जखमी चित्रबलाकाचा अलारिपु

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
28 Oct 2009 - 9:48 am

ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्‍या स्पायडरमॅनला,
नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला,
वास येतोय सटरफटर जळक्या कबाबांचा,
ड्रोन ड्रोन ड्रोन

प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे
व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे
लोचट ओशट कडबाकुट्टी
लाल्लाल खरपूस वीटभट्टी

वादळवारे प्रतीक कॅत्रिना
घोरी महमद कैफ वासना
दुय्यम संयम अळम् टळम्
सत्य अहिंसा गर्रम गर्रम

लाटावाटा कोमल भाटा
महापुरातील लव्हाळत्राता
लायटर फ़ायटर रुधिरवंचिता
मेजर्मायनर धेनुवल्लभा

विहिरीतेली बॆरलबॆरल
वजिरीस्तानी क्वीन घायल

ड्रोन ड्रोन ड्रोन

भयानककरुणरौद्ररसमुक्तक

प्रतिक्रिया

मनिष's picture

28 Oct 2009 - 11:43 am | मनिष

वाचतो आहे
शब्दबंबाळ, दॄष्यमूक कविता
समजेल कधीतरी ह्या आशेने
यॉन यॉन यॉन!

- (आद्य गद्य विडंबक टार्‍याचा पद्य मित्र) मनिष-नी
(आयला, इथेही शनी नडत होता, म्हणून फोड,गैरसमज नसावा)

सविता's picture

22 May 2010 - 10:11 am | सविता

=)) =)) =)) =)) =))
------------
आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा......

जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....

सुनील's picture

28 Oct 2009 - 11:42 am | सुनील

वाचायला (तरी) मजा आली!! ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2009 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता वाचली. ! विडंबनासाठी कवींना हे आव्हान नसावे.

-दिलीप बिरुटे

शेखर's picture

28 Oct 2009 - 11:51 am | शेखर

>> विडंबनासाठी कवींना हे आव्हान नसावे.

हे आव्हान नसुन आवाहन आहे असे विडंबक मानतील, त्यामुळे कटुता टळेल :)

शेखर

अवलिया's picture

28 Oct 2009 - 12:10 pm | अवलिया

नाराज होवु नका प्राडॉ... खास तुमच्यासाठी ;)

कविता मस्त :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पर्नल नेने मराठे's picture

28 Oct 2009 - 6:30 pm | पर्नल नेने मराठे

कवितेचे शेवटचे कडवे बदललेय :-?

चुचु

विजुभाऊ's picture

28 Oct 2009 - 12:57 pm | विजुभाऊ

वा मस्त शरदिनी तै....उत्तम
ही कविता लहान मुलाना बडबड गीत म्हणून पाठ्यपुस्तकात लागु करा.
मुले हमखास र आणी ड म्हणायला लवकर शिकतील

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

टारझन's picture

28 Oct 2009 - 11:50 am | टारझन

शरदिनी चे कौतुक वाटते (आणि हेवा ही) !!

-- टारझन

प्रभो's picture

28 Oct 2009 - 12:32 pm | प्रभो

शरदिनी चे कौतुक वाटते (आणि हेवा ही) !!

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

दिपाली पाटिल's picture

28 Oct 2009 - 12:58 pm | दिपाली पाटिल

काय रे प्रतिसाद कॉपी मारतोस...इकडे कॉपी मारना मना है... :D

दिपाली :D

प्रभो's picture

28 Oct 2009 - 1:12 pm | प्रभो

सहमत

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विशाल कुलकर्णी's picture

28 Oct 2009 - 11:52 am | विशाल कुलकर्णी

माते शरदिनी....

आपण धन्य आहात. ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

ज्ञानेश...'s picture

28 Oct 2009 - 11:53 am | ज्ञानेश...

=D>

(महापुरातील लव्हाळत्राता स्पायडरमॅन)
ज्ञानेश.

"Great Power Comes With Great Responsibilities"

दिपाली पाटिल's picture

28 Oct 2009 - 11:54 am | दिपाली पाटिल

अरे व्वा... कॅत्रिना कैफपण आलीये की कवितेत, एक शंका आहे...त्या जळक्या कबाबांचा वास "ड्रोन ड्रोन ड्रोन" कसा काय बुवा?? :/

दिपाली :/

मनिष's picture

28 Oct 2009 - 12:14 pm | मनिष

कॅट्रीना कैफ नसून कॅट्रीना वादळाविषयी त्या बोलत असाव्या अशी पुसट शंका आहे मला.

