जपान लाईफ (७)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Aug 2009 - 11:24 pm

मागील दूवा
जपान लाईफ http://misalpav.com/node/8488
जपान लाईफ (२) http://misalpav.com/node/8575
जपान लाईफ (३) http://misalpav.com/node/8647
जपान लाईफ (४) http://misalpav.com/node/8724
जपान लाईफ (५) http://misalpav.com/node/8754
जपाम लाईफ (६) http://misalpav.com/node/8787
तंत्रज्ञानामुळे तुम्हाला नसलेल्या गोष्टीवरही विष्वास बसतो. एखादा कोटटाय घातलेला कोणीतरी काहितरी सांगतो ते खोटे का असेल? असा आपण विष्वास ठेवतो( टायचा हा एक छुपा गुण) आपन त्या प्रॉडक्टबद्दल एकही प्रश्न विचारत नाही. त्यानी सांगितलेली किम्मत खरी आहे त्याने सांगितलेले गुण खरे आहेत हेच मानतो.
प्रॉडक्ट ही मोनॉपली आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान इतर कोणाही कडे उपलब्ध नाही यावर आपण विष्वास ठेवतो.
खरा खेळ सुरु होतो या नन्तर .......

प्रॉडक्ट्ची नक्की किम्मत काय असेल याचा अंदाजही कोणीच बांधत नाही,किमतीबद्दल कोणी विचारले की सांगितले जाते वस्तुची क्वालिटी पहा. त्याचे उपयोग पहा.आणि ते स्वतः अनुभवून पहा. म्हणजे प्रॉडक्ट विकत घेऊम पहा. त्या गादीचे अर्र ...स्लिपिंग सिस्टीमचे साधे दर्शनही घेऊ दिले जात नाही.
प्रॉडक्ट हे जणू कोणी रजपूत राणी आहे आणि आपण अल्ला उद्दीन खिलजी असेच काहिसे केले जाते.
हळूहळु चर्चा प्रॉडक्ट्चे रीटर्न्स आणि मिळणारे पैसे याकडे येते.
प्रॉडक्ट च्या किमतीबद्दल विचारले तर हमखास एक उदाहरण दिले जाते की तुमच्याकडे कोनती गाडी/२ व्हीलर आहे. बहुतेकजण काहितरी नाव सांगतात पुढचा प्रश्न येतो समजा मला एक २व्हीलर घ्यायची आहे तुम्ही मल तुमच्या वाहनाच्या कंपनीचे वाहन घ्यायला सांगाल का?साहजीकच " हो" असेच उत्तर येते. समजा मी ते वाहन तुमचे ऐकून घेतले तर तुम्ही कंपनीच्या केलेल्या मार्केटिंगबद्दल ती वाहन कम्पनी तुम्हाला काय देणार? काहीच नाही. आमची कम्पनी त्यांच्या ग्राहकाना त्यानी केलेल्या जहिरातीबद्दल थेट कमिशन देते. प्रॉडक्शन कम्पनी/सी& एफ एजन्ट /वितरक/डीलर/ किरकोळ विक्रेता/ आणि ग्राहक या साखळीत प्रत्येक टप्प्यावर प्रॉडक्टची किम्मत कमिशन मुळे वाढत असते आणि त्याचा बोजा थेट ग्राहकावर पडतो. या ऐवजी ग्राहकाने केलेल्या जहिरातीसाठी म्हणून त्यालाच कमिशन दिले जाते. आणि वस्तुची किम्मतही वाढत नाही.
( किम्मत अवाजवी आहे या मुद्द्याला शिताफीने बगल दिली )
हे आपल्याला पटते.
मग आकडेवारी दाखवली जाते. अमक्याला इतके मिळाले/ तमक्याला तितके मिळाले/ पासबुक आणि मिळालेल्या चेकच्या झेरॉक्स दाखवल्या जातात.
या मिळालेल्या रकमेवर मी टॅक्स भरतो. हा धन्दा संपूर्ण कायदेशीर आहे.
आपला अजूनही विश्वास बसलेला नसतो. आपण अजूनही संभ्रमीत अवस्थेत असतो.
पुढचा मुद्दा येतो......तुम्ही तुमच्या सी ए ला विचारून पहा.
आता आपला पूर्ण विश्वास बसतो.
आता आपली शंका....पण मला जमेल का हा व्यवसाय करायला?
साहेब ते गुजराती मारवाडी लोक बघा कुठून कुठून येतात इथे धन्दा करतात. आपण रडत बसतो.
संधी नेहमी येत नाही.
आता आपण निर्णय घेण्याच्या जवळ आलेलो असतो.
