उल्का

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
4 May 2009 - 2:02 pm

उल्का

उन्हाळ्याच्या रात्रीत मी बाहेर झोपतो,
झोपतांना काळेशार आभाळ पहातो.
काळ्याशार अंगणात शुभ्र चांदण्याचा सडा पडतो,
दर वेळी ठरावीक ठिकाणी प्रत्येक चांदणीचा थेंब दिसतो.
गेल्या पंधरवड्यापासून एक चांदणी वेगळी दिसते,
प्रत्येक थेंब शांत असतो, ही मात्र सतत हसते.
अचानक काल रात्री ती चांदणी खाली आली,
लोक म्हणाले, "ती चांदणी नव्हे, उल्का झाली."
मला तर असे वाटते, ती चांदणी कुणा ग्रहाच्या प्रेमात पडली,
आणि त्या ग्रहाच्या ओढीने स्वता:बिचारी भस्मसात झाली.

प्रेमकाव्यकविताआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

4 May 2009 - 2:22 pm | सायली पानसे

मस्त आहे कविता.. खुप आवडली.

दिपक's picture

4 May 2009 - 2:28 pm | दिपक

छान कविता!

चांदणी तुमच्या तर प्रेमात नाही पडली ना..? :)

पाषाणभेद's picture

4 May 2009 - 2:37 pm | पाषाणभेद

:H
नाही हो दिपकजी आपला काहीतरी 'ग्रह' होतो आहे.
प्रेमात ग्रहण लागलेला - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

सहज's picture

4 May 2009 - 2:54 pm | सहज

एकंदर प्रेमविवाहविरोधी किंवा प्रेमविरोधीच काव्य केलेत की :-)

अवलिया's picture

4 May 2009 - 2:59 pm | अवलिया

सहमत. हेच म्हणतो !

--अवलिया

पाषाणभेद's picture

4 May 2009 - 3:10 pm | पाषाणभेद

माझा तसा काही लिहायचा उद्देश नव्हता आणि अजुनपर्यंत तसा विचार पण ह्या काव्याबद्दल केला नव्हता.
सहज नैसर्गीक घटना मी मानवी स्वभावाच्या बाबतीत ताडून बघीतली इतकेच.

बहुतेक 'त्या' ग्रहाची खानदान की इज्जत आड आली असावी.
:-)
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

बेसनलाडू's picture

4 May 2009 - 11:03 pm | बेसनलाडू

(चांदोबा)बेसनलाडू
फक्त एक खुस्पट काढतो. काळेशार हा योग्य शब्द नव्हे; काळेभोर आणि निळेशार हे योग्य शब्द आहेत.
(छिद्रान्वेषी)बेसनलाडू

मराठमोळा's picture

4 May 2009 - 11:18 pm | मराठमोळा

>>फक्त एक खुस्पट काढतो. काळेशार हा योग्य शब्द नव्हे; काळेभोर आणि निळेशार हे योग्य शब्द आहेत.
मला ही हेच वाटलं होतं परंतु कवींना ही बंधने घालणे योग्य नव्हे किंबहुना ते स्वतःला ही बंधने घालुन घेत नाहीत म्हणुन काही बोललो नाही, असो..

इथे मला वाटलं की काळा आणी निळा रंग एकत्र केल्यासारखे आभाळ आहे म्हणुन "काळेशार" हा नवा शब्द वापरला असावा.

बाकी कवितेची कल्पना एकदम नविन आणी मस्त. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

पाषाणभेद's picture

5 May 2009 - 1:31 pm | पाषाणभेद

काळेशार हा शब्द विचारपुर्वक लिहीला गेला नाही, अगदी उस्पुर्त आला होता म्हणुन तोच ठेवला.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

क्रान्ति's picture

4 May 2009 - 11:06 pm | क्रान्ति

कविता खूप खूप आवडली. कल्पना एकदम सुन्दर आहे. अगदी नवीन!

:) :) क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

आयुर्हित's picture

8 Feb 2014 - 9:57 am | आयुर्हित

खुप सुन्दर कविता व कवितेचा आशय!
माझ्या मते खरे प्रेम हे हे असेच असते, ज्यात प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त आणि फक्त दुसऱ्याचाच विचार करत असते.

असे म्हणतात की न सुख कि भूख न दु:ख कि चिंता, प्रीत जीसे अपनाये

कवितानागेश's picture

8 Feb 2014 - 3:05 pm | कवितानागेश

खरच छान आहे रचना :)