Skip to main content

..ठाऊक नाही

लेखक राघव यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

.. ठाऊक नाही!

संवादावे कसे? उभयतां ठाऊक नाही! संवादाचा वाद कशाला? ठाऊक नाही! 🙂 तिच्याचसाठी सर्व करावे.. आंस मनातील! सर्वव्यापी ती उर्मी कुठली? ठाऊक नाही! 😎 प्रेमासाठी झुरणे म्हणजे प्रेम म्हणावे?? प्रेमाचा मज अर्थ मुळातच.. ठाऊक नाही! 😏 धरणीसाठी अमृत होतो पाऊस, तेव्हा.. कधी संपला विरहग्रीष्म, तिज ठाऊक नाही! 😊 तेल-वातीच्या जळण्यामधुनी ज्योत तेवते.. पतंगांचे महत्त्व तिज मग.. ठाऊक नाही!! 🔥 प्रत्येकाचा कृष्ण, मनांतील, सांगत असतो.. ईश-प्रेमाला अंतर कुठले ठाऊक नाही!! 😇 -- रतीब आहे शब्दांचा पण अर्थ निसटतो.. ह्या कवितेला शब्द बंधने.. ठाऊक नाही! 😉



वाचने 11169
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया


@राघव

'..ठाऊक नाही'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


क्या बात! तुमचं नाव पाहिल्यावर कविता सुंदर असणारच याची आधीच खात्री होती.

सुंदर ! धरणीसाठी अमृत होतो पाऊस, तेव्हा.. कधी संपला विरहग्रीष्म, तिज ठाऊक नाही! वाह, क्या बात हैं !

आणि इमोजींचा वापरही आवडला पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मला फार काही रुचला नाही. 😒 रचना सशक्त असल्यामुळे इमोजींची आवश्यकता नव्हती असं मला वाटतं