नाते प्लेटॉनिक

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
29 Apr 2009 - 11:38 am

सकाळी सकाळी एक सुंदर कन्या कॅफे मधे आली. संगणकाबरोबर फोन पण चालु होते, कॅफेत आम्ही दोघेच असल्याने माझे कान सहजच तिकडे लागले होते. अंदाजे ४ थ्या कॉलला एक वाक्य कानावर पडले, "शट अप मॅन, माझे आणि त्याचे नाते प्लेटॉनिक आहे".
आता ही काय भानगड आहे ते कळेना. क्षणभर मला 'सापेक्षता वादाचा सिद्धांत' लागोपाठ दोनद वाचल्यावर येउ शकेल तसा मठ्ठपणा आला.

दोन मुनीवर्य नजरसमोर होते.
१. अवलिया. अवलिया ऑन लाईन नव्हते.

२.गुर्जी. हे पण गायब होते पण भ्रमणध्वनी उपलब्ध होता.

म्हणजे गुर्जीना विचारण्याशिवाय पर्याय नव्हता, एरवी मी व्यनी वगैरे करुन उत्तराची वाट बघतो पण आज फारच उतावीळपणा आला होता. लावला फोन.
गुर्जीचा तिसराच प्रश्न " तु मुळचा निपाणीचा का रे?"
आता हे नविन क्रिप्टिक काय मला कळेना.

"हो मी तिथला तंबाखुचा व्यापारी आहे, उत्तर सांगा आता." असे शब्द अगदी तोंडावर आले होते.

शेवटी "नाही हो मी पक्का पुणेकर" ह्यावर भागवले.

गुर्जी म्हणाले , काय योगायोग बघ, आज सकाळी माझ्या बायकोने हाच प्रश्न विचारला.(च्यायला काकुंनी कोणाचे बोलणे ऐकले असेल?) आणि मी सुद्धा ह्या विषयावर मिपा सदस्यांबरोबर(कोणाकोणाच्या डोक्याची मंडई केली यांनी?) चर्चा केली.

तुझ्या प्रश्नाचे उत्तरः विशुद्ध मैत्री

मी म्हणालो : अशुद्ध मैत्री पण असते काय? नीट समजवा की जरा गुर्जी.

गुर्जी म्हणाले, सुरुवातीला मैत्री प्लेटॉनिकच असते. हळु हळु प्लेटॉनिक म्हणता म्हणता कधी टॉनिक बरोबर खेळ (प्ले) होतो ते कळत नाही आणि मैत्री टेमकाग्रस्त (मदन बाण झिंदाबाद) होण्याची शक्यता असते.

"ह्याचा विदा काय?" मी विचारले (हा प्रश्न विचारला की मिपावरचे आपले श्रेष्ठत्व आणी जेष्ठत्व सिद्ध होते म्हणे.)

"ते डेमोग्राफी वर अवलंबवुन असते. " इती प्रभु गुर्जी.

आता ही काय नविन भानगड असते गुर्जी ? च्यायला पण शब्द आहे भारी, नको नको त्या ग्राफी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

"ठाणे, पुणे, मुंबई त हे प्रमाण वेगळे असण्याची शक्यता असते.पण माझ्या अनुभवानुसार १०% मैत्री प्लेटॉनिक असतात." गुर्जींच्या एकुण टोनींगवरुन आता शाळा संपली हे मी ओळखले आणी फोन ठेवला.

गुर्जीची शाळा संपली आणि मी विचार करु लागलो...
आजपर्यंत माझी सर्व मैत्री प्लेटॉनिकच की. खरच काय सुंदर शब्द आहे आणी शब्दाचा अर्थ देखील. पण मी काय कींवा आणी दुसर्‍या कोणी काय असे नुसते सांगुन लोकांचा विश्वास बसतो ? शिकल्या सवरलेल्या समाजाला सुद्धा 'मैत्री' ह्या नावाचे एक नाते असते हे पटते ?

प्रत्येक ओळखीला एक नात्याचे नाव खरच गरजेचे आहे ? "हि माझी मैत्रीण आहे, माझी सहकारी आहे किंवा ही माझ्या बरोबर शिकत आहे" येव्हडे उत्तर पुरेसे नाही ?

