नीज भरते दिशांत
माझे रिते नीजपात्र
उतरूनि ये अंगणी
जरी हळुवार रात्र
रात्र रात्र जागते
गोड स्वप्नातूनि
धुंद गात राहते
अबोल मौनातूनि
येती कानी दुरून
सूर सारंगीचे छान
मन खाई हेलकावे
वाऱ्यावर जसे पान
पान पान जागते
पाचूच्या बनातूनि
शुभ्र सोनसकाळी
झळाळते दवातूनि
- संदीप चांदणे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4781
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
झकास एकदम.
छान.
वा !
नादमय कविता
शब्दांच्या बुळबुळीत घसरपट्टीवरून नुस्ते घसरत जाण्याची गंमत ?
.
In reply to शब्दांच्या बुळबुळीत घसरपट्टीवरून नुस्ते घसरत जाण्याची गंमत ? by चित्रगुप्त
म्हणजे 'दिन ढल जाये हाये, रात ना जाय' ... असा मामला आहे तर.
In reply to . by चांदणे संदीप
एक्झ्याटली पर्फेक्ट!
In reply to म्हणजे 'दिन ढल जाये हाये, रात ना जाय' ... असा मामला आहे तर. by चित्रगुप्त
मस्त. आवडली कविता!