Skip to main content

ताज्या घडामोडी- ऑगस्ट २०२२ (भाग २)

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 06/08/2022 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले: उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.

वाचने 24889
प्रतिक्रिया 186

प्रतिक्रिया

https://m.timesofindia.com/india/pm-narendra-modi-still-set-to-win-majo… इंडिया टुडेच्या सर्वेक्षणानुसार आज लोकसभा निवडणूक झाली तर रालोआ २८६ जागा जिंकेल, संपुआ १४६ व इतर १११ जागा जि़ंकतील. म्हणजे रालोआला अगदी काठावरचे बहुमत मिळेल. २०१९ मध्ये रालोआला ३५३ जागा होत्या व त्यात भाजपला ३०३ होत्या. आता संजद (१६), सेना (१८) व अकाली दल (२) रालोआत नाहीत. भाजपला गोवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड यातील सर्व ६९ जागा मिळाल्या होत्या व २०२४ मध्ये जवळपास असेच चित्र असेल. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आसाम, झारखंड व छत्तीसगड येथील २७४ पैकी १९४ जागा होत्या. उर्वरीत राज्यातून सुमारे ५५ जागा होत्या. यापैकी मध्यप्रदेश, कर्नाटक, हरयाणा व छत्तीसगड या राज्यात जवळपास ८५% जागा जिंकल्याने तेथे जागा वाढविण्यास फारसा वाव नाही. कदाचित तेथील काही जागा भाजप गमावेल. परंतु उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यातील २०५ पैकी ११४ जागा सध्या असणाऱ्या भाजपला या राज्यात किमान २० जागा वाढविण्याचा वाव आहे. त्यामुळे भाजप एकटा ३००+ जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सीबीआय, इन्कमटॅक्स, ईडी सारख्या संस्थांच्या कर्तुत्वाचा आणि त्याचा राजकारण्यांच्या, उद्योगपतींच्या आणि सामान्यजनांच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव आणि केंद्रातील पक्षाचे शासन आणि राज्यातिल शासन हे एकाच पक्षाला देण्याचे गतकालीन फायदेतोटे आणि अपेक्षित स्थिरतेचा विचार पाहता भाजपा एकटा ५४३ पैकी ५०० जागा जिंकू शकेल असे वाटते. (यामागे सध्या आहेत तशा युत्या वगैरे टाळून स्वबळावर ५३० किंवा सर्वच वगैरे जागा भाजपानेच लढवाव्यात असे गृहितक आहे)

