Skip to main content

शशक'२०२२ - बदला

प्रकाशित
राघव आणि शीला प्रसिध्द गुप्तहेर आणि त्याची हुशार असिस्टंट, खुनाच्या केसबद्दल चर्चा करत होते.. "अपघात वाटावेत अशा पध्दतीने तीन खुन झालेत. खुनी हुशारच दिसतोय, काहीच धागेदोरे सापडत नाहीयेत. खूनांचा उद्देशही समजत नाहीये. खून झालेले तीघे जूने घट्ट मित्र, त्यांचा चौथा मित्र आजच भारताबाहेरून यायचाय, मग काहीतरी धागा हाती लागेल". राघवचा फोन वाजला. "शीला, चौथा पोहचलाय, श्रीधरला घेऊन जा, त्याच्यावर नजर ठेवा. सुरक्षीत पोहचवा घरी. उद्या भेटेन त्याला" "डोन्ट वरी सर, मी एकटीच पोहचवेन त्याला". बाहेर येऊन हळु आवाजात फोनवर बोलली , "शेवटचंच काम हे. आता ताईच्या आत्म्याला शांती मिळेल." आणि जायला म्हणून वळली, एकदम दचकली, समोर विजयी हसत राघव उभा होता.

याद्या 10783
प्रतिक्रिया 14

राघव आणि शीला प्रसिध्द गुप्तहेर आणि त्याची हुशार असिस्टंट, खुनाच्या केसबद्दल चर्चा करत होते
हे वाक्य "प्रसिध्द गुप्तहेर राघव आणि त्याची हुशार असिस्टंट शीला खुनाच्या केसबद्दल चर्चा करत होते" असं सहज सोपं आणि अधिक योग्य झालं असतं. स्वल्पविरामाची आवश्यकता नव्हती. असो.

In reply to by विजुभाऊ

राघवचा फोन वाजला असावा त्याने तो घेतला असावा व मग शीलाशी त्याबद्दल बोलला असावा असे असावे. पहिल्या वाक्यात माझाही घोळ झाला.शीला ,राघव व त्याची असिस्टंट अशी तीन पात्रे वाटली.

+१ पण... आता ताईच्या आत्म्याला शांती मिळणार नाही "