'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
12 Sep 2021 - 8:39 am
गाभा: 

प्रत्येकाला जीवनात लहान मोठी काहीतरी समस्या असते. सध्याची संपली की सुखी जीवन सुरु असे काही नसते. 'जब तक जीवन है तब तक संघर्ष है।' हे अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. त्यांच्यासारख्या अब्जाधीशाला संघर्ष चुकला नाही तर आपण कोण?
तर मित्रहो, 'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? 'आपल्या' असे म्हणण्याचे कारण म्हणजे एखाद्याचे सुदैव हे कदाचित दुसर्‍याचे दुर्दैव किंवा अटळ असा तोटा/नुकसान असू शकतं. एखाद्याला मिळालेली चांगली संधी ही दुसर्‍याचं मन खट्टू करु शकते.
यामुळेच ती चुटपुट मनाला लागू न देता आपल्या जीवनात सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? संधीसाधू(चांगल्या अर्थाने) कसे व्हावे? उपाय स्ट्रॅटेजिक, तार्किक किंवा अगदी विशिष्ट देवोपासना, स्त्रोत्रे, मंत्रे , वास्तुशास्त्र , फेंगशुई , रत्ने वापरणे , संत अध्यायवाचन वगैरे असले तरी चालतील. (उपाय कोणाला शारीरिक ,मानसिक इजा करणारे नसावेत) ज्यांचा विश्वास आहे ते लोक करतील.
सुचवा उपाय तसेच सामायिक करा आपले या विषय अनुषंगाने असणारे अनुभव. _/\_

प्रतिक्रिया

ते आपल्या हातात आहे.

गुल्लू दादा's picture

12 Sep 2021 - 9:00 am | गुल्लू दादा

दैव वा नशीब हा खूप मोठा विषय आहे. यावर बरंच काही लिहिता येण्यासारखं आहे. मला वाटत दैव म्हणजे मेहनत आणि समयोचितपणा यांचा बायप्रोडक्ट असावा. माझ्या परिचयातील एक गृहस्थ होते. मोटारसायकलचे साईड मिरर त्यांना आवडत नसल्याने त्यांनी ते काढून टाकले. त्यांना मी नेहमी सांगत असे की काही गोष्टी आवडण्यासाठी नसतातच. रोड क्रॉस करताना मागून येणाऱ्या अवजड वाहनाने धडकून त्यांचा मृत्यू झाला. अंत्ययात्रेत सगळे म्हणत होते 'दैव हो दुसरं काय?' काल मी नीट-पीजीचा पेपर दिला. माझ्या बऱ्याच नेभळट चूका (सिली मिसटेक झाल्या. जे प्रश्न मी रूम वर बरोबर केला असता तो मी तिथे चुकवून आलो. याला कोणी नशीब म्हणू शकेल पण मी याला मेहनत कमी पडली अस म्हणेल. प्रेशर सुद्धा हँडल करता यायला हवे नुसतं ज्ञान असून फायदा नाही. बाकी दुसरं कोणतं नशीब असेल तर मला माहित नाही.

समस्या ना समस्या समजुच नका.जीवन जगताना येणारे अडथळे प्रयत्नाने पार करून पुढे जा.
काही समस्या आपण स्वतःच निर्माण करतो,काही संकट आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या ह्या सर्व कधी कधी काल्पनिक असतात.
आणि किती ही मोठे संकट आले तरी मानसिक स्वस्थ ढळू देवू नका.

सतिश गावडे's picture

12 Sep 2021 - 11:21 am | सतिश गावडे

पाच सत्पात्री मिपाकर बोलावून त्यांना बार्बेक्यू नेशन वगैरे ठिकाणी नेऊन त्यांना यथोचित सामिष भोजन घालून तृप्त करावे.

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 11:44 am | गॉडजिला

तर ते आपल्यासाठी एक फार मोठे सुदैव असेल असे मला वाटते. आता ते कसे घडावे यावर मार्गदर्शन मी काय करणार ?

प्रसाद गोडबोले's picture

12 Sep 2021 - 12:50 pm | प्रसाद गोडबोले

वैयक्तिक अनुभव असा आहे की सुदैव दुर्दैव हा सगळा पर्स्पेक्टीव्ह चा मामला आहे, सुख काय दु:ख काय काहीच शाश्वत नाही, काळ बदलेल तसे सगळेच बदलत रहाते , म्हणुन सर्वत्र समबुध्दी होणे हे आपले ध्येय्य असले पाहिजे , सुदैव अथवा सुख हे नव्हे ! हे सगळं बोलायला सोप्पं आहे पण प्रतिकुल परिस्थीती आली की चंचल होणे बिथरणे आणि अनुकुल परिस्थीती आली की उन्माद येणे बेफीकीर होणे ही सर्वसामान्य माणसाच्या मनाची नैसर्गिक वृत्ती आहे , ह्या वृत्तीची तीव्रता कमी करता आली की आपण जिंकलो !
आणि ह्यासाठी समर्थांनी आधीच उपाय सांगुन ठेवला आहे !

सुख दुःख उद्वेग चिंता ।अथवा आनंदरूप असतां ।
नामस्मरणेविण सर्वथा ।राहोंच नये ॥४॥
हरुषकाळीं विषमकाळीं ।पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं ।नामस्मरण करावें ॥५॥
कोडें सांकडें संकट ।नाना संसारखटपट ।
आवस्ता लागतां चटपट ।नामस्मरण करावें ॥६॥
चालतां बोलतां धंदा करितां ।खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां ।नाम विसरों नये ॥७॥
संपत्ती अथवा विपत्ती ।जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती ।सांडूच नये ॥८॥

प्रसाद गोडबोले's picture

12 Sep 2021 - 12:55 pm | प्रसाद गोडबोले

बाकी

सुचवायचे म्हणुन अनेक अनेक उपाय आहेत , बरेचसे स्वतः ट्राईड आणि टेस्टेड आहेत , पण नामस्मरण हा सर्वात पहिल्यांदा कळलेला उपायच सर्वात सुलभ , खात्रीशीर आणि अंतिम उपाय आहे ह्यावर आता ठाम विश्वास बसला आहे .

"मला नामापरते अजुन काहीही कळत नाही हे ज्याला कळले त्याला सर्व कळले " असे गोंदवलेकर महाराज म्हणाले आहेत त्याचा अर्थ आता गवसायला लागला आहे !

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 5:25 pm | गॉडजिला

सुदैव वाढवण्याचे उपाय मागतो…

तुम्ही फार चांगला उपाय सुचवला आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Sep 2021 - 2:29 pm | श्रीगुरुजी

नामस्मरण हा सर्वात पहिल्यांदा कळलेला उपायच सर्वात सुलभ , खात्रीशीर आणि अंतिम उपाय आहे ह्यावर आता ठाम विश्वास बसला आहे .

+ ९९९९९९९...