पण मला जमेल का लोकाना सांगायला?
का नाही जमणार? अन तुम्हाला कुठे काय सांगायचे आहे. तुम्ही फक्त लोकाना इथे घेऊन या. अपलाईन कशासाठी आहे? तुम्हाला सगळी मदत करतील. मी नाहीका करत सेल? माझ्या सारख्या माणसाला जर लोकाना गोळा करता येत असेल तर तुम्ही तर सहज करु शकाल. अहो पाच वरशांपूर्वी मला पाहिले असते ना तुमचा विश्वास बसला नसता. एका फालतू कम्पनीत डीस्पॅच क्लार्क होतो. मलाही तुमच्यासारखेच वाटत होते. पण अपलाईन ने विश्वास दिला ( इथे अपलाइन या शब्दानन्तर कानाच्या पाळीला/जिभेच्या शेन्ड्याला हात लावला जातो) अहो ते होते म्हणून तर आज मी येथे आहे नाहीतर अजूनही बसलो असतो टाईपरायटरवर बोटे बडवत. मला संधी मिळाली मी संधीचाफायदा घेतला.
आपण ह्या वेळेपर्यन्त त्याच्या पूर्ण कह्यात आलेलो असतो. चेकबूक असते तर सही करून चेक देऊन टाकलाही असता.
तुम्ही तुमच्या वडीलाशी बोला. तुम्हाला स्वतःच्या पायावर उभेरहायला ते मदत नक्की करतील . अहो साधी पानपट्टी टाकायची असेल तरी तीन लाखाच्यावर भांडवल लागते. त्यातून नफा काय मिळणार ?त्याला प्रतिष्ठा नसते ते वेगळेच. इथे हा तुमचा स्वतःचा बीझनेस तयार होतो. ऑफीसची गरज नाही. कम्पनी तुमच्यासाठी या इथे सेमिनार घेते.रीटर्न्स म्हणाल तर तुम्ही मला आलेले कमिशनचे चेक्स पाहिलेतच.
आता आपला त्या कोट टायवाल्यावर विश्वास बसतो. तो आपला तारणहार आहे या नजरेने आपण त्याला पाहु लागतो.
पण लोकाना मी या गादीबद्दल काय सांगायचे?
गादी म्हणू नाका हो साहेब्....स्लिपिंग सिस्टीम म्हणा स्लिपींग सिस्टीम. गादी म्हणायला लागले की एकदम कसेतरीच वाटते. आणि हो तुम्ही लोकाना सांगताना याचा अजिबात उल्लेख करु नका.
पण मग सांगायचे काय?
ते तुम्ही अपलाईनवर सोपवा.
तुम्ही अगोदर तुमच्या संभाव्य ग्राहकांची यादी करायला लागा
ती कशी करायची?
तुम्हाला फ्रेन्ड या शब्दाचे स्पेलिंग येते ना?
हो हे काय एफ आर आय ई एन डी एस
बरोब्बर
एफ = फ्रेन्ड्स म्हणजे खरोखर जवळचे मित्र
आर = रीलेटीव्ह नातेवाईक
आय= इन्टीमेट्स म्हणजे तुम्हाला जे अगदी जवळचे वाटतात असे लोक
ई = एम्प्लॉईज = तुमच्या ऑफीसमधले सहकारी/तुमच्या हाताखालचे जे तुमचा शब्द मानतात
एन= नेबर्स = शेजारपाजारचे
डी = डिस्टन्ट्स्...तुम्ही ज्याना नुसते ओळखता उदा तुमचा किराणावाला, मुलांचे शिक्षक नेहेमीचा कुरीयरवाला ते लोक
एस = स्पेशल्...ज्यांच्या बद्दल तुम्हाला आदर आहेत ते लोक.
अशा लोकांची एक यादी करा.त्याना सांगा की तुम्ही एक नवा व्यवसाय सुरु करणार आहात तुम्हाला त्यांचा सल्ला हवा आहे....सल्ला ही अशी एकच गोश्ट आहे की लोक ती न मागताही देतात आणि कोनी मागितली तर एकदम आनन्दीत होतात.
मला लोकेशच्या फोनवरच्या सम्भाषणाची आठवण झाली.
लोकेशने मला बरोब्बर पकडले होते आणि सावज म्हणून जाळ्यात स्वतःहून चालत आलो होतो. दहा हजारापेक्षा ज्याची किम्मत एक कपर्दीकही जास्त नसेल अशी एक गादी मी एक लाखात घ्यायला निघणार होतो.
मानसशास्त्राचा एवढा चांगला उपयोग गोबेल्सनेही करून घेतला नसेल
(क्रमशः)

वावरलेख

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

11 Aug 2009 - 11:48 pm | अभिज्ञ

उत्तम माहिती.
आता पुढचा भाग लवकर द्या.

