लॉकडाऊन : दहावा दिवस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
3 Apr 2020 - 9:40 am
गाभा: 

नमस्कार मिपाकर, आज लॉकडाऊनचा दहावा दिवस. सकाळीच देशाचे पंतप्रधान काय बोलतील म्हणून काळजीनेच टीव्ही लावला. आज देशाला संबोधन करतांना विशेष काही नव्हतं. पण, ५ एप्रीलला रात्री ९ वाजता आपल्या घरातील वीज ९ मिनिट बंद करुन मेनबत्ती, मोबाईल फ्लॅश घराच्या गॅलरीत येऊन लावायचा आहे. भारतातील शक्तीचा परिचय द्यायचा आहे. सोशीयल डिस्टन्स ठेवायचा आहे. आपली एक जगभर लॉकडाऊनमुळे उत्तम प्रतिमा गेली वगैरे. आज अवघ्या दहा मिनिटात हे संबोधन संपलं.

खरं तर मला आजचं संबोधन अजिबात पटलं नाही. मागचा अनुभव पाहता लोक आता काय करतील त्याची काळजी वाटली. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या उत्तम सहकार्याबद्दल कौतुक करुन पुढेही आपण तितक्याच जोमाने ही लढाई लढू. डॉक्टर्स आणि सर्व स्टाफ देशभर उत्तम सेवा देत आहेत. आणि आपणच विषाणुच्या या लढाईत जिंकणार आहोत आपलं सहकार्य हेच यश आहे, वगैरे काही तरी असायला होतं असं वाटलं.

लोकांनी आपल्या घरातच थांबावं. अजूनही विषाणुचा कहर कमी झालेला नाही. जितका लोकांशी संपर्क टाळता येईल तितका टाळावा असेच सुचवावे वाटते. योग्य खबरदारी हीच आपली काळजी आहे.

आता आपणही लॉकडाऊनला आता सरावलो आहे. सुरुवातीचे एक दोन दिवस गोंधळाची स्थिती होती. आता आपण विषाणुच्या लढाईत जरा नियंत्रण मिळवत होतो, जरा लोक जागरुकपणे सहकार्य करीत होते असे वाटत होते की, दिल्लीतील 'जमातच्या सदस्यांनी' देशभर एक भितीदायक वातावरण करुन टाकले. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज देशातल्या रुग्णांची संख्या अडीच हजारापर्यंत पोहचली आहे. अजूनही आपण भारतीय लोकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अजिबात घराबाहेर न पडणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

बाकी, घरातच पडीक असल्यामुळे सध्या तरी काही विशेष नाही. पुस्तकं चाळणे, एखाद्या पानात रमलो तर पुढे वाचायचं. नाही तर ठेवून द्यायचं. वाट्सॅपवर काहीच्या काही ढकलपत्रांना आवर घालणे. गप्प राहणे, तान न घेणे. हे पाळतोय. मंडळी, आपण गेल्या दहा दिवसात वेगळं काय केलं. एकूणच सध्याच्या परिस्थितीवर आपल्या सभोवती काय सुरु आहे, काय केलं पाहिजे, आणि आपलं काय सुरु आहे त्यासाठी लॉकडाऊनच्या धाग्याचा प्रपंच.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Apr 2020 - 10:04 am | प्रचेतस

आजचं आवाहन खरंच कायच्याकै होतं.
मोदींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची प्रतिमा मात्र माझ्या मनात निश्चितच उजळली आहे असे म्हणावे वाटतं, शांत, संयमी व्यक्तिमत्व, लोकांना व्यवस्थित धीर देणं, आपत्तीचं उत्कृष्ट व्यवस्थापन, लोकांना असे दिवे बंद करून मेणबत्त्या लावा असे वेडेचाळे न करावयास लावणं.

बाकी आज सकाळी जरा बाहेर जाऊन किरकोळ किराणा वगैरे घेऊन आलो. एक चेस मॅच खेळली ती जिंकली. तुम्ही खेळा ना भो माझ्याशी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>आजचं आवाहन खरंच कायच्याकै होतं.

१०० टक्के सहमत. सव्वाशे करोड भारतीय कालपासून डोळे लावून बसले होते की मा. पंतप्रधान काय सांगणार म्हणून. प्रचंड निराशादायक भाषण. आज साहेबांचा चेहराही जरा उदासच वाटला. एक सकारात्मक उर्जा बोलण्यातून असायला हवी होती, जी चकम हवी होती ती आज मात्र मला जाणवली नाही. आज समर्थक सुद्धा माझ्या या मताला सहमती देतील. आजा वाट्सॅपवर वीज बंद केल्यामुळे विषाणु नऊ मिनिटात मरेल असे मेसेजेस येऊ नये म्हणजे झालं. किंवा त्या नऊ मिनिटाच्य काळात चंद्राचे अतिनील प्रकाशकिरणांनी विषाणु पांगळा होईल आणि मग तो अहिस्ता अहिस्ता दम तोड देगा असे काहीही. अवघड आहे.

>>>>>>>>>मोदींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची प्रतिमा मात्र माझ्या मनात निश्चितच उजळली आहे असे म्हणावे वाटतं, शांत, संयमी व्यक्तिमत्व, लोकांना व्यवस्थित धीर देणं, आपत्तीचं उत्कृष्ट व्यवस्थापन, लोकांना असे दिवे बंद करून मेणबत्त्या लावा असे वेडेचाळे न करावयास लावणं.

सहमत. महाराष्ट्रात मा.मुख्यमंत्री साहेब, त्या मानाने परिस्थिती उत्तम सांभाळत आहेत. वेळोवेळी मा.शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतील, असे वाटते.मला मा.उद्धव ठाकरेसाहेब शिवसेनेचा आक्रमक स्वभाव पाहता त्या वृत्तीला साजेसा असा तो चेहरा कधी वाटला नाही. त्या ऐवजी राज ठाकरेंकडे नेतृत्व पाहिजे होतं हे माझं जुनं मत आहे.

>>>>>>>बाकी आज सकाळी जरा बाहेर जाऊन किरकोळ किराणा वगैरे घेऊन आलो.

बाहेर नका जाऊ हो. जरा परिस्थिती स्थिरास्थावर होऊ द्या आणि मग जा.

