जपान लाईफ (६)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
2 Aug 2009 - 11:56 pm

मागील दूवा
जपान लाईफ http://misalpav.com/node/8488
जपान लाईफ (२) http://misalpav.com/node/8575
जपान लाईफ (३) http://misalpav.com/node/8647
जपान लाईफ (४) http://misalpav.com/node/8724
जपान लाईफ (५) http://misalpav.com/node/8754
श्रीमन्त व्हायचे हे ध्येय आयुष्यात मी कधीच ठेवले नव्हते...कदाचित ते आपल्याला झेपणार नाही याची खात्री असेल म्हणूनही असेल.........
पण आता मी लवकरच श्रीमन्त होणार होतो........चार माणसे आपल्याला ओळखत नसली म्हणून काय झाले.....आमचे आयुष्य......आमच्यासाठी जगणार होतो...

हे विचार डोक्यात ठेऊन का कोण जाणे एक दिवस जाउ दिला. एक लाखाची सोय काय करायची हाच विचार डोक्यात होता.
विचारांच्या नादात फिरत असतानाच अचानाक हाक ऐकु आली आवाजाच्या दिशेने पाहिले तर माझा शाळेतला मित्र अमर बोलावत होता. बरेच वर्षानी दिसला. आम्ही चहा प्यायला गेलो टेबलावर बसल्यावर काय कोठे आहेस कसे चालले आहे काय करतोस वगैरे गप्प सुरु झाल्या. मी माझी कथा सांगितली. ती जपानी स्लिपिंग सिस्टीम चे प्रकरण सोडून सगळे काही सांगितले. मग अचानक म्हणालो की मला एक जब्बरदस्त संधी मिळतेय .
अमर हसला म्हणाला काय म्हणालास पुन्हा एकदा म्हण. मी पुन्हा म्हणालो की मला एक जब्बरदस्त संधी मिळतेय . त्यावर अमर पुन्हा हसला तो "जबरदस्त" शब्द पुन्हा म्हण.
मल कळेना हा असे का म्हणाला ते. त्याने पुन्हा आग्रह केला. तो जबरदस्त हा शब्द म्हण
मी म्हणालो " जब्बरदस्तः
अमर एकदम म्हणाला " काय जपानी गादीच्या सेमिनारला जाऊन आलास ना?"
आता आश्चर्य चकित व्हायची पाळी माझी होती. अर्रे हा एका शब्दावरून ओळखतोय?
अरे तुला कसे कळाले. की मी त्या स्लिपिग सिस्टीमच्या सेमिनारला जाऊन आलो ते?
त्याचे काय आहे तु जबरदस्त हा शब्द ज्या थाटात म्हणालास ना त्यावरुन ओळखले. मी सुद्धा गेलो होतो त्या सेमिनारला. तीन महिन्यांपूर्वी.
मग काय झाले तु झालास मेम्बर जपान लाईफचा?
नाही रे.
का?
अरे जपान लाईफ हा बिझनेस आपल्या सारख्या लोकांसाठी नाहिय्ये.
म्हणजे?
अरे हे बघ........अमर सांगु लागला.
त्याचे ऐकत असताना मला वारंवार डेरे साहेबाचे वोलणे आठवत होते. की सल्ला अशा लोकांचा घ्या जे यात यशस्वी झाले आहेत........ अपयशी माणसे तुम्हाला मागे खेचतील. यशस्वी लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील.
पण अमर जे बोलत होता ते ऐकून माझ्या डोक्यात वेगळीच गडबड झाली.
मी निर्णय घेऊच शकणार नव्हतो. एकी कडे ते लाखालाखाच्या नोंदी असणारे पासबूक आणि दुसरीकडे अमर बोलत होता ते............. दोन्ही खरे होते.
अमरने त्या उद्योगासाठी ब्यान्केतून कर्ज काढले होते.......का कोण जाणे त्याने ऐन वेळेस जापान लाईफ च्या नावे काढलेला वेळेस तो ड्राफ्ट रद्द केला.
जपान लाईफ म्हणा काय किंव अ‍ॅमवे, व्हर्साटाईल सारख्या मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपन्यांची एक वेगळीच दुनिया ऐकायला मिळाली.
