मात्र रात्रीची गोष्ट भाग ६

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
6 Oct 2009 - 3:54 pm

मात्र रात्रीची गोष्ट भाग ५

स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच.

(पाचवा पेग होवुन गेला आहे, समिक्षा सुरू आहे अशी स्वयंभु अवस्था.... अशातच पेग ६ )

मी - त्या हाटिलात गेला होतास का येवढ्यात...

तो- नाय बा ! आपल्याला तिकडं झेपत नाही

मी - का ?

तो - अरे आपण साला मनात आला ते ओकणार.. तिकडे ओकायचे तर मनातल्या मनातच

मी - अन तिकडे काय मनातले बोलत नाही काय ?

तो - बोलतात की. मनातले बोलतात पण सगळेच नाही. बोलतात कमी आठ्या जास्त...

मी -म्हणजे?

तो - अरे इथे कसे आपण डिश आवडली तर जोरदार टाळी वाजवतो, झक्कास करुन आवाज देतो, अऽऽऽब्ब करुन ढेकर देतो.

मी - हो... आणि नाही आवडली की दणक्यात ठणाणा करतो

तो - अगदी बरोबर. तिकडे तसे नाही. आवडले तर टाळ्या नाही वाजवत.. फक्त बोट बोटावर वाजवतात.. मायक्रो क्लॅप्स.

मी - ऑ ? आणि नाही आवडले तर.. ?

तो - एकतर तिकडे बद्धकोष्ट असलेल्यांची संख्या जास्त आहे.. त्यामुळे बहुतेक वेळा कितीही चांगली डिश असली तरी मीठ, तिखट काहीतरी जास्तच असते. मग ते काही बोलतच नाहीत.. चुप रहातात तेराव्याच्या जेवणाला आल्यासारखे... मुकाट गिळुन

मी - अरारा... आणि विनोदी लेखन वगैरे...

तो - चालत नाही तिकडे अजिबात... टवाळा आवडे विनोद विसरलास का?

मी - वैचारिक लेखन...

तो - प्रचंड... गंभीर कविता, लेख त्यावर अतिगंभीर समिक्षा भरपुर...

मी - वाचतोस तु?

तो - छे, माझ्या काकाने सांगितले आहे चार ओळीपेक्षा मोठा प्रतिसाद वाचायचा नाही, बुद्धीचा विकास कुंठतो नंतर माणुस कुंथतो

मी - पण आपल्या इथे पण आहेत की तसे लेखन करणारे.. तो नाही का...

तो - शुऽऽऽ नाव नको घेवुन.. ग्लासाला कान असतात.. मालकापेक्षा वेटर जड.. बाहेर काढेल

मी - खी खी खी... यार पण मला एकदा तसलं लेखन करायचं आहे...

तो - कर की.. काव्य समीक्षा हा बेस्ट पार्ट आहे त्यासाठी. कोणी उपप्रतिसाद देवुन डोक्याला कल्हई पण करत नाही. आलेच तर सहमतपुराहुन सहमतीचे प्रतिसाद मिळतीलच पण निमित्त शोधुन प्रतिसाद देणारे त्रास देणार नाहीत.

मी - कशी लिहायची ही समिक्षा?

तो - न समजणारी दुर्बोध कविता घ्यायची. दोघा तिघांनी आधी समजली नाही, कळली नाही असे लिहिले असलेली घेतली म्हणजे आपल्या समीक्षेला वजन येते. सुरवातीलाच ब-याच दिवसांनी कविता दिसली फार आनंद झाला, तुमची कविता म्हणजे मराठी वाङ्मयातील बावनकशी सोने आहे, तसे तुम्ही फार कमी लिहिता, अजुन तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत, केशवसुत आणि कुसुमाग्रजांनंतर मराठी काव्य प्रतिभेला तुम्हीच तारणहार वगैरे किमान १०-१२ ओळींचा परिच्छेद टाकायचा.

मी - हम्म... ऐकतोय...

तो - त्यानंतर कविची प्रतिभा कशी सतेज आहे, शब्दांच्या साखळी करुन निरर्थक शब्दांची रास मांडणे कवी टाळतो असले काहीतरी लिहायचे. परिपक्व मनाचा उत्तुंग आविष्कार कवी करत असुन केवळ प्रचंड वाचन आणि समाजाशी नित्य बांधिलकी असल्यानेच कवीचे काव्य मला समजले आहे अशी टीप टाकायला विसरायचे नाही. कवीची उंची कुणालाच गाठता येणार नाही असे बजावुन सांगत, संस्कृतीत मोलाची भर पडली आहे हे नमुद करायचे. जाणीवांनी कविता होत नाही, सर्जनशीलतेसाठी अनुभवाची जोड असावी, शब्द आहेत अनुभव नाही असे झाले तर बसचे टाईमटेबल सुद्धा कविता झाले असते वगैरे वगैरे स्वतःलाही कळणार नाही अशा वाक्यांनी पुढचे दोन परिच्छेद पुर्ण करायचे.

मी - पण कवितेबद्दल तर अजुन काहीच नाही..

तो - यालाच समीक्षा म्हणतात. यानंतर कवितेतील कोणतीही न कळणारी ओळ लिहायची आणि त्यापुढे बघा कवीने सादर केलेला भाव किती वेगळा परिणाम घडवत आहे. यानंतर लगेचच मात्र असा भाव कुठेही असु शकतो म्हणजेच कवी भावाचे सामान्यीकरण आणि सामान्याचे विशेषिकरण करण्यात किती निपुण आहे हे समजते अशी टीप द्यायची. म्हणुनच कवी थोर आणि श्रेष्ठ आहे हे सांगायला विसरायचे नाही.