शेखर's picture

28 Oct 2009 - 12:18 pm | शेखर

ती पण एक वादळच आहे की....

कालिन्दि मुधोळ्कर's picture

28 Oct 2009 - 12:16 pm | कालिन्दि मुधोळ्कर

कविता मस्त. झणझणीत.
सद्ध्याच्या अमेरिकन साम्राज्यवादाबद्दलची (मी वाचलेली) पहिलीच मराठी कविता.

ता.क. कसेही प्रतिसाद आले तरी झिम्मा-फुगडी-हळवा पाऊस-खट्याळ प्रियकर-अशा साबणाच्या फ्याक्टरीतल्या कवितांकडे तिरकस बघणे सोडू नका.

सहज's picture

28 Oct 2009 - 12:20 pm | सहज

"बुधवारच्या कविता" मधील अग्रभागी राहील अशी.

ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्‍या स्पायडरमॅनला, - अच्छा तो पर्वत सीजीआय नंतर भरला आहे बहुतेक. इथे तर पर्वत दिसत नाही आहे.

सुपरमॅन मात्र कुठेही नाचु शकतो.

श्रावण मोडक's picture

28 Oct 2009 - 12:28 pm | श्रावण मोडक

बरं!!!

धनंजय's picture

28 Oct 2009 - 6:52 pm | धनंजय

बरं.
(उद्गार चिह्ने नाहीत, हा प्रतिसादात फरक.)

वेताळ's picture

28 Oct 2009 - 12:31 pm | वेताळ

कळाली नाही पण आनंद झाला.कसला तोही माहित नाही.
लोचट ओशट कडबाकुट्टी
लाल्लाल खरपूस वीटभट्टी
नेमके कशा बद्दल हे लिहले आहे?
वेताळ

घाटावरचे भट's picture

28 Oct 2009 - 12:39 pm | घाटावरचे भट

अमेरिकेचे अफगाणिस्तानातील ड्रोन वापरून केलेले बाँबहल्ले वगैरे काही संदर्भ लागताहेत. मध्यपूर्वेतील तेल वगैरे समजलं. अमेरिकेच्या अंतर्गत समस्या, दुटप्पी धोरणसुद्धा लक्षात आलं. पण तरीही एकसंध अर्थ जुळवण्यास अडचण येत आहे (कारण काही काही शब्दांचं हेलिकॉप्टर होतंय)

भडकमकर मास्तर's picture

28 Oct 2009 - 3:10 pm | भडकमकर मास्तर

तुमच्या अमेरिकन साम्राज्यवादाच्या अंगाने ही कविता पुन्हा वाचून पहिली... मज्जा आली.... धन्यवाद....

शिवाय ते भरतनाट्यमच्या प्रयोगात ऐकलेले अलारिपु आणि तिल्लाना हे शब्द इथे काय करताहेत ? .. मज्जाय बुवा
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

गणपा's picture

28 Oct 2009 - 12:55 pm | गणपा

धमाल मुलगा's picture

28 Oct 2009 - 3:30 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

असो,
शरदिनी, कवितेमधले बरेचसे संदर्भ कळताहेत असं प्रथमदर्शनी तरी वाटतंय :)

तुम्ही लिहा हो...आम्ही वाचुच की

परिकथेतील राजकुमार's picture

28 Oct 2009 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार

हि मराठी कविता आहे का ? :?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विजुभाऊ's picture

28 Oct 2009 - 1:18 pm | विजुभाऊ

हल्ली किनई मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला मोस्ट टाईम्स फारच डिफीकल्ट जातय.
पोएम्स वाचताना इन बीट्वीन मराठी वर्ड्स आले तर काय रॉन्ग आहे त्यात.
इंग्लीश लॅन्ग्वेज मध्ये बरेचसे व्हर्नाक्यूलर वर्ड्स आले म्हणून तर ती इतकी रीच झाली.
मराठीत इंग्लीश वर्ड्स आले तर तुम्हाला ते बॅड का वाटावे.
ती ही एक ग्लोबल लॅन्ग्वेज आहे की
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मिसळभोक्ता's picture

28 Oct 2009 - 1:27 pm | मिसळभोक्ता

तात्यांकडे आयपी वगैरे सगळे पत्ते असतात, त्यामुळे त्याने खुलासा करावा.

शरदिनी हा खरा बाप्या आहे, आणि त्याचे नाव सं ने सुरू होऊन राव ने संपते.

