#तू म्हणालास

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
16 May 2022 - 7:10 pm

#तूम्हणालास

तू म्हणालास "सवय लावून घेऊ नये"
"मन बिघडू देऊ नये, उगा जीव लाऊ नये."
पण "नये नये" चा पाढा कधी अर्ध्यावरती चुकतोच ना?
मुकाट्यानं त्याचे परिणाम भोगत आपण असतोच ना?
कित्ती दिवसांत भेट सोडा, एक साधा शब्द नाही.
कुणी वेडं वेड्या सारखं वेडी वाट बघतंच ना?
"कामात व्यस्त" पटतं, "अपेक्षा चूक" कळतं.
पण मोबाईल हातामध्ये रोज घेऊन बसतंच ना?
मगं कुणी ठरवतं, आता मात्र बदलायचंच.
वेडेपणा सोडून आता शहाण्यासारखं वागायचंच.
यापुढे आपणहून बोलायला कधी जायचंच नाही.
समोरसमोर (समजा) आलोच तरी भेटायचं तर नाहीच नाही.
हो नाही च्या पुढे गाडी कधी न्यायचीच नाही
एकदा ठरलं म्हणजे ठरलं, दगडावरची रेघ जणू!
असूदे का डोळ्यामध्ये आषाढातले मेघ घनु!
एक दिवस जमेलच. लत सुद्धा सुटेलच.
...
असं छान चालू असतं, इतक्यात काय होतं,
मोबाईलच्या स्क्रीनवर एक नाव येतं.
"नाही म्हणजे नाही, फोन मुळीच घ्यायचा नाही", मन याद देतं.
पण कुठतरी आत आत गाणं वाजू लागतं,
"एक आदतसी बन गये हो तुम
एक आदतसी बन गये हो तुम..
और आदत कभी नही जाती.."

( ये ज़ुबाँ हमसे सी नहीं जाती
ज़िन्दगी है कि जी नहीं जाती
....
एक आदत-सी बन गई है तू
और आदत कभी नहीं जाती

ही दुष्यंतकुमारची एक फार सुंदर कविता आहे)

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2022 - 11:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त. आवडलं.

आपणहून बोलायला कधी जायचंच नाही.

हे तर पाच पन्नास हजार वेळा ठरवून झालेलं असतं.
काही नसतं. ठाम राहताच येत नै. सर्व 'पण' क्षणात मोडून जातात.

एक आदतसी बन गये हो तुम..
और आदत कभी नही जाती..

विषयच संपला.

-दिलीप बिरुटे

श्रीगणेशा's picture

27 May 2022 - 8:17 am | श्रीगणेशा

एकदा ठरलं म्हणजे ठरलं, दगडावरची रेघ जणू!
असूदे का डोळ्यामध्ये आषाढातले मेघ घनु!

खरं आहे! छान लिहिलंय!!

नेहमी सारखंच. अप्रतीम! :-)