भटकंती

Yogesh Sawant's picture
Yogesh Sawant in भटकंती
30 Sep 2019 - 14:38

सह्याद्रीतले हिरे माणके

महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किनारपट्टीला समांतर पसरलेली जी डोंगररांग आहे तिला आजकाल Western Ghat असं म्हणतात. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागापासून सुरु झालेली हि डोंगररांग महाराष्ट्राच्या पलीकडे गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. पृथ्वीवरच्या सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी हि एक जागा आहे.

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in भटकंती
29 Sep 2019 - 18:39

शोलिंग-नल्लूरची प्रत्यङ्गिरा (प्रत्यंगिरा) देवी

सकाळी सकाळी इ-मेल्स पहात असताना अचानक ऑफिस ऑर्डर दृष्टीस पडली !
“येत्या सोमवार पासून चेन्नै ऑफिसला रिपोर्ट करावे लागेल! ” चला, इथला मुक्काम संपला, मी मनाशी म्हटले.

स्मिता दत्ता's picture
स्मिता दत्ता in भटकंती
29 Sep 2019 - 13:03

डुब्रॉवनिक ....!!!!!

सकाळी नेहमी प्रमाणे लवकरच पहाटे जाग आली, पाच वाजलेले. ऊठून आवरायचं होतंच.नाश्ता पण करून बरोबर घ्यायचा होता. कारण बोटीवरती काय खायला मिळते माहित नाही, त्यामुळे मग फ्रेंच टोस्ट करून घेतले. सोबत नेहमीप्रमाणे छत्री, पाणी असा जामानिमा होताच. सकाळी साडेसहाची टॅक्सी बोलावली. लवकरच पोर्टवर पोहोचायचं ठरवलेलं इकडे तिकडे थोडं फिरता येईल म्हणून. तिथे बोट लागलेली होती पण दरवाजे बंद होते.

Yogesh Sawant's picture
Yogesh Sawant in भटकंती
27 Sep 2019 - 23:14

बाबा आणि खुशीची नेपाळ सफर

"तुझी लढाई फक्त तुझ्या स्वतःबरोबर आहे. दुसऱ्या कुणाबरोबर नाही. इतरांकडे लक्ष देऊ नकोस." बाबा ऐकत होता. अडकून पडलेलं एक दार उघडत होतं. बाहेरून मदत मिळाल्यावर बऱ्याच वर्षांपासून अडकलेलं दार उघडलं. एके दिवशी बाबा विचार करत होता, "जर आपण दार अडकूच द्यायचं नाही असं ठरवलं तर?" ठरवणं हि पहिली पायरी. सतत जागरून राहून प्रयत्नपूर्वक पुढे जाणं हि योग्य वाटचाल. आपली वाट आपणच शोधावी लागते.

रिकामटेकडा's picture
रिकामटेकडा in भटकंती
26 Sep 2019 - 17:39

बाइक, पाऊस आणि कोकण

रात्रीचे ८.३० वाजून गेलेले सततच्या पावसामुळे आधीच शांत असलेले कोकण गुडूगुप होऊन झोपून जायच्या मार्गावर होतं. स्वरुपानंद स्वामींच्या पावसच्या आश्रमातून बाहेर पडून समोरच आईस्क्रीम खात उभे होतो. पाउस पडतच होता. दुकानदार काळजीपोटी म्हणाला आता नका जाऊ पुढे रत्नागिरीत. मधल्या रस्त्याला बिबट्याने दोघा तिघांना जखमी केलंय. मी फक्त हं म्हटल आणि आईसक्रिम खाऊन झाल्यावर बाईक ला स्टार्टर मारला.