>>>>>>>एक चेस मॅच खेळली ती जिंकली. तुम्ही खेळा ना भो माझ्याशी.
नो नाय नेव्हर. मी माझ्या लेकरांशी खेळेन. कोणा तिसर्‍या अनोळखी व्यक्तीशी चेस खेळेन पण तुमच्याशी कब्बी नही. आपली मैत्री जपायची असेल तर मला आपल्याशी चेस टाळला पाहिजे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

3 Apr 2020 - 11:25 am | चौकस२१२

बिरुटे साहेब आपले वरचे विधान "लोकांना असे दिवे बंद करून मेणबत्त्या लावा असे वेडेचाळे " आणि आधी कधीतरी "५ वाजता घंटानाद करा " या गोष्टी हास्यास्पद/ वेडेचाळे वाटतात असे दिसतंय... आणि अर्थतच दोष किंवा वेडेपणा मोदींचाच असा अर्थ दिसतो आहे
हे जर खरे असेल तर सरळ तुम्हाला च प्रश्न विचारतो..
त्याआधी एक गोष्टीशी सहमत होतो कि असल्या आव्हानांमुळे कोणी जर हे संकट टळेल अशी अंधश्रद्धा ठेवून असेल तर तो मूर्ख पणा ठरेल...(मला वाटते कि आपण सहमत व्हाल या विधानाशी )
तर प्रश्न असा कि
- सार्वजनिक राग किंवा आनंद व्यक्त करण्याची साधने म्हणजे सामूहिक एकत्रित एका ठराविक केलेल्या गोष्टी मग ते मेणबत्या घेऊन केलेले मोर्चे असोत किंवा कुठला सामूहिक ध्वनी../ नृत्य हे अनेक समाजात जगात चालते... ( आधी अरबी उदाहरण दिले होते) आणि त्यामागे काही हेतू असतात
१) ठरवलेले साध्य झाले/ परिपूर्ण झाले हे सगळ्यांना कळवणे किंवा
२) अनेकांनी त्यात भाग घेतला होता हे निदर्शनात आणून देणे
मग यात हास्यास्पद काय? हा तुम्ही लोकांचं वेडगळपणा / अंधश्रद्धा किंवा बेशिस्ती बद्दल जरूर टीका करा पण हे मला तरी एकांगी वाटते
"मेणबत्ती "घेऊन शांतीचे मोर्चे जेवहा अति उदारमतवादी काढतात ते पण आपल्याला हास्यस्पद वाटत का ?
३) असे सार्वजनिक आव्हान आज इंग्लंड मध्ये हि आहे .. आणि त्यात धर्माचा किंवा बोरिस जॉसना च्य व्यकितपुजेचा हि प्रश नाही मग हे जर भारतात करण्याचे योजिले तर त्याची अशी खिल्ली उडवून अप्लायसारख्याला काय मिळते?

अर्थात सर्वांचंच "माझे मत मानण्याचा अधिकार आहे" हे खरे आहे पण ते काही वरील शंकेचे/ प्रश्नाचे उत्तर होऊ शकत नाही..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वप्रथम ते ''वेडेचाळ्याचं'' विधान माझं नाही ते आदरणीय प्रचेतससराचं आहे. राहिलं मुद्दा की इतरवेळी लोक मेणबत्त्या मोर्चा काढ़तात त्याचं काय. मला तेही हास्यास्पदच वाटतं हेही नम्रपणे नमूद करतो.

सध्या प्रसंग काय आहे, आपण सांगत काय आहात ? सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने आशादायक बोललं पाहिजे आणि तितक्याच आक्रमक पद्धतीने सध्याच्या संकटाला सामोरे जायला हवे असा एक विश्वास निर्माण करायला हवा. डॉक्टर्स आणि त्यांच्या स्टाफवर हल्ल्ला करणा-यांवर कड़क कार्यवाही करा किंवा थेट गोळ्या घालायचा सुद्धा आदेश देऊ शकतो अशा पद्धतीचा धीरोदत्त विचार द्यायला हवा होता.

एकदा टाळ्या, थाळ्या वाजवून पाहिल्या लोकांनी वराती मिरवणुका काढल्या हे माहिती असूनही आत्ता लोकांनी रात्री मेनबत्ती मोर्चा काढू नये म्हणजे मिळवलं.

बाकी आमची मतं एकांगी असली तरी आहे ती अशी आहेत, आपल्याला पटली पाहिजेत असा आग्रह नाही. आभार.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

3 Apr 2020 - 12:23 pm | सतिश गावडे

कोणत्याही प्रतिकात्मक कृतीचे बौद्धिक परीप्रेक्ष्यातून अवलोकन केले असता ती कृती बुद्धिवंतांस निरर्थक भासू शकते. मात्र अशा प्रतिकात्मक कृतीचे जनसामान्यांमध्ये समूहभावना जागवण्यामध्ये महत्व अनन्य साधारण असते.

शाम भागवत's picture

3 Apr 2020 - 12:36 pm | शाम भागवत

सगा सर,
माझ्या मनांत वेगळेच येतंय.
उपग्रहाच्या सहाय्याने ९ वाजता असणारा उजेड व त्यानंतरच्या ९ मिनिटांतील उजेड मोजता येऊ शकेल.

भारतात किती एकी आहे हे तपासता येईल. एका अर्धविकसीत देशातील १३० कोटी लोक जर अशी एकी दाखवू शकत असतील, तर आपल्यालाही तसं करता येऊ शकेल अशी उर्मी विकसित देशांमध्ये निर्माण करायची ताकद यात असू शकते.

आम्ही भारतीय एक आहोत हे दाखवण्याची ही संधी मी तरी सोडणार नाही.
असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 1:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद पटतोय पण लोकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे अशी कृती आता आवश्यक आहे असे वाटते. भारतीय संशोधक काय प्रयत्न करीत आहेत, देशासाठी आम्ही काय करीत आहोत. एक वैज्ञानिक दृष्टिकोन जनतेसमोर यायला हवा. सवंग लोकप्रियतेच्या प्रयोगात आजचा तरी प्रयोग फसला आहे असे वाटतेय. आजचं बोलणं फार बुळबुळीत वाटलं, कदाचित पुढील वेळी अधिक आक्रमक आणि प्रगतीच्या दृष्टीने आशादायक, भारतीयांचा आत्मविश्वास वाढेल असे आवश्यक काही येईल अशी अपेक्षा करू या.

-दिलीप बिरुटे

नंदन's picture

4 Apr 2020 - 1:46 pm | नंदन

सगाशेठचा प्रतिसाद वाचून हे आठवलं :)

