दहाजणीत!

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जे न देखे रवी...
22 Oct 2009 - 4:32 pm

आमची प्रेरणा... पण जाऊ द्या...

दहाजणीत!

कांदेपोह्यासाठी जाताना
तो स्वतःशीच म्हणाला
"शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध -
की नोकरी ?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा,
ठसका लागून अंधुकसा फुटलेला एक हुंदका
'हे पोहे तिनेच केले असतील तर
जवळची एक बरी मेस पाहून ठेवायला हवी...'
***
आपले विरळ केस चापून बसवताना
तिच्याकडं पाहिलं त्यानं
तेव्हा तिच्या 'स्थौल्या'तही त्याला
एक संख्या दिसली...
(तिच्या 'टेक होम' ची?)
दिसणं, आणि असणं
हे एकच की..
हेच उमजून त्याने घाम पुसला...
उंचावत किंचित जाडशी अशी तिची मान
एकाकी (जराशा तिरळ्या) नजरेनं
त्याच्याकडंच पाहात
ती स्थौल्या म्हणाली,
"इश्श, बाबा, हा टकलाच का मिळाला तुम्हाला?!"

भयानकविडंबन

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

22 Oct 2009 - 4:34 pm | पर्नल नेने मराठे

:D

चुचु

मदनबाण's picture

22 Oct 2009 - 4:35 pm | मदनबाण

'हे पोहे तिनेच केले असतील तर
जवळची एक बरी मेस पाहून ठेवायला हवी...'

हा.हा.हा... लयं भारी...

मदनबाण.....

रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

अमृतांजन's picture

22 Oct 2009 - 4:42 pm | अमृतांजन

मस्त! खुसखुशीत!

टारझन's picture

22 Oct 2009 - 5:01 pm | टारझन

एक्सलंट !!
जियो राव !!!!

-- टकलिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

चतुरंग's picture

22 Oct 2009 - 4:50 pm | चतुरंग

(स्थूल-टकल्या)चतुरंग :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Oct 2009 - 4:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हीहीहीही .... मस्तच!

अदिती

फ्रॅक्चर बंड्या's picture

22 Oct 2009 - 4:59 pm | फ्रॅक्चर बंड्या

हाहा .. भारी

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Oct 2009 - 5:04 pm | बिपिन कार्यकर्ते

रावसाहेब, तुम्ही तर असंख्य लोकांच्या वेदनेवर नेमके बोट ठेवले आहे. ;)

(केसाळ - अंमळ स्थूल) बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

22 Oct 2009 - 5:07 pm | प्रभो

एक्सलंट !!
जियो राव !!!!

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विसोबा खेचर's picture

22 Oct 2009 - 5:16 pm | विसोबा खेचर

"इश्श, बाबा, हा टकलाच का मिळाला तुम्हाला?!"

हा हा हा! लै भारी!

रावसाहेब, मिपा परिवारात मन:पूर्वक स्वागत..

तात्या.

वेदश्री's picture

22 Oct 2009 - 5:16 pm | वेदश्री

हाहाहाहा... झक्कास्स्स!

रंगवलेल्या चित्रात शेवटच्या ओळीतला 'इश्श' अनाठायी वाटला.

दशानन's picture

22 Oct 2009 - 5:23 pm | दशानन

एक्सलंट !!
जियो राव !!!!

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

चेतन's picture

22 Oct 2009 - 5:29 pm | चेतन

हे गणित मात्र मस्तच्

चेतन

श्रावण मोडक's picture

22 Oct 2009 - 6:20 pm | श्रावण मोडक

माझी बोलतीच बंद झाली.

गणपा's picture

22 Oct 2009 - 6:51 pm | गणपा

झक्कास पुनरागमन रावसाहेब..येउद्यात छान छान लेख.

लवंगी's picture

22 Oct 2009 - 6:53 pm | लवंगी

मस्तच

बेसनलाडू's picture

22 Oct 2009 - 9:06 pm | बेसनलाडू

(लोटपोट)बेसनलाडू

Nile's picture

22 Oct 2009 - 9:11 pm | Nile

=))

मिसळभोक्ता's picture

22 Oct 2009 - 10:33 pm | मिसळभोक्ता

वेलकम ब्याक !

(जाताना, "पुनरागमनायच" म्हटलेलं आठवतं :-)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Oct 2009 - 10:38 pm | अक्षय पुर्णपात्रे

हेच म्हणतो.

अवांतर: श्री मिसळभोक्ता, तुमचा दुधाचा व्यवसाय आहे का? (खरडवहीत लिहिण्याची अनुमती नसल्याने इथेच प्रश्न विचारावा लागला. धन्यवाद.)

Nile's picture

22 Oct 2009 - 10:50 pm | Nile

नाही, फक्त विरजणाचा! =))

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Oct 2009 - 11:05 pm | अक्षय पुर्णपात्रे

समजला. धन्यवाद. नवीन असल्याने गोंधळ होतो.

निमीत्त मात्र's picture

23 Oct 2009 - 12:07 am | निमीत्त मात्र

सन्जोप राव..तुमची वाटचाल पाहिली..तुम्ही महान आहात. आता तुम्ही इथे कायमचे राहा...

शरदिनी's picture

23 Oct 2009 - 2:03 pm | शरदिनी

कविता आवडली...
वरवर दिसणार्‍या विनोदामागे खूप काही दडलेले वाटले.
लग्न न जमणार्‍यांचे दु:ख खूप असोशीने मांडले आहे....
...
जडमोती नाकावर
पोहे फिटले झटले
तर्पंण अर्पण
देह साजरा दावी दर्पण

सन्जोप राव's picture

23 Oct 2009 - 7:49 pm | सन्जोप राव

कवितेचा खरा अर्थ (खूप उशीरा का होईना) कळाला याचे गाभुळसमाधान आहे. पोह्यात किंचित अधिक झालेली हळद आणि करपलेली मोहरी यांचे जाड मानेशी जोडलेले अर्धतुटक नाते कळताकळता गर्भगणिताचे कोंभ काहीसे सांकेतिकच राहिले, याचे व्यासशल्य अद्याप मनाचे हळवे कोपरे व्यापून आहे.
सन्जोप राव

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Oct 2009 - 7:53 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री राव, माफ करा. कविता आधी वाचली नसल्याने प्रतिक्रिया दिली नाही. कवितेच्या अर्थाचे खरा किंवा खोटा, योग्य किंवा अयोग्य असे वर्गीकरण करता येते का?

सन्जोप राव's picture

23 Oct 2009 - 8:01 pm | सन्जोप राव

कवीला जो अर्थ अभिप्रेत आहे, तो खरा. त्याव्यतिरिक्त इतरांनी काढलेला खोटा. पण खोटा अर्थ हा त्या त्या अर्थकाढू प्रतिसादकाच्या मानसिक आंदोलनाच्या प्रतिबिंबाला समांतरच असल्याने तसा तोही त्या त्या जागी खराच. त्यामुळे तसे दोन्ही अर्थ खरेच, पण त्यातला एक खोटा.
योग्य, अयोग्य हे शब्द मी वापरले नसल्याने त्यावर काही भाष्य करु शकत नाही, क्षमस्व.
सन्जोप राव

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Oct 2009 - 8:12 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री राव, धन्यवाद. अर्थकाढू प्रतिसादक आणि कवी यांच्या मानसिक आंदोलनांच्या प्रतिबिंबांची प्रतिबिंबे एकमेकांपासून भिन्न ठरवता येत नसल्यास तो अर्थ खरा. हे बरोबर आहे का?

सुवर्णमयी's picture

28 Oct 2009 - 8:07 pm | सुवर्णमयी

कवीला जो अर्थ अभिप्रेत आहे, तो खरा. -कित्येकदा तो फक्त त्याला एकटयाला /एकटीलाच कळतो:)

त्याव्यतिरिक्त इतरांनी काढलेला खोटा. पण खोटा अर्थ हा त्या त्या अर्थकाढू प्रतिसादकाच्या मानसिक आंदोलनाच्या प्रतिबिंबाला समांतरच असल्याने तसा तोही त्या त्या जागी खराच.
एकदम बरोबर...अर्थकाढू प्रतिसादांनी कित्येकदा करमणू़क होते . वाचकांची धडपड पाहून कवीला मनातल्या मनात हसू पुटत असावे:)

त्यामुळे तसे दोन्ही अर्थ खरेच, पण त्यातला एक खोटा.
एका वाचनात कळले नसेल तर पुन्हा वाचा.. अशी एक तळटीप दिली नाही नशीब तुम्ही.
तुम्ही इथे पुन्हा लिहू लागलात. हे चिन्ह किंवा ही कशाची नांदी आहे?(हलकेच घ्या. )
सोनाली

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Oct 2009 - 8:36 pm | अक्षय पुर्णपात्रे

सुवर्णमयी, अर्थास दुजोरा दिल्याबद्दल धन्यवाद.

हे चिन्ह किंवा ही कशाची नांदी आहे?

चुकून नोंदी वाचले आणि श्री मोडक यांची आठवण झाली. तेंडुलकरी आत्मविश्वास दुसरे काय?

श्री मात्र यांचा खालचा अर्थकाढू प्रतिसाद फारच सखोल भासायला लागलाय.

