मात्र रात्रीची गोष्ट भाग ३

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
12 Sep 2009 - 10:20 am

मागील भाग - २

स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच.

(पॅग मोजायचे सोडून दिले आहे... आता कितवा पॅग आहे ते वेटरालाच माहीत)

मी - अरे तुला चढली आहे काय ?

तो - नाही रे, अजून दोन चार चा कोटा आहे बाकी.

मी - ठिक आहे.. बाकी ते कुंपण शेत रखवालदार .

तो - अरे काय कुंपण शेत रखवालदार बडबडत आहेस.

मी - काहि नाही रे जरा वैचारीक लेखन करावे म्हणत आहे नाही तर गेला बाझार प्रेम कथाच लिहू म्हणत आहे..

तो - अरे वेडा आहेस, जमाना बदल गया. आता लेका तु लेखाचं विडंबन पाडायला बघ. पक्का ५० + - ७०+ प्रतिसाद.

मी - काय सांगतोस बे ? खरचं काय ?

तो - अरे किती उदाहरणे सांगू... ती मान्याचे शेंगदाणे असलेली पुडी फाड रे चकणा संपला.. !

मी - अरे चकणा खुप आहे त्याची काळजी नाही, पण उडला तर ?

तो - अबे सेटिंग करायचे रे.. बघ कुणाचे उडतात कुणाचे उडत नाही ते.

मी - असं कसं ? सेटींग कुणा बरोबर.. आणी कसं ?

तो - अरे सोप्पं आहे.. काही दिवस जबाबदारीने वागायचे थोडा विश्वास संपादन केला की झालं !

मी - नाही कळालं रे ?

तो - तु जरा काजु-बदाम वाला शिरा खात जा रे, तुझं डोकं बसलेलं आहे वाटतं..

मी - ह्म्म, ते बघतो माझं मी तु बोल.

तो - हे बघ ते अ, ब, क व ड आहे ना ब ला खरड टाकायची क बद्दल ड ला अ बद्दल व अ ला क बद्दल चांगले चांगले लिहायचे.

मी - त्याने काय होईल बे ?

तो- अबे, मियां है कोतवाल तो डर काहे का .....

मी - हा हा हा समजलं समजलं.

तो - बाकी लेखन प्रकाशीत करायच्या आधी तुझ्या त्या वक्रपदी मित्राकडून कुंडली काढून .. मुहुर्त बघ.

मी - नाही रे, नाडी शोधेन व बांधून ठेवेन ना.

तो - हा हे पण ठिक.

मी - बाकी एक सांग.. मी दहावी फेल. मला पण एक पदवी पाहिजे आहे काय करु ?

तो - अरे तु काल नव्हतास का टेबल वर ?

मी - नाही रे, बिझी होतो आपल्या आवडत्या स्त्री बरोबर पिच्चर बघायला गेलो होतो.. का काय झालं ?

तो - अरे तो नाना व परा .. डॉक्टर व कंपाउंडर झाले.

मी - एका दिवसात .. कसं रे कसं रे ? मला पण डॉक्टर नाही तर गेला बाझार पंडित ही पदवी तरी लावायची आहे रे नावा मागे.. त्यामुळे वट येतो असे वाटतं आहे.

तो - अरे त्यात काय सोपं ... कान आण इकडे.. कानात सांगतो.. ह्या स्क्रिनला पण कान असतात..

मी- काय सांगतोस.. ############### हॅ हॅ हॅ ! नाही रे इकडे नाही आहे.. ती सुविधा.

तो - अरे दुसरी बघ.. एकाद्या डॉक्टरला गटव.. चार दवादारुची नाव घे घोटून, कोणी काय बोललं की दे ठोकून ह्या गोळ्या घ्या ती दवा ह्या.. चार दिवस कर झाला तु डॉक्टर.

मी- हॅ हॅ हॅ... भारी कल्पना. पण च्यामायला दारुची नावं सगळी माहीत आहेत पण दवाचे काय ? नावं लै अवघड असतात रे त्यांची.

तो - नाडीस्पॅतीपळेशन ! हे नाव कधी वाचले / कानावर पडलं आहे का ?

मी - नाही बे काय आहे हे ?

तो - अबे दवा आहे, नाडीवाल्यांच्या धाग्यामुळे त्रस्त झालेल्यांना शुध्दीवर आणण्यासाठी वापरतात.. मीच तयार केले आहे.

