Skip to main content

..ठाऊक नाही

..ठाऊक नाही

Published on 14/11/2020 - 10:00 प्रकाशित मुखपृष्ठ

.. ठाऊक नाही!

संवादावे कसे? उभयतां ठाऊक नाही! संवादाचा वाद कशाला? ठाऊक नाही! 🙂 तिच्याचसाठी सर्व करावे.. आंस मनातील! सर्वव्यापी ती उर्मी कुठली? ठाऊक नाही! 😎 प्रेमासाठी झुरणे म्हणजे प्रेम म्हणावे?? प्रेमाचा मज अर्थ मुळातच.. ठाऊक नाही! 😏 धरणीसाठी अमृत होतो पाऊस, तेव्हा.. कधी संपला विरहग्रीष्म, तिज ठाऊक नाही! 😊 तेल-वातीच्या जळण्यामधुनी ज्योत तेवते.. पतंगांचे महत्त्व तिज मग.. ठाऊक नाही!! 🔥 प्रत्येकाचा कृष्ण, मनांतील, सांगत असतो.. ईश-प्रेमाला अंतर कुठले ठाऊक नाही!! 😇 -- रतीब आहे शब्दांचा पण अर्थ निसटतो.. ह्या कवितेला शब्द बंधने.. ठाऊक नाही! 😉



याद्या 11159
प्रतिक्रिया 11


@राघव

'..ठाऊक नाही'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


सुंदर ! धरणीसाठी अमृत होतो पाऊस, तेव्हा.. कधी संपला विरहग्रीष्म, तिज ठाऊक नाही! वाह, क्या बात हैं !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मला फार काही रुचला नाही. 😒 रचना सशक्त असल्यामुळे इमोजींची आवश्यकता नव्हती असं मला वाटतं