उपयोजक's picture

12 Sep 2021 - 6:01 pm | उपयोजक

छान प्रतिसाद

मार्कस नामस्मरणाचा उपाय खरंच चांगला आहे.पूर्वी वापरलाय. पण चांगल्या सवयी वाईट सवयींसारख्या दीर्घकाळ टिकत नाहीत. त्यामुळे नामस्मरण पुन्हा सुरु केले की काही दिवसांनी त्यात खंड पडतो. तो खंड पडूच नये यासाठी काय करता येईल? जमत नसतानाही हटवादी मन म्हणत राहतं की 'सजगच रहायचंय ना? माईंड चॅटरिंग बंद करायचंय ना? करु की मग स्वनियंत्रणाने.
प्रत्यक्षात मात्र ते जमत नाही. ते जमेल या फाजील आत्मविश्वासामुळेच नामस्मरण माझ्याकडून घडत नाहीये. कळतंय पण वळत नाहीये. यावर काही सॉलिड उपाय सुचवा.

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 7:48 pm | गॉडजिला

दोन नामांच्या मधे जो गॅप असतो त्यावर द्या… सुरुवातीला हा कालावधी क्षूल्लक असतो पण आपण जसे जसे आपले मन या क्षणीक पण निर्वीचार अवस्थेकडे देउ लागाल हळु हळु हा कालावधी वाढत जाइल. हा कलावधी म्हणजेच फक्त प्रेजेंस होय… इथे स्थिर होणे म्हणजे स्वताच्या मुलभुत स्वरुपाची ओळख पटु लागणे होय… जी विचारा पलिकडील बाब आहे.

मुळात विचार फक्त आणी फक्त भौतीक बाबीमुळेच तयार होउ शकतात व तत्पुरत्या भौतीक बाबींचे क्षणीक शमन करायच्याच उपयोगाचे असतात त्यातुन अन्य सखोल वा समग्र प्राप्ती कसलीही नाही…

नाम काय आहे ? एक विचार… त्याच्या (तिव्र) स्मरणाने/वापराने जास्ति जास्त काय होइल ? दुसरा विचार तात्पुरता दाबला जाइल, मारला जाइल… हे घडन मनाला आधार देते खरे पण या कुबड्या अनंतकाळाच्या बंदीवासाची सुरुवात असते… आपले मुल स्वरुप विचार न्हवे त्या पलीकडील आहे म्हणुनच नामस्मरणात न्हवे तर त्याच्या मधे जो गॅप असतो त्याकडे चित्त स्थिर करणे सुरु करा… अतिशय आनंददायी अवस्था अवश्य अनुभवाल.

शाम भागवत's picture

12 Sep 2021 - 8:23 pm | शाम भागवत

दुसरा विचार तात्पुरता दाबला जाइल, मारला जाइल…

तुमचा तसा अनुभव आहे का वाचनाधारीत तर्कावर अवलबून आहे हे मला माहित नाही. तरी तुमच्या मतांचा आदर आहे.
पण
माझा तरी तसा अनुभव नाही. नामस्मरणाने मनात येणार्‍या विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची प्रक्रिया सुरू होते. ते योग्य आहेत का अयोग्य आहेत. ते आवश्यक आहेत की नाही. ते थांबवायचे की चालू ठेवायचे की त्यांना फक्त वळण द्यायचे ह्या नंतरच्या प्रक्रिया आहेत. माझा अनुभव तुमच्या अनुभवाशी किंवा तर्काशी जिथे जुळला नाही तेवढ्यापुरतेच लिहिलेय.

पण या कुबड्या अनंतकाळाच्या बंदीवासाची सुरुवात असते

नामस्मरणाने माझ्या गरजा झपाट्याने कमी झाल्या. मी अनेक गोष्टींच्या बंदीवासातून मुक्त झालो असा माझा अनुभव आहे. माणसाचे हवे नको पण याला मी बंदीवास म्हणतो. पण बंदीवास या शब्दाची व्याख्या एखाद्याची वेगळी असू शकते.
यास्तव माझा पास.

सजग राहण्यासाठीचा हा साधा सोपा खात्रीशीर (माझ्या दृष्टीने तरी :) बिनखर्चाचा मार्ग आहे असा माझा अनुभव आहे बॉ. अर्थात माझी अजून वाटचाल चालू आहे. पण त्यासाठी लागणारे बळ मला माझ्या अनुभवातूनच मिळत आहे हे येथे नमूद करून थांबतो.

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 9:15 pm | गॉडजिला

माझ्या मतावर मी ठाम आहे असे नक्कि म्हटलो अस्तो जर माझे मत निव्वळ मत असते… पण नाम हा एक विचार आहे ही वस्तुस्थिती आहे. विचार फक्त भौतीकते मधुन तयार होतात. बस.. याउपर मी जे बोलेन ते आपणास समजणार नाही अथवा पटणार नाही… त्यामुळे विशाद केलेली वस्तुस्थिती ही निव्वळ मत वाटण्याचा भ्रम तयार होणे नक्किच संभव आहे. पण मुळात माझे जर मतच अस्तित्वात नाही तर त्याद्वारे तुमच्या मताचे खंडन तरी मी कसे करु शकेन ? त्यामूळे तुम्हाला मी म्हण्तो ते सत्य की असत्य हे तुमचे मत सोडुनच ठरवावे लागेल. आपल्यात वाद विवाद होउ शकत नाही…

बाकी प्रत्येकाची बंधने व त्यातुन मुक्तता या वेगवेगळ्या बाबी आहेत ज्याला आपण मुक्तता म्हणता ती बाबही एखाद्याला पुरेशी मुक्तता वाटणार नाही… तुमच्या व्याखेतील बंदीवास नामस्मरण थांबवुन देखील अनुभवाला येउ शकतो हे सांगुनही आपणाला ते करवणार नाही कारण तुम्ही नामस्मरणाचे बंदी आहात… ते सोडले तर तुम्ही कासावीसही होउन जाल.

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 9:19 pm | गॉडजिला

माझ्या मतावर मी ठाम आहे असे नक्कि म्हटलो अस्तो जर माझे मत निव्वळ मत असते… पण नाम हा एक विचार आहे ही वस्तुस्थिती आहे. विचार फक्त भौतीकते मधुन तयार होतात. बस.. याउपर मी जे बोलेन ते आपणास समजणार नाही अथवा पटणार नाही… त्यामुळे विशद केलेली वस्तुस्थिती ही निव्वळ मत वाटण्याचा भ्रम तयार होणे नक्किच संभव आहे. पण मुळात माझे जर मतच अस्तित्वात नाही तर त्याद्वारे तुमच्या मताचे खंडन तरी मी कसे करु शकेन ? त्यामूळे तुम्हाला मी म्हण्तो ते सत्य की असत्य हे तुमचे मत सोडुनच ठरवावे लागेल. आपल्यात वाद विवाद होउ शकत नाही…

बाकी प्रत्येकाची बंधने व त्यातुन मुक्तता या वेगवेगळ्या बाबी आहेत ज्याला आपण मुक्तता म्हणता ती बाबही एखाद्याला पुरेशी मुक्तता वाटणार नाही… तुमच्या व्याखेतील बंदीवास नामस्मरण थांबवुन देखील लोप पावलेला अनुभवाला येउ शकतो हे सांगुनही आपणाला ते करवणार नाही कारण तुम्ही नामस्मरणाचे बंदी आहात… ते सोडले तर तुम्ही कासावीसही होउन जाल.

