एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Feb 2020 - 4:05 pm

ज्या कृष्णांना राधा नसतात
आणि ज्या राधांना कृष्ण नसतात
त्यांनी काय करावे ?
ज्या कृष्णांना राधा असतात
आणि ज्या राधांना कृष्ण असतात
त्यांचे मनोमन कौतुक करावे
त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा
आदर करावा किमान राधेच्या
चारित्र्याचे उगाचच जज बनू नये.

ज्या कृष्णास राधा भेटत नाही
ज्या राधेस कृष्ण भेटत नाही
त्यांनी काय करावे?
न मिळालेल्या जोडीदाराच्या
निवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे
किमान न मिळालेल्या जोडीदाराच्या
जोडीदाराची इर्षा करु नये.
प्रेम पझेसिव्हनेस देत पण
पझेसिव्हनेस आणि आशाभंगण्यातून
येणारे दु:ख्ख दुसर्‍याच्या
निवडस्वातंत्र्याची जागा घेऊ शकत नाही.
त्यामुळे दु:ख्ख आणि राग बाजूस ठेऊन
खर्‍या प्रेमिका प्रमाणे प्रेयसाच्या अगदी
प्रत्येक निर्णयावर सकारात्म्क
प्रेम करावे, केवळ आणि विनाअट प्रेम करणारे
एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

खिलजीकाव्याचे विडंबन नाही अनुषंगिक प्रेर्ना मात्र आहे.

आरोग्यदायी पाककृतीकालगंगाकैच्याकैकविताखिलजी उवाचप्रेम कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविताशांतरसप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

==================

राधेचा कृष्ण कि कृष्णाची राधा

खरंच हे प्रेम कि गेमाची बाधा

कलियुगात बहू भेटती कृष्ण

सबला नारी व्यभिचाराने जीर्ण

कळी उमलता खुडण्यात येते

भुलवून तिजला भासवुनी कृष्ण

कृष्ण थोर कि थोर त्या लीला

आजही दुभंगती अबला राधा

अलगद त्यांचे यौवन शोषूनी

कृष्ण राहतो नामानिराळा

राधा साजरी परी गोजिरी कुटुंबा

कृष्णकृत्य जे कलियुगी , कृष्ण वेगळा तो कृष्ण वेगळा

=================================

प्राची अश्विनी's picture

20 Feb 2020 - 8:15 am | प्राची अश्विनी

आवडली कविता. आणि पटलीसुद्धा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Feb 2020 - 9:11 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता आवडली पण पटली नाही
विशेषतः

ज्या कृष्णांना राधा असतात
आणि ज्या राधांना कृष्ण असतात
त्यांचे मनोमन कौतुक करावे

हे अजिबात पटले नाही.

पैजारबुवा,

श्वेता२४'s picture

20 Feb 2020 - 2:40 pm | श्वेता२४

किमान राधेच्या
चारित्र्याचे उगाचच जज बनू नये.

अगदी. साधी, सरळ ,पण विचार करायला लावणारी कविता.