चौकस२१२'s picture

3 Apr 2020 - 2:57 pm | चौकस२१२

ठीक आहे मला वाटले आपले विधान.. कोणाचे का असेना ...
बाकी पण " एकदा टाळ्या, थाळ्या वाजवून पाहिल्या लोकांनी वराती मिरवणुका काढल्या हे माहिती असूनही आत्ता लोकांनी रात्री मेनबत्ती मोर्चा काढू नये म्हणजे मिळवलं."
या बाबत मोदींना दोष देण्यापेक्षा लोकांना जास्त दोष नाही का?
बाकी हि असली आवाहन का केली जातात याचं मागच्या तर्क बद्दल आपण काहीच बोलत नाही.. इंग्लंड चे हि उदाहरण दिले
या मागचा तर्क इतरांनीही चांगल्या शब्दात मंडळ आहे
"आमची मतं एकांगी असली तरी आहे ती अशी आहेत, " ते तर सर्वांचाच लागू होते हो.. पण प्राध्यापक साहेब जेव्हा चर्चा होते तेवहा मुद्याला धरून उत्तर येणे अपेक्षित असते ..
असो याला पण "माझे मत पटलं तर घ्या " असाच म्हनायचे असेल तर सोडून देऊ
पण हे आवाहन तर्कविसंगत कसे आहे हे सांगणार असेल तर कां आणि मन दोन्ही उघड आहे आपलं...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॅलरीत येऊन मेनबत्यांचा पांचट इव्हेंट करण्यापेक्षा एक पंतप्रधान म्हणून ज्या आवश्यक उपाययोजना आवश्यक होत्या त्या मुद्यांचा उहापोह आजच्या भाषणात आवश्यक होता. डॉक्टर्स आणि नर्स यांना सहकार्य न करणार्‍यांवर कार्यवाही. आरोग्य उपाययोजनांची माहिती. वैज्ञानिक दृष्टीकोन, भारतीय संशोधक करीत असलेल्या उपाययोजना. औषधी आणि तत्सम उपाययोजना. याबद्दल सामान्य जनतेमधे आशादायक चित्र निर्माण उभे राहावे, आत्मविश्वास उभा राहीला पाहिजे. असे बोलायला हवे होते. अशा गोष्टींपेक्षा मेनबत्त्या घेऊन गॅलरीत येऊन प्रकाश निर्माण करणे हे विचित्र आणि मूळ विषयांपासून आणि जवाबदारीपासून पळणे आहे, मेनबत्यांनी प्रश्न सुटणार नाही. सामान्य माणसाची आजच्या भाषणाने निराश केली इतकेच मला म्हणायचे आहे. आणि मेनबत्यांनी प्रश्न सुटतो आहे, असे ज्यांना वाटत असेल तर त्यांच्याही मतांबद्दल आदर आहेच.

तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

3 Apr 2020 - 3:53 pm | चौकस२१२

मेणबत्या पेटवून प्रश्न सुटणार नाही हे बरोबर आहे पण अहो ते प्रतीकात्मक आहे केवळ , २१ दिवस शिस्त पाळावी या योजनेचा शेवट एक प्रकारे "नोंदवावा" हा साधा तर्क आहे धडपडीत एक मैलाचा दगड कसा बस पार केला एवढेच ..त्यात एवढीं विखारी टीका कोणीच करू नये... हा हे हि मेनी कि अजून ४ गोष्टी तुम्ही म्हणताय त्या पण यायला पाहिजे होत्या पण मूळ कल्पनेला केवळ धोरण विरोध म्हणून विरोध... अजब ..
उद्या जर माझ्य देशातील पंतप्रधानाने आपण या रोगाचा प्रसारणाला वेग आपल्या देशात थांबवला आहे त्यासाठी अमुक दिवशी काहीतरी सार्वजनिक ( पण अंतर ठेवून) करा , असे आवाहन केले तर मी तरी त्याबद्दल येवडाही चेष्टा करणार नाही , टाळ्या, घंटा, मेणबत्य्यानी काही रोग जाणार नये हे सर्वांनाच माहिती आहे .. असो ..

स्मिता दत्ता's picture

3 Apr 2020 - 5:42 pm | स्मिता दत्ता

अगदी बरोबर मेडिकल स्टाफवर हात उगारणाऱ्यांवर काहीतरी कडक समज अपेक्षित होती. आणि थोडी जरब बसावी असंही काहीतरी हवं होतेच. उध्द्वव ठाकरे जास्त प्रभावी दिसतायत हे अगदी खरं. परिस्थिती खूपच छान हाताळताना दिसतात. सरकारमध्ये एकवाक्यता दिसते. बहुदा पवार साहेबांचा वचक असावासे वाटते. तो तसा काही दिवस तरी हवाच कारण नवे सरकार नवी आघाडी ..!! असो

सौंदाळा's picture

3 Apr 2020 - 2:00 pm | सौंदाळा

भाषणाच्या बाबतीत सहमत.
मोदींपेक्षा ठाकरेंचे भाषण बरं होतं.

उद्धव ठाकरे परिस्थिती चांगली सांभाळत आहेत??
मुबंईतच आग लागायची वेळ आली आहे आता.
भायखळा, बोरिवली, वरळी येथे मोठे बाजार अजूनही चालू आहेत. काल परवा धारावी, लालबाग, कोळीवाडा इकडे रुग्ण सापडल्यावर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

महाराष्ट्राच्या मानाने बाकी मोठी राज्ये परिस्थिती बरी हाताळत आहेत असं माझं मत आहे.

गणेशा's picture

14 May 2020 - 8:00 pm | गणेशा

सहमत.

@सर...
मोठा लेख लिहायची कि जरा

चांदणे संदीप's picture

3 Apr 2020 - 10:07 am | चांदणे संदीप

लॉकडाऊनच्या कंटाळवाण्या काळात मिपाच एकमेव सोबती आहे. काम करता करता एखादा लेख किंवा कविता वाचायची, वाटलं तर प्रतिसाद द्यायचा असं सुरू आहे.
बाकी, दोन दिवसांपासून कन्या हट्ट करून घरी न थांबता माझ्यासोबत आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये असलेल्या क्लबहाऊस मध्ये येत आहे. गार्डन सध्या सर्वांसाठी बंद केलेलं असल्याने इथं कोणीच येत नाहिये त्यामुळे काम करताना जी शांतता हवी असते ती मिळतेय. कन्येचा फुलं तोडून आणणे, रांगोळी काढणे आणि बाबाला बघायला लावणे, छान म्हणायला लावणे असा उद्योग सुरू आहे.
आज सकाळी मोदीकाकांनीही थोडा स्कोप दिला व्हाट्सअ‍ॅप ग्रूपवर चर्चा करायला.
आणखी म्हणजे एन्जॉयिंग रामायण सकाळी आणि संध्याकाळी.

सं - दी - प

महाभारत पण बघा, डीडी भारतीला लागतं दुपारी बारा आणि संध्याकाळी ७

चांदणे संदीप's picture

3 Apr 2020 - 10:27 am | चांदणे संदीप

महाभारत नशीबात नाही माझ्या. दोन्ही वेळेला नवीन हापिसात बसून काम चालू असतं. :(

सं - दी - प

सर्व जण श्री नारायण सुरवे कधी तापतात याची वाट पाहात आहेत.

मोदींच्या कामकाज पद्धतीची समीक्षा करणारा France 24 channel लेख

काल दुसर्‍या धाग्यावर व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतोय. अशी मते असलेल्या लेखांचा आता महापूर येणार.

