ मध्ये अगदी काही काळ घरोबा केला होता. पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर व त्यानंतर उसळलेल्या भीषण दंगलीमुळे आलेल्या लाटेत, ही युती वाहून गेली होती. नंतर, भाजपने सेनेशी काडीमोड घेतला (कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे गाजलेले वाक्य हे त्याच काळातले) पण त्यांचे बंध परत जुळले ते १९८९ मध्ये, ते सुद्धा हिंदुत्वाच्या विषयावर” पुढे.

१९९० शिवसेना-भाजपा युती. शिवसेना- ५२. भाजपा ४२.
१९९५ ला शिवसेना ७३ तर, भाजपा ६५.
१९९९ शिवसेना ६९ तर, भाजपा ५६
२००४ शिवसेना ६२ तर, भाजपा ५४
२००९ शिवसेना ४६ तर, भाजपा ४६
२०१४ ( आपल्या शेठची विशेष लाट) शिवसेना ६३ तर, भाजपा १२२
२०१९ शिवसेना ५५ तर, भाजपा १०६
(माहितीस्त्रोत विकि)

सर्व प्रवास पाहिला तर, शिवसेनेचे कायम जास्त आमदार निवडून येत राहीले. शिवसेनचा महाराष्ट्रभर कायम दबदबा राहीला. भाजपा आत्ता आत्ता महाराष्ट्रभर दिसायला लागले. बाकी, राजकीय पक्षांचा प्रवास आकड्यांवर असतो. सतत, शिवसेनेबरोबर भाजपाला युती करावी लागली. बाकी, तुम्हाला तुमची काय वस्तुस्थिती मांडायची ती मांडावी. माझा विषय संपला. जय महाराष्ट्र.

-दिलीप बिरुटे

जेम्स वांड's picture

9 Aug 2022 - 7:26 pm | जेम्स वांड

पण तुम्हाला कावीळ होऊन वरतून तुम्ही पिवळ्या काचेच्या चष्म्याला हळद फासून तो घालून प्रतिसाद टंकन करता आहात आणि तुम्ही लवकर ब्रे व्हावे इतक्या शुभेच्छा सहित इथेच थांबतो

तळटीप :- मजय सी मयत री करनर क

असे मी मुळीच विचारणार नाही

क्लिंटन's picture

9 Aug 2022 - 8:39 pm | क्लिंटन

सगळी आकडेवारी सादर करा की सर. असे काय करता?

मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. १९ जून १९६६ ला. जनसंघानंतर, भाजपाचं बारसं व्हायला १९८० उजाडलं. आता वयाने कोण मोठं ?

समजा १९८० मध्ये भाजप हे नाव न घेता परत जनसंघ हे नाव घेतलं असतं तर मग जनसंघ मोठा झाला असता का? कारण जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली होती आणि १९७७ पूर्वीच्या जनसंघातले सगळे लोक १९८० च्या भाजपत होते.

शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कधी मिळाले याविषयीही लिहा की. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ विद्याधर गोखले हे अधिकृत शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. निवडणुक आयोगाने बाकीच्या तीन- वामनराव महाडिक, अशोक देशमुख आणि मोरेश्वर सावे यांना अपक्ष उमेदवार म्हणून म्हणून धरले होते ते का हे पण सांगा की. https://ceomadhyapradesh.nic.in/Links/Books/89_Vol_II.pdf वर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांचे अधिकृत निकाल आहेत. त्यात निवडणुक लढविणार्‍या पक्षांची नावे दिली आहेत. शिवसेनेचे नाव तिथे राज्यस्तरीय पक्षांमध्येही दिसणार नाही तर ते REGISTERED(Unrecognised ) PARTIES मध्ये दिसेल. ते का हे पण लिहा की.

बरं १९९० पूर्वी अगदी १९५७ मध्ये जनसंघाचे पूर्ण देशात चार खासदार होते त्यापैकी दोन महाराष्ट्रातून निवडून आले होते ते पण लिहा की. महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघ-भाजपचे किती आमदार निवडून यायचे आणि शिवसेनेचे किती आमदार निवडून यायचे ते पण लिहा की. १९९० आणि नंतर नुसत्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या लिहिलीत. पण दोन पक्षांनी किती जागा लढवल्या होत्या ते पण लिहा की. मग स्ट्राईक रेट कोणाचा जास्त होता ते पण सगळ्यांना कळेल.

असं काय करता सर? प्रा.डॉ. आहात ना? मग नुसती आपल्या म्हणण्याला अनुकूल आकडेवारी सिलेक्टिव्हली देऊन कशी चालेल? सगळी आकडेवारी नको का द्यायला?