भाजपने आपल्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नेमणूक केली आहे. मागील सुमारे ६ वर्षे चंद्रकांत पाटील अध्यक्षपदी होते. चंद्रकांत पाटलांना हाताशी धरून फडणवीसांनी पक्षातील आपल्या तथाकथित प्रतिस्पर्धींना अक्षरशः संपवून पक्षाचे नुकसान करून स्वत:चे मुख्यमंत्रीपद व पक्षाची सत्ता घालविली. विनोद तावडे, पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नुसती व्यक्त करण्याचा अत्यंत गंभीर गुन्हा केल्यानंतर फडणवीसांनी अत्यंत निष्ठुर पद्धतीने त्यांना राजकारणातून संपविले. मुंडें विरूद्ध चिक्की प्रकरण, तावडेंविरूद्ध पदवी प्रकरण, खडसेंविरूद्ध भ्रष्टाचार, पाकिस्तानहून फोनकॉल अशी अनेक खोटी प्रकरणे विरोधकांच्या खांद्यावरून बाहेर आणली. बावनकुळे विदर्भात आपले प्रतिस्पर्धी आहेत अशी समजूत करून घेऊन त्यांनाही उमेदवारी नाकारली. या सर्व कारस्थानात चंद्रकांत पाटलांनी फडणवीसांना साथ दिली. यामुळे विदर्भात भाजपचे १५ उमेदवार पडले. खडसे व मुंडे मतदारसंघातही फडणवीसांनी आपल्याच उमेदवारांना पाडले. त्यामुळे अर्थातच भाजपची आमदारसंख्या १९ ने घटून सत्ता गेली. आपल्या पाठिंब्याची किंमत पाटलांनी कोथरूड मतदारसंघ बळकावून वसूल केली. स्थानिक उमेदवारांना डावलून आपल्या मर्जीतील उमेदवारांना शिवाजीनगर मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ देऊन टाकले. सत्ता गमाविल्यानंतरही फडणवीसांनी आपल्या चुका सुधारल्या नाहीत. तावडे व मुंडे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर आहेत. खडसेंना पक्ष सोडायला लावला. या चुकांचा अजून मोठा फटका पुढील निवडणुकीत बसणार आहे. राज्याध्यक्ष या भूमिकेतून चंद्रकांत पाटलांचे कर्तृत्व शून्य आहे. अत्यंत वाचाळ वक्तव्ये व विनोदी दावे करणे एवढेच त्यांनी ६ वर्षे केले. पक्षवाढ म्हणजे इतर पक्षातील अत्यंत भ्रष्ट, गुन्हेगार, जातीयवाद्यांची भरताड करणे हे त्यांचे कर्तृत्व. अशांना भाजपत आणून पक्ष घाण करून ठेवला. हे सर्व सुरू असताना मोदी-शहां फडणवीसांना पाठिंबा देत होते. ते सुद्धा फडणवीस-पाटील यांच्याइतकेच दोषी आहेत. परंतु उशीरा का होईना, मोदी-शहांना हळूहळू जाग येताना दिसत आहे. आधी बावनकुळेंना विधान परीषदेत आमदार केले. परंतु मंत्रीमंडळात बावनकुळेंना न घेऊन आपण आधीच्याच चुका सुरू ठेवणार हे फडणवीसांनी दाखवून दिले. पण आता चंद्रकांत पाटलांच्या जागेवर बावनकुळेंना आणल्याने मोदी-शहा आपल्या चुका सुधारत आहेत असं दिसतंय. आता उमेदवारी वाटपामध्ये पाटलांचा हस्तक्षेप कमी असेल व फडणवीसांनाही मुक्तहस्त मिळणार नाही. पुढील निवडणुकीत कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी पुन्हा एकदा उमेदवार असाव्या. पाटलांनी आग्रह धरल्यास त्यांना कोल्हापूरमधून उभे करावे. नाही तरी त्यांनी जाहीर सभेत सांगितले आहेच की कोल्हापुरातील कोणत्याही मतदारसंघातून मी निवडून येऊन दाखवीन, अन्यथा हिमालयात निघून जाईन. यापुढील पाऊल म्हणजे मुंडे व तावडे यांना परत महाराष्ट्रात आणणे व फडणवीसांना नेतेपदावरून बाजूला करणे ही असायला हवी, म्हणजे माझ्यासारखे पूवाश्रमीचे भाजप समर्थक पुन्हा भाजपला मत देतील. शक्य झाल्यास खडसेंना सुद्धा परत आणावे.

In reply to by श्रीगुरुजी

केसरकरांनी दोन चार दिवसांपूर्वी गौप्यस्फोट केला. अशोक चव्हाण, अजित पवार व उठा हे तिधे मोदींना भेटायला दिल्लीला गेले होते. तिथे मिटींग संपल्यावर उठा आपल्या सोबत्यांना सोडून एकटेच मोदींना अर्धा तास भेटले. परत सेना भाजपा युती करायचे नक्कीही झाले. पण भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन आणि राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड यामुळे तो प्लॅन फिस्कटला. अन्यथा फडणवीसांवर किती घणाघाती टीका करता आली असती नाही का? फडणवीस विरोधकांची एक मोठी सुवर्णसंधी हिरावली गेली. फारच नुकसान झालं बॅा. :)) फडणवीस अगदी वाईट्ट आहेत. मूर्खासारखे काहीतरी ठरवत असतात. मोदी शहा कितीही हुषार असले तरी त्यांचे मोदींपुढे काही चालत नाही. त्यामुळे ते गपगुमान फडणवीसांच्या होला हो म्हणत बसतात! :))

