नमस्कार मिपाकर, आज लॉकडाऊनचा दहावा दिवस. सकाळीच देशाचे पंतप्रधान काय बोलतील म्हणून काळजीनेच टीव्ही लावला. आज देशाला संबोधन करतांना विशेष काही नव्हतं. पण, ५ एप्रीलला रात्री ९ वाजता आपल्या घरातील वीज ९ मिनिट बंद करुन मेनबत्ती, मोबाईल फ्लॅश घराच्या गॅलरीत येऊन लावायचा आहे. भारतातील शक्तीचा परिचय द्यायचा आहे. सोशीयल डिस्टन्स ठेवायचा आहे. आपली एक जगभर लॉकडाऊनमुळे उत्तम प्रतिमा गेली वगैरे. आज अवघ्या दहा मिनिटात हे संबोधन संपलं.
खरं तर मला आजचं संबोधन अजिबात पटलं नाही. मागचा अनुभव पाहता लोक आता काय करतील त्याची काळजी वाटली. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या उत्तम सहकार्याबद्दल कौतुक करुन पुढेही आपण तितक्याच जोमाने ही लढाई लढू. डॉक्टर्स आणि सर्व स्टाफ देशभर उत्तम सेवा देत आहेत. आणि आपणच विषाणुच्या या लढाईत जिंकणार आहोत आपलं सहकार्य हेच यश आहे, वगैरे काही तरी असायला होतं असं वाटलं.
लोकांनी आपल्या घरातच थांबावं. अजूनही विषाणुचा कहर कमी झालेला नाही. जितका लोकांशी संपर्क टाळता येईल तितका टाळावा असेच सुचवावे वाटते. योग्य खबरदारी हीच आपली काळजी आहे.
आता आपणही लॉकडाऊनला आता सरावलो आहे. सुरुवातीचे एक दोन दिवस गोंधळाची स्थिती होती. आता आपण विषाणुच्या लढाईत जरा नियंत्रण मिळवत होतो, जरा लोक जागरुकपणे सहकार्य करीत होते असे वाटत होते की, दिल्लीतील 'जमातच्या सदस्यांनी' देशभर एक भितीदायक वातावरण करुन टाकले. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज देशातल्या रुग्णांची संख्या अडीच हजारापर्यंत पोहचली आहे. अजूनही आपण भारतीय लोकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अजिबात घराबाहेर न पडणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
बाकी, घरातच पडीक असल्यामुळे सध्या तरी काही विशेष नाही. पुस्तकं चाळणे, एखाद्या पानात रमलो तर पुढे वाचायचं. नाही तर ठेवून द्यायचं. वाट्सॅपवर काहीच्या काही ढकलपत्रांना आवर घालणे. गप्प राहणे, तान न घेणे. हे पाळतोय. मंडळी, आपण गेल्या दहा दिवसात वेगळं काय केलं. एकूणच सध्याच्या परिस्थितीवर आपल्या सभोवती काय सुरु आहे, काय केलं पाहिजे, आणि आपलं काय सुरु आहे त्यासाठी लॉकडाऊनच्या धाग्याचा प्रपंच.
वाचने
46230
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थ हवर....
In reply to उर्जा मंत्रालय हादरलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं काम.
छोटासा बदल - जे सोयिस्कर
In reply to आपलं काम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मागच्या वर्षी रात्री साडे आठ
Goods trains are running on 25kV alternating current traction
आपले दुवे २०१५ आणि २०१६ चे
In reply to Goods trains are running on 25kV alternating current traction by pspotdar
Please refer below PDF from Indian Railway
In reply to आपले दुवे २०१५ आणि २०१६ चे by सुबोध खरे
हो पण त्यांचे ग्रीड वेगळेच
In reply to Please refer below PDF from Indian Railway by pspotdar
*प ढ त मू र्ख*
वा ! तरीही ..
In reply to *प ढ त मू र्ख* by सुबोध खरे
सहमत
In reply to वा ! तरीही .. by चौकटराजा
प्रतीकात्मक
In reply to *प ढ त मू र्ख* by सुबोध खरे
केंद्रीय उर्जा मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
संपूर्ण वीज बंद करू नका.
ग्रीड बंद पडो
In reply to संपूर्ण वीज बंद करू नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निष्कारणच्या लफड्यात पडण्यापेक्षा,
In reply to ग्रीड बंद पडो by फुटूवाला
स्टॅबिलायझर जोडलेले नसलेले
In reply to ग्रीड बंद पडो by फुटूवाला
अगदी
In reply to ग्रीड बंद पडो by फुटूवाला
मी कारस् ९ मिनिटे सुरू ठेऊन
हे वाचा