शाम भागवत's picture

12 Sep 2021 - 9:55 pm | शाम भागवत

अरेच्या, तुमची पोस्ट चुकून दोनदा पोस्ट झालेली दिसतेय. खर तर लिहायचं थांबवल आहे.
पण...
मी लिहावं असं कोणी सुचवतंय की काय असं वाटलं. त्यामुळे लिहीतोय.
;)

भगवंताचे नाम आणि विचार या दोन्ही भगवंताच्याच प्रेरणा असल्या तरी त्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
नाम चिदाकाशातून चित्ताकाशात व चित्ताकाशातून भूताकाशात जसंच्या तसं उतरतं.
तर
विचार चित्ताकाशातील संस्कारांनी मलीन होऊन मग भूताकाशात उतरतात.
या संस्कारामधे मी व माझं तसेच हवे नकोपणाच्या अटी, स्मृती वगैरे बरेच काही असतं. पण तत्वज्ञानाची चर्चा एवढीच बास. :)

तुमचे म्हणणे मला पटणार नाही हे तुम्ही सांगितलेच आहे. मी माझे म्हणणे कोणाला पटो म्हणून लिहीतच नाहीये. निव्वळ अनुभवाशी जुळत नसल्यामुळे तेवढ्यापुरतेच लिहीतोय. त्यामुळे सर्व वाचकांवर सोपवून थांबूया.
_/\_

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 10:04 pm | गॉडजिला

आकाशी झेप घे रे पाखरा...

शाम भागवत's picture

12 Sep 2021 - 9:30 pm | शाम भागवत

माझा पास.
काय घ्यायचं काय नाही ते वाचकांवर सोपवलेले बरे.
:)

तुम्हाला मी नामस्मरण थांबवा असे थोडेच सुचवले आहे ? तुम्ही फक्त मी वर सांगितलेला प्रयोग करा म्हणजेच नामस्मरण चालु असताना लक्ष नामाकडे देण्या ऐवजी दोन नामांच्या मधे जो हलकासा कालावधी असतो गॅप असते त्यावर लक्ष द्या... व हळु हळु तो कालावधी वाढवुन बघा ? नामस्मरण चालुच राहील... मी त्याच्या आड येणार नाही.

शाम भागवत's picture

12 Sep 2021 - 10:04 pm | शाम भागवत

ते मला माहीत आहे.
ती एक नामस्मरणाच्या वाटचालीतील अवस्था आहे. त्याचा चित्तशुध्दीशी काहीही संबंध नाही, एवढेच मत व्यक्त करून थांबतो.

पण ह्या अवस्थेबद्दल कोणाला काही सुचवण्याचा मला अधिकार नसल्याने माझा पास.

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 10:10 pm | गॉडजिला

ते मला माहीत आहे.

पटत नाही... पण असो, तुमचे विधान पटले नाही म्हणुन वाचकांना काय फरक पडतो ?

ती एक नामस्मरणाच्या वाटचालीतील अवस्था आहे. त्याचा चित्तशुध्दीशी काहीही संबंध नाही, एवढेच मत व्यक्त करून थांबतो.
मी चित्त शुध्द करा असे कधी म्हणतच नाही तुम्हाला त्याचेही बंधन असेल तर मला त्याची कल्पना नाही.

पण ह्या अवस्थेबद्दल कोणाला काही सुचवण्याचा मला अधिकार नसल्याने माझा पास.
पुन्हा गोंधळ, इथे तुम्ही कोणालाच काही सुचवायचे नाहीये हो... जे सुचवले आहे ते करुन बघायचे आहे.

सुचना:- यापुढे माझा पास, आता सर्व वाचकांवर असे नाही लिहलेत तरी ते लिहले आहे असे आपुलकीने अवश्य समजुन घेउ ;)

शाम भागवत's picture

12 Sep 2021 - 10:11 pm | शाम भागवत

माझा पास.

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 10:16 pm | गॉडजिला

तुमच्या कुठल्याही श्रध्दा न तोडता तुम्हाला काही प्रयोग म्हणून करुन बघा सुचवले त्यासाठीही तुमची तयारी नाही आणी तुम्ही स्वताला बंधनमुक्त मानता...

शाम भागवत's picture

12 Sep 2021 - 10:42 pm | शाम भागवत

अहो, यानंतर शून्यावस्था येते किंवा समाधी अवस्था येते. हे फक्त इश्वर दर्शन आहे.
त्या अवस्थेत नाम सुध्दा शिल्लक राहत नाही. दोन नामाच्या मधले काय शिल्लक राहणार? देहभानच गेल्यावर, काही म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही हो. काय सांगायचं?

यापुढे खरतर अध्यात्म सुरू होतं. चारीमुक्ती मिळवायचे दरवाजे फक्त उघडले जातात. वाटचाल आपली आपल्याला करायला लागते. आपला (खोटा) मीपणा संपवायचा हा पुढचा प्रवास खूप खूप अवघड आहे. यासाठी किती काळ लागेल कोणीच सांगू शकत नाही. पदोपदी परिक्षा असतात.

गुरूकृपेने या अवस्थेचा अनुभव आल्यावर, आता त्या अगोदरच्या अवस्थेमधे मी का रस घ्यावा? संक्षीचा समोर पाहाण्याची पध्दत आहे तशीच ही एक पध्दत आहे. पण ह्या पध्दतीने जी शून्यावस्था येत असली तरी हे अंतीम धेय्य नाही.

कारण समाधी अवस्थेचा अनुभव आला तरी तो माणूस आतून चांगला असतो असे नाही. तर त्याच्यातले दोष व संस्कार काही काळापुरते मनाच्या ताकदीच्या जोरावर बाजूला होतात व समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर परत त्याच्यावर स्वार होतात. परत मी माझ्या ताकदीवर काहीतरी मिळवलं असं वाटू लागल्याने अहंकार कमी व्हायच्या ऐवजी वाढतो.

हीच गोष्ट न कळल्याने चांगदेवांची प्रगती खुंटली होती.
असो.

काही म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही हो. काय सांगायचं?

हेच पुन्हा पुन्हा सांगायचे की नामही शिल्लक रहात नाही.

गुरूकृपेने या अवस्थेचा अनुभव आल्यावर, आता त्या अगोदरच्या अवस्थेमधे मी का रस घ्यावा?