मित्रहो's picture
मित्रहो in भटकंती
26 Sep 2019 - 08:45

सायकल दौरा पूर्वेचा घाट- असा घातला घाट ३

तिसरा दिवस सर्वात कठीण आहे याची पूर्ण कल्पना होती. तशी मानसिक तयारी दौऱ्याच्या आधीपासूनच झाली होती. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेला परत विचारण्यात आले.
“उद्या सर्वजण चढ चढणार आहेत का? चढ मारेडमल्लीपेक्षाही कठीण आहे.”
“प्रयत्न करु या” सर्वांचे हेच उत्तर होते.

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
23 Sep 2019 - 21:52

अक्कलकोट मठ आणि संस्थान

अक्कलकोट काय आहे बघू म्हणून प्रथमच गेलो होतो. भरपूर पाऊस असल्याने गाड्या वेळेवर जातील का शंका होती.

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in भटकंती
23 Sep 2019 - 11:33

डेट्रॉईट , शिकागो , न्यूयॉर्क ट्रीप साठी मार्गदर्शन हवे आहे

पुढच्या महिन्यात डेट्रॉईट्ला एका कार्यक्रमासाठी जायचे आहे.
हातात दहा बारा दिवस आहेत. तीन चार दिवस शिकागो आणि कार्यक्रम झाल्या नंतर तीच चार दिवस न्यूयॉर्क फिरावे असा विचार आहे.
माझ्या सोबत कुटुंब आणि तीन ज्येष्ठ नागरीक आहेत.
शिकागो आणि न्यूयॉर्क साठी एखादी गायडेड टूर कंपनी / व्यवस्था होऊ शकेल का ?
याबद्दल कोणी मार्गदर्शन हवे आहे.

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
21 Sep 2019 - 22:36

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ४ : चंद्रशिला शिखर आणि तुंगनाथ

ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा :
Chopta Chandrashila Trek | Part 4 | Chandrashila Summit 13100 ft | Tungnath Mandir
आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा.

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in भटकंती
21 Sep 2019 - 18:25

थिबा पॅलेस

गेल्या काही वर्षांत शेकडो वेळा रत्नांग्रीस जाणं झालं असेल. पण तिथला तो फेमस थिबा पॅलेस आतून पहायची कधी संधीच मिळाली नाही. जांभ्या रंगाच्या अस्सल कोकणी मातीशी नातं सांगणाऱ्या लाल भिंतींची ती ऐसपैस इमारत लांबूनच कितीतरी वेळा खुणावायची. पण थिबा पॅलेसला मुद्दाम भेट द्यावी असंही कधी सुचलं नाही.

मित्रहो's picture
मित्रहो in भटकंती
19 Sep 2019 - 13:16

सायकल दौरा पूर्वेचा घाट- का, कुठे, कसा?

का घातला घाट?
या प्रश्नाला एकच उत्तर आहे शौक (हाच शब्द अधिक सोज्वळ आहे). खरे सांगायचे तर सायकलिंग हा शौक आहे, छंद आहे. निव्वळ फिट आणि तंदुरुस्त राहायला बरेच स्वस्तातले उपाय उपलब्ध आहे. शौक असल्याशिवाय कुणीही सायकलिंगवर पैसे उधळायला तयार होणार नाही. हा असा एकमेव शौक आहे ज्यावर पैसे उधळले तरी बायको विरोध करीत नाही.

सान्वी's picture
सान्वी in भटकंती
19 Sep 2019 - 01:28

केरळ मध्ये फिरण्यासंदर्भात माहिती हवी आहे

आम्ही डिसेंबर महिन्यात केरळ मध्ये मुन्नार व आलेपी येथे फिरायला जाण्याचे नियोजन केले आहे. खूप वर्षांपासून केरळ पाहण्याची इच्छा शेवटी पूर्ण होणार आहे. कुठल्या टूर कंपनी बरोबर नसून आम्ही आमचे प्रवास करणार आहोत. सोबत २ वर्षांचा मुलगा आहे.
मुन्नार येथे 4 दिवस आणि अलेपिला 2 दिवस मुक्काम आहे. कोणी जाऊन पाहिले असल्यास काय पाहावे हे सुचवा.