जपान लाईफ चे प्रॉडक्ट म्हणजे मॅग्नेटीक गादी रीव्होल्व्हिंग मॅग्नेटस ही कल्पना त्यानी लोकांच्या डोक्यात घातली. चुंबक चिकित्सा ही एक वादग्रस्त गोष्ट आहे. त्याच्या खरेखोटेपणाबद्दल लोकांमध्ये ज्ञानापेक्षा अज्ञानच जास्त आहे. वैद्यकशास्त्राने त्याचे चुंबकचिकित्सेला गौण स्थान दिलेले आहे. अमेरीकन सरकारने या शास्त्राच्या प्रसारावर बंदी घातलेली आहे कारण चुंबक चिकित्सा ज्या तत्वावर आधारीत आहे ते तत्वच प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकलेले नाही
ह्या इथे http://en.wikipedia.org/wiki/Magnet_therapy तुम्ही त्याबद्दल अधीक वाचु शकता.
ही जपान लाईफ कंपनी चुंबकीय उत्पादने बनवते आणि विकते इतपत त्यांचा व्ययसाय मर्यादीत असता तर ठीक होते अर्थात तीही फसवणूकच होती. पण निदान घेणाराचे जे उत्पादन घेतले त्याचा उपयोग त्यासाठीच होता. पण इथे कंपनी काही वेगळेच सांगु पहात होती.
आमची उत्पादने तुम्ही वापरा . तुम्हाला काय अनुभव आला ते सांगून त्याचा प्रसार तुम्ही करा. विक्रीतून होणारा नफ्यात तुम्हाला हिस्सेदार करु.
हेही समजू शकते. पण घडत होते ते काही वेगळेच होते.
धंद्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत होती. काही मोजकेजण श्रीमन्त होत होते. ते पाहून बरेचसे खुळे होत होते.
हे नक्की कसे होते ते पाहु या
जापान लाईफ ची गादी ( स्लिपिंग सिस्टीम ?) तुम्ही एक लाखाला विकत घेता. त्यातली
जवळ जवळ निम्मी रक्कम ही कंपनी ला जायची आणि उरलेली रक्कम ही तथाकथीत डिस्ट्रीब्यूर्स मध्यी वाटली जाते.
तुम्ही जेंव्हा ती गादी विकत घेता तेंव्हा तुम्ही त्याचे डिस्ट्रीब्यूर्स बनता. तुम्ही समजा त्या गादीचे फायदे इतराना सांगितले आणि त्यामुळे प्रेरीत होऊन त्या लोकानी ती गादी घेतली तर कंपनीला होणार्‍या नफ्यात तुम्हाला हिस्सेदारी मिळेल. त्या लोकानी प्रॉडक्ट वापरून अन्य लोकाना या बद्दल सांगितले आणि त्या अन्य लोकानी जर ती गादी विकत घेतली तर तुम्हालाही नफ्याचा काही टक्के हिस्सा मिळेल. या पद्धतीला रीसेड्यूअल इनकम म्हणतात. ज्यानी तुमचे ऐकून ती गादी घेतली ते लोक तुमचे डाऊनलाईन आणि त्या लोकांचे ऐकून ज्या अन्य लोकानी ती गादी घेतली त्या अन्य लोकाना त्यांची डाउन लाईन म्हणतात. अशा पद्धतीने एक मनोरा ( पिरॅमिड) रचला जातो. जसजसे नवनवे लोक यात येतात तळातल्या लोकांच्या पैशावर वरच्या लोकाना पैसे मिळतात
तर असे रेसीड्यूल इनकम तुम्हाला सतत मिळत राहिल.
खरे तर अशा चिटफन्ड पिरॅमिड प्रकारच्या व्ययसायाला भारतात कायद्याने मनाई आहे.
As per Section 3 of the Prize Chits and Money Circulation Schemes (Banking) Act, no person shall promote or conduct any prize, chit or money circulation scheme, or enroll a member to any such chit or scheme promising remittance of money in pursuance of the scheme. They can be punished with imprisonment for a term up to three years.