खरे की नाही, तात्या ? नीलकांत ?

आजवर "अनुपस्थित" असणार्‍या ह्या इसमाने शरदिनी नाव धारण करून अनेकांची डोकी उध्वस्त केली आहेत, असा आमचा समज आहे.

तात्यालाच खरे काय ते माहित. (नाही, म्हणजे आम्हाला खरे काय ते कळू शकते, पण मिसळकॉम वर आम्ही जुन्या पासवर्डाने लॉगिन करू इच्छित नाहि. आणि गटण्याची टेक्निके आम्ही वापरू इच्छित नाही. एका पत्रवाहकाच्या गोट्या कपाळात गेल्या, एवढेच पाप पुरेसे.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सुनील's picture

28 Oct 2009 - 2:36 pm | सुनील

:|

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

28 Oct 2009 - 4:27 pm | विसोबा खेचर

एका पत्रवाहकाच्या गोट्या कपाळात गेल्या, एवढेच पाप पुरेसे.

=)) =))

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Oct 2009 - 6:22 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मिसळभोक्ता, तसे नसावे.

प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे
व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे
लोचट ओशट कडबाकुट्टी
लाल्लाल खरपूस वीटभट्टी

'व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे' यासाठी या लेखातील हे वाक्य पहा

"समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे "

प्रतिभेच्या सोळा आण्यांविषयी बोलायलाच नको. नवा आदर्श तेंडुलकर आहे. ;)

सन्जोप राव's picture

28 Oct 2009 - 6:41 pm | सन्जोप राव

शरदिनी हा खरा बाप्या आहे, आणि त्याचे नाव सं ने सुरू होऊन राव ने संपते.

अगदी असेच आहे. याच व्यक्तीचे नाव 'अ' ने सुरु होऊन 'त्रे' नेही संपते! त्यांनी 'अत्रे' असाच आयडी का घेतला नाही ते कळत नाही. कदाचित तसे केले असते तर 'पु' ही चूक करता आली नसती म्हणून असावे.
बाकी माझ्या अस्तित्वाच्या, चेहर्‍यांच्या आणि लेखनाच्या जबरदस्त अभ्यासू मंडळींना पाहून तूर्त मला गहिवरुन आले आहे!

सन्जोप राव
टीकाकारांना आपल्या अस्त्रानेच उत्तर देणारा तेंडुलकर हा आमचा नवीन आदर्श आहे!

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Oct 2009 - 6:55 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री राव, चांगला प्रयत्न पण प्रोजाइक.

मनीषा's picture

28 Oct 2009 - 2:55 pm | मनीषा

चित्र - विचित्र आणि निरर्थक शब्द ..
(|:

अ-मोल's picture

28 Oct 2009 - 3:33 pm | अ-मोल

आपण ज्यांच्यासाठी कविता करतो,
त्यांना ती किमान समजली पाहिजे
एवढे तरी भान लिहिणारृयाने ठेवावे ही अपेक्षा.
अन्यथा शब्दांच्या चमत्कृती आणि चित्रविचित्र रचनेला दाद आम्हालाही देता येते.
पण समजलीच नाही, तर दाद कसली दृयावी.
हा, आता माननीय कवयित्री स्वान्तसुखाय कविता करत असतील तर ठीक आहे.
अन्यथा आमच्यासारख्या लिमिटेड कुवतीच्या वाचकांचे कठीणच आहे!

विसोबा खेचर's picture

28 Oct 2009 - 4:27 pm | विसोबा खेचर

दुय्यम संयम अळम् टळम्
सत्य अहिंसा गर्रम गर्रम

वा शरदिनी! नेहमीप्रमाणेच वेगळी परंतु सुंदर कविता..

तुझ्या या पूर्वीच्या व्य नि ला उत्तर दिले आहे. त्या कंटकांचा बंदोबस्त केला आहे. मिपा तुझंच आहे. लिही अगदी आरामात..

बाकी काय म्हणतंय तुझं कॉलेज? लौकरच पुण्यात येतो आहे, तेव्हा भेटू निवांत! :)

तात्या.