गुड वेरी गुड. आता गुरु़कृपा सोडुन या अवस्थेचा अनुभव येउ लागला की समजा अहंकार विसर्जीत झाला.. गुरु हवा कारण भय आहे (घसरण्याचे), आणी भय आहे म्हणजे अहंकार अजुनही ठणठणीत आहे...

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 11:02 pm | गॉडजिला

स्वनुभवातुन नाही तरी कीमान गुरुकडुन आपणास कळले असेल्च निराहंकारी व्यक्ती ठाम असतो तर अहंकारी व्यक्ती भयभीत वा अरेरावी करणारा असतो...

शाम भागवत's picture

12 Sep 2021 - 11:05 pm | शाम भागवत

ज्यांच्यासाठी सांगायचंय ते सगळं सांगून झालंय.
आता मात्र पास.
:)

गॉडजिला's picture

12 Sep 2021 - 11:15 pm | गॉडजिला

खरे तर तुम्ही मलाच सांगत आहात आणी मी तुम्हाला... तुमच्या खांद्यावर कोणाची बंदुक असेल तर मला ज्ञान नाही मी मात्र तुम्हालाच सांगतोय आणी तुमच्यासाठीच सांगतोय.

हां तर सांगायचा मुद्दा हा आहे की, असो भागवत साहेब मी थोडी गम्मत केली तुमची एक माणुस म्हणुन
सत्य हे आहे की तुम्हाला भय वगैरे अजिबात नाही आहे हो, तुमच्याकडे नॉलेज आहे
तुम्ही रस्ता क्रॉस करताना अचानक तुमचे लक्ष नसताना गाडी आडवी आली तर जे मागे हटणे होते त्याला भय म्हणतात...
तुम्ही रस्ता क्रॉस करताना तुमचे लक्ष असताना गाडी आडवी आली तर जे मागे हटणे होते त्याला नॉलेज असे म्हणतात...

क्रुती मागे हटण्याचीच जरी घडत असली तरी एक कृती भयातुन घडली आहे आणी दुसरी ज्ञानातुन... भय न्हवे नॉलेज कामी येते. आयुष्यातही हेच तत्व वापरायचे आहे... क्रुती भयातुन न्हवे ज्ञानातुन झाली पाहिजे.

गुरुकृपेने आपली भयाची न्हवे ज्ञानाची अवस्था सुरु झाली आहे आणी उत्तरोत्तर ती वाढत जाउन आपल्याला हवे असलेले लक्ष साध्य होवो याच माझ्या आपल्याला मनापासुन शुभेछ्चा आहेत.

_/\_

थांबतो... (वाढला विषय तर बोलतो)

शाम भागवत's picture

12 Sep 2021 - 11:44 pm | शाम भागवत

मी कोणालाच काही सांगत नाहीये. खरतर मी माझेच अनुभव मला सांगतोय. त्याचबरोबर नामस्मरण करणारा कोणितरी असल्यास त्याला फायदा होईल हा सुप्त हेतू आहेच.

खरा मी काय असतोय ते कळलंय. पण एवढंच कळणं पुरेसे नाहीये. तर माझा खोटा मी किती घट्ट आहे हे कळणं जास्त महत्वाचे असते. ते लक्षात आलंय. हा खोटा मी कमी करण्यासाठी आता मी नामस्मरण करतोय.
समाधीअवस्था शून्यावस्था वगैरे मिळवण्यासाठी नाही.

पूर्वीच्या अप्रिय आठवणी त्यामधे खोडा घालत होत्या. त्यावर मात करण्याबद्दल मागे लिहिलेले आहेच.

आपला मीपणा पदोपदी घुसखोरी करत असतो. त्याला दादापुता करून, समजावून सांगून शांत करायला लागत असते. ह्यालाच धारणा म्हणतात. शून्यावस्था प्राप्त करणं त्यामानाने सोपं आहे हो. शांत डोळे मिटून बसायच असतं. कशावर तरी लक्ष ठेवायचे असते. जमून जाते. सत्गुरू कृपेने हे झाले तर हे जमत असताना अहंभाव वाढत नाही. सत्गुरू ती काळजी घेतात. पण जागेपणी ह्या धारणेत जगायचं फार कठीण. ते आपले आपल्यालाच करायला लागते. तितिक्षा ही तर फार फार अवघड असते. तक्रार न करता जगायचे हे काही खायचे काम नाही.
असो.

माझ्या सर्वांनाच शुभेच्छा आहे. त्यात तुम्ही पण आलात.
🙏

आता थोडेसे धाग्याच्या विषयाबाबत,
मला वाटते संसारात आपल्याला जे काही मिळतं ते त्यागाने मिळते. काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. हा व्यवहार आहे. यासाठी प्रत्यक्ष जमले नाही तरी मनाने तरी देण्याची सवय लागली पाहिजे.
यासाठी जीवनविद्येची विश्वप्रार्थना सर्वोकृष्ट आहे. रोज एक तास या पध्दतीने पहिला अनुभव यायला सहा महिने लागतात.
सुदैव वाढवण्यासाठी प्रार्थना हा एक खात्रीशीर, सर्व संतांनी मान्य केलेला बिनखर्चाचा असा किफायतशीर मार्ग आहे.
नामस्मरण कसे काम करत हे कळण्यामधे बरीच वर्षे खर्च होऊ शकतात. मात्र त्यामानाने विश्वप्रार्थना लवकर फळते.
त्यानंतर मात्र पुढची प्रगती नामस्मरणाने होते. यासाठीच विश्वप्रार्थनेतील शेवटचे वाक्य महत्वाचे असते.
असो.
🙏

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 5:46 am | गॉडजिला

मी देखील मलाच सांगतोय... पण खरे तर इथेचं थांबावे वाटत होते थांबणारही होतो पण झालं काय की कोणीतरी मला लिही अशी प्रेरणा देत असल्याने अचानक लेखणी सुरु झाली आहे यामागे माझ्यातील मी आजिबात नाही याची नोंद जाणकारांनी अवश्य ठेवावी...

मी समाधी/ शुण्यावस्था वगैरे बाबत काही इथे लिहलेच नाही... तो तुमच्या गुरूज्ञानातून माझ्याबाबत आपल्या मनात तयार झालेला कचरा असेल तर कल्पना नाही... मी फक्त एक अतिशय आनंदायी अवस्था इतकेच विधान केले आहे त्यामूळे मला कळत नाही मला प्रतिसाद लिहताना तूम्ही भलेही स्वतःसाठी लिहीत असाल (खीक्क) तरीहि तूम्ही ज्या विधानाशी माझी चर्चा नाही ती का घुसडत आहात ?

गुरुची महानता अन कौशल्यातला मोठेपणा यात बहुसंख्य शहाण्यांनी फार मोठा अनावश्यक गोंधळ केला आहे आपणही त्याचे बळी आहात...उत्कृष्ट गुरू कोण जो विषय व्यवस्थित सामावून देतो तो की जो विषयात अधिकारी असतो तो ? दोन्ही गोष्टी एकत्र मिळत नाहीत त्याचा हव्यास नको....