पण का कोण जाणे आपले सरकार नेहमीच अशा कंपन्यासमोर नबळे ठरते आता हेच पहाना
Chandigarh, December 14. २००२
With the intervention of the Union Ministry of Finance, the Economic Offence Wing of the Chandigarh police has reportedly decided to stop its investigations against six multi-level marketing (MLM) companies — Golden Trust Finance Services, Onlinejobs.com, Amway India Enterprises, Japan Life India, Best Internet Services and Cossets India Ltd. — which were allegedly violating the Prize Chits and Money Circulation Schemes (Banking) Act, 1978 by exploiting agents and consumers.
( http://www.tribuneindia.com/2002/20021215/cth1.htm )
असो......आपण पहाणार आहोत ते अगदी उत्तम सुशिक्षीत लोकही लोक या प्रकाराला कसे भुलतात ते. यां कंपन्यानी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करून एक मार्केटिंगचे एक तंत्र बनवले आहे.
सर्वप्रथम तुम्हाला कोणितरी एक मित्र नातेवाईक सल्ला मागायला येतो. एक जब्बरदस्त अपॉर्च्युनिटीबद्दल काहितरी सांगतो. त्याबद्दल नक्की काही न बोलता थोडेसे मोघम बोलतो. तुम्हाला एखाद्या सेमिनार मध्ये नेतो. तुम्ही तेथे जाता तेथे एखादी फिलम पहाता. तंत्रज्ञानामुळे तुम्हाला नसलेल्या गोष्टीवरही विष्वास बसतो. एखादा कोटटाय घातलेला कोणीतरी काहितरी सांगतो ते खोटे का असेल? असा आपण विष्वास ठेवतो( टायचा हा एक छुपा गुण) आपन त्या प्रॉडक्टबद्दल एकही प्रश्न विचारत नाही. त्यानी सांगितलेली किम्मत खरी आहे त्याने सांगितलेले गुण खरे आहेत हेच मानतो.
प्रॉडक्ट ही मोनॉपली आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान इतर कोणाही कडे उपलब्ध नाही यावर आपण विष्वास ठेवतो.
खरा खेळ सुरु होतो या नन्तर .......
(क्रमशः)

वावरलेख

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

3 Aug 2009 - 8:08 am | विंजिनेर

वाचतो आहे. माझ्याच सारखी सामान्य माणसे मिठ्ठास बोलण्याला कशी भुलतात ते मनोरंजक आणि थोडे विचार करायला लावणारे आहे..

बाकी, जमले तर पुढचे भाग अजून थोडे मोठे येऊद्या...

अवलिया's picture

3 Aug 2009 - 10:48 am | अवलिया

जरा भाग मोठे मोठे लिहायचे मनावर घ्या विजुभौ... लै ताणु नका.. :)

टुकुल's picture

3 Aug 2009 - 7:29 pm | टुकुल

हेच म्हणतो ...

--टुकुल

ज्ञानेश...'s picture

3 Aug 2009 - 5:07 pm | ज्ञानेश...

हा भाग आवडला.
काही नव्या गोष्टी समजल्या.

"Great Power Comes With Great Responsibilities"

योगी९००'s picture

4 Aug 2009 - 2:23 pm | योगी९००

खरा खेळ सुरु होतो या नन्तर .......

सांगा ..सांगा.. लवकर पुढचा भाग टाका...च्यायला रोज २-३ वेळा तरी मि.पा. उधडून तुमचा पुढचा भाग आला का ते पहातो.

हा ही भाग मागच्या भागासारखा उत्तम...

खादाडमाऊ

कराडकर's picture

4 Aug 2009 - 3:14 pm | कराडकर

मलापण उत्सुकता लागुन राहिली आहे. खूपच मस्त लिहीले आहे..
ही गादी सॉरी स्लिपिंग सिस्टीम विकणार्‍यांनी पश्चीम महाराष्ट्रामध्येच जास्त धंदा केला कां ?

झकासराव's picture

5 Aug 2009 - 9:43 am | झकासराव

विजुभाउ चांगल लिहिताय जरा मोठे भाग येवु देत की.
आमच्या गल्लीतला एकजण अडकला होता ह्या गादीत.
आम्ही शाळेत होतो. त्यावेळी ५०००० का एक लाख असा काहिसा आकडा ऐकला होता. असली कसली गादी असल म्हणुन लयी आस्चर्य झाल होत.
असल्याच एका स्कीम मध्ये अडकता अडकता वाचलोय मी. इन्डस हॉलिस्टिक वैगेरे वैगेरे.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विजुभाऊ's picture

5 Aug 2009 - 7:17 pm | विजुभाऊ

असल्याच एका स्कीम मध्ये अडकता अडकता वाचलोय मी.

हे मी वाचता वाचता अडकलोय असे वाचले मी. ;)

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे