खुन्नस !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
27 Jul 2009 - 6:12 pm

हे खरंतर (माझंच) नक्कल - चिकट लिखाण (कॉपी-पेस्ट) आहे. आधी एका संकेतस्थळावर प्रकाशित केलेलं. पण म्हटलं मि पा वर लिहायची सुरुवात ह्यानंच करावी. तुका म्हणे त्यातल्या त्यात..... !

नाही हो... ही खुन्नस म्हणजे एकेरी वाहतुकीतून उलट्या बाजूने येणाऱ्या पुणेकराकडे सिग्नल तोडणारा पुणेकर ज्या नजरेने बघतो ती खुन्नस नाही. किंवा हिमेश रेशमिया त्याच्या गाण्यांनी बिचाऱ्या श्रोत्यांवर काढतो तशीदेखील खुन्नस नाही. आपल्याला अभिप्रेत खुन्नस वेगळी आहे.

खुन्नस.... तुम्ही म्हणाल अचानक खुन्नस ह्या प्रकाराबद्दल इतकं प्रेम उत्पन्न होण्याचं कारण? ते ही तसं इंटरेस्टिंग आहे. आठवड्याभरपूर्वी आय पी एल मध्ये मुंबई विरुद्ध राजस्थान सामना बघायला मी कचेरीतून अमेरीकेतील एका क्लायंटचा कॉल 'कोलून' लवकर पळून आलो. इच्छा एकच.... तेंडूलकर वि. वॉर्न हे द्वंद्व परत बघायला मिळावं! आणि ते मिळालंही ! साहेबांनी कव्हर्सच्या डोक्यावरून एक कडक 'इनसाईड आऊट' चौकार मारला.... आणि वॉर्ननं एका बेहतरीन 'फ्लिपर' नं त्याची परतफेड केली. एका षटकाचा सगळा खेळ... पण ह्या एका षटकाला पार्श्वभूमी १९९२ पासूनच्या "खुनशीची" होती. गेली १८ वर्षं चालू असलेल्या लढाईतली ही एक छोटी चकमक होती. ह्यावेळी ती वॉर्ननी जिंकली इतकंच.

आणि ही फक्त एक फलंदाज विरुद्ध एक गोलंदाज अशी खुन्नस नाही हो. ह्या खुनशीची बीजं खूप खोलवर रुजली आहेत. चेन्नई कसोटी... सचिन पहिल्या डावात झे. टेलर गो. वॉर्न - ४. साहजिकच दुसऱ्या डावात सचिन फलंदाजीला आल्यावर मार्क टेलर वॉर्नच्या हातात चेंडू सोपवतो. षटकाच्या चौथ्या चेडूवर सचिन-वॉर्न आमने सामने येतात.... २ स्लिप, गली, सिली पॉईंट, शॉर्ट कव्हर, फॉर्व्हर्ड शॉर्टलेग.... मागून टिपिकल "ऑझी" स्लेजिंग. वॉर्नचा लेगब्रेक.... लेगस्टंपच्याबाहेर गोलंदाजाच्या 'फूटमार्क्स' मध्ये...वाघानं सावजावर झडप घालावी तसा सचिन त्या चेडूवर झडप घालतो आणि त्याला मिडविकटवरून प्रेक्षकांत भिरकावून देतो. आणि मग सुरू होते खरी "खुन्नस". आणि खुन्नस तरी कशी? डोळ्यांचं पारणं फेडणारी! प्रत्येकवेळी दोघं समोरासमोर आल्यावर आपल्या हृदयाची धडधड वाढवणारी. आता सचिनचा फटका सणसणत सीमारेषेच्या बाहेर जातो का वॉर्नचा चेंडू सचिनचा बचाव भेदतो अशी सतत उत्सुकता वाढवणारी.

