Skip to main content

लॉकडाऊन : दहावा दिवस

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 03/04/2020 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, आज लॉकडाऊनचा दहावा दिवस. सकाळीच देशाचे पंतप्रधान काय बोलतील म्हणून काळजीनेच टीव्ही लावला. आज देशाला संबोधन करतांना विशेष काही नव्हतं. पण, ५ एप्रीलला रात्री ९ वाजता आपल्या घरातील वीज ९ मिनिट बंद करुन मेनबत्ती, मोबाईल फ्लॅश घराच्या गॅलरीत येऊन लावायचा आहे. भारतातील शक्तीचा परिचय द्यायचा आहे. सोशीयल डिस्टन्स ठेवायचा आहे. आपली एक जगभर लॉकडाऊनमुळे उत्तम प्रतिमा गेली वगैरे. आज अवघ्या दहा मिनिटात हे संबोधन संपलं. खरं तर मला आजचं संबोधन अजिबात पटलं नाही. मागचा अनुभव पाहता लोक आता काय करतील त्याची काळजी वाटली. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या उत्तम सहकार्याबद्दल कौतुक करुन पुढेही आपण तितक्याच जोमाने ही लढाई लढू. डॉक्टर्स आणि सर्व स्टाफ देशभर उत्तम सेवा देत आहेत. आणि आपणच विषाणुच्या या लढाईत जिंकणार आहोत आपलं सहकार्य हेच यश आहे, वगैरे काही तरी असायला होतं असं वाटलं. लोकांनी आपल्या घरातच थांबावं. अजूनही विषाणुचा कहर कमी झालेला नाही. जितका लोकांशी संपर्क टाळता येईल तितका टाळावा असेच सुचवावे वाटते. योग्य खबरदारी हीच आपली काळजी आहे. आता आपणही लॉकडाऊनला आता सरावलो आहे. सुरुवातीचे एक दोन दिवस गोंधळाची स्थिती होती. आता आपण विषाणुच्या लढाईत जरा नियंत्रण मिळवत होतो, जरा लोक जागरुकपणे सहकार्य करीत होते असे वाटत होते की, दिल्लीतील 'जमातच्या सदस्यांनी' देशभर एक भितीदायक वातावरण करुन टाकले. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज देशातल्या रुग्णांची संख्या अडीच हजारापर्यंत पोहचली आहे. अजूनही आपण भारतीय लोकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अजिबात घराबाहेर न पडणे हा सर्वोत्तम उपाय आहे. बाकी, घरातच पडीक असल्यामुळे सध्या तरी काही विशेष नाही. पुस्तकं चाळणे, एखाद्या पानात रमलो तर पुढे वाचायचं. नाही तर ठेवून द्यायचं. वाट्सॅपवर काहीच्या काही ढकलपत्रांना आवर घालणे. गप्प राहणे, तान न घेणे. हे पाळतोय. मंडळी, आपण गेल्या दहा दिवसात वेगळं काय केलं. एकूणच सध्याच्या परिस्थितीवर आपल्या सभोवती काय सुरु आहे, काय केलं पाहिजे, आणि आपलं काय सुरु आहे त्यासाठी लॉकडाऊनच्या धाग्याचा प्रपंच.

वाचने 46230
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्या काय म्हण्तोय ज्या वेळेस १ तास् भर 'अर्थ हवर' शेलेब्रेट करत असत्यात त्यावेळेस पण असेच उर्जा मण्त्रालय हादर्लेले असत्ये का? नाही म्हण्जे ९ मिनटात एवढा फरक पडणार म्हनुन विचारलाय..... https://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/Lights-to-go-o… https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-makes-it-to-Earth-Ho…

1A49D01 आपलं काम आहे, जे दिसतं ते लोकांसमोर ठेवणे. -दिलीप बिरुटे

मागच्या वर्षी रात्री साडे आठ ला "अर्थ अवर" म्हणून एक तास दिवे बंद करताना असले प्रश्न लोकांना का आले नाहीत याचा विचार व्हावा. https://gadgets.ndtv.com/others/news/earth-hour-2019-time-theme-india-da... https://currentaffairs.gktoday.in/earth-hour-2019-04201967558.html कदाचित ते पुरोगामी पणाचे लक्षण असल्याने त्याबद्दल कोणी काही बोलले नाही.

In reply to by pspotdar

आपले दुवे २०१५ आणि २०१६ चे आहेत. रेल्वेचे ग्रिड पूर्ण वेगळे आहे. रेल्वेची स्वतःची वीज केंद्रे सुद्धा आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Nabinagar_Thermal_Power_Project

In reply to by सुबोध खरे

in Executive Summary - IR has been procuring electricity as an ordinary consumer for its traction applications despite being the largest single user of energy in the country. Accordingly, it has been paying higher tariffs for energy duly taking the burden of distribution losses, cross subsidy and other surcharges of Power Distribution Companies (DISCOMs). http://www.indianrailways.gov.in/Mission_41K.pdf

In reply to by pspotdar

हो पण त्यांचे ग्रीड वेगळेच असते. महाराष्ट्रात वीज बंद झाली असताना सुद्धा बहुसंख्य वेळेस रेल्वे चालूच राहते. फारच क्वचित असे होते कि रेल्वेची वेगळी लाईन सुद्धा ट्रिप झाली.

