.. ठाऊक नाही!
संवादावे कसे? उभयतां ठाऊक नाही!
संवादाचा वाद कशाला? ठाऊक नाही! 🙂
तिच्याचसाठी सर्व करावे.. आंस मनातील!
सर्वव्यापी ती उर्मी कुठली? ठाऊक नाही! 😎
प्रेमासाठी झुरणे म्हणजे प्रेम म्हणावे??
प्रेमाचा मज अर्थ मुळातच.. ठाऊक नाही! 😏
धरणीसाठी अमृत होतो पाऊस, तेव्हा..
कधी संपला विरहग्रीष्म, तिज ठाऊक नाही! 😊
तेल-वातीच्या जळण्यामधुनी ज्योत तेवते..
पतंगांचे महत्त्व तिज मग.. ठाऊक नाही!! 🔥
प्रत्येकाचा कृष्ण, मनांतील, सांगत असतो..
ईश-प्रेमाला अंतर कुठले ठाऊक नाही!! 😇
--
रतीब आहे शब्दांचा पण अर्थ निसटतो..
ह्या कवितेला शब्द बंधने.. ठाऊक नाही! 😉
दिवाळी अंक वर्ष
वाचने
11196
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रत्येकाचा कृष्ण, मनांतील,
प्रत्येकाचा कृष्ण, मनांतील,
प्रत्येकाचा कृष्ण, मनांतील, सांगत असतो..
ईश-प्रेमाला अंतर कुठले ठाऊक नाही!!
मस्त
@राघव
@राघव
'..ठाऊक नाही'
ही कविता आवडली 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@राघव
'..ठाऊक नाही'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
क्या बात!
क्या बात!
क्या बात! तुमचं नाव
क्या बात! तुमचं नाव पाहिल्यावर कविता सुंदर असणारच याची आधीच खात्री होती.
सुंदर !
सुंदर !
धरणीसाठी अमृत होतो पाऊस, तेव्हा..कधी संपला विरहग्रीष्म, तिज ठाऊक नाही!
वाह, क्या बात हैं !
सुरेख कविता
आणि इमोजींचा वापरही आवडला
पैजारबुवा,
मला
In reply to सुरेख कविता by ज्ञानोबाचे पैजार
मला फार काही रुचला नाही.
😒
रचना सशक्त असल्यामुळे इमोजींची आवश्यकता नव्हती असं मला वाटतं
नवीन प्रयत्न करून पाहिला
In reply to मला by चौथा कोनाडा
नवीन प्रयत्न करून पाहिला इतकंच! :-)
सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार!
सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार! तुमचे प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला!
खूप सुरेख. अतिशय आवडली.
खूप सुरेख.
अतिशय आवडली.