कंजूस's picture

3 Apr 2020 - 10:25 am | कंजूस

Camera app शोधताना हे 3 एमबीचे app सापडलं. यामध्ये विडिओ सुरू करण्याचा टाईमर आहे. किती वेळ शुटिंग करायचाही आहे. सोलो ट्रेकिंगला उपयुक्त. बरीच सेटिंग्ज आहेत.
Best Camera ( Hd Camera)
लिंक

कंजूस's picture

3 Apr 2020 - 10:27 am | कंजूस

Best Camera ( by - Hd Camera)
लिंक

कुमार१'s picture

3 Apr 2020 - 10:54 am | कुमार१

माणूस आणि जीवजंतू यांच्यातील संघर्ष सनातन आहे. दोघेही सतत एकमेकावर कुरघोडी करीत असतात. सध्याही एका उच्छाद मांडणाऱ्या जंतूविरोधी औषधाचा शोध युद्धपातळीवर चालू आहे.
........

यानिमित्ताने डॉ. जोन्स साल्क (पोलिओ-लसीचे निर्माते) यांच्या एका वाक्याची तीव्रतेने आठवण झाली.
ते वाक्य असे आहे:

“ जर का पृथ्वीवरील सर्व जीवजंतू नष्ट झाले, तर पुढच्या ५० वर्षांत इथली सर्व जीवसृष्टीच नष्ट होईल. पण, जर पृथ्वीवरील सर्व माणसेच नष्ट झाली, तर पुढच्या ५० वर्षांत इथे अनेक प्रकारच्या सजीवांची भरभराट होईल”.

चौकटराजा's picture

3 Apr 2020 - 2:52 pm | चौकटराजा

मिपावर सर्व जण हे एक जैविक युद्ध आहे याचा विचार वा अभ्यास करताना देखील दिसत नाहीत . एकाने ( तो मिपाचा सदस्स्य आहे ) फेसबुक वर असा धागा काढलाय की " हे" सर्व सम्पल्यावर कोण कोण काय काय करणार..... ? त्याला म्हटले असा धागा जरूर काढ पण जगलो तर असा त्याला क्लॉज जोड ! सर्वाना जणू आपण अमर आहोत अशा थाटात हिन्दुत्व काय ,,, कशाहीही त्याचा सम्बन्ध जोडत आहेत. एकाने तर ( मिपाकर नाही ) करोना व शिवाजी महाराज असाही विडिओ काढला आहे. १९१८ च्या साथी नन्तर मोठा नरसंहार करणारी साथ आली नाही म्हणून आपण जैविक सायन्स पासून इतके वेगळे झाले आहोत की , फायनास , राजकारण, धर्मकारण ई मूळ जगण्याला अवश्यक नसलेल्या गोष्टीचे चर्वित चर्वण चालू आहे.

अजून तरी आपले नशीब असे आहे की हाआजार करणारा विषाणू हवेतून प्रसार करीत आहे असे पुढे आलेले नाही. असे जर झाले तर..... तर इथे प्रतिसाद द्यायची देखील कुणाला उसन्त मिळणार नाही. तशी भाषण करायला अगदी मोदी शहा आणि ठाकरेना सुद्धा !

चौथा कोनाडा's picture

3 Apr 2020 - 11:31 am | चौथा कोनाडा

छोट्या छोट्या निवेदनांसाठी पंतप्रधाना सारख्या मोठ्या व्यक्तिंनी पुढे येणे रुचले नाही. हे टाळायला हवे.

सतिश गावडे's picture

3 Apr 2020 - 11:57 am | सतिश गावडे

सध्याच्या घडीला घराबाहेर न पडणे आणि घराबाहेर जाणे निकडीचे असल्यास परस्परांमध्ये योग्य ते अंतर ठेवणे हाच कोरोनापासून स्वतःला दूर ठेवण्याचा मंत्र आहे.

वाट्सॅपवर काहीच्या काही ढकलपत्रांना आवर घालणे.

हे तुम्ही कसे जमवता? माझ्या वैयक्तिक अनुभवावरुन हे अश्क्य कोटीतील काम आहे असं मला वाटतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 1:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पर्सनलवर असे काही निरर्थक ढकलू नका असे सांगणे. ब्लॉक करणे. ब्रॉड मेसेजेस वाल्यांना स्ट्रिकली मला मेसेजेस ढकलू नका हे सांगणे. फरक पडतो. बाकी ग्रुपवर लोक लवकर शिवीगाळावर येतात, व्यक्तिगत होतात. ग्रुप सोड़णे हा सोपा उपाय.माझ्यासाठी हे बर पडत. :)

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

3 Apr 2020 - 1:52 pm | धर्मराजमुटके

मी शक्यतो ग्रुप जॉईन करतच नाही. त्याने मिळणारा फायदा हा त्याच्या मनस्तापाच्या मोजमापात अगदीच नगण्य असतो. त्याउपरही कोणी जबरदस्ती ग्रुप मधे अ‍ॅड केले तर हळूच २-४ दिवसानी ग्रुपमधून निघून जातो.

शाम भागवत's picture

3 Apr 2020 - 2:22 pm | शाम भागवत

त्यापेक्षा मोबाईलमधली कायप्पाची सेटिंग बदला. कोणीही तुमच्या नकळत कोणत्याही ग्रुपमधे सामील करून घेऊ शकत नाही. तुम्हाला इन्व्हीटेशन लिंक पाठवूनच सभासद होण्याची विनंतीच करायला लागते.

धर्मराजमुटके's picture

3 Apr 2020 - 2:27 pm | धर्मराजमुटके

धन्यवाद ! मुळातच मी थोडासा एकलकोंडा आहे. व्हॉटसअ‍ॅप, फेसबूक सारख्या माध्यमांपासून मी स्वतःला जाणिवपुर्वक दुर ठेवले आहे. व्यवसायानिमित्त केवळ मजबूरी म्हणून मी व्हॉटसअ‍ॅप वापरत आहे. तुमच्या सुचनेची नोंद घेऊन त्याप्रमाणे बदल करत आहे.
अवांतर : तुम्हाला एक निरोप पाठवला होता. कदाचित आपल्या नजरेतून तो सुटला असेल.
बघून वेळ असल्यास उत्तर द्याल काय प्लीज ?

कुमार१'s picture

3 Apr 2020 - 2:33 pm | कुमार१

व्हॉटसअ‍ॅप, फेसबूक सारख्या माध्यमांपासून मी स्वतःला जाणिवपुर्वक दुर ठेवले आहे.

>>>

+ १ लाख !

नवीन परिचय झालेल्या व्यक्तीस मी शक्यतो समस / इ मेल करतो. ही माध्यमे शांत व सुसह्य आहेत. आपल्याकडे कायप्पा (कामापुरता ) आहे , हे आपणहून सांगायचे नाही. नंतर दुसऱ्याला कळते हा भाग वेगळा.