जसे आचरेकर सर विषय व्यवस्थित समजावून सचिनला घडवले पणं ते स्वतः कधीच शतकांचे शतक करु शकले नाहीत... उत्कृष्ट गुरु तोच ज्याचा चेला त्याच्यापेक्षा पुढे असतो. मागे न्हवे.

बाकी हे मी मलाच सांगत आहे कोणितरी लिही अशी प्रेरणा दिली म्हणून सांगत आहे... तूम्ही मनावर घेऊ नका

शाम भागवत's picture

13 Sep 2021 - 7:36 am | शाम भागवत

:)

शाम भागवत's picture

12 Sep 2021 - 11:06 pm | शाम भागवत

ज्यांच्यासाठी सांगायचंय ते सगळं सांगून झालंय.
आता मात्र पास.
:)

विटेकर's picture

15 Sep 2021 - 12:15 pm | विटेकर

दोन नामांच्या मधला कालांश हळू हळू वाढवत नेणे.. आणि नामस्मरणाने मला खूप छान वाटतंय असे सतत म्हणत राहायचे ..Fake it to make it.

वाईट नकोसा विचार आला कीं आपोआप नामस्मरण चालू होते ..Auto imune होऊन जातो मनुष्य , लै भारी !

आवडणारे कोणतेही नाव घ्यायला सुरुवात करायची ...अगदी कोणतेही ...अनुग्रह, जपमाळ , आसन , प्रतिमा याच्या अवदंबराची गरज नाही. इथे बसलोय, बोटे काम करताहेत, आता गजर चालू करता आला पाहिजे ...२४ तासात कधीही ...हा प्रॅक्टिसचा भाग आहे.

नाम हे शेवटी आलंबन आहे , छत्रीसारखे ! घरी पोचलो की छत्री दारात काढून मग आत घरात जायचे !

नामस्मरणाबद्दल थोरामोठ्यांनी इतकं सांगून ठेवलंय की आणिक काय भर घालणार? पण त्याबद्दल इतक्या उपहासानं वगैरे लिहायची काहीही गरज नाहीये.
ज्याला जो उपाय पटतो तो घेतो आणि प्रयत्न करतो. ते विचार बदलणारे आपण कसे असू?
याच धाग्यात अनेकांनी वेगवेगळे उपाय सुचवलेले आहेत, त्याबद्दलही बोलता येईलच की.

प्रसाद गोडबोले's picture

13 Sep 2021 - 1:37 am | प्रसाद गोडबोले

सॉलिड उपाय
>>> मी काय बोलु ? सगळं आधीच सांगुन ठेवले आहे संतानी ! संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, काय म्या पामरे जाणावे हे |

तरीही त्यातल्यात्यात आपण सांगितलेल्या समस्येवरील मला कळलेला उपाय नित्यनेम !
श्रवण आणि मनन | ह्या ऐसे नाही साधन | म्हणोनि हे नित्य नूतन | केले पाहिजे ||

रुटीन हाच सॉलिड उपाय ! जसं आपल्याला कोणीही न सांगता आपण सकाळी उठल्यावर दात घासतो, जेवण झल्यावर हात घासतो, किंव्वा ऑफिसचा लॅपटॉप उघडुन सगळ्यात पहिल्यांदा ई-मेल चेक करतो किंव्वा ३० तारखेला न चुकता सॅलरी आणि बॅलन्स चेक करतो , अशा अनेक गोष्टी आहेत , प्रत्येकासाठी भिन्न भिन्न असु शकतील पण माझ्याकरिता ह्या इतक्या बेसिक गोष्टी आहेत की केल्या नाहीत तर मला हुरहुर लागते , इतक्या सहजपणे नामस्मरण व्ह्यायला हवे ! परिस्थीती कशीही असो, कशीही , स्मरण चुकायला नको !

हेचि दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा !

एकदा हे जमले की अनुकुल प्रतिकुल, सुदैव दुर्दैव , सुख दु:ख असे काही नाही !

अशा पुरुषाची स्थिती नाथांनी सुंदर वर्णन करुन ठेवली आहे :

गृहस्थाश्रमु न सांडीता | कर्मरेखा नोलांडिता |
निजव्यापारी वर्तता | आत्मबोधु सर्वथा न मैळे ||

__/\__

प्रगो भाऊंचा सल्ला एक नंबर.
आणखी एक सुचवू इच्छिते.
तुम्हाला जे हवंय ते यथाशक्ती इतरांना देत रहा. 'दाता' व्हा. मग जे पेराल तेच परत मिळेल. स्नेह, सुदैव वाटत रहा, कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते परत तुमच्याकडे येईल. हा प्रकृतीचा नियम आहे. चुकणार नाही. पूर्वसुरींनीपण सांगितले आहे..करावे तसे भरावे. कुणी सांगावे, याच जन्मी मिळेल सगळे केलेले सुकृत, सुदैव बनून तुम्हाला !
शुभेच्छुक,
स्नेहा

सुमित्रा's picture

15 Sep 2021 - 4:16 pm | सुमित्रा

असल्यामुळे माझे दोन आणे.
मी तुम्ही जे काही तुमचे अनुभव लिहिले आहेत त्याला रिलिव्हंट रिप्लाय देते आहे. तुम्ही खूप निश्चय करूनही जर नामस्मरणणामध्ये खंड पडतो आहे तर सस्नेह यांनी सांगितलेला सल्ला at full swing अंमलात आणा. regularly, mechanically जे कोणी खरंच गरजू आहेत त्यांना मदत करत रहा. आणि तुमचं जे काही आवडतं नामस्मरण आहे तेही करत रहा. दोन्ही गोष्टी खुप महत्वाच्या आहेत. आणि तो जो चांगल्या सवयींचा नियम आहे, की तुम्हाला एखादी सवय स्वतःला लावायची असली की रोज ती अगदी थोड्या प्रमाणात का होईना, करायचीच. (उदा. मला सुर्यनमस्कारांची सवय लावायची होती. मग मी ज्या दिवशी वेळ नसेल तेव्हा at least दोन सुर्यनमस्कार 'आट्पून टाकते'. तीन मिनिटं लागतात. ) असेही उद्योग करा, नामस्मरण आणि मदत यांची सवय लागण्यासाठी. तुमची जर ईच्छ्हा इइच्छा ईच्छा आहे तर तुम्हाला मार्ग नक्की सापडेल.
शुभेच्छा :-)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Sep 2021 - 10:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भलताच गंभीर विषय निवडलास रे उपयोजका. आयुष्य हा एक प्रवास आहे. ह्या प्रवासात समस्या अगदी आयुष्याच्या अखेर्पर्यंत असणारच आहेत हे मानून चालावे. आपल्यासारखे असंख्य आहेत, आपल्यापेक्षा काही सुदैवी असणार आहेत तर काही दुर्दैवी.
खरचटले तर फ्रॅक्चर झाले नाही म्हणून सुदैवी समजावे.
फ्रॅक्चर झाले तर मरण आले नाही म्हणून सुदैवी समजावे.

