Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माहितगार on Mon, 04/25/2022 - 12:43
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 04/25/2022 - 18:57

Permalink

वसंतॠतू

पुरणपोळ्या पचल्यावर साखरेच्या गाठ्या दिसल्यावर आभाळातली पाने खाली पडल्यावर जमीनी वरची फुलं आभाळात गेल्यावर जेव्हा नसती हुरहूर संपते आणी मनी उधाण वारे शिरते तेव्हा समजावे शिशीराचे दिवस सरले आणी ऋतुराज वसंत अवतरले. मुक्तक आवडले
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Fri, 04/29/2022 - 09:46

Permalink

व्वा!

व्वा!
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 04/29/2022 - 15:49

Permalink

अरे वा अजून एक प्रतिसाद आला,

अरे वा अजून एक प्रतिसाद आला, मला माझ्या कवितेपेक्षा कर्नल तपस्वींचा काव्य प्रतिसाद अधिक आवडला. दोघांचेही आभार
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगणेशा on Fri, 05/27/2022 - 08:38

Permalink

मुक्त कविता आणि कर्नल

मुक्त कविता आणि कर्नल साहेबांचा प्रतिसाद दोन्हीही आवडलं!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3549 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com