खुन्नस... शब्दातच काय धार आहे ना? खुन्नस म्हटलं की नजरेला भिडलेली नजर आली... तू मोठा की मी वरचढ ही अहमहिका आली.... पहिला वार कोणाचा ही उत्सुकता आली... डावपेच आले.... तळपणाऱ्या तलवारी आल्या.... द्वंद्वयुद्ध आलं ! हेडन - हरभजन - सायमंडस मध्ये जो किळसवाणा प्रकार घडला ती हमरीतुमरी... ती खुन्नस नव्हे. हा... ९६ च्या विश्वचषकाच्या सामन्यात आमिर सोहेलनी वेंकटेश प्रसादला दिली ती खुन्नस.. तिची जातकुळी अगदी वेगळी! खरंतर रोज शेपूची भाजी आणि सार-भात खाणाऱ्या आमच्या "अहिंसक" गोलंदाजाला सोहेलनी उगाच "हूल" दिली आणि पुढच्या चेंडूवर विकेट (आणि इज्जत) गमावून बसला. ती एक प्रासंगिक खुन्नस झाली. खरंतर खुनशीच्या प्रस्तुत व्याख्येत ती खुन्नस बसतच नाही. खुन्नस म्हणजे दोन व्यक्ती अथवा संघांतली ती ईर्षा.. ती स्पर्धा... जी दोन्ही बाजूंना आपलं सर्वस्व पणाला लावायला भाग पाडते. क्रीडांगणावर अश्या खुनशी ह्या त्या खेळाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.

खेळांमध्ये खुन्नस एक जबरदस्त प्रेरणा ठरते. मग ती वैयक्तिक असो वा सांघिक. सध्या पटकन डोळ्यासमोर येणारी खुन्नस म्हणजे रॉजर फेडरर - रफेल नदालची. एक रंगांची मुक्त उधळण करीत प्रत्येक सामन्यात एक क्रीडाशिल्प साकारणारा कलाकार, तर दुसरा ताकद आणि प्रचंड कष्टांनी कमावलेल्या कौशल्याची कास धरणारा कर्मकार ! जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या स्पर्धेच्या अंतिम लढती ह्या दोघांत होतात. प्रेक्षक आणि टेनिस शौकीन आतुरतेनं ह्या लढतींची वाट बघत असतात.

बोर्ग - मॅकॅन्रो , एडबर्ग - बेकर, सॅंप्रास - अगासी... इतकंच काय पण फिशर - स्पास्की, कार्पोव - कास्पारोव, सचिन - वॉर्न, स्टीव वॉ - ऍंब्रोस, स्टेफी ग्राफ - मोनिका सेलेस, जो फ्रेझर - मोहंमद अली, शुमाकर - अलोन्सो, मार्शल - गावसकर .... कुठल्याही "खुनशी" जोड्या घ्या... सगळ्यांत दोन गुण समान आहेत. एक म्हणजे दोघांचा "वेगळेपणा" आणि दुसरा म्हणजे परस्परांविषयीचा आदर. म्हणूनच बोर्ग निवृत्त झाल्यावर मॅकॅन्रोच्या यशाची लज्जत कमी झाली, सेलेसला आपल्याच एका चाहत्याने जखमी केल्याचं स्टेफी ग्राफला दुःख झालं आणि सॅंप्रासच्या शेवटच्या सामन्याच्यावेळी अगासीच्या डोळ्यांत पाणी आलं.

काही वेळा तर ही खुन्नस वैयक्तिक न राहाता त्या संघाची अथवा देशाचीच होऊन जाते. मग एखादा जावेद मियाँदाद शेवटच्या चेंडूवर अविश्वसनीय षटकार मारतो किंवा एखादा जुगराज सिंग सोहेल अब्बास सारख्या कसलेल्या "ड्रॅग फ्लिकर" चा सणसणीत फटका सरळ आपल्या छातीवर झेलतो. क्रीडांगणावर तर भारत पाकिस्तानची खुन्नस नेहेमीच एक वेगळा रंग दाखवत असते. इंग्लंड - ऑस्ट्रेलिया, भारत - ऑस्ट्रेलिया, फुटबॉल मधली ब्राझील - आर्जेंटीना, आर्सेनल - चेल्सी, एसी रग्बीमधली इंग्लंड - स्कॉटलंड, बोट रेसिंग मधली ऑक्स्फर्ड - केंब्रिज .... नावं तरी किती घ्यायची? ह्या सगळ्या खुनशी एक नशा देऊन जातात! सहभागी लोकांना ११०% प्रयत्न करून सर्वोत्तम प्रदर्शन करायला भाग पाडतात. आपल्या मर्यादा ओलांडून नव्या यशाला गवसणी घालायला उद्युक्त करतात !