शाम भागवत's picture

3 Apr 2020 - 3:26 pm | शाम भागवत

माझा तर फोनच हरवलाय.
आनंदाने नाचणाऱ्या माणसाचे चित्र:)

शाम भागवत's picture

3 Apr 2020 - 2:37 pm | शाम भागवत

धर्मराजमुटके 12/25/19

मिटवा Block

नमस्कार !
डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांचा व्हाटसअप क्रमांक मिळेल काय ? मुंबईच्या मधूमेही रुग्णांना ते मदत करतात काय ?
त्यांना HbA1c & Fasting Insulin Test ह्या दोन टेस्टचे रिपोर्ट पाठवून सल्ला घ्यायचा आहे.
धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके 12/25/19

मिटवा Block

ठाणे / मुंबईसाठी काही वेगळा ग्रुप आहे काय ? असल्यास प्लीज कळवा. धन्यवाद.
शाम भागवत's picture
You 12/28/19

मिटवा

https://www.misalpav.com/comment/1010528#comment-1010528
इथे म्हणजे लेखाच्या दुसऱ्या पानावर फोन नंबर दिलेले आहेत.

https://www.facebook.com/weightlosseffortlessly/posts/good-news-for-citi...
ही फेसबुक लिंक पण उपयोगी ठरू शकेल. ठाण्याच्या लोकांसाठीच आहे.

वरील उत्तर मी तेव्हांच दिलं होतं. तुम्हाला मिळालं नाही का?
किंवा उत्तर देण्याची माझी पध्दत चुकीची असली तर माहित नाही.

शाम भागवत's picture

3 Apr 2020 - 2:40 pm | शाम भागवत

हाच मेसेज होता का आणखी कोणता वेगळा होता?

चौकटराजा's picture

3 Apr 2020 - 3:13 pm | चौकटराजा

मी कोणत्याही वोटस अ‍ॅप चा मेम्बर नाही. जे वैयक्तिक कॉन्टकट आहेत त्याचे फोर्वर्ड मी कचर्यात फेकून देतो . फक्त मेसेज असतील तरच वाचतो करोना सम्बंधी कोणतेही विडिओ पहात नाही. सर्व चानलना , पीम एम सी एम ना फाट्यावर मारले आहे. एवढेच काय , आयुवेद अलोपथी, युनानी ,होमिओपाथी , योगी ई शी सध्या डिस्ट्न्सिंग ठेवूनच आहे. अपवाद डो खरे यांचे लेख ! त्यामुळे सुखी आहे. तू नळी वर ढिगाने रंजक व बोधक विडिओ आहेत. त्याला रोज 30 मिंनिट चालणे , गाणी वाजविणे चालू आहे, जग अजूनही सुंदरच आहे !

जखडल्याचं फीलिंग आलेल्या कोट्यवधी लोकांना सलग मोठा लोकडाऊन कालावधी असल्याने अधेमध्ये एखादा निरर्थक दिसणारा का होईना पण इव्हेंट, कार्यक्रम देणं मानसिकदृष्ट्या महत्वाचं असावं. हाच विचार या प्लॅनमागे असावा. एक मानसिक ब्रेक मिळतो. रिलीज मिळतो. अगदीच सर्व थिजलेलं आहे अशा भावनेपेक्षा लोकांना बरं वाटतं.

खूप तर्ककर्कश टीका करू नये.

अर्थात लोकांनी पंतप्रधानांची रस्त्यावर न येण्याची/ या निमित्ताने घोळके न करण्याची खास सूचना लक्षात घ्यावी ही इच्छा. अन्यथा लोक दिवाळी या नावाखाली सामूहिक फटाके माळ, भुईनळे, बाण उडवू नयेत म्हणजे झालं.

मूकवाचक's picture

3 Apr 2020 - 2:26 pm | मूकवाचक

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजचं भाषण काहीच्या काही होतं त्यातल्या आपल्या 'रिलीज फिलिंग' हे मत मनाचं समाधान करून घेणे आहे. मनाची समजूत काढणे आहे. आजच्या भाषणात काहीही नवं नव्हतं, आज ते नसते बोलले तरी चाललं असतं. मागील वेळी तरी डॉक्टर नर्स यांच्या संबधी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणुन ती एक चांगली भावना होती.

आज काहीही समर्थन करणारे लोक एका मेनबत्तीची उष्णता इतकी तर एक कोटी लोकांच्या मेनबत्तीतुन इतकी उष्णता निर्माण होऊन कोरोनाचा विषाणु इतक्या उष्णतेला मरून जातो असा युक्तिवाद करीत फिरत आहेत.

आपल्या विषयी पूर्ण आदर व्यक्त करून असे म्हणतो की 'रिलीज' चा युक्तिवाद विषाणु इतक्या उष्णतेला मरून जातो अशा काहीच्या काही युक्तिवादासारखा आहे, आणि ते भयंकर आहे इतकेच सांगावे वाटते.

-दिलीप बिरुटे

अगदी सहमत..

चौकस२१२'s picture

3 Apr 2020 - 3:00 pm | चौकस२१२

सहमत गवी यांच्या विधानाशी..

जालिम लोशन's picture

3 Apr 2020 - 3:16 pm | जालिम लोशन

तार्किक, पटणारे.

जालिम लोशन's picture

3 Apr 2020 - 3:18 pm | जालिम लोशन

तार्किक, पटणारे. गविंसाठी,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जेथे लोक व्हेंटीलेटरवर आहेते तिथे ९ मिनिटे लाईट बंद करु नका
नाहीतर त्यांच्यासाठी १० दिवस पणती लावावी लागेल.

(एक मस्त फॉरवर्ड)

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

3 Apr 2020 - 4:33 pm | धर्मराजमुटके

घ्या ! तुम्हाला खाद्य पुरविणारा लेख लगेच आला देखील. बहुतेक पत्रकार लोक आजकाल मिपावर हेरगिरी करत असावेत असा दाट संशय येतोय :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 4:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिव्यांची महती सांगणारे कितीतरी मेसेजेस सकाळपासून सुरु झाले आहेत. एकापेक्षा एक एक्स्पर्ट आणि दिव्यांमुळे काय काय होऊ शकतं ते.
अर्थात हे दोन्ही बाजूंनी सुरु असतं. आपण मिपावर फूल पडिक असल्यामुळे आपल्यालाही एक बाजू तिव्रतेने लावून धरावी लागतेय.