सूहास's picture

28 Oct 2009 - 4:30 pm | सूहास (not verified)

ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्‍या स्पायडरमॅनला,
नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला,
वास येतोय सटरफटर जळक्या कबाबांचा,
ड्रोन ड्रोन ड्रोन

स्पायडरमॅन हा अमेरिकन सुपर हिरो ,ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत म्हणजे बहुधा अफगाणात कुठेतरी , नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला म्हणजे बहुतेक अडगळीच्या ठिकाणी किंवा नको त्या ठिकानी दुखण्यामुळे चिडुन आपल्याच नखावर तिल्लाना नाचत असावा..आणी तिथे जळके कबाबांचा वास येतोय म्हणजे कुणीतरी कबाब तसेच भट्टीत टाकुन पळुन गेले कारण ड्रोन आला असावा..

प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे
व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे
लोचट ओशट कडबाकुट्टी
लाल्लाल खरपूस वीटभट्टी

प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे ही ओळ तर एकदम पटली ..बहुधा ही त्या मिपाकरांना संबोधुन असावी जे केवळ आपल्या अमुल्य आणी अमोघ प्रतिसादातुन आणी लेखातुन आपले अगाध ज्ञान प्रदर्शित करत असावेत पण ते फटाकडेरुपी असल्यावर कबाब जळाल्यावर जसा वास येतो तसाच वास फटाकडे उडुन गेल्यावर आला असावा..

व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे
लोचट ओशट कडबाकुट्टी
लाल्लाल खरपूस वीटभट्टी

ह्या तीन ओळीत असेच समाज प्रबोधक ज्या सामजिक समस्यांचे साकडे कारण नसताना राजकारण्यांनी जी लोचट आणी पैशाने माजुन खरपुस झालेल्या विटभट्टीत घेउन जातात त्यांच्या विषयी असावी असे वाटते..

वादळवारे प्रतीक कॅत्रिना
घोरी महमद कैफ वासना
दुय्यम संयम अळम् टळम्
सत्य अहिंसा गर्रम गर्रम

ह्या चार ओळीत तर गहन अर्थ लपला आहे , आता बघा ना कॅत्रिना कुठे येते ,अमेरिकेत ,"घोरी" हे पाकिस्तान चे एक क्षेपणास्त्र आणी त्या पाकिस्तान चे लाड कोण करते तर तो जो सत्य अहिंसा ह्याचे लांगुलचालन करतो ..तो म्हणजेच ओबामा म्हणजे खरच वा !! वा !!

लाटावाटा कोमल भाटा
महापुरातील लव्हाळत्राता
लायटर फ़ायटर रुधिरवंचिता
मेजर्मायनर धेनुवल्लभा

ह्या ओळी माझ्या डोक्याबाहेर जाणार आहे , पण तुर्तास तरी ह्या ओळीचा अभ्यास मी पुढे जी पी.एच.डी करणार आहे,त्यासाठी राखुन ठेवत आहे...

विहिरीतेली बॆरलबॆरल
वजिरीस्तानी क्वीन घायल
ड्रोन ड्रोन ड्रोन

आणी हे सर्व अमेरिका कशासाठी करते आहे ..तेला साठी च ना म्हणुन च खालच्या ओळी

हुश्श्श............(ईथे एक रुमालाने कपाळावरील घाम पुसणारी स्मायली कल्पावी)

ह्या पेक्षा फ्रेंच शिकुन "नास्ट्रोंडेमन्स" वाचले असते तर...

सू हा स...

महेश हतोळकर's picture

28 Oct 2009 - 4:40 pm | महेश हतोळकर

=))
(हसून लोळत नाहीये. चक्कर येऊन पडलो आहे.)

दशानन's picture

28 Oct 2009 - 5:21 pm | दशानन

=))

=))

=))

=))

लवंगी's picture

28 Oct 2009 - 6:40 pm | लवंगी

=)) =))

दिपाली पाटिल's picture

28 Oct 2009 - 9:20 pm | दिपाली पाटिल

स्पायडरमॅन हा अमेरिकन सुपर हिरो ,ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत म्हणजे बहुधा अफगाणात कुठेतरी , नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला म्हणजे बहुतेक अडगळीच्या ठिकाणी किंवा नको त्या ठिकानी दुखण्यामुळे चिडुन आपल्याच नखावर तिल्लाना नाचत असावा....

पण पर्वतावर कोळीगीत? ते तर समुद्रात म्हणायचं असतं ना?? :/ आणि ते पण कोण म्हणतंय? तर स्पायडरमॅन, जो ७५% हवेत असतो...
काय म्हणता?