अभिज्ञ.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Aug 2009 - 5:34 am | llपुण्याचे पेशवेll

हेच म्हणतो.. उत्तम माहीती....अमेरीकेतही अशा चेन मार्केटींग वाल्या कंपन्या बिनबोभाट धंदा करतात. तुम्ही वॉलमार्ट किंवा तत्सम कोणत्या मॉल मधे गेलात आणि तेथे एकादा भारतीय माणूस स्वतःहून तुमच्याशी बोलायला ओळख काढायला आला तर समजायचे की असलाच चेनमार्केटींगवाला असणार. अशा लोकांपासून सावध राहावे लागते. बोलण्यातही फार चतुर असतात हे लोक.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

अवलिया's picture

12 Aug 2009 - 11:38 am | अवलिया

हम्म.. वाचतो आहे...

--अवलिया

योगी९००'s picture

12 Aug 2009 - 12:29 pm | योगी९००

मस्त माहिती आणि अनुभवकथन...

पुढील भाग लवकर येऊ द्या. लोकेश वाचतो का हे भाग...?

खादाडमाऊ
(बरे झाले माझे कोणी ...FRIENDS ...मि.पा.वर नाहीत ते)

समंजस's picture

12 Aug 2009 - 12:39 pm | समंजस

आणखी येउ द्या!!!!

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2009 - 12:45 pm | प्रकाश घाटपांडे

पिसांची गादी वर एक बातमी वाचली होती. ज्या पक्षांची ती आहेत त्यांची हत्या केल्याचा आरोप होता तेव्हा जंगलात मेलेल्या पक्षांची पिसे आहेत असा खुलासा कंपणीने केला होता.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ's picture

12 Aug 2009 - 6:27 pm | लिखाळ

छान आहे. जपान लाईफ मजेदार प्रकार आहे.
(एकदा त्या सेमिनारला जाऊन मजा घेऊन यावे असे वाटते आहे :) )

पुढे लिहा लवकर..उत्सुकता आहे.
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक-आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

ज्ञानेश...'s picture

12 Aug 2009 - 11:47 pm | ज्ञानेश...

वाचतो(च) आहे...

("प्रॉडक्ट हे जणू कोणी रजपूत राणी आहे आणि आपण अल्ला उद्दीन खिलजी.." =)) जाम हसलो!)

"Great Power Comes With Great Responsibilities"

विजुभाऊ's picture

12 Aug 2009 - 11:49 pm | विजुभाऊ

(एकदा त्या सेमिनारला जाऊन मजा घेऊन यावे असे वाटते आहे )

अहो भयंकर प्रकार असतो. नार परवडली पण सेमीनार नको.
एकदा अ‍ॅमवे चा सेमिनार अनुभवून पहा/ अर्थात त्याबद्दल मी लिहिणारच आहे.
पण एक आहे तेथे गेल्यावर आपण त्याना हवे तसे चिन्तन करायला लागतो हे खरे. मास हिप्नॉटीझमचे यापेक्षा उत्तम उदाहरण आणखी कय हवे

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

कवटी's picture

13 Aug 2009 - 5:03 pm | कवटी

मस्त चाललय विजु भाउ,
खालच्या लिंकवरचा अनामिकाचा अनुभव पण मस्त आहे.
http://pailteer.blogspot.com/2008_08_01_archive.html

कवटी

टारझन's picture

13 Aug 2009 - 5:27 pm | टारझन

हॅहॅहॅहॅहॅहॅ !!!

दहा हजारापेक्षा ज्याची किम्मत एक कपर्दीकही जास्त नसेल अशी एक गादी मी एक लाखात घ्यायला निघणार होतो.

विजुभाऊ ... काय हे ? हॅहॅहॅ हे टेक्निक शिकला असता तर तुम्ही अजुन बकरे बनवुन करोडपती झाला असतात

- टिश्युभाऊ

दशानन's picture

13 Aug 2009 - 6:43 pm | दशानन

उत्तम माहिती.
आता पुढचा भाग लवकर द्या.

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !