जे न देखे रवी...
ओल्या खुणा
हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा
हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा
फुले शोधता लागला जिव्हारी काटा
डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा
नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे
उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे
हरवून दूर गेली ओळखीची वाट
मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट
मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले
प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले
वसंतात मृगजळ खास
काठावरचे गुपित झेलता
अनु'मतीची महत्ता विशेष
वसंताचे मृगजळ खास
कटी बंधात उष्म निश्वास
नभी नाभी ताम्र गोल
चा'लते जातो तोल
आर्त कुंजन
आस पास
पर्ण विरहीत पुष्प तटी दाट
दिंगबर सुरेख मदन पाझरतो
.
.
.
.
.
.
.
वैशाखाची ऊन्हं ..
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली,
वळीवाची आठवण उमलून आली.
बहाव्याने केली रिती फुलांची पखाल,
पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली..
सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे,
वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे.
चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी,
धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे.
(थू)
पेर्णा पाभे सरांची तू
http://misalpav.com/node/50075
थू -१
तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग
अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग
तू हसते अशी छाती माझी धडधडे ग
गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग
तू
तू चालते अशी झाडावरची वेल ग
अंगावरती पानं फुलं ल्यायते ग
तू हसते अशी झरा वाहतो ग
खळखळाटानं हासणं पिकतं ग
तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग
येता येता सुगंघ आणतो ग
तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग
बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग
तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग
तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग
- पाषाणभेद
२९/०४/२०२२
उष्णकटिबंधीय वसंत
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
रोज किती पाणी प्यावे?
रोज किती पाणी प्यावे?
शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे
रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
आठवतो आज पुन्हा...
आठवतो आज पुन्हा
माझा गाव माझी माती
सारं काही सोडले मी
वितभर पोटासाठी.
बरसून येती मेघ
भिजूनिया जावे चिंब
ओंजळीत पावसाचे
झेलूनिया घ्यावे थेंब
घेवूनिया हाती काठी
जात होतो पोरं पोरं
माळावरी चरावया
घेऊनिया गुरं ढोरं.
रानपाखरांच्या जैसे
रानिवणी हिंडण्यात
किती आठवू ते दिस
मौज होती जगण्यात.
कविता वसंत ऋतु
-
*वसंत ऋतु*
टपो-या कळीचे होई फुल,
दरवळे सुंगध मोग-याचा,
जाई, जुई, चाफा ही फुलतो,
शिडकावा होई प्रसन्नतेचा !!
अत्तराच्या कुप्या जणू का
फुलांमधी लपल्या असती,
सुगंध तयांचा वा-यासवे ,
वाहत राहे सभोवती !!
मरीआई बारागाड्या यात्रा
भुसावळात बारागाड्या ओढताना भीषण दुर्घटना; एक भाविकाचा मृत्यू, चौघे जखमी
https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/one-devotee-was-lo...
कळले मला न काही.
कळले मला न काही हा रुसवा कशास सजणी
डोळ्यात दाटले का हे आता तुझ्या ग पाणी.
कसला म्हणू अबोला तू गुमसुम कशास असशी
सांगून टाक आता जे सलते मनात राणी.
येता धुके असे हे बघ दाटून प्राक्तनाचे
जवळी असून सारे ते अपुले असे न कोणी.
ही रात चांदण्याची बघ भिजली दवात सारी
या चांदण्या क्षणात कुणी गाते उदास गाणी.
वासंतिक
सुरांबरोबरच कुंचल्यातून उतरलेली माझी कविता...
व्हिडिओ पण नक्की पाहा आणि अभिप्राय जरूर कळवा.
हिंडोल छेड भ्रमरा, सुमनांत आज,
स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥धृ॥
ती शाल्मली बहरली, फुलला पलाश,
आरक्त कुंकुम गमे, तबकात खास।
ये औक्षणास अवनी, चढवून साज
स्वर्गातुनी उतरला ऋतुराज आज ॥१॥
ईट्स माय लाईफ
हे तुटलेल्या हृदयासाठी गाणे नाही
विश्वासाने निघून गेलेल्यांसाठी मूक प्रार्थना नाही
आणि मी गर्दीत फक्त एक चेहरा बनणार नाही
जेव्हा मी मोठ्याने ओरडतो तेव्हा तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल
हे माझे जीवन
आहे ते आता आहे किंवा कधीच नाही
पण मी कायमचे जगणार नाही
मला फक्त मी जिवंत असताना जगायचे आहे
(हे माझे जीवन आहे)
पंचमीतले रंग सांडले........
पंचमीतले रंग सांडले
झाडांनी ते बघा झेलले
डोक्यावरती तुरे गुलाबी
धुंद होऊनी फाग नाचले
लुसलुशीत ही कवळी पाने
मोहरून गेली सर्वच राने
आंबोळ्या निंबोळ्या सवे खेळती
ओढून नुतन वस्त्रे गर्द पोपटी
कोण चितारी चित्र काढतो
रंगांची रागदारी मांडतो
कोकीळ मंजुळ कुजन करते
मन मुदित हिंदोळ्यावर झुलते
कसरत
२९-३-२०२२
50 लाखांचं घड्याळ
खातोश्री
(50 लाखांचं घड्याळ)
टिक टिक टिक टिक
टिक टिक टिक टिक
चालते आहे घडी.
भ्रष्टाचार धूण्याची हो
सापडेल का कुठे वडी?
2 कोटी च्या भेटीनं
उभारली पाडवा गुढी
डायरी मधे नोंद पहा
मिळाली आहे बडी
कुटूंबाची चंगळ चाले
बांधली राष्ट्रवादी घडी
तीन नापास, सत्तेत आले
खेळून एक डाव रडी
प्रवास
अथांगाचा तळठाव
अज्ञेयाचा पैलतीर
विराटाची पराकाष्ठा
सूक्ष्मातील शून्याभास
खुणावती ऐसे सारे
क्षणोक्षणी अविरत
जरी जटिल तरीही
जीवा लावतात ध्यास
नादावतो या ध्यासाने
ठेचाळतो जागोजाग
असे खडतर तरी
भूल घाली हा प्रवास
एक भास
अपूर्वाई कोंदणात
तुझ्या माझ्या प्रितीत
चांदण....लख्ख प्रकाश|
सांज रंगी उधळतात
आठवणी मोती झेलत
निशब्द....मंद श्वास|
शोधे जादूई तळ्यात
मासोळी नयनांत
पाणकळा...तुझं आकाश|
मोरपंखात निथळत
कृष्ण मुरली सुरांत
राधा...एक भास|
-भक्ती
(हायकू लिहिण्याचा एक प्रयत्न)
बकध्यान....
http://www.misalpav.com/node/50007/backlinks
श्रीमान बाजीगर यांनी मांडलेल्या विषयाची दुसरी बाजू.....
रिकामटेकडा मी खरडतो चार ओळी
नका शोधू यात जोडगोळी कुणाची
पहिलेच सागंतो मी ही तर कसरत अक्षरांची
नाहीतर उगा द्याल मज शिवीगाळी फुकाची
- ‹ previous
- 20 of 468
- next ›