जे न देखे रवी...
घनदाट गर्द रेशमी केशकुंतल
घनदाट गर्द रेशमी केशकुंतल
नेत्रास कोरले काजळ कि सोमल
तनुत रातराणीची मादक दरवळ
गात्रात मदनाची बेफाम सळसळ
*
नजर, कधि लाजरी, कधि नाचरी
रतिरुप,नखशीकांत तु लावण्य परी
वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी
रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी
*
वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली
तव उरास काचे ,भर्जरी काचोळी
देहात रानवारा,उसळे उधाण लाटा
काल धरण बांधिले
काल धरण बांधिले
खेकड्यांनी हो तोडिले
येरू म्हणे बघा नीट
विठू चरणीची वीट
सृष्टीचा जो तोले भार
त्यासी विटेचा आधार
युगे अठ्ठावीस ठेला
विठू विटेवरी भला
वीट अजूनी अभंग
बघणारे होती दंग
मूळ माल जर नीट
(जशी विठ्ठलाची वीट)
तर फिजूल बोभाट
नको खेकडी खटपट
कधीकधी मी हळवा होतो , बघुनी देव दानवांत
कधीकधी मी हळवा होतो
बघुनी देव दानवांत
का उगविली हि बीजे तू ?
अर्धपोटी मानवात
कधीकधी मी कठोर होतो
बघून साऱ्या वेदनांना
भळभळ त्या वाहत असतात
पण पुन्हा करतो सुरुवात
कधीकधी मी हळहळतो
कोमेजल्या कळ्या बघुनी
नव्या उमलताना बघून
त्याला करतो कुर्निसात
कधीकधी मी बिथरतो
भविष्यकाळ चिंतूनि
सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात
सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात
तुम्ही हसा प्रसन्नतेने ,मग बघा आजूबाजूला कश्या चीता पेटतात
तुमच्या हसण्याची किंमत , तुम्हालाच ठाऊक नाही
तुम्हाला हसताना बघून, त्यांचं स्वतःच कामच होत नाही
त्यांचं खिन्नपण जणू तुमच्याशीच निगडित असतं
वाया घालवत असतात वेळ , हळूहळू प्रारब्ध बदलत असतं
रोवूनीया झेंडे कैक , कैफ मिरविती एकमुखाने
प्रेम कोडगे घेऊन फिरलो
पुन्हा तेच अगम्य कोडे
प्रेम कोडगे घेऊन फिरलो
कुठे कुठे शोधले तुला सखे ?
वैतागून हळूच पिवळा झालो
तू नाही भेटली तरीही
शोधली तुला अर्धांगिनीत
भेट अधुरीच राहिली आपुली ,
शोधून पुरता अर्धा झालो
अर्थ अनर्थ घेऊनि सारे
गहिवर आला स्वप्नाचा
माळ फुलांची सुकून गेली तरीही
सुवास दरवळे प्रेमाचा
पूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे आता एक टपरी झालीय
पूर्वी आपण जिथे भेटायचो
तिथे आता एक टपरी झालीय
एक तपानंतर पुन्हा कप घेतला हाति
पण कटिंग इथली जर्रा बरी झालीय
वळणे घेत घेत तू तिथून , तर मी कुठून कुठून यायचो
कधी तू तर कधी मी , या इथेच झाडामागे तोन्ड लपवायचो
मी घाबरून तुलाच म्हणायचो , हळहळू तुझि डेरिंग बरी झालीय
त्या झाडामागे बराच इतिहास घडला
तो काळ सुवर्णाक्षरात लिहावा असा
पावसाविषयी असूया
पावसाविषयी असूया
पाहून माझे खुप हाल झाले
पावसाने केले तुझे केस ओले
गवतावर पडताच पाऊल शहारले अंग
भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग
पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली
तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली
ओली करून साडी पाऊस मातलेला
बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला
तर्काच्या सीमेवर तेव्हा
स्थलकालाचे ताणेबाणे
जटिल, चिवट पण तटतट तुटले
घालित अवघड नवे उखाणे
जडातुनी चैतन्य उमलले
सप्तरंग लवथवले, मिटले
सप्तसूर झंकारुन शमले
भवतालाला भारून काही
पुन्हा निवांत झाले
तर्काच्या सीमेवर तेव्हा
अतर्क्य भेटुनी गेले
सर्पणाला एकदा पालवी फुटली
सर्पणाला एकदा पालवी फुटली
त्यालाही जगण्यात मजा वाटू लागली
सर्पणच ते चुलीत जळायचेच होते
इतरांसारखेच राख होऊन वर जायचे होते
प्रेतांच्या ढिगाऱ्यात असेच पडून होते
स्वगत सर्पणाचे ==
फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ?
कधी राख होईन , हि भीती मनात
पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ
जगावे वाढावे ते कोणा प्रित्यर्थ ?
पृथ्वी उवाच
पृथ्वी उवाच....
तलखी ने कासावीस हा जीव,
दाह घेई सर्वांगाचा ठाव,
उदरात घुसमटे बीजांचा जीव,
निलाकाशीच्या देवा घे तूच आता धाव.
आक्रमू दे आकाश हे जलदांनी,
येऊ दे रे आभाळ हे भरूनी,
लखलखत्या विद्युल्लतानी,
रणसंगर होऊ दे ह्या गगनी.
पावसा पावसा पड रे
पावसा पावसा पड रे
---------------------------------------------------
पावसा पावसा पड रे
लागू देत झड रे
पाऊस पडला संततधार
सगळं झालं हिरवंगार
रान सारे चिंब झाले
वाहू लागले नद्या नाले
पावसा पावसा पड रे
लागू देत झड रे
पावसा पावसा पडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस
------------------------------------------------------
ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस
आम्हाला आहे खेळायचं
खेळताना तू येऊ नकोस
क्रिकेटचा खेळ आलाय रंगात
त्याच्यामधे खो घालू नकोस
ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस
कोडगं व्हायचं...
खुशाल कोडगं व्हायचं
कशाला मनाला लावून घ्यायचं
मनाला लावून घेण्याने परिस्थिती
थोडीच बदलणार आहे
अवतीभवतीची माणसं
थोडीच बदलणार आहेत
कशाला पाहिजे हळवं संवेदनशील मन
लहान सहान गोष्टींनी चरे पाडून घ्यायला
ओरखडे पडायला
काय सुख मिळतं संवेदनशील मनाने
चार ओळी लिहिता येतात
पानभर खरडता येते... एवढंच
सरळ निर्लज्ज व्हायचं
ऑफिसात जाऊन आलो
ऑफिसात गेलो,
गप्पा मारून आलो
कॅन्टीनला जाऊन मी
भजे खाऊन आलो
जरी थेंब पावसाचे आले
ओला .. भिजून आलो
भांबावल्या दुपारी
झोपा काढून आलो
होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
पाट्या टाकून आलो.. ?
पाकीट जरी रिकामे
अकाऊंट भरून आले..
चुकू मुळी न देता
लॉगिन करून आलो.
तुझे शहर
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय –
डोळे न उघडता तुला पाहून आलेय
रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे –
तुझा हात घामेजला आहे
मंदिरातले कासव ओलांडले आहे –
तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे
दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे –
लोबानचा गंध दरवळत आहे
मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे –
हात चिकट, तोंड गोड झाले आहे
कविता पिंपळपान
कविता सुचत नाही
मन ही रितेच काही
लिहू काय? म्हणता म्हणता
सापडले ओले पान.
ही कविता पिंपळपान!
थेंब थेंबा जाग आली
रेष रेषा बोलू लागली
ना लिहिता आले कैसे
मज लेखणिस भान?
ही कविता पिंपळपान!
हे असेच असते सारे
ना सुचता हलते वारे
पाचोळा नसता कोठे
गर्द जागे होते रान
ही कविता पिंपळपान!
बिल देऊन आलो..
सांगावयास गेलो,
ऐकून काय आलो?
सुनावलेस तू, मी
बिल देऊन आलो..
सैराट पावसाने
पुरता.. भिजून आलो.
त्या गोठल्या दुपारी
बिल देऊन आलो..
हात होता तुझा
अन कानशील माझे
लोकां उमजण्याआधी
बिल देऊन आलो.
चालते होणे त्वरे
सोपे गेले तुला
वेटराने हटकले, मी
बिल देऊन आलो.
असा पाऊस
नभातून पडावा पाऊस
मनात उतरावा पाऊस
धरतीमध्ये थेंब थेंब
रुजवावा पाऊस
झाडांवरल्या थेंबातूनी
झरावा पाऊस
कौलांच्या पागोळ्यांतूनी
ओघळावा पाऊस
हातातल्या ओंजळीत
पकडूनी प्यावा पाऊस
अधिर ओठांचा स्पर्शाने
हलकेच चुंबावा पाऊस
ललनेच्या केसांतूनी
झटकावा पाऊस
गावा पाऊस घ्यावा पाऊस
पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस
कुरळ्या बटावर माझ्या
तू"
रेशमी सुगंधात माझ्या होऊनि सुगंध दरवळतोस तू
कुरळ्या बटावर माझ्या होऊनि वारा ऊनाडतोस तू
*
टपो~या डोळ्यात माझ्या,होऊनि काजळ राहतोस तू
गो~या भाळावरी माझ्या होऊन बिंदि विराजतोस तू
*
लाल अधरावरी माझ्या ,होऊनि गीत गुणगुणतोस तू
गळ्यात माझ्या होऊनी मोतियाची माळ सजवतोस तू
*
रंगी बेरंगी चुड्यात माझ्या होऊनि सप्तरंग उतरतोस तू
(व्हिस्की पिऊन आलो...)
प्राची ताई, ज्ञानोबाचे पैजार व नाखु साहेबांची मनातल्या मनात क्षमा मागून
भेटावयास गेलो,
करून काय आलो ?
बोलावलेत तुम्ही,
व्हिस्की पिऊन आलो...
ना थेंब दिला सोड्याचा
चखना फुकट दिला...
पाण्या सवेत केवळ,
व्हिस्की पिऊन आलो...
होते मित्र चार आणि...
नव्हती कुणीही रमणी,
बायकोस हे पटेना...
व्हिस्की पिऊन आलो...
- ‹ previous
- 54 of 468
- next ›