मी - येतंय लक्षात .. अजुन काही महत्वाचे..

तो - हो, सगळ्यात महत्वाचे राहिलेच. कवी परंपरावादी नाही पण पुर्वापार मनाच्या घडणीला छेद देत नाही म्हणुन कवी संस्कारवादी आहे असे कधी मधी वेळ पाहुन ठोकुन द्यायचे. आणि दहा बारा ओळीनंतर कवी आधुनिक असुन जुने जावु द्या मरणालागुनी विचारधारा मानणारा असुन आधुनिक चार्वाक आहे असे समजायला हरकत नाही असे लिहायचे. लोक समिक्षा सगळीच वाचत नसतात. मधुन मधुन ओळखीचा शब्द दिसला की ती ओळ पुर्ण वाचतात. अशा रितीने सगळे खुश.

(पेग ६ समाप्त)

मी - आयला सोपी आहे की ... लिहितोच मी आता दणक्यात आणि होतो मान्यवर समिक्षक..

तो - येस्स बेस्ट लक

मी - व्हाट नेक्स्ट?

तो - पब्लिक बोलली तर घेवु अजुन नायतर जय महाराष्ट्र

मी - वोके...
(भाग ६ समाप्त)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

6 Oct 2009 - 4:03 pm | श्रावण मोडक

रिपीट!!!
बायदवे, तुम्ही इतक्या विलंबाने ऑर्डर आणणार असाल तर रिपीटला अर्थ रहात नाही. नव्याने सुरू म्हणायची वेळ येतेय. मधले संदर्भही हरवतात. तेव्हा...

प्रभो's picture

6 Oct 2009 - 4:05 pm | प्रभो

एकतर तिकडे बद्धकोष्ट असलेल्यांची संख्या जास्त आहे.. त्यामुळे बहुतेक वेळा कितीही चांगली डिश असली तरी मीठ, तिखट काहीतरी जास्तच असते. मग ते काही बोलतच नाहीत.. चुप रहातात तेराव्याच्या जेवणाला आल्यासारखे... मुकाट गिळुन

हीहीहीही =))

छे, माझ्या काकाने सांगितले आहे चार ओळीपेक्षा मोठा प्रतिसाद वाचायचा नाही, बुद्धीचा विकास कुंठतो नंतर माणुस कुंथतो

हीहीहीही =))

जबहरा....रिपीट !!!
--प्रभो

निखिल देशपांडे's picture

6 Oct 2009 - 4:16 pm | निखिल देशपांडे

रिपिट

मालका पेक्षा वेटर जड

असहमत राजे ह्यावर... आजकाल परिस्थिती बदलत आहे म्हणे.....
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

दशानन's picture

6 Oct 2009 - 4:52 pm | दशानन

>>तुम्ही इतक्या विलंबाने ऑर्डर आणणार असाल तर रिपीटला अर्थ रहात नाही. नव्याने सुरू म्हणायची वेळ येतेय. मधले संदर्भही हरवतात. तेव्हा...

:SS

रोज पॅग घेऊन बसलो तर अवघड होईल ना... चपला पण दिसणार नाहीत मग ;)

दशानन's picture

6 Oct 2009 - 4:53 pm | दशानन

>>तुम्ही इतक्या विलंबाने ऑर्डर आणणार असाल तर रिपीटला अर्थ रहात नाही. नव्याने सुरू म्हणायची वेळ येतेय. मधले संदर्भही हरवतात. तेव्हा...

:SS

रोज पॅग घेऊन बसलो तर अवघड होईल ना... चपला पण दिसणार नाहीत मग ;)

फ्रॅक्चर बंड्या's picture

6 Oct 2009 - 3:59 pm | फ्रॅक्चर बंड्या

ग्लासाला कान असतात.. मालकापेक्षा वेटर जड
=)) =))
मस्त आहे

गणपा's picture

6 Oct 2009 - 4:01 pm | गणपा

हा हा हा, राजे लै भारी.
समिक्षा फॉर डमीज् ;)

स्वाती२'s picture

6 Oct 2009 - 5:22 pm | स्वाती२

+१

विनायक प्रभू's picture

6 Oct 2009 - 4:24 pm | विनायक प्रभू

चालु राहु देत.

लवंगी's picture

6 Oct 2009 - 11:04 pm | लवंगी

पुढे...

अवलिया's picture

7 Oct 2009 - 9:13 am | अवलिया

चालु द्या :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

समंजस's picture

7 Oct 2009 - 11:03 am | समंजस

आणखी पेग येउ द्यात!!
समिक्षक कसे व्हावे यावर चांगलीच माहिती मिळाली :)

धमाल मुलगा's picture

7 Oct 2009 - 8:15 pm | धमाल मुलगा

अविनाऽऽश..... ए पोकळे..... च्यायला सहावापेग नक्की किती मिलीचा भरला? खरं सांग! पाणी-सोडा जास्ती घातला ना?

पुढचा नीट भर...गेलाबाजार ऑन द रॉक्स भर! ह्या पेगला 'लागली'च नाही रे!

राजे,
अंमळ सोडा जास्त पडला बॉ ह्या पेगला :|