"हा माझ्या बरोबर ऑफिस मध्ये आहे किंवा आमचा बसरुट एकच आहे" हि कारणे कधी एकमेकांसमोर आल्यास बोलायला किंवा मनमोकळे पणानी वेळ घालवायला पुरेशी नाहीत ? ह्या सगळ्याला कायम नात्याची गरज का ? शेवटी समाज समाज म्हणुन आपण तरी कोणत्या नात्यानी एकत्र आलेलो असतो ?

येव्हडा सगळा विचार केल्यावर मग मला आपण फार मोठे कर्तुत्व गाजवल्या सारखे वाटायला लागले, भले प्रश्नांनी उत्तरे मिळाली नाहीत तरी. त्याच मुड मध्ये असताना अचानक एक प्रश्न सणकनी डोक्यात घुसला , काय रे "हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्‍याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?

कथामुक्तकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

अवलिया's picture

29 Apr 2009 - 11:41 am | अवलिया

खी खी खी

लै भारी रे परा !
नवे आंबे आले का रे बाजारात?

--अवलिया

नितिन थत्ते's picture

29 Apr 2009 - 12:27 pm | नितिन थत्ते

नानांना फोन न करता मास्तरना फोन केल्याचा हा परिणाम.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विनायक प्रभू's picture

29 Apr 2009 - 1:15 pm | विनायक प्रभू

नानांना फोन केला असता तर त्यानी ७००० वर्षापुर्वीचे उदाहरण दिले असते.
द्रौपदी आणि श्री कृष्णाचे नाते. एकदम प्लेटॉनिक.

अवलिया's picture

29 Apr 2009 - 1:53 pm | अवलिया

हाणा तिच्यायला गरीब नानाला !

'आता उरलो प्लेटॉनिक मैत्रीपुरता !! ' ..... अरे कोई है ?

--अवलिया

दशानन's picture

29 Apr 2009 - 2:11 pm | दशानन

=))

मास्तरांच्या तावडीत आज सापडलास =))

थोडेसं नवीन !

अमोल खरे's picture

29 Apr 2009 - 11:45 am | अमोल खरे

मी पाहिली आहेत बरीच उदाहरणे आसपास. विशेषतः वर्षानुवर्ष एकाच ऑफिसात काम करणारया खुप मुलामुलींची निखळ मैत्री असते.

निखिल देशपांडे's picture

29 Apr 2009 - 11:50 am | निखिल देशपांडे

परा मस्तच लिहितोस
क्षणभर मला 'सापेक्षता वादाचा सिद्धांत' लागोपाठ दोनद वाचल्यावर येउ शकेल तसा मठ्ठपणा आला.
"हो मी तिथला तंबाखुचा व्यापारी आहे, उत्तर सांगा आता."

असते रे प्लेटोनिक (ह्यापेक्षा विशुद्ध शब्द चांगला वाटतो) मैत्री
"हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्‍याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?

होय
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

शिप्रा's picture

29 Apr 2009 - 12:01 pm | शिप्रा

मस्तच लिहिले हाय..बाकि

>>हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्‍याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय
हे नवर्याला विचारुन बघायला हवे..
बरे झाले नवरा ऒफ़िस मधुन आला की पहिले त्याचे डोके खाते..:)
बाकी मी मात्र "हि माझ्या नवर्याची मैत्रिण" वगेरे ओळख करुन देउ शकणार नाहि...;)

श्रावण मोडक's picture

29 Apr 2009 - 12:02 pm | श्रावण मोडक

काय रे "हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्‍याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
काही प्रश्न असेच आणखी -
स्वतःच्या संदर्भात - ही माझी बायको असे म्हणाल की मी हिचा नवरा?
इतरांच्या संदर्भात - हा 'क्ष'चा नवरा अशी ओळख करून द्याल की ही 'य'ची बायको अशी ओळख करून द्याल?
या दोन्ही प्रश्नांमध्ये नात्यांचे संदर्भ बदला - बहिण-भाऊ, दीर-भावजय, मेहुणा (जीजाजी या अर्थी) - मेहुणी...
दोन्ही उत्तरांमध्ये काय फरक आहे हे इथल्या स्त्रीसभासद नक्कीच सांगतील.
स्त्री म्हणून त्या मानवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे कळून येते हळूच. गंमत म्हणून हा एक्सरसाईज कराच एकदा.
बाकी, कॅफेत आलेल्या किंवा कोणत्याही मुलीचा उल्लेख कन्या असा होतो तेव्हा त्या कन्या या शब्दाभोवती एक अवतरण दिसतेच हमखास!!! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Apr 2009 - 12:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिकल्या सवरलेल्या समाजाला सुद्धा 'मैत्री' ह्या नावाचे एक नाते असते हे पटते ?
खूप चांगला प्रश्न आहे रे पर्‍या हा! (असं मला तरी वाटतं!) अनेक भोचकांच्या अनेक "संदर्भा"तल्या एकाच प्रश्नावरून मलाही हाच प्रश्न पडायचा.

