जपान लाईफ(५)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
30 Jul 2009 - 10:49 pm

मागील दूवा
जपान लाईफ http://misalpav.com/node/8488
जपान लाईफ (२) http://misalpav.com/node/8575
जपान लाईफ (३) http://misalpav.com/node/8647
जपान लाईफ (४) http://misalpav.com/node/8724

आता या वर्षाच्या अखेरीस आम्ही प्रत्येकजण किमान दशलक्षाधीश होणार होतो.
आणि कोणाला तरी मनापासून हसत विचारणार होतो. "साहेब तुम्हाला हवंय अशा नोन्दी असणारे तुमच्या नावाचे पासबूक?"
आमच्या नकळत ;मानसशास्त्राचा पुरेपूर अभ्यास करून आम्हाला कशा पद्धतीने अडकवण्यात येत होते त्याचा आम्हाला गंधही नव्हता.
"बकरा किश्तो पें " हे आमच्या नव्या अवस्थेचे नाव होते. असे बरेच बकरे किश्तोमे हलाल होण्यासाठी रांकेत उभे होते

त्या धुंदीतच घरी आलो. झोपताना आता या गादीवर फार दिवस झोपायचे नाही एकदा का ती मॅग्नेटीक स्लीपिंग सिस्टीम आली की मग.....स्वप्नातसुद्धा मला मी त्या गादीवर सॉरी स्लिपिंग सिस्टीम वर झोपलोय असे दिसत होते.
त्याच धुंदीत जागा झालो. मी माझ्या तंद्रीतच होतो .सकाळी चहा पिताना ही म्हणाली "काय आज लक्ष्य कुठे आहे? काल कोल्हापुरला कोण भेटले का?
अरे.......मी काय म्हणतेय्....लक्ष्य कुठे आहे. मी चहात साखर टाकायला विसरले आणि तू तो चक्क तस्सा पिउन टाकलास?
आं काय कुठे काय काही नाही.
अरे कसला एवढा विचार करतो आहेस?
अग काल ना..मी एका वेगळ्याच दुनियेत गेलो होतो. आता आपली फरफट संपणार.
कसली फरफट्.....काय म्हणतो आहेस.....
सांगतो ...............तीला काहीही सांगायचे नाही असे ठरवूनही मी सगळे सांगितले.
माझे सगळे सांगून झाल्यावर आम्ही दोघेही बराच वेळ गप्प होतो. कोणीच काही बोलत नव्हते.
हे सगळे स्वप्नवत वाटतय रे....आपण फसणार तर नाही ना...
हो ना मलाही तसेच वाटत होते.पण मी त्याचे ब्यांकेचे पास बुक पाहिले. लाखालाखांच्या नोंदी होत्या त्यात.......
आपण दोघेही मिळवते आहोत्........पण पासबुकात कधी एक लाख जाऊदेत दहाहजार ही शिल्लक दिसली आहे तुला?
खरे आहे रे.
मला आता वैताग आला आहे त्या तसल्या जगण्याचा. त्या माणसाला कोणी फारसे ओळखत ही नव्हते . आपण मात्र कवटाळून बसलो आहोत खोटी मानमरातबे जपत. कोणी सर तुमच्या मुळे माझा मुलगा लायनीवर आला म्हंटले की आपल्याला अस्मान ठेंगणे वाटते....जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ......असे आपण स्वतःला संत समजत आलो . लोकानी चांगले म्हंटले की झाले...मग आपल्या मुलाना चांगल्या शाळेत उत्तम शिक्षण पैशा अभावी घेता आले नाही तरी ते चालते....आपल्याला कुठे ट्रीपला फिरायला जाता आले नाही तरी चालते.......परवडत नाही म्हणून आपण हनिमूनलाही इथे जवळच गेलो होतो............आठवते........आपण मध्यमवर्गीय....... आपल्याला ते जमणार नाही म्हणून आपण समाधानाचा मुखवटा पांघरतो...... पैशाअभावी आम्हाला ते जमत नाही हे लपवण्यासाठी ठेविले अनन्ते चित्ती असु द्यावे समाधान चा गजर करतो....
आपले बालपण आपल्या हातात नव्हते.....तरुणपण मुलांसाठी खर्ची घालतोय्.... निदान म्हातारपण तरी आपल्या स्वतःच्या हातात असू देत...... आजाराला औषधाला कोणाकदे हात पसरायला लागु नये .........किमान इतके तरी आपल्या हातात असावं.......