खुन्नस... मग ती अमेरिका - चीन मधल्या ऑलिंपिक्स वर्चस्वाची असो वा आंतरशालेय स्पर्धांत वर्षानुवर्ष अंतिम फेरीत लढणाऱ्या शाळांची.... क्रीडांगणावर ती खुन्नस नेहेमीच नवनवीन विक्रम - पराक्रम घडवीत राहील ! अश्या छोट्यातल्या छोट्या देखील खुनशीचा एक भाग बनता आलं तरी स्वतःला भाग्यवान समजावं. फक्त एक गोष्ट नक्की माहिती हवी की त्वेषानी खेळलेल्या सामन्यानंतर आपल्या 'खुनशी' प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत गप्पा मारत फक्कड चहा मारता यायला हवा!

क्रीडामौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

27 Jul 2009 - 6:17 pm | अवलिया

वा ! मस्त !!
सुरेख लेखन, असेच लिहित रहा !

विनायक प्रभू's picture

27 Jul 2009 - 6:20 pm | विनायक प्रभू

मस्त
असेच लेखन येउ द्या.

सूहास's picture

27 Jul 2009 - 6:18 pm | सूहास (not verified)

X( X( X(
सुहास

जे.पी.मॉर्गन's picture

27 Jul 2009 - 6:23 pm | जे.पी.मॉर्गन

लिखाण सुपूर्त करून काही क्षण नाही झाले तर लगेच प्रतिक्रिया आल्यासुद्धा!
मि पा चा विजय असो !
धन्यवाद मंडळी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jul 2009 - 6:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबई विरुद्ध राजस्थान म्याच पाहतांना मलाही सचिन आणि वॉर्नची खुन्नस पाहावी वाटली. आणि त्यात वार्न यशस्वी होऊ नये असे वाटायचे. सचिनच्या भात्यात उत्तम फटके असतांना, नेमका सचिन त्याला पॅडल स्वीप मारण्याच्या प्रयत्न करतो तेव्हा लेगबिफोरच्या धाकाने प्राण कंठाशी येतो. असो, खुन्नस पाहतांना मात्र मजा येते.

बाकीची खुन्नसही मस्तच मांडली आहे, अ़जून येऊ दे.

-दिलीप बिरुटे

प्रसन्न केसकर's picture

27 Jul 2009 - 6:29 pm | प्रसन्न केसकर

`खुन्नस' हीच अनेकदा उत्कटता आणि उत्कृष्ठता याची प्रेरणा ठरते हे खरे आहे.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

छोटा डॉन's picture

27 Jul 2009 - 6:58 pm | छोटा डॉन

मस्त लिहले आहेस रे भावा, खुप आवडले.
"स्फुट" ह्या ललितलेखनाच्या प्रकाराचा एक उत्तम अविष्कार ...

असेच अजुन येऊद्यात ...
आम्ही वाचतो आहोत.

------
छोटा डॉन
अत्यंत भयंकर आणि निष्ठुर असत्य हे बहुदा मौनातुनच सांगितले जाते...

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jul 2009 - 7:07 pm | परिकथेतील राजकुमार

खुप छान.

असेच आपले सुंदर लेखन येत राहु देत !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

27 Jul 2009 - 7:07 pm | नितिन थत्ते

पहिलाच चेंडू गुडलेंग्थ. वा! वा!! वा!!!

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

अनिल हटेला's picture

27 Jul 2009 - 7:38 pm | अनिल हटेला

असेच म्हणतो...

:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

टारझन's picture

27 Jul 2009 - 7:41 pm | टारझन

वा वा वा @!! केवळ अप्रतिम लेखण !!! मिपावर आत्तापर्यंत आलेल्या सर्वांत भारी लेखांपैकी एक ..
वाक्य न वाक्य काळजाला भिडले !!

जेचंद्र पीराव मॉर्गनसाहेबजी अजुनही असेच लेख येउन द्या !!