आपल्या करियर मध्ये अर्ध्या पेक्षा अधिक रिमेक असलेल्या चित्रपटांमध्ये काम करुन मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणवुन घेण्यार्‍या आमिर खाण ची लोकांनी व्यवस्थित पाचर मारली ! :))) वार वही पें करो जहा दर्द बोहोत ज्यादा होता है ! जिहादी बॉलिवुड हे हिंदुस्थानी लोकांच्या पैशातुन मोठे झाले आणि हिंदुस्थानी लोकांचेच हिंदू धर्म विरोधी ब्रेन वॉश करत राहिले, पण काळ आता बदलला आहे हे उघड आहे. उत्तम कलाकृती पाहण्यास उपलब्ध असताना ह्यांचे डब्बा रिमेक पाहण्याचे पाप लोकांनी का करावे ? आता एकमेकांची चाटणारे रडणारे समोर येत आहेत, अक्षय रडला, म्हणाला अर्थव्यवस्थेला नुकसान होते [ बरोबर, जिहादी अर्थव्यवस्थेला नुकसान झाले, ते झालेच पाहिजे ! याची मैत्री Aneel Mussarat आणि Nabeel Mussarat शी आहे त्या बद्धल २ शब्द सांग म्हणावे. ] आता येडा अण्णा पण म्हणतोय असं करु नका ! तुम्ही हिंदू द्रोही / देश द्रोही प्रोपगेंडा बंद करा आधी, मग विचार करु. अगदी गेल्या २-३ दिवसात आमिरचा कौन बनेगा करोड्पती मधली क्लिप व्हायरल झाली, ती पहा... आर्मी लेडीला सॅल्युट करण्यासाठी आमिर खाणकडे एकही हात तेव्हा उपलब्ध नव्हता ! मिडीयात हे व्हायरल झाल्यावर काहीतरी थातुर मातुर कारण दिले त्याने. जर आमिर ने खरचं सॅल्युट केला असेल आणि त्याच्या मतानुसार वेगवेगळ्या कॅमेरा अँगलमुळे ते आले नसेल तर केबीसीवाल्यांनी आमिर चे सगळ्या अँगलचे फुटेज रिलीज करावे. हा असे का वागतो त्याचे विश्लेशण :- - -- --- मी ध्रुव राठी बद्धल म्हणालो होतो :- ध्रुव राठी चा व्हिडियो मी आधीच पाहिला होता, तो एक प्रसिद्ध व्ह्लॉगर / युट्युबर आहे. परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे. आता तरी समजले का फंडिग का होते ? असो... जाता जाता :- लाल सिंग की चड्डी उतार देने के बाद, अब पठाण की पतलुन उतरनेवाली है ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022

In reply to by मदनबाण

चित्रपट कालच रिलिज झाला आहे. आजचा शुक्रवार, शनिवार आणि रविवारचे कलेक्शनचे आकडे आले की चित्रपट हिट आहे की फ्लॉप झाला हे ठरविता येईल ना ? शिवाय ऱक्षाबंधन ला सार्वजनिक सुट्टी नसते. वेळ काढून भाऊ बहिण एकमेकांकडे जाण्यासाठी प्रवास करतात त्यामुळे कालचे आकडे गृहित धरावेत काय ?