आणि हो (हे शब्द श्री सुनीत यांच्याकडून साभार), 'हसू पुटत असावे' या पुवरून यातला पु तसेच तुमच्या सदस्यनामातला सु असे बरेच अर्थकाढू संदर्भ लागले. (संदर्भ धरून/सोडून वाचणे यावर अधिक माहितीसाठी श्री नंदन यांना भेटा.)

सन्जोप राव's picture

29 Oct 2009 - 6:25 am | सन्जोप राव

तुम्ही इथे पुन्हा लिहू लागलात. हे चिन्ह किंवा ही कशाची नांदी आहे?

"कारण? " महाराजांचे विकट हास्य सदनाला पुरून उरले. "कारण राजकारण!

सन्जोप राव
टीकाकारांना आपल्या अस्त्रानेच उत्तर देणारा तेंडुलकर हा आमचा नवीन आदर्श आहे!

श्रावण मोडक's picture

29 Oct 2009 - 2:59 pm | श्रावण मोडक

"कारण? " महाराजांचे विकट हास्य सदनाला पुरून उरले. "कारण राजकारण!
हाहाहा... आंतरजालीय 'पुलोद' प्रयोग सुरू झाला की काय?
कारण पुढं हेही शब्द आहेत की त्या अवतरणात, "...आमच्या या प्रतिमा विविध नावांनी जनसामान्यांत एकरुप होतील. कुणी शशीकुमार, कुणी रजनीनाथ, कुणी चंद्रभान... पण या सगळ्याचे सूत्रधार आम्हीच. या प्रतिमा आमच्याच बाहुल्या आहेत भ्रातृभजना, आमच्याच सावल्या. आम्ही जे वदतो, त्याला या बाहुल्या दुसर्‍याच नावाने अनुमोदन देतील. आम्ही एखाद्याची प्रशंसा करतो, त्यावर या बाहुल्या स्तुतीसुमने उधळतील. आम्ही एखाद्याला दूषण देतो, त्यावर या बाहुल्या अग्निवर्षाव करतील.. ही सगळी आमचीच क्रीडा आहे. आम्ही प्रजाजनांना संबोधित करत असताना आमच्या नावाच्या गर्जना करणारे प्रजाजन कोण असतात भ्रातृभजना? ते दुसर्‍या नावाने वावरणारे आम्हीच!"
चला चपला घालूया आता... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2009 - 3:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'पुलोद' का पुणे पॅटर्न?

(सामान्य प्रजाजन) अदिती

निमीत्त मात्र's picture

29 Oct 2009 - 6:04 pm | निमीत्त मात्र

अचूक टायमींग मोडक शेठ! :)

अक्षय पुर्णपात्रे's picture

29 Oct 2009 - 7:27 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मोडक, उत्तम संशोधन. प्रतिमांचे लेझिमपथक. श्री धोंडोपंत यांचा विजय असो.

निमीत्त मात्र's picture

23 Oct 2009 - 7:58 pm | निमीत्त मात्र

कशाचा खरा अर्थ? मूळ कविता की तुमचे विडंबन?

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2009 - 10:24 pm | मिसळभोक्ता

गर्भगणिताचे कोंभ काहीसे सांकेतिकच राहिले

वा ! शरदिनीताईंना "काटेकी टक्कर" ! अब आयेगा मजा.

(आम्ही पिटात बसलेलो आहोत!)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Oct 2009 - 10:39 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री राव, रचना प्रेरीत असली तरीही स्वयंभू वाटली. तुमच्या कवितेवरून शरदिनी यांची 'अश्रू' ही कविता आठवली. शरदिनी यांच्या कवितेत 'चहात बुडालेल्या मिशा' होत्या तर तुमच्या रचनेत 'हा टकलाच का मिळाला तुम्हाला?' आहे. विवाहव्यवस्थेतील परिक्षणाचे स्वरूप आमुलाग्र बदलत आहे हेच तुमच्या कवितेतून जाणवले.

निमीत्त मात्र's picture

23 Oct 2009 - 10:53 pm | निमीत्त मात्र

शरदिनी यांच्या कवितेत 'चहात बुडालेल्या मिशा' होत्या तर तुमच्या रचनेत 'हा टकलाच का मिळाला तुम्हाला?' आहे.

दोन्ही कवितांचा तुलनात्मक अभ्यास करुन साम्यस्थळे नोंदवण्याची हातोटी दाद देण्याजोगी आहे.

अवांतर : आमच्या गद्य आणि रुक्ष नजरेला हीच तुलना, 'टकल्या कवीला चहात मिश्या बुडवणारी कवयित्री भेटली' अशी वाटली असती.

विनायक प्रभू's picture

29 Oct 2009 - 2:18 pm | विनायक प्रभू

लय आवडल बगा.

कपिलमुनी's picture

11 Nov 2014 - 3:14 pm | कपिलमुनी

आवडलं !