- टारझन
(हिणकस सेवा बंद करण्यात आली आहे)

घाटावरचे भट's picture

27 Jul 2009 - 8:54 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

पिवळा डांबिस's picture

27 Jul 2009 - 10:29 pm | पिवळा डांबिस

सुरेख विषय आणि त्याहून समर्थ लेखन!!!
वा, वा!!!
मिपावर क्रीडा विषयावरच्या समर्थ लिखाणाची उणीव भरून काढलीत!!!
चालू राहू द्या....

जृंभणश्वान's picture

27 Jul 2009 - 11:00 pm | जृंभणश्वान

भारी लिहिले आहे !

भडकमकर मास्तर's picture

27 Jul 2009 - 11:34 pm | भडकमकर मास्तर

उत्तम सुरुवात...
आता अशीच बॅटिंग चालू राहूद्यात...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

स्वाती२'s picture

28 Jul 2009 - 12:15 am | स्वाती२

लेख आवडला.

नंदन's picture

28 Jul 2009 - 12:24 am | नंदन

मस्तच, लेख आवडला. त्या वर्षीचा रणजी विजेता संघ मुंबई वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात ३/४ दिवसांचा सामना कसोटींआधी होता. त्यावेळी साहेबांनी ठोकून काढलेल्या २०४ धावा (१९२ चेंडूंत) आणि पाकिस्तानविरूद्धची ती ९८ धावांची खेळी - निव्वळ अप्रतिम!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

28 Jul 2009 - 12:38 am | ऋषिकेश

लेख आधीही वाचला होता.. तेव्हाही आवडला होता.. आता पुन्हा वाचून पुन्हा आवडला! :)

(स्फुटप्रेमी)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

Nile's picture

28 Jul 2009 - 1:29 am | Nile

वा खुन्नस आवडली! बर्‍याच खुनशी आठवणी ताज्या झाल्या! ;)

खुन्नसीमुळे तर खेळाला खरी मजा येते राव! :)

खरंतर रोज शेपूची भाजी आणि सार-भात खाणाऱ्या आमच्या "अहिंसक" गोलंदाजाला सोहेलनी उगाच "हूल" दिली आणि पुढच्या चेंडूवर विकेट (आणि इज्जत) गमावून बसला.

हे ब्येस!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jul 2009 - 12:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकास लिखाण!

फक्त एक गोष्ट नक्की माहिती हवी की त्वेषानी खेळलेल्या सामन्यानंतर आपल्या 'खुनशी' प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत गप्पा मारत फक्कड चहा मारता यायला हवा!

:-)
हा तर एकदम फिट्ट क्लायमॅक्स या सुंदर लेखाला!

अदिती

पोलिसकाका_जयहिन्द's picture

28 Jul 2009 - 4:50 am | पोलिसकाका_जयहिन्द

वाचताना खुपच मज्जा आली....
अजुन वाचायला आवडेल... येउ देत अजुन...

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

विशाल कुलकर्णी's picture

30 Jul 2009 - 2:42 pm | विशाल कुलकर्णी

सुरेखच, अजुन येवु द्या !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

ढ's picture

30 Jul 2009 - 2:58 pm |

अतिशय आवडलं आपलं लिखाण.

लगे रहो!

यशोधरा's picture

30 Jul 2009 - 2:59 pm | यशोधरा

फक्त एक गोष्ट नक्की माहिती हवी की त्वेषानी खेळलेल्या सामन्यानंतर आपल्या 'खुनशी' प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत गप्पा मारत फक्कड चहा मारता यायला हवा!

क्या बात है! मस्त! :)

सन्दीप's picture

30 Jul 2009 - 4:45 pm | सन्दीप

सई खुनशी आठवणी .अशीच बॅटिंग चालू राहूद्यात.

शशिधर केळकर's picture

30 Jul 2009 - 6:00 pm | शशिधर केळकर

वा, मस्तच मजा आली. एक मजेशीर सामना डोळ्यांसमोर आला.

बाबूजी - सुधीर फडके वि. ग.दि.मा. यांच्यातला!

गीतरामायणामधील गाण्यांच्या लिखाण व तत्काल चाली लावून आकाशवाणीवरून प्रसारित करण्याचा!