दीव्यांच्या प्रकाशाने अंतराळात एक पोकळी निर्माण होवून विषाणुच्या डोळ्यांसमोर प्रकाशामुळे अंधारी येईल आणि ते दिशाहीन होती हा तर सर्वच कळस होता. :)

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

3 Apr 2020 - 5:10 pm | चौकस२१२

हो ना मोदींनीच पाठवला असणार तो दिव्य मेसेज
लोक काय वाट्टेल ते लिहितात बोलतात आणि करतात .. आणि खापर काम करणारी सरकारवर.. धन्य
मला सकाळी आज काळ पातळ होते याला पण कारणीभूत मोदीच ...किंवा सी आय ए चा हात असावा त्यात (शिईईई )
सार्कष्टीक

यातील धर्माचा / संस्कृतीचा संदर्भ एक क्षण बाजूला ठेवूयात ..
माझा मुद्दा केवळ एक सार्वजनिक प्रतीकात्मक गोष्टीला फुकाचा विरोध करू नये एवढाच आहे (सध्याच्या परिस्थिती ) भारतासारखाय "श्रद्धाळू" देशामध्ये लोक याचा कुठच्या कुठे संबंध जोडतील हे गृहीत आहे.... पण फक्त सरकार विरोधी म्हणून त्यांच्या प्रत्येक कृतीत विरोध करणायचा त्यावर अशी टीका करणे हे Not called for आहे असे वाटते
एवढेच ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 5:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>भारतासारखाय "श्रद्धाळू" देशामध्ये लोक याचा कुठच्या कुठे संबंध जोडतील हे गृहीत आहे.

देशाचे पंतप्रधान आहेत ते, त्यांनीही भारतीय श्रद्धाळू आहेत म्हणून काहीही विचार सांगू नये असे वाटते. आज मेणबत्त्या सांगितल्या. उद्या अगरबत्ती ओवाळायची सांगतील. परवा सार्वजनिक प्रतिक्रिया म्हणून यज्ञ हवन करायचेत का ? गंडे-दोरे सांगतील तेही करायचं काय ? देशाचे पंतप्रधान आहेत, गारुडी नाहीत. वैज्ञानिक दृष्टी असलेला विचार सांगितला पाहिजे असे वाटते. श्रद्धाळू आहोत म्हणून काहीही करु नये असे वाटते. सरकार विरोधाचं काय आलं त्यात. सरकारने सध्याच्या काळात परिस्थिती पाहुन योग्य पावले उचलावीत आपण त्याचं स्वागत करु. अनेक त्रास सहन होऊनही आपण लॉकडाऊनचंही स्वागत केलंच ना.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

3 Apr 2020 - 6:26 pm | चौकस२१२

मी श्रधाळू भारत हा शब्द वापरला तो केवळ भारतीय जनतेची वैचारिक घडण दाखवण्यासाठी.. तुम्ही त्याचा भलताच अर्थ घेतला कि मी जणू म्हणतोय कि मोदींनी भारतीय जनता श्रधाळू आहे म्हणून काह्ही सांगावे ...कशाचा कशाला जोडून घेताय...
सार्वजनिक हाती घेतलेल्या गोष्टीचा पूर्ती होताना केवळ एक प्रतीकात्मक म्हणून त्यांनी एकदा ५ वाजता घंटानाद किंवा तत्सम करा आणि २१ दिवस संपल्यावर दिवे लावण्याच्या प्रतीकात्मक रूपात हा दुसरा भाग पूर्ण झाल्याचा , उन्माद नाही पण मैलाचा दगड म्हणून हे कार्याला सुचवलं तर तर एवढा विरोध!
जगभरात अनेक ठिकाणी असे काहीतरी लोक करीत आहात ते काही अंधश्रेद्धेपोटी नाहीतर एक सार्वजनिक खून म्हणून एवढे पण लक्षात ना घेता केवळ शाब्दिक लढाई जिकंण्यासाठी करीत असाल तर करा.. तुम्ही जिकलात...

चौकस२१२'s picture

3 Apr 2020 - 6:27 pm | चौकस२१२

सार्वजनिक खूण

चौथा कोनाडा's picture

3 Apr 2020 - 5:27 pm | चौथा कोनाडा

दिव्यांची एवढीच चर्चा सुरु आहे तर आपण का मागे रहायचे दिवा लावायला ?
DDLMP
दीपज्योती नमोस्तूते ||

ऋतुराज चित्रे's picture

3 Apr 2020 - 5:31 pm | ऋतुराज चित्रे

६ एप्रिलला नासाचे फोटो येतील भारतातील लोकांनी लावलेल्या दिव्यांचे. बघू त्यात कोरोना व्हायरस दिसतो की ॐ .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 8:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी होता. =)))

-दिलीप बिरुटे

मूकवाचक's picture

3 Apr 2020 - 6:57 pm | मूकवाचक

१. मा. पंतप्रधान आणि केंद्र शासनाने विविध माध्यमांच्या मार्फत करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसते (फोनची कॉलर ट्युन, हेल्पलाइन्स, न्युज चॅनल इ.) . यात अशी नेहमी कुठली माहिती वगळली गेली आहे जिचा मा. पंतप्रधानांच्या आवाहनात उल्लेख असायला हवा होता?

२. मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामध्ये आणि केंद्र शासनाने दिलेल्या माहितीमधे अवैज्ञानिक, दिशाभूल करणारे किंवा समाजाचे नुकसान करू शकेल असे नेमके काय आहे?

मा. पंतप्रधानांचे आवाहनः

कुमार१'s picture

3 Apr 2020 - 7:05 pm | कुमार१

फोनची कॉलर ट्युन

>>
मी कधीच ट्यून वापरत नाही. पण परवा अचानक फोन कंचा समस आला की तुमचे २१ रु कापले आहेत.
हे आपल्या सर्वांचेच 'करोना जनजागृती संदेश ' याबद्दलचे आहेत का?

ऋतुराज चित्रे's picture

3 Apr 2020 - 7:06 pm | ऋतुराज चित्रे

९ वाजता आणि ९ मिनिटे ह्यात वैज्ञानिक काय आहे? दिव्यांचे नंतर बघू.

काही कृती शासन चुकीच्या पद्धतीने करीत आहे असे बऱ्याचदा सर्व सामान्य माणसाच्या मनात येते. पण राजकीय नेते त्यात त्यांना काय अपेक्षित आहे ते सांगत नाही. हे अगदी तसेच असते की एक कवी आपल्या मनात आलेल्या भावनांना वाट मोकळी करून पटकन एक सुंदर कविता कागदावर उतरवत जातो, नंतर अनेक समिक्षक त्यावर कित्येक वर्ष खर्डे घाशी करत असतात.
ता. क. डॉ. साहेब कृपया वैयक्तिक नाही. मोदी कवी नाहीत.

शाम भागवत's picture

3 Apr 2020 - 8:06 pm | शाम भागवत

व्वा!
काडी टाकावी तर अशी.
एका काडीत तिघेजण ( कवी, मोदी व प्राडॉ )
:)
कृ.ह.घ्या.

अधेमध्ये एखादा निरर्थक दिसणारा का होईना पण इव्हेंट, कार्यक्रम देणं मानसिकदृष्ट्या महत्वाचं असावं. हाच विचार या प्लॅनमागे असावा.

मागच्या वेळी थाळ्या वाजवून कोरोनाला पळवलं असं ओरडत होते किंवा तो गेला म्हणत होते. अंधश्रद्धा भरपूर आहे.

चार पाच हजार लोकांना घरी बसवून काही होत नाही, संशयीत लागण झालेल्या चार पाच जणांना एका ठिकाणी वेगळे थोपवणे गरजेचे आहे पण तेच शक्य होत नाही.

कंजूस's picture

3 Apr 2020 - 8:19 pm | कंजूस

९ वाजता आणि ९ मिनिटे

पुन्हा हे न्युमरॉलजी/गुरुचा शुभांक वगैरे झालंच.
वैज्ञानिक झाडाला अध्यात्माचं आळं.

शाम भागवत's picture

3 Apr 2020 - 8:26 pm | शाम भागवत

कंकाका,
नवग्रह शब्द वापरा की.
ज्योतिषालापण मग यात ओढता येईल.
;)

सतिश गावडे's picture

3 Apr 2020 - 8:45 pm | सतिश गावडे

एरव्ही ढकलपत्र आले की चिडचिड होते, मात्र आज आलेल्या ढकलपत्रांनी तुफान मनोरंजन केले. काही ढकलपत्रांमधला उपहास ईतका उच्च दर्जाचा होता की लोकांना तो उपहास असेल अशी पुसटशी शंका न आल्याने ते मेसेज "नॉर्मल" मेसेज समजून भाबडेपणाने* इतरांना पाठवत होते.

शाम भागवत's picture

3 Apr 2020 - 8:55 pm | शाम भागवत

:)

भोळीभाबडी जनता आणि त्यांचा विश्वास.

आता अंगारेसुद्धा येतील.
केरळमधले एक म्हातारे जोडपे तांदूळ आणि फणसाची सागुती खाल्ल्याने बरे झाले असा त्यांचा दावा आहे.

'आपल्या' नाचणीच्या भाकरीला मागणी वाढेल बहुतेक.

गोंधळी's picture

4 Apr 2020 - 10:41 am | गोंधळी

गोमुत्राच काय झाल ? त्यावरील संशोधन कुठवर आल? http://thewirehindi.com/13462/committee-research-cow-gobar-gomutra/

बाकी कहीही म्हणा ह्यावेळी ही मोदींच्या आईचा फोटो बघण्यास खुप उत्सुक आहे. त्यातुन एक वेगळी स्फुर्ती मिळते.

प्रतिक्रिया वाचून मनोरंजन झाले. स्वतःचा अजेंडा रेटताना किमान 'आपण सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहोत आणि पुढे काय होणार आहे / होऊ शकेल' हे थोडेतरी ध्यानात घ्यावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीव्हीवर बातमी चालू होती की संपूर्णपणे वीजेचा वापर कमी केला तर वीजसंचावर परिणाम होऊ शकतो.
या विषयातले जाणकार खरी काय ते माहिते देतील. लोकमतची बातमी इथे.

सेठ निर्णय घेण्यापूर्वी वेगवेगळ्या विभागाशी चर्चा करतात की नाही ?
की आपलं एकट्याचच घोडं अचानक हाकत असतात असा विचार येतो अशावेळी.

०दिलीप बिरुटे

जाणकार तज्ञ माहिती देईपर्यंत तरी स्वतःचे घोडे आवरा..

..असा विचार येतो अशावेळी. =))

शाम भागवत's picture

3 Apr 2020 - 9:38 pm | शाम भागवत

ऊर्जा मंत्रालयाचे संबंधीत सर्व विभाग त्यासंदर्भात तयारी करत असून कुठलीही अडचण येणार नाही असंही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे वाक्य वाचायच राहिलं असावं.
अगदी शेवटचच वाक्य आहे ते. अगोदरच्या सगळ्या बातमीचे रसभंग करणारे.
;)

टीव्हीवर बातमी चालू होती की संपूर्णपणे वीजेचा वापर कमी केला तर वीजसंचावर परिणाम होऊ शकतो.

रोज रात्री अकरा बारा वाजता वीज संच बिघडतात ही नवीन माहिती कळली. धन्यवाद.

यश राज's picture

3 Apr 2020 - 11:19 pm | यश राज

म्या काय म्हण्तोय ज्या वेळेस १ तास् भर 'अर्थ हवर' शेलेब्रेट करत असत्यात त्यावेळेस पण असेच उर्जा मण्त्रालय हादर्लेले असत्ये का?
नाही म्हण्जे ९ मिनटात एवढा फरक पडणार म्हनुन विचारलाय.....

https://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/Lights-to-go-of...

https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-makes-it-to-Earth-Hou...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2020 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

1A49D01

आपलं काम आहे, जे दिसतं ते लोकांसमोर ठेवणे.

-दिलीप बिरुटे

छोटासा बदल - जे सोयिस्कर दिसतं ते लोकांसमोर ठेवणे.

सुबोध खरे's picture

4 Apr 2020 - 11:59 am | सुबोध खरे

मागच्या वर्षी रात्री साडे आठ ला "अर्थ अवर" म्हणून एक तास दिवे बंद करताना असले प्रश्न लोकांना का आले नाहीत याचा विचार व्हावा.

https://gadgets.ndtv.com/others/news/earth-hour-2019-time-theme-india-da...

https://currentaffairs.gktoday.in/earth-hour-2019-04201967558.html

कदाचित ते पुरोगामी पणाचे लक्षण असल्याने त्याबद्दल कोणी काही बोलले नाही.

https://24coaches.com/ac-electric-locomotives-roster-the-wam-class/
https://24coaches.com/electric-locomotive-roster-the-wag-series/

Goods trains are running on 25kV alternating current traction throughout nation, probably Indian Railway power grid is not attached to National Grid.

सुबोध खरे's picture

4 Apr 2020 - 6:40 pm | सुबोध खरे

आपले दुवे २०१५ आणि २०१६ चे आहेत.

रेल्वेचे ग्रिड पूर्ण वेगळे आहे. रेल्वेची स्वतःची वीज केंद्रे सुद्धा आहेत.

https://en.wikipedia.org/wiki/Nabinagar_Thermal_Power_Project

pspotdar's picture

4 Apr 2020 - 8:07 pm | pspotdar

in Executive Summary -

IR has been procuring electricity as an ordinary consumer for its traction applications despite being the largest single user of energy in the country. Accordingly, it has been paying higher tariffs for energy duly taking the burden of distribution losses, cross subsidy and other surcharges of Power Distribution Companies (DISCOMs).

http://www.indianrailways.gov.in/Mission_41K.pdf

सुबोध खरे's picture

4 Apr 2020 - 8:28 pm | सुबोध खरे

हो पण त्यांचे ग्रीड वेगळेच असते.
महाराष्ट्रात वीज बंद झाली असताना सुद्धा बहुसंख्य वेळेस रेल्वे चालूच राहते.
फारच क्वचित असे होते कि रेल्वेची वेगळी लाईन सुद्धा ट्रिप झाली.