मी बोलत होतो.........मनात भूतकाळातली कितीतरी पाने उलटत होती....
ताईच्या लग्नात बाबानी कर्ज केले......ते आपण फेडत बसलो....बाबांचे आजारपण्.....त्याचा खर्च...........आईला उपचार करायला पैसे नव्हते...डोळ्यादेखत तिला खितपत पडलेले पहायला लागले.......
ऑफिसमधली सोनाली.....तिचे वडील गेले म्हणून निरोप आला...त्या रात्री तिच्या घरी ती आणि तिची म्हातारी आई शून्य नजरेने बसलेले होते..........शेजारी वाड्यात इतरत्र टीव्ही सिरीयल्स चा आवाज येत होता..........पैसे नाहीत म्हणून माणसाने मर्तीकाला ही महाग व्हावे........तो आपल्या आयूष्यातला प्रसंग.......... मनावर कायमचा ओरखडा काढुन गेलाय....
कितीतरी वेळ मी तसाच असंबद्ध बोलत होतो.
हीच्या डोळ्यातून पाणी येत होते. माझ्या डोळ्यातही तळे झाले होते........
आम्ही तस्से बसून राहिलो...... अचानक हीने माझा हात घट्ट धरला.........त्या स्पर्षात सगळा आश्वासकपणा भरून होता. तुझ्या सुखदु:खात मीही सहभागी आहे असेच म्हणायचे होते. त्यापलिकडचेही बरेच काहीसे तो स्पर्श सांगत होता.
चहा गार ढोण झाला.......... आपण लोकेशला पुन्हा एकदा विचारू मी पण येईन त्या सेमिनारला.
इतके पैसे आपण भरणार नीट चौकशी करुयात. आपण तुझ्या इतर मित्राना सुद्धा विचारु यात
नको.........त्या सेमिनार मध्ये सांगितले की तुमच्या आयूष्याचा निर्णय तुम्ही घ्या आनि काही सल्ला घ्यायचाअसेल तर ज्याला ज्ञान आहे त्यालाच विचारा म्हणून
म्हणजे.........
लोकांचा विश्वास नसतो की इतके पैसे मिळू शकतात म्हणून्........त्याना ते खोटे वाटते.ते तुमचे पाय खेचायला पहातात........
खरे आहे. पन मग विचारायचे कुणाला?
या व्यवसायात जो सक्सेस्फूल झाला आहे त्यालाच विचारू.
आम्ही डेरेचा नंबर फिरवला........ तो एंगेज होता.
म्हणून मग राजशेठचा नंबर फिरवला.
त्यालाही माझ्यासारखाच प्रश्न पडला होता.......दोघेही एका हॉटेलात भेटलो. काहीच निर्णय होत नव्हता. डोके फिरायची वेळ आली...
अमेय चा मात्र निर्णय झाला होता. त्याने वडिलांच्या प्रॉव्हिडन्ट फंडावर कर्जासाठी अर्ज ही केला होता. त्याचा चेक उद्या मिळणार होता. त्याने मला त्याची यादी दाखवली...मित्र नातेवाईक ओळखीचे दूरचे असे सगळे त्या यादीत होते. माणसाच्या ओळखी किती असू शकतात याची ती एक झलक होती.
मीही आठवून आठवून प्रयत्नपूर्वक लिस्ट करायला लागलो कसाबसा आकडा सव्वाशे पर्यन्त गेला.
हे सगळे माझे संभाव्य ग्राहक होते.
मारायचे कोणाला याची यादी बकरेच स्वतः होऊन खाटकाला देत होते.
अमेय सारखा अननुभवी तरूण जर सहज या व्यवसायात उतरत असेल तर मी का नाही...दशलक्षाधीश व्हायचे माझे स्वप्न मी आता दिवसासुद्धा पहायला लागलो होतो...
श्रीमन्त व्हायचे हे ध्येय आयुष्यात मी कधीच ठेवले नव्हते...कदाचित ते आपल्याला झेपणार नाही याची खात्री असेल म्हणूनही असेल.........
पण आता मी लवकरच श्रीमन्त होणार होतो........चार मणसे आपल्याला ओळखत नसली म्हणून काय झाले.....आमचे आयुष्य......आमच्यासाठी जगणार होतो...
(क्रमशः)