In reply to by धर्मराजमुटके

चित्रपट कालच रिलिज झाला आहे. आजचा शुक्रवार, शनिवार आणि रविवारचे कलेक्शनचे आकडे आले की चित्रपट हिट आहे की फ्लॉप झाला हे ठरविता येईल ना ? तुम्हाला हा चित्रपट फ्लॉप झाला आहे हे कळेल, तेव्हा नक्की सांगा. :) शिवाय ऱक्षाबंधन ला सार्वजनिक सुट्टी नसते. वेळ काढून भाऊ बहिण एकमेकांकडे जाण्यासाठी प्रवास करतात त्यामुळे कालचे आकडे गृहित धरावेत काय ? ओह्ह, आमिर ला हे बहुधा समजले नसावे की हिंदू सणांना अधिक महत्व देणे पसंत करतात, चित्रपट त्या दिवशी रिलीज करणे योग्य नाही ! :))) ज्या लोकांनी हा पाहिला आहे त्यांचे रिव्हूज हे चित्रपटापेक्षा अधिक प्रसिद्ध होत आहेत... तेव्हा रिव्हू पाहुन जमल्यास त्याचा आनंद घ्या ! विशेष सुचना :- वाचकांना असे भन्नाट रिव्हू मिळाले तर ते नक्की शेअर करा, आम्ही देखील त्याचा लुफ्त घेऊ ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022

In reply to by मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Minister

वा! जगाला जे माहिती नाही ते तेथे उपस्थित नसूनही केसरकरांसारख्या राज्य पातळीवर तिय्यम किंवा त्यापैक्षाही खालच्या पातळीवर असलेल्या नेत्याला समजलं हे वाचून केसरकर व त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांबद्दलचा आदर द्विगुणित झाला. मुख्य म्हणजे चव्हाण व पवारांच्या उपस्थितीत मोदी गुपचूप ठाकरेंशी १० मिनिटे बोलले, १० मिनिटात सत्तांतराची योजना ठरली, ठाकरेंनी राजा हरीश्चंद्राप्रमाणे निस्पृह वृत्तीने आसनत्याग करून शत्रूला गादीवर आणण्याची तयारी केली . . . परंतु बाहेर बसलेल्या पवार व चव्हाणांना याचा सुगावा लागून त्यांनी लगेच योजना आखून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करून भाजपचा डाव उधळून लावला व डाव उधळून जात असताना ठाकरे त्याला पाठिंबा देत होते. अजून येऊ दे फिक्शन!

In reply to by शाम भागवत

अश्या सुरस, उत्कंठावर्धक, रहस्यमय,अद्भुत कथा अजून येऊ दे. तेवढंच आमचं मनोरंजन!

In reply to by शाम भागवत

:)

चर्च बेकायदा आश्रमशाळा प्रकरणाला वेगळे वळण ; सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची संस्थाचालकाविरोधात विनयभंगाची तक्रार https://www.loksatta.com/thane/a-minor-girl-who-was-released-from-an-as… अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारी नंतर या बेकायदेशीर चर्च आश्रमशाळा प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसून येत आहे.

In reply to by मुक्त विहारि

सीवूड येथील एका चर्चमध्ये बेकायदेशीरपणे आश्रमशाळा (Navi mumbai crime) चालवली जात होती. या शाळेत असलेल्या ४५ अल्पवयीन बालकांची सुटका करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Minor Molestation) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवून चर्च व्यवस्थापकांच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीत भाजपच्या तिरंगा प्रचार रथाची तोडफोड, समाजकंटकांवर कारवाईची मागणी https://www.loksatta.com/nagpur/bjp-india-flag-campaign-chariot-vandali… अमरावती शहरात गत काही दिवसांपासून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. आज घडलेल्या घटनेचा तपास देखील पोलिसांनी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रचार रथावर झालेला हल्ला हा देशाचा अपमान असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

In reply to by मुक्त विहारि

हिंदूंच्या यात्रेवर हल्ले झाले तेव्हा सरकारं मूग गिळून गप्प बसली. सर्वधर्मसमभाव म्हणे. त्यामुळे धर्मांध माजले आणि ते तिरंगा यात्रेवर हल्ले करू लागले. वेळीच आवर घालायचा असतो. -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

सलमान रश्दी रश्दींवरील हल्ल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक लोक त्यांचे सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकाच्या प्रती खरेदी करीत आहेत. https://www.indy100.com/viral/salman-rushdie-stabbing-the-satanic-verses