सुबोध खरे's picture

12 Sep 2021 - 11:04 pm | सुबोध खरे

मुळात दैव हि गोष्ट जी आपल्या हातातच नाही, ती आपल्याला वाढवता कशी येईल, मग ते सुदैव असो कि दुर्दैव

बाकी चालू द्या

जे गरजेचे आहे ते सहज मीळणे, जे हवे आहे त्यासाठी सन्धी साधणे. ह्या दोनही गोश्टी भीन्न आहेत.
काही गोश्टी आपल्याला सहज मीळतात त्यान्चे वर्गीकरण करून प्रमाण ५० टक्के मानले तर
काही गोश्टी आपल्याला सहज न मीळणे ह्यान्चे वर्गीकरण उरलेले ५० टक्के होवू शकते.
.
अ) ज्या गोश्टी सहज मीळतात (५० टक्के)
- त्यातील ५० टक्के गोश्टी आपण आपल्या अजाणतेमूळे त्या धरून ठेवता येत नाही म्हणून गमावून बसतो. (२५%)
- तसेच ५० टक्के गोश्टी प्रकृती नीयमनामूळे त्यान्चा नाश होत राहतो, गमावून बसतो. (२५%)
.
ब) ज्या गोश्टी आपल्याला सहजपणे न मीळू शकण्याच्या वर्गात येतात (५०%)
- त्यातील ५० टक्के गोश्टी आपल्याला मीळूच शकत नाहीत, आपण त्या गोश्टी मीळवीण्याच्या पात्रतेचे नसतोच.
अशा बाबतीत त्या गोश्टी न मीळाल्याचे दूख न करणे तसेच अशा गोश्टीन्ची आस धरणे देखील योग्य नसते. (२५%)
- शेवटच्या उरलेल्या २५% भागात प्रयत्न करणे असते. त्यातही स्वतःहासाठी धोका पत्कारायचा की इतरान्साठी धोका पत्करायाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न!

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 7:13 am | गॉडजिला

बाकी उपाय कामी येत नाहीत… ९०% दुर्दैव आपलीच मानसिकता निर्माण करते १०% मात्र खरे अपघात असतात…
स्म्रुतीच्या सर्व बंधनातुन मुक्त व्हा भविष्याच्या स्वप्नरंजानात वेळ खर्च करु नका…
काळ हे सर्वात मोठे पण कृत्रिम बंधन आहे जे आपण मोडायला हवे भौतीक महत्वाकांक्षाच न्हवे तर अगदी जिव आणी शिव यांच्या मिलनातही अडथळा ना प्रयत्नांचा आहे ना भाग्याचा… ना श्रध्देचा. अडथळा आहे तो फक्त काळाचा पण त्याला अवास्तव महत्व देउ नका सबकुच मजामा होउन जाइल..

How to Get Lucky and Stay Lucky

  1. Position yourself. The first step toward improving your luck is to acknowledge that luck exists. ...
  2. Plan, but be ready to bail. ...
  3. Remember, luck comes and goes. ...
  4. Don't take the blame. ...
  5. Go where luck resides. ...
  6. Stick your neck out. ...
  7. Never say anything's 100 percent sure. ...
  8. Don't push it.
प्रकाश घाटपांडे's picture

13 Sep 2021 - 3:42 pm | प्रकाश घाटपांडे

मला चर्चा अगम्य वाटते. पण ते असो. नामसमरण म्हणजे नेमके काय? नामस्मरण व जप यात काय फरक आहे? श्रद्धाळू माणसाला नामस्मरणाने मानसिक शांतता लाभेलही पण त्यामुळे सुदैवाचे प्रमाण कसे वाढेल. प्रयत्न करुन वाढते ते दैव कसे?

नामस्मरण व जप यात काय फरक आहे? श्रद्धाळू

नमस्मरण जप बनु शकते पण जप म्हणजे नमस्मरण नाही… फार नाही पण फरक आहे असे मला वाटते तज्ञांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

प्रयत्न करुन वाढते ते दैव कसे?
:) प्रयत्नाने दैवात बदल होतो की नाही हा फार सुरेख मुद्दा उचलला आहे माझे नीरीक्षण तुर्त जाणकारांच्या प्रतिसादासाठी राखुन ठेवतो… छान मुद्दा आहे चांगली चर्चा व्हावी यावर

कॉमी's picture

13 Sep 2021 - 5:00 pm | कॉमी

सेल्फ काँट्रॅडिक्शन होईल की, काहीतरी करून जर दैव बदलता येत असेल तर. आजवरचा समज होता आपल्या हाताबाहेर असणाऱ्या गोष्टींचा वर्ग म्हणजे दैव.☺️

कॉमी's picture

13 Sep 2021 - 5:03 pm | कॉमी

हि इमोजी कुठुन आली ब्वा ? मी तर नाही टाकली!
- (बुमर मनःस्थितीतला) कॉमी

दैव ह्या शब्दाचा अर्थ च खूप व्यापक आहे प्रयत्न करणे न करणे ही भावना निर्माण होणे ही पण दैव चीच बाब आहे.

हा हा हा.. चांगला विषय आहे. पण जे प्रश्न आणि मुद्दे तुम्ही मांडले मांडले आहेत, त्यात स्वतःतच विरोधाभास आहे.

तुम्ही म्हणता -
आपल्या जीवनात..
आणि लिहितांना मुद्दा मांडता -
एखाद्याचे सुदैव हे कदाचित दुसर्‍याचे दुर्दैव किंवा अटळ असा तोटा/नुकसान असू शकतं. एखाद्याला मिळालेली चांगली संधी ही दुसर्‍याचं मन खट्टू करु शकते.

जर केवळ स्वतःचा विचार करायचा तर मग दुसर्‍यांसाठी मनाला चुटपुट का लावून घ्यावी? :-) असो.

-----------

दैव बदलणं वगैरे फार व्यक्तिगत मुद्दे झालेत. दैव बदललंय किंवा नाही हे सुद्धा कुणी सांगू शकणार नाही, कारण त्यासाठी आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलंय ते माहित असायला हवं.

