शशक'२०२२ - बदला
राघव आणि शीला प्रसिध्द गुप्तहेर आणि त्याची हुशार असिस्टंट, खुनाच्या केसबद्दल चर्चा करत होते..
"अपघात वाटावेत अशा पध्दतीने तीन खुन झालेत. खुनी हुशारच दिसतोय, काहीच धागेदोरे सापडत नाहीयेत. खूनांचा उद्देशही समजत नाहीये.
खून झालेले तीघे जूने घट्ट मित्र, त्यांचा चौथा मित्र आजच भारताबाहेरून यायचाय, मग काहीतरी धागा हाती लागेल".
राघवचा फोन वाजला.
"शीला, चौथा पोहचलाय, श्रीधरला घेऊन जा, त्याच्यावर नजर ठेवा. सुरक्षीत पोहचवा घरी. उद्या भेटेन त्याला"
"डोन्ट वरी सर, मी एकटीच पोहचवेन त्याला".
बाहेर येऊन हळु आवाजात फोनवर बोलली , "शेवटचंच काम हे. आता ताईच्या आत्म्याला शांती मिळेल."
आणि जायला म्हणून वळली, एकदम दचकली, समोर विजयी हसत राघव उभा होता.
याद्या
10783
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
+१ व्हेरी स्मार्ट!
+१
व्हिलन लोकं हिरोसमोर प्लॅन
कथानक आवडलं पण ...
फोन कोणाचा वाजला. राघवचा की
एकदम बरोबर मुद्दा
In reply to फोन कोणाचा वाजला. राघवचा की by विजुभाऊ
राघवचा फोन वाजला असावा त्याने
In reply to फोन कोणाचा वाजला. राघवचा की by विजुभाऊ
+१
In reply to राघवचा फोन वाजला असावा त्याने by कानडाऊ योगेशु
+१
+१
शांती नसली म्हणून काय झालं
In reply to +१ by चौथा कोनाडा
+१
प्रेडिक्टेबल
+१