मी - अबे तु तर डॉक्टर झाला बे.

तो - मग.. लै सोपं हाय बे.. आता मी पण उद्यापासून आपल्या नावापुढे डॉ. लावणार बॉ.

मी - अबे, आज पासून का नाही रे ?

तो - अबे नाडि वाल्याने सांगितले आहे की शनिवार घातवार आहे म्हणून रे..

मी - अबे अजून एक काम कर ना.

तो - बोल.

मी - अरे सेठ सोबत एकदा गाठ घालून दे ना यार..

तो - का रे ?

मी - अरे, सारखं सारखं कोल्हापुरी गोंडेदार चपल्ला दाखवत असतो रे... त्याला सांगायचे होते की मी पण त्याच्याच कंपुतला आहे म्हणून..

तो - हॅ हॅ हॅ.. हलकट आपला लेख वाचवायला बघत आहेस... गुरुघंटाल आहेस लेका.

मी - हा हा हा... आता तुझ्या पाऊलावर पाऊल टाकावेच लागेल नै ... अरे वेटर भाऊ.. पॅग आण रं !

तो - अरे परत रिपीट...

मी - चालू दे रे.. रिपीट तर रिपीट चालू दे.

(भाग ३ समाप्त)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

12 Sep 2009 - 10:32 am | शैलेन्द्र

"अरे सेठ सोबत एकदा गाठ घालून दे ना यार."

हे भारी... डायरेक हायकमांड..

दशानन's picture

12 Sep 2009 - 10:52 am | दशानन

:D

शॉर्टकट ;)

सहज's picture

12 Sep 2009 - 10:56 am | सहज

फुल्ल एन्ड फायनल सेटलमेंट कसे बेस्ट :-)

अवलिया's picture

12 Sep 2009 - 11:22 am | अवलिया

रिपीट !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Sep 2009 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

रिपीट इकडे पण ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

श्रावण मोडक's picture

12 Sep 2009 - 12:03 pm | श्रावण मोडक

वाचतोय...

मदनबाण's picture

12 Sep 2009 - 12:35 pm | मदनबाण

समाप्त
छ्या. /:)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

श्रावण मोडक's picture

12 Sep 2009 - 12:44 pm | श्रावण मोडक

तिसरा पेग संपलाय फक्त. अजून दोन-चारचा कोटा बाकी आहे हे लिहून ठेवलंय त्यांनीच. पुन्हा दोन-चार हे आत्ताचे भान. तेही झाल्यानंतर अवकाशाचा विस्तार होतो. ग्रह-तारे पराभूत होऊ लागतात. तेव्हा चिंता नको. रिपीट म्हणत रहा फक्त.

दशानन's picture

12 Sep 2009 - 12:50 pm | दशानन

+१

मदनबाणा असा निराश नको रे होऊ मित्रा ;)

मदनबाण's picture

12 Sep 2009 - 1:20 pm | मदनबाण

व्होक्के... रिपीट प्लीज. ;)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

श्रावण मोडक's picture

12 Sep 2009 - 1:27 pm | श्रावण मोडक

द 'स्पिरिट'!!!

अवलिया's picture

12 Sep 2009 - 12:55 pm | अवलिया

आणि तरीही जर राजे "आऊट" झालेच (होणार नाही, पण सांगता येत नाही) तर पुढील कथामाला आम्ही चालु ठेवु ... ! :)

काय राजे चालेल ना ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

12 Sep 2009 - 1:01 pm | दशानन

काही प्रॉब्लम नाय बॉस ;)

चालू दे !

प्रभो's picture

12 Sep 2009 - 1:15 pm | प्रभो

तिसरा पेग सोबत तिसरा लेख आला...२-४ पेगची अजुन क्याप्यासिटी म्हणजे आजुन २-४ लेख याच मालिकेत वाचायला मिळतील...मजा आहे...

लवकर लिहा राजेसाहेब:)

श्रावण मोडक's picture

12 Sep 2009 - 1:34 pm | श्रावण मोडक

राजे, तुमची कपॅसिटी अशीच वाढत जाओ, अशी प्रार्थना दडली आहे का हो यात? ;)

दशानन's picture

12 Sep 2009 - 1:36 pm | दशानन

हा प्रभो ... माझे अहित चिंतच आहे काय सेठ :?