'स्पेस्ड' नावाची एक ब्रिटीश टी.व्ही. मालिका मी पहायचे. त्यात अशा अर्थाचं एक वाक्य होतं, "२१व्या शतकात मैत्र हा परिवार झाला आहे."

"हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्‍याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
हे वाक्य माझ्यातरी परिचयाचं आहे.

"ह्याचा विदा काय?" मी विचारले (हा प्रश्न विचारला की मिपावरचे आपले श्रेष्ठत्व आणी जेष्ठत्व सिद्ध होते म्हणे.)
हीहीहीही मिपावरच काय, कुठल्याही 'लेक्चर'मधे संदर्भासहीत हाच प्रश्न थोडा बदलून विचार, लोकं भारी मानतात लगेच! ;-)

(मैत्रीण) अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

बाकरवडी's picture

29 Apr 2009 - 12:16 pm | बाकरवडी

काही म्हणा पण सगळ्यांना पराच्या कॅफेत येणार्‍या कन्येचीच काळजी !
त्याला बिच्यार्‍याला कोण विचारतच नाही.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

विनायक प्रभू's picture

29 Apr 2009 - 1:10 pm | विनायक प्रभू

प्लेटॉनिक म्हणजे सखा
नॉन प्लेटॉनिक म्हणजे सख्या.
फोन केलास तेंव्हा बाजुला शेक्रेटरी होती बाबा, म्हणुन थोडक्यात आटोपले.
असो.
त्या कन्येचे म्हणशील तर सकृत दर्शनी असे वाटते की तीचे दोन अकाउंट आहेत.
एक प्लेटॉनिक दुसरा नॉन प्लेटॉनिक
तीला आलेला फोन बहुधा नॉन प्लेटोनिक चा असावा (डीस्टर्ब झाला असेल बिचारा)
आपला पत्ता कट होतो आहे का विचाराने.

अवलिया's picture

29 Apr 2009 - 1:57 pm | अवलिया

पण परवा सत्संगाच्या वेळेस तर तुम्ही कबुल केले होते... शेक्रेटरी प्लेटॉनिक आहे म्हणुन :)

--अवलिया

विनायक प्रभू's picture

29 Apr 2009 - 2:00 pm | विनायक प्रभू

म्हणुनच जरा लांब जाउन थोडक्यात बोललो.
आयला मला वाटले की निष्पाप प्रश्न - बघतो तर लेखच टाकला.
अशा विषयाने मस्तकशुळ होतो काहींना.

अवलिया's picture

29 Apr 2009 - 2:07 pm | अवलिया

निष्पाप प्रश्न -पाप प्रश्न हे 'सापेक्ष' आहे
तुम्ही असे करा आजपासुन फक्त प्लेटॉनिक प्रश्नच विचारत चला...
लेख पण नाही अन शुळ पण नाही... कसे ?
नाहितर, 'चुक्याच भाग दोन' येईल ! चालेल ?

--अवलिया

छोटा डॉन's picture

29 Apr 2009 - 1:36 pm | छोटा डॉन

आज सकाळीच लॉगईन केल्यावर प्रभुदेवांची "एक प्रश्न विचारु का ?" अशी खरड आली.
म्हटलं च्यायला मेलं आता, मास्तर सकाळी सकाळी धोतराला पलिते लावणार. कसेबसे धीर गोळा करुन "विचारा" म्हणले त्यांना ..

काय योगायोग आहे पहा प्रभुमास्तरांनी सकाळ-सकाळ हाच प्रश्न विचारला ...