आणी तिथे जळके कबाबांचा वास येतोय म्हणजे कुणीतरी कबाब तसेच भट्टीत टाकुन पळुन गेले कारण ड्रोन आला असावा

ओह्ह, म्हणून ते ड्रोन ड्रोन ड्रोन आहे होय...पळताना ड्रोsssssन ड्रोssssssन ड्रोssssssssन
असं म्हणत पळाला असावा....काय बोलता??

दिपाली :)

धमाल मुलगा's picture

28 Oct 2009 - 9:51 pm | धमाल मुलगा

अगो बाय माझी ती....
=)) =)) =)) =))
अरे हिला आवरा रे!!!! काय लिहिलंय राव! मी सांडलो ना खुर्चीतून.

डावखुरा's picture

22 May 2010 - 9:39 pm | डावखुरा

हुश्श्श............प्रतिक्रिया वाचतांना पण... :D :D :D :D :D (ईथे एक रुमालाने कपाळावरील घाम पुसणारी स्मायली कल्पावी)

ह्या पेक्षा फ्रेंच शिकुन "नास्ट्रोंडेमन्स" वाचले असते तर...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अशक्य...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Oct 2009 - 4:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नेहेमीप्रमाणेच शरदीनीताईंचं नाव पाहून कविता उघडली आणि निराशा झाली नाही. खरंच कालिंदी यांच्या म्हणण्याप्रमाणे फुलपाखरी कवितांचा कंटाळा येतो, जो शरदिनीताई उडवून लावतात.

अदिती

गणपा's picture

28 Oct 2009 - 9:52 pm | गणपा

हॅ हॅ हॅ शरदीनी तै कंटाळा आणि फुलपाखरु दोन्ही उडवण्यात पटाईत आहेत :D

नंदू's picture

28 Oct 2009 - 5:26 pm | नंदू

ज्स्द्ल्कज्फ्हूएवोन क्ज्ल्क्ज्क्ल क्ज्क्जद्फ्झ्द्न क्ज्क्ल्ज्स्द्;क्ल्फ्ज्वेल्;ल.

~X(

वा! उरोभागी शरविद्ध झालेल्या रक्तबकाचे हतप्रभ नृत्य आपल्या शब्दलालित्याने दृगोचर करणारे हे मुक्तक वाचून उन्मुक्त जाहलो.
-लोचट ओशट कडबाकुट्टी

कायच्या काय कविता(?) उगाच 'र'ला'ट' जुळवून शब्दांचे कडबोळे केले आहे झालं.
- लाल्लाल खरपूस वीटभट्टी

ते काही असो. कुठेतरी 'प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे' वात पेटून फुरफुरते आहे खास!
'दाण दाण दाण' ?

अजुन कच्चाच आहे's picture

28 Oct 2009 - 6:28 pm | अजुन कच्चाच आहे

अजून कच्चाच आहे (नक्कीच).
.................
अजून कच्चाच आहे.

आनंदयात्री's picture

28 Oct 2009 - 6:43 pm | आनंदयात्री

या वेळेस कविता कळली नाही (अर्थात प्रतिसादातुन विश्लेषण वाचले) ..
पण आपली प्रतिभा पाहुन विस्मित होतो .. आपण पुराण काळात जन्माला आल्या असता तर एखादे भारी/दणका गुढ उपनिषद नक्की लिहले असते .. (आता होउन जाउद्या तुमच्या गुढ पुर्नजन्मावर एखादी कविता) ..

-
आंद्या विक्रिडीत

निमीत्त मात्र's picture

28 Oct 2009 - 8:55 pm | निमीत्त मात्र

छान कविता. सहज गुणगुणता येण्यासारखी.

विंजिनेर's picture

29 Oct 2009 - 10:46 am | विंजिनेर

सहज गुणगुणता येण्यासारखी.

च्चच्च ... बोललात? तरी सांगत होतो मी...
अहो ते देव काका लगेच चाल लावून राहतिल ना.. मग? एकदम जीवघेणं (म्हणजे भान हरपवणारे हो..) कॉंबिनेशन होईल ते

प्रमोद देव's picture

29 Oct 2009 - 11:13 am | प्रमोद देव

अहो ते देव काका लगेच चाल लावून राहतिल ना.. मग? एकदम जीवघेणं (म्हणजे भान हरपवणारे हो..) कॉंबिनेशन होईल ते

नाही हो. अशा कवितेला चाल लावण्याइतपत प्रतिभा नाही माझ्यात. ते काम 'एच मंगेशराव' करू शकतील. ;)

=========
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

शेखर's picture

28 Oct 2009 - 10:38 pm | शेखर

५० वा प्रतिसाद...