माझ्यामते आपण जगतांना कसे जगतो याकडे बघावं, आत्मपरिक्षण करत रहावं. कोण काय म्हणाला यापेक्षा, आपल्याला काय वाटतं त्याकडे लक्ष देणं जास्त योग्य होईल. मागे एका धाग्यात खालील विचार मांडलेला होता, तो नमूद करावा म्हणतो -

खरंच, आपण आपल्या छोट्याशा आयुष्यात काय केलं आजतोवर.. असा विचार करून बघीतलं तर..?
त्याही पलिकडे जाऊन, आपल्या आयुष्यातल्या चांगल्या/आनंदी आठवणी किती.. असा विचार केला तर?
सामान्यतः माणसाला आपल्या दु:खद आठवणी जास्त लक्षात राहतात. कारण सुप्त मनात त्या बर्‍यापैकी जागृत असतात. आनंदी आठवणी त्यामानानं कमी लक्षात राहतात. कमी जागृत असतात. पण म्हणजे, सुख-दु:खाचा समतोल हा नेहमी दु:खाच्या बाजूनंच कललेला असतो काय?

मला वाटतं सामान्यतः आनंदी घटनांना, त्या घडत असतांना, आपण पुरेसं recognize [मराठी?] करत नाही. जेवढं दु:ख आपण मनाला लावून घेतो, तेवढं महत्त्व आपण आनंदाला देत नाही. किंबहुना, दु:खच लक्षपूर्वक उपभोगल्या जातं.. सुख/आनंद तेवढ्या प्रमाणात नाही.
आता ज्या घटनांना, त्या घडत असतांनाच आपण तेवढं महत्त्व देणार नाही.. तर त्यांना सुप्त मन तरी कशाला तेवढं महत्त्व देईल? :-)

जर आनंदी/घटना प्रसंग. आपण जाणीवपूर्वक उपभोगले आणि दु:खी घटना/प्रसंग दुर्लक्षीत ठेवले तर...? हा दॄष्टिकोनातला बदल आहे आणि त्याला वेळ लागणारच. चांगलंच बघायचं वळण मनाला लावणं म्हणजे हेच असावं.. अर्थात् याचा अर्थ असा अजिबात नाही की दु:खद गोष्टी सरळ सोडून द्यायच्या.. पण मनाला त्यातूनही, जेवढं जमेल तेवढं, चांगलं काय ते शोधायला लावत राहायचं.
जरी अजूनही पुरेसं जमलेलं नाही तरीही, ही सवय खूप मोलाची ठरते एवढं मात्र मी स्वानुभवावरून सांगू शकतो.

जर असा बदल आपल्या दृष्टीकोनात आपल्याला करता आला तर, आयुष्य बरंच चांगलं होऊ शकेल.. आपलंही आणि आपल्या आजुबाजूच्या इतरांचंही, नाही?

तसंही तुकाराम महाराजांनी सांगीतलेलंच आहे - "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण.." :-)

उपयोजक's picture

13 Sep 2021 - 7:36 pm | उपयोजक

अध्यात्माची भाषा जडबंबाळ असल्याने नामस्मरण आणि अध्यात्माचा संबंध मला काही समजला नाही. पण नामस्मरणाचा फायदा मानसशास्त्रीय स्वरुपात कसा होतो ते या लेखात वाचा.
----------------------------------------------------------------------------------
स्मरण - विस्मरण

नामस्मरणाचं महत्त्व प्रत्येक धर्मगुरूंनी , सर्वांना पटवलं आहे . वैखरीवाटे प्रकट होणारे नाम ' अगदी अंतरात्म्यापासून आलं पाहिजे , याचा आग्रह धरला आहे . आपल्या आराध्यदैवताचं गोड नाव असो की आपापल्या गुरूंनी कानात सांगितलेले मंत्रात्मक नाम असो . ज्यानं त्यानं मुखात परमेश्वराचं नाव धारण केलं पाहिजे , असा उपदेश केला जातो . सर्व पिढ्यांतल्या काही आबालवृद्धांना नामस्मरणाची महती पटते असं नाही , तर त्यांना ते आचरणातही आणता येते . आपापली अत्यंत जिकिरीची आणि जटिल काम पार पाडताना मनातल्या मनात नामस्मरण करीत राहण्याची तारेवरची कसरत ' त्यांना जमते . खरंच , अशा मंडळीचं कौतुक वाटतं . परंतु सर्वसामान्य माणसांना ते जमतंच असं नाही . पटतं ; पण वर्तनात वठत नाही . कळतं ; पण वळत नाही . तर काही विलक्षण चिकित्सक शास्त्रीय विश्लेषण करू इच्छिणाऱ्या शिक्षित लोकांना ते आवडलं तरी पटतंच असं नाही . त्यांना असं नामस्मरण अनाठायी आणि अवडंबर आहे असं वाटतं . अशा लोकांसाठी काही विश्लेषण ! मानसशास्त्रानुसार मनाची एकाग्रता म्हणजे एखाद्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करणं . असं अवधान खरोखरंच एकाग्र असतं . स्मरण करताना त्या एकाच संवेदनेवर अथवा मनांतर्गत विचारावर लक्ष केंद्रित होतं . त्या एकाग्रतेनं मानसिक शक्ती एकवटण्याची क्षमता मनात निर्माण होते . मनाला लक्ष एकाग्र करण्याचं प्रशिक्षण मिळतं . अशा प्रशिक्षणाचा आपल्याला खूप फायदा होतो . पण नामस्मरणाच्या उपयुक्ततेचं रहस्य पुढे आहे . आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप
विस्मरणाची प्रक्रिया सुरू होते . चक्रावलात ना ? मनामध्ये असंख्य विचार असतात . काही होकारात्मक , काही नकारात्मक . ( काहींच्या बाबतीत नकारात्मक अधिक ) नामस्मरण होकारात्मक असतं , अशा होकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते जमू लागलं की आपोआप नकारात्मक विचारमालिकाचं विस्मरण होतं . होकारात्मक विचारांची मनात स्थापना होते . नकारात्मक विचारांना गच्छन्ती मिळते . ते विचार मनातून मावळतात . होकारात्मक विचारातून सद्गुणांवर विश्वास निर्माण होतो . त्या विश्वासातून ' आशा ' जन्म घेते . आशा म्हणजे उत्साहित मन , प्रसन्न मन ; प्रफुल्ल मन ! आहे की नाही गंमत !! तुमची माझी !!!

डॉ.राजेंद्र बर्वे

लेखक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत.

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 7:55 pm | गॉडजिला

अगदीच आकाशातून नाम मनात येते (मग आकाशात कुठून येते हा प्रश्न उरलाच) वगैरे वगैरे पेक्षा हे जास्त सुटसुटीत सोपं स्पष्टिकरण आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Sep 2021 - 9:19 pm | प्रकाश घाटपांडे

मी याकडे माईंड डायवर्टिंग टेक्निक या दृष्टीने उपयुक्तता म्हणून पहातो. मी ते वापरल आहे.

शेवटी दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. आजच्या काळांत गरीब मनुष्याला ज्या सोयी सुविधा उपलब्द आहेत त्या १०० वर्षे आधी श्रीमंतांना सुद्धा उपलब्ध नव्हत्या. ३०० वर्षे आधी तर मोठ्या बादशहाना सुद्धा उपलब्ध नव्हत्या.