>> प्लेटॉनीक नाते म्हणजे काय?
प्रश्न तसा सोपा आहे तसा इतका अवघड आहे की नक्की व्याख्या करता येणार नाही ...
असो.

माझ्या मते,
प्लेटॉनिक नाते म्हणजे कसल्याही स्वार्थाशिवाय (पैसा वगैरे ) कसल्याही माध्यमाचा ( शरिर वगैरे ) जाणुनबुजुन अथवा मुद्दाम वापर न करता केवळ विचार अथवा फ्रिक्वेन्सी जुळते आहे म्हणुन जे निर्माण होते ते प्लेटॉनिक नाते ...
ह्यात अर्थातच कसल्या अपेक्षांचे बंधन नसल्याने अपेक्षाभंग व ओघाने येणारा दु:स्वास वगैरे गोष्टी येत नाहीत ...
नात्यांचा ओढा हा फक्त भावना, विचार शेअर करण्यासाठी असतो. इथे सुख व दु:खे दोन्हीही तितक्याच उत्कटतेने वाटली जातात, यश साजरे केले जाते व पराभव पचवला जातो ...
मात्र हे करताना कसलाही स्वार्थ अथव अंतस्थ कु-हेतु इथे असत नाही,
इट इज जस्ट नॅचरल प्रोसेस ऑफ शेअरिंग विदाउट एनी स्वार्थ ...

उदा : मी आणि माझी एक मैत्रिण. आमचे असेच मस्त जमते.
मला तिच्याकडुन काही "हवे" आहे असे अजिबात नाही, ती ही कधीच कसला हट्ट करत नसेल. आम्ही दु:ख वाटतो आणि सुख साजरे करतो. गप्पा मारताना विषयांचे बंधन कधी येत नाही आणि कंटाळवाणे कधीच होत नाही कराण कसल्या भावना नाहीत ...
आम्ही आमचे विचार एकमेकांवर लादत नाही त्यामुळे वाद हे होतच नाहीत ...
आमच्यात पटणार नाही असे बरेच मुद्दे आहेत पण तो अडसर ठरत नाही कारण मुळात त्या मुद्द्यांना पाहुन दोस्ती ही झालीच नाही. मग त्यां मुद्द्यांना कवटाळुन भांडण्यात अर्थ नाही हे आम्ही म्युच्युअली ठरवले आहे ...
( एक स्पष्ट करतो की इथे "प्रेम" नाही, म्हणजे प्रेम आहे पण सामाजीक व्याख्येत ज्याला प्रेम म्हणतात ते प्रेम नाही. मैत्रिणीचे उदाहरण अशासाठी की त्याशिवाय आजकाल कोणी बोलणे ऐकुन घेत नाही, मित्र ना, मग गेला उडत असे असते ;) )

हे एक उदाहरण झाले, इथे मैत्रिणच हवे असे अजिबात नाही.
मित्र, आई-वडील, भाऊ, बहिण अगदी कोणीही असु शकते, नात्यांना अंत नाही ...
अर्थात ह्या माझ्या संकल्पना आणि व्याख्या झाल्या पण माझा फक्त तेवढाच संबंध आहे.

>>काय रे "हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्‍याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
का नाही ???
अगदी जरुर करु, अर्थात नाते तेवढे "मॅच्युअर" जरुर हवे ...
एक मैत्रिण आहे, लग्न वगैरे झाले आहे व वयाने माझ्यापेक्षा मोठ्ठी आहे बर्‍यापैकी. जेव्हा जेव्हा एखादा समारंभ वगैरे असतो तेव्हा आम्ही मित्र तिच्या घरी जातो. तेव्हा तिचा नवरा आमची ओळख " हा माझ्या बायकोचा दोस्त" अशीच करुन देतो.
तेव्हा ह्यात अगदी अतर्क्य आणि अनैसर्गीक काही नाही, सर्व गोष्टी "समजुतदारपणा" आणि "प्रामाणीकपणा" इथे येऊन थांबतात ...

तर तुम्ही एकदा स्वतःच आपला प्रामाणीकपणा व समजतदारपणा तपासा, मग असल्या प्रश्नांचा त्रासही होणार नाही आणि अवघडल्यासारखेही होणार नाही ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अवलिया's picture

29 Apr 2009 - 1:54 pm | अवलिया

उत्तम प्रतिसाद !
चांगला समुपदेशक होशील गड्या तु !

--अवलिया

संदीप चित्रे's picture

29 Apr 2009 - 7:42 pm | संदीप चित्रे

आवडला रे डॉन्या .....
>> प्लेटॉनिक नाते म्हणजे कसल्याही स्वार्थाशिवाय (पैसा वगैरे ) कसल्याही माध्यमाचा ( शरिर वगैरे ) जाणुनबुजुन अथवा मुद्दाम वापर न करता केवळ विचार अथवा फ्रिक्वेन्सी जुळते आहे म्हणुन जे निर्माण होते ते प्लेटॉनिक नाते ...

हे वाक्य विशेष महत्वाचं आहे.

दिपक's picture

29 Apr 2009 - 1:37 pm | दिपक

गुर्जी म्हणाले, सुरुवातीला मैत्री प्लेटॉनिकच असते. हळु हळु प्लेटॉनिक म्हणता म्हणता कधी टॉनिक बरोबर खेळ (प्ले) होतो ते कळत नाही आणि मैत्री टेमकाग्रस्त (मदन बाण झिंदाबाद) होण्याची शक्यता असते.
वाह क्या लाख रुपये की बात कही है गुर्जी.

निखळ मैत्री असते पण फार क्वचीत.

अवांतर: अजुन काय काय बोलत होती रे ती? :)

विनायक प्रभू's picture

29 Apr 2009 - 1:39 pm | विनायक प्रभू

भारी समुपदेशन रे डॉन्या
अभिमान वाटला रे तुझी प्रतिक्रिया वाचुन

परिकथेतील राजकुमार's picture

29 Apr 2009 - 2:45 pm | परिकथेतील राजकुमार

डॉनरावांचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच अत्युत्तम :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

"ह्याचा विदा काय?" मी विचारले (हा प्रश्न विचारला की मिपावरचे आपले श्रेष्ठत्व आणी जेष्ठत्व सिद्ध होते म्हणे.)"
:-)

"ठाणे, पुणे, मुंबई त हे प्रमाण वेगळे असण्याची शक्यता असते.पण माझ्या अनुभवानुसार १०% मैत्री प्लेटॉनिक असतात." गुर्जींच्या एकुण टोनींगवरुन आता शाळा संपली हे मी ओळखले आणी फोन ठेवला."

शहरानुसार त्यातील घटकही बदलत असतील का हा विचार मनात येऊन गेला.

प्लेटॉनिक शब्दाला अनेक छटा आहेत व त्या कालानुसार बदलल्या आहेत- वाचा

नंदन's picture

29 Apr 2009 - 5:00 pm | नंदन

डॉनरावांची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच भारी. प्रपंच या मालिकेतला हा प्रसंग आठवला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शितल's picture

29 Apr 2009 - 7:56 pm | शितल

निखळ मैत्री असतेच, फक्त ती जेव्हा एका स्त्री-पुरूषा मध्ये होते तेव्हा काही लोकांच्या कपाळा आट्या पडतात.

>>"हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्‍याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
हरकत नसावी.
मी माझ्या नव-याच्या मैत्रीणींची ओळख किंवा त्यांच्यात असलेल्या मैत्री बद्दल माझ्या मनात कधीच शंका येत नाही.

भाग्यश्री's picture

29 Apr 2009 - 10:56 pm | भाग्यश्री

सहमत.. असा प्रश्न आम्हाला कधी नाही पडला..
स्त्री-पुरुषांमधे निखळ मैत्री नक्कीच असते असा दोघांचाही विश्वास आणि अनुभव आहे..

www.bhagyashree.co.cc

माधुरी दिक्षित's picture

29 Apr 2009 - 8:23 pm | माधुरी दिक्षित

निखळ मैत्री असतेच, फक्त ती जेव्हा एका स्त्री-पुरूषा मध्ये होते तेव्हा काही लोकांच्या कपाळा आट्या पडतात.

सहमत आहे, आजही एका विवाहित स्त्रीची आणि पुरूषाची मैत्री असलेली लोकांच्या सह्ज पचनी पडत नाही.