आणि सर्व होऊन गेल्यावर एकमेकांच्या मोठेपणाचे उदात्त कौतुक करण्याच्या अंतिम ओळींचा!
(खुनशी ) शशिधर

कपिल काळे's picture

30 Jul 2009 - 6:30 pm | कपिल काळे

मस्त लेखन, वेगळा विषय, सुंदर हाताळणी!!

दत्ता काळे's picture

30 Jul 2009 - 6:37 pm | दत्ता काळे

१९ एप्रिल २००७ पहिली टिट्वेन्टी - भारत - इंग्लंडचा सुपर एट मधला सामना. फ्लिंटॉप आणि युवराज ह्यांच्यात शाब्दीक चकमकमुळे निर्माण झालेली युवराजची तात्पुरती खुन्नस - स्टुअर्र्ट ब्रॉडच्या पुढच्याच ओव्हरमध्ये सहा रट्टेबाज सिक्सेस . . ना आपण कधी विसरू, ना ब्रॉड.

जे.पी.मॉर्गन's picture

31 Jul 2009 - 12:40 pm | जे.पी.मॉर्गन

क्या बात है काळेसाहेब.... अहो ती खुन्नस तर कशी विसरणार?? चौथ्या षटकारानंतरचा फ्लिंटॉफचा चेहरा आठवतोय ना? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2009 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त लेख. आवडला.

बिपिन कार्यकर्ते

प्रदीप's picture

30 Jul 2009 - 7:03 pm | प्रदीप

आवडले. असेच अजून लिहीत रहा.

संदीप चित्रे's picture

30 Jul 2009 - 11:18 pm | संदीप चित्रे

लेख आवडला एकदम.
साहेबांनी आणि सेहवागने २००३ वर्ल्डकपमधे शोएअब, अक्रम आणि वकारला चेचलं होतं त्याची आठवण झाली.

तुमच्या खुनशी जोड्यांमधे मार्टिना आणि ख्रिस एव्हर्ट ही अप्रतिम जोडी राहिली की !

>> म्हणूनच बोर्ग निवृत्त झाल्यावर मॅकॅन्रोच्या यशाची लज्जत कमी झाली, सेलेसला आपल्याच एका चाहत्याने जखमी केल्याचं स्टेफी ग्राफला दुःख झालं आणि सॅंप्रासच्या शेवटच्या सामन्याच्यावेळी अगासीच्या डोळ्यांत पाणी आलं.
>> फक्त एक गोष्ट नक्की माहिती हवी की त्वेषानी खेळलेल्या सामन्यानंतर आपल्या 'खुनशी' प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत गप्पा मारत फक्कड चहा मारता यायला हवा!

क्या बात है ! जियो !!

भाग्यश्री's picture

31 Jul 2009 - 1:15 am | भाग्यश्री

लेख मस्त आहे !!

खुनशीचे अजुन एक उदाहरण आठवले.. वेंकटेश प्रसादने आमिर सोहेलचा उडवलेला त्रिफळा.. http://video.google.com/videoplay?docid=-6195330196162848951

http://www.bhagyashree.co.cc/

फारएन्ड's picture

31 Jul 2009 - 1:34 am | फारएन्ड

मस्त लिहीले आहे. आवडले एकदम.

विसोबा खेचर's picture

31 Jul 2009 - 1:46 am | विसोबा खेचर

काही वेळा तर ही खुन्नस वैयक्तिक न राहाता त्या संघाची अथवा देशाचीच होऊन जाते. मग एखादा जावेद मियाँदाद शेवटच्या चेंडूवर अविश्वसनीय षटकार मारतो किंवा एखादा जुगराज सिंग सोहेल अब्बास सारख्या कसलेल्या "ड्रॅग फ्लिकर" चा सणसणीत फटका सरळ आपल्या छातीवर झेलतो.

सह्ही लेख आहे भिडू..! :)

तात्या.

राजू's picture

3 Aug 2009 - 12:53 pm | राजू

स्टेफी ग्राफ - मोनिका सेलेस, जो फ्रेझर - मोहंमद अली, यांच्या वर अजुन लिखाण करा.

आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.