In reply to by वामन देशमुख

सलमान रश्दी रश्दींवरील हल्ल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक लोक त्यांचे सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकाच्या प्रती खरेदी करीत आहेत.
ज्या धर्माच्या लोकांचे शिक्षण व्हावे असे वाटते ते लोक खरेदी करतात काय ? वाचतात काय ? आपल्या चुका मान्य करतात काय ? आपल्यात बदल करतात काय ? दुसर्‍या धर्मियांनी ते वाचून पहिल्या धर्मियांच्या जीवनात काही बदल होणार आहे काय ? तसे नसेल तर ही कवायत करुन फारसे काही हाती लागेल अशी परिस्थिती नाही असेच म्हणावी लागेल.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थी राख्या घालून शाळेत पोहोचले. त्यावर आक्षेप घेत मिशनरी शाळेतील शिक्षकांनी मुलांना जबरदस्तीने पकडून राख्या काढून फेकून दिल्या. कर्नाटकातील मंगळुरू येथील कटिपल्ला येथील इन्फंट मेरीज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. ख्रिश्चन शाळांमधील हिंदू विद्यार्थ्यांना पद्धतशीरपणे अपमानित करण्याच्या आणि त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक चालीरीती आणि परंपरांना लक्ष्य करून त्यांना अपमानास्पदपणे वागवण्याचा घटना घडत आहेत. हा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू मुलांचा धर्मावरून छळ केला आहे. हिंदू विद्यार्थ्यांनी ख्रिश्चन शाळांमधे न जाता इतर शाळांमध्ये गेले पाहिजे.

In reply to by निनाद

ख्रिश्चन शाळांमधील हिंदू विद्यार्थ्यांना पद्धतशीरपणे अपमानित करण्याच्या आणि त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक चालीरीती आणि परंपरांना लक्ष्य करून त्यांना अपमानास्पदपणे वागवण्याचा घटना घडत आहेत. हा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू मुलांचा धर्मावरून छळ केला आहे. हिंदू विद्यार्थ्यांनी ख्रिश्चन शाळांमधे न जाता इतर शाळांमध्ये गेले पाहिजे.
मी देखील हाच विचार करुन जिथे हिंदू धर्माचा आदर केला जातो अशा शाळेमधे मुलाला दाखल केले आहे. अर्थात त्याची जास्तिची आर्थिक किंमत मला मोजावी लागतेय हे ही खरेच. असो.

In reply to by धर्मराजमुटके

अर्थात त्याची जास्तिची आर्थिक किंमत मला मोजावी लागतेय
त्याचे कारण शिक्षण हक्क कायदा आहे मोदींनी आठ वर्षांत तो कायदा रद्द करायला हवा होता.

In reply to by निनाद

कर्नाटकातील मंगळुरू येथील कटिपल्ला येथील इन्फंट मेरीज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.
केंद्र -राज्य दोन्हीकडे, लोकांना हिंदुत्ववादी वाटणारी भाजपची सरकारे आहेत.

स्थानिक नगरसेवकाने ध्वजवाटप केले. अत्यंत दु:खाने सांगावेसे वाटते की ध्वजाचे आरेखन पूर्ण चुकले आहे. तिन्ही रंगाच्या पट्ट्यांची रूंदी वेगवेगळी आहे. श्वेत पट्टा सर्वाधिक रूंद असून भगवा पट्टा सर्वात कमी रूंदीचा आहे. मध्यभागी असलेले अशोकचक्र वर्तुळाकार नसून उजवीकडे झुकलेले अंडाकृती आकारात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अत्यंत दु:खाने सांगावेसे वाटते की ध्वजाचे आरेखन पूर्ण चुकले आहे
मला वाटते की तुमचा स्पष्टवक्ता स्वभाव पाहता ही गोष्ट तुम्ही नक्कीच नगरसेवकाच्या लक्षात आणून दिली असेल. अवांतर : मी घर घर तिरंगा मोहिमेत सहभागी झालो नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकणार्‍या गोष्टींची यादी वाचली. एवढे सगळे सोपस्कार माझ्याकडून होतील की नाही याची शंका वाटते. तसा मी देव देश आणि धर्माबाबत आस्थेवाईक असलो तरी कर्मकांडांमधे मागे पडतो. त्यापेक्षा १५ ऑगस्ट ला मुलाच्या शाळेत जाऊन तिथल्या मुलांच्या निरागस सान्निध्यात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे ठरविले आहे.