क्रान्ति's picture

29 Apr 2009 - 8:27 pm | क्रान्ति

पराचा लेख तर खासच, पण छोटा डॉनचा प्रतिसाद अगदी चपखल! 'इट इज जस्ट नॅचरल प्रोसेस ऑफ शेअरिंग विदाउट एनी स्वार्थ ...' विशेष भावलं. विशुद्ध नात्याची त्यांनी केलेली व्याख्या १००% पटली. परा, विषय खरंच खास निवडला आहेस.
=D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्रकाश घाटपांडे's picture

30 Apr 2009 - 11:00 am | प्रकाश घाटपांडे

स्त्री-पुरुष मैत्री ही जेव्हा समाजमान्य नव्हती (आताही ती सर्वमान्य आहे असे नाही) तेव्हा हे नाते असायचे . पण सोयीसाठी त्याला गुरुभगिनी / भाउ असे म्हणत. म्हण्जे कसे अध्यात्मिक वाटते?
पं.नेहरु व लेडी माउंटबॅटन यांचे नाते प्लॅटॉनिक होते असे म्हणतात ब्वॉ. खरखोटं आपल्याला काय माहीत ?
असो
अवांतर-
मैत्री म्हणजे काय?
मित्र/मैत्रिण कोणाला म्हणावे?
हे ठरविण्याचे अधिकार कोणाचे? त्यासाठी निकष/पात्रता काय?
मैत्री तुटते म्हणजे काय होते?
मैत्री तुटल्यावर पुढे त्याला काय म्हणायचे?
शैत्री म्हणजे काय?
अत्रे व फडके, टिळक व आगरकर यांचे नाते मैत्रीचे कि शैत्रीचे?
अजातशत्रू कोण?
अजातमित्र कोण?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Apr 2009 - 12:16 pm | ब्रिटिश टिंग्या

नाईलाजाने निर्माण होणार्‍या नात्याला प्लेटॉनिक नाते म्हणत असावेत!

टारझन's picture

30 Apr 2009 - 12:24 pm | टारझन

=)) =)) =)) =))

मेलो !!

विनायक प्रभू's picture

30 Apr 2009 - 6:29 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो टींग्या भाई

वैदेहीजी's picture

8 May 2010 - 2:47 pm | वैदेहीजी

मग कधी कधी लग्नाने जोड्लेल्या साथी दारा पे़क्षा अशा "प्लेटॉनिक " नात्याचाच जास्त आधार वाटु लागतो कींवा जास्त भावनिक जवळिक आहे असे वाटु लागते तेव्हा त्य नात्याला काय नाव द्ययचे ?

-वैदेही

सिर्फ अहेसास हैं यह , रुह से महसूस करो ..
प्यार को प्यार ही रहेने दो, कोई नाम ना दो :-)

~ वाहीदा

इंटरनेटस्नेही's picture

8 May 2010 - 4:19 pm | इंटरनेटस्नेही

असेच म्हणतो!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

शानबा५१२'s picture

8 May 2010 - 2:59 pm | शानबा५१२

To,
परीकथेतला राजकुमार.

कडबा६९
तुझ्या कथेला 'तो' प्रतिसाद दीला म्हणून हे अस काय??
आवडला नव्हता तर काढुन टाकायचा ना यार!!
आणि माझ्या सारख्या उपेक्षीत लो़कांचा प्रतिसादही वाळीत टाकायचा असतो रे...........तांदळातुन खडा आणि दुधातुन माशी काढतात ना तसा.......जस आज मी स्वःताला समजतोय...माशी आणि खड्यासारखा कुठेतरी पडलेला.
प्लीझ ह्या प्रतिसादाची खेचु नकोस .......
बाकी मला नव्हत आवडल तो प्रतिसाद देउन.पण मानसिक रुग्नांचे काही problem असतात रे.तसे माझे आहेत,आता तु मला मानसिक रुग्न समजलास तरी हरकत नाही त्या कारणाने तु 'त्या' प्रतिसादाला तरी seriously घेणार नाहीस.
(it cn make sm1 feel sory 4 me bt it does nt mean dat,i jst wrote wat i felt)
Bye,have a nice time!

TO HIDE MY TEARS I DO MY CRYING IN THE RAIN.................. हे लिहणार होतो पण आता नाही लिहणार आहे ते राहु दे

*************************************************
एक उपेक्षीत...................शान............शानबा पण नाही आणि कडबा पण नाही.