वावरलेख

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

30 Jul 2009 - 11:20 pm | मस्त कलंदर

माझ्या आतेभावाने ही गादी घरी आणली होती.. त्या सगळ्या मित्रांनी एकदमच ही गुंतवणूक केली होती.. गादी घरी आली तेव्हा ती कशी उघडायची.. त्यातले मॅग्नेट्स.. सगळी प्रात्यक्षिके पण पाहिली होती.. आम्हीपण एक लाखाची गादी(?) पाहून यात एक लाखासारखे काय आहे हा विचार करत होतो.. नंतर त्या गादीचं काय झालं हे माहीत नाही.. त्यानेही ही मूठ "झाकलीच" ठेवली.. पण तिचा फायदा माझ्या भावाला किंवा त्याच्या मित्राला कुणालाच झाला नाही..

अवांतः जरा मोठे भाग येऊद्यात ना.. म्हणजे नक्की काय झाले की ज्यामुळे तुम्ही यात अडकला नाही हे तरी कळेल... बाय द वे.. हे प्रकरण अजूनही चालू आहे? माझ्य भावाने ती २००० मध्ये घेतली होती... पुढच्याच्या ठेचेवरून लोक कधी शहाणे व्हायला शिकणार???

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

कवटी's picture

31 Jul 2009 - 9:56 am | कवटी

मारायचे कोणाला याची यादी बकरेच स्वतः होऊन खाटकाला देत होते.

वा सुंदर लिहीलय.... पण भौ इतर म्हणतात तसे जरा मोठे मोठे भाग टाका ना राव.
गादीचा सॉरी स्लिपिंग सिस्टीमचा स्वप्न प्रवास नका करू.

कवटी

योगी९००'s picture

31 Jul 2009 - 1:14 pm | योगी९००

जपान लाईफ मधला हा भाग सगळ्यात छान...आमच्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाची मनस्थिती दाखवलीत.

मी सुद्धा असाच विचार केला होता. पण आयत्यावेळी माघार घेतली आणि वाचलो.

विजुभाऊ -पुढचा भाग लवकर टाका. आम्हालाही उत्सुकता आहे की तुम्ही काय निर्णय घेतला ते.

एक गोष्ट मात्र खरी, मी समजा तुमचे एवढेच भाग त्यावेळी वाचले असते तर जपान लाईफचा मेंबर झालो असतो.

खादाडमाऊ

निखिल देशपांडे's picture

31 Jul 2009 - 1:18 pm | निखिल देशपांडे

आता मला भीती वाटायला लागली आहे... विजुभाउ त्यांचा पासबुकाचे स्कॅन टाकुन त्यात लाख लाखाच्या नोंदी दाखवणार...
मग शेवटच्या भागात लिहिणार आता तुम्ही पण होवु शकता श्रिमंत माझ्या कडुन एक गादी सॉरी स्लिपिंग सिस्टम घेउन ;)

बाकी थोडे मोठे भाग टाका ना हो...

निखिल
================================

विजुभाऊ's picture

31 Jul 2009 - 1:42 pm | विजुभाऊ

ही लेखमाला मी मल्टीलेवल मार्केटिंग तुमच्या भावनांचा कसा फायदा उठवते आणि लोकाना कसे कामाला लावते ते दाखवण्यासाठी लिहितोय