In reply to by धर्मराजमुटके

राजहंसाचे चालणे जगी झालीया शहाणे म्हणोनि काय कवणे चालोची नये

In reply to by आनन्दा

ह्या मारधाडीच्या धाग्यावर एवढे सुंदर वचन ? आत्मा थंडावला आज :) नक्कीच चालावे. मी फक्त माझ्यापुरते सांगीतले हो.

In reply to by श्रीगुरुजी

भारतीय ध्वज संहितेनुसार अतिशय गंभीर गुन्हा असून याच्याविरुद्ध कडक शिक्षेची प्रावधाने आहेत. खरे पाहता बी आय एस उर्फ ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या मानकांनुसार झेंडे बनविण्याचे काम करण्यासाठी एकमात्र मान्यताप्राप्त युनिट आहे देशात ते म्हणजे कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ. . बाकी इतर असले थातूरमातूर रंगकाम करून बनवलेले झेंडे घेऊ नयेत, तो एक कायदेशीर गुन्हाच नाही तर राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान पण होतो, जो कुठल्याही सुजाण नागरिकांनी करू नये.

In reply to by जेम्स वांड

आणि काल सकाळी झेंडा लावताना त्यातल्या चुका लक्षात आल्या. ध्वज २:३ प्रमाणात नव्हता, अशोक चक्र तिरपे होते, भगवा, पांढरा, आणि हिरव्या रंगाचे प्रमाण पण चुकले होते. झेंडा बदलण्यासाठी दुकानदाराकडे गेलो असता, तो म्हणाला कि सगळे झेंडे एकसारखेच आले होते. सगळे विकले गेले आणि आता एकच झेंडा शिल्लक आहे. तो झेंडा पण प्रमाणात नसल्याने मी घेतला नाही. मी मजजवळचा झेंडा त्याला परत केला. तळटीपः त्याच्या दुकानावर लावलेला झेंडा मात्र प्रमाणशीर होता. त्याने बहुधा दुसरीकडून आणला असावा.

झेंड्याच्या नावाने बालिशपणा चालू आहे. पोरंटोरं सायकल ,बाईकवर तिरंगा लावून तिरंग्याचा अवमान करत आहेत. हेतू तोच असावा.

In reply to by आग्या१९९०

काय असेल ह्यावर माझे भाष्य नाही, किंवा जनता हेतुपरस्पर काही करेल ते ही एखाद सरकारच्या म्हणण्यावर ते ही झेंड्याच्या अपमान बाबतीत असे अजूनतरी वाटत नाही मला. जनता भावूक असते, प्रसंगी कायद्याने अडाणी असते पण इतकी चवचाल नसते, कारण मुळात गर्दीचा बुद्ध्यांक जरा कमीच असतो, लोकांना देशभक्ती साजरी करायला आवडते, त्यानुसार ध्वजसंहिता पण मॉडीफाय झाली आहे (त्याच्यासाठी एका काँग्रेसच्या राज्यसभा खासदार असणाऱ्या नवीन जिंदल नामक नेत्याने आंदोलन केले होते) मॉडीफाईड संहितेनुसार कोणीही भारतीय नागरिक भारतीय झेंडा फडकवु शकतोच, विषय तो नाही विषय आहे झेंडा मानकांच्या अनुसार असणे किंवा नसणे, देशभक्ती मुळात वाईट गुण वाटत नाही. त्यामुळे हेतुवर तूर्तास benefit of doubt, पण एकंदरीत जनतेने तारतम्य अन् झेंड्याच्या पावित्र्याची जाण ठेवावी अशी अपेक्षा.