सुबोध खरे's picture

4 Apr 2020 - 6:32 pm | सुबोध खरे

*प ढ त मू र्ख*

१) हर हर महादेव ही गर्जना करून युद्ध जिंकता येत नाही हे महाराजांनाही माहित होते.

२) निव्वळ चले जाव ची घोषणा देवून इंग्रज पळून जाणार नाहीत हे महात्मा गांधींनाही माहित होते.

३) निव्वळ तळ्याचे पाणी पिल्याने जातीयता नष्ट होणार नाही हे बाबासाहेबांनाही माहित होते.

४) निव्वळ रक्त मागून स्वातंत्र्य मिळणार नाही हे सुभाषबाबूंनाही माहित होते.

५) निव्वळ जय जय रघुवीर समर्थ म्हणून हिंदू एकत्र येणार नाही हे रामदास स्वामींनाही माहित होते.

६) याचप्रमाणे दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे मोदींनाही माहित आहे.

या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते हे ज्यांना समजत नाही त्यांना रामदास स्वामी पढतमूर्ख म्हणतात.

चौकटराजा's picture

4 Apr 2020 - 10:08 pm | चौकटराजा

लोकाना मानसिक पातळीवर एक आणण्यासाठी हे सर्व करावे लागते हे मान्य परंतू वरील उदाहरणात एकाही लीडर ने " महामारी" सारखे अत्यंत गम्भीर प्रकरण भावनेच्या जोरावर हाताळले असेल असे वाटत नाही. वरील सर्व उदाहरणे मानव निर्मित समस्यांची आहेत. सध्याचे प्रकरण यापेक्शा वेगळे आहे. ते एक नैसर्गिक संकट आहे .लोकाना काय वाटते यापेक्षा सध्यातरी कोणता उपाय अधिक महत्वाचा आहे हे महत्वाचे. तो मोदीनी ओळखला आहे स्वीकरला ही आहे. पण ज्या प्रमाणे शरीराचे ऑपरेशन हे शरीर चालू ठेवून करावे लागते तसे मानवी व्यवहार काही पातळीवर दया तर काही बाबतीत मानव अधिकार वगैरे स्थगित ठेवून करावे लागते. काही विशिष्ट समाजाला घाबरून जर कठोर पणा आणण्याचे धाडस मोदीनी दाखविले पहिजे जसे इंदिराजीनी दाखविले होते .

गोंधळी's picture

5 Apr 2020 - 11:35 am | गोंधळी

भारताला (हिंदुस्तानाला) विज्ञानवादी,उच्च शिक्षित पंप्र. ची गरज आहे असे वाटते.

चौकस२१२'s picture

5 Apr 2020 - 8:11 am | चौकस२१२

वाह डॉ .. अगदी बरोबर.. हे सगळे प्रतीकात्मक आहे. हे जाणून घायचे नाही आणि कुचेष्टा कार्याची ते सुद्धा अश्या गंभीर परिस्थितीत अशी घाण सवय लोकांना असते ... कारण एकाच पराकोटीचा साध्यचय्या सरकार आणि सत्ताधारी पक्षाचा विरोध...
मग संधी मिळेल तिथे नुसतंय टपल्या होण्याच्या किंवा फुसक्या सोडायच्या
" झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही जागे करता येत.."
हेच bagaha पृथ्वीराज चव्हाणांचे विधान... रामायण आणि महाभारत बरोअबर इतर का नाही दाखवला...
अरे हुशार नेत्या .. एक तर त्या मालिका या केवळ मनोरंजन साठी होत्या काही धर्म प्रसारासाठी नाही... आणि आहेत इथे ८०/१०० हिंदू त्यामुळे त्यांचं इतिहासावर किंवा संस्कृतीवरील कार्यक्रम दाखवले तर येवढए का झोंबत बे !
वरील ५/६ उदाहरणात अजून एक जुने उद्धरण बाळासाहेब ठाकरे यांचे ..
रस्त्यावर नमाज पडायला आलेल्या जनते मुळे रहदारी चा खोळंबा होतो पण त्यावर त्यावेळचे सरकार गप्प ( भावना दुखव्याला नको)
पण त्यावेळी सरकारला हे नाही समजले कि हा एक सामाजिक नागरिक प्रश्न आहे यात हिंदू मुस्लिम काही नाही
मग याला उत्तर म्हणून बाळासाहेबांनी "महाआरती " ची घोषणा केली आणि सगळ्या हिंदूंना आवाहन केलं कि तुम्ही पण आरती साठी रस्त्यावर या आणि आडवा...
त्यावेळी बाळासाहेबांना हे हि माहिती होतं कि असं नमाजसारखं महारारती वैगरे हिंदू धर्मात नाहीये... ती केवळ सरकारला त्यांचा येडे पणा दाखवून देण्यासाठी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2020 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपूर्ण वीज बंद करू नका असा MSEB कडून अधिकृत मेसेज बील App वर येत आहे केवळ माहितीस्तव. मेन स्विच बंद करू नका.

आता आम्ही सर्व लाइट बंद करणार नव्हतोच, कृपया हे सांगू नका. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

फुटूवाला's picture

5 Apr 2020 - 9:34 am | फुटूवाला

अथवा अजून काही होऊ. मी माझ्या घरात टीव्ही, कम्प्युटर बंद ठेवणार आहे.
रिकामा ताण नको.

हे योग्य वाटतंय !

शाम भागवत's picture

5 Apr 2020 - 11:33 am | शाम भागवत

स्टॅबिलायझर जोडलेले नसलेले कोणतेही उपकरण बंद ठेवलेलेच बरे.
म्हणजे मला असं वाटतंय.
मी काही यातला तज्ञ नाही.

चौकटराजा's picture

5 Apr 2020 - 7:08 pm | चौकटराजा

फोटोशोप अगाध विषय आहे त्यात वेळ घालावा। बुद्धिभेद ही महाबला आहे. व् भारतीय लोक त्यात माहीर आहेत.

शाम भागवत's picture

5 Apr 2020 - 11:58 am | शाम भागवत

मी कारस् ९ मिनिटे सुरू ठेऊन कारचे पार्किंग लाईट लावणार आहे. हॅझार्ड लॅम्पपण लावणार आहे.
एवितेवी बॅटरी चार्चिंगसाठी ते करायला लागणारच होते म्हणा.
९ मिनिटांचा असाही सदुपयोग करावा म्हणतोय.

कोणाला असेच काही सदुपयोग सुचत असतील तर सुचवा

भागो's picture

5 Apr 2020 - 12:05 pm | भागो

Switch-off Bharat: Power distracts, absolute power distracts absolutelyR. SURYAMURTHY AND G.S. MUDUR - 05 Apr 2020

https://epaper.telegraphindia.com/textview_326743_14936160_4__1_05-04-20...