लॉकडाऊन : दहावा दिवस
नमस्कार मिपाकर, आज लॉकडाऊनचा दहावा दिवस. सकाळीच देशाचे पंतप्रधान काय बोलतील म्हणून काळजीनेच टीव्ही लावला. आज देशाला संबोधन करतांना विशेष काही नव्हतं. पण, ५ एप्रीलला रात्री ९ वाजता आपल्या घरातील वीज ९ मिनिट बंद करुन मेनबत्ती, मोबाईल फ्लॅश घराच्या गॅलरीत येऊन लावायचा आहे. भारतातील शक्तीचा परिचय द्यायचा आहे. सोशीयल डिस्टन्स ठेवायचा आहे. आपली एक जगभर लॉकडाऊनमुळे उत्तम प्रतिमा गेली वगैरे. आज अवघ्या दहा मिनिटात हे संबोधन संपलं.
खरं तर मला आजचं संबोधन अजिबात पटलं नाही. मागचा अनुभव पाहता लोक आता काय करतील त्याची काळजी वाटली. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या उत्तम सहकार्याबद्दल कौतुक करुन पुढेही आपण तितक्याच जोमाने ही लढाई लढू. डॉक्टर्स आणि सर्व स्टाफ देशभर उत्तम सेवा देत आहेत. आणि आपणच विषाणुच्या या लढाईत जिंकणार आहोत आपलं सहकार्य हेच यश आहे, वगैरे काही तरी असायला होतं असं वाटलं.
लोकांनी आपल्या घरातच थांबावं. अजूनही विषाणुचा कहर कमी झालेला नाही. जितका लोकांशी संपर्क टाळता येईल तितका टाळावा असेच सुचवावे वाटते. योग्य खबरदारी हीच आपली काळजी आहे.
आता आपणही लॉकडाऊनला आता सरावलो आहे. सुरुवातीचे एक दोन दिवस गोंधळाची स्थिती होती. आता आपण विषाणुच्या लढाईत जरा नियंत्रण मिळवत होतो, जरा लोक जागरुकपणे सहकार्य करीत होते असे वाटत होते की, दिल्लीतील 'जमातच्या सदस्यांनी' देशभर एक भितीदायक वातावरण करुन टाकले. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज देशातल्या रुग्णांची संख्या अडीच हजारापर्यंत पोहचली आहे. अजूनही आपण भारतीय लोकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अजिबात घराबाहेर न पडणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
बाकी, घरातच पडीक असल्यामुळे सध्या तरी काही विशेष नाही. पुस्तकं चाळणे, एखाद्या पानात रमलो तर पुढे वाचायचं. नाही तर ठेवून द्यायचं. वाट्सॅपवर काहीच्या काही ढकलपत्रांना आवर घालणे. गप्प राहणे, तान न घेणे. हे पाळतोय. मंडळी, आपण गेल्या दहा दिवसात वेगळं काय केलं. एकूणच सध्याच्या परिस्थितीवर आपल्या सभोवती काय सुरु आहे, काय केलं पाहिजे, आणि आपलं काय सुरु आहे त्यासाठी लॉकडाऊनच्या धाग्याचा प्रपंच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आजचं आवाहन खरंच कायच्याकै
सहमत आणि काही असहमती.
वेडेचाळे
आभार.
कोणत्याही प्रतिकात्मक कृतीचे
सगा सर,
हं...!
परिप्रेक्ष्यणीय
तर्कविसंगत कसे
प्रतिसादात सांगितलं की.
विखारी टीका
अगदी बरोबर मेडिकल स्टाफवर हात
भाषणाच्या बाबतीत सहमत.
सहमत.
मी पयला...
महाभारत पण बघा, डीडी भारतीला
.
सर्व जण श्री नारायण सुरवे कधी
मोदींच्या कामकाज पद्धतीची
काल दुसर्या धाग्यावर व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतोय
camera app - with video start timer
लिंक दुरुस्ती
माणूस आणि जीवजंतू...
याला म्हणतात प्रतिसाद !!
छोट्या छोट्या निवेदनांसाठी
सध्याच्या घडीला घराबाहेर न
पर्सनलवर...
सहमत !
त्यापेक्षा मोबाईलमधली
धन्यवाद !
द्या टाळी !
माझा तर फोनच हरवलाय.
धर्मराजमुटके 12/25/19
हाच मेसेज होता का आणखी कोणता
माझे दोन लाख धन्यवाद !!
जखडल्याचं फीलिंग आलेल्या
+१
काहीही समर्थन...!
हाच विचार या प्लॅनमागे असावा
सहमत गवी
सहमत
सहमत
व्हेंटीलेटर.
घ्या !
हा हा
लावून धरावी लागतेय
धर्माचा / संस्कृतीचा संदर्भ एक क्षण बाजूला ठेवूयात
>>>भारतासारखाय "श्रद्धाळू"
तुम्ही जिकलात...
सार्वजनिक खूण