In reply to by जेम्स वांड

जनतेचा हेतू नक्कीच तसा नाही. ज्यांनी एखादे खेळणे वाटावे अशा प्रकारे सदोष तिरंगे वाटले त्यांच्या हेतूबद्दल शंका येते. तिरंग्याचा अवमान होऊ नये ह्याबद्दल काय काळजी घेतली? सदोष तिरंगे वाटलेच कसे गेले? आपण तिरांग्याबाबतीत फार गंभीर नसल्याचे सरकारने दाखवून दिले आहे.

"हर घर तिरंगाने" झेंड्याचा घोर अपमान होतो. पण हमिद अंसारी ह्यांनी 15August कार्यक्रमाला झेंड्याला सॅल्युट केला नाही, तेंव्हा पुरोगाम्याच्या मते तो झेंड्याचा अपमान नव्हता. आता पर्यंत ईतकी वर्षे झेंड्याचे अपमान होतच होते. अगदी हल्ली पर्यंत आम जनतेला 15 August / 26 Jan सोडुन ईतर दिवशी झेंड्याला हात लावायची ( झेंडा फडकवायची) कायद्याने बंदी होती. पुढे कधीतरी ही बंदी उठवली गेली. लहान मुले शाळेय गणवेशावर पेपरचे झेंडे पीनने लावत, सायकलवर काडीवर चीकटवलेले झेंडे बांधत असत. कायद्यानुसार आम्ही असे गुन्हे शालेय जिवनात केलेले आहेत. शाळेत फडकवले जाणारे झेंडे कर्नाटकातल्या खादी भंडारातुन येत असत ह्याच्यावर माझा विश्वास नाही. पुर्ण देशाला झेंड्याचा पूरवठा फक्त एका खादी भंडारातुन व्हावा हा अतर्क निर्णय असावा.

In reply to by डँबिस००७

अगदी हल्ली पर्यंत आम जनतेला 15 August / 26 Jan सोडुन ईतर दिवशी झेंड्याला हात लावायची ( झेंडा फडकवायची) कायद्याने बंदी होती. पुढे कधीतरी ही बंदी उठवली गेली. असं नाही स्पष्ट उपलब्ध आहे पण ते नेटवर नवीन जिंदल विरुद्ध भारत सरकार १९९५ , हे काँग्रेस पार्टीचे खासदार होते, काहींना ते गैरसोयीचे वाटू शकेल पण होते हे fact बदलले जाऊ शकत नाही. फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया ही त्यांची गैर सरकारी संस्था होय. ह्याचं कोडच्या अंतर्गत, कर्नाटक खादी मंडळाला पर्यायवाचक इतर मटेरियल वापरून झेंडे बनवणारे उत्पादक २००५ पासून allowed केले आहेत पण त्यांनाही झेंडे BIS मानकांच्या अंतर्गतच बनवावे लागतात, अन् अश्या स्टँडर्ड वर certified आजही कर्नाटक खादी मंडळ एक कंपनी आहे. दुसऱ्या कुठल्या असतील तर पहावयास लागतील. तुमचा तर्क चेक करताना नवीन माहिती सापडली, ते एक बरे झाले. पण फ्लॅग कोड मॉडीफाय होण्याच्या अगोदर कर्नाटक खादी मंडळ एकमेव कंपनी होती, हे मात्र नक्की आहे. १७ एकरांत पसरलेल्या त्यांच्या फॅसिलिटी मधे १००-१५० कामगार वर्षभर फक्त झेंडे तयार करत असतात. त्यामुळे त्याकाळी असलेल्या लिमिटेड डिमांड मध्ये एकच कारखाना पुरेसा ठरत असेल असे वाटते

In reply to by डँबिस००७

हमीद अन्सारी ह्या माणसाबद्दल एकंदरीतच मत खराब झाले आहे permanently, उपराष्ट्रपती पदावर असणाऱ्या माणसाने IAMC सारख्या धर्मांध अन् मूलतत्ववादी संघटनेच्या कार्यक्रमात जाऊन गळे काढणे ही शुद्ध हलकट वृत्ती आहे असे मी मानतो.

ज्या प्रमाणात "लाल सिंग चढ्ढा"चा बॉयकॉट यशस्वी झाला तितकाच "हर घर तिरंगा" कार्यक्रम यशस्वी होताना दिसत आहे. "मी पण देश प्रेमी" अस दाखवण्यासाठी आमिर खानने ह्या कार्यक्रमा अंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावलेले फोटो शेअर केलेले आहेत. जनतेचा मूड बदलत आहे. पुढे येणार्या संभाव्य धोक्याची जाणिव होऊन त्यावरील ऊपायावर चर्चा करण्यासाठी बॉलीवूड मधील दिग्गजांची काल मिटींग झालेली आहे. जनतेला मुर्ख कसे बनवायचे ह्याचा सखोल आराखडा तयार केलेला आहे अशी बातमी आहे. (बातमीचा दूवा देता येणार नाही)

In reply to by डँबिस००७

सखोल आराखडा तयार केलेला आहे अशी बातमी आहे. (बातमीचा दूवा देता येणार नाही)
अंतस्थ गोटातली बातमी असल्यास अन् ती पक्की असल्यास तुम्ही ती पोलीस, आयबी/ रॉ वगैरे लोकांना देऊन आपल्या नागरिक जबाबदारीचे पालन करणे जास्त श्रेयस्कर. पब्लिक फोरम वर असे काही बोलताना आपणांस किमान विदा देता येत नसतील तर त्या वक्तव्याची जबाबदारी तरी वैयक्तिक रित्या घेण्याची तसदी उचलली पाहिजे, उद्या तुम्ही विदा लिंक काहीही उपलब्ध नाही/ देता येणार नाही/ देणार नाही म्हणून काहीही दामटून लिहाल तर त्याला काय अर्थ असेल !

In reply to by जेम्स वांड

जनतेचे पैसे कसे लुटायचे याबद्दल काल मोदी आणि अदानी अंबानी ची मीटिंग झाली.. दुवा देता येणार नाही

In reply to by कपिलमुनी

"लाल सिंग चढ्ढा"च्या बॉयकॉटमुळे अंबानीचेच नुकसान झाले आहे हे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटले असावे ! त्यामुळे बरे झाले त्याला चांगलीच अद्दल घडवली. लगेहात आता जिओ फोनचा पण बॉयकॉट करा म्हणजे अंबानी कसा रस्त्यावर येईल.

एखाद्या व्यक्तीने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते, परंतु येथे सरकारच सदोष राष्ट्रध्वज वितरीत करत आहे ह्यात तुम्हाला काहीही वावगे वाटत नाही?

In reply to by आग्या१९९०

जर सरकारने असे केले असेल तर तुम्ही ती माहीती, पोलीस, आयबी/ रॉ वगैरे लोकांना देऊन आपल्या नागरिक जबाबदारीचे पालन करणे जास्त श्रेयस्कर.

ज्या प्रमाणात "लाल सिंग चढ्ढा"चा बॉयकॉट यशस्वी झाला तितकाच "हर घर तिरंगा" कार्यक्रम यशस्वी होताना दिसत आहे. स्वदेशी लोकांनी काढलेला सिनेमा बॉयकॉट का करावासा वाटतोय? "मी पण देश प्रेमी" अस दाखवण्यासाठी आमिर खानने ह्या कार्यक्रमा अंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावलेले फोटो शेअर केलेले आहेत. आणि त्याने आपल्या घरावर तिरंगा नसता फडकावला असता तर त्याला काय म्हटले असते आपण?