*प ढ त मू र्ख* १) हर हर महादेव ही गर्जना करून युद्ध जिंकता येत नाही हे महाराजांनाही माहित होते. २) निव्वळ चले जाव ची घोषणा देवून इंग्रज पळून जाणार नाहीत हे महात्मा गांधींनाही माहित होते. ३) निव्वळ तळ्याचे पाणी पिल्याने जातीयता नष्ट होणार नाही हे बाबासाहेबांनाही माहित होते. ४) निव्वळ रक्त मागून स्वातंत्र्य मिळणार नाही हे सुभाषबाबूंनाही माहित होते. ५) निव्वळ जय जय रघुवीर समर्थ म्हणून हिंदू एकत्र येणार नाही हे रामदास स्वामींनाही माहित होते. ६) याचप्रमाणे दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे मोदींनाही माहित आहे. या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते हे ज्यांना समजत नाही त्यांना रामदास स्वामी पढतमूर्ख म्हणतात.

In reply to by सुबोध खरे

लोकाना मानसिक पातळीवर एक आणण्यासाठी हे सर्व करावे लागते हे मान्य परंतू वरील उदाहरणात एकाही लीडर ने " महामारी" सारखे अत्यंत गम्भीर प्रकरण भावनेच्या जोरावर हाताळले असेल असे वाटत नाही. वरील सर्व उदाहरणे मानव निर्मित समस्यांची आहेत. सध्याचे प्रकरण यापेक्शा वेगळे आहे. ते एक नैसर्गिक संकट आहे .लोकाना काय वाटते यापेक्षा सध्यातरी कोणता उपाय अधिक महत्वाचा आहे हे महत्वाचे. तो मोदीनी ओळखला आहे स्वीकरला ही आहे. पण ज्या प्रमाणे शरीराचे ऑपरेशन हे शरीर चालू ठेवून करावे लागते तसे मानवी व्यवहार काही पातळीवर दया तर काही बाबतीत मानव अधिकार वगैरे स्थगित ठेवून करावे लागते. काही विशिष्ट समाजाला घाबरून जर कठोर पणा आणण्याचे धाडस मोदीनी दाखविले पहिजे जसे इंदिराजीनी दाखविले होते .

In reply to by चौकटराजा

भारताला (हिंदुस्तानाला) विज्ञानवादी,उच्च शिक्षित पंप्र. ची गरज आहे असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

वाह डॉ .. अगदी बरोबर.. हे सगळे प्रतीकात्मक आहे. हे जाणून घायचे नाही आणि कुचेष्टा कार्याची ते सुद्धा अश्या गंभीर परिस्थितीत अशी घाण सवय लोकांना असते ... कारण एकाच पराकोटीचा साध्यचय्या सरकार आणि सत्ताधारी पक्षाचा विरोध... मग संधी मिळेल तिथे नुसतंय टपल्या होण्याच्या किंवा फुसक्या सोडायच्या " झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही जागे करता येत.." हेच bagaha पृथ्वीराज चव्हाणांचे विधान... रामायण आणि महाभारत बरोअबर इतर का नाही दाखवला... अरे हुशार नेत्या .. एक तर त्या मालिका या केवळ मनोरंजन साठी होत्या काही धर्म प्रसारासाठी नाही... आणि आहेत इथे ८०/१०० हिंदू त्यामुळे त्यांचं इतिहासावर किंवा संस्कृतीवरील कार्यक्रम दाखवले तर येवढए का झोंबत बे ! वरील ५/६ उदाहरणात अजून एक जुने उद्धरण बाळासाहेब ठाकरे यांचे .. रस्त्यावर नमाज पडायला आलेल्या जनते मुळे रहदारी चा खोळंबा होतो पण त्यावर त्यावेळचे सरकार गप्प ( भावना दुखव्याला नको) पण त्यावेळी सरकारला हे नाही समजले कि हा एक सामाजिक नागरिक प्रश्न आहे यात हिंदू मुस्लिम काही नाही मग याला उत्तर म्हणून बाळासाहेबांनी "महाआरती " ची घोषणा केली आणि सगळ्या हिंदूंना आवाहन केलं कि तुम्ही पण आरती साठी रस्त्यावर या आणि आडवा... त्यावेळी बाळासाहेबांना हे हि माहिती होतं कि असं नमाजसारखं महारारती वैगरे हिंदू धर्मात नाहीये... ती केवळ सरकारला त्यांचा येडे पणा दाखवून देण्यासाठी

संपूर्ण वीज बंद करू नका असा MSEB कडून अधिकृत मेसेज बील App वर येत आहे केवळ माहितीस्तव. मेन स्विच बंद करू नका. आता आम्ही सर्व लाइट बंद करणार नव्हतोच, कृपया हे सांगू नका. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by फुटूवाला

स्टॅबिलायझर जोडलेले नसलेले कोणतेही उपकरण बंद ठेवलेलेच बरे. म्हणजे मला असं वाटतंय. मी काही यातला तज्ञ नाही.

In reply to by फुटूवाला

फोटोशोप अगाध विषय आहे त्यात वेळ घालावा। बुद्धिभेद ही महाबला आहे. व् भारतीय लोक त्यात माहीर आहेत.

मी कारस् ९ मिनिटे सुरू ठेऊन कारचे पार्किंग लाईट लावणार आहे. हॅझार्ड लॅम्पपण लावणार आहे. एवितेवी बॅटरी चार्चिंगसाठी ते करायला लागणारच होते म्हणा. ९ मिनिटांचा असाही सदुपयोग करावा म्हणतोय. कोणाला असेच काही सदुपयोग सुचत असतील तर सुचवा