..ठाऊक नाही

Primary tabs

राघव's picture
राघव in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 am.. ठाऊक नाही!

संवादावे कसे? उभयतां ठाऊक नाही!
संवादाचा वाद कशाला? ठाऊक नाही! 🙂

तिच्याचसाठी सर्व करावे.. आंस मनातील!
सर्वव्यापी ती उर्मी कुठली? ठाऊक नाही! 😎

प्रेमासाठी झुरणे म्हणजे प्रेम म्हणावे??
प्रेमाचा मज अर्थ मुळातच.. ठाऊक नाही! 😏

धरणीसाठी अमृत होतो पाऊस, तेव्हा..
कधी संपला विरहग्रीष्म, तिज ठाऊक नाही! 😊

तेल-वातीच्या जळण्यामधुनी ज्योत तेवते..
पतंगांचे महत्त्व तिज मग.. ठाऊक नाही!! 🔥

प्रत्येकाचा कृष्ण, मनांतील, सांगत असतो..
ईश-प्रेमाला अंतर कुठले ठाऊक नाही!! 😇
--
रतीब आहे शब्दांचा पण अर्थ निसटतो..
ह्या कवितेला शब्द बंधने.. ठाऊक नाही! 😉


प्रतिक्रिया

प्रत्येकाचा कृष्ण, मनांतील, सांगत असतो..
ईश-प्रेमाला अंतर कुठले ठाऊक नाही!!

मस्त

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 10:37 pm | टर्मीनेटर

@राघव

'..ठाऊक नाही'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 6:29 pm | प्राची अश्विनी

क्या बात!

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 6:30 pm | प्राची अश्विनी

क्या बात! तुमचं नाव पाहिल्यावर कविता सुंदर असणारच याची आधीच खात्री होती.

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 12:22 pm | चौथा कोनाडा

सुंदर !

धरणीसाठी अमृत होतो पाऊस, तेव्हा..
कधी संपला विरहग्रीष्म, तिज ठाऊक नाही!

वाह, क्या बात हैं !

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2020 - 12:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

आणि इमोजींचा वापरही आवडला
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 12:59 pm | चौथा कोनाडा

मला फार काही रुचला नाही.
😒

रचना सशक्त असल्यामुळे इमोजींची आवश्यकता नव्हती असं मला वाटतं

नवीन प्रयत्न करून पाहिला इतकंच! :-)

सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार! तुमचे प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला!

प्रचेतस's picture

2 Dec 2020 - 9:10 am | प्रचेतस

खूप सुरेख.
अतिशय आवडली.