गॉडजिला's picture

14 Sep 2021 - 10:20 am | गॉडजिला

व्यक्तिच्या जिवंत काळातिल घटना व अनुभव यांपुरता मर्यादीत असल्याने आजच्या काळातील गरीबाच्या हाताशी असलेल्या अनेक गोष्टी ३०० वर्ष आधि बादशहास उपलब्ध्द नसुनही तो बादशाहाच राहतो व गरीब गरीबच.

खिलजि's picture

14 Sep 2021 - 6:55 pm | खिलजि

तुमच्याकडे जे जे आहे , ते दररोज सकाळी उठल्यावर शाबूत आहे कि नाही ते बघा ... हात पाय जागेवर आहेत , नीट हलतायत .. मग त्या वर्च्याचे आभार माना आणि सुदैवी समजून कामाला लागा ... है काय आणि नाय काय .. जरुरत से ज्यादा और जरुरत से कम .. दोनो जहर होता है ,, ठाकूर ....

उपयोजक's picture

15 Sep 2021 - 7:31 pm | उपयोजक

Savay

कॉमी's picture

15 Sep 2021 - 7:51 pm | कॉमी

What about the two things I do regularly ?
:)

प्रसाद गोडबोले's picture

16 Sep 2021 - 11:08 am | प्रसाद गोडबोले

बेक्कार चित्र आहे , त्या माणसाला मूळव्याध झाला असे वाटत आहे =))))

@ मार्कस ऑरेलियसः मूळव्याधीचे अगदी नेमके चित्रण बघून हहपुवाझा. अगदी नेमके पकडलेत. जियो.

काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात हे नक्की .. अशा random म्हणजे अनियंत्रित गोष्टी कधी आपल्याला अनुकूल असतात तर कधी प्रतिकूल. या अनियंत्रित व random घटकांना कुणी नशिबाचे , दैवाचे फासे म्हणू शकेल, कुणी लक फॅक्टर म्हणेल. पण अर्थ बहूधा तोच.
मला वाटते हे घटक अनियंत्रित वा random असतात म्हणूनच त्यांना नशिबाच्या गोष्टी वा दैव म्हंटले जाते. मग या घटकांना नियंत्रित थोडेच करता येणार आहे ? पण या अनियंत्रित घटकांची प्रतिकुलता कमी करणे वा अनुकूलता वाढवणे याकरिता विचारपुर्वक प्रयत्न केले जावू शकतात.
आपण सोपे उदाहरण घेवू. अलिकडे मोबाईल अ‍ॅपमुळे लोकप्रिय झालेला ल्युडो हा खेळ अनेकजण खेळले असतील (मागच्या लॉकडाउनमध्ये या अ‍ॅपची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.. असो). तर त्यात फासा फिरवल्यावर १ ते ६ पैकी कोणता अंक यावा हे आपल्या हातात नसते. आपल्याला हवा तो अंक येईलच याची खात्री नसते. पण मग आपल्या हातात काय असते ? तर आपल्याकडे ४ सोंगट्या असतात, यापैकी कोणती सोंगटी पुढे न्यायची कोणती थांबवायची, स्वतःची सोंगटी कशी सुरक्षित करता येईल ते बघायचे, इतर खेळाडूंच्या सोंगट्यांची स्थिती लक्षात घेवून जोखीम कमी करायची ई ई.. मला वाटते आपल्या जीवनाचे ही काहीसे तसेच आहे. ज्या गोष्टी नियंत्रित करणे आपल्याला शक्य नाही त्यावर नियंत्रण करण्याकरिता वृथा धडपडण्याऐवजी ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत त्यांचा यथोचित उपयोग करणे अधिक महत्वाचे.
पाऊस पडेल की नाही हे आपल्या नियंत्रणात नाही - महत्वाच्या कामाकरिता बाहेर पडताना पाऊस पडू नये म्हणून काही प्रार्थना, उपासना, जप करुन उपयोग होणार नाही. पण पावसाचा अंदाज वाचून त्याची शक्यता जोखणे, पाउस पडलाच तर भिजण्यापासून स्वतःचा बचाव करण्याकरिता छत्री वा रेनकोट सोबत बाळगणे, पावसामुळे होणारे ट्रॅफिक जॅम लक्षात घेवून लवकर घराबाहेर पडणे, योग्य ते वाहन वापरणे ई गोष्टी आपण करु शकतो.

उपयोजक's picture

16 Sep 2021 - 6:17 pm | उपयोजक

छान प्रतिसाद

शाम भागवत's picture

17 Sep 2021 - 5:53 pm | शाम भागवत

हेच म्हणतो.

तर्कवादी's picture

20 Sep 2021 - 5:23 pm | तर्कवादी

उपयोजक जी, शाम भागवत जी

मूळ प्रश्न असा आहे:
आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का?
उत्तरः नाही.
कारणः मुळात 'दैव' (सुदैव असो की दुर्दैव असो) या शब्दातून '...जे आपल्या प्रयत्नांच्या पलिकडले, न बदलण्यासारखे, ज्यावर आपला कहीच ताबा नसतो - असे जे काही असते ते...' असा अर्थ ध्वनित होत असल्याने त्यात करण्यासारखे काही असू शकत नाही.

गॉडजिला's picture

17 Sep 2021 - 7:52 am | गॉडजिला

आपण फक्त त्याचे परीणाम कमी जास्त करणे अथवा कसे सामोरे जावे हे ठरवु शकतो

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Sep 2021 - 10:03 pm | अनिरुद्ध.वैद्य

पितृपंधरवडा सुरू होताच आहे!

hrkorde's picture

29 Sep 2021 - 12:10 pm | hrkorde

सर्वाना ३ फळे भोगावी लागतात

क्रियमाणाचे फळ
सन्चिताचे फळ
प्रारब्धाचे फळ

फक्त पहिले फळ आपण थोडेफार बदलु शकतो, आणि क्रियमाणच चांगले करत राहिले तर भविश्यात त्याचे सण्चित फळ चांगले मिळते.

बाकी सर्व बियोन्ड आवर कंट्रोल आहे

क्रियमाणाचे फळ सन्चिताचे फळास कारणीभुत होते बरोबर ?
अन सन्चिताचे फळ प्रारब्धाचे फळास ?

मग क्रियमाणाचे फळ म्हणने पुरेसे नाही काय ?

hrkorde's picture

29 Sep 2021 - 12:25 pm | hrkorde

प्रारब्ध हे क्रियमाण , संचित कशावरच अवलंबुन नसते,

गॉडजिला's picture

29 Sep 2021 - 12:28 pm | गॉडजिला

?..

उपयोजक's picture

17 Oct 2021 - 7:09 pm | उपयोजक

असते का? काही वैज्ञानिक पुरावे? शिवाय या हिंदू अध्यात्मातल्या संज्ञा आहेत. तुम्ही यावर विश्वास ठेवता हे आश्चर्य आहे.