अश्रू

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
31 Aug 2009 - 9:45 pm

माझ्या लग्नाच विचार कदाचित
त्यांच्या मनात घोळत असेल
म्हणून त्यांनी त्याला बोलावलंय
गप्पा मारायला आमच्याकडे

गप्पा अशाच गमतीच्या
धंद्यात काही पुढेमागे होतंय
मिशा पिळत बोलायचं
नफा तोटा चालायचाच.

उमराव, सरदार घराणी
कशी संपत चाललीएत
आणि ते तेज उरलेलं नाहीये
थोडंसुद्धा- असलं काहीबाही

होणार अजून काही गप्पा
मग मुख्य मुद्द्यावर
त्यांची काळजी अजीजी
आणि क्वचित वादावादी

मग चहात बुडालेल्या मिशा
वाळवत अंगणात बसायचं
सार्‍यांनी निर्णयाच्या प्रतीक्षेत
चेहरा आक्रसून

अणि मी त्या वसंतातल्या चमकदार दिवशीसुद्धा
खिडकीत बसून माझ्या निस्तेज शरीराला
फुटलेल्या त्या निर्जीव पायाकडे
पाहत अश्रू ढाळायचे

-------------------------- मूळ कविता : ( रशियन कवयित्री) अलेक्झांड्रा कोलोन्तोइ
फार पूर्वी ऐकलेल्या एका इंग्रजी कवितेचा स्वैर अनुवाद

३१ ऑगस्ट २००९, पुणे

करुणशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

31 Aug 2009 - 9:52 pm | नितिन थत्ते

मला मूळ कविता सावनकुमार टाक यांची असावी असे वाटले होते. (आठवा: शायद मेरी शादीका खयाल...) :) ह. घ्या.

असो. जोक्स अपार्ट; कविता छान आहे.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

सुबक ठेंगणी's picture

1 Sep 2009 - 5:53 pm | सुबक ठेंगणी

मूळ परदेशी आहे असं कुठेही वाटलं नाही एवढं सही जमलंय! (बघा नां...'शायद मेरी शादी का खयाल' च आठवलं.
तसं म्हटलं तर दु:खाला भाषा, देश, संस्कृती ह्यांची बंधनं असतात कुठे?

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2009 - 9:54 pm | बिपिन कार्यकर्ते

शरदिनी, कविता आवडलीच. यावेळी समजेल अशी वाटली (अर्थात मला समजलेला अर्थ बरोबर आहे का हे माहित नाही). शेवटच्या कडव्या पर्यंत कळत नव्हते की कशाबद्दल आहे ही कविता. पण शेवटचे कडवे हलवून गेले. अनंत काळापासून मुलींचे मनोगत असावे असे वाटून गेले पटकन, शहारलो.... ग्रेट!!!

बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

1 Sep 2009 - 9:28 am | निखिल देशपांडे

शरदिनी ताईची कविता म्हणुन खु उत्साहाने वाचली
कविता कळत आहे असे उगाचच वाटते...
बिका तुम्हाला शेवटच्या कडव्या बद्दल काय वाटले ते सांगता का???रसग्रहण टाका ना.

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

चन्द्रशेखर गोखले's picture

3 Sep 2009 - 7:41 pm | चन्द्रशेखर गोखले

बिपिनच्या प्रतिक्रियेशी सहमत !

चतुरंग's picture

1 Sep 2009 - 4:54 am | चतुरंग

सुंदर कविता. आधीच्या कडव्यांमधून लोकांच्या बडा घर पोकळ वासा ह्याचा उल्लेख येत असतानाच कविता नक्की कशा शेवटाकडे नेते आहे हे समजत नाही आणि एकदम शेवटच्या कडव्यातल्या कलाटणीने सुरी फिरली!
एकीकडे समाजाचे मानसिक अपंगत्व आणी एकीकडे हिचे शारीरिक लुळेपण! दुखलं मनात.

चतुरंग

विजुभाऊ's picture

1 Sep 2009 - 9:38 am | विजुभाऊ

अरे बापरे शरदिनीतैंची कविता प्रथमच पटक्कन कळाली. मला वाटले की माझेच काहितरी चुकतय

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

श्रावण मोडक's picture

1 Sep 2009 - 1:51 pm | श्रावण मोडक

कळली की नाही? हा पण एक प्रश्चन आहे. कविता आधारित असल्याने कळली असं म्हणणं हे शहाणपणाचंही लक्षण आहे!

दत्ता काळे's picture

1 Sep 2009 - 5:09 pm | दत्ता काळे

शेवटच्या कडव्यामुळे एकूण काव्यार्थाला उठाव आला.

अनिल हटेला's picture

1 Sep 2009 - 5:13 pm | अनिल हटेला

शरदिनी ताईची कविता म्हणजे अर्थातच वाचली..
कळाली नाही असं वाटतये...

कुणी तरी रसग्रहण टाका राव...:-(

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

ऋषिकेश's picture

1 Sep 2009 - 10:30 pm | ऋषिकेश

कविता आवडली.

ऋषिकेश
------------------
रात्रीचे १० वाजून २७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "अजूनी चालतोच वाट...."